मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
दशावतारांची भूपाळी

भक्ती

दशावतारांची भूपाळी

dashavataranchi bhupali

सारांश

एक अवतार एक चरण — मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह असे क्रमाने दहा अवतार सांगत जाणारी भूपाळी. प्रातःकाळी हे स्मरण केल्यास भवसागर तरून जाता येतो, असा शेवट. ‘दास म्हणे’ ही नाममुद्रा.

जन म्हणा हो श्रीहरि । प्रातःकाळी स्मरण करी ।तेणे तराल भवसागरी । हा निर्धार भंरवसा ॥ ध्रु ॥
वेद नेले निशाचरी । मत्स्यरुप झाले हरी ।कार्य ब्रह्मयाचे करी । शंखासुर वधोनिया ॥ १ ॥
दैत्य मातले भूमंडळी । पृथ्वी नेली रसातळी ।कूर्मरुपी हो वनमाळी । पृष्ठी धरिली मेदिनी ॥ २ ॥
मही डळमळी पहा हो । देव झाले वराह हो ।मग वधियेले दैत्य दानवो । पृथ्वी दाढे धरोनिया ॥ ३ ॥
पुत्र पित्याने गांजिला । तो हा नरहरि स्मरता झाला ।स्तंभी अवतार धरियेला । भक्त रक्षिला प्रह्लादा ॥ ४ ॥
याग करिता झाला बळी । इंद्र कांपिन्नला चळचळी ।वामनरुपी हो वनमाळी । धाली पाताळी बळीराजा ॥ ५ ॥
रेणुके उदरी भार्गव झाले । राजे समस्त संहारिले ।राज्य ब्राह्मणा दीधले । सुखी केले भूदेव ॥ ६ ॥
सूर्यवंशी रघुनंदन । वानर सैन्य मिळवून ।सागर पाषाणी बांधून । संहारिले राक्षसा ॥ ७ ॥
कारागृही अवतरले । श्रीकृष्ण गोकुळी वाढिन्नले ।कंसचाणूर मर्दिले । राज्य स्थापिले उग्रसेना ॥ ८ ॥
बौद्ध अवतार धरियेला । जन हा बहुत कष्टी झाला ।मग कलीस वरा दीधला । आपण राहिले निद्रिस्थ ॥ ९ ॥
पुढे कलंकी होणार । ऐसा शास्त्राचा निर्धार ।मग फिरेल भवसंदेह । या हो विश्वजनाचा ॥ १० ॥
दशावतारांची भूपाळी नित्यस्मरा प्रातःकाळी ।दास म्हणे हो भूमंडळी भाग्यवंत होतील ॥ ११ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

हेही वाचा