त्दृदयिं आठवुनी पदसारसावदतसे अवतार कथारसासुरस जो मुनिवाल्मिक गातसेसकळ रामकथा मुनि गा तसे ॥१॥
प्रगट रामचरित्र कलौ करीजितचि मुक्ति तया अजि लौकरीह्नणुनि गा रघुनायक राम हातदनु रुप विलास करा महा ॥२॥
शुक्लपक्ष मधुमास वसंतींरामजन्म नवमी तिथि संतींवर्णिली वदति अर्थहि लोकींत्या खुणा निपुण तो अवलोकी ॥३॥
योगीं अशा जन्म न राघवाचातो योग आला अशि गोष्टि वाचाकाळांत जो उत्तम जन्मकाळश्रीरामजन्मीं करिती सुकाळ ॥४॥
जनीं मनीं भक्ति कळा समृद्धिकेल्या जशा चंद्रकळा समृद्धिवाढे सुखें चंद्र मनोभिमानीतो शुक्लपक्षीं जन जन्म मानी ॥५॥
गोड रामरस केवळ संतींसेविला प्रथम मास वसंतींत्या रसें मधुर तो मधु झालाकीं जयांत अजि जन्म अजाला ॥६॥
ऋतूचा धणी सूर्य काळाभिमानीवसंतासि जो उत्तमत्वेंचि मानीवडिल स्ववंशीं प्रभु जन्मकाळींतया दाखवी उत्सहाच्या सुकाळीं ॥७॥
रामावतारार्थ जगीं भुकेल्याभक्ती जनीं त्या श्रवणादि केल्यानव प्रकारें भजती अजालाजन्म प्रभूचा नवमीस झाला ॥८॥
नवदिन नवरात्रीं भक्ति लोकीं करा होनवविध निज भक्ती लोकीं करा होनवरस नवमीस स्वामिचा जन्म झालानवरस नव अर्पा प्रीतिनें त्या अजाला ॥९॥
नवविधा नवरात्रिं महाधनेंगुणकथा श्रवणादिक साधनेंकरुनि सेवटिं आत्म निवेदनाभजति संत अहो रघुनंदना ॥१०॥
चित्त जो उपसमीपचि वासींराघवीं करिल तो उपवासीभक्ति वांचुनि दुज्या विषयातेंसेवितां सुख गम विषयातेंअयोध्येमधें लोक ऐसेचि सारेविनाराम जे नेणती हे पसारेतयाचेच गाती असे गीत नानान ज्या कीर्तनीं अन्यवार्ता तनाना ॥१२॥
टळटळित दुपारां जन्मला रामराणाह्नणुनि सकळ गाती ठाउकें हें पुराणादशरथगृहमाथां सूर्य आला अहो तोकुळटिळक पहाया तो चि मध्यान्ह होतो ॥१३॥
त्या सुखा रवि अखंड अपारावाटतें स्मरतसेल दुपारास्तब्ध यास्तव असेच घडी होकीं स्मरोनि सुख तें उघडी हो ॥१४॥
स्वयें अंतरिक्षीहुनी लेंकुरातेंअहो भास्करें लावियेलें करातेंझणी उष्ण लागे ह्यणें राघवातेंदुरुनीच दावी अशा लाघवातें ॥१५॥
सूर्य यास्तव असे गगनींचहें विचारुनि नये मगनीचेसाउली करुनि आडचि पाहेउष्त्म शंकित करी स्वकृपा हे ॥१६॥
छाया ह्यणे वाइल हे मला जेघेऊनियां हे कर हेमलाजेजातांचि मी अव्यवधान मातेंदेखोनि सोडील रघूत्तमातें ॥१७॥
आणिखी प्रगट कौतुक रीतीवाल्मिकि प्रभृति येथ करीतीमेष राशि पदवी बरवी होघे तईं तदवलंब रवी हो ॥१८॥
पुत्र उत्सह जयास विराजेउत्तमा सनिंच बैसवि राजेसूर्य ये परम उच्च पदातेंसेविती ग्रह समस्त पदातें ॥१९॥
प्रकटला प्रभु ज्या विमलक्षणींऋषि वरां सुखदे श्रुभलक्षणीह्यणति मारुनियां पुरुषाद हाकरिल शुभ्र यशें स्व दिशा दहा ॥२०॥
दशरथ स्वसुतानन पाहतोनिज सुखें सुखि होउनि राहतोजगपटीं सुखतंतु विराज तोप्रगटला नयनीं रघुराज तो ॥२१॥
रवीच्या करें श्यामता ये घनासीतया चाच संताप तो मेघ नासीतया सूर्यवंशी घनश्याम रामकरी काळ वैवस्वताचा विराम ॥२२॥
जसें चातकाला घनाचेंच पाणीस्वभक्तां तसा राम कोदंड पाणीह्नणुनी घन श्याम हा राम झालाजया कारणें जन्म घेणें अजाला ॥२३॥
बुंग बुंग रवतुंग मृदंगींसंग संग नटती स्व - त्दृदंगीअंग - भंग बहु दावित रंगींरामरंग - सुख सिंधु तरंगीं ॥२४॥
दुम दुम ध्वनि वाजति दुंदुबीसहित रावण राक्षसनृंद भीसुख नरां सकळां अमरां महाप्रगटतांचि रघूत्तम राम हा ॥२५॥
रविकुळांत रघूत्तम राम हाउपजतां सुख दे अमरां महासकळ पूर्ण मनोरथ मेदिनीकरि तयांत अहो प्रथमे दिनीं ॥२६॥
ब्रम्ह पूर्ण गुण वैभव लोकींजन्मतां मग धरा अवलोकीयोग्य लेंकिस गमे नवरा होजो मनीं ह्नणति मानव राहो ॥२७॥
तो हाणितां राघव दानवारीश्री भूमि संकल्प करुनि घालीविवाह तात्काळ करुं निघाली ॥२८॥
आणीक आनंद अपार झालाकीं लाधलें पायिंचिया रजालाऐश्या सुखें राघवजन्मकाळींजनासि घाली धरणी सुकाळीं ॥२९॥
असे सर्व भूतांसही वेगळालेदिल्हे सोहळे दोघ त्यांचे गळालेजळें न्हाणितां राम कोदंड पाणीमहादोष गेले ह्नणे आजि पाणी ॥३०॥
तारील पाषाण असे जळालावाटे ह्नणे दोष जळो जळालातेव्हा तरी तारक शक्ति रामदेईल आह्मासि मनोभिराम ॥३१॥
देखूनियां जन्म असा जालाआनंद मोठा उदकासि झालाऐसाचि आनंद समस्तभूतींश्री राघवाची करि हो विभूती ॥३२॥
भयें राक्षसांच्या सदा जो विझालास्वयें अग्नि तो दीप्त कुंडांत झालाह्नणे अग्नि आला मला पाळणारय या ऊपरी यज्ञही चालणार ॥३३॥
स्व सुत राघव दास्य सुखें करीविभव हें अवलोकिन लौकरीपवन घे असी राम सुखें धणी ॥३४॥
पुत्र राम परमानव साचाव्यर्थ अन्य परमा - नवसांचापुत्र वास चुकवी नरकाचादुर्गती न चुकवी नर कांचा ॥३५॥
रामभक्त सुत मानव लोकींतत्पिता न नरका अवलोकीगोष्टि हे अलिकडेंच वदावीत्यासि तो स्व पद राघव दावी ॥३६॥
वंशजांत करि राघव सेवाकीं कथा करिती त्यांत असे वासर्व वंश करि धन्य अहो तोयेकही नर असा जरि हो तो ॥३७॥
वंश धन्य करि राम धरवींअर्पितां त्दृदय राम चरित्रींपाडिली नगरि वोस यमाचीरामकीर्ति असि या नियमाची ॥३८॥
वायूस आनंद अपार झालाकीं याचिया पायिंचिया रजालालाधेल सेवील रघूत्तमातेंस्वपुत्र तो धन्य करील मातें ॥३९॥
श्रीराम जन्म समयीं जन राम रामप्रेमें ह्नणे ध्वनि उठे त्दृदयाभिरामआकाश तो निरवकाश सुखेंचि झालाकीं लोक शब्द कृतताप तंई विझाला ॥४०॥
एक शब्द गुण त्यासहि वाणीरामनाम न वदे जन वाणीखेद हा परम जो गगनासीराम शब्द सहजें मग नासी ॥४१॥
सुमित्रा सुताच्या अहो अग्रजालाजगीं जन्म झाला परेशा अजालाअसा सर्व भूतांसि आनंद झालाअपेक्षी अहिल्या पदांच्या रजाला ॥४२॥
ऋषि समस्तहि राघव कीर्तनीचरित गाति निरोपिति नर्त्तनींबहु सुखी ऋषि वाल्मिकि वैखरीकरुनि दाखविली निज वैखरी ॥४३॥
विश्वामित्र स्वामिच्या जन्म काळींनाचों लागे उत्सहाच्या सुकाळींकीं मी आतां आणिन स्वाश्रमातेंनाशी माझा राम हो या श्रमातेंभविष्यातें पाहे करुनि त्दृदयीं ध्यान मुनितो ॥४४॥
सुखें नाचों लागे चरित रघुनाथा नमुनि तोस्ववेंशीं रामाचे गुण रचित ऐसें समजलाह्नणें हे भाग्य त्रिभुवन वसिष्ठासि मजला ॥४५॥
श्रीमद्भागवतांत आणि इतर ग्रंथीं महाभारतींश्रीमद्रामकथा निरुपिलि वरी व्यासाचि ही भारतीगातां तेचि शुकादि गोत्र जवळी मध्यें वसिष्ठान्वयींमाझा वामन राम गाइल तंई लक्षूनि सर्वान्वयीं ॥४६॥
उपाध्याय रामास मानें मुनीं होस्ववंशीं स्मरे भक्त जो ने मुनी होसुखें राम सेवी अशा गोत्रजालास्मरोनी ऋषी - मात्र संतुष्ट झाला ॥४७॥
इत्यादि राम चरितीं रस हे अपारश्रीव्यासवाल्मिकिहि नेणति अंतपारहा ग्रंथ वामन निरोपित राघवाचावाचा हरील मग ते सकळाघवाचा ॥४८॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.