मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्री खंडोबाची आरती

भक्ती

श्री खंडोबाची आरती

Shri Khandobachi Aarti

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।खंडामंडित दंडित दानव अवलीला ॥मणिमल्लां मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ ॥
सुरवर संवर वर दे मजलागी देवा ।नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ जय ॥ २ ॥
रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।तो हा मल्लांतक अवतार झाला ॥यालागीं आवडे भाव वर्णिला ।रामी रामदासा जिवलग भेडला ॥ जय ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Khandoba British Museum.jpg — Unknown artist Unknown artist, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)