
भक्ती
श्री अनंताची आरती
Shri Anantachi Aarti
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ॥ धृ ॥
भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।दुकुलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ॥ १ ॥
नानापरिचीं पुष्पें द्रव्यें तुजला अर्पीती ।षोडशपूजा करुनी द्वाह्मण संतर्पण करिती ॥ २ ॥
अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशीं करिती ।अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपती ॥ ३ ॥
रामा धर्में आचरितां व्रत क्लेशांतुनि सुटला ।कौंडिण्याने पुजिलां तुजला उद्धरिले त्याला ॥ ४ ॥
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

आरती ज्ञानराजा
विठ्ठलआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
Aarti Dnyanaraja

युगे अठ्ठावीस
विठ्ठलयुगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
Yuge Atthavis

येई हो विठ्ठले
विठ्ठलयेई हो विठ्ठले माझे माऊली ये
Yei Ho Vitthale

ओवाळूं ग माये विठ्ठल
विठ्ठलओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा
Ovalu Ga Maye Vitthal

आरती अनंतभुजा
विठ्ठलआरती अनंतभुजा विठो पंढरिराजा
Aarti Anantabhuja

श्री विष्णूची आरती
विठ्ठलसंतसनकादिक भक्त मिळाले अनेक
Shri Vishnuchi Aarti