मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ब्रम्हस्तुति

साहित्य

ब्रम्हस्तुति

चरण २, भाग १ · श्लोक १९३–३४२

bramhastuti

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधात ब्रह्मदेवाने कृष्णाची केलेली स्तुती आहे; ही त्या स्तुतीवरील वामन पंडितांची मराठी टीका, तीन चरणांत. वत्सहरणाचा प्रसंग, ब्रह्मदेवाचा भ्रम आणि मग त्याचे डोळे उघडणे — यातून निर्गुण आणि सगुण या दोन्ही रूपांचे वर्णन पुढे येते. त्यांच्या रचनांतील सर्वात मोठी.

श्रीविष्णु - भक्ति करितां अगुणात्म - सिद्धीकोण्ही न मानिति असें जन ते कुबुद्धीआत्मैक्यमात्र कळतां चिदचिद्विवेकीमहे टाकिली सगुण - भक्ति जगीं अनेकीं ॥१॥
आम्हींच विष्णु तरि कां सगुणा भजावेंआत्मत्व निर्गुण तयासि सदा पहावेंधंदा वृथा श्रवण - कीर्तनरुप आतांयेणें रिती वदति शाब्दिक बोध होतो ॥२॥
जैसी तयांस उपजे सगुणीं उपेक्षाऐक्यें तसाचि विधि ही सरसीरुहाक्षामानूनि एकपण वत्सप वत्स नेतांमी हा समान असिहे घडली अहंता ॥३॥
मी एक सृष्टि करणार तसाच हाहीविष्णु - स्थितीस करणार विशेष नाहींवत्सें मुलें हरुनि नेइन मी स्वभावेंदावील काय मग वैभव तें पहावें ॥४॥
याचा उपाधि सकळांहुनि थोर जैसासर्वात्मतें करुनि बिंब अनंत तैसादोहीं कडूनि हरि थोर असें स्मरेनाब्रम्ह स्वगर्व त्दृदयांतील आवरेना ॥५॥
वत्सें मुलें विधि हरुनि समस्त गेलावर्षाभरां उपरि मागुति तेथ आलातों आपणें सकळ वत्सप वत्स नेलेतैसेचि आणिकहि येउनि देखियेले ॥६॥
देखोनि मोह पडला कमळासनालाते कोण हे कवण हें नकळे तयालाम्या वत्स वत्सप हरुनि समस्त नेलेते तों तसेच दिसती अवघे निजेले ॥७॥
केले नवेच असतील तरीं कळेनाते कोण हे कवण हें मनिं आकळेनाते आणिले करुनि नूतन नीजवीलेकीं हे नवे मनिं म्हणे हरिनेंच केले ॥८॥
ऐसें खरें नकळतां त्दृदयांत कष्टीहोऊनि पाहत असे अति - सूक्ष्म - दृष्टीतो वत्स वत्सप समस्तहि विष्णुरुपींदेखे सरोज - भव केवळ चित्स्वरुपीं ॥९॥
ब्रम्हांड एक चतुरातन एक - एकमूर्ती पुढें अजित मूर्ति अशा अनेकदेखोनि मूर्छिन पडोनि उठोनि पाहेतों गोपरुप हरि एकचि तेथ आहे ॥१०॥
तेव्हां अतर्क्य महिमा कळला हरीचाकीं हा अनंत गुण आणि अनंत साचाआत्मैक्यते करुनि भिन्न नसे तथापीब्रम्ह स्वयें हरिच मी प्रतिबिंबरुपी ॥११॥
श्लोकाष्टकें करुनि या करितांचि आधींटाकूनियां सगुण - भक्ति निजात्म - बोधींजे गुंतले श्रमचि त्यांसि म्हणोनि बोलेआत्मज्ञ भक्तचि म्हणे कृतकृत्य झाले ॥१२॥
जे ऐक्य मानुनि तुझी करिती उपेक्षातैसेंचि आजि घडलें मज अंबुजाक्षाऐक्यें करुनि सलगी करितां मुकुंदाअन्याय थोर घडला मज बुद्धिमंदा ॥१३॥
भावें अशा नवम पद्य तयांत धाताअंगी करुनि अपराध वदे अनंताकीं थोर तूं हरि उपाधि करुनि जैसासर्वात्मते करुनिही वहु थोर तैसा ॥१४॥
एकत्व मानुनि समानपणें करुनीम्यां वत्स वत्सप समस्त तुझे हरुनींनेले तयावरि तुझा महिमा पहातांमी सापराध हरि हा अनुताप आतां ॥१५॥
माये करुनि बहु थोर तुझीच मायातत्वें करुनि तरि बिंबचि देवरायाजो तूं असा तव महत्त्व पहावयालामी कोण येरिति चतुर्मुख बोलियेला ॥१६॥
अंगी करुनि अपराध असा विधाताआतां क्षमा करिं म्हणोनि म्हणे अनंतावाणी पती परम भक्तिरसें स्ववाणीश्लोकत्रयें वदतसे अति दीन वाणी ॥१७॥
करिं अतः पर हें मजला क्षमा विधि असें विनवी पुरुषोत्तमस्व - अधमत्व निवेदुनि त्यावरी भगवदुत्तमता वदतो खरी ॥१८॥
हरि तुवां पद हें मज दीधलें विभव हें तुजवीण नसाधलेंइतुकिया वरिही तुजवांचुनी मजहि ईश्वरता गमली मनीं ॥१९॥
असें मानणें याच अन्याय - कोटीनसे मीपणा एवढी गोष्टि खोटीतथापि क्षमा माधवा तूज मोटीकृपा सागरा हें धरावें न पोटीं ॥२०॥
रजोगुणें संभव या शरीरा रजोगुणाचाच ननांतथारासर्वेश जो तूं विसरोनि त्याला मी ईश ऐसा मज गर्व झाला ॥२१॥
जो अंध त्याचें पद लागतांही विवेकिया क्रोधचि येत नाहींरजोगुणें अंध तयासि देवा क्षमा दुरन्यानहि हा करावा ॥२२॥
तथापि ऐश्वर्य तुझें हराया समर्थ होतों जरि देवरायाक्षमा न तेव्हां करितासि देवा अन्याय हा तूं मज वासुदेवा ॥२३॥
च्युति नव्हे विभवासि तुझ्या कधींम्हणति अच्युत याकरितां सुचीसहज अच्युत तूं पुरुषोत्तमाम्हणुनि हा अपराध करीं क्षमा ॥२४॥
विभव नित्य अनंत तुझें हरीन हरंवी तिळ मात्रहि तें जरीतरि तुझा अपराध कसा घडेमन अहंकृतिनेंच तमीं बुडे ॥२५॥
हरुनि नेइन वत्स - परिग्रहाकरिल काय तयावरि कृष्ण हाम्हणुनियां म्हणतों निज - मीपणेंबुडतसे स्व - उपाधि - रजोगुणें ॥२६॥
अविद्या - आंधारें करुनि नयनीं लेप चढलाजसा तूं तैसा मी म्हणुनि हरि हा मोह पडलामुलें वत्सें नेलीं बहुत मज अन्याय घडलाक्षमा लक्ष्मीकांता करि मद मनांतील झडला ॥२७॥
सनाथ ब्रम्हा हा मज करुनि याला मजविणेंनसे स्वामी कोण्हीं म्हणसि तरि हें सार्थक जिणेंकृपा - पीयूषाचें कमलभव हा पात्र म्हणुनीक्षमा लक्ष्मीनाथा धरिं मज अनाथावरि मनी ॥२८॥
कमलजापतिची कमलासनेंपरम - उत्तमता चहुं आनतेंकथियली परि वैभव आपुलेंत्दृदयिं आठवितां मन शंकलें ॥२९॥
ब्रम्हांड सावरण सर्व शरीर माझेंहोतें असें चहुं शिरांवरि गर्व - ओझेंब्रम्हांड आणी चतुरानन कोटि कोटीदावोनी बुद्धि हरिली हरितेंचि खोटी ॥३०॥
जो कां वत्सप - वत्सरुप हरि हा तद्वस्त्र तद्भूपणेंशिकीं वेत्र विषाण वेणु अवघीं झाला स्वयें आपणेंरुपे सर्वहि तीं चतुर्भुज घनः श्यामेंचि म्या देखिलींब्रम्हांडें सचतुर्मुखें तितकियापाशीं उभीं राहिलीं ॥३१॥
अंडें किती विधि किती मज लेखवेनातेव्हां अतर्क्य महिमा मज देखवेनाआछादिलें विभव हें हरिनेंचि जेव्हांआली मला स्मृति हळूहळू आजि तेव्हां ॥३२॥
म्हणुनि अंड - शरीरहि मी जरीतरि हि मेरुपुढें जसि मोहरीमनिं विचारुनियां विधि येरितीवदतसे स्वलधुत्त्व हरी प्रती ॥३३॥
अंडें जेविं विशाळ येचरितिनें ब्रम्हांड हें निर्मिलेंआकाशादिक पंचकें महदहंकारें तमें वेष्टिलेंमाझा यद्यपि देह हा तरि असंख्यातें नजाणों कितीएकैका तव - रोम - कूप - विवरीं अंडें असीं श्रीपती ॥३४॥
गृहीं छिद्रद्वारा दिसति किरणाचे त्र्यणुकतेंतयांचीही संख्या करिन म्हणतां ते नघडनेंअशां रेणूचे ते द्वयणुक त्र्यणु जे त्यांस गणनानसे तैसी रोमाप्रति हरि तुझ्या अंडरचना ॥३५॥
किडे उंबराच्या फळामाजि पोटींअसे अंड कोटी मध्यें जीव कोटीकिडे नेपाती आणिकां उंबरांसीअसे जीव हे नेणती अंडरासी ॥३६॥
अनेकें जसीं उंबरें एक वृक्षींतसा अंड कोटींस तूं एक साक्षीफळांच्या त्रिकाळीं तरु तोचि जैसाअति त्यांस अंडांस तूं नित्य तैसा ॥३७॥
माझें शरीर तंव एकचि अंड देवाअंडें अनंत तुजभीतरि वासुदेवातोमी किती किती तुझा महिमा मुकुंदाभावें अशा विनवि कृष्ण - पदाऽरविंदा ॥३८॥
जगें जेधवां येरिती कोटि कोटीमुकुंदा तुझ्या एकल्याच्याच पोटींतयीं हे जरी अस्मद न्याय झालेन तूं कोपसी येरिती येथ बोले ॥३९॥
गर्भान अर्भक जरी जननीस लालाहाणे तयास हरि काय करील माताहें विश्व आणि कमळासन अंडकोटीयांतील काय मज सांग तुझ्या न पोटीं ॥४०॥
जैसें समस्त उदरांत तुझ्या अनंतातैताच मी म्हणुनि बोलियला विधाताआतां वदेल जननी जनक त्रिलोकींलोकां अनेक मज दोतिहि एक तूं कीं ॥४१॥
नाभींस पंकज तुझ्या मज जन्म तेथेंतूं माय बाप मज आणिक कोण येथेंहे अन्यथा जरि म्हणो तरि वेदवाणीबोले असें अनृत केविं स्थांगपाणी ॥४२॥
त्रिलोकाच्या नाशीं सकळ जळराशीस मिळणेंतयांमध्ये योगें करुनि उदकी तूज निजणेंसरे निद्रा द्रष्टा मकटसि जळें तेंचि दिसतीविना द्रष्टा दोरीं अघटित मृषा सर्पवसतीं ॥४३॥
नजाणे जो दोरा भुजगचि खरा त्यास दिसतोजरी दोरा जाणे नयनिं लटिका सर्प बसतोतसा तूं ज्या नीरीं निजसि दिसतें तेंचि उठतांनसे कोणी द्रष्ठा तरि मग नये सर्प म्हणतां ॥४४॥
लयाच्या ही अंतीं किमपि सदसद्विश्व नदिसेतंई कोठें पाणी अति गहन गंभीरहि असेअशा ऋग्वेदाच्या श्रुति वदति यालागिंच लयींनिजे द्रष्टा पाणी किमपिहि न निर्वाण समयीं ॥४५॥
निजे पाण्यामध्यें गिळुनि निजतो त्याच सलिलींउटे ऐसें वेदीं मुनिवर - कुळें हेंचि वदलींनिजे द्रष्टा दोरीं भुजग अवलोकूनिच जसाउठे तेव्हां मिथ्या भुजगचि यथा पूर्वचि तसा ॥४६॥
या कारणें त्रिभुवन - प्रळयांस नीरींनिद्रा करी उदकिं त्याच उठे मुरारीद्वैपायनादि मुनि बोलति हें पुराणींतो रज्जुसर्प निजतां उठतांचि पाणीं ॥४७॥
या कारणें त्रिभुवन - प्रळयांतकाळींजें नीर त्यांत हरि - नाभि - सरोज - नाळींझाला विरंचि म्हणती निगमीं पुराणींभावे अशाच वदतो विधि ही स्ववाणी ॥४८॥
कीं बोलती श्रुति जगत्रय - अंतकाळींनारायणो दर सरोरुह - नाभिनाळींझाला चतुर्मुख न हे तरि गोष्टि खोटीतूं सांग कीं उपजलों न तुझ्याच पोटीं ॥४९॥
भावार्थ हा किं तुझि याच पोटींमीं जन्मलो गोष्टि कदां न खोटीतूं माय बी बाळ तुझाचि जेव्हांमानू नको हा अपराध तेव्हां ॥५०॥
या कारणें जनतिच्या उदरांत लाताझाडी शिशू न मनिं ते अपराध माताहे पूर्व - पद्म - रचना दृढ येथ केलीते ब्रम्ह - वैखरि असोरिती वर्णियेली ॥५१॥
तुझा पुत्र मी स्थापिलें हें तथापीमनीं शंकला येरिती गोपरुपींमला काय तूं पुत्र नारायणाचाझणी मोह ऐसा करी कृष्णवाचा ॥५२॥
म्हणोनि बोलेल विरंचि आतांकीं तोचि नारायण तूं अनंतानारायणाचे बहु अर्थ जेथेंतो श्लोक वर्णील हरीच येथें ॥५३॥
नव्हेसि नारायण केविं देवाआत्माचि तूं केवळ वासुदेवातूं बिंब नाना - प्रतिबिंब - वृंदाउपाधिभेदें रचिसी मुकुंदा ॥५४॥
अनेकां घटीं एक आकाश जैसाहरी एक सर्वा शरीरांत तैसानभें दूसरीं त्याच कुंभांत नीरींजसीं येरीति जीव नाना शरीरीं ॥५५॥
तूं बिंब सर्वात्मक वासुदेवाहे जीव तूझे प्रतिबिंब देवाउपाधि - योगास्तव भिन्न होतीभोगूनि कर्मे तुज माजि येती ॥५६॥
एवं सुषुप्ति - समयीं प्रळयीं जयांलाबिंबैक्य भिन्नपण लेश नसे तयांलाजीवां असा सतत आश्रय तूंचि जेव्हांनारायणाख्य सकळात्मक तूंचि तेव्हां ॥५७॥
जे जीव तेचि नर संस्कृत वेदवाचेतैसेंचि नार म्हणिजे समुदाय त्यांचेनारांस त्यां अयन आश्रय बिंबरुपेंनारायणाख्य सकळात्मक चित्स्वरुपें ॥५८॥
व्योय - साम्य वदती श्रुति बिंब विष्णु आश्रय असा प्रतिबिंबजीव जैं प्रतिघटीं प्रतिरुपीं बिंब ईश्वर तदैक्य तथापी ॥५९॥
नारायणा वांचुनि ईश कैंचाजो जीवदाता सकळां जनांचाप्रकाशितो जो जड सर्व तारेंआणीक नारायण या प्रकारें ॥६०॥
नारायणासि सकळात्मकताचि जेव्हांआत्मा चिदात्मक जडात्मक तोचि तेव्हांजीवैक्यतेस्तव चिदात्मकता तसी हेचैतन्य आणि जड - ऐक्य असेंचि आहे ॥६१॥
जीवास देहद्वय हे उपाधीतत्वें जडें त्यांसि निमित्त आधींझालीं जसा सर्प असत्य दोरींनारायणीं सर्व अशा प्रकारीं ॥६२॥
जीवांला म्हणती जसे नर तसे त्यांच्या उपाधीप्रतीशास्त्रीं व्याकरणांत नार म्हणती तत्त्वें जडें मोजितीत्याचा आश्रय रज्जु जेविं लटिक्या सर्पा प्रकाशी धरीश्री नारायण नार - आश्रय असा आत्मा जडाचा हरी ॥६३॥
चैतन्य आणि जड दोनिच भेद लोकींआत्मा जसा उभयतांसिहि एक तूं कींया कारणें नव्हसि केवळ तूंचि कैसानारायणा त्रिभुवनात्मक तूंचि ऐसा ॥६४॥
नारायणाख्य हरिनाम तदर्थ धाताआणीकही करुनि अर्पितसे अनंताकी तूं अधीश सकळात्मक ईश जेव्हांनारायण त्रिभुवनेश न केविं तेव्हां ॥६५॥
जे जीव ते नर तुझे प्रतिबिंब देवातूं बिंब ईश्वर निया मक वासुदेवाजो नार जीव - समुदाय समस्त - देहींनारांसि त्या अयन आश्रय तूं असाही ॥६६॥
आणिक नारायण - नाम धाताव्याख्यानरुपें विनवी अनंताकीं सर्वसाक्षी हरि तूंचि जेव्हांनव्हेसि नारायण केविं तेव्हां ॥६७॥
तंतूंत जेविं पट हें जड चित्स्वरुपींतें श्रुद्ध - सत्वमय तूं हरि साक्षिरुपींनारांसि जो अयन तोचि अधीश साक्षीनारायणाख्य तरि तूंचि समस्त - पक्षीं ॥६८॥
नारायणार्थ वदला इतुके विरंचीझाली तथापि बहु शंकित बुद्धि त्याचीकीं नारसंज्ञक - जळीं प्रळयीं निजेलानारायण प्रभु असें म्हणती तयाला ॥६९॥
तो पद्मनाभ उदकीं भुजगें द्रशायीमी चोरितों पशुपदनंदनवत्स गायीनारायणत्व घडतें मजलागिं कैसेंब्रम्हा म्हणे झणि मुकुंद म्हणेल ऐसें ॥७०॥
या कारणें कमळ - संभव बोलता हेकीं बोलणें हरि कदापिहि हें नसाहेरुपें तुझीं दिसति भिन्न तरी तथापीरुपें समस्त लटिकीं हरि तूं अरुपी ॥७१॥
नारें ज्या प्रळयोदकासि म्हणती येथें निजे श्रीपत्तीतेव्हां आश्रयतें जळेंचि हरिला ऐसें श्रुती बोलतीश्रीनारायण - नाम यास्तव जया देहास तोही असामायामात्र न सत्य येरिति पहा बोले विधाता कसा ॥७२॥
नसोनी करी सर्प रज्जू तसाचम्हणोनी म्हणे कीं जसा सर्प साचनसोनी असेला दिसे विश्व सारेंम्हणोनी जडें हीं नरांचींच नारें ॥७३॥
जे रज्जु नेणति तयांस भुजंग आहेसर्वज्ञ रज्जुच असा समजोनि पाहेपाहे निजीं लथ जळें हरि याप्रकारेंत्याकारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७४॥
संहार सर्वहि करुनि जळीं निजेलाद्रष्ट्यास दृश्य जळ मात्र उरे तयालात्याला अखंड निजरुपचि दृश्य सारेंयाकारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७५॥
सृष्टि - स्थिति - प्रळय - कार्य करी तथापीजीवांस सत्य हरिलागिं मृषा स्वरुपींजीं जीवदृष्टिस नविष्णुस सत्य नारेंया कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७६॥
जीवांत कोणिहि न तेसमयीं तथापीतदृष्टिनें उदक पाहतसे स्वरुपींकीं जीव - दृष्टिस जसीं दिसणार नारेंया कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७७॥
रज्जूस सर्प म्हणणार न अज्ञ जेव्हांसर्वज्ञ दोंपरिहि पाहतसेच तेव्हांपाहे हरी लय - जळांस अशा प्रकारेंया कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७८॥
जागाचि जोवरि जळांत अभाव - साक्षींऐसा जळांस नरदृष्टि करुनि लक्षीकीं रज्जु मी जळ भुजंग अशा प्रकारेंया कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७९॥
नारें असीं लय जळें नर - हेतुभूतेंनिद्रार्थ तें अयन आश्रय माधवातेंऐसा समास करितां प्रळयां बुशायीनारायणाख्य हरिरुप तथापि मायी ॥८०॥
तो तूंचि यास्तव न संशय येथ कांहींहा रुप भेद तरि रुपचि सत्य नाहींरुपें अनेक धरितो नट वेषधारीरुपें असत्य नष्ट तूंचि खरा मुरारी ॥८१॥
या लागिं नारायण तूंचि जेव्हांमीं पुत्र तूझा श्रुति - सिद्ध तेव्हांहें पूर्वपद्यें वदला विधातास्थापूनियां तें स्तविलें अनंता ॥८२॥
अहो मायिकें सर्व रुपें हरीचीअसा बोलिला श्लोक पूर्वी विरंचीपुढें बोलतो कीं मला जन्म जेव्हांअसत्यत्वही देखिलें म्याचि तेव्हां ॥८३॥
तें सत्य पाण्यांतील रुप जेव्हांम्या काय तें देखियलें न तेव्हंखरेंचि तें कां उदरीं दिसेनाजें बाह्य तें आंतहि कां असेना ॥८४॥
शरीर तें मागुति वासुदेवाम्या देखिलें काय न देवदेवाश्लोकांत हा केवळ अर्थ येथेंभावार्थ तो पूर्वकथाचि तेथें ॥८५॥
कीं तें म्हणो जरि जळांतिल रुप साचेमिथ्यात्व म्याचि अवलोकियलें तयाचेंकीं त्यांत मी कमळ नाळपथें निघालोंधुडूनि वर्षशत त्यांतुनि मीचि आलों ॥८६॥
बाहेरि ये तंवहि एकसरें मुरारीम्या देखिली सगुण सुंदर मूर्ति सारीतेंही अरुप निजरुप तुझें मुकुंदाभक्तासि दाविसि विचित्र - मुखाऽरविंदा ॥८७॥
बाहेरि मूर्ति दिसते निघतां शरीरींआकार तो किमपि हीन दिसे मुरारीतेव्हां जसा पठ दिसे परि त्यांत कांहीतंतू विणें इतर वसु कदापि नाहीं ॥८८॥
एवं तुझें कमळनाभ शरीर दृष्टींजें देखिलें उदकिं तेथुनि सर्व सृष्टींतेंही न सत्य म्हणवे जगदात्मदेवाभावार्थ हाचि वदला विधि वासुदेवा ॥८९॥
जे सर्व कारण शरीर न सत्य तेंहीऐसें तयीं सकळ विश्वहि सत्य नाहींप्रत्यक्ष सत्यहि असत्य कसें म्हणावेंहा पूर्वपक्ष उठला त्दृदयीं स्वभावें ॥९०॥
ऐसें म्हणाल तरि उत्तर काय द्यावेंप्रत्यक्षही जग असत्य कसें म्हणावेंतें याच कृष्ण - अवतार - कथेंत आतांम्या देखिलें म्हणुनियां वदतो विधाता ॥९१॥
येथेंचि माया - हरणाऽवतारीं प्रपंच - मिथ्यात्व मला मुरारीमृद्भक्षणीं दाखविले मुकुंदा पाहे जयीं विश्व मुखीं यशोदा ॥९२॥
प्रत्यक्ष जें दिसतसे जग तेंचि पोटींदेखें असें जरि म्हणो तरि गोष्टि खोटीबाहेरि जी तुज धरुनि करीं यशोदाजैसी उभी तसिच आंत कसी मुकुंदा ॥९३॥
बाहेरि विश्व अवघें उदरांत तैसेंविश्वांत विश्व हरि सांटवणार कैसेंएकांत एक घट तुल्य जसे न मातीसत्या जगांत जग सत्य असेचरीती ॥९४॥
या कारणें उदरिं दाखविली स्वमायादेखोनि जीस भुलली व्रज - नाथ - जायाआंतील विश्व लटिकें हरि येचिरीतीब्रम्हांड - भांड शतकोटि मृषाच होती ॥९५॥
स्वप्न - प्रपंच नकळोनि खराच वाटेतो या प्रपंच - रचनेंत कधीं न दाटेएके क्षणीं बहुत लोक जयीं निजेलेस्वप्न - प्रपंच तितके इतक्यांत माले ॥९६॥
पोटांत येरिति चराचर वासुदेवामातेसि दाखविसि तें लटिकेंचि देवापोटांमधील जग सर्व मृषाच जैसेंहें विश्वही सकळ दाखवितोचि तैसें ॥९७॥
म्हणतिल जन येथें आरशामाजि जैसेंस्थिरचर जननीनें देखिलें सर्व तैसेंप्रतिफळित शरीरीं विष्णुच्या विश्व जेव्हांअघटित अवघें हें पूर्वपद्योक्त तेव्हां ॥९८॥
विधाताचि तो या अशा पूर्वपक्षा निवारुनियां बोलतो अंबुजाक्षाजसे आरशामाजि ऐसें न तेव्हां दिसे दाविलें विश्व मातेसि जेव्हां ॥९९॥
कुक्षींत हें जगहि हा व्रज - नाथ आहेतूझ्याच येथ जननी तुजमाजि पाहेमृद्भक्षणीं जननि युक्त जसा अनंतापाहे जसें त्वदुदरीं तुज तेचि माता ॥१००॥
दिसे कुक्षीमध्यें सकळ जग ज्याच्या हरिहितोव्रजीं या ज्या रुपें सतत जननीलागिं दिसतोतयारुपें तोही निज - उदरि भासे त्रिभुवनींअहो पाहे जेव्हां जग हरि - शरीरांत जननी ॥१०१॥
तूं आरसा तुजमधें जग दीसताहेहें बोलणें इतकियावरि केविं साहेतूं आरसा तरि कसें तुजमाजि देवादेखेल तूज जननी तुझि वासुदेवा ॥१०२॥
जया दर्पणींजें दिसे विश्व नाना तयामाजि तो आरसा तों दिसेनाशरीरीं दिसे विश्व नाना - स्वभावें तुवां आरशातें न तेथें दिसावें ॥१०३॥
तुझी मूर्ति जेव्हां तुझ्याचा शरीरीं समस्तांमधें देखिली याप्रकारींपहातां तुवां दाविली सर्व माया तसें विश्व मायाच हे देवराया ॥१०४॥
प्रकारांतरें याच पद्यांत आतां निवारील या पूर्वपक्षा विधाताम्हणे तूं जसा आणि हें विश्व जैसें जशाचें तसें दर्पणामाजि कैसें ॥१०५॥
आकारवंत जितुकें प्रतिरुप त्याचेंकांहीं विलक्षण दिसे नयनासि साचेंजो उत्तराभिमुख तो प्रतिबिंब पाहेतो दक्षिणाभिमुख त्यासचि दीसताहे ॥१०६॥
जसी गोकुळी मूर्ति तूझी मुकुंदा उभी ज्यामुखीं आणि जैसी यशोदाजसें जेथ तैसें तुझ्या सर्व पोटीं दिसे दर्पणाची तयीं गोष्टी खोटी ॥१०७॥
चैतन्यरुप तरि तत्प्रतिबिंब कैसेंहा पूर्व पक्ष दिसतो तरि तत्व ऐसेंसाकारतो विण विलक्षणता घडेनाचिन्मात्र त्यांत तरि आकृति सांपडेना ॥१०८॥
व्यापूनि सर्वहि दिशा उरलेंच जैसेंहे व्योम चिद्गगत सर्वजगांत तैसेंआकाश दर्पणिं जळांत दिसे जनालाकैसें विलक्षण म्हणाल तयासि बोला ॥१०९॥
एके दिशेस नभ सन्मुख होय जेव्हांत्याचें विलक्षण तसें प्रतिरुप तेव्हांसर्वाकडे सम अरुप अनंत ऐसेंचैतन्य तें प्रतिफळे विपरीत कैसें ॥११०॥
अनंतत्व त्यालाच बिंब - स्वरुपीं परिच्छिन्नता त्यासही जीवरुपींघटासारिखा सूर्य पाण्यांत भासे तयीं स्वप्रकाशत्व त्याचें न भासे ॥१११॥
हें बिंब आणि प्रतिबिंब तैसें विचार हा सार जगन्निवासेंभाषाप्रबंधीं स्फुट वर्णियेला जो कर्मतत्वाख्य निबंध झाला ॥११२॥
त्य कर्ततत्वीं बरव्या प्रकारें श्री - कर्मतत्वाख्य निबंधकारेंकेला असे वामननामरुपें तेथें पहावीं उभय स्वरुपें ॥११३॥
या प्रस्तुतीं या अवताररुपीं हें सर्व मायामय चित्स्वरुपींकेलें असें दाखविलें अनंता म्हणूनियां बोलियला विधाता ॥११४॥
आणीक हे आजिच सर्व माया अनेक विश्वें मज देवरायातुवांचि कीं दाखविलीं मुकुंदें ब्रम्हा वदे तत्त्व - कथानुवादें ॥११५॥
मिथ्या भुजंग परि सत्य सुगंध हारेंभासे दिसे जगहि साच अशाप्रकारेंसत्ते करुनि तुझिया तुजवीण कांहींहें पाहतां जड चराचर वस्तु नाहीं ॥११६॥
ब्रम्हा म्हणे म्हणुनि येरिति देवरायाकीं तूजवांचुनि असत्य समस्त मायामायाम यत्व मज आजिच हें जगाचेंदाऊनि तत्व निज सूच विलेंच साचें ॥११७॥
कीं वत्स वत्सपहि म्या हरितां अनंतातूं एकलाचि उरलासि म्हणे विधाताझालासि त्याउपरि वत्सप वत्स देवाहोतासि वर्षभरि येरिति वासुदेवा ॥११८॥
वर्षाभरीं परतलों तुजला पहायातों दाविली मज तुवां निज योगमायाते वत्स वत्सप चतुर्भुज सर्व केलेब्रम्हे चतुर्मुख अपारचि दाखविले ॥११९॥
ज्या त्या चतुर्भुज तुझ्या घननील मूर्तीशास्त्रें - पुराण - निगमाऽगम गाति कीर्तीमूर्ती तुझ्या जितुकिया तितुके विधातेब्रम्हांड - कोटि - रचनेसह जेथ होते ॥१२०॥
ऐसा अतर्क्य महिमा मज दाखवीलातो घागरींत हरि रांझण साठवीलामी तुच्छ वैभव तुझें मज पाहवेनाहंसावरि स्मृति धरुनिहि राहवेना ॥१२१॥
जैसा दिबांधनयनीं रवि साहवेनातैसें तुझें विभव तें मज पाहवेनाहंसावरी गगनिं मूर्च्छित मूढ झालोंतुझ्याकृपेस्तव पुन्हा स्मरणासि आलों ॥१२२॥
आच्छादिलें स्व - विभवासि तुवांच जेव्हांआली प्रतीति उठलों गगनींच तेव्हांतों तेथ तें किनपिही नयनीं दिसेनावृंदावनीं तुजविना दुसरें असेना ॥१२३॥
अध्याय पूर्विल तयांत कथार्थ ऐसाश्लोकांत या न विशदार्थ निरुक्त तैसासंक्षेपरुप वदतो विधि कीं मुकुंदाऐसेंचि तूं रचिसि सर्वहि विश्व - वृंदा ॥१२४॥
होतासि एक मग वत्सप - वत्स - रुपींझालासि दाविसि असें जग चित्स्वरुपींजैसें मृषा उदक सूर्य - करांत भासेकेले प्रपंच तुजमाजि तुवांचि ऐसे ॥१२५॥
झालासि तूं वत्सप वत्स जेव्हां केली अविद्या मजलागिं तेव्हांमी भ्रांत कीं कोठिल आणि कैची मूढां जना भ्रांति जसी प्रपंची ॥१२६॥
तूं एकलाचि पहिला गुणहीन देवाझालासि तोचि सचराचर वासुदेवातंतूचि जेविं पट तूंचि समस्त ऐसातत्वार्थ नेणति मला भ्रम आजि तैसा ॥१२७॥
जीवांत त्या भजति जे तुज विश्ववंद्यात्याची कृपेकरुनि नाश्रुनि तूं अविद्यासर्वत्र त्यांस दिसतोसि पटांत तंतूजैसा तसा त्रिभुवनीं सचराचरीं तूं ॥१२८॥
तैसाचि आजि हरि वत्सप - वत्स - रुपीतो तूं सदाद्वय - चिदात्म - सुख - स्वरुपीझालासि कीं सकळ मी जगदीश आहेंरे ब्रम्हया विविध विश्व असेंचि पाहें ॥१२९॥
केला असा हा उपदेश मातें संहारिलें पूर्विलिया भ्रमातेंश्लोकांत या चेरितिनें विरिंची करी स्तुति श्रीपुरुषोत्तमाची ॥१३०॥
तूं वत्स वत्सप - चतुर्भुज - रुप जैसाझालासि सर्वहि चराचर रुप तैसाऐसें वदोनि विधि शंकितरुप झालाकीं शब्द हा वहु सदोष मुखासि आला ॥१३१॥
मायामधें स्थिरचरें अगुण स्वरुपेंजैसीं प्रकाशति तसीं जगदीश - रुपेंहें पाहणें प्रिय बहू जगदीश्वरालागीतेमधें हरिहि येरिति बोलियेला ॥१३२॥
या कारणें उचित हें म्हणणें तथापीब्रम्हा महत्व बहु देखुनि विष्णुरुपींमूर्ती म्हणे परम या हरिच्या स्वतंत्रात्या कर्मबंध - रचिता विवशा विचित्रा ॥१३३॥
त्या पांच भौतिक जडा विधवा कुयोनीकर्मात्मिका न हरि मूर्ति - समा म्हणोनीबोलावया त्दृदयिं बाव धरी विधाताकीं या जडासम न मूर्ति तुझ्या अनंता ॥१३४॥
ब्रम्ह प्रकाशक चराचर रुप मायातूं ब्रम्ह देह तुज माइक देवरायाहें अन्यथा हरि नव्हे म्हणऊनि ऐसेंमी बोलिलों परि समत्व घडेल कैसें ॥१३५॥
स्वयें कोण हें नेणती जीवजाती जगीं वासनारुप कर्मे करीतीसुटेना विना भोगिल्या कर्म त्यांचें मृषा विश्व भोगार्थ हें त्यांस साचेंकरिति कर्म परोपरि तें फळे निज सुखाऽमुख भोगविते बळेंम्हणुनि देह चराचर पावती विवश कर्मफळाप्रति धांवती ॥१३७॥
म्हणुनि सत्य शरीर गमे जयां कवण आपण हें नकळे तयांतव तनू हरि यद्यपि मायिका परि न कर्ममया व्रजनायका ॥१३८॥
जें जीव कर्म करिती फळ तें तयांतेदेशी त्रिमूर्तिपण यास्तव तूज येथेंएतद्विलक्षण तथापिहि त्या स्वमूर्तीतूझ्या म्हणूनि विधि वर्णिल विष्णु - कीर्ती ॥१३९॥
जे अज्ञ नेणति तुझी पदवी मुकुंदातूं देह हे सृजिसि त्या जड - जीव - वृंदात्यांच्याच सृष्टि - समयीं जरि तूं अरुपीमायेंकरुनि चतुरानन तूं तथापी ॥१४०॥
जैं हें अनात्म जग पाळिसि यांत त्यालातो विष्णुनाम तुज देह नसोनि झालाऐसा त्रिनेत्र हर होउनि अंतकाळींसंहारिसी परम दारुण रुंड माळी ॥१४१॥
ज्या कारणें धरिसि तूं हरि देह ऐसेत्या सारिखे वदविती तुज देह कैसेतूं या जगीं पसरुनी निज शुद्ध मायास्वेच्छेंकरुनि धरिसी तनु देवराया ॥१४२॥
आत्मा स्वयेंचि सकळात्मकतें करुनीब्रम्ह स्वयें सकळात्मक तें करुनीब्रम्ह स्वयें स्मृति अखंड असी धरुनीजे देह तूं धरिसि देहहि ते न देवादेही असा अससि केवळ वासुदे वा ॥१४३॥
इव इव इव तीन्ही शब्द हे याचि भावेंविधि - हरि - हर - रुपीं योजिले ब्रम्हदेवेंत्रिविधहि हरुरुपें लोक दृष्टिस मात्रेंदिसति परि न भूतें जेरिती अन्य गात्रें ॥१४४॥
विधि वदत असें कीं तूं हरी ब्रम्हरुपीघडि घडि अपराधी मी म्हणों को तथापीतरि रज - तम - योगें ब्रम्हया मोह होतोम्हणुनिहि अपराधी होउनी प्रार्थितो तो ॥१४५॥
तथापि ते कर्मतनू तयाची नव्हे स्वयें विष्णुचि तो विरंचीश्रीविष्णु तो केवळ सत्वमूर्ती म्हणूनि वर्णी विधि विष्णु कीर्तीजशा जीवयोनी तसीं विष्णु - रुपें कसीं हो म्हणावीं सुखाचीं स्वरुपेंम्हणूनीच जीवार्थ सृष्ट्यादि - कारें त्रिमूर्ति प्रभू वर्णिला या प्रकारें ॥१४७॥
त्रिमूर्तीतही श्रुद्ध सत्वें मुरारी जगीं विष्णु तूं एक नानावतारीकरीसी खळो मर्दुनी धर्म - रक्षा विधाता असें बोलतो अंबुजाक्षा ॥१४८॥
देवांत वामन तुझा अवतार देवानारायणादिक ऋषींतहि वासुदेवाश्रीराम कृष्ण अवतार मनुष्य - देहींक्रोडादि दिव्य अवतार पश्रूमधेंही ॥१४९॥
तैसेचि जे जळ चरांतहि मत्स्य कूर्मस्वामी तुझे सदवतार पवित्र कर्मदुष्टांस निग्रह अनुग्रह साधु - संतांऐसे अनंत अवतार तुझे अनंता ॥१५०॥
तूं जन्म - श्रून्य तुज जन्म - निमित्त कांहींअज्ञान - कर्म - फळ बंधन रुप नाहींलीलाऽमृतें जन तरोत सरोत पापेंतूं जन्मसी अजहि केवळ या प्रतापें ॥१५१॥
मायामयीं स्थिरचरीं अवतार ऐसेमायाचि यद्यपि समान तथापि कैसेजे कर्म बंध रचिते परतंत्र - रुपेंतैसीं तुझीं म्हणवतील कसीं स्वरुपें ॥१५२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ऐसें
— असे
तुज
— तुला
माया
— भासमान करणारी शक्ती
तैसें
— तसे
सकळ
— सर्व
जैसें
— जसे
तुवां
— तू (करणरूप)
तेथ
— तिथे
देखोनि
— पाहून
म्हणोनि
— म्हणून
एवं
— अशा प्रकारे
जैं
— जेव्हा
जेथ
— जिथे
देखे
— पाहतो
घडे
— घडते, शक्य होते
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
मातें
— मला

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.