इंद्राचे पद दैत्यराज बळि तो विप्रप्रसादें हरीतेव्हां कश्यप - मंदिरीं अदितिच्या दिव्यव्रतें श्रीहरीझाला वामन मुंजि तेचि समयीं होतांचि भिक्षा छळेंसर्वस्व त्रिपदें हरी स्मर मना त्याचीं पदे कोमळे ॥१॥
बळी याग तो नर्मदेच्या तटाकीं करी आहुती श्रुक अग्नींत टाकीअकस्मात तों देखता वामनाला सुखाचा गमें पूर्ण ठेवा मनाला ॥२॥
करिं कमंडलु दंड मृगाजिन त्रिजग - माप करी बटु वामनसकळ - वेद - विशारद चांगला कटितटीं अति सुंदर मेखला ॥३॥
श्रुतिमयें वचनें वदतां बटु वळिमखाप्रति अद्भुत ये बटुलुटलुटां द्विजअर्भक येकटु करि उदार कथा भलता लटु ॥४॥
करिं कमंडलु ये जगजीवन त्रिजग उद्धरि जो पदजीवनस्ववचनें बळिचें मन मोहरी रुचिर वामन - पाद नमो हरी ॥५॥
देखोनि ऐशापरि त्या द्विजाला चित्तीं बळीच्या बहु तोष झालायेऊनियां सन्मुख पाव वंदी वर्णी गुणा होउनि भाट बंदी ॥६॥
पूजी बळी मग म्हणे बटुवामनातेंकीं माग जें तुज अभीष्ट गमे मनातेंदेणार गा इतर मी मज काम नाहींजें माग तं पुरवितों तव कामना ही ॥७॥
म्हणे धन्य राया स्व - वंशानुसारा प्रभू बोलसी हा तुझा बोल सारारणीं आणि दानीं तुझीया कुळीं रे नदे पाठ कोण्हीच राया बळी रे ॥८॥
राया मला एक असे अपेक्षा त्यावेगळी सर्व झणी उपेक्षामोजूनि माझ्या त्रिपदेंचि मातें दे भूमि वीप्र - प्रवरोत्तमातें ॥९॥
बळि म्हणे अति सादर वामना बहुत वाटसि गा बरवा मनामज अशा भुवन - त्रय - पाळका बहुत मागसि कां द्विज - बाळका ॥१०॥
शब्द मी धरिन मस्तकावरी ब्राम्हणा अधिक भूमिका वरींवाटसी बहुत नेटका मना जे असेल वद नीट कामना ॥११॥
द्विजसुता तुझिया वचनाऽमृतें मज गमे उठतील शवें मृतेंनिपुण दीससि निर्मळ आरसा परि न मागसि अर्थहि फारसा ॥१२॥
हरि म्हणे मजला इतुकें पुरे त्रिभुवनात्मक होउनियां उरेत्रिपदमात्रचि कार्य असे अरे अधिक मागति लोक न ते बरे ॥१३॥
शब्द भाव बळिला न आकळे श्रुक सन्निध तयासि तें कळेतो म्हणे भुज सभे उभारुनी त्या बळी प्रतीच हाक मारुती ॥१४॥
अदितिच्या उदरीं हरि जन्मला म्हणुनि येसमयीं कळलें मलाविभव राज्य हरील समस्त रे यशहि विश्रुत होइल अस्त रे ॥१५॥
म्हण न देउंशकें तुज मी अगा वइस मौनपणें अथवा उगाम्हणसि देइन यावरिही जरी रिघसि दाटुनि पातक - पंजरीं ॥१६॥
संकल्प जो तूं करसील बापा न देववे पावसि सद्य पापापरद्वयें विश्व नुरेचि जेव्हां जासील राया नरकासि तेव्हां ॥१७॥
करुनि संकल्प न दे द्विजा तो प्रानि स्व - पापें नरकासि जातोआधींच नेदी म्हणतां भला हो घेसी झणी वैखरिमाजि लाहो ॥१८॥
जरि विचारुनि गोंविसि वैखरी तरिच होइल जाण अगा खरीम्हणुनि श्रुक अजी बहु बोलतो परि वदों वदला बळि बोल तो ॥१९॥
विचारुनि आचार्य - वाचा निदानीं बळी तों धरी बुद्धि सर्व स्वदानींम्हणे बोलतां ते जरी सत्व वाणी द्विजा केविं वाचा वदों दैन्यवाणी ॥२०॥
हे भूमि वेश्या इसिं सर्व जाती भोगूनियां मृत्युमुखासि जातीलोभे इच्या लंघुनि विप्र - वाणी धिक् बोलणें वैखरि दीनवाणी ॥२१॥
निगमविधि विधानें मोडुनी हे पसारेयजुनि विविध - यागीं वंदिती यासि सारेवरद हरिच तो हो विप्र कोण्हीच हा जीकितितरि मज मागो भूमि देतों अहो जी ॥२२॥
सर्वस्व - दानीं बळि सिद्ध झाला पूज्यासनीं बैसविलें द्विजालाप्रक्षाळि तों श्री - पद - पंकजातें ध्याती रमा अब्नभवादि ज्यातें ॥२३॥
आली समीप यजमानिन पट्टराणीपाहे हरीस नपुरेच जिची शिराणीओती करीं कनक - पात्र धरुनि वारीसर्वस्व दे पति तयास न जे निवारी ॥२४॥
कुंभस्तती कनक - कुंभ धरुनि पाणीओती मणी चपळ नासिकिंचे सुपाणीभी लावितां बळि पदीं स्वकठोर पाणीसर्व स्व - पात्र बळिचें हरि चक्रपाणी ॥२५॥
विध्बुक्त संकल्प करुनि पाणी घालूं म्हणे पूजुनि चक्रपाणीनिघे न झारींतुनि नीर - बिंदू म्लानत्व पावे बळिचा मुखेंदू ॥२६॥
कीं श्रुक झारींत रिघोनि गोळा करुनि अंगें अजि होय बोळाफोडी हरी घालुनि दर्भ डोळा जना दिसे विप्र - कुमार भोळा ॥२७॥
पूजुनि ऐसेरिति दनवाऽरी घाली करीं तें बळि दान - वारीम्हणे स्वपादीं अजि भूमि मोजीं जे अर्पिली त्याचि पदी नमो जी ॥२८॥
संकल्प - युक्त पडतां स्वकरांत पाणीवाढे त्वरेंकरुनि वामन चक्रमाणीपाताळ पादतळ मस्तक सत्यलोकींकानीं दिशा दिनमणी नयनाऽवलोकीं ॥२९॥
एक्या पदें भूमि भरुनि थोडी पायें दुज्या अंडकटाह फोडीदे तीसरा पाद म्हणे बळीला म्हणोनि पाशें दृढ आकळीला ॥३०॥
पदयुगें भुवनत्रय मोजिलें बळि - शिरीं तिसरें पद योजिलेंपदनखें विधि - अंड विदारिलें पदजळें भुवन - त्रय तारिलें ॥३१॥
त्याकारणें प्रार्थुनियां हरीची करी स्तुती प्रेमरसें विरंचीप्रर्हाद आजा बळि - भूपतीचा आला महाभक्त रसापतीचा ॥३२॥
म्हणे तुवां हे दिधली त्रिलोकी नेली तुंवा पूर्ण कृपावलोकींकेला तुवां दंड कृतार्थ झाला प्रर्हाद इत्यादि वदे अजाला ॥३३॥
यत्नी बळीची जगदीश्वरातें वंदूनि बोले कमळावरातेंम्हणे धणी तूंचि चराचराचा वृथाभिमान प्रभुजी नरांचा ॥३४॥
सर्वाचिया आइकतां स्तुतीतें बोलावुनी त्याच महामतीतेंम्हणे बळी दे तिसर्या पदातें कीं भोगिं पापें बहु आपदांतें ॥३५॥
करुनि संकल्प न देसि जेव्हां जासील राया नरकासि तेव्हांबळी म्हणे देइन देवराया आहेंचि संकल्प खरा कराया ॥३६॥
तैसा न भी मी नरकासि देवा या पाश - बंधासिहि वासुदेवान भी सुरांच्या जय - वाद्य - नादा भीतों तसा मी अपकीर्तिवात ॥३७॥
करुनि संकल्पहि तूज देना कोणी मला धन्य जगीं वदेनामाझ्या शिरीं ठेविं तिज्या पदातें जें छेदितें सर्वहि आपदांतें ॥३८॥
करी बळी स्वात्म - निवेदनातें संतोष ज्याणें मधुसूदनातेंदैत्येंद्र तात्काळचि मुक्त केला प्रेमाऽमृताचा हरि हो भुकेला ॥३९॥
देऊनियां सुतळ - राज्य अखंड दारींराहोनियां बळिचिया गृह - पुत्र - दारींझाला जसा त्दृदय - मंदिरिं वामनाच्यावृत्ती चिदात्मक करी अवघ्या मनाच्या ॥४०॥
घनाक्षरी -करीं कमंडलु दंड दावी कौतुक उदंडध्यावा त्दृदयीं अखंड भव - गज - केसरीसुखी सर्वाचेही मन करी कमळ - नयनसहस्त्रानन शयन दावी शब्दकूसरीइंद्रासी दे इंद्रपद बळी - मस्तकी स्वपदगंगा आणुनि त्रिपद जगीं पुण्य पसरीपायीं पावन जीवन कथा जिवांचें जीवनऐसा वामनीं वामन नेणे बुद्धि दूसरी ॥१॥
अहो बळी भाग्यवंत ज्याचे द्वारीं भगवंतदेतां जग अंतवंत अनंतत्व पावलादेऊनियां तिन्हि लोक अणुमात्र नेणें शोकमस्तकीं हें पुण्य श्लोक चरणीं झेंपावलासर्व अर्पुनिही धीर तिज्या - पावलासि धीरदेतां न लावी उशीर आनंद दुणावलाशाप देतां श्रुक खळ तहिं नव्हेचि वीकळदान करुनि सकळ म्हणे डाव फावला ॥२॥
इंद्राहुनिही कल्याण करी बळीचे सुजाणतया देवाचीच आण नव्हे गोष्टि लटकीकेला इंद्र भाग्यवंत देउनियां अंतवंतसंपदा त्या भगवंत करी त्याच्या वटकीइंद्र इंद्रपद - दास बळी त्यावरी उदासदासीसम ज्या पदास लेखिना नीपटं कींम्हणुनीयां विश्वपाळ झाला द्वारीं द्वारपाळजयापाशिं सर्वकाळ असुरांच्या कटकीं ॥३॥
बळीं हाचि सत्वगुण त्यासि करी हो निपुणभाग्य अपत्तीचि खूण कळतां जो सांपडेतंतुलागीं सर्व पट देतां काय खटपटतैसें अर्पितां निपट विश्व हें न सांपडेऐसें दान देतो सत्व नुरे त्यासही भिन्नत्वआत्म - निवेदन तत्व नेणती हे बापुडेव्यर्थ घेउनी संन्यास व्यर्थ दाविती अन्यासहोतां वामनीं हा त्यास कर्मशेंडी ऊपडे ॥४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.