
भक्ती
पंढरीची भूपाळी
pandharichi bhupali
सारांश
ही भूपाळी देवाला उठवत नाही, भक्ताला उठवते — ‘चला जाऊ पंढरीसी’. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचे दर्शन, आणि सगळ्या नद्या स्वतः श्रीपतीच्या दर्शनाला आलेल्या.
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी ।भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । क्रुष्णा वेण्या भागिरथी ।तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपतिदर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।स्नाने केलिया बाहेरी । हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।माता पिता विश्र्वंभर । पैलपार तरतील ॥ ४ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

आरती ज्ञानराजा
विठ्ठलआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
Aarti Dnyanaraja

युगे अठ्ठावीस
विठ्ठलयुगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
Yuge Atthavis

येई हो विठ्ठले
विठ्ठलयेई हो विठ्ठले माझे माऊली ये
Yei Ho Vitthale

ओवाळूं ग माये विठ्ठल
विठ्ठलओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा
Ovalu Ga Maye Vitthal

आरती अनंतभुजा
विठ्ठलआरती अनंतभुजा विठो पंढरिराजा
Aarti Anantabhuja

श्री विष्णूची आरती
विठ्ठलसंतसनकादिक भक्त मिळाले अनेक
Shri Vishnuchi Aarti