मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल ४ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

अफझलखानाची स्वारी आणि प्रतापगडचा प्रसंग. फुल्यांची मांडणी शौर्याची आहे, पण ती चमत्काराकडे झुकत नाही — डावपेच आणि माणसांचे धाडस हेच कारण म्हणून सांगितले जाते.

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास ।केले मग सुरू खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास ।नेमिला कोल्हापुरास ।स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास ।आला थेट पन्हाळ्यास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस ।अति जेर केले त्यास ।खंडणी घेत गेला भिडला विजापुरास ।परत मग आला गडास ॥
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास ।मात गेली विजापुरास ॥
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस ।सावंत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास ।करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास ।केले महाग दाण्यास ॥
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस ।कोंडिले गडी फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास ।योजनां करी उपायास ॥
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास ।उपद्रव झाला रयतेस ॥
पासलकर बाजीराव पडाले वाडीस ।दुःख मग झाले शिवाजीस ॥
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास ।खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करून गेला उरला नाही आवकास ।कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस ।गेला थाप देऊन गडास ॥
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश ।हयगय झाली जप्तीस ॥
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस ।सविले मुसलमानांस ॥
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्याथस ।स्वारदळ लावी पाठीस ॥
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस ।बंदुका लावी छातीस ।बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास ।एकटा गेला रांगण्यास ॥
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस ।हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास ।धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास ।खवळला बाजी युध्दास ॥
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास ।पडला प्रभू भूमीस ॥
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस ।अंती मनी हाच ध्यास ॥
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास ।निघून गेला स्वर्गास ॥
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास ।पाहून स्वामीभक्तीगस ॥
विजापुरी मुसलमान करी तयारीस ।खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस ।वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास ।मारले पाळेगारांस ॥
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास ।राजगडी स्थापी देवीस ॥
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस ।केली मग मोठी मजलस ॥
तानसैनी भले गवय्या बसवी गायास ।कमी नाही तालस्वरास ॥
॥ चाल ॥
जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाहि हिमानी ॥
सचा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाईकू हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥
छोटे कूंबी कैद किया । लोक उसके फितालीया ॥
मजला भाई भगादिया । आराकानमे मारा गया ॥
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥
भाईबंदकू कैद किया । रयत सब ताराज किया ॥
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐषारामी । शिवाजीकू कहे हरामी ॥
बेर हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नाभी ॥
॥ चाल ॥
आदी आंतन । सर्वा कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूती पाहून । मनी ध्याईन ॥
नाव देऊन । जगज्जीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाई(रा)चा ॥
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ ४ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 6