ज्याणें मुक्ति अधासुरासि दिधली वत्सां मुलां जीवनेंज्याणें देउनिया सरोवर - तटीं आरंभिलीं भोजनेंजो कां वत्सप - वत्सरुप विधिनें सर्वास नेल्यावरीझाला अब्द भरी नमूं स्छिर चरी तो चित्स्वरुपी हरी ॥१॥
ज्याणें दाउनियं अतर्क्य - महिमा ब्रम्हा मनीं मोहिलातो आच्छादूनि नंद - नंदन वनीं जो एकला राहिलातेव्हां सावध होउनी नमुनियां ब्रम्हा करी जे स्तुतीत्या ब्रम्ह - स्तुतिची करी हरिच तो टीका स्वयें श्रीपती ॥२॥
जो कां एक अनेकरुप दिसतो तो वामनाच्या मुखेंटीका या स्तुतिची करुनि करितो श्रोत्यां जनाला सुखेंब्रम्हा नेत्र - जळें पदाब्ज युगुळें न्हाणूनियां जेथुनीश्रीभद्भागवतीं करी स्तुति तिची टिका पहा तेथुनी ॥३॥
ब्रम्हयानें हरिरुप दृष्टि सहजें तेव्हां वनी देखिलेंश्री - गोपाळपणांत बाळपणिचें प्रेमें मनीं रेखिलेंआधीं वेष तसाच वर्णुनि तया वंदूनियां त्यावरीत्याची निर्गुणता तथा सगुणता वर्णील ते वैखरी ॥४॥
जो एक स्तुति योग्य तूं विधि म्हणे नंदात्मजा त्या तुतेंमी वंदीन जया स्वरुप बरवें अत्यंत हें साजतेंमेघ श्याम शरीर - बीज झळके त्यामाजि पीतांबरींगुंजांचे अवतंस मोर - मुगुटीं शोभे मुखश्री बरी ॥५॥
जेव्हां मारुनियां अघासुर वनीं आरंभिलीं भोजनेंतेव्हां वेष जसा तसाच विधिला येथें जगज्जीवनेंदृष्टीं दाखविला चतुर्मुख तया वर्णील रुपा बरेंया श्लोकांतचि उत्तरार्ध रचितां ऐसीं पहा अक्षरें ॥६॥
कंठीं श्रीवन - माळिका करतळीं दध्यो - दनाचा बराशोभे ग्रास - विलास वेणु जठरी पीतांबरीं साजिराश्रृंगी आणिक वेत्रही धरियला कांखेस डावेकडेजेवी सव्य - करीं हरी मृदुपरीं त्याच्या विधाता पडे ॥७॥
एवं कृष्ण असे सुवेध - विधिनें गोपाळ - वेषें असामाथां बंदुनि वर्णिला स्व - नयनीं तत्काळ भासे जसाआम्हा या तनुचा अतर्क्य महिमा हा वर्णवेना कधींतेव्हां वर्णिल कोण आणिक असें बोलेल आतां विधी ॥८॥
ऐसा गोवळ - वेष केवळ जसा पद्मोद्भवें देखिलातैसा वर्णुनि शंकला हरि अहो गौळीच म्यां लेखिलाजो या देवपणीं अतर्क्य महिमा जो तर्कवेना कधींतेव्हां वर्णवतो अतींद्रिय कसा बोलेल ऐसें विधी ॥९॥
जें तूझें अवतार - रुप दिसतें दृष्टीस सर्वा जनांहेंही केवळ पांच - भौतिक नव्हे देवा जगज्जीवनाजें माझ्याच अनुग्रहार्थ रचिलें ऐकोनि मत्प्रार्थनायाचाही महिमा कधीं नगवसे कोणाचियाही मना ॥१०॥
जें दृष्टीस दिसे मना न गवसे याचा जयीं नाकळेकोण्हाला महिमा अतींद्रियपणीं माहात्म्य कैसें कळेआनंदात्मक पाणि पाद न जया जें शुद्ध मायामयब्रम्हात्मानुभवैक मात्र अवघें होऊनि जें अद्वय ॥११॥
ज्या देवासि अपाणिपाद म्हणती वेदस्मृती तत्वतातों तो होउनियां अहो सगुणही त्याला निराकारताकर्णावांचुनि ऐकतो श्रुति म्हणे नेत्रांविणें पाहतोतेव्हां निर्गुण - धर्महीन न घडे मायामय स्वामि तो ॥१२॥
जें ब्रम्ह तें धर्मविहीन आहे न आइके आणिक तें न पाहेसाक्षित्वही निर्गुणता न साहे प्रकाशवी दीप उगाच राहे ॥१३॥
दीप - प्रकाशें तरि नेत्र पाहे नेत्रांविणें दीप उगाच आहेमायेंविणें ब्रम्ह न धर्म साहे श्रुतींत येथें सगुणात्मता हे ॥१४॥
साक्षात् सुखानुभव रुप तुझें तयाचाकैंचा कळेल महिमा म्हणऊनि वाचाश्लोकांत यांत वदली कमळासनाचीतेही अहो सगुणताचि जनार्दनाची ॥१५॥
ब्रम्ह तों सुखचि केवळ आहे तें निजात्म - सुख ईश्वर पाहेत्यासही न कर पाद तथापी भक्त वत्सल रमापति - रुपीं ॥१६॥
नयन हेंचि अतींद्रिय दोंपरी सगुण एकचि वर्णियला हरीप्रकटरुप महत्वहि नाकळे तरि अतींद्रिय - भाग्य कसें कळे ॥१७॥
भाव हाचि महिमेंत न कांहीं तारतम्य उभयत्रहि नाहींन्यून पूर्ण महिमा न हरीचा रुप - भेद - महिमा सम साचा ॥१८॥
आत्मत्व भक्ति सहजें प्रियता विधाताश्लोकांत या तिसरियाच वदेल आतांपूर्वी अतर्क्य महिमा वदला विरिंचीयालागिं येविषइं शंकित - बुद्धि त्याची ॥१९॥
न महिमा हरिचा जरि आकळे तरि निजानुभवत्व कसें कळेन कळतां भयबंध तुटे कसा म्हणुनि संशय उद्भवला असा ॥२०॥
तरि समुद्र - तरंग जळीं मुरे मग दुजेपण त्यांत कधीं नुरेमन मुरे स्वचिदात्मपणीं जरी कळणियांत तयांत नुरे उरी ॥२१॥
परि अनुभव ऐसा साधकां होय तेव्हांजरि भजन - विशेषें तत्कृपा होय जेव्हांभजन सफळ तेव्हां भक्ति जेव्हां ठसाचेसकळहि कळणें तें भक्ति मागेंचि धांवे ॥२२॥
असे वत्स जेथें जसी गाय धांवे तसा बोध ही भक्ति तेथें ठसावेपरी प्रीति जे ईश्वरीं आत्मभावें तिये प्रीतिला भक्ति ऐसें म्हणावें ॥२३॥
कळे आत्मता बोध झालाचि त्याला पुढें भक्तिनें साध्य तों केवि बोलाअसे बोलती दांभिक ज्ञानभानी कुतर्काश्रयें शब्द बोधभिमानी ॥२४॥
जड निषेधुनि शुद्ध चिदात्मता गुरु मुखें कळली जरि तत्वतांमन मुरोनि अशेषपणें उरे तरिच सिद्ध न जेथ दुजें स्फुरे ॥२५॥
यालागिं जीवेश्वर - ऐक्य जेव्हां कळे निजात्मा कळलाचि तेव्हांआत्मप्रियत्वें गुरु - देव - भक्ती करील तेव्हांच समाधि - मुक्ती ॥२६॥
श्रुती यस्य देवे परा भक्ति ऐसी पहा बोलती याच अर्थास कैसीगुरु होय दावी चिदात्मत्व जेव्हां तयाची करावी अहो भक्ति तेव्हां ॥२७॥
जसी कां देवाची करि परम भक्ती प्रियपणेंगुरुची ही तैसी करि जरि मनें ऐक्य - निपुणेंगुरुनें जे त्याला अनुभवरहस्यार्थ कथिलेप्रकाशूनी प्राप्ती स्छिति परम देती मग भले ॥२८॥
श्रुतीचा असा अर्थ यालागिं जेव्हां करी भक्ति आत्मज्ञ तो सिद्ध तेव्हांगुरुच्या मुखें जें कळे शब्द - बोधें तयाची स्थिती स्वात्मता - भक्ति वेधें ॥२९॥
याकारणें तत्वमसीतिवाक्यें जीवेश - वाच्यांश - निषेध - ऐक्येंआत्म - प्रियत्वें गुरु - देव - भक्ती करी मुरे चित्त तईच मुक्ती ॥३०॥
कोण्ही जडाजड - विवेक करुनि धालेज्ञानाभिमान मनिं मानुनि मूढ झालेआतां किमर्थ म्हणती सगुणा भजावेंते ज्ञान - गर्व - निधि हेंचि तयां म्हणावें ॥३१॥
अभ्यासही करिति केवळ निर्गुणाचातों तों अधीक मनिं आदर मीपणाचाअभ्यास मी बहुवरा करणार ऐसाचित्तांत भाव सहसा उपजे न कैंसा ॥३२॥
आत्मज्ञ होउनिहि जे भजती मुकुंदात्याचा सदा श्रवण - कीर्तन - रुप धंदाआत्मैक्य - भक्ति त्दृदयीं गुण दिव्य कानींते सिद्धि होउनि कदापि न होति मानी ॥३३॥
श्रवण - कीर्तन - भक्ति जसी जसी हरि - कृपा अभिवृद्धि तसी तसीजसि कृपा उपजे मधुसूदना तसि तसी अगुणीं स्थिरता मना ॥३४॥
जसि जसी स्थिरता हरिची दया तसतसा अवलोकिल तो तयामनिं तरंग अहंकृतिचा कसा मग उठे जरि निश्चय हा असा ॥३५॥
ज्ञाता स्व - भक्तिंच करी दृढ - बोध - सिद्धीबोधीं न भक्तिविण निश्चळ होय बुद्धीयाकारणें अजित - भक्ति - महत्त्व आतांज्ञानाहुनी अधिक वर्णितसे विधाता ॥३६॥
ज्ञानीं प्रयास मन - सुस्थिरता करायाआत्मज्ञ मांडिति भवांबुधितें तरायाचित्त - स्थिरत्व करितां श्रमि फार होतीवृत्ती निरोधिति तथापि न त्या रहाती ॥३७॥
ते शुद्ध - निर्गुण - उपासक - कष्ट जेव्हांऐसे वृथा अफळ देखति तेचि तेव्हांब्रम्हा म्हणे हरि तुझ्या चरणार विंदाबंदूनि मांडिति तव - श्रवणादि धंदा ॥३८॥
योगी प्रयास न करुनि समस्त - भूतींवस्त्रांत तंतु तुज चिंतुनि येचिरीतीसाष्टांग ते करिती वंदन विश्वरुपालक्षूनियां जड - जगांत हि चित्स्वरुपा ॥३९॥
ज्ञाने प्रयास मुदपास्य नमंत एवश्लोकांत या चरणिं येरिती हाचि भावज्ञानीं प्रयास न करी सगुणात्मयोगीज्ञानें तथापि करि वंदन वीतरागी ॥४०॥
ज्ञानीं प्रयास न करुनिहि बोधरीतीविश्वात्मते करुनि वंदन ते करीतीभेदें करुनि भजणें पश्रु तुल्य ऐसेंस्पष्ट श्रुती वदति जाणति ते न कैसें ॥४१॥
ज्ञानें असे करिति ते प्रणिपात तूतेंतूझे कथामृतचि जीवन त्यांस होतेंलीला तुझ्या श्रवणिं आइकती मुकुंदासांडुनि योग - पथ आणिक सर्वधंदा ॥४२॥
जे संत - त्दृत्कमळ - सार - सुधा निघालीत्यांच्या मुखेंकरुनि कर्ण पुटास आलीबा रे अशी हरि - कृपारव्य - सुधेस प्यालेज्ञानें श्रमाग्नि विझतां त्दृदयीं निवाले ॥४३॥
तूझ्या कथा त्रिविध ताप हरी हरीतीकष्टाविणें श्रवण - अमृत जें भरीतीस्थानें धरुनि वसती श्रवणार्थ जेथेंकानीं कथा रिघति आपणहूनि तेथें ॥४४॥
एकाग्र - चित्त - तनु निश्चळ मौन वाचेजे येरिती कवळ घेति कथामृताचेब्रम्हा म्हणे अजित तूं तुज जिंकणारेनाहींत यद्यपि तयां वश तूं मुरारे ॥४५॥
टाकूनियां इतर - साधन - मात्र धंदातूझी कथा सतत आइकती मुकुंदात्यांचें जिणें सकळ जे भगवत्कथेतेंमानूनि जीवन जिती त्यजिती व्यथेतें ॥४६॥
श्लोकांत या तिसरियांत पदापदाचाजो वामनानन - पुटीं हरिरुप वाचावाक्यार्थ - भाय वदली बरव्या प्रकारेंपाहोत संत हरि - भक्ति - पथें विचारें ॥४७॥
योग - प्रयास - पथ टाकुनियां मुकुंदाआत्मैक्य - भक्ति करुनी तव - भक्ति - धंदाआरंभिती श्रवण - वंदनरुप त्यांलाहोतोसि तूं वश असें विधि बोलियेला ॥४८॥
यानंतरें बोलतसे विरिंची कीं भक्ति हे टाकुनियां हरीचीज्ञानार्थ मोठ्या पडती प्रयासीं न कष्ट देती फळ तें तयांसी ॥४९॥
अमृत - पुष्करणी धरणी - वरी सकळ - मंडळ जेथ झरे हरीअसिहि टांकुनि भक्ति तुझी बरी श्रमति ते श्रममात्र तयां उरी ॥५०॥
टाकूनि भक्ति - असि केवळ बोध - सिद्धीजे भक्ति - गम्य जन इच्छिति ते समाधीटाकूनियां सकस तंदुळ - गर्भ शाळीजे स्थूळ फोल कुटिती श्रमती त्रिकाळीं ॥५१॥
अव्यक्त निर्गुणचि भोगुनि यत्न - रत्नेंहोऊनि खिन्न शिरिं वंदिति भक्ति यत्नेंश्लोकामधें तिसरिचा विधि भक्ति ऐसेंजें बोलिला विशद वर्णियलेंच तैसें ॥५२॥
आत्मैक्य एक करिती सगुणीं उपेक्षाजे ज`जान - गर्वित न सेविति अंबुजाक्षाश्लोकांत येथ चवथ्यांत कुबुद्धि त्यांचीगोपाळ - रुप हरिसीं वदला विरिंची ॥५३॥
आत्मज्ञ हे द्विविध येरिति वर्णियेलेआत्मज्ञ आणि सगुण प्रिय थोर केलेआत्मज्ञता सुगम हे चिदचिद्विवेकींकेली निरर्थक तथापि अभक्त लोकीं ॥५४॥
आत्मा प्रकाशक जडासि असें कळायाआयास काय परि जोंवरि देवरायानारायणा न भजती स्थिति त्यांस नाहींहा शब्द बोधचि न सिद्धि तयांत कांहीं ॥५५॥
जे देवतांतर - उपासक मात्र आधींसत्संगमें धरियली शुचि - आत्मबोधींआत्मा प्रकाशक असें कळलें तथापीसर्वात्मता न कळली हरिंच्या स्वरुपीं ॥५६॥
ते बोध - यत्नहि करुनि कितेक कष्टीहोऊनियां मग विचारुनि दूर दृष्टीश्रीविष्णुभक्ति करितां कृतकृत्य झालेश्लोकांत त्या तिसरि यांत निरुपियेलें ॥५७॥
श्लोकांत जे कथियले विधिनें चतुर्थीआत्मज्ञ होउनिहि ते पडले अनर्थीआत्मज्ञ हे द्विविध येरिति वर्णियेलेआत्मज्ञ आणि सगुण प्रिय थोर केले ॥५८॥
आधींच विष्णु - भजनीं न जयां प्रवृत्तीहोऊनि खिन्न मग जे हरिभक्त होतीत्यांलागिं कष्ट बहु फार म्हणे विधातावर्णील विष्णु - भजनीं सुगमत्व आतां ॥५९॥
आत्मा न जाणतहि जे भजती मुकुंदात्याचा सदा करिति जे श्रवणादि - धंदात्यांला गुरु हरिच होउनि अप्रयासेंदेईल बोध परिपूर्ण वदेल ऐसें ॥६०॥
पूर्वीच म्यां स्वरुप देखियलें अनंतातें वर्णितां म्हणउनी विनयी विधाताकीं देखिले बहु जगीं निज - कर्म - योगीजे कर्म सर्वहि समर्पिति तूजलागीं ॥६१॥
आवश्यकें करुनियां विहितें स्वकर्मेनिष्काम तीं तुज समर्पिति विष्णु - धर्मेकर्मार्पणेंचि तुझि आवडि त्या जनांलातूझ्या कथा मग हरी रुचती तयांला ॥६२॥
कर्मार्पणें तव - कथा - श्रवणेंचि ज्यांलात्वभ्दक्तिचा परम - दुर्लभ लाभ झालाआत्मैक्य आवडि तुझी कळली मुकुंदाझालेच सिद्ध नकरोनिहि योग - धंदा ॥६३॥
अनायासें ऐशा तय - चरण - दास्यें करुनियांगति श्रेष्ठा तूझ्या तुजचि भजती जे नर तयांत्यजूनी जे अन्या मग शरण आले तुज परीतयांही त्या सिद्धि श्रम गण - समृद्धी बहु करी ॥६४॥
जाणोनि जे चिदचिदात्म विवेक मात्रामानूनि धन्य भजती न सरोज - नेत्रात्यांला श्रमाविण नसे फळ अन्य ऐसाश्लोकांत यांत कथिला स्फुट भाव तैसा ॥६५॥
गर्भस्तुतींतहि असें दशमींच येथेंश्लोकद्वयें विधिभवादिक भाव तेथेंहा स्पष्ट अर्थ वदले श्रुतिसिद्ध देवेंगीतेंतही कथियलें स्फुट वासुदेवें ॥६६॥
गर्भस्तुति - श्लोक हरीच येथें वारवाणितो श्री हरि - भक्ति जेथेंते संस्कृत श्लोकहि दोनि वाचा त्यानंतरें अर्थ पहा तयांचा ॥६७॥
श्लोक - द्वयार्थहि हरीच वदेल येथेंसंक्षेपरुप बहु विस्तरता न जेथेंकीं आत्मता कळलि शाब्दिक - बोध - रीतीजे मुक्ति हेचि म्हणऊनि मनीं धरीती ॥६८॥
आत्मज्ञता परम तें पद त्या पदींहीयत्नें चढोनिहि अहो पडताति देहीकीं आत्मता कळलि कां सगुणास आतांसेऊं म्हणूनि भजती न तुतें अनंता ॥६९॥
तुझा भाव जेव्हां असा अस्त झाला मतिभ्रंश तो मोह आला तयांलाजरी शुद्ध होती बरी बुद्धि त्यांची तुझा भाव जातांच ते शुद्धि कैंची ॥७०॥
दृष्टि - प्रकाश उदयाद्रिस सूर्य येतांआंधार तीस रवि अस्त गिरीस जातांश्रुद्धा मती सगुण - भाव - विना अशुद्धासिद्धी विना हरिकृपा अवघ्या असिद्धा ॥७१॥
पायीं तुझ्या आदर ज्यांस नाहीं आत्मज्ञता त्यांस फळे न कांहींहा आद्यपद्यार्थ दुज्यां विमुक्तां निरुपिती केवळ विष्णु भक्तां ॥७२॥
तुझी नावडी मुक्त झालों म्हणूनी जयां भ्रष्टती ते जसे ज्ञानमानीतसे माधवा जे तुझे ते कधींही नहोती न ते चूकती मार्ग कांहीं ॥७३॥
सखा सोयरा स्वामि तूं शेषशायी म्हणूनी सुत्दृद्धाव तुझ्याचठायींतयां रक्षिता तूं जनीं नित्य होसी शकेना करुं विघ्न कोण्ही तयांसी ॥७४॥
महाविघ्न - सेनापती मोठमोठे तयांचे शिरीं पाय देवोनि वाटेहरी चालती मोक्ष - मार्गी तुझे जे तशांही न ते बाधती विघ्न राजे ॥७५॥
न तें बोलवे ग्रंथ वाटे म्हणोनी अगत्यास हे बोलिलों श्लोक दोनींपुढें भारती भारतीच्या पतीची पहा दाविते काय शोभा स्तुतीची ॥७६॥
तूझा अतर्क्य महिमा नकळे अनंताश्लोकांत हें दुसरिचा वदला विधाताबोलोनि येरिति मनींच सशंक झालाकीं मोक्ष याउपरि होय कसा जनाला ॥७७॥
देणार मुक्तिस कळे महिमा न त्याचालोकांस मोक्ष मग हा घडणार कैंचाशंका असी त्दृदयिं तीस हरावयालाहे श्लोक तीन कमळासन बोलियेला ॥७८॥
पृथ्वी छंदः अतर्क्य महिमा जरी तरिहि तूं निजात्मा हरीप्रकाशक मनीं स्फुरे मन मुरे तया भीतरीतथापि तव भक्तिनें तव अनुयहें या पदाप्रपन्न - जन पावती इतर भोगिती आपदा ॥७९॥
येणें प्रसगेंच उपासकांचे प्रकारही वर्णियले स्ववाचेसिद्धांत कीं श्री हरि - भक्ति ज्यांला ब्रम्हात्मता - प्राप्ति घडे तयांला ॥८०॥
करि हरीच अनुग्रह जेधवां अगुणिचां महिमा मग तेधवांसहज एक चिदात्मपणें कळे सगुणिंचा महिमा तरि नाकळे ॥८१॥
श्लोकद्वर्ये करुनि हेंचि वदेल आतांटीकामुरघें करिति जे सुख सर्व संतांआत्मज्ञता वदति शाब्दिक ते प्रसंगेंखंडील येथ निज - केवळ - आत्म - योगें ॥८२॥
तूझा अतर्क्य महिमा नकळे तथापीजाणावयास महिमा अगुण - स्वरुपींपूर्वोक्त भक्त भजतां तुज योग्य होतोचित्तास चिन्मय करुनि तुतें वरीतो ॥८३॥
योगीं निर्गुणिंचा कळे न महिमा भक्ति - प्रतापें जरीआत्मानात्म - विवेक तों गुरुमुखावांचूनि नेणे तरीसांगे श्रीगुरु आत्मता मग घडे सद्भक्ति सर्वेश्वरींतेव्हां निर्गुणिंचा कळेल महिमा दुर्वोध तो तोंबरी ॥८४॥
दास्येंचि लभ्य हरि - भक्ति असे तथापीजे कां निजात्म - रति केवळ चित्स्वरुपींते प्रीति तों जडशवांत तया निषेधीतो श्रीहरी गुरुपणें निज - तत्व - बोधी ॥८५॥
जो निर्निमित्त सतत प्रिय हो चिदात्मातो वासुदेव कळल्यावरि भक्तिवर्त्माजाणोनियां करि अनन्य अखंड भक्तीतेव्हांच निर्गुण - महत्व कळोनि मुक्ती ॥८६॥
या कारणें म्हणतसे विधि कीं अनंतात्वद्दासही गुरुकरुनिच तत्ववेत्तातूं विश्वरुप गुरु होउनि भेट देसीसर्वात्मता नुभव - रुपहि तूंचि होसी ॥८७॥
तूं विश्वरुप परि तूज गुरुत्व तेथेंकीं चित्त चिन्मय स्वरुप असेल जेथेंतें चित्त चिन्मय सजीव जरी जनाचेंमालिन्य तत्व विषयात्मपणें मनाचें ॥८८॥
या कारणें अमल चित्त असे जयांचेंतें चित्त चिन्मय अखंड असे तयांचेंया कारणें विधि म्हणे अमलांतरात्मेजे त्वन्मुखेंचि कळती निज - बोध - वर्त्मे ॥८९॥
हा आत्मशब्द मन चित्त शरीर बुद्धीबोले तरी प्रकरणाऽनुगुणार्थ सिद्धीया प्रस्तुतीं अमळ चित्त असा चतुर्थीहा आत्मशब्द धरणें त्दृदयीं समर्थी ॥९०॥
परम अमळ ज्याचे अंतरात्मे मुरारीवदनिंहुनि तयांच्या केवळात्मा विचारीतदुपरि महिमेतें निर्गुणाच्या तुझ्या तोहळुहळु समजाया माधवा योग्य होतो ॥९१॥
गुरुमुखें कळल्यावरि आत्मता अगुणिंचा महिमा मग तत्वताकळतसे कळण्यासहि योग्यता घडतसे म्हणतो विधि अच्युता ॥९२॥
आत्मज्ञता द्विविध यास्तव या विचारेंबुद्धीस श्रुद्धि म्हणऊनिच दोंप्रकारेंशुद्धात्मता गुरुमुखें कळली तथापीआत्मज्ञ भक्ति करितां मिळतो स्वरुपीं ॥९३॥
जरी हेम तावोनियां ओप देती तयांतीलत्या मिथ धातून जातीकसीं लावितां दिसे हीन सोनें तसीं शुद्ध चित्तें अहो भक्ति हीनें ॥९४॥
करुनि विहित कर्मे साधिली चित्तश्रुद्धीश्रवण - मनन मात्रीं योग्यता हेचि सिद्धीजरि मन विधरेना सेवितां विष्णुलीलाअकळचि महिमा हा गिर्गुणाचा तयाला ॥९५॥
कनक जेरिति घातलिया पुठीं इतर धातु जळे मग शेवटींकनक केवळ शुद्ध जसें उरे अमळ चित्त तसें अगुणीं मुरे ॥९६॥
आत्मज्ञ आत्मरतितें भजती हरीलाप्रेमें मनीं द्रवति सेउनि विष्णु - लीलाहोईल येरिति जसीजसि सत्व - शुद्धीतत्त्वींच सत्व मुरतां अगुणात्म - सिद्धी ॥९७॥
जो स्कंध एकादश तेथ देवें हें उद्धवालागुनि वासुदेवेंश्लोक द्वयें वर्णियलें तयाचा भावार्थही वर्णिल कृष्ण - वाचा ॥९८॥
टाकी सुवर्ण मळ बात्द्य हुताशनें तेंतेंही पुठीं द्रवविलें तरि शुद्ध होतेंभावें अशा विविध ताप वदे तयातेंकीं तें पुन्हा द्रवविलें तरि शुद्ध होतें ॥९९॥
ऐशीच शुद्ध जरि कर्म करुनि बुद्धीआत्मैक्य - भक्ति करितां मग पूर्ण सिद्धीकर्मेंचि शुद्धि परि आशय त्याच कर्मातोही त्यजी श्रवण - कीर्तन - विष्णु - धर्मा ॥१००॥
माझें कथा - श्रवण आणिक नाम वाचेगातां धुतो जसजसे मळ हो मनाचेतत्वासहीत सतता अति - सूक्ष्म दृष्टीपाहे मदात्मक चराचर सर्व सृष्टी ॥१०१॥
तत्व स्वयें स्थिरचरांतहि सिद्ध आहेजो दृष्टि निर्मळ करील तयास पाहेचित्तांत जे रज - तमोगुण त्यांस नाशीमाद्भक्ति अंजन मनोमय लोचनासी ॥१०२॥
या कारणें गुरुमुखें समजोनि तत्वभक्ती करुनि जरि शोधिल शुद्ध सत्वतो एक निर्गुण - महामहिमेस पावेपावोनि शुद्धि त्दृदयीं अगुणीं स्थिरावे ॥१०३॥
या कारणें गुरुमुखें म्हणतो विधाताजाणोनि तत्व मग साधक तो अनंताहोईल योग्य अगुणीं महिमा कळायापूर्वोक्त भक्त तव सेवक देवराया ॥१०४॥
ऐसें तथापिहि समाधिविणें कळेनाजो कां अनंत मन - बुद्धिस आकळेनात्या निर्गुणीं मन तदात्मकतेस पावेतेव्हां अनंतमय मानस तें ठसावे ॥१०५॥
सिंधूमधें लहरि जेसमयीं निमालीगंभीरता तिस अलभ्यहि लभ्य झालीतैसें मुरे मन जई अगुणीं तयाचातेव्हां अनंत - महिमा कळलाच साचा ॥१०६॥
कीं त्या अनंत - महिमेंत अनंत हेंहीझालेंचि तन्मय जई न विरुद्ध कांहींसिधूंत सैंधव - खडा विघरोनि गेलात्याला समुद्र म्हणती न किमर्थ बोला ॥१०७॥
कैसें अहो मन तदात्मकतेस पावेत्याच्या अनंत - महिमेस कसें ठसावेंतें बोलतो कमळसंभव उत्तरार्धीश्लोकांत या नकरितां बहु शब्द - वृद्धी ॥१०८॥
मन अविक्रिय होउनियां मुरे अगुण होउनियां अगुणी उरेम्हणुनि यास्तव तो महिमा कळे इतर त्यास कदापि न आकळे ॥१०९॥
विषय तामस राजस इंद्रियें विमळ केवळ सत्त्व मन स्वयेंपरि विकार तयास गुणद्वयें अगुणि तें अगुणात्मक निश्चयें ॥११०॥
परि न अच्युत तें मनही स्वयें विषयही जड आणिक इंद्रियेंकरि मनास सचेतन आत्मता परि न हें जन जाणति तत्त्वता ॥१११॥
दीप प्रकाशी नयनास जैसा आत्मा प्रकाशी मन - बुद्धि तैसादीप - प्रकाशेंचि घटादि दृष्टी दिसे मना येरिति सर्व सृष्टी ॥११२॥
ते दृष्टि दीपासचि पाह ताहे तेव्हां पदार्था परतें नपाहेध्यानीं मन स्वात्मसुखें निमालें तैंवि क्रिया टाकुनि तेंचि झालें ॥११३॥
म्हणुनि निर्गुणींच्या महिमा मना कळतसे म्हणतों मधुसूदनाविधि असे वदला परि अंतरीं उपजला मनिं संशय यापरी ॥११४॥
जरि मनें त्यजिल्यावरि विक्रिया अगुणिंचा महिमा कळतो तयातरि सुषुप्तिमधें न पडे कसा अगुणिच्या महिमेंत मना ठसा ॥११५॥
कमळसंभव मानुनियां असा त्दृदयिं संशय हा हरितो कसामन सुषुप्ति - विलक्षणता धरी म्हणुनि वर्णिल तो विधि यावरी ॥११६॥
जरी विक्रियातें सुषुप्तींत सोडीनजाणे तमोलीन तेथील गोडीसमाधीमधें तें चिदाकाश रुपमुरे निर्गुणीं स्वाऽनुभूति - स्वरुप ॥११७॥
सुषुप्तीमधें तों तमोलीन - चित्तींतसे लेशही स्वात्मतेची प्रतीतीसमाधीमधें स्वात्मता - स्फूर्ति जेव्हांननिद्रा तसे विक्रिया त्यास तेव्हां ॥११८॥
असी ते अवस्थात्रयातीत तुर्याविधाता असें बोलतो देववर्थाप्रसंगें तया अद्वितीयाऽनुभूतीवदे ते पाहावी विचारुनि संतीं ॥११९॥
जें कां मन स्वानुभवी स्छिरावेतें निर्गुणाच्या महिमेस पावेनिजात्मभूतीस्तव शुद्ध तुर्याजेथें कळे निर्गुण देववर्या ॥१२०॥
सुषुप्तिनें स्वानुभवें न जेव्हां कीं स्वप्न कीं जागृति होय तेव्हांस्वप्नामधें अणिक जागरींहीं उणें नसे स्वानुभवास कांही ॥१२१॥
या पूर्व पक्षास हरुप पहातां तुर्याच ते स्थापितसे विधाताकीं निर्गुणी चित्त अरुप होतें अरुप त्याचा महिमा पहातें ॥१२२॥
स्वप्नीं निजानुभव आणिक जो प्रबोधींदेहादिरुप न तसा वदवे समाधींयेथें निजानुभव केवळ जेथ कांहींदेहादि सर्वहि चराचररुप नाहीं ॥१२३॥
स्वप्नीं निजानुभव आणिक जो प्रबोधींनाहीं म्हणोनिच विलक्षणता समाधीहे स्वप्न - जागृति - सुषुप्तिहुनी निराळीतुर्या अरुप मन जेथ समाधि काळीं ॥१२४॥
अविक्रियात् स्वानुभवादरुप तोश्लोकाचिया या चरणीं विराजतोतुर्येमधें ब्रम्हचि होय जेधवांजाणे मन ब्रम्ह - महत्त्व तेधवां ॥१२५॥
असा निर्गुणानंद तुर्येत योगीअवस्थात्रयातीत होऊनि भोगीअसें बोलतां येस्थळीं भेदवादीन हें मानिती अज्ञ जेकां अनादी ॥१२६॥
अवस्थान्नयातीत होवोनि लक्षी तरी भिन्न तो बोलती पूर्व पक्षीन तुर्येत या भिन्न तो ध्यान कर्ता निवारील धाता असी भेदवार्ता ॥१२७॥
अनन्य बोध्यात्मतया नचान्यथाअशा चतुर्था चरणांत सर्वथान भेद येथे म्हणऊनियां विधीवदेल अद्वैत - सुधा महासुधी ॥१२८॥
कळावया योग्य दुजें न जाणेंतदात्मकत्वेंच तयास जाणेंअनन्यबोधेंचि तयास पाहासामर्थ्य बोले विधि अर्थ तो हा ॥१२९॥
ज्याच्या अन्यपणें करुनि नघडे जाणावया योग्यताशास्त्रीं त्यास अनन्य - बोध म्हणती तेव्हां कसा तत्त्वताजाणावा तरि आत्मते करुनियां जाणावया योग्यतायालागिं स्व - चिदात्मतें करुनियां जाणेल तो जाणता ॥१३०॥
ऐक्येंचि हो वैष्णव तो तयालाजाणोनि ऐसा कतकृत्य झालाजाणें तया द्वैतपणें न कोणींवाणी सही हे वदतेच वाणी ॥१३१॥
द्वैतेंचि जे भजति त्यांस न बोध - सिद्धीत्यांच्या श्रुती वदति कीं पशुतुल्य बुद्धीमी अन्य दैवतहि अन्य म्हणोनि देहीसेवी तया श्रुति म्हणें नकळेचि कांहीं ॥१३२॥
ज्ञानानिमित्त भजनी जन अज्ञ देवातेव्हां घडे कसि तयासहि ऐक्य - सेवाभेदें भजेल मग त्यास अभेद - सिद्धीहा पूर्वपक्ष करितो निगनार्थ - सिद्धी ॥१३३॥
अद्वैत हें निगम - सिद्ध खरें तथापीनाहीं मला अनुभव स्व - सुख - स्वरुपींतो ईश्वरा मज घडो म्हणऊनि देवाजिज्ञासु सेविल तयास फळेल सेवा ॥१३४॥
जे सर्वथा म्हणति अद्वयता घडेनाभेदाविणें इतर गोष्टिच आवडेनाजीवेश - भेद दृढ साधुनि वासुदेवाजे सेविती पश्रुसमान तदीय - सेवा ॥१३५॥
ज्ञानाविणे अकळ अद्वय तत्त्व जेव्हांज्ञानार्थ जे भजति ऐक्य कळे न तेव्हांत्याला असें म्हणतसे श्रुति हें घडेनानिदेस पात्र कुमताविण सांपडेना ॥१३६॥
जेकां धरुनि दृढ भेद - मताऽभिमानाअद्वैत तत्त्व म्हणती सहसा घडेनामानूनि भेद जन जे भजतीं मुकुंदात्यांचीच हे वदतसे श्रुति येथ निंदा ॥१३७॥
श्रुत्यर्थ्य हा मनिं धरुनि वदे विरंचीकीं अन्यथा भजति त्यांसहि सिद्धि कैंचीयाकारणें त्यजुनि भेद निजात्म - भक्तीजेका जगीं करिति पावति तेचि मुक्ती ॥१३८॥
आत्मज्ञता गुरुकृपेस्तव होय ज्यालायोगीं कळे अगुणिंचा महिमा तयालाचैतन्य - सागरिं मुरे लहरी गुणाचीतैं प्राप्ति येथ वदला विधि निर्गुणाची ॥१३९॥
गुरुवर अगुणात्मा बोधिती यासि जैसेसगुण अगुण ऐसा सांगती तेचि तैसेतरि मग महिमेंते त्याचिया कां नपाहेम्हणउनि विधि शंका येथ हे वारिता हे ॥१४०॥
जरि सगुण गुणातें देखती संत संख्यातरि मग उपदेशीं बोधिती शिष्य - मुख्याम्हणुनि गुरुमुखेंही बोलवेना न जेव्हांअकळचि महिमा ह सिद्ध हे गोष्टि तेव्हां ॥१४१॥
यालागिं हा भाव धरुनि आतांअगण्यता विष्णु - गुणासि धाताश्लोकामध्यें या स्फुट वर्णिताहेअजन्म जो अंत गुणीं न पाहे ॥१४२॥
होती हितालागिं चराचराच्याकीं मूर्ति तूझ्या जगदीश्वराच्याअनंत - कल्याण - गुणें शरीरेंम्हणे गुणात्मा तुज या विचारें ॥१४३॥
तूंजो असा त्या तुझिया गुणाला मो जावया नील - सरोज - नीलाहोती जगी शक्त असे न कोणी अनंत तुझे गुण चक्र पाणी ॥१४४॥
काळें करुनि धरणी - रज मोजणारेहोतील मोजितिल ही हिसबिंदु सारेहोती समर्थ गणना किरणीं करायातूझे न मोजवति सद्गुण देवराया ॥१४५॥
वेदश्रुती वदति येरिति विष्णुसूक्तींविष्णोर्नुकं म्हणुनि हे श्रुतिचीच उक्तीसंतांसही सगुणिंचा महिमा कळेनाशिष्योपदेशविषयीं रसना वळेना ॥१४६॥
जाणोनियाचि करितां अगुणास योगीऐक्यें करुनि भजती सगुणाचलागींआत्मैक्य - भक्ति करितांचि जनार्दनाचीआनंद - सागरिं मुरे लहरी मनाची ॥१४७॥
सगुण अगुण दोनीं विष्णुरुपें अनंतेंकवण निपुण ऐसा कीं निरुपी तयांतेंपरि अगुण चिदात्मा चित्त चिद्रूप होतांजितचि अजित - भक्तां मुक्ति हो भाग्यवंतां ॥१४८॥
अगुणमात्र उपास्य हरी जयां सगुण भक्तिविणे नफळे तयांम्हणुनि येरिति भारतिचा पती विशद बोलियला स्व - पित्याप्रती ॥१४९॥
अगुणमात्र - उपासक साधनें ऋषिकुळीं करितील तपोधनेंतरिहि कां मन निर्गुण केवळीं नवि घरे म्हणती जरि येस्थळीं ॥१५०॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.