तरि रमापतिच्या पद - पंकजीं नभजतीरिक्षती अगुणीं निजींअचुक मीपण सत्पथ चूकवी निजविलास अगम्यचि दाखवी ॥१५१॥
आम्हीं स्वये ब्रम्ह म्हणोनि एकीं शब्दात्मबोधें चिदचिद्विवेकींजाणोनि अभ्यास किमर्थ आतां ते मानिती शाब्दिक बोध होतो ॥१५२॥
म्हणति विप्र न विप्रपणा स्मरे तरिहि विप्रपणास न अंतरेजरि सुवाशिणि मी नम्हणे मनीं तरि सुवाशिणि ते मिरवे जनीं ॥१५३॥
अशा स्थूळ द्रिष्टींचिया या कुयुक्ती बहू बोलती मानिती त्यांस मुक्तीजरी ब्राम्हण ब्राम्हणत्वा स्मरेना तरी श्रूद्र मी हें तयाला स्फुरेना ॥१५४॥
मी सौभाग्यवती असें घडि घडी ते आठवेना जरीवैधव्य - स्फुरणें न नापित - गृहा क्षौरार्थ जाते तरीब्रम्हात्यत्व न आठवी जई तई देहात्मता आयतीते देहात्मकता धरुनि धरिते संस्कार पूर्वस्थिती ॥१५५॥
दृष्टीविना दीप जसा कळेना बुद्धी विना ब्रम्हहि आकळेनादेहात्मतेची तिस पूर्वखोडी अभ्यास - योगाविण ते नसोडी ॥१५६॥
जाणोनि अभ्यास किमर्थ आतां आम्हांस कां हो सगुणात्म चिंताजोडे अहंकार तयास पेसा तो विष्णु - भक्तीविण जाय कैसा ॥१५७॥
अभ्यासही करिति एक निज - स्वरुपींसोडी तयांसहि न मीपण तें तथापीआम्ही करुं करितसें दृढ योग ऐसाचित्तांत भाव उपजे सहसा न कैसा ॥१५८॥
अभ्यास मी करीन आणिक आजि केलाअभ्यासही करुनि मीपण तें तयालाकोण्हीं मनांत समजोनि अकर्तृता हीआम्हांस कर्तृपण ते म्हणताति नाहीं ॥१५९॥
ऐसा अहंकृति - विलास मना सुटेनाहे श्रृंखळा हरिकृपेविण तों तुटेनाजो ज्ञान - लाभ हरि - भक्त - जनास वाटेतेतों कृपा म्हणुनि हेचि मनांत दाटे ॥१६०॥
जो लाभ तो हरिकृपेस्तव हेचि बुद्धीजो देखतो हरिकृपेस्तव सर्व - सिद्धीतो विष्णु - भक्तहि कसा कसि सिद्धि त्याचीहे कृष्णपाद - कमळीं वदतो विरंची ॥१६१॥
जें बोलिलों विधि म्हणे अगुणात्म - सिद्धीजेथें समाधि - सुख आत्म - सुधा - समृद्धीतेतों कृपा तुझिच केवळ भक्त पाहेत्याच्या मनीं असि अहंकृति केविं राहे ॥१६२॥
अभ्यासयोग करितां मज या समृद्धीऐसें कदापि न मनीं तव - भक्त - बुद्धीतो तों क्षणक्षणिं तुझेच कृपेस पाहेत्याचे मनीं मग अहंकृति केविं राहे ॥१६३॥
ज्ञानेकरुनि निरहंकृति चित्त झालेंजें कां अकर्मपणही त्दृदया निघालेंहे सर्वही तवकृपेकरितांचि पाहेत्याचे मनीं असि अहंकृति केविं राहे ॥१६४॥
श्लोकांत या विधि म्हणे सु - समिक्षमाणाकीं भाय हा निजमनांतील सुत जाणोयालागिं येथ सु - समिक्षण रीति कांहींजे वर्णिली किमपि मूळ - विरुद्ध नाहीं ॥१६५॥
येथेंचि या उपरि भक्ति विरक्ति त्याचीसर्वज्ञ - पाद - कमळीं विनवी विरंचीकीं पूर्व - कर्म - फळमात्रचि भोगितो तोवैराग्य याच चरणीं विधि सूचवी तो ॥१६६॥
कीं हो मला सुख असी सकळांस इच्छातो मीपणारहित हे न तयास वांच्छाप्रारब्ध - भोग नसटे म्हणऊनि भोगीभोगूनितें सुखहि मागुति वीतरागी ॥१६७॥
त्याची वदेल विधि मागुति येथ भक्तीनिःसंशयें जितचि वर्णिल त्यास मुक्तीकीं तो मनें करुनि वैखरिनें शरीरेंध्यानीं असोनिहि भजे विविधा प्रकारें ॥१६८॥
त्याचे निमग्न मन निर्गुण - चित्स्वरुपीकीं तंतु आपण पटीं जड - विश्व - रुपींकिंवा तुझ्या सगुण सुंदर दिव्य मूर्तीध्यातो मुखीं श्रवणलब्ध तुझ्याच कीर्ती ॥१६९॥
तूं विश्वरुप सचराचर देह तूं हेंध्यानीं स्मरोनि तुज येरिति वंदिताहेंत्या वंदनी चरणिं या धरणीस पाहेंलोळोनि तीवरि समग्र शरीर बाहे ॥१७०॥
ध्यातो मनें तुज मुखें तव कीर्ति गातोंदेहें करुनि करि वंदन नृत्यही तोदेहें मनें करुनियां वचनें विरंचीजे सुज्ञ सूचवि तयांप्रति भक्ति त्याची ॥१७१॥
जो भक्ति येरिति करोनि कृपाच पाहेहे भक्ति मीं करितसें इतुकें नसाहेआत्मैक्य - भक्ति दृढ आणि उपाधि भेदेंया सेव्य - सेवकपणें भजतो प्रसादें ॥१७२॥
जो भक्ति येरिति करोनि भजे तयाचीश्लोकांत याचि गतिही वदतो विरंचीजो जी असा जितचि मुक्त तया म्हणूनीब्रम्हा म्हणेल चवथ्या चरणे करुनी ॥१७३॥
सत्पुत्र जेविं पितृ - भाग्य - विलास भोगीतो नित्य मुक्त - पदवीस तसा विभागीप्रारब्ध शेष म्हणऊनि शरीरधारीऐसा तथापि तवरुपचि तो मुरारी ॥१७४॥
पित्याची धनें भोगितो पुत्र जैसाविभागी तुझ्या मुक्तिचा भक्त तैसाविधाता असें आपुल्या मायबापाम्हणे वर्णितां तत्कृपेच्या प्रतापा ॥१७५॥
जो आठवा देवकिचा मुरारीजो आठवा कृष्ण दशावतारीहा आठवा श्लोक धरुनि चित्तींतो आठवा येरिति चित्तवृत्तीं ॥१७६॥
विना भक्ति आत्मज्ञही भ्रष्ट झालेअहंकार - डोहीं स्वदेहीं बुडालेअसें बोलिला यावरी तो विधाताम्हणे मीच दृष्टांत येथेंच आतां ॥१७७॥
पाहें हरी विधि म्हणे अपराध माझाम्या वत्स - वत्सप - परिग्रह सर्व तूझानेला मनीं धरुनि केवळ भाव ऐसाकीं कृष्ण यावरि करील विलास कैसा ॥१७८॥
आधींच कारण चराचर अंतरात्माज्याचा कळे न निगमास अतर्क्य वर्त्मातो काय यावरि करील असें पहायमी कोण शक्ति मजला किति देवराया ॥१७९॥
या आमुच्या सकळशक्तिहि अंश जीचेमाया अनादि कळती न विलास तीचेतीचा नियामक तयाबरि म्या स्वमायाविस्तारिली विभव काय असें पहाया ॥१८०॥
आत्मैक्य मात्र कळतां विदचिद्विवेकींतूं आणि आपण नभिन्न म्हणूनि एकींतूझा अनादर तिहीं धरिलाच जैसाहाही तसाच पडला मज मोह फांसा ॥१८१॥
भावें अशा कमळ - संभव बोलताहेकीं ऐक्य सत्य परि तुल्यपणा नसाहेएकत्व आणि स्वमहत्त्व लघुत्व कैसेंसाधा म्हणाल तरि साधिल तोचि ऐसें ॥१८२॥
आत्मत्व - भेद नदिसे मज तूज कांहींऐसें तथापि महदंतर साम्य नाहींदावाग्निमाजि जसि एक शिखा स्वरुपींमी तूझिया हरि तसा महदंत रुपीं ॥१८३॥
अनेका घटीं एक आकाश जैसाअनेका शरीरी हरी बिंब तैसघटाच्या जळीं भिन्न आकाश नानातरी भिन्नता त्या नभाला असेना ॥१८४॥
न जीवेश्वरां भेद ऐसा तथापीअनंतत्व बिंबत्व विष्णु - स्वरुपींतयाचे कृपेनें जयीं ऐक्य होतेंअनंतत्व त्याचें तयीं यास येतें ॥१८५॥
नाहीं तरी बिंब अनंत साचाहा एकदेशी प्रतिबिंब त्याचाब्रम्हा म्हणे यास्तव विष्णु - धामींअग्नीमध्यें जेविं शिग्या तसामीं ॥१८६॥
तद्दिष्णो परमंपदं म्हणुनियां श्रुत्यर्थही पाहतांजे कां पाहति संतबिंब पदतें श्री विष्णुचे तत्त्वतांब्रम्हादि प्रतिबिंब बिंब नव्हती बिबैक्यता पावतीबिंबैक्यें महदंतर श्रुतिमुखें ब्रम्हा वदे वेरिती ॥१८७॥
येणें करुनि सकळात्मक तूं मुरारीआत्मा स्वदेह मयमात्रचि मी शरीरीयालागिं तूज मज अंतर फार देवाइत्यादि भाव विधि दाखवि वासुदेवा ॥१८८॥
जैसाच उत्तम अनंतगुणें उपाधीतैसें स्वरुपहि अनंत म्हणूनि साधीदोंही परी विधि अनंत - गुणें उपामीसामर्थ्य काय मज तेथ अनंत - धार्मी ॥१८९॥
अंगी करुनि अपराध निवेदियेलाआतां क्षमा करिं म्हणेल पुढें हरीलायेथूनियां चरण एक समाप्त झालाश्रीकृष्ण - ब्रम्ह - चरणींच समर्पियेला ॥१९०॥
श्रीभद्भागवतीं विचित्र दशम स्कंधी विरंबि - स्तुतीतीची वामत हे त्रिविक्रमपणें व्याख्या करी श्रीपतीटीका या करितांचि हे त्रिचरणी लोकप्रयीं संचरेयेथें या चरणीं मुकुंद - चरणी सप्रेम जो तो तरे ॥१९१॥
नव श्लोकी लोकीं विधि - जनक - अंकी जसि रमाअसी टीका जेकां मिरवित असे विष्णुमहिमासमर्पू श्रीकृष्णा विषय - बहुतृष्णा त्यजुनियांपहावी हे संतीं निजरति अनंतीं धरुनियां ॥१९२॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.