मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
शुकाष्टक

साहित्य

शुकाष्टक

shukashtaka

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

आठ श्लोक, आणि प्रत्येकाचा शेवट एकच प्रश्न: ‘ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांध - लोकां’ — शहाणी माणसे धनांध दुष्टांची सेवा का करतात? चिंध्या फुकट मिळतात, भिक्षा मिळते, झाडे परोपकारी आहेत — प्रत्येक श्लोकात एक सोपा पर्याय दाखवून कवी तोच प्रश्न पुन्हा विचारतो.

चिंध्या नसांपडति काय उग्याचि वाटेकंथेनिमित्त जरि शीत तनूस वाटेऐसें असोनि म्हणतो श्रुक वाक्य कीं कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांध - लोकां ॥१॥
अन्नाविणें विकळ देह म्हणाल हो तोभिक्षाशनें भजन - हेतु जितांचि होतोतेंतों मिळेचि म्हणतो श्रुक यावरी कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥२॥
कोठें मिळे न जरि भैक्ष्यहि या प्रकारींबोले तरु नसति काय परोपकारीऐसें असूनि म्हणतो श्रुक यावरी कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥३॥
पाणीं अगत्य तरि पात्र - मिसें अपेक्षात्याची भले न धरिती करिती उपेक्षाकीं आटती श्रुक म्हणे न नद्या अहो कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥४॥
राहावया मठ गृहादिक तों सजावेंत्याकारणें जरि धनांध - गृहास जावेंकोण्ही गुहा श्रुक म्हणे न निरोधिल्या कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥५॥
भोगी विरक्त हरिभक्त नसे असोशींभिक्षाशनादिक तथापि न देह सोशीत्याला म्हणे हरि उपेक्षिल काय हो कांज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥६॥
ऐसें म्हणे श्रुक तथापि हरीस योगक्षेमार्थ सेविति तयांस न भक्ति - योगकीं तो सकाम इतुकी जरि वासना हीत्याचा श्रुकोक्त मग भार हरीस नाहीं ॥७॥
प्रारब्ध - निष्ठ सुख दुःख समान पाहेदेतो स्व - भक्ति हरि यासि म्हणे कृपा हेत्याचें अगत्य पुरवी हरि लौकरी तोकिंवा अहो सहनशील तया करीतो ॥८॥
ज्यावीण देह नचले हरि लौकरी तोदे अर्थ कीं दृढशरीर असें करीतोभिक्षाशनादि मग तो स्वमुखेंचि सोशीज्याला नसे विषय - भोग - सुखीं असोशीं ॥९॥
योगभ्रष्टासि जन्म द्विविध हरि वदे अर्जुनातें विशेषेंत्यांत श्रीमंत - योगी - श्रुचि - गृहिं उपजे भोगवांछाविशेंषेंभोग श्रीमंत भोगी तर्हि मति पहिली पावतां देवदेवावैराग्यें सेवितो तो सकळ सहनता सत्सदंनादि देवा ॥१०॥
सुखी देह जो जो कदन्नासि सोशी सदन्नादिही घे नसोनी असोशीद्विधाही म्हणे उत्तम - श्लोक पाळी सुखें भोगवी भोग जे जे कपाळीं ॥११॥
रक्षी न काय अजित स्व - पदाब्ज - दासांतें बोलिला श्रुक असें असिया उदासांभावार्थ हा निवडिला स्फुट वामनानेंमानूनि निश्चय अस बरवा मनानें ॥१२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ऐसें
— असे
तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.