श्रीनारायण निर्निमित्त उगला आहे जसा निश्वयेंतैसें विश्व तथांत हें उपजतें वस्तु - स्वभावें स्वयेंमाया शुद्ध तयामधें प्रथमता होते अजा जेधवांतेव्हां निर्गुण तेंचि ईश्वरतथा घ्यावें द्विजा माधवा ॥१॥
मध्यान्हीं किरणीं मृषा जळ तसी मायाच अव्यक्त तेअव्यक्तें मग निर्गुणी सगुणता सर्वज्ञता वर्तनेइच्छा सृष्टिनिमित्त वृत्ति उठिली तें सूत्र तेथें क्रियाशक्तीचें बळ आगळें बळ तिन्हीं सूत्रारव्यतत्वीं तया ॥२॥
इच्छा सृष्टि करावया उपजली शक्ति क्रियारुपिणीजीचा वास रजोगुणीं प्रबळ जो आधीं तयां तीं गुणींते चिच्छक्ति अधीन सत्व - गुणिची जे शक्ति तेथें वसेते चिच्छक्ति करुनि यासिच महत्तत्वाख्य राज असें ॥३॥
तत्त्वें दोनिहि सूत्र आणिखि महत्तत्वासहीं वेगळींसंख्येमाजि न मोजिती श्रुतिमधें ऐसेंचि सर्वास्थळींदोन्हीं एक तथापि भेदहि असे वायूस सूत्रात्मतामुख्य - प्राणहि तो विरिंचिस महत्तत्वास तो तत्त्वता ॥४॥
एवं राजस सूत्र सात्विक महत्तत्वाख्य - शक्ति - द्वयेंसत्वादि त्रिगुणीचि सूत्रहि महत्तत्वाख्यही निश्वयेंतेथें जो तिसरा तमोगुण तदा द्रव्याख्य शक्तीस तोपोटें घेउनियां उगाच असतो तत्त्वद्वयीं भासतो ॥५॥
सूत्रीं आणिक जो तमोगुण महत्तत्वीं असा बोलिलातो सत्वास रजास घेउनि अहंकार स्वये ऊठिलातों तो रुद्रचि शब्द तेथ उठिला आकाश त्यापासूनीझाला शब्दचि तो नभोगुण असों बीजीं फळें येथुनी ॥६॥
झाला शब्द नभांतुनीचि परि तो व्याला पृथक् वायुलाआकाशींच असोनि वायुगुण तो बीजीं फळीं राहिलावायु स्पर्श - गुणीं परंतु वडिला व्योमांत जो शब्द तोजैसा स्पर्श धरुनि शब्दहि तसा दोहीम गुणीं वर्त्ततो ॥७॥
वायूपासूनि रुप भिन्न उठिलें तेथूनि वैश्वानराझाला उद्भवरुप तें निज - गुण - स्पर्शाखही दूसरावायूचा गुण आणि शब्द नभिंचा तोही तयाअंतरींआतां अग्निमधूनि होय रस तो निर्माण पाणी करी ॥८॥
पाण्याचा रस आपुला गुण तसा व्योमादि - भूतत्रयेंशब्द स्पर्शहि रुपही गुण तिन्हीं दावी तयांचे स्वयेंपाण्यापासूनि गंध होय मग तो निर्माण पृथ्वी करीतीचा गंध गुण स्वकीय तरि ते शब्दाहि चारी धरी ॥९॥
एवं तामस पंचक - द्वय रजोहंकार निर्मीत साकेलें सात्विक - मींपणें मन असीं एकदिकें विंशतीअव्यक्तादिक कारण - त्रय असीं चोवीस हीं मोजिती ॥१०॥
केले सात्विक - मींपणें सुर दहा ते चोविसां वेगळेते विश्वेश्वर इंद्रियात्मक धणी लोकेंद्रियां आगळेदिकवातार्क रसेश अश्विनि - सुत - ज्ञानेद्रियांचे पतीते अग्नीद्र उपेंद्र मित्र कजिहीं कर्मेद्रियें वर्तती ॥११॥
एक श्रोत्र दुजें खगिंद्रिय तसें जें चक्षुही तेजसेंजिव्हा घ्राण मिळोनि पांच रचिलीं ज्ञानेंद्रियें राजसेंवाचा आणिक पाणि इंद्रिय दुजें पादारव्य हेंही तसेंपायूपस्थ मिळोनि कर्ममय हीं पंचेंद्रियें राजसें ॥१२॥
ऐसीं चोविसही मिळोनि रचिलें ब्रम्हांड त्याभीतरीत्यांचे अंश मिळोनि सर्व रचिले जे देह ते दोंपरीस्थूळीं हे नभ - आदि पंचक दिसे सूक्ष्मांत सोळा पहाभूतांचे गुण पांच एक मन हें कीं इंद्रियेंजीं दहा ॥१३॥
सोळा आणिक पांच एकविस हे आतां तिन्हीं कारणेंचित्तीं चित्प्रतिबिंब तेथ दिसतें अंतीं मती मीपणेंअव्यक्तांशक चित्त आणखि महत्तत्वांस्ख नाना - मतीतैसे मी म्हणऊनिही बहु अहंकारांश ते बोलती ॥१४॥
चित्ताचा अतएव देव म्हणती श्री - वासदेव प्रभूशुद्धाऽव्यक्त - उपाधि तो म्हणउनी तत्पुत्रही आत्प्रभूब्रम्हा बुद्धि - गुणादिदैवत महत्तत्वांश नानामतींचित्तापासुनि बुद्धि तेथुनि अहं सर्वज्ञ हें पाहती ॥१५॥
चित्तें केवळ आत्मता - स्फुरण जें ऐसी विराडात्मताअव्यक्तात्मक वासुदेव विभु जो त्याला असे तत्वताआत्मा निर्गुण चित्त त्या अनुभवीं अव्यक्त ऐशा श्रुतीब्रम्हा बुद्धि उमेश मी पण मन श्रीबंधु तारापती ॥१६॥
जागृत् स्वप्न सुषुप्ति तीनहि जशा सत्वादि तींहीं गुणींतुर्या केवळ सत्व यां अवधियां मानाल सत्ता झणीतत्वें चोविस हीं जडेंचि अवघीं सत्ता न यांला असेझाला पंचविसावयाचि करितां जीवत्व - सत्ता दिसे ॥१७॥
जीवात्म्यासह पंचवीसचि तसा जो सच्चिसावा स्वयेंसर्वात्मा प्रतिजीव बिंब अवघें ज्या स्वामिचें निश्वयेंत्यानें प्राकृत - वैखरींत रचिली हे वामनाच्या मुखेंहे कंठीच धरुन साधक सदा श्रीतत्वमाळा सुखें ॥१८॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.