हरि ॐश्रीगुरु कृपाचंद्रोदयेसीं ॥ मतिउदधी भरती उल्हासी ॥ओव्या लाटा उसळल्या सरसी ॥ एकचढी एक ॥१॥
मायिका पंचभूतांचे बेटा ॥ लोटल्या पंचाशतत्रय लाटा ॥सदद्वयजळें पाडिला पिठा ॥ ठाव ना ठिकाणा ॥२॥
तेथ अक्षयवटपत्रावरुती ॥ सान रूपें गोविंद खेळती ॥तें म्यां पूर्वीपार्जित पुण्य अगणिती ॥ देखीयलें ॥३॥
तेणें आनंदलों भारी ॥ स्वपत्रपक्षें मारिली भरारी ॥लोटावें प्रभु चरणावरी ॥ म्हणोनियां ॥४॥
पुराण पुरुष बहु भोळे ॥ कधींच न देखती द्वैत डोळे ॥काय काय म्हणोनि दचकले ॥ लव मात्र् ॥५॥
विचार उपनेत्र लाऊनी ॥ जव पाहती निरुखोनी ॥तव आपुलीच देखियली वाणी ॥ आपणा पुढती ॥६॥
प्रेमें अंतराय काढिती ॥ शब्द ठाईंच्या ठाईं लोपती ॥अर्थ आपुला आपण स्वयंजोती ॥ प्रकटचि असे ॥७॥
नवल वर्षाऋतु हे होती ॥ कैसे चंद्र चकोर एकवटती ॥पूर्ण पोर्णिमेच्या तिथि ॥ स्वानंद भरें ॥८॥
नेत्रीं सुदितांणि आंजन ॥ डोळां देखतसें निधान ॥तेथ भूमीचें आवरण ॥ बाधूं न शके ॥९॥
तैसेच मुनि विद्यारण्य ॥ करुनी पंचक्कोश विवरण ॥दाखवती स्वात्म निधान ॥ श्लोक मात्रें ॥१०॥
“योवेदनिहितं गुहायां” इति ॥ बोलली तैत्तिर्य उपनिषधी श्रुति ॥तेंचि प्रमाण धरूनी वदती ॥ मुनिवर्य ॥११॥
येर्हवी पहातां निकें ॥ कोणवस्तु आवरण करूं शके ॥सूर्य आंधकारीं झांके ॥ हें कैं घडे ? ॥१२॥
परि अज्ञान तमें बुद्धि डोळे ॥ देखापणी झाले आंधळे ॥म्हणोनी श्रुति माता बोलें ॥ ज्ञान मंत्र हे ॥१३॥
तोचि घेउनी मतितार्थ ॥ श्लोकें पंचकोश विवरित ॥तयाचेचि आम्ही प्राकृत ॥ बोल बोलिलों ॥१४॥
भाषाभेदें अर्थ नाहीं भेदला ॥ नाना नामें परि पुरुष जैसा एकला ॥तैसाचि अर्थ पाहिजे घेतला ॥ सुजाण श्रोतीं ॥१५॥
गुहाहितंब्रम्हा यत्तत् पंचकोशविवेकत: ॥बोद्धुं शक्यं तत: कोशपंचकं प्रविविच्यते ॥१॥
यत जो प्रत्यगात्मा जाण ॥ तयाचें बुद्धिगुहेंत ठिकाण ॥तें समजण्या परम कठीण ॥ वाटाडया विण ॥१६॥
वेदा हा जेथील वाटाडी ॥ तया बोलें लंघिल्या कठीण दरडी ॥पावले गुहा पैलयाडीं ॥ मूनीवर्य ॥१७॥
तेथील तो सकळ देखावा ॥ अज्ञजना समजण्या सुलभ व्हावा ॥म्हणोनी पंचकोश विवरावा ॥ लागला तयां ॥१८॥
नाना अनेकी भ्रांती ॥ हीच गुहा म्हणोनी थबकती ॥तया लागीं ही उपपत्ती ॥ सुलभ केली ॥१९॥
जोडावया सत्य कण ॥ कोंडा काढून दाखवती जाण ॥तैसेंचि हें कोश विवरणा ॥ केलें वाटे ॥२०॥
इया विवरणा वांचून ॥ शक्य न होय वस्तु दर्शन ॥चिंध्या सोडितांचि जाण ॥ रत्न लाभे ॥२१॥
नाना पाण्यावरील बाबुळी ॥ सारूनी करितां वेगळी ॥द्दष्टी पैठतसे जैशी जळी ॥ तैसें होय ॥२२॥
देहादभ्यंत्तर: प्राण: प्राणादभ्यंतरं मन: ॥तत: कर्ता ततो भोक्ता गुहासेयं परंपरा ॥२॥
जड देहाचे डोंगरीं ॥ प्राण गुहा असे अंतरीं ॥तियेच्याही अभ्यंतरीं ॥ मनो गुहा ॥२३॥
मन गुहेच्या आंत ॥ विज्ञानमय कर्ता राहता ॥तयाचे ही आंतरांत ॥ भोक्ता आनंदमय ॥२४॥
एवं परंपरा जाण ॥ पंचकोश असती निर्वाण ॥तयांशीं गुहा उपलक्षण ॥ वेद बोलिला ॥२५॥
वेदें शब्दें दंश केला ॥ जड पोकळ बोलिला सकळां ॥येथ अर्थ नाहीं म्हणोनी प्राण्याला ॥ सुचना केली ॥२६॥
रायाचा शुद्धा संकेत ॥ करावया अभिव्यक्त ॥मंत्री जैसा बहु बोलत ॥ तैशा परी ॥२७॥
अन्नमयादि पंचकोश ॥ मुनि बिवरोनी दाविती सावकाश ॥कधींही न व्हावी मतिभ्रंश ॥ म्हणोनियां ॥२८॥
पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ॥देह:सोऽन्नमयो नात्मा प्राक चोर्ध्वं तदभावत: ॥३॥
मातापितरें अन्न भक्षिती ॥ तया पासूनी रेताची उत्पत्ति ॥तया रेतीं देह प्राप्ति ॥ हें ठाउकें सकळां ॥२९॥
एवं अन्नमय देह जाहला ॥ पुढें अन्नेची वाढूं लागला ॥म्हणोनी अन्नमय कोश तयाला ॥ बोलिताती ॥३०॥
अन्नाचा जो विकार होतो ॥ तया आत्मा कोण म्हणतो ॥आद्यंतीं अभाव असतो ॥ जया लागीं ॥३१॥
कार्य म्हणोनि नाशिवंत ॥ आत्मा सदा सर्वदा शाश्वत ॥एवं अन्नमय कोश नाहीं होत ॥ आत्मा जाण ॥३२॥
वादी - अन्नमय कोशाचा हेत ॥ बोलिला तो असे सत्य ॥परि तें कार्य आत्मा होत ॥ ऐसें कां न म्हणा ॥३३॥
पूर्वजन्मन्यसन्नेतज्ज्जन्म संपादयेत्कथम् ॥भाविजन्मन्यसन्कर्म नभुंजीतेहसंचितम् ॥४॥
सि० देहासीच आत्मा म्हणतां ॥ दोष येती आंगीं सर्वथा ॥आकृताम्यागमता ॥ आणि कृतविप्रणाश ॥३४॥
पूर्व जन्मीं हा देह नव्हता ॥ तैसाची आत्मा होईल तत्वता ॥मग हा जन्म कोणा वरता ॥ स्थापूं शकशी ॥३५॥
देहालाचि देहाची प्राप्ति ॥ हें ही न घडे कल्पांतीं ॥पूर्वजन्म, कोणाला निश्चिती ॥ लाविसी बापा ? ॥३६॥
येणें अकृताभ्यागमता ॥ आंगीं लागे तत्वता ॥आतां कृतविप्रणाशता ॥ तेंही सांगू ॥३७॥
हया देहाचा होतां अंत ॥ कर्म फळ भोग कोण भोगीत ॥कां कीं देहात्मा नाहीं होत ॥ तोचि भावी जन्मीं ॥३८॥
मग केलेलें कर्म जाण ॥ उपभोगाविण होईल क्षीण ॥कांकीं भोक्ताच नाहीं जाणा ॥ म्हणोनियां ॥३९॥
एवं प्रकारें करून ॥ दोष येताती दारुण ॥म्हणोनी अन्नमय कोशा न म्हण ॥ आत्मवस्तु ॥४०॥
वादी - बरें अन्नमय कोश आत्मा नव्हे ॥ देहाला चालक प्राण आहे ॥तया प्राणमय कोशाला आत्मा हे ॥ बोल लावा ॥४१॥
पूर्णोदेहे बलं यच्छन्नक्षणां य: प्रवर्तक: ॥वायु: प्राण मयोनासावात्माचैतन्य वर्जनात् ॥५॥
सि० - आपादमस्तक पर्यंत ॥ हा देहीं असे राहत ॥व्यान रूपें सामर्थ्य देत ॥ जड देहा ॥४२॥
चक्षुरादि इंद्रियांप्रेरक ॥ हाचि एक असे देख ॥अन्नाचाही परिपाक ॥ हाचि करी ॥४३॥
परि एक असे उणें ॥ समजेचें नाहीं जेथ ठाणें ॥म्हणोनी हीं अवलक्षणें ॥ जडापरी ॥४४॥
सुषुत्प तमाचे वेळीं ॥ हा असोनी देहा जवळी ॥मृतप्राय दशा आली ॥ कवण्या गुणें ॥४५॥
म्हणोनी हा ही आत्मा नोहे जाण ॥ कां कीं जेथ मुळींच नाहीं चैतन्य ॥जड काष्ठादि पाषाण ॥ जवा परी ॥४६॥
अहंतां ममतां देहे गेहादौ च करोति य: ॥कामाद्यवस्थया भ्रांतो मासावात्मा मनोमय: ॥६॥
वादी - जड म्हणोनी प्राणा उपेक्षिता ॥ मन तरी तैसें नाहीं तत्वता ॥जयाचे ठाईं चैतन्य सत्ता ॥ जागती असे ॥४७॥
सि०- हां हां बरें बोलिलासी ॥ देह गेहादि ममता जयापाशीं ॥हा मी हें माझें म्हणे अहर्निशीं ॥ वेडया परी ॥४८॥
कामादि विकारी भ्रांत ॥ होऊनी जो असे नाचत ॥तया भ्रांताशीं आत्मा निभ्रांत ॥ कोण बोले ॥४९॥
जन्मांधा म्हणसी डोळसा ॥ सूर्या परि वाखाणसी कोळसा ॥सूज्ञ जनचि म्हणसी पिसा ॥ जैशा परी ॥५०॥
तैसा मनोमय कोश भ्रामक ॥ न म्हण आत्मा सम्यक ॥जो सदांसर्वदां निभ्रांत देख ॥ चैतन्य रूप ॥५१॥
लीना सुप्तौ वपुर्बोधे व्याप्नुयादानखाग्रगा ॥चिच्छायोपेतधीर्नात्मा विज्ञानमयशब्दभाक् ॥७॥
बुद्धि होऊनी चिदायुक्त ॥ जागृती नखशिखांत व्यापत ॥निद्रे माजीं तीच लय पावत ॥ या नांव विज्ञानमय ॥५२॥
हा ही कोश आत्मा नव्हे ॥ कां कीं जेथ लयादि अवस्था आहे ॥आत्मा तैसा कधींच नोहे ॥ अवस्था रहित ॥५३॥
वादी - बुद्धि आणि दूजें मन ॥ हया दोंरूपीं एकचि अंत: करण ॥मग तयाचेदोन कोश कल्पून ॥ कैसे बोलिला ॥५४॥
कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतांतरिंद्रियम् ॥विज्ञानमनसी अंतर्बहिश्वैते परस्परम् ॥८॥
सि० - दोन्हीं रूपें एकचि अंत: करण ॥ परि एक असे कर्ता दुसरे कारण ॥मग तयांचें एकीकरण ॥ कैसें व्हाबें ? ॥५५॥
म्हणोनी कोश दोन बोलिले ॥ अंतर्बहिर्भेदें जाहले ॥कर्ता कारण म्हणियले ॥ बुद्धिमना ॥५६॥
अंतरीं राहता कर्ता जाण ॥ बाहेर येतांचि होतसें मन ॥म्हणोनी दोन कोश कल्पून ॥ बोलियलों ॥५७॥
काचिदंतर्मुखा वृत्तिरानंदप्रतिबिंबभाक ॥पुण्यभोगेभोगशांतो निद्रारूपेण लीयते ॥९॥
कदाचित्कत्वतोऽनात्मा स्यादानंदमयोऽप्ययम् ॥बिंबभूतोय आनंद आत्माऽसौसर्वदास्थिते: ॥१०॥
पुण्य कर्माचें फळ भोगितां ॥ वृत्तीची हौनी अंतर्मुखता ॥चिदानंद प्रतिबिंब पडतां ॥ सुख भोगी ॥५८॥
तोचि पुण्ययोग संपला ॥ निद्रारूपें जाती लयाला ॥ऐशा या वृत्ति कोशा म्हणितला ॥ आनंद मय ॥५९॥
तोही आत्मा नोहे जाण ॥ कां कीं जेथ अनित्यपण ॥एवं हे पंचकोश उपेक्षून ॥ टाकियले ॥६०॥
इयापंचकोशाचे पैलीकडे ॥ जयाचें प्रतिबिंब बुद्धींत पडे ॥आनंद नित्यपण कधीं ही न मोडे ॥ तोचि आत्मा ॥६१॥
इया लक्षण ॥ कोण करील विचक्षण ॥परि श्रुती बोलियली खुण ॥ त्याग लक्षणें ॥६२॥
सूर्य कैसा आहे तैजस ॥ म्हणतां कोण दावावें वस्तूस ॥तरी सकल वस्तु अप्रकाश ॥ होती जयापुढें ॥६३॥
हेम जैसें काम बोलणें ॥ तेंशींच आत्म्याचीं लक्षणें ॥कोण वाखाणूं तो वाखाणे ॥ मौनावले वेद ॥६४॥
वेदें घेतलें मौन ॥ तेथ आम्ही काय हुटहुटून ॥परि मुनि बोलियले म्हणोन ॥ बोलावें लागे ॥६५॥
ननु देहमुपक्रम्य निद्रानंदांतवस्तुषु ॥मा भूदात्मत्वमन्यस्तु न कश्चिदनुभूयते ॥११॥
वा० - अन्नमयादी आनंदमय पर्यंत ॥ गुहा शोधिल्या म्यां समस्त ॥तेथ द्दष्ठीस नाहीं पडत ॥ कांहीं एक ॥६६॥
कोणी वर्णज्योति पाहिले म्हणती ॥ तरी ते अनात्म पदार्थ निश्चिती ॥तया मूर्खाची नको गणती ॥ इया वेळीं ॥६७॥
आत्मा स्वद्दष्टीं पाहिला ॥ ऐस कोणी देखिला ना ऐकला ॥मग कां हा व्यर्थ गलबला ॥ करीत अहा ? ॥६८॥
कोणी अनुभव बोलती ॥ ते भ्रमिष्टाचे सांगाती ॥तुम्ही ही बैसाल तया पाती ॥ आहे म्हणतां ॥६९॥
वाढं निद्रादय: सर्वेऽनुभूयंते न चेतर: ॥तथाप्येतेऽनुभुयंते येन तं को निवारयेत् ॥१२॥
सि - तूं बोलिलासी यथार्थ ॥ कीं पंचकोशाचा अनुभव येत ॥बाकी नाहीं कांहीं दिसत ॥ आत्मवस्तु ॥७०॥
तरी विचारूं आतां तुपशीं ॥ कोण अनुभविता इया पंचकोशाशीं ॥तोचि आत्मा निश्चपेशीं ॥ ओळख बापा ॥७१॥
अनुभवस्त्यावीण अनुभव ॥ बोलणें होईल वाव ॥तरी तूंचआतां ठरीव ॥ कोण अनुभविता ॥७२॥
तूं जो ठराव करशी ॥ तोचि मान्य आम्हासी ॥आतां भ्रमिष्टाचे पंक्तीशी ॥ कोणी बैसावें ? ॥७३॥
स्वयमेवानुमूतित्वाद्विद्यते नानुभाव्यता ॥ज्ञातृज्ञानांतरभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥१३॥
स्वत: अनुभूती असतां ॥ कैशी येईल अनुभाव्यता ॥आपणचि आपुला विषय म्हणता ॥ होऊं न शाके ॥७४॥
तैसा सकल कोशाचा साक्षी ॥ तया अलक्षाशीं कोण लक्षी ॥काळासी ही मो कां मक्षी ॥ तया कोण खाये ? ॥७५॥
ज्ञातृ ज्ञाना विरहीत ॥ कोण ज्ञेय असे उभारत ॥तैसा आत्मा नाहीं होत ॥ अनुभाव्य कधीं ॥७६॥
सकळ कांहीं देखे डोळा ॥ परि आपुले रूपा हो पांगुळा ॥म्हणोनी काम तया आंधळा ॥ म्हणो येई ? ॥७७॥
सकळ रसातें चोखे रसना ॥ स्व्रस गोडी कधींच घेईना ॥म्हणोनी काय उणेपणा ॥ आला तिला ? ॥७८॥
तैसाचि हा आत्मा जाणा ॥ न होऊनी विषय कवणा ॥अस्तित्वाचा ठिकाणा ॥ ढळोंच नेदी ॥७९॥
माधुर्यादिस्वभावानामन्यत्र स्वगुणार्पिणाम् ॥स्वस्मिंस्तदर्पणपेक्षा नो न चास्त्यन्यदर्पकम् ॥१४॥
अर्पकांतरराहित्येऽप्यस्त्येषां तत्स्वभावता ॥मा भूत्तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते ॥१५॥
शर्करा लिंबादि जाती ॥ मधुर आम्लत्वादि असती ॥तयांसंगें इतरां येती ॥ माधुर्य आम्लता ॥८०॥
परि इतरांचेनी संगती ॥ काय ते आम्ल मधुर होती ॥नाहीं नाहीं तयाची जाती ॥ स्वय मेव ॥८१॥
म्हणोनी दुजिया वांचून ॥ जयाचा जो स्वभाव गुण ॥तो कधींच न होय पालटण ॥ जैसा तैसा ॥८२॥
तैसाचि हा, आत्मा जाण ॥ न हौनी अनुभाव्य पूर्ण ॥बोधात्माचि होऊन ॥ असे सदां ॥८३॥
त्रिपुटी विरहीत ॥ असे जयाची मात ॥तयाशीं त्रिपुटीचे आंत ॥ कैसा आणसी ? ॥८४॥
कोण पदार्थ डोळां देखे ॥ कोण रस रसना चाखे ॥कोण शब्द कर्ण ऐके ॥ जयापरी ॥८५॥
तैसाची आत्मा कोणाही कडून ॥ न होय सिद्ध प्रमाण ॥आंधकार सूर्य दर्शन ॥ कैसा देई ? ॥८६॥
वादी - एवं ऐसें जें तुम्ही बोलिलां ॥ श्रुतिप्रमाण कांहीं आहे ययाला ॥कां युक्तीनेंचि बोल संपविला ॥ तुमचा तुम्हीं ॥८७॥
स्वयंज्योतिर्भवत्येष पुरोऽस्माद्भासतेऽखिलात् ॥तमेव भांतमन्वेति तद्भासा भास्यते जगत् ॥१६॥
सि० - “अत्रायं पुरुष: स्वयं जोतिर्भवति" ॥ “तस्य भासा सर्वमिदं विभाति” ॥इत्यादि अनेक आहेत श्रुति ॥ प्रमाण इया ॥८८॥
जो स्वत: स्वयं प्रकाश ॥ तयाचेचि प्रकाशें सकलभास ॥तया प्रकाशनीं कोण्याही वस्तुस ॥ सामर्थ्य नसे ॥८९॥
येनेदं जानते सर्वं तत्केनान्येन जानताम् ॥विज्ञातारं केन विंद्याच्छक्तं वेद्ये तु साधनं ॥१७॥
यजाचेनि योगानें ॥ सकल वस्तु जात जाणणें ॥तयासी आतां कोण्याप्रमाणें ॥ सिद्ध करशी ॥९०॥
“विज्ञातारं केन विजानीयात् ॥ ऐसे अनेक श्रुतिसिद्धांत ॥तेंचि प्रमाण घेउन बोलत ॥ आम्हीं सदांसर्वदां ॥९१॥
वादी - मन सकलही वस्तु जाणें ॥ जयाठाईं असें ज्ञानाचें ठाणें ॥तयाशीं आत्मज्ञान न होणें ॥ हें कायी आतां ॥९२॥
सि० - “यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह” ॥ इति ॥बोलियली प्रमाण श्रुति ॥ अनुभव ही त्याच रिती ॥परि अज्ञात आंतर्यामि जाण ॥ तया कैसा कळे ॥९४॥
मनाचें जें मूळरूप ॥ तें तया कैसें ये समीप ॥आपणचि आपुला बाप ॥ व्हावें कैसें ॥९५॥
पाहतांचि कैसा होईल पाहणें ॥ ज्ञाताचि कैसा होईल जाणणें ॥आपणचि आपुले स्कंदीं बैसणें ॥ हें घडे कैसें ? ॥९६॥
कर्ताचि कर्म होता ॥ शास्त्रा येई विरोधता ॥म्हणोनि मन ही आत्मा जाणता ॥ होऊं न शकें ॥९७॥
स वेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता ॥विदिता बिदिताभ्यां तत्पृथग्बोधस्वरूपकम् ॥१८॥
‘स वेत्ति वेद्यं नच तस्यास्ति वेत्ता’ ॥ ‘अन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि’ इति ॥प्रमाणें बोलियली श्रुति ॥ तेंचि आमुची वाचा वदती ॥ जाहली श्लोकें ॥९८॥
अरे सकला जो वेत्ता ॥ तया कोण होय वेद्यकर्ता ॥ज्ञानाज्ञान विरहिता ॥ कैसा जाणसी ॥९९॥
बोधस्वरूप आत्मा जाण ॥ नाहीं जयाशीं अज्ञान आवरण ॥तयाशीं कोणतें प्रमाण धरून ॥ विषय करशी ? ॥१००॥
वादी - ज्ञानाचा न होय विषय ॥ अज्ञानाची मुळींच नाहीं सोय ॥तयांचा अनुभव तरी कैसा होय ॥ आम्हां सांगा ? ॥१०१॥
बोधेप्यनुभवोयस्य न कथंचन जायते ॥तं कथं बोधयेच्छास्त्रं लोष्ठं नरसमाकृतिम् ॥१९॥
सि० - श्रुति युक्ति प्रमाणद्वारें ॥ जया आंगीं बोध न शिरे ॥तया मूर्खाशीं कोण्या प्रकारें ॥ शास्त्रें बोधावें ? ॥१०२॥
ते नराकृती असती पाषाण ॥ जयासी न शिवे बोध जाण ॥शास्त्रें तयाशीं डावलून ॥ सदां जाती ॥१०३॥
द्विपद पशूंच्या जाती ॥ मनुप्यामध्यें कांहीं असती ॥ऐसें आचार्यही बोलती ॥ भाष्यांमधें ॥१०४॥
घटादि प्रत्यक्ष पहातां ॥ अनुभवी अनुभव नाहीं म्हणता ॥तया दगडाशीं बुद्धि माता ॥ सोडुनी गेली ॥१०५॥
जया जवळी नाहीं बुद्धि ॥ तया अनुभवाची कैची सिद्धी ॥नपुंसकाशीं रंभा विद्धी ॥ हें कैं घडे ? ॥१०६॥
जन्मांध असतां डोळा ॥ काय करील सूर्याचा गोळा ॥बधिरापुढें गायन लीला ॥ काय करती ? ॥१०७॥
तैसेची जड मंद मती ॥ तया नरा शास्त्रें काय करती ॥ऋद्धि सिद्धी आल्या कृपणाहातीं ॥ तरि कां दाता होई ? ॥१०८॥
जिव्हा मेऽस्तिन व्येत्युक्तिर्लज्जाजै केवलं यथा ॥न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति ताद्दशी ॥२०॥
जिव्हा आहे कीं नाहीं पुसणें ॥ हे बोलचि जैसे लाजिखाणें ॥तैसेचि खात्मबोध नाहीं म्हणणें ॥ हें घडे कैसें ? ॥१०९॥
आपणचि नाहीं म्हणशी ॥ तरी व्याघात होती बोलण्याशीं ॥जिव्हेविण कैसा पुसशी ॥ नाहीं आहे ऐसें ? ॥११०॥
तात्पर्य तुझाचि तुजला ॥ बोध न होता झाला ॥हें काय आणिकाला ॥ पुसावें लागे ? ॥१११॥
वादी - असो ऐसा बोध झाला ॥ तेणें काय फळ लाधला ॥प्रस्तुत ब्रम्हाज्ञानाच्या उपेगाला ॥ काया आलें ? ॥११२॥
यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ॥यद्बोधमात्रं तदब्रम्होत्येवंधीर्ब्रम्हानिश्चय: ॥२१॥
सि० - लोकीं जो जो विषय हो ज्ञानाला ॥ तो तो उपेक्षुनी हो टाकिला ॥शेवटीं तया ही ज्ञानाला ॥ उपेक्षावें ॥११३॥
विषय ज्ञानासीं उपेक्षोनी ॥ जें राही तें न टाकवें कोणाचेनी ॥तयाशीं च सकळ ज्ञानी ॥ ब्रम्हा बोलती ॥११४॥
हाचि बुद्धिचा निश्चय बाणणें ॥ तयाशींच ब्रम्हाज्ञान म्हणणें ॥हें स्वबोधाचेंनि योगें मिळणें ॥ होय सदां ॥११५॥
वादी - विषय ज्ञान उपेक्षितां ॥ ब्रम्हाज्ञान लाभें हातां ॥मग पंचकोश विवरितां ॥ कां जाहलां ? ॥११६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.