श्री - स्वयंवर - बधू नवरा हो तो अखंड मनिं राघव राहोभग्न जो करि धनुष्य भवाचें बीज तो हरु अनादि - भवाचें ॥१॥
वंदूनियां पद तया प्रभु - राघवाचेंसीतास्वयंवर निरुपिन लेश वाचेजें व्यास - वाल्मिकि - मुखांतिल सार साचेंसंक्षेप मी कथिन रुप तया रसाचें ॥२॥
राम उद्धरुनि गौतम - जाया दे निरोप पतिसंनिध जायाकौशिकासह गृहा जनकाच्या ये स्वयंवरवधूजन काच्या ॥३॥
रावणादिक पती असुरांचे वृंद वृंद नृप - भूमिसुरांचेमान्यता जनक तो करि पूजी तों मुनींत दशकंटरिपू जी ॥४॥
बुद्धि जे अनुभवी जनकाची मूर्ति त्या निजसुखा कनकाचीपाहतां धणि पुरे न मनाची न स्मृति स्फुरतसे नमनाची ॥५॥
तो भक्ति संस्कार वरी विदेहा पाडी पदीं दंडचि जेविं देहाउठे करी त्यावरि पूजनातें करुनि पायीं अवनेजनातें ॥६॥
आले बहू आणिकही घरा जे पूजी यथायोग्य मुनींद्र राजेत्यानंतरें आणवि त्या धनुष्या न जें ढळे दैत्य - सुरां - मनुष्यां ॥७॥
त्रिशत गण शिवाचे सत्वरें त्या धनुष्याउंचलिति नढळे तें अन्यदेवां मनुष्यांतिहिं बहुबहुकष्टें ठेविलें चाप रंगींदचकति नृप सारे देखता अंतरंगी ॥८॥
वाटे तयां परम दुर्लभ ते नवोढाजेव्हां पुरोहित म्हणे धनु कां न वोढाकोणी धरुनि बसला बसल्याचि ठायाउत्साह बुद्धि न मनाप्रति दे उठाया ॥९॥
घ० सीता - स्वयंवरीं वीर प्रबळ बळाढ्य धीरनृपवर थोर थोर सभे घन दाटलेत्यांच्या पूजनीं उपचार महा जनक उदारकरीं मनीं वाक्य सार निज कर जोडिलेऐका सकळही पण मृड - कोदंड कठिणनिज - भुज - बळें गुण चढवुनि वोढणेगुण - निपुण - प्रवीण सर्वही सुजाण पणपूरवील हा जो पण त्यासि सीता अर्पणेंवाक्य ऐकूनि तयाचें चित्त भंगलें भूपांचेंकोणी नबोलेचि वाचें टकमक पहातीअवघे तटस्थ भूप कोणी नबोलेचि चुपतेव्हां होउनी सकोप बोले लंकाधिपतीस० तों दशकंठ अकुंठ विसांभुजिं तें विषकंठ - धनू उंचलीकष्टत कोष्ठवरि द्विज ओष्ठहि चावुनि ज्या जरिनें खचलीचाय उरीं दडपे झडपे मग आनन - पंक्ति धरे रचलीवासुनि दांत मुखांत दाहांत पडे मति गाढ नमीं पचली ॥१०॥
घ० कोणी उचलीना चाप बहु पावले संतापकोणी उफराटी थाप चढवीतां चाखलीरावणें जो केला ताण भुई पडला उताणशक्ति कराया उत्थान अंविकेनें राखिलीदडपे धनुष्यें ऊर दाहीं कंठीं घुरघुरजेणें ऐशी दशा क्रूर कधीं नाहीं देखिलीतोही पावतां विराम उठे दाशरथी रामतेव्हां मूर्ति अभिराम जनीं मनीं देखिली ॥११॥
श्लो० नित्यमुक्त जरि नित्य विरक्त श्री स्वयें स्वचरणीं अनुरक्तहे अनन्य विषया निजरामा या निमित्त उठणे रघुरामा ॥१२॥
म्हणे विश्वामित्र स्वमनिं सकळांचे भरंवसेकळों आलें आतां मजजवळि विश्वंभर वसेतथा या श्रीरामाविण जनकजा अन्य व वरीम्हणोनी बोले कीं उठ उघुपती साध नवरी ॥१३॥
श्रीराम तेव्हां मुनि - पाद - पद्मा बंदी जयाचे स्वपदींच पद्माआज्ञा गुरुची म्हणऊनि साची करीन बोलोनि उठे तसाची ॥१४॥
श्रृंगार - वीर - करुणादि नवां रसांचींलीला जगदुरुचिया पद - सारसांचीसप्रेम तो दशम त्यासह त्या नवांतेंदावी सभेसि उठतां सुर - मानवांतें ॥१५॥
घ० दावी सीतेसि श्रृंगार परि दिसे सकुमारत्यांत वीभत्स विकार निर्विकार दाखवीविप्र म्हणती किशोर चढवितां चाप घोरकटिन हो हाचि थोर कृपारस राघवींम्हणती मुंगी सपक्ष मूढां हाचि हास्य पक्षमानिला हो वीर दक्ष देव दैन्य दानवींसंतां शांत सीताधध चाप मोडी अभिनवमोडी रौद्र त्याचा रव भयानक सूचवी ॥१६॥
श्लो० श्रृंगार - श्रृंग - उदयाचळ - रामचंद्राश्रीरंगतुंगत्दृदया रघुरामचंद्राअगोगसुंदरवरा नव मेघरंगारंगांगणीं जनकजा जडि अंतरंगा ॥१७॥
श्रृंगार - श्रृंगालय - केसरी हो सांगा अनंगा नट केसरी होकासे विकासे पट केसरी हो श्री शंकली पंकज - केसरीं हो ॥१८॥
अनंगरगांबुधिच्या तरंगीं रंगीं शुभांगी जडि अंतरंगींभंगील हा हो धनु केविं रंगीं म्हणे कुरंगीनयनी सुरंगी ॥१९॥
श्रृंगाररुप पहिला रस चाखवीलाबी भत्स शोककर त्यांतचि दाखवीलाकीं पाहतां विषय मानुनि त्या मलाहीचिंतानळी मन करीलचि काम लाही ॥२०॥
सूर्यवंशपतिच्या सकुमारा देखतां रघुपतीस कुमाराचाप तें कठिन हो मृदु भारी हें मनांत भय काम उभारी ॥२१॥
लज्जावती फार तथापि त्याची शंका तसी ना धरि हो पित्याचीम्हणे अहा तात कशा पणातें केलें तुवां संकट आपणातें ॥२२॥
बहु कठोर म्हणे धनु जानकी निकट कांसव - पृष्ठसमान कींरघुपती तरि हा लघु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२३॥
मदन - शत्रु - शरासन हें महा मदनमूर्तिच केवळ राम हाकरिल सज्ज कसा धनु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२४॥
मज नये नवरा दुसरा मना निजपणीं दृढ हे स्मर कामनारघुपती तरि हा लघु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२५॥
प्रतिज्ञा सांडावी मति असि न माने स्वजनकावदे दुःखें तेव्हां सखिजवळि निंदूनि जनकाम्हणे वैरी बाप त्यजुनि पण रामासि मजलानदे या देहातें त्यजिन मज नाहीं समजला ॥२६॥
सखींसीं असें बोलतो सारसाक्षी कृपाक्लिन्न तो होय संसार - साक्षीतिला आणि सर्वा जसी देव दावी तसी गोड एथूनि लीला वदावी ॥२७॥
मंडपात मग जी जनकाच्या त्या स्वयंवर वधू जनकाच्याअंगणांत विभु ये कनकाचा या प्रभा म्हणति लोक न काचा ॥२८॥
रामचंद्र उठतो जनकाच्या मंडपीं नवरिच्या जनकाच्या ॥२९॥
छावा उठे दशरथ - प्रभु - दिग्गजाचाघे चाप इक्षुसम तें पति भर्ग ज्याचाशुंडा स्वबाहु उचलूनिच चालिला होघेती समस्त नयनीं प्रभुचालिला हो ॥३०॥
गजाशिशु गति जैसे जेविं शुंडा उभारीरघुपति उचलूनी ये तसा बाहु भारीकरि करि चिमणासा इक्षुभंग स्वहस्तींप्रियहि भव धनुष्या ध्वंसि तैसा स्वहस्तीं ॥३१॥
घे इक्षु वारण जसा कर पुष्करानेंश्रीराम चाप उचली कर पुष्करानेंविध्वस्त कानन दशानन - अंबुजाचेंचाप प्रताप हरि आनन - अंबु ज्याचें ॥३२॥
दश - मुख - कमळांतें हस्त पद्मा विसातेंपडत असुर मूर्छेमाजि अब्जा तिसातेंतनु - जलज - वनीं त्या वारणा अव्ययालादृढ मृड धनु वाटे उत्सहो दिव्य याला ॥३३॥
पद्माटवीस गज इक्षु मिसें निघालाआला तथापिहि सरोजवनासि घालातोंडें दहा पसरिलीं सरली अहंतापायीं उरीं ढकलि चाप तदीय - हंता ॥३४॥
पाहूनि पूर्वी उठतांचि राम श्रीमूर्ति देखूनि मनोभिरामआली कृपा ते असि विप्रसंगा सिंहावलोकें परिसा प्रसंगा ॥३५॥
जन वदति रमा हे आजि हो रामरामामुनि वदति मुखें जे गाति कीं राम रामाउडति उडविती जे विप्र अंगोस्तरातेंप्रभुहि भव धनुष्या मोडि या दुस्तरातें ॥३६॥
एवं दशातन - उरावरि चाप हा तेंहाणोनि लात उचली जन तें पहातेंपायीं उरीं ढकलि राम दशास्य - हंताज्याचीं मुखें पसरलीं सरली अहंता ॥३७॥
कीर्तिचा तरि जगी रव याचा दिसतो मृदु - किशोर - वयाचाहो तथापि जय राघवराया ये रमा त्वरित यासि वराचा ॥३८॥
मोडो त्वरें हे भव चाप हातीं ऐशा कृपेनें द्विज जे पहातीतो भाव दावी स्व - कृपा - रसाचा जरि स्वयें पूर्ण अपार साचा ॥३९॥
मुंगीस पक्ष फुटले उठला तसा रेअन्योन्य हें वदति हांसति चट्ट सारेश्रीराम हास्यरस येरिति भाव दावीआतां कथा किमपि वीररसीं वदावी ॥४०॥
मोठ्या गजासहि जसा चिमणा हरी तोगंडस्थळें अति विदारुनि संहरीतोमोडील हें धनु असें कुशलांसि वाटेचित्तांत वीररस ये नयनासि वाटे ॥४१॥
संत पात्र विभु - शांत - रसाचें प्रीतियुक्त निज अंतर साचेंया सभे करिति वर्षति दृष्टी प्रेम ज्यां न भव दुःख अदृष्टीं ॥४२॥
अद्भुतांत विभु अद्धुत दावी ते कथा विशद लेश वदावीकेविं वोढिल धनुष्य भवाचें आइका सुख निजाऽनुभवाचें ॥४३॥
स्वउत्तरी यांवर त्या समाजीं बांधोनियां चाप तयास माजींदशाननाच्या त्दृदया वरुनी घे मस्तकीं कुंतळ आवरुनी ॥४४॥
घंटा - पताकांसह चाप हातीं घेतां स्त्रिया पूरुषही पहातीकिशोरही थोर पराक्रमी तो जाणों उसांतें गज आक्रमीतो ॥४५॥
घे आणि सज्जन मिसें करि चाप हातींओढी त्वरें नवल सर्वहि हें पहातीस्वल्या वयांत जन मानिति अद्भुतातेंया अद्भुतें स्फुट करी सरसा मृतातें ॥४६॥
रौद्रावरी रौद्र - रसासि घाली गोडी रसज्ञांत असी निघालीकीं रुद्रचापावरि रुद्रभावा योजी असें रौद्र - रस - स्वभावा ॥४७॥
श्रीमद्राघव - हस्त - पद्म - गुण ये कर्णात हो जेधवांमोडे हें भव चाप अर्थ इतुका दावी जगीं तेधवांकीं श्रीराम - कराऽरविंद - गुणही कर्णात येतां स्वयेंमोडे हें भवसायकासन असा भावार्थ हा निश्वयें ॥४८॥
जेव्हां कथेची गति हे वदावी धनुष्य - भंगी रस रौद्र दावीकडाडितां चाप भयान कांहीं करी असा उग्र जनास कांहीं ॥४९॥
कडकडकड चापीं जेधवां शब्द जालातडतड विधि अंड त्रास दे अब्जजालातडफडि फणिराणा कंप भूमंडळालाखडबडि कनकाद्री धाक आखंडलाला ॥५०॥
घ० करीती खळासि दंड ऐसे राम - बाहुदंडतिहीं मृड चाप चंड मोडितां कडाडिलेंभांड ब्रम्हांड अखंड साता द्वीपां खंड खंडहोऊं पाहे खंड खंड गगन गडाडिलेंराक्षसांत मुंड मुंड रावणादि पुंड पुंडहोती त्यांचे पिंड पिंड त्दृदय तडाडिलेंभ्याले भूप लंड भंड गज दिग्गज उदंडतोंडीं उगळितां गंड शोणित भडाडिलें ॥५१॥
घंटा ज्यासी जडजड पताकांची फडफडकरी चाप कडकड मोडी राम जेधवांअब्जजादि तडतड गिरीवरी खडखडनक्षत्रांचे घडघड लोळे व्योम चांदवाभ्याले वीर धडधड ज्यांचे मनीं धडधडराक्षसांचे धडधड कांपले हो तेधवांरावणाची बडबड राहे पडे हडबडकाळघन गडगड आटले हो तेधवां ॥५२॥
श्लो० सद्भक्ति ते मूर्ति नवां रसांची देखोनि नेत्रीं गति मानसांचीते वर्षती प्रेम तयाचि वाटे एवं दहावा रस त्यांसि वाटे ॥५३॥
मना सदा प्रीति सुखा निजाची मूढां जनांतें नकळोनि जाचीसप्रेम विद्या प्रद मुर्ति साची भक्तांसि वाटे दशमा रसाची ॥५४॥
मुसहि नवरसांचीं रामरुपेंचि केलीतरि दशमरसाच्या आवडीनें भुकेलीदशम सुरस ओते त्यांत रुपें नवांचींदिसति सफळ विद्या तेधवां मानवांची ॥५५॥
रामरुप नवही रस पाहे राम त्यावरि करीच कृपा हेप्रेम तो दशम त्यां रस दावी यानिमित्त रसरीति वदावी ॥५६॥
मोडी असें जो भव चाप हातीं तो लोक रामी र्स हे पहातीते जानकी ये प्रिय देवराया रंगांत मातंगगती वराया ॥५७॥
गजगती जगती प्रति दाविते वसुमती सुमती सुख भावितेस्वततुजा तनु जाणतसे धरा नवरि ते वरिते मणिकंधरा ॥५८॥
नव सुधा वसुधा - तनया स्मरा जनमनीं न मनीं वशजे स्मरास्वपति तों पतितोद्धर तो खरा नवरि ते वरिते रघुशेखरा ॥५९॥
जगपित्यास जगज्जननीच ते वरि नजाणति हें जन नीचतेनवरि जे वरिजे जगदीश्वरें अमळ ते मळते न दुज्या वरें ॥६०॥
ध्वनि उठे चरणीं लघुभूषणीं मन समर्पित ये रघु भूषणींपरमहंस - गतीच जया प्रिया परमहंसगती वरि ते प्रिया ॥६१॥
स्मर तिला रतिलाच न ईश तो अतनु जो तनुजोत्तम दीसतोनृपति तों पतितोत्तम भासती नवरि ते वरिते प्रभुतें सती ॥६२॥
अनादि हाचि प्रिय नाथ जीचा मुखेंदु तो या रघुनाथजीचालक्षूनिही अन्य मुरवांबुजा ते पाहे नृपाच्या न मुखांबुजातें ॥६३॥
शवापरी मानुनियां नृपांगें लक्षूनियां तुच्छपणें अपांगेंसर्वोत्तमा त्याचि रघूत्तमाला अर्पी गळां श्री निज - हस्त - माळा ॥६४॥
कमळजा मळ - जाल - सुरादिकीं नवरि ते वरिते स्व अनादि कींस्वपति तो पतितोद्धर त्याविना इतर ते तरते गुण भाविना ॥६५॥
सुर्वणमुक्तादि - सुधा शुभांगीं त्याली अळंकार असे शुभांगीअंगांगश्रुंगार यथाविभागीं सीता उभी ते प्रिय - बाम - भागी ॥६६॥
अर्पी गळां हार जया सुकाळी सीता सुखाच्या पडली सुकाळींविचित्र वाद्यें जन वाजवीती सीतापतीचें यश गाजवीती ॥६७॥
गेलीं अयोध्येसि सहस्त्र पत्रें कीं राघवें हस्त सहस्त्र पत्रेंभवायुध - ध्वंस - बळां तरंगीं यशोब्धि केला धवला तरंगीं ॥६८॥
भव धनु रघुवीरें भंगिलें विश्व - सारेंतुम्हिं सहपरिवारें पत्र वाचूनि सारेंनिज - तनय - विवाहालागिं यावें प्रभावेंजनक दशर थातें हें लिही प्रेम - भावें ॥६९॥
भिजवि सजळ - नेत्रें पत्र तें ज्यांत वाचीदशरथ नृप साची कीर्ति ते राघवाचीठक सकळ सभा ते राहिली प्रेम - पाणीस्रवति नयन - चित्तीं राम तो चाप पाणी ॥७०॥
करि विभु - जय - वार्ता भग्न वार्ता भवाचीनवल न धनु - कांबी ध्वंसिली हे भवाचीश्रवणिं निघत नासी दुःख संसार सारादृढ पण मृडचा पाहूनिही ज्या असारा ॥७१॥
दशरथ - नृप - संगें सव आमात्य योद्धेइतरहि जन जाती नीघती जे अयोद्धेसजल - नयन सारे राघवातें पहातीनवल म्हणति यानें मोडिलें चाप हातीं ॥७२॥
पूजूनियां जनक त्यां सकळां स्वहातेंयेऊनि दूर बहु सादर ते गृहातेंश्रीराम - कीर्ति वदनेंचि किती वदावीयालागि चाप - शकलें नरदेव दावी ॥७३॥
असें देखतां मोडकें चाप भारी शरीरीं गुड्या रोम - राजी उभारीस्व - मांडीवरी राम घेऊनि माय स्वयें पूसते प्रेम चित्तीं नमाय ॥७४॥
म्हणे श्री कौसल्या परमसुकुमारा रघुपतीकडीं हातीं तूझ्या जडित जड - चित्तांत खुपतीअशा या हस्ताब्जें उचलुनि धनू दोन तुकडेकसे केले पाहों नशकति बली थोर जिकडे ॥७५॥
नसे अंत या राम - कीर्ति - प्रवाहा असो तें पुढें राम - सीता - विवाहाजना देखतां फार आनंद झाला अजा पद्मजा भेटली श्री अजाला ॥७६॥
रामानुजां देखुनि सुप्रभावां कन्या तिघी तीं भरतादि - भावांविदेह तो देत विवाहरीती कीर्ती जयांच्याच भवा हरीती ॥७७॥
श्री - विदेह - तनया सुकुमारी पूर्ण शांति निज भूमि - कुमारीआत्मयासि वरि होउनि रामा मूर्तिमंतसगुणा अभिरामा ॥७८॥
रायें विवाहास मुहूर्त केला लागे हरिद्रा नृप - कन्य केलासुवासिनीच्या करपुष्करानीं सुरत्न - कुंभाकर - पुष्करानीं ॥७९॥
चहूंही मोक्षाचे कलश चहुं कोनीं मिरवतीन जे ब्रम्हीं हेमीं दिसतिहि खरेसे म्हणवितीगुणी शुभ्रीं दावी सगुणपण संतांस सुमतीअसें न्हाणें वारी अभिनव वधू - शांति - सुमती ॥८०॥
चढे तीस सर्वात्मतेची हरिद्रा नजे ठाउकी भेदवाद्या दरिद्रातिचें शेष ये षङ्गुणा रामचंद्रा अविद्याऽग्नि - संतप्त - विश्राम - चंद्रा ॥८१॥
एक राम जनिं देवदेव कीं भाव हा उभय - देव - देवकींजान्हवी पुरवि काम कामना वापिका - खनन - कामका मना ॥८२॥
जीव जे प्रकृति - अष्टक - वर्गी तृप्त ते सकळ अष्टक - वर्गीज्योतिषी द्विज पुरोहित सारे त्यांत एकहि न मोहितसा रे ॥८३॥
गुणत्रयांच्या तटिनी - प्रवाहीं सत्वांबु शोधूनि पृथक् विवाहींते घालिनी काळघडी द्विजाती सत्वें घड्या रामनिमित्त जाती ॥८४॥
वाजवीत विविधा निगमातें घे नृप श्रुतिचिया उगमातेंआणिला निजगृहा नवरा हो जो मनीं म्हणति मानव राहो ॥८५॥
पूजूनि राम निगमोदित बोधरीतीचित्तंतु आड पट मायिक जो धरीतीकाढावयासिच निषेधुनि घेत हातींशांतीसि अंतरहि हेंचि असें पहाती ॥८६॥
श्रीराम - मंगळ - कथा जन गात नानाअध्यात्म - मार्ग पहातांचि वृथा तनानान भ्रांतिचा पट किटे म्हणुनी द्विजातीगाती सुमंगळ सुधारस चित्रजाती ॥८७॥
मंग० ब्रम्हा वृद्ध सकाम कामरिपु तो रुद्र स्मशानीं वसेदैत्य - त्रस्त - सुरेंद्र - इंद्र - गुरुही इंद्राभिमानी वसेदुर्वासादि अशांत शांत मजही जो कांत इच्छीचनामाळा हे कमळा विचारुनि गळां घालीं जगज्जीवना ॥८८॥
इच्छीना मजला सुरासुर भला ऐसा दिसेना मलाआशेसीं रमला जिच्या नर तिला तो दाससा भासलाश्रीवांछादि - मला शिवे न शमला त्या या घनश्यामलामाला हे कमला विचारुनि गळां घाली जगन्मंगला ॥८९॥
श्रीमद्भागवतांत आणि इतर - ग्रंथीं महाभारतींश्रीमद्रामकथा निरुपित बरी व्यासाचिही भारतीगाती तेचि शुकादि गोत्रज कुळीं मध्यें वसिष्ठान्वयीं ॥९०॥
पौरोहित्यहि निंद्य तें विधि - पिता दे या कुळाचें मलाया संबंधमिसेंचि लाधसि म्हणे रामा घनश्यामलातो मी आजि पुरोहितत्व करितों वैवाहिकें मंगळेंगातों रामरसें कृतार्थहि असें केलें जगन्मंगळें ॥९१॥
विश्वामित्र म्हणे पवित्र चरणें माझ्या करी आश्रमासंगें ये मिथिलेसि पादकमलें नासी अहल्या - श्रमामद्वाक्यें भव - चाप - भंग करितां माला रमाकंधरींघाली आजि विवाह मंगळदिनीं सीतेसि हातीं धरीं ॥९२॥
घ० सावधान सावधान कांहीं नाहीं व्यवधानआत्म - लाभाचें निधान लग्न बहू जवळीम्हणे ज्योतिषी आचार्य काळ - गणनादि कार्यझालें बोल जें हें कार्य घडीजेल कवळीॐ पुण्यादि हें अक्षर मुखा येतां पदाक्षरनिरसें दिसे अक्षर तंतु नेत्रीं सकळींशांति आत्मा वधू वर वरितां हो परस्परअक्षतिं अक्षततर मुक्तिचि मुक्ताफळी ॥९३॥
श्लो० गातां द्विजीं राधव - मंगळाला जो आड माया - पट तो गळालापरस्परें अर्पिति अक्षतांतें मुक्ताफळां नूतन - अक्षतांतें ॥९४॥
संतप्त सोनें जसि जोति यांची सीता - शरीरावरि मोतियांचीश्री - इंद्र नीळाचिसमें समान श्री रासदेहावरि भासमान ॥९५॥
तद्वं नवरि वरी हो श्री अजा श्री अजालातइं अगड धडाधों घोष इत्यादि झालाध्वनि गगनिं अशब्दीं स्थावरां जंगमाचाप्रकृति - पुरुष - योगें चिज्जडा संगमाचा ॥९६॥
काम - क्रोध - हुताशनीं तडफडा होऊनियां भाजल्यालाजा वृत्तिमयी न या चिदनली त्या होमितां वाजल्यासातां आवरणांत सप्तपदिहि होतां पुढें तो पतीतेव्हां कांत दुजा कधीं नवदवे वार्ताच या लोपती ॥९७॥
आत्मा सुवर्ण सचराचरवास मुद्राऐशा धने भरवि देह - चतुःसमुद्राविद्याकरें भव - दरिद्रपणासि नाशीसंतोष तो सुर - नरां कमळासनासी ॥९८॥
तत्तद्व्रम्हसमन्वयें ध्वनि उठे ते ताल घेती श्रुतीआलापी व्यतिरेक - रुपक रिती कीं तन्न तन्न श्रुतीवेदांता गण तर्क - कर्कश खडे सांडूनि जे शोधितीगीतागीत तदर्थनाद्यहि असें तेथें जना बोधिती ॥९९॥
दशहि इंद्रिय अश्व तनू - रथीं दशरथारव्य चिदंश महारथीस्व - सुख - नंदन उत्सव पाहतो श्रुत - सुतैक्य - सुखी स्थिर राहतो ॥१००॥
कुळस्त्री कौशल्या सुमति निगमोक्ता कुशलताकरी कामें टाकी श्रुति - विहित - वार्ता विषलताधरी स्वात्माराम - प्रभुसि उदरीं युक्ति नमनींकरी सर्वात्मत्वें प्रकटहि तथा बुद्धि जननीं ॥१०१॥
आणी शांति सुनेचिया सुनमुखा पाहावया ते सतीवृत्ती कोटि वराडिणी अवघिया ज्या चिन्मया दीसतीशुद्ध ब्रम्ह सुवर्ण विश्व नग जें होऊनि साकारलेंअर्पि तें पाहिलें सुनेसि विधिनें सासू गळां कारलें ॥१०२॥
कामादि सा - कुरस - वर्जित - षड्रसाचानिःकामनादि परिपाक विपाक साचासायुज्यतादिक चतुर्विध अन्न जातीजें त्यासि इष्ट जन सेवुनि तेंचि जाती ॥१०३॥
समारंभ इत्यादि तो कोण वर्णी वधूचा पिता तृप्ति दे सर्व - वर्णीहरी दुःख हें स्वल्पही रामवार्ता निरोगी करी अल्प मात्रा भवार्ता ॥१०४॥
ओवाळितो स्वपुरुषार्थ चतुर्थ होमींरामावरुनि म्हणऊनि चतुर्थ हो मीदे सर्व आंदण फणींद्रहि जें न मोजीन्यूनासि पूर्ण करिं तूंचि म्हणे नमो जी ॥१०५॥
साडे करी स - जळ - लोचन कन्य केलासद्वंशजा निरवितां जन धन्य केलाकां स्वशांति तिस घेउनि ये अयोध्येश्रीराम आणि जन सर्व अमात्य योद्धे ॥१०६॥
आद्यंत अध्यात्मचि हे कथा रे जे वर्णितां न भ्रम शोक थारेअध्यात्मरामायण नाम याचें ठेवी असें व्यास अनामयाचें ॥१०७॥
परंतु साधारण मानवांची वाचा अजी हा महिमा नवाचीम्हणोनियां राधव - लोक - लीळा उग्याचही संहरती कलीला ॥१०८॥
अध्यात्मरामायण गति संतीं हें कोकिळ जे वदली वसंतींआतां रुचीनें जन घेति सारे वदों तया राम - कथा - रसा रे ॥१०९॥
जिंके पुरीस फिरतां जगदग्नि ज्यालाजो भगितां भव धनुष्य भडाग्नि झालाज्याला जगांत घडली बहु - राज - हिंसातो क्षत्रियानळ करी रघुराज हिंसा ॥११०॥
दशरथ नृप त्याला कंकणें आणि चोळीभृगुवर लपतां तो हस्त सक्रोध चोळीदशरथ - सुत जिंके राम तैशास वाटेदशमुख विजयाचें काय आश्वर्य वाटे ॥१११॥
घ० राम असतां किशोर भेटे जामदग्नी घोरक्षत्रियांत गर्व थोर त्यातें दूर जो करीअन्य - राम - वीर - रस आइकावे हे सुरसतुटे नामें हे कुरस भव - रोग लौकरीरावणासि बांधे धीर बाहूसहस्त्राचा वीरकापी तशाचेंही शिर पशु जो घे करींऐशा भृगु - कुळीं राम जिंकी त्यासि रघुरामदश ग्रीवादि संग्राम प्रेमें गावा किंकरीं ॥११२॥
श्लो० ऋषित्वेंच ठेवूनि विप्रोत्तमाला तयांतील रामांश रामीं मिळालाअयोध्येप्रति श्रीस घेऊनि पावे सदा हेचि हो मंत्र त्याचे जपावे ॥११३॥
सीता - स्वयंवर असें वरव्या मनानेंलक्षूनि शास्त्र अवलोकुनि वामनानेंभाषाप्रबंध रघुनाथ - कथा - रसांचाकेला प्रसाद अवघा पद - सारसांचा ॥११४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.