मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल ३ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

मावळ्यांचा मेळा जमवून किल्ले घेण्यास सुरुवात. फुले मावळ्यांना नावानिशी गौरवतात — पोवाड्याचा भर राजावर नाही तितका त्याच्या सोबत्यांवर आहे, हे या भागात स्पष्ट दिसते.

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात ।चाकरी ठेवी लोकांस ॥
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास ।मुख्य केले फिर्डोजीस ॥
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास ।कैद पाहा केले मामांस ॥
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास ।करामत केली रात्रीस ॥
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास ।सिंहगड नाव दिले त्यास ॥
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास ।कैद पाहा केले सर्वांस ॥
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस ।मारले नाही कोणास ॥
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास ।साठवी राजगडांस ॥
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ॥
बाकी चारा किल्ल्यास ॥
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस ।धूर्त योजी फितुरास ॥
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास ।मुलान्या सुभेदारांस ॥
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास ।योजना केली कपटांस ॥
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास ।कैद तुम्ही करां शहाजीस ॥
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास ।दग्याने कैद केले त्यास ॥
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास ।खुशी मग झाली यवनांस ॥
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास ।ठेविले भोक वार्यायस ॥
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस ।ऐकून भ्याला बातमीस ॥
पिताभक्तील मनी लागला शरण जायास ।विचारी आपल्या स्त्रियेस ॥
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस ।ताडा दंडी दुसमनास ॥
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास ।पाठवी दिल्ली मोगलांस ॥
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस ।सोडवा माझ्या पित्यास ॥
मोगल थैली गेली थेट मुसलमानास ।ठेविले किल्ल्यावर त्यास ॥
बाजी शामराज का लाजला जात सांगायास ।धरू पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस ।आडचण झाली बखरीस ॥
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास ।काळे केले महाडास ॥
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस ।हा पाजी मुकला जातीस ॥
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस ।यवन भ्याला सिंहास ॥
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास ।पिताभक्ती पुत्रास ॥
चंद्रराव मोर्याशस मारी घेई जावळीस ।दुसरे वासोट्या किल्ल्यास ॥
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास ।नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास ।चलाखी दावी मोगलांस ॥
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास ।पाठवी गडी लुटीस ॥
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस ।लुटी हत्तिघोड्यांस ॥
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास ।चाकरी ठेवी बारगिरास ॥
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास ।चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास ।उदासी लाभ शिवाजीस ॥
आबजूलखान शूर पठाण आला वाईस ।शोभला मोठा फौजेस ॥
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस ।कमी नाही दारूगोळिस ॥
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस ।फितवीले लोभी ब्राम्हणास ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास ।चुकला नाही संकेतास ॥
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास ।बरोबर आला बेतास ॥
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास ।कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस ।भ्याला तुमच्या शिपायांस ॥
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस ।लागला भेटू शिवाजीस ॥
वर भेटभाव वाघनख मारी पोटास ।भयभित केले पठाणास ॥
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस ।झोंबती एकमेकांत ॥
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस ।पठाण मुकला प्राणास ॥
स्वामीभक्तीप धाव घेई कळले शिपायास ।राहिला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास ।तान्हाजी भिडे बाजूस ॥
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास ।घाबरे केले दोघांस ॥
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस ।लाथाळी जीवदानास ॥
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस ।न्याहाळी प्रेती धन्यास ॥
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास ।गेला जन्नत स्वर्गास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस ।पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास ।दुसर्यार सरंजामास ॥
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास ।पाठवि विजापूरास ॥
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस ।फितुर्या गोपीनाथास ॥
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास ।उपमा नाही आनंदास ॥॥ चाल ॥
॥ शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ॥
॥ क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार खेळला ॥
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा ।आर्शिवाद घेई आईचा ॥
आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥ ३ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 6