मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
मुकुंदविलास

साहित्य

मुकुंदविलास

mukundavilasa

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

उद्धवाने कृष्णाला विचारलेल्या प्रश्नापासून सुरुवात. द्वारकेची सुधर्मा सभा, तिथे जमलेले यादव, आणि मध्यभागी शंखचक्र धारण केलेला हरी — वर्णनातून कथा पुढे सरकते. ‘नाम सुधा’ या संग्रहातील एक रचना.

स्वयें ईश सर्वज्ञही उद्धवानें पुसे नीति वंदूनि त्या माधवातेंतयाच्या वदों त्याच दिव्या कथार्था शुक - व्यास उक्ती वदोनी यथार्था ॥१॥
सुधर्मा सभा भोंवने वृष्णिचक्र हरी मध्यभागी करीं शंखचक्रघनश्याम हेमांबरी भासमान नये कोटि - कंदर्प - शोभा समान ॥२॥
पुढें नाचती संघ नृत्यांगनांचे जयाचें यथाभाग सर्वागनाचेसभे बैसले ते समीप द्विजानी यशें धार्मिकांचीं निरोपीत जाती ॥३॥
सकवच तनु सारें मस्तकीं टोप भारीयदु - मधु - वर ऐसे त्यामधें कैठभारीकरिं सशर धनुष्यें पाठिसीं पूर्ण भानेहरि मनि नयनीं ही येरितीची सभा ते ॥४॥
तों दूत ये एक विदेश - वासी साष्टांग वंदी प्रभु केशवासीप्रणाम त्यानंतर राजयाचा करी पुढें काळ बरा जयांचा ॥५॥
जरासंधें बंधें करुनि अयुत - द्वंद्व नृपतीबहू केले कष्टी मग हरि हरी हेंचि जपतीदुराशा राज्याची त्यजुनि अवघे पातक - मळस्वदृष्टीनें पाहूं म्हणति हरिचें पाद - कमळ ॥६॥
हरिचरण पहाया भूप जो तो भुकेलावध मगधपतीचा या सुखा हेतु केलाम्हणति शरण आलों मुक्ति देणार साचीपरि रुचिन तिला हे जे पदाब्नीं रसाची ॥७॥
म्हणुनि मारुनि मागध माधवा चरण सत्वर दाविं रसा - धवाधरुनि भाव मनीं इतुका महा वदनि दूतमुखें नृप काम हा ॥८॥
विनति संपवि दूत विशारद प्रगट होय अशांतचि नारदनमुनि त्यास सभासद वेष्टित प्रभु पुसे निज - पांडव - चेष्टित ॥९॥
स्वजन वत्सल लौकिक तांडव स्फुट करुनि म्हणे अजि पांडवधरुनियां असती असि कामना विदित भाव करी इतुका मना ॥१०॥
प्रश्नें हरी सुख करी मुनि - अंतरंगाशब्दांत दाउनि दयांबुधिच्या तरंगाजें मी वदेन म्हणतों पुरुषोत्तमातेंतें हा पुसे ऋषि म्हणे स्वयमेव मातें ॥११॥
मी पांडवांचेंचि बरें कराया प्रार्थू पहतों जगदेकरायात्याची त्वराया पुरुषोत्तमातें योजी स्वयें त्यावचनीच मातें ॥१२॥
मी भक्त माझ्या वचनास मान देणार सर्वत्र जरी समानया कारणें बोलविनो मला हो ऐशा मुनीला सुखधाम लाहो ॥१३॥
नमुनि मुनि म्हणे तो राजसूय - ऋतूतेंकरुनि यजिल राजा पांडुचा पुत्र तूतेंस्व - चरण - शरणातें चक्रवर्ती करायालव निज - करुणेचा दाविं लौकिक राया ॥१४॥
मिळतिल जन सारे त्या समस्तांत देवादिससिल हरि येथें सर्वभूतां सदेवाक्रतुवर म्हणुनी हा होय ऐसी कृपा हेकरुनी निज - अपांगें पांडवांलागि पाहें ॥१५॥
श्रवण कथन ज्याचें दुष्टही अंत्यजातीकरुनि तरति पापें भस्म होऊनि जातीऋतुवर हरि होतां त्या तुझे दिव्य पायेंत्रिभुवन जन पाहे तूंचि त्याच्या उपायें ॥१६॥
तुझ्या कीर्तीगाती अतळ वितळीं आणि सुतळींसहस्त्रां तोंडीं ही भुजगपति गातो अतितळींमनुष्यक्ष्मा - लोकी क्षिति - सुर स्फुर स्वर्गभुवनींवितान त्रैलोक्यावरि यश तुझें जी जनिं वनीं ॥१७॥
त्वत्कीर्ति जी त्रिभुवनीं जरि चांदवा हेमंदाकिनी चरणतोय अमंद वाहेगंगा दुजी तिसरि भोगवती हरी तेपादोद्भवा जगतिपातक संहरीते ॥१८॥
साम्राज्य या ऋतुमिसें अजि पांद वांतेंदेऊनि दाखवि जगीं यश - तांडवातेंभावें अशा यश निरुपुनि नारदानेंकेलें करुनि निजकार्य विशारदानें ॥१९॥
ऐकोनि गोष्टी मुनिनारदाच्या भक्तांचिया मुक्तिविशारदाच्याआधींच हें कृत्य अगाध वाटे तों देखिले यादव अन्य - वाटे ॥२०॥
गमें यादवां कीं नृपांचाचि धांवा धरुनी मनीं शत्रु आधीं वधावामुनी पांडवांचेचि संधीस पाहे मुकुंदास दोहींकडेही कृपा है ॥२१॥
पक्षद्वयावरि करुं म्हणतो कृपा हेसाक्षी हरी निजसभे मतभेद पाहेकीं मागधा वधिन नेउनि भीमसेनासंकल्प हा स्वकृत हें नमनी स्वसेना ॥२२॥
देग्वे हरी खवळले यदुवीर भारीहे नीति त्यास न वढे मधुकैठभारीकीं सांगतां बहु जरा - सुत - गर्व दूनेंनिःसीम कोप चढला सकळां यदूतें ॥२३॥
जरासंधवैरानुबंध स्मरावा वदूनीं तयांच्या करें तो मरावाअसी धाडितां गोष्टि भू - पाळकानीं यदृमाजि घेतीस गोपाळ कानीं ॥२४॥
पथीं पायीं जातां प्रगट नकरी माग धरणीपळाला सत्रादां हतबळ असा मागध रणींपुरीतें तूं जातां विमुख तुज त्या मार्ग गमनींस्वयें केलें मानीं मृगपतिस जैसा मृग मनीं ॥२५॥
करुनि गर्व अपार असा हरी प्रबळ आपण निर्बळ संहरीम्हणुनि मारुनि सत्वर या खळा करिं सुखी क्षिति सागरमेखळा ॥२६॥
श्रवण हें करितां बहु तापले अधर चाविति यादव आपुलेम्हणति हे अपकीर्तिच ऊघडी परिहरुं अरि मारुनि ये घडी ॥२७॥
तनुत्राणें देहीं तटतटित ऐसेचि फुगलेमुनी मध्यें बोले म्हणुनि अति सक्रोध उगलेअशातें गुन्ह्याचें कथन करितां विप्रवचनानिमित्त हे केली म्हणतिल नृपा शब्द - रचना ॥२८॥
सर्वज्ञ यास्तवचि लौकिक भाव दावीकीं नीतिउद्धवमुखें स्फुट हे वदावीत्यातें वदे सदय माधव हें स्ववाचाकीं उद्धवा नयन तूं निजर्वेभवाचा ॥२९॥
आम्हांस तूं तनुस नेश्र जसा तसारेवर्तो तुझ्याच वचनें यदुवीर सारेहें उद्धवा तुज विचार - रहस्य ठावेंकोणीकडे प्रथम सांग अगा उठावें ॥३०॥
त्रिभुवनपतिची हे आयके शुद्ध वाचाजनि विजनिहि कांदे तोष त्या उद्धवाचाविदित मन सभेचें दूत - देवर्षि - वाणीअणुभरि न जयातें बुद्धि - चातुर्य - वाणी ॥३१॥
म्हणे मुकुंदा मुनि - नारदानें जें बोलिलें बुद्धि विशारदानेंते योग्य सिद्धि स्वकरें कराया जावेंचि तेथें जगदेकराया ॥३२॥
शरण भूपति सोडवणें स्वरें मनिं असें धरिलें सुरशेखरेंपरि जरासुत - मृत्यु जधीं घदे उभय सिद्धि - कपाटहि ऊघडे ॥३३॥
जिंकोनि राजे सहसा धनानें जो राजसूय ऋतु साधनानेंआणील त्याला मखराज सिद्धि ते होंनदे भागधहं प्रसिद्धी ॥३४॥
मेल्याविणें तो सहसा धनानें नेदील होऊं ऋतु - माधनातेतैसाचि सोडील न त्यां नृपांतें दोन्हीं घडावीं खळ - घात - पातें ॥३५॥
रणीं मृत्युही त्यास देवा असेना जरी जाय अक्षोहिणी कोटि सेनाजरासंध तो द्वंद्वयुद्धीं वधावा घडे योग तेव्हां फळे भूष धाया ॥३६॥
जरासंधदेहास या दोनिभाग स्वहस्तेंचिरुनी करी जो विभागतयाच्या करें मृत्यु तो या खळाचा नव्हे अन्यथा घात उछृखेळाचा ॥३७॥
पाहिजे समबळीच खळा या देह - सांधिस बळें उखळायापाडुनी अयुत - नाग - बळानें कोण जी चिरिल त्या प्रबळातें ॥३८॥
भीम एक समसत्व नृपा था तोचि एक खळ - मृत्यु - उपायाहें रहस्य विरळांसचि ठावें सद्य यास्तव मखार्थ उठावें ॥३९॥
मगधपति वधावा जाउनी त्याच वाटेसमबळि अरि ज्याचा एकला भीम वाटेत्यजुनि सकळ इंद्र - प्रस्थभूमीस सेनागमन अजि करावें घेउनी भीमसेना ॥४०॥
जवळि तूं असतां अजि भीम हा चिरिल मागधसंधि उभी महाशिखिमुखीं वन अर्पुनि खांडव करि जसा रणि तांडव पांडव ॥४१॥
करुनि तूं जग मोडिसि माधवा परि निमित्त विधीस उमा - धवाकरिसि या रिति या कुरुनंदना करि पुढें यदुनंदन - नंदना ॥४२॥
परि द्वंद्वयुद्धार्थ तो सांपडावा चमत्कारयोगेंच फांसा पडावानदे ब्राम्हणा पाठि नेदूनि दान करावें तयाच्या वधा हें निदोन ॥४३॥
स्वयें विप्रवेषासि भीमें सजावें अकस्मान आतिथ्य - काळास जावेंम्हणें माग तों युद्ध देहें वदावें खडाण्या पशूतें तया हेंचि दावें ॥४४॥
असें द्वंद्वयुद्धीं हरी त्या नृपातें चिरावें क्षिती पाडुनी घात - पातेंतई याग तेव्हांच त्यां भूपतीतें घडे मुक्ति भक्तास्त्रियांच्या पतीतेंपदभ्रष्टा राण्या गिरिदरिं अरण्यांत असतीकितेका कुग्रामीं करुनि असती जी स्ववसतीदळाया कांडाया इतर गृहकृत्यास बसतीतुतें जेव्हां जेव्हां स्मरति इतराही नृपसती ॥४६॥
निजउनि नृपकांता पाळणीं वाळकांतेंस्मरतचि तुज गाती श्री जगत्पाळकातेंकरिसिल पतिमुक्ती मागधातें वधूंनीम्हणुनि भरवंसा हा मानिला त्यां वधूंनीं ॥४७॥
गाती तुझे विशद कर्म नरेंद्रकांनाकीं मारुनी रिपुसि सोडविशी स्वकांतागोपी जगीं क्षितिपति स्मरन स्वमायाइत्यादि बंध हरि कीर्ति जगीं सजाया ॥४८॥
व्रजसतीसह गाय वनींहरी धनद - दूत तई अबला हरीवधुनि ते खळ तो प्रभु त्या वधू त्वरित सोडवि मागध तो वधू ॥४९॥
जळचरें चरणीं धरितां करी करि सरोरुह काकुलती करीस्वगति जो तइंदे द्विरदाधिपा वरद तोचि वधू मगधाधिपा ॥५०॥
जनकजा हरिनां दशकंधरें वधुनित्यासहि कौस्तुभ - कंधरेंस्वपदही दिधलें स्वपतीस तो रिपुहर स्वपदप्रद दीसतो ॥५१॥
स्वजननी जनकें यदुशेखरें वधुनि कंसहि सोडविलीं खरेंकवण त्याविण मागध संहरी म्हणुनि भूपसत्या वदती हरी ॥५२॥
दुतबिलंबित - नृत्त तसा हरी नृपहि सोडवि मागध संहरीद्रुतकृपाळु मरवार्थ विलंबितो प्रभुस कार्य असे अविलंबितो ॥५३॥
चारि हे द्रुतविलबित - वृत्ते आयकोनि हरि चारिहि कृत्तेंपातला द्रुतचि अल्पविलंबें कार्य उद्भवहि त्या अविलंबें ॥५४॥
असे तो पुढें नीट जोडोनि पाणी असा उद्धवें प्रार्थिला चक्रपाणीम्हणें हेंचि गाती हरी लोक सारे हरी तूं न दुःखें हरीसी कसा रे ॥५५॥
गाती असेच शरणागत जे पदातेंव्यासादिकें मुनि अशा यशसंपदातेंऐसेंच उद्धव म्हणें हरि - भक्त सारेगातां न पावसि म्हणे हरि तूं कसा रे ॥५६॥
जरा संध हा सर्वथाही वधावा धरुनी असा हा बहू - जीव धांवाजई राज सूयाचिया क्षिप्र संधी हरी तोचि आम्हां अरी हे प्रसिद्धी ॥५७॥
नृपां राज्य साम्राज्यही पांडवांतें सुखी तृष्णिवृंदें करु तांडवातेंयशाची तुझ्या सर्वलोकीं प्रसिद्धी वधें मागधाच्या अतिक्षिप्र सिद्धी ॥५८॥
सविनय निपुणाची येरिती सिद्ध वाचापरिसुनि यदुवृंद स्वामि हा उद्धवाचामुनिवर नृपदूतें हर्ष पावोनि सारेम्हणति चतुर नाहीं उद्धवा तूजसा रे ॥५९॥
भीम एक कळला खळहंता यादवीं दवडिली स्वअहंतागोष्टि अप्रिय मना जई वाटे बुद्धि हे कसनि लावि सुवाटे ॥६०॥
हरी इंद्र प्रस्था गमन - करुनी पांहुतनयास्वभक्तांची वाणी सहजचि वदे त्या सुविनयासवेंनें भीमाते सहज करुणेंनें तदनुजाप्रकारें त्या मारी मगधपति दे राज्य तनुजा ॥६१॥
जसें गीत केले नृपांच्या वधूंनीं तसें सोडिलें मागधातें वधूनींहरुनी तयांच्या महा आपदेतें पदद्वंद्व दाऊनि दे संपदेतें ॥६२॥
न करुं म्हणति राज्यें भूप जे त्यांस देवेंपरिहरुनि अविद्या दीधलें त्यां सदेवेंमिळुनि बहुत राजे क्लेश फारां दिसांचेहरुनि विमळ केले दुग्धतापादि साचे ॥६३॥
नव्हे जागरीं कद्वक स्वप्नसेना प्रबुद्धांतसा बद्ध - भोगी असेनाअसें ध्यान लाऊनियां चिद्रसाचें दिल्हें राज्य कीं जें न वाटेचि साचें ॥६४॥
सदन्नें सद्वस्त्रें विविध सदलंकार निकरेंतयां शोभा केली अभय अभया देउनि करेंरयीं एका एका बसउनि कृपायुक्त - हदयेंतयां आज्ञा देतां गमन करिती भाग्यउदयें ॥६५॥
ते सोडऊनि अवघे नरदेव देवेयेऊनियां करविला ऋतु वासदेवेंयागांत मोक्ष शिशुपाळ - नृपास देवेंदेतां दिसे प्रकट सर्वजना सदेवें ॥६६॥
मुक्तिदायक मुकुंद - विलास ग्रंथ यास्तव मुकुंदविलासध्यान वामन मुकुंद - पहातें अर्पितां निज - मुकुंद - पदातें ॥६७॥
समाप्त.

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तुज
— तुला
मातें
— मला
घडे
— घडते, शक्य होते
अगा
— अरे (संबोधन)
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.