सलज्जांची लज्जा हरि परिहरी आशु भजनींअसा गोपी वस्त्रें हरुनि विभु दावी शुभजनींस्वभक्तां नारीही नर भजति त्याहूनिहि बराद्विजस्त्री प्रेमें हें स्फुट करिं नमो त्या यदुविरा ॥१॥
ह्नणूनी गोपीची वरद वसनें जे दितिं हरीद्विजस्त्री - भक्तीनें प्रगट दिवसीं त्या करि हरीस्वकांना ते विप्र स्तविति निज - धिक्कार करितीकथाब्धी यामध्यें चतुर चमते तत्त्व मथिती ॥२॥
करुनि नमन कृष्णा तें कथातत्व वाचेकथिन मि गुण कांहीं त्यामधें माधवाचेन भजत हरि झाले नष्ट थोर द्विजातीप्रिय हरि अबळा त्या त्या सुमुक्तीस जाती ॥३॥
अंबरें हरुनियां वरदानेंगोपिकांसि दिधली वरदानेंधांवले पशुप गोवळ सारेकाय हा जन ह्नणे वळ सारे ॥४॥
सिदोर्या न घेतांचि टाकूनि जातीसवें आपुल्याल्या चतुष्पाद जातीमिळाल्या त्वरेनें मृगांकाननातेंअसे धांवले गोप ते काननातें ॥५॥
हरि बहुत पहाटे दूर गेला वनातेंह्नणउनि पशुपाळीं मांडिलें धांवनातेंजसि दिल्ही गमनाऽज्ञा गोपकन्यांसि देवेंचहुं कडुनि मिळालीं गोप वृंदें सदैवें ॥६॥
जाय त्यांसह हरी परभारादावितो द्रुम - शिरीं पर - भाराहे ह्नणे तरु परार्थचि सारेधन्य मानव दयाळु कसा रे ॥७॥
हे परार्थक विलास कळांचेंदेह भूरुहवरां सकळाचेंघे करें वदत हें फळ पानेंसेविती पशु तृणें जळपाणें ॥८॥
सभाग्या तरुच्या फळा पल्लवांतेंस्वये घ्या वदे येरिती बल्लवांतेंकृपायुक्त नम्रावरी हात टाकीबसे त्या स्थळीं भानुकन्या - तटाकीं ॥९॥
असा दूरि टाकूनि वृंदा वनातेंहरी पाजुनी धेनु वृंदा वनातेंबसे देखुनी पुष्पिता - काननातेंगडी सेविती श्री मृगांकाऽननातें ॥१०॥
तेथें क्षुधें करुनि त्यां पशुपालकांनींहे घातली विनवणी व्रजबाल - कांनींकीं प्राण आजि अजि भूक हरी हरीतेदेऊनि अन्न बहु तृप्त करीं हरीते ॥११॥
ह्नणे हरी येथुनि यज्ञशाळासमीप हे जे दिसती विशाळास्वर्गा निमित्यें यजनें करीतीतेथें असे अन्न अनेक रीती ॥१२॥
ह्नणाल आह्मीं पशुपाळ जातीते श्रेष्ठ शास्त्रज्ञ महा - द्विजातीमागों कसें अन्न तयां द्विजांतेंद्यावें परी तें निज पुण्य जातें ॥१३॥
तरी स्वयें जात तुह्मी नसा रेमागा मदाज्ञेंच करुनि सारेकीं नाम माझें मम - अग्रजाचेंसांगा तुह्मीं सैन्य समग्र ज्याचें ॥१४॥
निरोप ऐसा पशुपांसि झालाते मागती अन्न तया द्विजांलाकीं येथुनी सन्निध कृष्ण रामआले स्वयें विश्व - मनोऽभिराम ॥१५॥
हे थोर कोण्हीच न यां समानद्यावाच यांच्या वचनासि मानद्या अन्न ऐसें जरि साच वाटेआह्मांस लावा अथवा स्ववाटे ॥१६॥
हें ऐकिलें कीं वसुधाऽमरांनींन मान्य केलें तरि पामरांनींनेदूं असें ही परि ते द्विजातीन मागतां गोप निराश जाती ॥१७॥
वृत्तांत ऐसा पशु पालकांनींनिवेदिता घे व्रजवाल कानींलक्षूनि माया करि मंद हासकेला जिणें मोह महा - महास ॥१८॥
बोले पुन्हा हरि तयांप्रति लोक रीतीकीं एक यत्न नव्हतां दुसरा करीतीप्रार्था अशाचि तुह्मिं जाउनि विप्रदारात्या अन्न देतिल तुह्मांसि महा - उदारा ॥१९॥
अत्यंत मी प्रिय जयांसि जगन्निवासज्यांच्या मतीस मज माजि सदा निवासमाझ्या कथा बहु रुचीं परिसोनि कानींध्यानीं तिही स्तवियेलें मज बायकांनीं ॥२०॥
स्नेह स्वभाव सहज स्वत एव साचातन्नपि वास मज माजिच मानसाचातो मी असे जवळि हे परिसोनि वाणीदेतील अन्न बहु त्या न करुनि वाणी ॥२१॥
ऐकूनि हे शब्द अगाध वाचेगडी पुन्हा धांवति माधवाचेते यज्ञ शाळेचमधें द्विजातीतों पत्नि शाळेप्रति गोप जाती ॥२२॥
विप्रस्त्रिया सारुनि पाक साराध्याती मुकुंदा जगदेक साराआलंकृता मौक्तिक - माणिकानींमनीं मुखीं माधव आणि कानीं ॥२३॥
देखूनियां हे हरिदास त्यांतेंनमो ह्नणूनी नमिती सत्यांतेंसन्मान देऊनि अनेक रीतीआला हरी हे श्रुत ते करीती ॥२४॥
द्विजांच्या पल्या हो वचन वदतों हें मनिंधरातुह्मीं प्रेमें चित्तीं स्मरत असतां ज्या गिरिधरास्वयें आला आहे बहुत जवळी येथुनि हरीतया द्या अन्नें जो स्वजन - जठराग्रीं परिहरी ॥२५॥
ऐकतां निकट आगमनातेंनावरेच अनुराग मनातेंअन्न षड्रस चतुर्विध जातीघेउनी हरिस सन्निध जाती ॥२६॥
समुद्रातें उच्च - स्थळिं हुनि मिळों जाति सरितासुखाब्धीतें जाती त्वरितचि तशा प्रेम भरितापिता पुत्र भ्राता जिस तिस निवारी निजपतीतर्ही गेल्या तेथें पशु पजन - युक्त व्रजपती ॥२७॥
गडी गाती कीर्ती स्तविति वडिला बंधुस बळापहाती ते दृष्टीं करुनि अबळा भाग्य सबळातटीं कालिंदीच्य सुललित - अशोक द्रुम - वनींस्व गोपाळांमध्यें करि पदरजें धन्य अवनी ॥२८॥
ऐकोनि जो स्व त्दृदयांतचि रेखिला होप्रत्यक्ष तोचि नयनीं हरि देखिला होआलंगिला निजमनें प्रभु त्या सत्यानींकेलें तया उपरि वंदन त्यास त्यानीं ॥२९॥
श्रुतिसहि वदवेना जो त्दृषीकेश वाचेपुसिति कुरळ केशीं पाय त्या केशवाचेचरण कमल - युग्मीं शामला भृंग मालामिरविति सुख तेव्हां स्थावरा जंगमाला ॥३०॥
हरी ह्नणे कीं तुह्मिं विप्रदारामहा - सभाग्या परमा उदारापहावया पातलि याच मातेंअलभ्य जो मी त्रिदशोत्तमातें ॥३१॥
जडा अनर्थात समान साचाजो अर्थ तो मी प्रिय - मानसाचासर्वासही गोडचि वाटलों कींप्रीतीस ही एकचि वाट लोकीं ॥३२॥
स्वयें स्वात्मा तोहा हरि ह्नणुनि या पावन कळेन घेती भक्तीचा परम निज सद्भाव न कळेस्वभक्ती मुक्तीचे विरजण न नामीं प्रियपणाविलंबें सिद्धीची उडवि रुचि ते भक्ति कृपणा ॥३३॥
अशा प्रियातें पुरुषोत्तमातेंपहावयां पातलियाच मातेंहे युक्ति कीं मी प्रिय मानसाचासर्वा प्रिया माजि समान साचा ॥३४॥
तनु - धन - विषयांचा सर्व जो जो पसाराअनृतचि परि माझा त्यामधें व्याप सारालहरिहि तृषितातें गोड ते जीवनानेंप्रिय सकळाहि केले म्यां जग ज्जीवनानें ॥३५॥
प्रियें सारीं जेणें प्रिय परम तो वो स्वभजनींअसा मी त्या मातें तुह्मिं गवसिलें प्रेमभजनींअसें जें हें केलें बहु उचित वाटे मज परीपती जेथें तेथें गमन करणें एतदुपरी ॥३६॥
तुह्मीं जावें जेथें स्व पति करिती देवयजनस्त्रियांच्या योगें तें करितिल समाप्ती द्विजजनसुखाच्या त्या गोष्टी वदत सुख दे श्रीहरि परीबहु क्लेशी झाल्या गमन वदला जें तदुपरीं ॥३७॥
बहु क्लेशी झाल्या श्रवणिं पडतां हें द्विजसत्याजळातें नेत्रांच्या पुसुनि वदति श्रीपतिस त्याअहा हा देवा तूं परम - करुणा सागर हरीतयाही मध्यें हें नवल उठिली क्रूर लहरी ॥३८॥
हे शब्द योग्य न तुतें पुरुषोत्तमातेंमिथ्या नको करुं तुझ्या निगमाऽगमात्तेंवायां न जाय निज भक्ति असी स्ववाणीसाची करुनि न करी करुणेसि वाणी ॥३९॥
पदापासीं आलों चरणरज निर्माल्य तुळसीधराया माथां जे ढकलिसि पदें तें अतुळसीपरी पुत्र भ्राते सुत्दृदजन लंघूनि सकळांनिघालों त्या आह्मां गति न तुज वांचूनि विकळां ॥४०॥
अंगी करील न पती न पिता न बंधुआह्मांसि तूंचि गति यावरि दीन बंधुज्याच्या पदाजवळि लोकुनिया प्रकारेंद्यावें न अंतर तयां अजि निर्विकारें ॥४१॥
पद जयांसि तुझें परमा - गतीत्यजिसि त्यांसि अतः पर मागतीवदसि यावरि शब्द झणी असाह्नण पदाजवळीच तुम्हीं असा ॥४२॥
करुनि हास्य ह्नणे हरि कांपतीत्यजिति सर्व तुह्मांसचि कांपतीधुवुनि ते तुमच्या पदपंकजापितिल तो अति पार न पंक ज्या ॥४३॥
किमपि दोष तुह्मांसि कदापि तेपति न लाविति आणि सखे पितेसकळ ते सह बंधु सहोदरस्मरति हे तुमचा गुण सागर ॥४४॥
अहो तुमचिया द्विजां सुकृतपुण्यसांटा कितीतुह्मांसि सुर वंदिती नभिंहुनी फूलें टाकितीह्नणोनि तुह्मिं जा गृहा त्यजुनि शीघ्र या आग्रहाह्नणे तुम्हिं करा मनीं स्वपद भक्तिच्या संग्रहा ॥४५॥
घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगेंन साधे तसी माझिया अंग - संगेंमनीं ध्या मला शीघ्र पावाल मातेंस्मरा अंतरीं सर्व सर्वोत्तमातें ॥४६॥
शुक ह्नणे हरिची असि वैखरीद्विज सत्या मनिं मानुनियां खरीपरतल्या अवघ्या स्वसुखालयाअशन अर्पुनियां स्वसुखालया ॥४७॥
द्विज न ले शहि वाइट वाटतीपरम सादर त्यांसिच मानितीदिधलि सद्य जिला परमा गतीस्मरति तीसचि मागुति मागुती ॥४८॥
जातां हरी जवळि एक सती पतीतेंजें सांपडे हरि मनींच समीप तीतेंध्यानीं दिसे तनुं सुटे सह लिंग देहासारुप्य मोक्ष निज तीस मुकुंद देहा ॥४९॥
देखूनि कृष्णपदभक्तिचिया प्रतापास्वाऽन्याय आठविति पावति विप्र तापाधन्यत्व वर्णिति तया अबळा - जनांचेंसान्निध्य ज्यांसि घडलें भवभंजनाचें ॥५०॥
शुक ह्नणे द्विज ते अनुतापलेस्मरति जे अपराधहि आपलेस्तविति आपुलिया अबळाजनाजिहिं सदन्न दिल्हें भव भंजना ॥५१॥
श्रीकांत - भक्ति अवलोकुनि त्या सत्यांचीते वाटली परम सन्मति त्यांस त्यांचीयालागिं वानिति अशा अबळापणातेंधिक्कारिती निज गुणासह आपणातें ॥५२॥
विश्वंभर त्रिभुवनेश्वर विश्व - पाळीतो मागतो ह्नणुनियां स्फुट धेनुपाळींसांगीतलें तरि तया दिधलें न कांहींतें अन्न नेउनि दिल्हें निज - बायकांहीं ॥५३॥
आह्मीं गुरु सर्व - दिनां द्विजातीदाऊं जनां मार्ग तसेचि जातीऐशा सहीते करिते भ्रमायातया हरीची तखे न माया ॥५४॥
माया असी ह्नणुनी जें वदतों जनातेंतेही नसो समजलों भवभंजनातेंमायापती सहि करी भ्रम विष्णुमायाजीवित्व जी करुनि तोचि धरी रमाया ॥५५॥
पहा हो नारीचें हरिचरण - पद्म - प्रियपणद्विजां आह्मां नाहीं पढत पशु जे मूर्ख कृपणअहो ज्या सद्धावें जनन - मरणाचा उपरमस्त्रियांच्या ठांई तो द्विज ह्नणति आश्चर्य परम ॥५६॥
ज्या अंगना कधिं न आचरल्या तपातेंसोसूनि ही परम वर्ष हिमाऽतपातेंलावी न ज्यांस निज अद्वय - लाभ - वार्ताजे मुक्ति मार्ग - पद दाखवितो भवार्ता ॥५७॥
संसार तो द्विजपणीं अबळांसि नाहींज्याला नसे गुरुपणीं सदुपासना हीऐशा ही भक्ति पद अंबुजपाणिजीचीआह्मां अशा द्विजवरांसहि वाणि जीची ॥५८॥
पुरुष ते भजती अबळाजनास्मरत वामन त्या भवभंजनाह्नणतसे कमलापुरुषा त्वरेंमनिं धरील तया पुरुषत्व रे
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.