मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
विश्वासवध

साहित्य

विश्वासवध

vishvasavadha

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

गुरुमहिमा सांगणारी रचना. गुरूने मस्तकावर हात ठेवला तरच बंध तुटतात; लहरी आणि समुद्र जसे वेगळे नाहीत, तसा स्थिर-चरांत भरलेला गुरु — आणि सुविद्या प्रकाशवून कुविद्या हरणारा तोच.

तुटति बंध तरीच समस्त कीं जरि गुरु कर ठेविल मस्तकींत्यजुनि सर्वहि कुल्पित कामना गुरुपदांबुज तूं भज कामना ॥१॥
चहुंकडे गुरुराज विराजतो लहरियाचि समुद्र विराजतोस्थिर - चरांत गुरु नुसता पहा तरि विझे अति मानस - ताप हा ॥२॥
प्रकाशी सुविद्या कुविद्या हरी तो गुरु - ज्ञान देतो अविद्या हरीतोजयाचे हरीतो गुरुत्वें गुरुत्वा त्रिवाचा गमे जो गुरुत्वें गुरुत्वा ॥३॥
गुरुच तो रुचतो मति ते बरी पसरते सरते सचिदांबरीगुरुच या भव - हस्तिस जो हरी गुरुपणा अपदुःख न जो हरी ॥४॥
जाणेल जो गुरुकृपेस्तव आपणातेंतो कां स्मरेल नसत्या पहिल्यापणातेंतो तूंच कीं म्हणुनि पूसति लोक सारेहा देह सातविथि होइल हो कसा रे ॥५॥
असे हेम ताटीं जसें कांठसारें दिसे एक सोनें जसें कांठसारेतंई ज्ञान अद्वैत ऐसें वदावें जड भ्रांतिचें सोडवीतोचि दावें ॥६॥
सकळ चिन्मय काढिन मी रवा जरि खरा उतरे तरि मीरवामग समस्त अवेवहि हे महा - जग तसें दिसतें निज हेम हा ॥७॥
जें जाणनें जाणतसे जगातें नव्हे तम ज्योतिहि तेज गा तेंचिदंबु हें साच जडा न गारा हें ब्रम्ह जाणा पिटितों नगारा ॥८॥
भिन्ना नसोन दिसती जळभिन्न गारावर्तूळ श्रुभ्र कठिणा मृदु थंड गारातैशाच ब्रम्ह - उदधींतिल विश्व - गारागाजे असा निगम - भूपतिचा नगारा ॥९॥
असे आंत बाहेर सोनें नगीं रे तसें ब्रम्ह हें देखणें या जगीं रेजगीं तत्व जाणोनि ऐसें वदावें कळेना तरी सद्गुरुतें पुसावें ॥१०॥
गुरु बोध सांगूनि आधीं जनासी तनू - इंद्रियें - प्राण - जीवासि नासीजिता येरिती देखत्को जो शवाला असें जाणतो जो भजे केशयाला ॥११॥
धंदा त्यजूनि करि गोष्ट निरंजनाचीचिंता कसीनकरि तोचि तया जनाचीत्याचाच यत्न अतएव भले करीतीपोटनिमित्त भलते कृषि वोकरीती ॥१२॥
नेणे प्रयत्न पशु त्यसहि केविं चारानिर्माण देव करितो बरवें विचारालागे न नागर न बीजहि त्यांस कांहींतो कां उपेक्षिल मुकुंद उपास कांहीं ॥१३॥
नारेळ मार्ग नसतां जळ लाभलाहेआशा त्यजूनि धरि गोष्टि मनीं भला हेजैसें कपिथ्य गजभुक्त तसीच हानीचिंता किमर्थ करणें मग निस्पृहांनीं ॥१४॥
विश्वाससबंध करवी बरवा मनाचाऐसा समर्थ अभयंकर वामनाचाअज्ञान आणि जडता तम जो हरीतोचैतन्य तत्वमसि उत्तम जो हरी तो ॥१५॥
असा भास हा वास नारायणाचा दिसे भेद तो वेद - पारायणाचाकरा शोध तो बोध हा वामनाचा रमाकांत एकांत - ठेवा - मनाचा ॥१६॥
ज्ञानाऽनळें विविध संचित दग्ध झालेंवंध्या - विलासवत सत्क्रियमाण गेलेंप्रारब्ध शेष उरलें जन - निश्वयालाअद्वैत बोध मज तों परिपूर्ण झाला ॥१७॥
त्रिकाळीं जयाची अवाधीत निष्ठा जिवाहूनि जो आत्म मानी वरिष्ठामनांतीत पाहे जगीं एक द्रष्ठा नमस्कार माझा तया योग भ्रष्टा ॥१८॥
घन श्यामा रामा तुजविण नसे देव मजलाअळंकारीं सोनें स्थिरचरिं असा जो समजलादुजें देखो जातां झडकरि बळें तूंचि दिससीघटीं माती जैसी वळखण घटा तेविं वससी ॥१९॥
कर्मे दास्यपणें करुनि निपुणें नारायणीं अर्पणेंपापातें क्षपणें रमापति गुणें प्रेमामृता सेवणेंसत्संगीं वसणें स्मृतींत असणें एकांतिंचें बैसणेंहें सर्व करणें भयाब्धि तरणें दुर्वासना मारणें ॥२०॥
सदा जो चित्सिंधू स्थिर - चर - तरंगांत वसतोजनोद्धारालागीं प्रगट तनुधारी गवसतोअशासीं बोलावें स्वसुख अथवा तप्तत्दृदयाजयातें जिज्ञासा तदुपरि करावी निजदया ॥२१॥
देतांही विष पावली अमृतता ते राक्षसी पूतनाकामी मोक्ष अपेक्षितांचि चढल्या वैकुंठ गोपांगनाद्वेषें दानव शत्रुभाव तरले ऐशा जगज्जीवनाघ्या कानें त्दृदयीं धरा तुम्हिं अहो हे वामन - प्रार्थना ॥२२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
ऐसें
— असे
तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
जैसें
— जसे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.