मुख्य मजकुराकडे जा

संतसाहित्य

पसायदान

Pasaydan

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीं रती वाढो ।भूतां परस्परें जडो । मैत्र जीवांचें ॥
दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित गाथेशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.