वंदूनि श्रीराम संसार - साक्षीज्याचे अंकीं जानकी सारसाऽक्षीलोपा मुद्रेसीं तिसीं शब्द - मालाझाल्या अंर्पू त्याचि सर्वोत्तमाला ॥१॥
मारुनि रावण विदेहि - सुता - श्रमातेंनासूनि ये कलश - संभव - आश्रमातेंतो सिंधु बिंदु करि हा मनिं गर्व वाहेत्याची वधू विदितसे मति राघवा हे ॥२॥
न ती पुढें सेतु - कथा वदावीह्नणोनि सीते प्रति भाव दावीबोलोनिही सांवरिजे स्ववाचाहे शब्द तो सूचवि लाघवाचा ॥३॥
विचारी मनीं सर्व संसार - साक्षीजन्ही वारिली जानकी सारसाऽक्षीसदा सेतु - लीला निज - ध्यास तीतेंवदेल स्व - वाचें ऋषीचे सतीतें ॥४॥
यापरी कथुनि ते शुक - वाणीराम - गोष्टि असि कौतुक - वाणीक्षार - सिंधु करितांचि समुद्राहे करी कुशळ - बुद्धिस मुद्रा ॥५॥
सर्वा कथा कथि अगस्ति - वधूसि सीतेक्षाराब्धि - सेतु - रचना न कथीं सतीतेंकीं चूळ जो जलधिचा करि त्या मुनीचीकांता ह्नणेल तव वल्लभ - कीर्तिनीची ॥६॥
प्रमाण आज्ञा ह्नणवूनि रामावंदूनि जातां मुनिवर्य - धामापुसे तिला क्षेम तया प्रसंगींसंवाद हा राघव विप्रसंगीं ॥७॥
राम तो स्व - रत नित्य विरक्तहा नसेल तुजशीं अनुरक्तकीं असेल सुख तें वद सीतेसांग गोष्टिहि सुख - प्रदसी ते ॥८॥
काय बोलत असे अभिरामश्रांत तूज अवलोकुनि रामसांग अणिकहि वल्लभ - वार्त्ताज्या कथा करिति सौख्य भवाऽर्ता ॥९॥
स्व - रत अद्वय राम असे खरेंमजसि याचि गुणें रघु - शेखरेंस्थिर चराऽत्मपणें रमणें सयेजरि अहं ममताऽदिन यास ये ॥१०॥
विरक्त बाई रघुराज साचाभोक्ता नव्हे राजस तामसाचानया बहू कल्पतरुपमातेंहे सोहळे कल्पित - रुप मातें ॥११॥
जसि बहु रवि - तप्ता साउली गोड वाटेतसि वनिं पति - लाडें मानित्यें कोड वाटेघरिहुनि मज बाई सोहळे काननाचेसजल जलद संगें मोर वो का न नाचे ॥१२॥
पथीं भागे मागें परम - अनुरागें रघुपतीउभा राहे पाहे गुणहि मुनि हे हेचि जपतीकृपा पांगें अंगें निववि करि संसार धिवसाधरा माता भ्राता शशिच सविता होय दिवसा ॥१३॥
रघुपति सह शय्या भूमि हे माय वाटेमृदु सुपति हुनी ही मायत्या पाय वाटेश्वशुर दिनमणी ही होय एणाक भाऊन कळत जन ऐसें क्लेश निःशेष भाऊं ॥१४॥
पवन वन - सुवासें उष्ण होतांचि वाटेउपजवि सुख पुत्रा स्वामिनी ज्यासि वाटेतनु करि अनुसूया नित्य बोली सुगंधेंनव्हति अजुनि बाई म्लान पुष्पें सुगंधे ॥१५॥
तिघें पावलों अत्रिच्या आश्रमातेंतयाची वधू ते हरी वो श्रमातेंतंई हार हे गंध लाऊनि घालीस्व आतिथ्य कौशल्य दाऊं निघाली ॥१६॥
ये देखतां बहु कृपा मज दत्त - मातेपूजूनि ये रिति वदे सति उत्तमा तेवेणी फणी करिल वो तुज कोण वाटेवाईट हें मज म्हणे सति फार वाटे ॥१७॥
म्लानता कधि न यो सुमनातेंकेश क्लेश न करुन मनातेंगंध आर्द्रचि असो अनसूयादे असा वर न जीस असूया ॥१८॥
करतळ न दुखोंदे फोड वो जेवि पाणीवनिं धरि मन माझें येरिती चाप - पाणीकनक - मृग म्हणें तों पाटिसी राम लागेदश - मुख हरि ऐश्या माजि मेला मला गे ॥१९॥
मृग प्राण सोडी तंई दीन वाणीअरे लक्ष्मणा धांव ऐसी सुवाणीवदे तों मला राम वाणीच वाटेह्नणोनी बळें लाविलें त्यास वाटे ॥२०॥
न जातां तया बोलिलें दुष्ट वाचाअरे घात तूं इच्छिसी राघवाचातुला प्राप्त होणार कां देवरा मीधरीसी असा कां म्हणे भाव रामीं ॥२१॥
अशा शब्द - बाणीं सुमित्रात्मजालाअवो विधितां तो मृत प्राय जालारडे जाय तो राघवा लोक - पाळाकरुं काय आतां ह्नणे मी कपाळा ॥२२॥
जाय तो रडत दाढत कंठप्राप्त होय मजला दश - कंठपद्मिनी उपडितो गज हस्तींने तसा उचलुनी मज हस्तीं ॥२३॥
असि सकळ अनर्था मूळ माझीच वाणीधरुनि मज पळे तैं होय मी दीन वाणीबहुत मज निमित्यें राघवें शोक केलाकरुण ह्नणुनि न स्त्री काम कामीं भुकेला ॥२४॥
मजनिमित्त करी गडि वानरांसुलभ जो न सुरां अथवा नरांधरि मदर्थ असा व्यवसाय कींदश - सुखा वधि राघव सायकीं ॥२५॥
धरि करीं कमला कमला - पतीमथुनि सिंधु तसाचि मला पतीजलधि मध्य पुरींत तिचा धणीवधुनि दे मज आत्म - सुखें धणी ॥२६॥
जे जळांत बुडणार तीव्र तेथोर पर्वत अवो पतिव्रतेसागरीं तरति सेतु - वाट तेहे अतर्क्य करणीच वाटते ॥२७॥
परततां जल धीवरि पाहतेंतरति पर्वत विस्मित राहतेंजळ तळीं वरि हो धरणी सवेकरि नसे तुलना करणीस ये ॥२८॥
समुद्रावरी सैन्य ये पाय - वाटेमनीं हें सदां जीस आश्चर्य वाटेकसी सेतुची गोष्टि तीच्या सुवाचेनये बोल ते वीसरे राघवाचे ॥२९॥
शरीरीं भरे वर्णितां राम - वारेंउठाणें मनाची तंई दुर्निवारेंपतीची यशें जे निरोपीत जातेवदे गोष्टि हेही विदेहाऽत्मता ते ॥३०॥
विदेहाऽत्मजा पावली विस्मृतीतेंह्नणे बांधला सिंधु जों त्या सतीतेंजसें हास्य ये स्वामिचे भारतीतेंस्मरे तों स्फुरे हा चमत्कार तीतें ॥३१॥
क्षाराऽब्धि - सेतु झणि सांगासि तीस सीतेजीचा पती जळधि चूळ करी तसीनेशब्दांत या रघुपतीच खुणेस दावीकीं क्षार मूत्र असि गोष्ट पुन्हा वदावी ॥३२॥
ह्नणे लोपामुद्रा चुळ भरि समुद्रा करि पतीतया या आयासें - करुनि उतरे कां रघुपतीद्विजाच्या हो मूत्रा शिवति अपवित्रा न कपि तेह्नणे सीता नाहीं तरि सगिरि - सप्ताऽब्धिहि पिते ॥३३॥
लोपामुद्रेसीं असा राघवाचासंवाद श्री जानकीची सुवाचाबोले वाणी बुद्धि जे वामनाचीवर्णी रामीं हेचि सेवा मनाची ॥३४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.