मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
साम्राज्यवामनटीका

साहित्य

साम्राज्यवामनटीका

श्लोक १–१५०

samrajyavamanatika

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

‘अनुभूतिलेश’ हा ग्रंथ पूर्ण करून तो शेषशायी हरीच्या पायी अर्पण केला, आणि त्यावर समश्लोकी टीका केली — हे कवी स्वतः पहिल्या श्लोकांत सांगतो. दीडशेहून अधिक श्लोकांची ही टीका.

लब्ध चिन्मकरंदातें वर्णी वामन ग्रंथिं या ॥अर्थानुभव हा घेतां मनोमोह न त्यागितां ।मुरतें स्वसुखानंदीं सर्वही तोचि पांहु तें ॥१॥
यास्तौ अनुभूतिलेश नामें संपूर्ण ग्रंथ हा ।करूनि अर्पिला पायीं शेषशायी हरीचिया ॥२॥
समश्लोकी असी टीका तो श्रीवत्सांक स्फूरवी ।तसी करूनि ते अर्पी त्याच श्रीपदपंकजीं ॥३॥
सत्यज्ञानानन्त आत्मा असे बम्हाचि निश्चयें ।असत् अज्ञान अल्पत्व निषेधानेंच जाणतो ॥४॥
आत्मा सत्य असद्देह अनित्य तद्विलक्षण ।आत्मा देह नव्हे तेव्हां असे अन्य तयाहुनी ॥५॥
देहात्मता निषेधें या पंचभूतें समातृक ।जातांतमोगुणें युक्त अन्नमय निषेध हा ॥६॥
आत्मा ज्ञान असे प्राण अज्ञान तद्विलक्षण ।तेव्हां आत्मा नव्हे प्राण असे अन्य तयाहुनी ॥७॥
प्राणात्मता निषेधानें इंद्रियें द्विप्रकार ही ।जातां रजोगुणासह निषेध प्राणकोश हा ॥८॥
आत्मा अनंतचि मन अल्पत्वें तद्विलक्षण ।आत्मा तेव्हां मन नव्हे असे अन्य तयाहुनी ॥९॥
मनात्मतानिषेधानें चित्तबुद्धि अहं मन ।जातां सत्त्वगुणेंयुक्त मनोमय निषेध तो ॥१०॥
कोशत्रयनिषेधें या आत्मता नाहिं जाणतां ।दावी गुरु नखशिखें साक्षित्वीं मग त्याहि ती ॥११॥
देहीं ब्रम्हांडिंही तैसा जो देहद्वयतीत त्या ।दिसे जेणें अहंराहू चंद्र आत्मा तयासची ॥१२॥
एवं कोशत्रयातीत आत्मा चंद्र तया मनें ।अहंकृच्छाखेपरता पाहती सत्त्वदृष्टिनें ॥१३॥
प्रळयीं जें जरे शेष निषेध शेषही तसें ।आदि अंतीं एकचि जें मध्येंही तें असेच कीं ॥१४॥
ब्रम्हांडीं प्रत्यकत्वें जे आत्मता कळतांच ते ।ब्रम्हांड उत्पत्ति लय आत्मत्वीं मग जाणती ॥१५॥
सृष्टी प्रळयज्ञानानें कीं आत्मा सत्यकीरण ।यास्तौ भासे जगजळ न तें सत्य असत्यचि ॥१६॥
देह द्रष्टा भिन्न स्थूळ सूक्ष्म देह चराचरा ।साक्षित्वें जाणता सर्व वास सर्वत्र यास्तव ॥१७॥
कोशत्रय जडोपाधीनिषेधें आत्मसिद्धता ।झाली मनोमया कोशीं शुद्धी ते वंपदात्मक ॥१८॥
न मोडे परि संस्कार अविद्येचे अनादि ते ।मोडती तेहि विद्येनें जाणतां तत्पदात्मक ॥१९॥
जीवात्मता वंपदेंची तत्पदें परमास्मता ।विद्याऽविद्योपाधित्यागें ब्रम्हा असें ‘असी’ पद ॥२०॥
जो आकाशघटमठीं महदाकाश तो असे ।आत्मा तसा स्वप्रकाश जणती दोहिं ठायिं त्या ॥२१॥
जो जेथें देखिला होता तेथें आतां दिसेच तो ।ते देशकाळ टाकीतां असे पुरुष एकची ॥२२॥
उभयोपाधिनीराशें ब्रम्हानुभव होतसे ।परि विद्या शुद्धसत्त्व ब्रम्हानुभव हा तिणें ॥२३॥
अविद्या उपाधि जसा घटदेह तसा मठ ।विद्योपाधिही ब्रम्हांड निराशें ब्रम्हा जें महत् ॥२४॥
देहीं ब्रम्हांडिं त्या बाहय असे एकचि ब्रम्हा तें ।तोचि कूठस्थ जो देहीं अभोक्ता बिंब आत्मता ॥२५॥
कूटस्थापासुनी होते वृत्ति सत्त्वजळींच त्या ।तेंचि कूटस्थ चैतन्य प्रतिबिंबें तयासची ॥२६॥
जीवात्मा प्रतिबिंबात्मा भोक्ताही वदति श्रुती ।वृत्तियोगें चेततौनी इंद्रियां विषयां भुतां ॥२७॥
एवं सर्वहि तें एक अनात्म तद्विलक्षण ।वसे आत्मा वृत्ति ज्यांत साक्षित्वातीत देहिं जो ॥२८॥
कूट्स्थ वदती त्यातें ब्रम्हांडींहि मठस्थ तो ।महत् जो त्याहि बाहेरी असे एकचि ब्रम्हा तें ॥२९॥
तत्त्वमस्यर्थश्रवणें अविद्याग्रंथिसूटतां ।प्रकटे ब्रम्हा विद्या जों समाधि निर्विकल्प तो ॥३०॥
होतां ब्रम्हाकार चित्त तें ब्रम्हा जग पाहती ।‘सवं खलु इदं ब्रम्हा’ अभिप्रायें श्रुतीचिया ॥३१॥
निराकारचि हें सर्व निश्चयें वाटतें परी ।होतां अंगीं विकारित्व जाणती त्या गुरूक्तिनें ॥३२॥
ठसतां निश्चयो चित्ता देह ब्रम्हांडपासुनी ।जें जें आठवतें तें तेम निराकारचि जाणता ॥३३॥
कीं जें भासे जगजळ से आत्माच कीरण ।सत्यें भासे जें असत्य नसे तें सत्यची असे ॥३४॥
विनाचैतन्य हें विश्व न भासे जड कांहिंच ।चित्स्फूर्तिनें जड स्फुरे ब्रम्हाद्वैत अखंड तें ॥३५॥
दोरची सर्प तंतूच पट मातीच तो घट ।समुद्रलहरी हेम अलंकार असे परी ॥३६॥
आत्माच आपला ब्रम्हा तो सर्वात्मपणें असे ।जाणती सर्व भूतांतें आत्मत्वेंच करूनियां ॥३७॥
बळें ब्रम्हा चित्प्रकाश प्रपंच पाहतां दिसे ।ये हातासहि तें ब्रम्हा घट मातीबळें जसी ॥३८॥
माती हेमीं नग घट शुक्तीं रजत शब्दची ।दोरीं सर्पनाम जसें ब्रम्हीं जीवत्वही तसें ॥३९॥
मन प्राण इंद्रियेंही सत्क्रिय ब्रम्हा सर्व तें ।सात्वीक धारणें पाहे स्फुरे नगचि हेम तें ॥४०॥
नामें रूपें क्रिया सर्व ब्रम्हचि धरिती स्वयें ।नग शाश्वत् जसें हेम जग शाश्वत ब्रम्हाची ॥४१॥
कारणीं कार्य पाहातो जड दृष्टीस तें नसे ।चित्स्वरूपीं जड वसे हेमीं नग असे परी ॥४२॥
येतां अनुभवा सर्व निराकारचि ब्रम्हा तें ।परि आकार जो दृश्य न राहे काळशक्तिनें ॥४३॥
आकार वाटत मना कल्पनेंच करूनियां ।कल्पना विषयेंद्रीयें जाणती ब्रम्हादृष्टिनें ॥४४॥
व्याप्य व्यापक आत्माचवदताति असें श्रुती ।ऐसें समजतां तत्त्व जडभेदा नुरे उरी ॥४५॥
प्रियत्वें ज्या प्रीति होय पुत्रवित्तादिकीं परी ।तुटे काळें स्वप्रियत्व असें दु:खहिभोगितां ॥४६॥
हेम सर्व अलंकारीं ब्रम्हा तैसें चराचरीं ।दृष्टी हेमावरी आधीं भूषणें मग दीसती ॥४७॥
हे श्रीगुरूकृपाउक्ती जोंवरी मनिं स्थीरता ।सर्व ब्रम्हा ठसावे तैं समाधीस विशेष तो ॥४८॥
प्रिय आत्मा दु:ख देह दृढ निश्चय्जो असा ।चित्त चित्स्वरुपाकार समाधि स्थिति ते असे ॥४९॥
विज्ञानमय हा कोश जेथ ब्रम्हाचि अद्वय ।वैराग्यें आणि अभ्यासें सिद्ध आनंद कोश तो ॥५०॥
जागृती स्वप्न सुषुप्ती अव स्थात्रयतीत जे ।तुर्या एकपणें पाहे तेव्हां अनुभवी असे ॥५१॥
समुद्रीं लहरी जैसी आत्मत्वीं वृत्तिही तसी ।ल हरीच जळ जसें वृत्तीच ब्रम्हा तें तसें ॥५२॥
लहरी वृत्ति जे धांवे चित्समुद्रीं न त्या फुढां ।सिद्ध अस ब्रम्हाजळ वृत्ती लहरिरूपि त्या ॥५३॥
आकार जो कल्पि मन तो निराकार बुद्धिस ।विश्व जें इंद्रियां भासे बुद्धीस ब्रम्हा तें असे ॥५४॥
जेथें लक्षी शुद्ध सत्त्व ब्रम्हाची अन्य नाठवे ।जेव्हां वृत्तीशून्य़ चित्त उन्मनी स्थिति ते मग ॥५५॥
लय आणिक विक्षेप विन्घ जें कल्पनात्मक ।युक्ताहारविहारानें लय निद्रा न बाधते ॥५६॥
मोडे तत्त्व स्मृतीनें तो विक्षेपसह कल्पना ।तेव्हां आनंद हा कोश सिद्ध होय न त्याविण ॥५७॥
घ्येय नसे अन्य शुद्धचैतन्यची असे ।अनंतसुख अपार आनंदमय कोश तैं ॥५८॥
नाठवे अन्य कांहींच एक आत्मखुणे विना ।आठवे जैं जें जितुकें आत्मा आपण तीतुकें ॥५९॥
आत्मप्रतीतीमात्रच ना ते स्मृति न विस्मृती ।आनंदाचा अनुभव कोश आनंद यास्तव ॥६०॥
अनंतानंत ब्रम्हांडीं अलंकारीं सुवर्णवत् ।आपणचि निराकार आनंदाद्भववैभव ॥६१॥
तेंच हें सगुण ब्रम्हा म्हणूनि श्रुतिवर्णिते ।‘पुरुष एवेदं सर्व’ पुरुष जाण सर्वही ॥६२॥
पुरुष म्हणतां येतो प्रकृतीसहि घेउनी ।व्यापी आपणचि जग सगुण ब्रम्हा तें असे ॥६३॥
अव्यक्ततत्त्व प्रकृति ब्रम्हानुभूति ब्रम्हा जें ।अनूभवात्मक त्यातें सगुण ब्रम्हा बोलिजे ॥६४॥
व्यापिलें जग ब्रम्हानें रज्जूनें सर्प ज्या परी ।असें तें जग ब्रम्हींच सर्प रज्जूमधें जसा ॥६५॥
न तें ब्रम्हा जगामाजी न रज्जू सर्पिं त्यापरी ।जग ब्रम्हीं नसे तेंही जसा सर्प न अरज्जुंत ॥६६॥
एवं चारी प्रकारेंही जग नाहींच जें असे ।ब्रम्हा तें सगुण ब्रम्हा असावें जाणुनी तया ॥६७॥
आकार जो दिसे तोचि योग ऐश्वर्यची असे ।योग तो युक्तिचातुर्य सामर्थ्य ऐश्वरचि तें ॥६८॥
आहे वस्तु परब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ।युक्ति चातुर्य तें ऐसें कीं सामर्थ्यचि तें तसें ॥६९॥
ज्याचें सामर्थ्य ऐश्वर्य असें कीं तोचि तें स्वयें ।भगवंताय त्या विश्वाकाराय च नमो नम: ॥७०॥
हा अघटीतघटना योगाइश्वर्य गूण जो ।सिद्ध यांत असें ब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ॥७१॥
दिसोनि जग तें नाहीं ऐश्वर्यीं ज्ञान प्राप्त जें ।ज्ञानीं त्या सिद्धस्वरूप त्रिगुणातीत निर्गुण ॥७२॥
जाणे चिच्छक्ति त्या ज्ञानीं सतस्वरूप असज्जग ।परी कल्पी जग हि ते कल्पनासह तें जग ॥७३॥
मिथ्या स्थाणुत्वीं पुरुष जाणे ज्ञानगुणेंच त्या ।तेव्हां जगचि तें ज्ञान वैराग्य सिद्ध त्यांतची ॥७४॥
प्रिय सत्य स्वरूपची असत्य जगिं अप्रिती ।श्रुतिज्ञ जो तया मिथ्या रजतीं अप्रिती जसी ॥७५॥
वैराग्य गुण हा त्यांत झाला धर्म फलद्रुप ।भवबंधन त्या धर्मीं मिथ्याच जग जाणतां ॥७६॥
धर्में सत्कर्म समता कर्माचें फळ देउनी ।सदयें तरुणोपायें सन्मार्गीं जीव तारिले ॥७७॥
धर्में अशा कल्पिलें तं ज्ग कर्म तुझें असे ।तें ब्रम्हा तूं दयायुक्त सगुण समनाथ ही ॥७८॥
शुद्ध सत्त्व तुझा धर्म नाहीं तो तुजवांचुनी ।जसें न कनका बाहय कटकत्व असे परी ॥७९॥
धर्मगुणीं सिद्ध यश अपेश ज्यांत तें नसे ।यशें त्या तारिलें विश्व अवतारादि निश्चयें ॥८०॥
हें पवित्र यशा तुझें ते श्री माया असेच कीं ।जग मायामयी यांत असे सत्य स्वरूपची ॥८१॥
एवं ऐश्वर्य वैराग्य ज्ञान धर्म यश श्री ही ।षडिवध गुण जे त्यांतें भग नामचि बोलती ॥८२॥
भग तेंचि जग असे आत्मा तोच म्हणूनिया ॥भग नाम जगीं वंत आत्माच भगवंत तो ॥८३॥
तो आत्मा वंत सुवर्ण भगनाम जगीं नगीं ।म्हणूनि तो वासुदेव भगवंत हि तो असे ॥८४॥
भगवंत वासुदेव देहीं ब्रम्हांड अंतिंही ।जाणती कल्पिती त्यातें नमितीच पुन: पुन: ॥८५॥
दिसे निर्गुण बुद्धीतें इंद्रियां जग षडगुण ।पाहे प्रत्यक्ष निर्गूण भगवान् हरि तो स्वयें ॥८६॥
जगीं षडगुण पाहे जों मनीं आवेश होय तो ।निजीं निर्गुण षडगुणीं पाहे विश्व हरीच तो ॥८७॥
रीती अनुभवाची हे सर्वभूतींच षडगूण ।आत्मभक्त अनुभवी त्या सर्वीं भगवंत तो ॥८८॥
त्रिगुणातीत निर्गूण षडगूण सगुणचि जो ।सेव्यसेवकभावें ही ज्या घ्यानीं वासुदेवची ॥८९॥
वसे सुवर्णचि नगीं भगवंत तसा भगीं ।भगशब्दें जगचि त्या म्हणूनी वासुदेव तो ॥९०॥
इंद्रियां जो जगद्भास पाहाती जगदीश्वर ।गुरुक्ती करुनी ज्ञान होतां जें आठवूनि तें ॥९१॥
वासुदेवाय भगवते नमो प्रणवयुक्तची ।जपती ते ब्रम्हाभूत पदवी पावती स्वयें ॥९२॥
सर्वभूर्ती ब्रम्हादृष्टी भगवंतचि पाहती ।प्रसन्न वर्तति सदा शोककांक्षादिवर्जित ॥९३॥
सर्वभूतीं न त्यां द्वेष सृष्टी ज्यां भगवद्रुप ।दिसें जें तें लहरि ती पाहे अमृतसिंधुची ॥९४॥
मुमुक्षा तारि मित्रत्वं दया भूतीं असीच कीं ।प्रतिबिंबरुपें भोक्ता सर्वत्र वासुदेव ज्या ॥९५॥
न त्या अहंकृति परि स्फुरे प्रारब्ध भोगितां ।कर्मशक्ती जाणुनी ते पाहे दु:खसुखीं सम ॥९६॥
भगवद्भाव सर्वत्र क्षेत्रज्ञ जगदीश्वर ।पाहे करी सुखी नेदी दु:खें भलतया हि तो ॥९७॥
सर्वभूतीं स्वात्मखूण क्षमापरापरधि त्या ।न दाखवी वक्रभाव कायावाचामनेंहि जो ॥९८॥
द्वादशाक्ष्ररमंत्राच्या जपादीही जपांतिची ।अर्चिती त्या यथाउक्त उपचारकल्पनात्मकें ॥९९॥
स्वधर्मादिक कर्मे जीं कृष्णपादींच अर्पिती ।सर्वात्मभावें नमिती अनंतत्व स्मरोनियां ॥१००॥
अर्पिती नवही भक्ती तशाच सकळ क्रिया ।कियमाणातीत ऐसे निरहंकृति वर्तती ॥१०१॥
संचीत दग्ध ज्ञानाग्नीकरुनि जाहलें परी ।राहे प्रारब्ध जें त्यातें भोगेंकरुनि सारिती ॥१०२॥
प्रारब्ध भोगितांही ते विरक्त प्रेमयुक्तची ।गोविंद अच्युत मुखीं अमृतवृष्टि सर्वदा ॥१०३॥
अनंत हरि मुकुंद रामकृष्णादि नाम जें ।येतां मुखीं बुद्धि अर्थीं रूपाभिनव ज्या मनीं ॥१०४॥
भगवंतीं प्राण चित्त बोधिती त्या परस्परें ।कथिती त्या तोषती ही रमती नित्य त्यांतची ॥१०५॥
अनंत वदतां पाहे व्यापुनी उरला जगा ।अच्युत वदतां देखे नाशरहित शाश्वत ॥१०६॥
त्रिभंगीं मांडिती ठाण अधरीं वेणु दाविती ।क्रीडती नाचती गातो ते अभिनव दावुनी ॥१०७॥
येतां मुखीं वासुदेव पाहे विश्वरूपें तया ।भगवान् म्हणतां तोची प्रत्यक्ष भगवद्रुप ॥१०८॥
जगातें भगवद्रूपें भजताति जगींच त्या ।चिदात्मा देखती तोची वासुदेवचि सर्व हें ॥१०९॥
सुखदु:खें तुष्ट कष्ट नसे आनंदची असे ।जो विश्व भरुनी राहे आनंदकंद बोलतां ॥११०॥
पंचभूतें ज्योतिरूपें प्राणी वृक्ष दिशा नग ।शरीर हरिचें विश्व आत्मत्वें वदती तया ॥१११॥
अवतारादिहि जग मनें आकार कल्पुनी ।बुद्धिनें तें अनुभवीकीं चैतन्यचि तें असे ॥११२॥
सुख अनंतचि जया संतुष्ट सर्वदाहि तो ।लाभ ज्या सवरूपीं चित्त भगवद्भक्ति युक्तची ॥११३॥
लाभ जो भक्ति सुखाचा कृपा सर्वेश्वराचि ते ।आठवी निरहंकारें वर्ते प्रारब्ध भोगुनी ॥११४॥
गुरु ईश्वर जो त्याचे सेवेभक्तींत सर्वदा ॥घ्यानींच मूर्ति पूजूनी अर्पी सर्वहि घ्यानिं त्या ॥११५॥
प्रार्थुनी त्या वासुदेवा मागताति पुन: पुन: ।भगवद्बाव सर्वाही भूतीं द्यावा म्हणूनियां ॥११६॥
सर्वात तूझे चरण थोर होय असें करीं ।आत्मत्वें चरणीं तूझ्या अखंड प्रीति दे हरी ॥११७॥
सनक नारद शुक भक्तांची गति दे तसी ।दे समागम संतांचा अंतीं स्मृति तुझीच दे ॥११८॥
उरी ज्ञानाचि जे कांहीं बुद्धि ते दिसते तिही ।होतां भक्ती असी येतें ज्ञान पूर्ण अनूभवा ॥११९॥
निदिघ्यासेंच करुनी आत्मत्वी स्थैर्य पावतो ।नित्याभ्यासेंच करूनी बुद्धिसी सच्चिदात्मता ॥१२०॥
आत्मा सत्य असें ज्ञान त्या सत्यत्वींच तेवढें ।आनंद तेथ तैसाची सच्चिदानंद तो असा ॥१२१॥
सत्पदें जो असे आत्मा चित्पदें तोचि दीसतो ।आहे आनंद आत्माच सच्चिदानंद तो असा ॥१२२॥
कालत्रयीं असे तेंची सत्य जें नित्य जाणणें ।असत्य आणि अनित्य नसे त्या वेगळेंच कीं ॥१२३॥
आत्मरज्जू असे सत्य असत्य ज्ग सर्प तो ।ज्ग सर्प न तो मिथ्या ससे आत्माच दोर तो ॥१२४॥
म्हणा सर्प त्री रज्जू स्वभावें असतो तसा ।चराचर नाम मात्र आहे ब्रम्हाचि सर्वही ॥१२५॥
चराचर देहसह नाम आकार मात्रची ।आकारीं त्या निर्विकार आहे एकचि ब्रम्हा तें ॥१२६॥
नेत्रां दिसे जळचि तें बुद्धीस मात्र कीरण ।इंद्रियां विश्व भासे तैं बुद्धीस ब्रम्हा वाटतें ॥१२७॥
एवं प्राप्ति निराकार स्वरूपाचीच सर्वदा ।साक्षित्वातीत प्रथम निराकारचि तें असें ॥१२८॥
घट मठ उपाधीच्या निषेधें जें ‘असी’ पद ।व्यतिरेकमहावाक्यें निराकारचि ब्रम्हा तें ॥१२९॥
तंतू पट माति घट दृष्टान्तें विश्व ब्रम्हाची ।तें अन्वयमहावाक्यें निराकारचि वाणते ॥१३०॥
षडगुणींही निराकार हेमवत् नगिं पाहणें ।सत्य ज्ञानानंत जें काम निराकारचि सर्वदा ॥१३१॥
गेली आवरणाविद्या परिविक्षेपयुक्त जे ।राहे ते जाय कळतां जडही चित्स्वरूपची ॥१३२॥
अनूभव असा त्यांत फलितार्थचि निर्गुण ।दिसेना कांहिंच जडाजड कांहींच नाहिं तें ॥१३३॥
अखंडानुभवें ऐशा देहीं वर्ते विदेहि जो ।त्या पूर्ण भगवत्प्राप्ती मुक्तिही हरिभक्तिही ॥१३४॥
ब्रम्हा सर्व अशा ज्ञानें दिसती ब्रम्हा इंद्रियें ।अभ्यास हा अशा ज्ञानें होतो इंद्रियसंयम ॥१३५॥
पाहे चैतन्य हेमचि जडत्व नग टाकुनी ।नियमें पाहती ज्ञानी स्वानंदप्रद नेम तो ॥१३६॥
आत्माच पाहतो सर्व प्रपंच जड त्यागितां ।बोलण्यांच हि तें मौन नि:शब्दीं म्न वर्ततां ॥१३७॥
ब्रम्हाचि आदि अंतीं जें मध्यें ही तेंचि वीजन ।ब्रम्हा काळ असे ज्यांत निमिषादिक काळची ॥१३८॥
सुख ब्रम्हा स्फुरण जें नित्य आसन सिद्ध तें ।ब्रम्हाच जड मायेचें मूळ अज्ञानबंध तो ॥१३९॥
तरंग जड चिदब्धि ज्ञान जें समताच ते ।दृष्टि ते कारण ब्रम्हा जड कार्यचि पाहणें ॥१४०॥
ब्रम्हा सर्वहि वृत्तींच्या निरोधानेंच पावणें ।अंतर्मुख पूरक तो प्रपंचिं रेचक सुटे ॥१४१॥
अद्वैत स्थिर वृत्ती जे तो प्राण स्थिर कुंभक ।प्राणायम असा त्याचा न होय इतरांस तो ॥१४२॥
व्यतिरेकें आवरणा विक्षेपा अन्वयें तसी ।नासे तेव्हांच जाणावें अद्वैत कळलें तया ॥१४३॥
गेली आवरणाविद्या विक्षेपा राहते तया ।नाशिती जाणुनी सर्व जड हें चित्स्वरूपची ॥१४४॥
आत्माच विषयीं वाटे मन चित्स्वरुपीं असे ।प्रत्याहार असा त्यांचा जो मुमुक्षूंस उत्तम ॥१४५॥
ब्रम्हीं निराकार वृत्ति स्थिर जें ध्यान त्यास तें ।ब्रम्हाकारपणें वृत्ती स्थिरता जे समाधि तो ॥१४६॥
ब्रम्हाचि स्फुरतें तेथें ज्मन जेथेंचि जाय तें ।मनाची धारणा हेची मुमुक्षां अति उत्तम ॥१४७॥
तो राजयोगी गुरुदेव भक्त, योगांगमात्रींच समाधियुक्त ।विष्णु स्वयें तो तनु जे तयाची, जीवोद्धरा देवनदीच साची ॥१४८॥
वसे प्रपंचीं परि निष्प्रपंच, असा असे ज्या परमार्थ साच ।होऊनि त्या युक्त जरी अशुध, प्रपंचिं साधे परमार्थ शुद्ध ॥१४९॥
नारायण पद्मभव नारद व्यास शूकही ।आचार्य जे गौडपाद गोविंद भगवत्पद ॥१५०॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या
एवं
— अशा प्रकारे
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
तैं
— तेव्हा
वैराग्य
— आसक्ती सुटणे
ऐसें
— असे
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैसें
— तसे
जेथ
— जिथे
जैं
— जेव्हा
प्रकृति
— सृष्टीचे मूळ जड तत्त्व
माया
— भासमान करणारी शक्ती
सकळ
— सर्व
जाहलें
— झाले
देखे
— पाहतो
तेथ
— तिथे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.