मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
रुक्मिणी पत्रिका

साहित्य

रुक्मिणी पत्रिका

rukmini patrika

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेले पत्र, सोळा श्लोकांत. कानावर पडलेले गुण, त्यांनी तीन ताप हरण केले, आणि ‘निर्लज्ज मन्मन हरी तुजला वरीतें’ — मनाने तुला आधीच वरले आहे, हे सांगणारी ओळ पहिल्या तीन श्लोकांत तीन वेळा वेगळ्या शब्दांत येते.

तापत्रयां हरिति श्रोत्र - मनीं रिघोनीत्रैलोख्य - सुंदर - तुझे गुण आइकोनीरुपा तुझ्या मदनमोहन - सांवळ्यातेंनिर्लज्ज मन्मन हरी तुजला वरीतें ॥१॥
श्रोत्यांचिया श्रवण - रंध्रिं रिघोनि चित्तींतूझे गुण त्रिविध ताप हरी हरीतीऐकोनियां भुवन - सुंदर या गुणातेंनिर्लज्ज चित्त हरि हें तुजला वरीतें ॥२॥
विद्या वय द्रविण रुप इहीं करोनीहा आत्मतुल्य पति हेंचि मनीं धरोनीजे सर्व - लक्षण - विचक्षण सत्कुलीताकोण्हीं नृसिंह नवरी तुजला वरीना ॥३॥
जे सर्व - लक्षण - विचक्षण आणि धीरातेही तुझे गुण असे जगदेकवीराऐकोन कोण नवरी न वरील तूतेंनिर्लज्ज यास्तव झणी म्हणसील मातें ॥४॥
देहार्पणा करुनि तूं पति म्या वरीलाजाया करीं हरि तुं नेउनि शीघ्र मालासिंहांगनेसि मज नेइल अंबुजाक्षाजेबूक चैद्य जरि तूं करिसी उपेक्षा ॥५॥
म्या तूज निश्वित मनें वरिलें अनंतायेऊनियां करिं धरुनि करीं स्वकांतासिंहांगनेसि मज जंबुक अंबुजाक्षानेईल चैद्य जरि तूं करिसी उपेक्षा ॥६॥
आराधिला जरि गदायज म्या अगण्येंपूर्तेष्ट - दत्त - नियमादि - बहूत - पुण्येंयेऊनियां करिं धरु मज चक्रपाणीचैद्यादि दुष्ट हरि हे नधरुत पाणी ॥७॥
स्वर्वेश्वरार्पणविधी करुनि अगण्येंकेलीं जरी असति कीं बहुजन्म पुण्येंयेऊनियां मज करीं धरि चक्रपाणीहे नातळोत दमघोसुतादि कोणी ॥८॥
त्वां गुप्त उद्दहनपूर्वदिनींच यावेंहोऊनियां मग स्वसैन्य - समेत हावेंचैद्यादिका मथुनि पौरुषश्रुल्क द्यावेंमातें निशाचर - विधी करुनीच न्यावें ॥९॥
लग्नाचिया पहिलिया दिवसांत यावेंसंगीं समय बळ यादव सैन्य घ्यावेंया चैद्य - मागध बळोऽबुधितें मथावेंमातें निशाचर - विधी करुनी हरावें ॥१०॥
बंधू तुझे न वधितां ग्रह - मध्यगा तूंनेऊं कसी असि जरी पुसतील मातूआहेच पूर्वदिवसीं गिरिजेसि यावेंत्वां येऊनी हरि मला हरुनीच न्यावें ॥११॥
अंतः पुरांतुनि तुझे नवधूनि बंधून्यावें कसें म्हणसि तूं जरि सौख्य - सिंधूयांचे कुळीं हरि असे कुळदेवि - यात्रातेथूनि तूं मजसि ने शतपत्र - नेत्रा ॥१२॥
रुद्रासि ज्या पद - रज - स्वपनाचि इच्छातैसीच संत करितील जयाचि इच्छायाचा प्रसाद नपवें जरि जन्मिं हेचीप्राण त्यजूनि शतवार वरीन तोची ॥१३॥
शर्वादि सर्व तुझि इच्छिति पाय - धूळीतूझा प्रसाद नव्हतां मज याचकाळींजन्मा शतांत स्मरणे मरणें मुकुंदाअंतें तुझ्याच वरणें चरणार विंदा ॥१४॥
हरि - चरण - सरोजीं रुक्मिणीची शिराणीविवाद - लिखित - रुपें बोलिली जे पुराणींमनुज - तनुज जैसा भूतळीं चक्रपाणीजगदद्य हरि भाषारुप हे व्यासवाणी ॥१५॥
असि विदर्भ - महीपति - पुत्रिका लिहि हरिप्रति संस्कृत पत्रिकालिखित - भाव तिचा वरवा मनें उकलिला त्दृदयांतुति वामनें ॥१६॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

मातें
— मला
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.