मधुर - वेणु - रवें मन मोहरीमधु - वनीं मधु - शत्रु नमो हरीकरुनि वंदन तत्पद - सारसाकथिन वेणु - सुधा - रस सारसा ॥१॥
वनीं वाजवी वेणु जेव्हां मुरारीव्रजीं चित्त कामें स्त्रियांचे थरारीतया वर्णिती प्राण ठेवूनि कंठींवधू - वृंद तो संकटें दीन कंठी ॥२॥
अंगवक्र अधरीं धरि पांवागोप - वेष हरि तोचि जपावावाम - बाहुवरि गालहि डावातो ठसा स्व त्दृदयांत पडावा ॥३॥
वेणु जेविं अधरीं स्वर - रंध्रींअंगुली स्मरति गोप - पुरंध्रीकोमळा सु - चपळा अतिलंबासप्तही स्वर - रसा अविलंबा ॥४॥
ऐसिये हरिचिये मुरलीनेंकाम - तत्पर मनें स्मरलीनेंमोहिलीं सह - वधु त्रिदशांचींआमुचीं न नवलें सुदशांचीं ॥५॥
गायनीं अमर जे अभिमानीआणि देव - ललना स्व - विमानींत्या स्त्रियां - सहित दैत्य - जनाऽरीमोहिले ह्नणति या व्रज - नारी ॥६॥
वेणु - ध्वनी तो सुर - गायकांनींत्यांच्या विमानांतहि बायकांनींआश्चर्य कानीं पडतांचि केलेंन तृप्त ज्यांचें मन हें भुकेलें ॥७॥
स्मर - शळें विकळा सुर - कामिनीगलित नीविहि नेणति भामिनीहरिस देखुनि त्या अधराऽमृतात्वरित इच्छिति त्याविण ज्या मृता ॥८॥
किती की अशा बोलती गोप - दारादुज्या गोपिका वर्णिती त्या उदारामहा थोर आश्चर्य हें आयका याअसें प्रार्थिती आणिखी बायका या ॥९॥
आयका नवल हें अबला होकीं स्थिरा घनिं विजा प्रबळा होहार येरिती मुकुंद उरीं वोदेखतां न उरतीच उरी वो ॥१०॥
वास ज्यांतचि रमा - रमणीचाश्याम ऊर वरि हार मणीचावेणु - गान समयांत हरी तोडोलतां जनमनास हरी तो ॥११॥
अधरिं - वेणु धरी जई तो हरीविरहिणी - जन - चित्तहि मोहरीव्रज - वधूंसि खुणा व्रज - राज तोमुरलिमाजि वदोनि विराजतो ॥१२॥
करुनी वियोगें मुखा दीनवाणीवसे तों विनोदें रमा - कांत वाणीअकस्मात त्या वेणुनें कर्ण - रंध्रींनिघे सौख्य तात्काळ पावे पुरंध्रीं ॥१३॥
क्षण असें सुख पावति मागतीत्वरित तें अधराऽमृत मागतीजस जसा ध्वनि गोड गमे मनातसि तसी उपजे स्मर - कामना ॥१४॥
मोहती व्रज पशू मृग - गाईआमुचें नवल काय अगाईस्तब्ध होति लिखितें जसि चित्रेंवेणुच्या ध्वनि - रुसेंचि विचित्रें ॥१५॥
ज्यांसि न स्मरण त्दृत्सदनांतग्रास वो न गिळिती वदनांतनिद्रितेंचि अथवा लिहिलीं होचित्रिचीं न गमती पहिली हो ॥१६॥
मातृ - स्तनींचा रस आननांदतों होय वेणु - ध्वनि काननांतगळे गिळेना पय वासुरांतेंआश्चर्य वाटे गगनीं सुरांतें ॥१७॥
उचलुनि श्रवण श्रवणाऽमृतापशु पिती रस जीवन जो मृताजवळि दूरहि वृंद असा असेमधु - वनी हरि जेथ उभा असे ॥१८॥
चरित्रें करी आणिखी ही हरी तोस्वलीला - रसें जो अविद्या हरी तोस्त्रिया वर्णिती आणिखी एक लीलातिला आयका नाशिते जे कलीला ॥१९॥
मल्लवेष रचिला अभिरामश्री - धर - प्रभु - सवें बलराममोर - पत्र मुकुटीं तरु - पत्रें ॥२०॥
सये असा म्यां हरि देखिला गेपाचारितो वेणु - खेंचि गाईआश्चर्य तेव्हां करितों अगाई ॥२१॥
गोधनीं बहु पुढें नव जावेंठाव एकचि धरुनि थिजावेंवाजवी ह्नणुनि जो निज पांवाकृष्ण तोचि त्दृदयांत जपावा ॥२२॥
पशु जसे ध्वनिनें स्थिर राहतीतशि जळें न नद्यांतिल वाहतीव्रज - वधू सम होती न या सयेसुकृत अल्प विकल्प न यांस ये ॥२३॥
केलीं सु - पुण्यें जरि गोपि कांहींझालीं अपूर्णेचि तथापि कांहींकां धन्य आह्मीं व्रज - अंगनांहींतर्ही सदा श्री - हरि - संग नाहीं ॥२४॥
भुजा कांपती नित्य आलिंगनांतेंन फावे तरी सर्वदा अंगनांतेंजनांचा मनीं धाक वाटे जळालाअवस्था दिसे हे नद्यांच्या जळाला ॥२५॥
हरि - प्रेम आह्मां जसें अंतरंगींनद्यांचें तसें दीसते वो तरंगींभुजा कांपती त्याचि आलिंगनांतेंव्रजीं होय आह्मां जसें अंगनांतें ॥२६॥
आह्मांत ही देखुनि कृष्ण जीतेंप्रेमें जळें लोचतिं येति जीतेंभये जनाच्या वरिच्या वरी तेनेत्रींच नेत्रोदक आवरीते ॥२७॥
नद्यांतही स्तब्ध असेच पाणीआह्मां तयांही सम चक्र - पाणीस्वल्पें सुखें आमुचिया अदृष्टींतैशाचि याही दिसताति दृष्टी ॥२८॥
होऊनि शीतळ सुगंध समीर जातोकृष्णाकडे तरि पदांऽबुजिंच्या रजां तोआणू ह्नणूनि उचलूनि भुजा तरंगाज्या प्रार्थिता पवन दाउनि अंतरंगा ॥२९॥
कथिति येरिति ज्या व्रजनायकावदति त्यांस दुज्या व्रज नायकाह्नणति हें परिसा नवल क्षणत्रिभुवनेश्वर मानव - लक्षण ॥३०॥
सुर सरस हरीच्या वर्णिती विक्रमातेंअनु - चर चरणाचे गाति कीर्तिक्रमातेंपरम - पुरुष विष्णु श्रीश हा वाटला गेस्मरत चरित त्याला मुक्तिची वाट लागे ॥३१॥
वनीं हा असे पर्वतीं सर्व गाईतंई देखिलीं कौतुकें वो अगाईदुरुनी करुनी कृपा चारितो वोस्ववंशी - खें त्यांसि पाचारितो वो ॥३२॥
फळें मोक्ष काम्यें सुखें पुष्प - जातीअसें वेद वेदांत वर्णूनि जातीफळें दोनि हीं विष्णु देणार साचातया दाखवी नाद वंशीरसाचा ॥३३॥
फळें दोनि हीं जे स्थळीं देव दावीतनू तेचि साकार त्याची वदावीअसा विष्णु वृक्षांलतां - माजि पांवाअहो दाखवी तो गुरुत्वें जपावा ॥३४॥
स्व शब्देंचि व्यापकालागिं दावीस्वयें विष्णुची मूर्ति ते ही वदावीफुलांची फळांची पडे वृष्टि भारीलता - वृक्षरुपें दिसे कैठ भारी ॥३५॥
लतामाजि काटे तरु माजि पानेंउभे रोम ते वेणु - पीयूष - पानेंफळीं आणि पुष्पीं तयीं वृक्ष भारीसुखें त्यां दिसे त्यांत तो कैठ भारी ॥३६॥
वृक्षां लतांसहि घडे गुरुभाव लोकींकीं विष्णु दाविति जनास कृपाऽवलोकींप्रेमें सुखें करिति विष्णु निरुपणातेंश्रेष्ठत्व साधिति लतात्व तरुपणातें ॥३७॥
मुखें वर्षती विष्णु - नामाऽमृतातेंसुधा पाजिती मृत्युलोकीं मृतातेंरसस्त्राव ऐशापरी गोड भारीजसा संत शब्दा मधें कैठ भारी ॥३८॥
दिसे जे धवां जे रितीनें जिला होतसा घेतसे ते मन माजि लाहोकितेकी अशा आणिखी गोपदाराप्रकारांतरें वर्णिती त्या उदारा ॥१॥
ह्नणे एक म्यां कृष्णजी देखिलागेअसा की ललाटीं टिळा रेखिला गेपहाता पहातां पहावाच वाटेरुते चित्त जाऊनि नेत्रींच वाटे ॥२॥
अपाद माळा प्रभु कृष्ण जीचीसुधापिती षट्पद क्रुष्ण जीचीप्रदक्षिणा ते अवघे तिला होकरुनि गुंजारव घेति लाहो ॥३॥
गुंजारवें भ्रमर गुंजति त्यांत देवेंवेणु ध्वनी मिसळिला मृदु वासुदेवेंआपाद कंठ वनमाळ असी विराजेते सेविती मधुप होउनि देवराजे ॥४॥
वेष हो रचियले भ्रमरांचेवृंद ते ऋषिवरां - अमरांचेंया मिषें स्तविति भक्तचि जाणासेविती त्दृदयसाक्षि सुजाणा ॥५॥
त्यांस आदर करी अधरीं तोवेणु ये रिति मुकुंद धरीतोकीं जया उठति षट्पद वाचाते रिती रसहि वेणु - रवाचा ॥६॥
विभव त्य समयांतिल आयकानवल कीं मग या व्रज - नायकाभजति वेष्टुनियां अति वो रसेंसुरस वेणुचिया अति वोरसेंवनीं राजहंसीं पिकोनीं शुकानी ॥७॥
ध्वनी गोड तो आइकोनीं सुकानींत्वरें येऊनी सेविलें श्रीहरीतेंमहापापही नाम ज्याचें हरीतें ॥८॥
वदन लाउनि ते सकल क्षितीनयन झांकुनि अन्य न लक्षितीस्थिर मनें करुनी स्थिर आसनाकरिती ते खग कृष्ण - उपासना ॥९॥
त्या खगीं क्षिति कितेक चावरव्यापिली प्रभु गधें जिचा वरभोंवतें विहग शोभते धराश्रीपती सह मनांत ते धरा ॥१०॥
क्रीडे असें आणिक पूतनारीतें गाति अन्यारत पूतनारीकीं ते वदे तें परिसा सया होघ्या एक चित्तेंचि रसास या हो ॥११॥
दिव्यहार बरवेच तुरे होकृष्ण रामहि असे चतुरे होतेधवां गिरितटीं निज पांवावाजवी हरि तसाचि जपावा ॥१२॥
स्वयें तुष्ट संतुष्टवीतो जगातेंअगांतें नगांतें मृगांतें खगांतेंअसें क्रीडतां काळ मध्यान्ह झालाघनें देखिलें तों सख्या त्या अजाला ॥१३॥
धरुनि साउलिही वरि हर्षतोहळुहळू घन गर्जत वर्षतोनव - विधा निज - भक्तिहि दावितोसमगुणें स्व - सखा हरि भावितो ॥१४॥
जगज्जीवन श्रीहरी आणि काळाकरीतो जगीं जीवनाच्या सकाळाअसो मेघही यानिमित्यें सखा होसुत्दृद्भाव ऐसा नसे आणिकां हो ॥१५॥
झणी उष्ण लागे सख्या केशवातेंह्नणूनी त्वरें येउनी लेश वातेंमुकुंदा वरी मेघ तो छत्र झालाकरी स्वाऽत्मदेहाऽर्पण श्री अजाला ॥१६॥
करुनि सख्य निजाऽत्म निवेदनाघन भजे पाहिलें मधु सूदनाप्रगट दास्यहि त्याचि मिषें करीधरि धण्यावरि साउलि लौकरी ॥१७॥
छत्राऽत्मता अर्पुनियां अजालाधरुनियां साउलि दास झालाकरुनिही स्वात्म निवेदनातेंदास्यें भजे श्री पुरुषोत्तमातें ॥१८॥
आणीक भक्तिरस जो शुक सूचवीतोत्यांच्या क्रमेंच नृप घेत असे चवी तोकीं मंदमंद घन गर्जतसे नभीं होशंका धरुनि तरि काय ह्नणूनि भी हो ॥१९॥
मेघ ध्वनी मुरलिहूनि विशेष होतोतेव्हां घडे महदतिक्रम कीं अहो तोशंका असी तरि उगा घनका असेनाहें मंद - गर्जन - निमित्त असें दिसेना ॥२०॥
न मांडूनि तेव्हां असी गर्जना हीकरी वृष्टि मौन्यें तरी वर्ज नाहींघडी एक वर्षे घडी एक राहेउगा कां नसे मेघ टीका करा हे ॥२१॥
श्रवण भक्तिमधें घनराज तोकरुनि कीर्त्तन भक्ति विराजतोस्वमनिं भाव असा शुक नेमुनीकुशळ - बुद्धिसि वोढुनि ने मुनी ॥२२॥
हळूहळू घन गर्जतसे नभींमुरलिहूनि चढेल ह्नणोनि भीश्रवण भक्तिं अतिक्रम वर्ज तोकरित कीर्तन ही घन गर्जतो ॥२३॥
मिळोनि गातां प्रभु - वेणु संगेंझणी चढे गर्जत त्या प्रसंगेंशंका जरी यावरि हे वदावीतथापि भक्तिद्वय भाव दावी ॥२४॥
पुढें होउनी एक जो गाय नाचेतसे संगती गाति त्या गाय नाचेअसा वेणु ऐकूनिही मेघ गातोकरी एकदां सर्व भक्ती अगा तो ॥२५॥
रंगांत एक हरिचे गुए गाय नाचेसंगी तसेच गुण गातिहि गायनाचेते साधिती श्रवण भक्तिहि गात सारेबोले नृपास शुक मेघ अगा तसा रे ॥२६॥
वेगळ्या नवहि भक्तिरसांचाएकदांचि करि आदर साचाकीर्तन श्रवण भक्ति हि माजीसूचवी शुक मुनींद्रसमाजीं ॥२७॥
या गर्जती श्रवण भक्ति नवांत मोजीश्री व्यास तत्सुतहि त्यां उभयां नमोजीतेथें दिसे स्मरण भक्तिचि सूचना हीकीं विस्मृतीस अशि हे पदवीच नाहीं ॥२८॥
गोडी दिल्ही प्रति रसा सहि जी वनानेंभक्षूनि ते विविधही जन जीवना तेभक्ति स्व येरिति जिणें स्मृतिजी वनानेंते ही वनांत गणिली जग जीवनातें ॥२९॥
हें सूचवी श्रवण भक्ति हि मानवांतश्रेष्ठत्व दाखवि जिचा महिमा नवांतभूमी वरी पडति मेघ तुषार कांहींतें पादसेवन गमेचि शुकाऽदि कांहीं ॥३०॥
ह्नणे मुनी कीं सुमनें करुनीवर्षे सख्यातें घन त्यावरुनीधूतो जलत्वें पद या प्रकारेंकेलीं तुषारें सुमनाऽनुकारें ॥३१॥
भूमि हे चरण माधवजीचेसृष्टि वृष्टिहि पदें भव जीचेवर्षतां क्षितिवरी सुमनातेंपाद - सेवन गमे सुमनातें ॥३२॥
वर्षे तुषार परि ते सुमनें शुकानेंभावें अशा कथियलीं अति कौतुकानेंते मूर्तिचे पदहि धूउनि अंबुदानेंपुष्पांजळी मग दिल्ही निज - अंबुदानें ॥३३॥
चरणि तोयद सेवितसा पडेनिववितां तनु अर्चन सांपडेस्नपन देत भजे कुसुमांजुळीसुमन शब्दिं तसा महिमा जुळी ॥३४॥
नमस्कार सर्वात्म भावें करीतीतळींही तया देव तो एकरीतीवरुनी घन स्तब्ध तो वंदनाचीकरी भक्ति नंदाचिया नंदनाची ॥३५॥
गीतेंतही अर्जुन वंदनातेंश्रीविश्वरुपा यदु नंदनातेंमागें पुढें ही करि सव्यसाचीसख्या नमी तो घन ही तसाची ॥३६॥
नवविधा असि भक्ति घना घडेभ्रमकवाडहि जी स्तव ऊघडेभजति आणिक गौळणि बायकाम्हणति अद्भुत हें तुह्मि आयका ॥१॥
स्थळीं स्थळीं गौळणि या रितीच्याकथा करीती कमळापतीच्याकोणी यशोदेस समीप होत्यानिरोपिती तीप्रतिही अहो त्या ॥२॥
यशोदे तुझा पुत्र वंशस्व रानींसुधा ओष्ठिंची वर्षतो या स्वरानींतंई भोंवते मोहती देवजातीजयांचीं मनें उन्मनत्वास जाती ॥३॥
कमल - संभव आणि शंकरत्रिदशनाथसवें सुर किंकरह्नणति सर्वहि त्यास नमो हरीकरुनि मोहित जो मन मोहरी ॥४॥
कीं ताळकीं मंद असें कळेनाराग स्वराचें घर आकळेनारसाच मध्यें अवघे बुडालेविचार ज्यांच्या मतिचे उडाले ॥५॥
भरें रसाच्या अति नम्र मानामूर्ती अशा सर्वहि वर्त्तमानासभोंवते येरिति देवजातीनादा मृता माजि बुडोनिजाती ॥६॥
टाकूनि लज्जा स्थिति लोकरीतीवार्त्ता यशोदेप्रति त्या करीतीनिर्लज्जतेनें व्रजगोपदाराआणीकही वर्णिति त्या उदारा ॥७॥
पशु खुरीं बहु खिन्न वसुंधरासुत तुझा अवलोकुनि ते धराअधरिं वेणु धरी श्रम तो हरीवरुषतो रस तो तिस तो हरी ॥८॥
सुत तुझा क्षितिचें कुशल क्षणेंकरि पदें ध्वज - अकुंशल क्षणेंचरण लावुनि वो जलजा तसेगजगती जगतीवरि जातसे ॥९॥
मुखीं वेणु ऐसा वनामाजि वागेगमे सौख्य देतो क्षितीच्या जिवा गेयशोदे असे लावितां तीस पायस्मरें आमुचा थोर केला अपाय ॥१०॥
जो असे रिति वनांत हरी तोभूमीचा श्रम अशेष हरीतोवाजवी मुरलि दैत्यजनारीत्या रसेंचि भुलल्या व्रजनारी ॥११॥
अशामाजि वो चालिलों काननातेंविलासें पहाया मृगांकाऽननातेंयशोदे दुरुनीच तूझ्या कुमारेंमनें मोहिली व्यापिली जै कुमारें ॥१२॥
तरु स्तब्ध नेणे जशा लोक रीतीतशा गोपिका भाव तेव्हां करीतीशिरीं मोकळे केश वस्त्रें गळालींमनें मोहिली येरिती वेगळालीं ॥१३॥
दुरुनि हो व्रजनाथ निरीक्षणींगलित होउनि जाय निरीक्षणींमन मुरे पवनीं चळतां सरेशिथिल होउनि अंबर तीसरे ॥१४॥
ऐशाच आणीकहि गोपदारालीला हरीच्या वदती उदाराकीं मोजितो नंद - कुमार गाईआश्चर्य तेव्हां करि वो अगाई ॥१५॥
देव ज्यास ह्नणताति नमो जीतो वनांत हरि गोधन मोजीकंधरीं तुळशि - हार करीतोघेउनी गणित कृष्ण करी तो ॥१६॥
प्रिय अनुचर गौळी धन्य खांदा तयांचातदुपरि भुज वो या मुक्तिच्या दातयाचाधरुनि तुळसिमाळा दुसरा बाहु भारीव्रज पशु गण नेला कैठ भारी उभारी ॥१७॥
असा गोधनें मोजितो आणि गातोकरीतो सुखी वेणु - नादें जगा तोअशाही विलासांत आश्चर्य दावीमृगी मोहिल्या गोष्टि तेही वदावी ॥१८॥
व्रजव धूसम हो हरिणी हरीकरि मनें मुरली ध्वनि जो हरीवसति त्या धरुनी प्रभु - संगतीपति सुतादि सुखांत न रंगती ॥१९॥
वाटे न ज्यांला मृग - कृष्ण - नाथस्व - स्वामि हा मानिनि कृष्णनाथया कृष्णजीच्या गृहणी - गणायालेखा स्वसाम्यें हरिणी गणाया ॥२०॥
व्रज युवति गृहाऽशेपासुनी नित्य मुक्ताफिरति धरुनि चित्तीं जेविं या नित्य मुक्तारुचि तशि न मृगीला या मृगाकाननाचीतनु नयनिं पहाती श्रीमृगांकाननाची ॥२१॥
हरि समीपचि केवळ राहतीपरिसती मुरली मुख पाहतीव्रजव धूसम पावलि या गतीमग तसे अधरामृत मागती ॥२२॥
यशोदेपुढें आणिखी गोपदाराअशा वर्णिती कृष्ण लीला उदाराह्नणे निर्मिले दिव्यजे दाम कुंदींयशोदे बहू शोभती ते मुकुंदीं ॥२३॥
हार शोभति गळां व्रजपाळाभोंवतां पशुपगोव्रजपाळावेणु गोड अधरीं स्वकरी तोकौतुकेंच यमुनेंत करीतो ॥२४॥
ह्नणति गौळणि वत्स तुझा हरीव्रजवधूजनचित्त अवो हरीमुरलि माजि विनोद कळा करीह्नणतसे सुख देइन लौकरी ॥२५॥
भिउं नका ह्नणतो तुह्मिं कामिनीदिवस जाउनि पातलि यामिनीकरित जें अति इष्ट तुह्मां असेकरि विनोदहि वेणु मधें असे ॥२६॥
असा उभा हो यमुनात टाकींविनोद वाणी मुरलींत टाकीसमीर तेव्हां मलयाद्रिवासीहळूहळू सेविति माधवासी ॥२७॥
उभें भोवतें वृंद वृंदारकांचेंगळां हार वो कुंद मंदारकांचेअसे वेष्टुनी पूजिती सर्व देवदिसे हा स्वयें त्यांत देवाऽधिदेव ॥२८॥
असा गोधनाच्या श्रमातें हरी तोकराया सुखी आमुतेंही हरी तोकरी जों नमस्कार तों वृद्ध वाटेतयां देखतां दुःख आह्मांस वाटे ॥२९॥
गोविती जरठ नंदनंदनाटोणपे पडति आड वंदनाशीघ्र सोडिति तयासि वाटतेगोष्टि हे विषसमान वाटते ॥३०॥
त्वरा यावयाची तुझ्या नंदनातेंन मानीच हा इष्ट त्या वंदनातेंयशोदे असें वर्म त्यांला कळेनामनोभाव वृद्धां तयां आकळेना ॥३१॥
वनीं सेविती वृद्ध पद्मासना दीव्रजीं चालतां वंदिती तो अनादीअसा लागतां वेळ येतां उदाराव्रजीं अगुळ्या मोडिती गोपदारा ॥३२॥
अशा संकटें पावतां गोकुळातेंसुखें दे समूहा वियोगा कुळातेंतयावीण जो रोग नेत्रीं हरी तोस्वसंदर्शनाच्या सुधेनें हरीतो ॥३३॥
खुरांचा धुळोरा मुखीं आणि हारींव्रजीं येतसे कृष्ण ऐशा विहारीदिनांतीं असा धेनु वृंदांत वाटेशशी देवकी गर्भ संभून वाटे ॥३४॥
मदवि धूर्णित वो नयनांऽचळव्रज वधू वरिते करि चंचळशशिचकोरकुळीं सुख देतसेविविध मान वधू प्रति दे तसे ॥३५॥
कुंडलें जडित दीप्ति फांकलीदाविती दिनमणीस वांकुलीधूळि धूषित हि गडमंडळींस्वप्रभा मिरवली सुकुंडलीं ॥३६॥
यदुपति दिवसांती येरिती पातलागेगजपति गति येतां गोड चित्तांत लागेमुदित वदन साजे ये जसा चंद्रमागेसुखकरपण ज्याला व्योमिचा चंद्र मागे ॥३७॥
स्व गोधनें लक्षित ये हरी तोदुःखें दिगंतींहुनिही हरीतोगाई सुखी येरितिनें करीतोदेणार आह्मां सुख लौकरीतो ॥३८॥
प्रतिदिनीं दिवसा व्रजनायकास्मरति येरितिनें व्रजनायकारमति त्याचसवे प्रतियामिनींहरिविणा क्षण नेणती कामिनी ॥३९॥
निशा कृष्ण ध्यानीं प्रियविषयनिष्ठा दिवस तोनिजे रात्रीं जागा जडजन दिनीं त्यान वसतोहरीचे जे दास क्रमिति हरि गाऊनि दिस तेतिये रात्रीं ध्यानी तरि असिच गोपींत दिसते ॥४०॥
व्रजांत जो जागृत लोक साराजों या कथा वर्णिति लोक साराकृष्णांग संगार्थ निघोनि जायाया सिद्ध तों ते डुलती निजाया ॥४१॥
अहा भाग्यवंता महा गोपदाराअशा गातिया कृष्णलीला उदाराअसा बोलिला श्रीशुक्राचार्य रायाकथा या त्रिलोकांस ही उद्धराया ॥४२॥
वामनानन मिषें वसुधेंतेंधन्य कृष्ण करि वेणु - सुधतेंवर्णनीय गुण वर्णुनि लोकींतो कृतार्थ रस जो अवलोकीं ॥४३॥
करी धन्य गोपाळजी वामनातेंकथा - छंद लाऊनि त्याच्या मनातेंमहा भाग्य हें अन्यथा काव्य रीतीवृथा ज्या कवी लोकवार्त्ता करीती ॥४४॥
हरिगुणामृत जीत पदोपदीअशिहि वेणुसुधा हरिच्या पदींरचुनि वंदुनि अर्पुनि वामनेंधरियला हरि नित्य नवा मने ॥४५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.