मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ब्रम्हस्तुति

साहित्य

ब्रम्हस्तुति

चरण २, भाग २ · श्लोक ३४३–४९२

bramhastuti

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधात ब्रह्मदेवाने कृष्णाची केलेली स्तुती आहे; ही त्या स्तुतीवरील वामन पंडितांची मराठी टीका, तीन चरणांत. वत्सहरणाचा प्रसंग, ब्रह्मदेवाचा भ्रम आणि मग त्याचे डोळे उघडणे — यातून निर्गुण आणि सगुण या दोन्ही रूपांचे वर्णन पुढे येते. त्यांच्या रचनांतील सर्वात मोठी.

ब्रम्हात्मता - स्फुरण रुपिणि नित्य विद्यामाया तुझी विमळ येरिति विश्व - वंद्यादेहात्मता - स्फुरण - रुपिणि ते अविद्यामाया तुझी कसि तसी भव - रोग - वैद्या ॥१५३॥
अविद्येस विद्येस मिथ्यात्व साम्यें अनीशत्व ईशत्व हें तारतम्येंविधाता असें बोलिला स्पष्ट जेथें उठे एक शंका मनामाजि तेथें ॥१५४॥
स्वातंत्र्य जेव्हां अवतार - रुपी विद्यामय ब्रम्ह सुखस्वरुपींन कर्म - संबंध तयासि जेव्हां मत्स्यादि कां देहहि तुच्छ तेव्हां ॥१५५॥
मागावया बळि - गृहासि किमर्थ जावेंसीता - वियोग - विरहें तरि कां रडावेंकंसासही भिउनि कां मथुरा त्यजावीहे मूर्ति नंद - सदनास किमर्थ यावी ॥१५६॥
शंका असी उपजली विधिच्याच पोटींतों आठवे त्दृदयिं विक्रम कोटिकोटीचित्तीं स्मरोनि निज योग बळें हरीचीशंकेस या हरिल येथुनियां विरंची ॥१५७॥
श्लोकांत या म्हणतसे विधि देवरायातूं क्रीडसी पसरुनी निज - योग - मायाकोठें कसा करिल काय असा विवेकीजाणों शकेल तुज कोण असा त्रिलोकीं ॥१५८॥
लीला अतर्क्य त्दृदयीं स्मरतां विरंचीसंबो धनें तदनुरुप वदे हरीचींकीं तूं अनंत भगवंत पराख्य मायाआत्मा प्रकाशक तिचा पति देवराया ॥१५९॥
योगेश्वरा अकळ या तव दिव्य लीलाजाणों शके कवण नील - सरोज - नीळाश्लोकार्थ हाचि परि भाव विचार - रीतीभावार्थ सार बहु फार अपार होती ॥१६०॥
भ्रू वक्रमात्र करि काळ शरीर जेव्हांब्रम्हांड - भांड शत कोटि जळेचि तेव्हांतो भूमित्वा असुर - भार हरावयालाझाला कसा भिउनि येथ कसा लपाला ॥१६१॥
व्यापूनि विश्व उरलाचि तया अनंतालंकेमधेंचि कसि अंतरली स्व - सीताव्यापी त्रिविक्रम चराचर विश्व पायींतोही बळीस पसरी कर शेषशाची ॥१६२॥
इत्यादि सर्वहि अनीश्वरता घडेनाजेथें अनीशपण लेशहि सांपडेनालीला जशा रुचति लोकरिती मनालातैशा करुनि हरि उद्धरितो जनाला ॥१६३॥
माया अचेतन चराचर ज्या प्रकारेंमायामयेंचि हरिचीं सगुणें शरीरेंमायामयत्व उभयत्र वदोनि साम्येंधाता तथापि वदला बहु तारतम्यें ॥१६४॥
ईशत्व आणिक अनीश्वरता तथापीमिथ्यात्व तों समचि ईश - अनीश - रुपींया कारणें अनृत विश्व म्हणूनि आतांसिद्धांत हा दृढ करीत असे विधाता ॥१६५॥
ज्या विश्वकारण तुझ्या अवतार - मूर्तीत्याही मृषा जरि समर्थ पवित्र - कीर्तीत्याकारणास्तव समस्त असत्य देवास्वप्नास सचराचर वासुदेवा ॥१६६॥
स्वप्ना असें अनृत नश्वर दुःखरुपीतें सत्य शाश्वत दिसे तव - चित् - स्वरुपींमायेच पासुनि असत्य जरी उदेलेंजाणों खरेंचि जग येरिति त्यास झालें ॥१६७॥
मायाच विश्व म्हणती निगमीं पुराणींमायेचपासुनि तयास विरंचि - वाणीउत्पत्ति बोलत असे तरि दोनि मायाकैशा म्हणाल तरि सावध आयका या ॥१६८॥
मातींत जेविं घट - कारण शक्ति कांहींआहे जरी अनुभवा प्रति येत नाहींनाहीं म्हणाल तरि घागरि होय कैसीब्रम्हीं प्रपंच करणार हि शक्ति ऐसी ॥१६९॥
झाला जरीं घटविकार न मृत्ति केलादुग्धासि जेविं दधिरुप विकार केलादुग्धांत ही असति शक्ति तसीच जेव्हांदुग्धत्व - हानि नव्हती दधिमाजि तेव्हां ॥१७०॥
होती घटाकृति नसोनि उगीच मातीती माजि जेविं घट - कारक शक्ति होतीब्रम्हीं प्रपंच नसतां असतेचि मायाजे कां असी तसि म्हणूनि नये म्हणाया ॥१७१॥
रज्जूंत सर्प करणार असीच कांहींजे शक्ति ते अनुभवा प्रति येत नाहींजे कां अवस्तुहि असोनि दिसे न दृष्टीजैसी दिसे अनृत - कार्य हि सर्प - सृष्टी ॥१७२॥
अज्ञान शुक्तिविषयीं करितेच शक्तीजे कां रुपें करुनि दाखवि शुद्ध शुक्तीअज्ञान तें न म्हणवे बहुतांस विद्यादेऊनियां उरलियोस करी अविद्या ॥१७३॥
अज्ञान तेंचि असती तरि शुक्ति जेव्हांएक जणास कळली तिस नाश तेव्हांअज्ञान शुक्ति - विषयीं मग आणिकांलाहोऊं नये उपजते तरि केविं बोला ॥१७४॥
निर्माण शुक्ति विषयीं करि जे अविद्यानिर्माण शुक्ति - विषयीं करि तेच विद्यादोहींस कारण असी निज - शक्ति कांहींजे ते प्रतीतिस कदापिहि येत नाहीं ॥१७५॥
ब्रम्हीं असी सकळ - कारण शक्ति कांहींमाया असोनिहि दुजेपण जीस नाहींमाशब्द नास्ति म्हणतो नदिसे स्वरुपींया शब्द जे म्हणुनि तीस वदे तथांपी ॥१७६॥
ब्रम्हीं दुजेपण करी न म्हणूनि नाहींकार्या मृषा वरुनि कारण शक्ति कांहींमायार्थ कारणपणांत असेरितीचानामार्थ कार्य पण ही वदिजेल तीचा ॥१७७॥
माशब्द नास्ति म्हणिजे घटवस्तु नाहींया शब्द जे असिहि ते घट - सृष्टि कांहींमातींत येरिति नसो नि दिसे म्हणूनीमाया तिला म्हणति वर्ण तिचेच दोनी ॥१७८॥
या शब्द त्यांत पहिलें मग मा म्हणूनींया मा तिला म्हणति वर्ण तिचेच दोनीया शब्द जे म्हणुनि दाउनि दे अविद्यामाशब्द तीसहि निषेधुनि दे स्वविद्या ॥१७९॥
इत्यादि अर्थ बहु फार असोत आतांया प्रस्तुतीं हरिस काय वदे विधातामायेच पासुनि म्हणे जरि विश्व झालेंसत्या असेंचि जग सर्व दिसोनि आलें ॥१८०॥
हें कार्यरुपहि असत्यचि देवराया ॥१८१॥
मिथ्याचि कारण हि कार्य हि या प्रकारींतें सत्य जें परम कारण तूं मुरारीमृत्पिंड आणि घट दोनि असत्य मायामाती खरी परमकारण देवराया ॥१८२॥
माती खरी घट मृषा परि सत्य झालामाती कडूनचि खरेपण कीं तयालामाती करुनि घट यद्यपि सत्य वाटेकाळत्रयांत घट मातिस तों न भेदे ॥१८३॥
मातींत आधीं नव्हताचि जैसा अंतीं न मातींत उरेल तैसामातीविणें तों घटवस्तु नाहीं माती नसे ही तरित्यांत पाहीं ॥१८४॥
ब्रम्हीं प्रपंच नव्हता पहिलाच जैसासंहार होइल तयीं न तयांत तैसाआतां असोनिहि दिसोनिहि तो न कांहींब्रम्हीं प्रपंच म्हणऊनि कदापि नाहीं ॥१८५॥
अधिष्ठान सत्यें करुनीं विवर्ता दिसे सत्यता येरिती विश्व वार्तामृषा होउनी ही जसें सत्यदीसें स्वयें दुःख ही तें सुखाभास भासे ॥१८६॥
ऐसें असत्य जग होउनि दुःस्वरुपीतेथें गमं सुख तुझ्याच सुख - स्वरुपींजेथें भुजंग लटिका भय - कंप - कारीतेथें सुगंध सुख कारक पुष्प हारी ॥१८७॥
तूं सत्य यास्तव असत्यहि सत्य झालेंज्ञानें तुझ्या जड सचेतनतेस आलेंदुःखांत या सुख तुझ्याच सुखें अनंताभावार्थ हा धरुनि बोलियला विधाता ॥१८८॥
कोठें अचेतन दिसे जग हें तथापीतंतू मधें पट जसा तव - चित् - स्वरुपींयाही मधें नवल एक वदे विधाताकीं हें चराचर नसोनि दिसे अनंता ॥१८९॥
खरें हेम तेथें अलंकार माया नसोनी असेसा दिसे देवरायान पूर्वी न अंतीं अलंकार काहीं नसे वस्तुता भास तो तेधवांही ॥१९०॥
झुझी एक सत्ता खरी तींतनाना दिसे हें जरी विश्व काहीं असेनानहें आदि अंतीं दिसे विश्व आतां तरी तूंचि तें विश्व नाहीं अनंता ॥१९१॥
स्वरुपीं तुझ्या विश्व मिथ्या अनंता असें बोलिला पूर्व पद्यें विधाताअलंकार - सोन्यास एकत्व जेव्हां म्हणूनी म्हणे विश्व हें तूंचि तेव्हां ॥१९२॥
म्हणूनीच सर्व खलु ब्रम्ह ऐसें श्रुती बोलती साधलें तेंचि तैसेंघडे ऐक्य हें चिज्जडाचें तथापी दिसे जीवनामात्मता चित्स्वरुपीं ॥१९३॥
चिदात्मत्वही एक ऐसें विरंची स्वतः सिद्ध जीवात्मता श्रीहरीचीवदों पाहतो या प्रसंगी विधाता वदे लक्षणें वस्तुचीं श्री अनंता ॥१९४॥
तूं एक ऐसें म्हणतो विरंची या एक शब्दें स्तुति काय त्याचीएक स्वयें तो भलताचि आहे या लागिं हा अर्थ न येथ साहे ॥१९५॥
हरिहि एक अनेक पणें जरी स्फुरण दाउनि भेदहि तो हरीतरिच एक तथा म्हणणें बरें म्हणुनि एक म्हणे विधि आदरें ॥१९६॥
तूं बिंब एक अवघे प्रतिबिंब देवचिट्रूप जीव म्हणती श्रुति वासुदेवाहे स्वप्न - जागृति मध्यें जरि वेगळालेतुर्या - सुषुप्ति - समयीं नुरती निराळे ॥१९७॥
भोगार्थ हे तुझि अनादि विचित्र युक्तीकीं वासना - फळहि भोगुनि नित्य मुक्तीभोक्ता अनीश्वरहि तूं प्रतिबिंब - रुपेंतें तद्विलक्षणहि बिंब निज - स्वरुपें ॥१९८॥
जें एक तूं म्हणउनी विधि बोलियेलाभावार्थ हा विशद त्यांतुनियां निघालाया कारणें पुढलियाच पदीं विधाताआत्माच तूं म्हणुनि बोलतसे अनंता ॥१९९॥
बिंबत्व आणि तुजला प्रति बिंबताहीआत्मा असा म्हणुनि तूंचि समस्त - देहींयाकारणें पुरुषनाम तुझें अनंताऐसें पदीं तिसरिया वदतो विधाता ॥२००॥
वससि या सकळां विविधा पुरीं पुरुषनाम तरीच तुझें हरीदिसति भेद परस्पर मीपणें पुरुष तूं प्रतिबिंब अशागुणें ॥२०१॥
लव - सुषुप्ति - उपाधिस जेधवां उरसि केवळ बिंबचि तेधवांपुनरपि प्रतिबिंबपणें तयीं मिरवसी करिसी जग हें जयीं ॥२०२॥
उदक निर्मळ सत्वहि येरिती तरि चिदंश पृथक् प्रतिबिंबतीचिखल सत्वजळीं तम कालवें स्मृति न सत्वगुणीं मग बोलवे ॥२०३॥
गढुळ सत्व तमोमय जे धवां प्रतिमुखें न जळीं मग ते धवांतंई सुषुप्तिंत बिंबचिदैक्यता श्रुतिहि हें स्फुट बोलति तत्त्वता ॥२०४॥
जइं वसे दृढ कर्दम तो तळीं नितळतां प्रतिबिंब दिसे जळींपुरुष तूं प्रतिबिंबपणें असा पुरुष बिंबतसा म्हणवे कसा ॥२०५॥
मिळति तूजमधें प्रतिबिंबके निघति होति जयीं अमलोदकेतुज असे रिघणें निघणें नसे पुरुष ते तुजतुल्य वदों कसे ॥२०६॥
पुरुष बिंब रिघे ननिघे कधीं म्हणुनि येथ चतुर्थपदें विधीम्हणतसे पुरुषांत पुराण तूं अगुण होउनि ईश सुजाण तूं ॥२०७॥
तव पुराणपणेंचि पुराणता प्रतिमुखा पुरुषां तुजला स्वतातुजमधें रिघती - निघती जरी तुजकडूनि पुरातन ते हरी ॥२०८॥
जीवात्मता सकळ येरितिने हरीचीयां चौंपदें करुनि बोलियला विरंचीकीं बिंब तूंचि सकळां प्रतिबिंबकांचेंबोलेल याउपरि कीं हरितेंचि साचें ॥२०९॥
आत्मा पुराणपुरुषा हरि सत्य तो तूंमिथ्या चराचर पटांतिल सत्य तंतूश्लोकांत हें पहिलिया वदला विरंचीते सत्यता विशद वर्णिल येथ साची ॥२१०॥
कीं दृश्य विश्व जरि केवळ सत्य होतेंतूं ब्रम्ह सत्य म्हणतांच विरुद्ध येतेंकीं ब्रम्ह कारण चराचर कार्य तेव्हांकां तंतु सत्य म्हणणें पट सत्य जेव्हां ॥२११॥
या कारणें पट असत्य म्हणूनि तंतूजैसा खरा म्हणति कारण सत्य तो तूंजैसीं स्वयें दिसति तंतु सुवर्ण मातीतैशा स्वयें न पट - कुंडल - कुंभ - जाती ॥२१२॥
तंतू विणेंचि असता पट वस्तु कांहींतंतू विणेंचि दिसता तरि सत्य तोहीसोन्या विणें कटक कुंडल येचरीतीतैसें असत्यचि घटादिक सत्य माती ॥२१३॥
दृष्टांत हे सकळ सत्य पणास ऐसेहे ही पदार्थ जड होतिल सत्य कैसेजे हे स्वयें सकळ होतिल सत्य जेव्हांकोण्ही प्रकाशक न यांस दिसेल तेव्हां ॥२१४॥
विश्व ब्रम्हविना स्वयेंचि नदिसे मिथ्या म्हणूनि स्वयेंज्याणें विश्व दिसे प्रकाशक तया कोणी नसे निश्वयेंतेव्हां तोचि खरा म्हणूनि म्हणतों कीं तूं स्वयं ज्योति तोआत्मा निर्गुण तो प्रकाश्रुनि जडा विश्व स्वयें भासतो ॥२१५॥
ब्रम्ह स्वयं ज्योति जसें तसा हा जीव स्वयंज्योतिहि कां न पाहादोष स्वयं ज्योति पणास तेव्हां जीव स्वयं ज्योति अनेक जेव्हां ॥२१६॥
हरावया या दृढ - पूर्वपक्षा अनंतशब्दें कमळायताक्षाब्रम्हा म्हणे तूंचि अनंत जेव्हां दूजा स्वयं ज्योति घडे न तेव्हां ॥२१७॥
अनंत स्वयं ज्योति हा पूर्ण साचा न देशें न काळें गमे अंत याचाजसा सर्वकाळीं तसा सर्वदेशीं प्रकाशे स्वयें भास मिथ्या प्रकाशीं ॥२१८॥
दहाही दिशा नेणती अंत ज्याचा अनंत स्वयं ज्योति तो तूं विसाचाशरीराहुनी जीव बाहेरि नाहीं प्रकाशत्व सर्वत्र ज्याला न कांहीं ॥२१९॥
स्वदेहाविणें जो नसे अन्य देहीं स्वयं ज्योति बिंब स्वयें तो न कांहींअसाही तरी जागृति - स्वप्न - काळीं सुषुप्तींत सत्ता दिसेना निराळी ॥२२०॥
सुषुप्तिकाळीं प्रतिबिंब बिंबीं मिळे स्वबिंबात्म - सुखाऽवलंबींतेथें न आनंदहि जाणतो तो उपाधि योगें मग आठवीतो ॥२२१॥
आनंदमात्र परि त्यांत न धर्म कांहींनेणे सुधा स्वमधुरत्व असेंचि तेंहीबिंबीं तया मिळतसे प्रतिबिंब जेव्हांआनंदमात्र परि वृत्तिविहीन तेव्हां ॥२२२॥
रज - तम - कृत दुःखें जाणतो बुद्धियोगेंअनुभव असुखाचा त्याच जीवास भोगेंपरम असुख मी तों कीं तुझें आणि माझेम्हणुनि मनिं वहातो नित्य हें जीव ओझें ॥२२३॥
कोणी शिरीं धरुनि चालति भार जेव्हांभोगोनियां म्हणति हें उतरेल केव्हांमी - तूं पणें करुनि जो करि जीव धंदाकंटाळतो मग गुणात्मक - वृत्ति - वृंदा ॥२२४॥
चित्तांत ज्या उठति चित्र - विचित्र वृत्तीनिद्रेमधें प्रबल तें तम त्याच चित्तींवृत्तिप्रतीति नसतां मग भार त्यालानाहीं स्व - बिंब - सुख ऐक्य तयीं जयाला ॥२२५॥
सुषुप्तींत मी तूं तुझें आणि माझें नवाहे शिरीं जीव हें वृत्ति ओझेंविना दुःख जो काळ निद्रेंत गेला प्रबोधीं निजानंद वाटे तयाला ॥२२६॥
सुषुप्तीमधें तों सुखाची प्रतीती नसे मानितां ते घडेना सुषुप्तीसमाधींतही वीसरे सर्व कांहीं तयीं विस्मृति स्वात्मतेचीच नाहीं ॥२२७॥
सुषुप्तींतही नाठवे अन्य जेव्हां निजानंद मात्र स्फुरे यासि तेव्हांसुषुप्ती - समाधीमधें भेद कांहीं दिसेना असें बोलतां येत नाहीं ॥२२८॥
विना बुद्धि निर्धर्म नेणे प्रतीती तमोलीनता तीस जेव्हां सुषुप्तींविना दुःख निद्रेंत जो काळ गेला प्रबोधीं सुखत्वें स्मरे जीवत्वालासबिंबीं असा काळ निद्रेंत जातां न काळें अनंतत्व त्याला अनंतातुझा अंश तूझें अनंतत्व त्याला न देशें न काळें स्वयें तें जयाला ॥२३०॥
अनंत स्वयं ज्योति तो तूं मुकुंदा स्वयं ज्योति कैसें म्हणों जीव वृंदाधरुनी असा भाव पोटीं विधाता अनंताख्य - नामें स्तवी श्रीअनंतासुषुप्ति काळीं सुख बिंब - रुपें तें मानिती सर्व निज - स्वरुपेंतेव्हां स्वयंज्योति तुझीच ज्योतीजीच्या प्रतिज्योति अनेक होती ॥२३२॥
स्वयंज्योतिच्या जीवज्योती अनेका असे तेधवां व्तर्थ नानात्मशंकातरी देश - काळें अनंतत्व ज्याला स्वयं ज्योति कैसे वदावें तयाला ॥२३३॥
अनंत स्वयं ज्योति हें सिद्ध जेथें स्वयें सिद्ध सत्वत्व झालेंच तेथेंनव्हे सत्य जें दीसतें विश्व नाना प्रकाश स्वयें त्या जडाला असेना ॥२३४॥
स्वयं ज्योति शब्दें असें सिद्ध झालें प्रपंचा जडालागिं मिथ्यात्व आलेंविना मृत्तिका कुंभ जेव्हां असेना विना मृत्तिका कुंभ तेव्हां दिसेना ॥२३५॥
असत्यत्व सत्यत्व एके रितीनें असें सूचिलें भारतीच्या पतीतेंस्वयें मृत्तिका दीसते सत्य ऐसें तिणें भासतें कुंभ - मिथ्यात्व तैसें ॥२३६॥
प्रकाश स्वयें ब्रम्ह त्यावीण कांहीं दिसेना असें त्यास सत्यत्व नाहींदुजे रीतितें सत्य मिथ्यात्व आतां सुचे येरितींनें स्तवी श्री अनंता ॥२३७॥
तूं आद्य नित्य हरि अक्षर तूं म्हणूनीसत्यत्व वर्णित असे त्रिपदें करुनीतूं आद्य कीं प्रथम एकचि तूं मुकुंदाजो निर्मिसी सकळ या जड - तत्व वृंदा ॥२३८॥
न निर्माण होता मृषा कुंभ जेव्हां स्वयें मृत्तिका सिद्ध होतीच तेव्हांनव्हे विश्व होतें जई श्री अनंता तुझा एक लक्षाश चिन्मात्र होतासरस्वतीचा पति याच भावें म्हणे हरी आद्य तुतें म्हणावेंतसाच अंतीं उरसी मुकुंदा गिळूनियां सर्व - अनित्य - वृंदा ॥२४०॥
भावें अशा बोलतसे विधाता कीं नित्य तूं या करितां अनतांनासे मृषा - कुंभ असेच माती तूं सत्य तो एकचि आदि अंतीं ॥२४१॥
जें आदि अंतीं उरतें तयातें सत्यत्व मिथ्यात्व दुज्यास येतेंमध्येंच निर्माण घटादि होती ते पाहतां एकचि सत्य माती ॥२४२॥
घट दिसे परि वस्तुचि तो नसे अनृत होउनि मातिमधें वसेतरि नसेचि म्हणा घट यारिती अनृत हें जग सत्य रमापती ॥२४३॥
प्रपंच - उत्पत्ति - लया वरुनी न आदिअंतीं जग हें म्हणूनीमिथ्यात्व मध्यें सहजेंचि आलें तथापिही शंकित चित्त झालें ॥२४४॥
न हें विश्व झालें न हें विश्व नाशे जगीं बोलती एक पाषांड ऐसेंजसें होउनी सर्वही नाशताहे तसें विश्व झालें पुढें ही नराहे ॥२४५॥
जसा पुत्र होतो तसा बाप झाला पित्याचा दिसे जन्म तर्के सुतालासमस्तां दिसे नाश - उत्पत्ति होती जगा नाश उत्पत्ति तर्कें करीती ॥२४६॥
न यां पंच भूतां दिसे अंत आदी तरी साधतें येरिती हेंचि वेदीजसे देह होती तसीं पंचभूतें जसा नाश यांला तसा नाश त्यांतें ॥२४७॥
जसीं सर्व भूतें क्षरें लोकदृष्टी असी सर्वही हे क्षयी ब्रम्हसृष्टीउरे अक्षर ब्रम्ह जें सर्व अंतीं खरें तेंचि हें साधिलें सर्व संतीं ॥२४८॥
मधेंही क्षरें भौतिकें येचिरीती क्षरें पंचभूतें न हें आदि अंतींस्थितीमाजिहि या क्षरत्वें अनंता खरा तूंचि हें बोलताहे विधाता ॥२४९॥
नित्यत्व वर्णुनिहि अक्षर तूं म्हणूनीबोले विरंचि मनिं भाव असा धरुनीकाळत्रयीं हरिच सत्य न अन्य कांहींभासे तथापि हरि वांचुनि अन्य नाहीं ॥२५०॥
सत्यत्व - लक्षण असें उभय प्रकारेंमिथ्यात्व - लक्षण - विलक्षण ज्या विकारेंश्लोकांत यारिति असें विधि बोलियेलातस्मात् प्रपंच हरिरुप समस्त झाला ॥२५१॥
पटचि तंतु घटादिक मृत्तिका कनकताचि जसी कटकादिकाभुजग रज्जुचि श्रुक्तिरुपें जसें हरिच विश्व समस्त हि हें तसे ॥२५२॥
विनवितां हरिचीं निजल क्षणें हरिच सत्य म्हणूनि विचक्षणेंकथियले विपरीत - विलक्षणें जगमृषात्व - कटाक्ष - निरीक्षणें ॥२५३॥
जग मृषा तरि कां विषयी सुखें म्हणुनि येरिति येथ चतुर्मुखेंकिमपि शंकित मानस देखिलें सुखहि तें हरिरुपचि लेखिलें ॥२५४॥
सुख म्हणों हरिरुपचि हें जरी क्षणिक आणि सदोष कसे परीमग म्हणे विषयात्मक निश्वयें क्षणिक आणि सदोष न तें स्वयें ॥२५५॥
या लागिं नित्यसुख तूं म्हणतो विधाताहें बोलवे न तुज नश्वरता अनंतावारी मृषा विषयदोष तया वरुनीकीं नित्य तें सुख निरंजन तूं म्हणूनी ॥२५६॥
दुःख प्रपंच सुख त्यांतहि वासुदेवातेंतों स्वरुपचि तुझें जगदात्म - देवाआनंद नश्वर सदोष जगीं तथापीनिर्दोष नित्यसुख तूं स्व - सुख - स्वरुपी ॥२५७॥
सुमन हार सुशीत सुधास तो अनृत सर्प तयावरि भासतोसुख तया वरिल्या पवनें क्षणें किमपि तों भय सर्प निरीक्षणें ॥२५८॥
घडिघडी विषयीं सुख जें हरी सुख तुझेंच तथापिहि यापरीविषय सर्प मृषा भय दाविनी सुख न तथापिहि तूंच रमापती ॥२५९॥
सुख तुझें विषयाकरितां हरी क्षणिक आणि सदोष गमे परीसुख निरंजन नित्यचि तूं स्वयें क्षणिक आणि सदोष न निश्वयें ॥२६०॥
जे हार नेणति तयांसचि सर्प होतोजे जाणती मृदु सुगंध तया जना तोहें विश्व दुःख परि जो विषयांत कांहींआनंद - लेश तुजवांचुनि अन्य नाहीं ॥२६१॥
आनंद नाहीं विषयांत कांहीं आनंद तूं व्यापक सर्व - देहींमानूनि पाणी रविरश्मि तृष्णा वाटे जसी कां हरणासि तृष्णा ॥२६२॥
जैसें मृगांसि लटिकें जळ सत्य वाटेत्यालागिं धांवति पथीं जळ सत्य भेटेत्यातें पिऊनि म्हणती जळ तेंचि प्यालोंलक्षूनि जें उदक धांवत येथ आलों ॥२६३॥
ऐसे विलास करितां विषयीं जनालाआनंद त्यांत गमतो जितुका मनालातें तों स्वरुप - गत केवळ सौख्य आहेजो अज्ञ तो सुख तयां विषयांत पाहे ॥२६४॥
जरि अनित्य तरी सुख तों खरें म्हणसि सौंख्य तथापुइ न तें बरेंसुख निरंजन एकचिं तूं हरी म्हणुनि बोलियला विधि यापरी ॥२६५॥
म्हणति अंजन यद्यपि काजळा परि तमोगुण त्याहुनि आगळाविषय - निर्मित दुःख तया तमा सुख निरंजन तूं पुरुषोत्तमा ॥२६६॥
सहज अग्नि सधूम मधीं नसे जळति त्यांत तया करितां दिसेअसुख जें उपजे सुख भोगितां विषय - भोगचि कारण पाहतां ॥२६७॥
विषय तामस राजस इंद्रियें मिसळलें जरि सत्व मन स्वयेंत्रिगुण वात असी घृत कामना करि सुखाग्नि निरंजन अंजना ॥२६८॥
ज्या जीवाच्या उपाधी त्रिगुणमय अहो वासना - स्नेह - तेलाजाळी जो वातिरुपें सुख अनळ करी अंजनप्राय त्यालावाती तेलासि जाळी जरि अनळ करी काजळातें तथापीत्याला तों लेप नाहीं विषय - सुख असें चित्सुखें चित्स्वरुपीं ॥२६९॥
येणेंकरिती सुख तुझें विषयीं मुरारीझालें असे क्षणिक आणिक दुःखकारीतेतों मृषा विषय वाटत तूज देवायालागिं तूं सुख निरंजन वासुदेवा ॥२७०॥
निर्दोष जें सुख निरंजन तें म्हणावेंदोषासि अंजनहि बोलति याचि भावेंकीं दोष अंजन जसें तमरुप काळेंयालागिं काजळपणें कथिलें निराळें ॥२७१॥
सुख निरंजन नित्य हरी स्वयें म्हणुनि बोलियला विधि निश्वयेंपरम जें सुख लक्षण येरिती स्तविल यावरि भारतिचा पती ॥२७२॥
श्रुति सुख वदती हें सामवेदांत तत्त्वेंअधिगत सुख संतां जें असाधारणत्वेंश्रुति वदति सुखाचें जे स्थळीं नाम भूमानिपुण म्हणति भूमा तें जयाला न सीमा ॥२७३॥
सतत्कुमाराप्रति नारदानें केला असा प्रश्न विशारदानेंकीं तूं गुरु केवळ दीन - बंधू माझा निवारीं भव - शोक - सिंधू ॥२७४॥
हे दोघही पुत्र विधातयाचे परस्परेंझ बोल असे तयांचेगाती श्रुती सामक सामवेदीं प्रमाण जे कां सुख - दुःख - भेदीं ॥२७५॥
त्या नारदालागिं सनत्कुमारें दिलें असे उत्तर या प्रकारेंकीं शोक सिंधू उतरोनि जाणें तेव्हां सुखाचें निजरुप जाणे ॥२७६॥
तो नारद प्रश्न करी तयातें कीं तें सुख सांग मातेंस्वरुप तो त्यास वदे सुखाचें कीं नाम भूमा सुख तेंचि साचें ॥२७७॥
या वै भूमा तत्सुखं या श्रुतीचा बोले अर्थ स्पष्ट जो येरितीचाकीं जो भूमा तोचि आनंद साचा भूमाशब्दें अंत नाहीं जयाचा ॥२७८॥
न देशें न काळें कधीं अंत ज्याला अहो बोलती वेद भूमा तयालाजडें स्थावरें जंगमें अंतवंतें श्रुती बोलती दुःखरुपें तयातें ॥२७९॥
असी असाधारणता सुखाची या प्रस्तुतीं वर्णितसे विरंचीकीं तूं हरी पूर्ण म्हणूनि धाता या पूर्ण शब्दें स्तवितो अनंता ॥२८०॥
सुख - समुद्र अखंड रमापती लहरिया विविधा विषयाकृतीजळधि तोचि जरी लहरी जळीं जलधि पूर्ण न त्या अवघ्या स्थळी ॥२८१॥
विस्तीर्ण अत्यंत समुद्र जैसा विस्तार नाहीं लहरींस तैसासमुद्र अंशें लहरींत आहे तरी न पूर्णत्व तरंग साहे ॥२८२॥
तें सर्वकाळीं सुख सर्व ठायीं तो एक नारायण शेषशायीसुखांशलेशें विषयीं जरी तो तेथें अपूर्ण त्वचि दाखवी तो ॥२८३॥
एवं प्रपंच लटिका अतिदुःखस्वरुपीआनंद केवळ अनन्य हरिस्वरुपींत्याच्या सुखेंचि विषयीं सुख हें विधाताश्लोकांत भाव वदला स्तवितां अनंता ॥२८४॥
सुखस्वरुपें हरि वर्णियेला तथापिही शंकित चित्त झालाकीं ज्यामधें हें जग दुःख रुपीं हें द्वैत तों बाधक त्या स्वरुपीं ॥२८५॥
त्दृदयिं शंकित होउनियां विधी मृगजळांत म्हणे रविचे कधींकिरण हे बुडती जरि ते धवां अनृत - दुःखहि बाधक माधवा ॥२८६॥
जें सत्य तें सत्य असत्य नाहीं न विश्व आहे हरि माजि कांहींया कारणें अद्वय तूं अनंता म्हणूनियां वर्णितसे विधाता ॥२८७॥
मिथ्या प्रपंच हरि एकचि सत्य सर्वीहें चिज्जडैक्य कथिलें विधिनेंच पूर्वीश्लोकांत या सकळ जीव चिदैक्य आलेंहें सर्व अद्वयपदें स्फुट सूचवीलें ॥२८८॥
नसे द्वैत जेथें नसे त्रास तेथें विधाता असा दावितो भास येथेंअसीं लक्षणें रत्नसंख्या हरीचीं स्तुतीमाजि या बोलियेला विरेंची ॥२८९॥
श्लोकांत या भारतिच्या पतीनें निरुपिलें तत्व असे रितीनेंहीं लक्षणें केवळ निर्गुणाचीं साशंक यालागिं मनीं विरंची ॥२९०॥
सगुण सुंदर निर्गुण हा कसा कमळ संभव शंकित तो असाविमळ ईश - उपाधि मनीं स्फुरे सगुण निर्गुण भेद न तो उरे ॥२९१॥
ब्रम्हीं उपाधि करितां सगुणत्व आलेंसाकार रुप मग त्या करितांचि झालेंत्याला स्वयें अगुण हेचि सदां प्रतीतीतेव्हां कसे सगुण - निर्गुण - भेद होती ॥२९२॥
त्दृदयिं येरिति भारतिचा पती धरुनि भाव असा स्वपित्याप्रतीअमृत आणिक मुक्त - उपाधि तो म्हणुनि मूळ पदद्वय बोलतो ॥२९३॥
अमृत म्हणति मोक्षा तोचि तूं अंबुजाक्षासगुण - अगुण - लक्षा येसि जो भक्तपक्षाश्रवण - मनन - साक्षात्कार ज्या ज्ञानदीक्षातव तनु करि शिक्षा कीं जगीं धर्मरक्षा ॥२९४॥
जो उपाधि तुजला सगुणत्वीं नित्यमुक्तचि तया शुभसत्वींनिर्गुणीं सहज नित्य समाधी ज्यास जो हरि तुझा सदुपाधी ॥२९५॥
अगुणताच अखंड पणीं स्फुरे सगुणता मग केविं दुजी उरेअमृत आणिक मुक्त उपाधि तो द्विपदभाव असा विधि दावितो ॥२९६॥
श्रुति मणि - गण - मेळा श्रुद्ध - बुद्धींत गोळाकरुनि रचुनि माळा लक्षणें जींत सोळासजळ - जलद - नीळा अर्पुनी विश्वपाळाचरण धरुनि भाळा वंदितों त्या कृपाला ॥२९७॥
श्लोकामधें पूर्विलिया अनंता जीं लक्षणें बोलियेला विधातातद्वोध कोणेरिति होय संतां प्रकार तो वर्णिल येथ आतां ॥२९८॥
अनन्यें तुझीं लक्षणें हीं मुरारी तुतें जाणती शांत ऐशा प्रकारींपरी स्वात्मतेनें अशेपात्म भावें न भेदें जना वाटतो जो स्वभावें ॥२९९॥
प्रतिशरीरिं तुझीं प्रतिबिंबकें स्वतनुमात्रचितीं अवलंबकेंम्हणुनि जे सकळात्मक आत्मता हरि तुझी तिस जाणति तत्वता ॥३००॥
सर्वात्मबोध गुरु वांचुनि हा कळेनाब्रम्हात्मता गुरुकृपेविण आकळेनातूं श्रीगुरु प्रकटसी रविरुप जेव्हांअज्ञानरुप तम होइल दूर तेव्हां ॥३०१॥
गुरुवर रविरुपें भेटसी ज्यांस जेव्हांनिज - उपनिषदार्था दृष्टि देसील तेव्हांतव - किरण समूहीं मृत्यु संसार - सिंधूमृगजळ मग होतो तूं असा दीनबंधू ॥३०२॥
उमजलें गुरु तत्वचि जेधवां अनृत हा भव - सागर तेधवांउदक - भासक भानु कळे जयीं उदकतें तरणें नलगें तयीं ॥३०३॥
तरणि भेटलिया किरणीं जळें उतरणें तरणें नलगे बळेंगुरु - रवी निज - दृष्टिस भेठि दे मग मृषा न तृषा जळसृष्टि दे ॥३०४॥
जरि मृषा - उदकीं न तृषा जना गुरुकृपेस्तव नासति वासनाजितचि मुक्त विरक्त असे सुधी नतरतां तरले अनृतां बुधी ॥३०५॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
माया
— भासमान करणारी शक्ती
तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
सकळ
— सर्व
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
तुज
— तुला
तैसें
— तसे
घडे
— घडते, शक्य होते
जैसें
— जसे
मातें
— मला
ठायीं
— ठिकाणी
एवं
— अशा प्रकारे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.