मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नद्यांची भूपाळी

भक्ती

नद्यांची भूपाळी

nadyanchi bhupali

सारांश

जवळपास संपूर्ण भूपाळी नद्यांच्या नावांची यादी आहे — गंगा, यमुना, कृष्णा, भीमा, नर्मदा, कावेरी, तुंगभद्रा, गोदावरी आणि अशा कितीतरी. प्रातःस्मरणात नदीचे नाव घेणे हे स्नानासारखेच, अशी यामागची कल्पना. शेवटी ‘दास म्हणे’ ही नाममुद्रा.

प्रातःकाळी प्रातःस्नान । घडे केलिया स्मरण ।महादोषांचे दहन । महिमा गहन पुराणीं ॥ ध्रु ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी ।पूर्णा फल्गु भोगावती । रे गौतमी वैतरणी ॥ १ ॥
काळी कालिंदी किंकिणी । कपिलायणी इंद्रायणी ।नलिणी अर्चिणी धर्मिणी । ताम्रवर्णी नर्मदा ॥ २ ॥
कुंदा वरदा माहेश्वरी । तुंगभद्रा आणि कावेरी ।घटपाटपती मलप्रहरी । दुरितहरी जाह्नवी ॥ ३ ॥
भीमा वरुणा मंदाकिनी । पूर्णपदा पुन्हपुन्ही ।वज्रा वैष्णवी त्रिवेणी । कुमुदिनी नारदी ॥ ४ ॥
मनकर्णिका वेदावती । कुकुद्वती हेमावती ।सीता प्रयागी मालती । हरिद्वयती गंडिका ॥ ५ ॥
सरयू गायत्री समुद्रा । कुरुक्षेत्रा सुवर्णभद्रा ।दास म्हणे पुण्यक्षेत्रा । नाना नद्या गोविंदीं ॥ ६ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

घडे
— घडते, शक्य होते

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

हेही वाचा