म्हणुनियां वदतो विधि येस्थळीं लटकिया भव - सागरिंच्या जळींतरलियाचपरी तरती तयीं गुरु दिवाकर लोचन दे जयीं ॥३०६॥
बळखती जरि आपलि आत्मता तरति तेचि भवां बुधि अच्युताअनृतसिंधुहि ते तरल्यापरी नतरतां तरती जन हे हरी ॥३०७॥
श्लोकांत हें पहिलिया वदला विधाताश्लोकद्वयें करुनि साधिल हेंचि आतांज्ञानेंचि कां तरति यासि निमित्त येथेंआधीं वदेल मननार्थ अपूर्व जेथें ॥३०८॥
जे आत्मतेकरुनि नेणति आपणालात्यांला प्रपंच जड त्याकरितांच झालातें आत्मतत्त्व कळतां मग विश्व कैसेंरज्जूंत जन्म मरणें भुजगासि जैसें ॥३०९॥
श्लोकार्थ हाचि परि भाव बरा पहातांजो यांत तोविनविजेल विचार संतांकीं दोर जो नकळतांचि भुजंग होतोतो जाणतां अनृत - सर्प नसोनि जातो ॥३१०॥
रज्जूंत सर्प दिसतो परि रज्जु दृष्टीआधीं दिसे तरि दिसे वरि सर्प - सृष्टीमिथ्या भुजंग परि झांकुनि सत्य दोरीदोरी करुनिच दिसे लटिका विकारी ॥३११॥
आत्माचि रज्जु जड देह भुजंगरुपेंपाहे अहंमति धरुनि निजस्वरुपेंआत्म प्रतीति पहिली मन देह पाहेनेणोनि देह निजरुपचि मानिताहे ॥३१२॥
मिथ्याच देह परि झांकुनि आत्मयालादृष्टीस दृश्यहि तया करितांचि झालातैसाचि देह सचराचर विश्व तैसेंयाला दिसे अनृत सर्प शरीर जैसें ॥३१३॥
रज्जूस नेणति तयां भय कंप देहींमिथ्या - भुजंग करि जाणति त्यांस नाहींआत्माचि नेणति निजात्मपणें तयांतेंसंसार दुःख भव बंधन रुप होतें ॥३१४॥
रज्जूच सर्प दिसतो परि सर्प नाहींजाणे असें तरि तयां भय तें न कांहींते जीत - मुक्त जन येरिति सर्व सृष्टीब्रम्हीं नसोनि अवलोकिति ब्रम्ह - दृष्टीं ॥३१५॥
आत्मा असा नकळतां भवबंध झालाआत्माच ज्यांस कळला मग मोक्ष त्यांलाज्ञानाविणें इतर मुक्तिस मार्ग कांहींवेदस्मृती म्हणति याकरितांच नाहीं ॥३१६॥
मी देह येरिति जडात्मपणांत आत्मातोचि स्फुरे परि न हा निज - बोध - वर्त्मासर्पाकृती करुनि दोरचि दृश्य हो तोदेखोनि नेणति तयां भय कंप होतो ॥३१७॥
श्लोकांत याचि म्हणऊनि विरंचि युक्तीकीं आत्मतेकरुनियां कळतांच मुक्तीआत्मज्ञतेंकरुनि जाणति मोक्ष त्यांलाश्लोकांत त्या पहिलियांतहि बोलियेला ॥३१८॥
सिद्धांत युक्तिबळ देउनि सिद्ध केलाते आत्मतेकरुनियांच जनास मुक्तीश्लोकांतही पहिलियांत विरंचिउक्ती ॥३१९॥
भय समुद्रहि हा लटिका तयां कळलि शुद्ध - चिदात्मकता जयांतरलि याचपरी अनृतां बुधी तरति ते नतरोनि म्हणे विधी ॥३२०॥
असें पूर्वपद्योत जें बोलियेला तया बाध येऊनियां प्राप्त झालामृषा बंध तेव्हां मृषा मोक्षहीतो मृषा मानितां नित्यता भंग होतो ॥३२१॥
असत्यत्व बंधास तैसेंचि मोक्षा असें स्थापुनी वारितो पूर्वपक्षापुढें श्लोक बोलेल तेथेंचि ऐसें पहा बोलतो भारती कांत कैसें ॥३२२॥
मोक्ष स्वरुप तरि केवळ तत्व त्यालामिथ्या म्हणाल तरि मोक्ष अनित्य बोलाशंका असी परि तिचा परिहार आतांश्लोकांत या करिल केविं पहा विधाता ॥३२३॥
मायाच बंध तरि नाशक मोक्ष त्याचामायाच जो म्हणति तो म्हणवे न साचासत्य स्वयें सहज तें उभय प्रकाशीसर्प - प्रकाशकर रज्जु न सर्प नाशी ॥३२४॥
बिंबरुपिणि जसीच अविद्या मोक्ष रुपिणिहि येरिति विद्याबंधकारक अनित्य उपाधी मोक्ष नित्य जगदीश - समाधी ॥३२५॥
नित्यमुक्त जगदीश - उपाधी मोक्षजी बहि तयास्तव साधीतो असत्य परि नित्य अनादी येरिती विशद बोलति वेदीं ॥३२६॥
बंध मोक्ष उभय प्रतिबिंबी तें असत्य दिसतें निजबिंबींत्यांत बंधचि अनित्य अविद्या मोक्ष नित्य परमेश्वर विद्या ॥३२७॥
मृषा बंधही मोक्षही हे तथापी फळ प्राप्ति देहींचिही जीवरुपींसुखें आणि दुःखें जसीं हीं असत्यें तथापि प्रतीतीस येती अगत्यें ॥३२८॥
ही प्रतीति नचुके प्रतिबिंबी ऐक्य त्यासहि जया निजबिंबींहे असत्यपण त्यांतचि साहे तेंचि पद्मभव बोलत आहे ॥३२९॥
जया बंधही मुक्तिही त्याच अज्ञा म्हणूनीच दोंहींस अज्ञान संज्ञाजरी आत्मबोधाविणें बंध झाला तया नाशतां मोक्ष तो बोलियेला ॥३३०॥
मायाच बंध करणार जसी अविद्यामायाच मोक्ष करणार अनादि विद्याहे बंध मोक्ष म्हणऊनि न वस्तु कांहींरज्जूंत सर्प म्हणणें परि सर्प नाहीं ॥३३१॥
रज्जूंत सर्प नव्हताचि कधीं जयातेंरुपाविणें भुजगनामचि मात्र होतेंमिथ्याच उद्भवहि नाशहि त्यास जैसामिथ्याच बंध तरि मोक्ष मृषाचि तैसा ॥३३२॥
बंध मोक्षहि तसेच म्हणुनी नाम मात्रणि म्हणे विधि दोनीनाममात्रचि न वास्तव कांहीं बंध मोक्ष पण आणिक नाहीं ॥३३३॥
हें खरें परि मृषापण यांचें त्यास कीं समजलें निज साचेंरज्जु जाणति असत्य तयांला सर्प - उद्भव - विनाशहि झाला ॥३३४॥
यालागिं बोले विधि येस्थळीं कीं जाणेल तो आत्मपणास जो कींसत्यज्ञभावास्तव त्यासि पाहे असत्यता या उभयांस साहे ॥३३५॥
निजात्म सत्यत्व कळे जयाला सत्यज्ञ संज्ञा म्हणती तयालाजो मुक्त होऊनि जितो तथापी देखे मृषा मोक्षहि त्या स्वरुपीं ॥३३६॥
ऋतज्ञभावास्तव बंध मोक्षा मिथ्यात्व ऐसें सरसीरुहाक्षाम्हणूनि जो बोलियला विरंची भावार्थटीका इतुकीच त्याची ॥३३७॥
ऐसें वदोनिहि विरंचि सशंक झालाकीं जो ऋतज्ञ जन जीतचि मुक्ति त्यालातो मोक्ष मागुनि असत्य कसा म्हणावाऐसा तरी अनृतसत्यपणें न घ्यावा ॥३३८॥
ते बंध मोक्ष विधि तों प्रतिबिंबरुपींदेखे तदैक्य - निज - बिंब सुखस्वरुपींबिंबांत त्यांत तरि मोक्ष न बंध कांहींयालागिं मोक्ष - अनृतत्व विरुद्ध नाहीं ॥३३९॥
आणीक एक सुचली विधिलाची युक्तीकीं बिंब एकपण तें प्रतिबिंब मुक्तीजो नित्यमुक्त जगदीश उपाधिबिंबींत्याणेंचि जीव निज - बिंब सुखाऽवलंबी ॥३४०॥
तो ही उपाधि लटिकाचि जरी अनादीमायीकमात्र वदती श्रुति हेंचि वेदींमुक्तांचि बिंबपण त्याकरितांचि मुक्तीते ही असत्य तरि या न विरुद्ध उक्ती ॥३४१॥
यालागिं आतां विधि उत्तरार्धे श्लोकांत याही हरितो विरुद्धेंकीं बिंब तूं त्यांतहि अंबुजाक्षा प्रतीति बंधा न तसीच मोक्षा ॥३४२॥
ब्रम्हा म्हणे तव - अखंड - चिदात्मकत्वींतूझ्या स्वकेवळपणांत अनंतकत्वींहे बंध मोक्ष न कदापि विचाररीतींसूर्यात जेविं नसती दिन आणि राती ॥३४३॥
चैतन्य खंडित दिसे प्रतिबिंबरुपींत्याचें अखंडपण बिंब - निज - स्वरुपींजेथें प्रतीति न कदापिहि बंध मोक्षातेथेंचि हे नसति यास्तव अंबुजाक्षा ॥३४४॥
जीवासि मायिकपणें जरि बंध - मोक्षादेती प्रतीति सहसा सरसीरुहाक्षाबंध प्रतीति तरि बिंबपणांत नाहींमोक्ष प्रतीति म्हणऊनि तुतें न कांहीं ॥३४५॥
जो नित्यमुक्त तव बिंबपणीं उपाधीज्याला अखंड - अगुणीं स्वसुखीं समाधीहा जीवबंध अवलोकुनि नित्य मुक्तीत्यालागिं बोलति तथापि वृथाच उक्ती ॥३४६॥
नसे रोग आरोग्य कैसें तयाला उगा नित्य आरोग्य हा बोल केलाअसें नित्यमुक्तत्व तूझें मुकुंदा श्रुती वर्णिती लक्षुनी जीववृंदा ॥३४७॥
बंध सोक्षहि न निर्गुण तत्त्वीं येरितीच नसती सगुणत्वींनिर्गुणत्व सगुणत्वहि बिंबीं बंध मोक्ष घडती प्रतिबिंबीं ॥३४८॥
हे बंध मोक्ष लटिकेचि तथापि होतीजीवास ज्यास्तव अवश्य घडे प्रतीतीबिंबींच हे नसति यास्तव अंबुजाक्षातूं बिंब हेतु सकळांसहि बंध मोक्षा ॥३४९॥
सूर्यामधें दिवस आणिक रात्र नाहींत्यावीण मागुति नव्हे दिनराति कांहींबुद्धीस बिंब नकळोनिचि बद्ध झालाबुद्धीस बिंब कळलें तरि मोक्ष आला ॥३५०॥
सूर्यास आणि जगदृष्टिस आड जेव्हांहोयील अस्तगिरि रात्रि जनासि तेव्हांतो लोक दृष्टि उदयाद्रिवरी प्रकाशीतेव्हां जनास गमतो दिन सर्व देशीं ॥३५१॥
करी असा जो दिन रात्रि नेत्रीं नित्यामधें तो दिन आणि रात्रीजीवासि अस्ताचळ हे अविद्या ब्रम्हार्क बोधीं उदयाद्रि विद्या ॥३५२॥
ब्रम्हा म्हणे हरि असी न विचार दृष्टीज्यांलागिं ते मृगजळार्थ तृषार्त्त कष्टीयालागिं तूं गुरु दिवाकर दृष्टि ज्यांलादेशी मृषा - जळधि कां बुडवील त्यांला ॥३५३॥
मृषा जसा बंध तसीच मुक्ती हे सिद्ध केली विधिनें स्वयुक्तीकीं सूर्यबिंबीं दिनराति नाहीं बिंबीं तसा बंध न मोक्ष कांहीं ॥३५४॥
बिंबी मिळे हें प्रतिबिंब जेव्हां तेथें तया बंध न मोक्ष तेव्हांजो बंध हा मोक्षहि तो अलीकडे तें बंध मोक्षाहुनिही पलीकडे ॥३५५॥
बिंबामधें बंध असेच जेव्हां बिंबामधें मुक्तिहि नित्य तेव्हांउपाधि जो कां परमेश्वराचा तो नित्य हें बोलति वेदवाचा ॥३५६॥
बंध मोक्ष लटिके जरि तेथें पूर्वपक्ष उठला तरि येथेंश्लोक चारिवरि तो कथिजेतो पूर्वपक्ष मग खंडित होतो ॥३५७॥
बुद्धि जेच पहिली प्रतिबिंबीं तीकरुनिच तदैक्यहि बिंबींजीत मुक्त जन देखति जेव्हां बंध मोक्ष तिस ठाउक तेव्हां ॥३५८॥
प्रतीति बिंबांतहि त्या प्रकारें बंधास मोक्षासहि या विचारेंजे बुद्धिनें तीसहि नाश आहे प्रारब्ध याचें सरतां न राहे ॥३५९॥
जरी ईश्वरोपाधिनें मुक्ति याला तरी बुद्धि याची असे तेथ बोलाजितां मुक्ति ते बुद्धियोगेंचि जेव्हां अनित्यत्व मुक्तीस आलेंचि तेव्हां ॥३६०॥
या पूर्वपक्षाख्य तमासही तो श्री सूर्य - दृष्टांतचि येथ येतोबुद्धीस जेथें उभय - प्रतीती स्फुरोनि दोनी न विचाररीती ॥३६१॥
बंध दुःख मति जाणत होती मुक्ति ती करुनि मुक्त पहातीहें घडेच परि मोक्ष जयाला तो स्वबिंबसुख त्यांत मिळाला ॥३६२॥
बंध मोक्ष करिजे प्रतिबिंबीं बुद्धि तेच उरली मग बिंबींबंध मोक्ष तिस दोनि न तेथें दीसती अगुण केवळ जेथें ॥३६३॥
जाणें जरी ते मति बंध मोक्षा बिंबांत तो तीस तयेच लक्षाजो कां दिवारात्रिस जाणता हे तोही न सूर्यात तयांस पाहे ॥३६४॥
अरुण कश्यपनंदन सारथी सतत जो वसला रविच्या रथींदिवस - रात्रिस जाणतसे जरीं न रवि - मंडळिं देखतसे तरीं ॥३६५॥
बंध - मोक्ष दिसती प्रतिबिंबीं त्यास ऐक्य घडल्यावरि बिंबींमुक्त दोनिहि नदेखति तेथें जीतमुक्त जरि वर्तति येथें ॥३६६॥
कर्मभोग सरल्यावरि बुद्धी नाशल्या वरिल ईश उपाधीमुक्ति देउनिहि जो प्रतिबिंबा वर्ततोचि अवलंबुनि बिंबा ॥३६७॥
तो लयीं मिळतसे जरि बिंबीं सृष्टिकारण पुन्हा अवलंबीतो असत्य परि बिंब म्हणावा मोक्ष - नित्यपण येरिति भावा ॥३६८॥
बंध मोक्ष म्हणऊनि न बिंबीं ते कधीं नचुकती प्रतिबिंबींपक्ष संमत न हाच जयाला बंध मोक्ष म्हणवे न तयाला ॥३६९॥
बद्धता न म्हणती प्रतिबिंबा बंधमोक्ष घडती मग बिंबामुक्ति ज्यास भव बंधहि त्याला ब्रम्ह बद्ध कवणेपरि बोला ॥३७०॥
जडास तों मोक्ष कधीं घडेना बंधामधें ब्रम्हहि सांपडेनाया कारणें हें प्रतिबिंब घ्यावें तें बद्ध तें मुक्त असे म्हणावें ॥३७१॥
बंध - कारण जसीच अविद्या मोक्ष - कारण तसी निजविद्याकारणें अनृत दोनिहि जेव्हां बंध मोक्षहि असत्यहि तेव्हां ॥३७२॥
विद्या अविद्या जरि बिंबरुपीं हा बंधही मोक्षहि त्या स्वरुपींज्ञानें जरी बंध गळोनि गेला आत्मा असे मोक्ष जयासि झाला ॥३७३॥
गेली जरी ग्रंथि सुटोनि दोरी जो सूटला तो नवजाय दूरींजों मुक्त तों मुक्ति असेचि त्याची हें बोलतां मुक्ति तयासि साची ॥३७४॥
म्हणाल कीं ईश उपाधि आहे तो मुक्तिच्या मुक्तपणा नसाहेमुक्तीस मिथ्यात्वहि याप्रकारें म्हणाल हेंही जरि या विचारें ॥३७५॥
स्वरुपीं जया बोलतां हा उपाधी स्वरुपीं तया मानितां बंध आधींअहो चित्स्वरुपांत एकांत ऐसें वदा बंधही मोक्षही नित्य कैसे ॥३७६॥
हा नित्य - मुक्त रविरुप उपाधि जेथेंअज्ञानबंध तम अंधहि केविं तेथेंहोता असें प्रथम साधुनि मुक्ति त्यालाया नित्य - ईश्वर - उपाधि करुनि बोला ॥३७७॥
आतां अवस्थात्रय एकजीवा बद्धत्व मुक्तत्व असेंचि भावाम्हणाल ऐसें जरि झोंप जेव्हां प्रबोध नाहींच तसाच तेव्हां ॥३७८॥
जडा अवस्था परि त्या जयाला जडत्व हें तों वदवे न त्यालातिन्ही अवस्था जरि त्याचलागीं एके अवस्थेंत दुजी न भोगी ॥३७९॥
हा नित्यमुक्त सदुपाधि जया स्वरुपींतेथेंचि एकसमयीं भव बंध रुपींहोतो उपाधि म्हणतांचि विरुद्ध येतेंयालागिं बद्ध म्हणतां प्रतिबिंब होतें ॥३८०॥
हेंही असो प्रस्तुत एक येथें कीं सूर्य दृष्टांत असेल जेथेंतेथें नघेतां प्रतिबिंब - पक्षा श्लोकार्थ सिद्धांत नयेचि लक्षा ॥३८१॥
दिवस रात्रि असोनिहि भूतळीं दिसति तीं न जसीं रविमंडळींघडति बंधहि मोक्षचि जें जिवा दिसति ते मुजमाजि न माधवा ॥३८२॥
बंध मोक्ष दिसती प्रतिबिंबीं तेचि दीसति कदापि न बिंबींअर्थ अन्यरिति येथ घडेना संत त्दृत्पदकिं रत्न जडेना ॥३८३॥
जे विकल्प धरिती प्रतिबिंबीं त्यांस भोक्तृपण येईल बिंबींदुःख आणि सुख तों न जडाला कोण भोगित असे तरि बोला ॥३८४॥
मिथ्या म्हणाल तरि रज्जुंत सर्प नाहींद्रष्टा खरा म्हणुनियां भयकंप देहींश्रुक्तींतही रजतलाभ सुखास मानीमिथ्या प्रपंच परि भोग घडे निदानीं ॥३८५॥
श्लोकांत या तरि अहो प्रतिबिंब नाहींशंका अशी जरि धराल मनांत कांहींश्लोकांत याच म्हणतो विधि अंबुजाक्षातूझ्या अखंडितपणीं अनृतत्व मोक्षा ॥३८६॥
नसे खंड तूझ्या चिदात्म - स्वरुपीं नसे बंध ही मोक्ष ही त्याच रुपींविधाता असें बोलिला स्पष्ट जेव्हां नसे टाव त्या बंध मोक्षांसि तेव्हां ॥३८७॥
चैतन्य खंडित न हें प्रतिबिंब घ्यावेंबद्धत्व मुक्तपण ही कवणा म्हणावेंयाची प्रतीति नसतां तुजमाजि नाहींहें बोलणें उचित तों नदिसेच कांहीं ॥३८८॥
नसे तूजला त्रास बंध्या सुताचा असें बोलतां येरिती व्यर्थ वाचाम्हणूनीच जें खंड चैतन्य रुपीं म्हणे तें न तूझ्या अखंड - स्वरुपीं ॥३८९॥
या कारणें निगमही प्रतिबिंब बोलेदुःखें सुखें जड - उपाधिजळांत डोलेहे बंध मोक्ष हरि त्यास असे तथापीत्यालाचि दोनिहि तुझ्या न निज - स्वरुपीं ॥३९०॥
श्रुत्यर्थ कीं ज्योति - शरीर जैसा हा सूर्य नाना उदकांत तैसाक्षेत्रीं अनेंकीं जगदात्म देव स्वयें असा एक अनेक जीव ॥३९१॥
एवं प्रतीतिकर सर्प असत्य जेव्हांत्याचा अभाव वदवेल भल्यांस तेव्हांवंध्या सुतादिक अभाव कसा म्हणावाया कारणें निगम - संमत पक्ष घ्यावा ॥३९२॥
मिथ्यात्व ऐसे भवबंध - मोक्षा म्हणूनि बोले विधि अंबुजाक्षासर्वज्ञतेनें हरि वामनात्मा तदर्थ बोले निजबोधवर्त्मा ॥३९३॥
न तरतां तरले अनृतांबुधी म्हणुनिजें वदला पहिलें विधीअनृत बंधहि मोक्षहि येरिती म्हणुनि तो वदला स्वगुरुप्रती ॥३९४॥
जें वेदगर्भ वदला स्फुट हेंचि वेदींहे तों नमानिति कदापिहि भेदवादीधिःकारितो कमळ संभव त्यांस आतांत्याचें कधीं न मत संमत होय संतां ॥३९५॥
आत्माचि तूं तुजहि मानुनि भिन्न देवाभिन्नास आत्म पण मानुनि वासुदेवाबाहेरि धुंडिति असी जन - अज्ञता हेआश्वर्य हें विधि म्हणे हरिलागिं पाहें ॥३९६॥
श्लोकार्थ हा तों इतुकाचि येथें भावार्थ आहे अतिदिव्य जेथेंआत्मा गमे भिन्न कसा विकारें भिन्नास आत्मत्व कशा प्रकारें ॥३९७॥
हरी तोचि हे अर्थ भावार्थ आतां स्वयें वर्णीतो जेथ आनंद संतांनिजात्मा न तो भिन्न वाटे कदापी प्रतीतीस भिन्नत्व येना स्वरुपीं ॥३९८॥
मूढां जरीं कवण आपण हें कळेनाभिन्नत्व आत्मगत त्यांसहि सांपडेनाआत्माच तूं तुजहि मानिति भिन्न ऐसेंहें वाक्य ये अनुभवाप्रति येथ कैसें ॥३९९॥
आत्माच तंतु पट त्यांत शरीर झालेंभिन्नत्व आत्मगत येरितिनेंच आलेंआत्माच तो इतर येरिति मानियेलाजे ज्ञानहीन तिहिं हे विधि बोलियेला ॥४००॥
विधाता म्हणे तूंचि देहादिरुपीं पटीं तंतु जैसा जडीं चित्स्वरुपींदिसेना असेना विना तंतु जैसा पटाकार आत्म्याविणें देह तैसा ॥४०१॥
तंतूस त्या विसरतां पट सत्य ज्यांलाआत्मा नजाणति खरा जड देह त्यांलानाहींच जो पट तयासि खरें म्हणावेंसत्यास तंतुस पटाकृतिनें पहावें ॥४०२॥
तंतूमधें पट दिसे परि तो परावादावी नसोनि नयनीं पटरुप - भावातंतूचि तो पट तरी लटिक्या विकारेंभासे तयास इतरत्वहि या विचारें ॥४०३॥
आत्माचि तूं हरि तथापि शरीरभावेंअज्ञा जनासि दिससी जड तें परावेंजे आत्मयास इतरत्व - जडत्व - रीतीमानूनि वर्तति वृथा क्षितिभार होती ॥४०४॥
या एक अज्ञ - जन - अज्ञपणासि धातासांगे असें नवल मानुनियां अनंतात्याची असी रचियली हरिनेंच टीकाश्रोत्यांस येरिति - इथें उपजेल शंका ॥४०५॥
कीं हा चिदात्मा तरि तंतुरुपीं शरीर मिथ्या पटवत् तथापीतंतूस तों तंतु दुजा न वाटे मेल्या शरीरास न जीव भेटे ॥४०६॥
आत्मा जयीं टाकुनि देह जातो तंतूच गेल्या पट कां रहातोत्द्या पूर्वपक्षा परिहार तेव्हां कळेल बिंबप्रतिबिंब जेव्हां ॥४०७॥
विचार हा तों बहुवार येथें झाला असे हा परिहार तेथेंटाकुनि जाणें प्रतिबिंब जीवा जडामधें वास्तव वासुदेवा ॥४०८॥
ज्या चित्प्रकाशें मृत - देह दृष्टी दिसेल तो रज्जु भुजंग सृष्टीहें तथ्य कीं वस्त्र दिसे तथापी न भिन्नता तंतुस तंतुरुपीं ॥४०९॥
पटासि टाकूनि न तंतु जातो हा अर्थ बिंबांतचि सिद्ध होतोटाकूनि जातो प्रतिबिंबरुपी बिंबीं न भिन्नत्व तया तथापी ॥४१०॥
बिंबात्मया सगुण निर्गुण दोनि रुपेंमायेकरुनि जगदाकृति चित्स्वरुपेंजीवांस त्यांतचि दिसे जरि विश्व नानाबिंबीं प्रतीति दुसरी अणुही दिसेना ॥४११॥
देहादि भेद गमती प्रतिबिंब - रुपींअज्ञान त्यास निज - बिंब सुख - स्वरुपींबिंबीं घडे तरि सुषुप्तिस ऐक्य त्यालातो भिन्न केंवि म्हणवेल चिदंश बोला ॥४१२॥
तद्रूप होउनि सुषुप्ति - सुखावलंबींभिन्नत्व - सांप्रतहि न प्रतिबिंबबिंबींदेहादिरुप निज बिंबचि भासताहेआत्मज्ञतेविण असे रितिनें नपाहे ॥४१३॥
या कारणें नवल मानुनियां विरंचीमाया असी म्हणुनि वर्णितसे हरीचीवेदांत शास्त्रहि पढोनि असाच वेदींतत्वार्थ मानिति तयास न भेदवादी ॥४१४॥
जे कां नजाणति कधीं निगमाऽगमातेंतेथें नधिःकरण केवळ त्यांस होतेंआश्वर्य वस्तु नदिसे जरि डोळसालाअंधा दिसे न तरि विस्मय काय बोला ॥४१५॥
श्लोकांत यांतचि वदेल असें विरिंचीकीं बात्द्य धुंडिति गती तुज आत्मयाचीबाहेर धुंडिति जरीं परमात्मयालाशास्त्रज्ञ ते नव्हति केविं म्हणाल बोला ॥४१६॥
आतां म्हणाल भजती प्रतिमादिरुपीबाहेरि धुंडिति हरीस असे तथापीते शास्त्र नेणति तयांस असें विधाताबोले म्हणाल तरि तद्रुरु शास्त्रवेत्ता ॥४१७॥
द्वैतेंच जो भजन शिष्यगणास सांगेशिष्यांस भेद भजन प्रतिमेंत लागेशिष्यांस शास्त्र नकळे कितिएक तेहीतैसेचि वर्तति अनन्य विचार नाहीं ॥४१८॥
अद्वैत वेद पथ केवळ तो निषेधीशिष्यांसि भेदचि खरा म्हणऊनि बोधीत्याला जडाऽजड - विवेक - मुखें चिदात्माविश्वप्रकाश नकळे श्रुतिसिद्धवर्त्मा ॥४१९॥
अद्वैत भायें प्रतिमादि कांहीं जेपूजिती त्यांस पश्रुत्व नाहींदाटूनि जो दैवत अन्य पाहे पश्रुत्व त्याला श्रुति बोलता हे ॥४२०॥
श्रुत्यर्थ या पहिलिया चरणांत येथेंझाला असे स्फूट विचार समग्र तेथेंसिद्धांत - भेद अवलंबुनि भेदवादीकोणेरिती तरि भजो पशु तोचि वेदीं ॥४२१॥
प्रवर्तची दुर्मत बोल त्याला धिःकार हा त्यासचि बोलियेलाहें धुंडणें वात्द्यहि जें स्वभावें या श्लोकटीकेंत पुढें पहावें ॥४२२॥
येथें वदे विधि अभिज्ञहि शास्त्र - वेदींजे दुर्मतें रचिति केवळ - भेदवादीते यास रज्जुशरिरींच भुजंग देवाजे मानिती नवल हें बहु वासुदेवा ॥४२३॥
आणीक अज्ञ - जन - अज्ञपणास धातावर्णूनियां नवल सांगतसे अनंताकीं आत्म यास तुज मानुनि अन्यभावेंजें अन्य तें मिरविती स्वचि दात्मनावें ॥४२४॥
कीं बिंब एक दुसरें प्रतिबिंब देवाहे आत्मता द्विविधनात्रचि वासुदेवाबिंबात्मता जसि शरीरपणें पहातीजीवात्मता असिच मानुनि अन्यरीती ॥४२५॥
कीं अन्यता धरुनि त्यासचि वासुदेवाआत्माचि केवळचि हा म्हणताति देवातो अन्य तो कवण आणिक तोचि कैसाआत्मा म्हणूनि म्हणताति विचार ऐसा ॥४२६॥
देहात्मता सकळ मानुनि हें प्रसिद्धब्रम्हा म्हणे जरि असें तरि हें विरुद्धदेहात्मता तरि न मानिति भेदवादीदेहाभिमान दृढ यद्यपिही अनादी ॥४२७॥
चार्वाक आणि जन केवळ मूढ त्यांचीनिंदा म्हणाल करितो जरिही विरिंचीहे आंत बात्द्यहि न धुंडिति आत्मयालाबाहेर धुंडिति तुतें म्हणवे न त्यांला ॥४२८॥
बाहेर धुंडिति तुतें परमात्मयासीदेहात्मता वदति तन्मत कार कैसीआत्मा परास म्हणती कचण्या प्रकारींहें गुत्द्य वामन - मुखें वदता मुरारी ॥४२९॥
नानामतीं वदति भेदचि भेदवादीअद्वैत दुषुनिहि जे परनिष्ठ भेटींजीवात्मता वदति सर्व अहंप्रतीतीतें अन्य मीपण तदात्मक मूढ होती ॥४३०॥
देहेंद्रियादिगुण टाकुनि वेगळेंहीजें मीपणस्फुरण वाटतसे स्वदेहींआत्मा तया म्हणति नेणति तत्त्वरीतीकीं मीपणें त्रिविध हें त्रिगुणेंचि होती ॥४३१॥
मी देह तामस अहंपण हें शरीरींमी इंद्रियें म्हणुनि हेंचि रजो विकारींया दोंविणें स्फुरण सात्विक - मीपणाचेंआत्मत्व केवळ तयास घडेल कैंचें ॥४३२॥
त्याही पुढें बुद्धि नियेपुढेंही जें चित्त आत्मत्व तयास नाहींया मीपणा ते थहि ठाव कैंचा जें वर्णिता लाजति वेदवाचा ॥४३३॥
जीवत्व ही गुरुकृपेविण हें कळेनाया मीपणें तरि कदापिहि आकळेनावार्त्ता सुषुप्तिसमयीं न असे जयाचीश्रुद्धात्मतेंत गणना करिती तयाची ॥४३४॥
अद्वैत मानुनिहि मानिति हाचि आत्माकोणी तयांसहि न ठाउक तत्त्ववर्त्मायाचा विचार बरवेरिति कर्मतत्त्वींतो पाहणें विशद वाचुनि शुद्धसत्त्वीं ॥४३५॥
अहंप्रत्यया मानिती शुद्ध आत्मासुषुप्तींत ज्याचा नसे लेश वर्त्माअनात्मा परावा अहंकार त्यासीअहो आत्मता मानिती अज्ञ कैसी ॥४३६॥
बिंबात्मयातें तुज देहरुपें अहंपणालागिं निजस्वरुपेंअहो हरी मानिति अज्ञ कैसे म्हणूनि बोले विधि येथ ऐसें ॥४३७॥
बिंबात्मत हरि तुझी प्रतिबिंबताहीजे नेणती पढत - मूढ जनांत तेहीआत्मा कसा म्हणुनि मागुति तेचि देवाबाहेर धुंडिति म्हणे तुज वासुदेवा ॥४३८॥
मायामयें हरि तुझीं बहु चित्र रुपेंमत्स्यादिकें म्हणति हेंचि निजस्वरुपेंप्रत्यक्ष जें दिसत गोचर इंद्रियांसीतें वाटतें तव अतींद्रिय तत्त्व त्यांसी ॥४३९॥
दिसे बात्द्य दृष्टीस तें तत्त्व कैसें असे धुंडणें नेणणें बात्द्य ऐसेंजरी अंतरीं बोलती ध्यानरीती तरी तत्त्व साकार ऐसें पहाती ॥४४०॥
रचियलें मत शास्त्र असे रिती पढति तत्वहि तेंचि विचारीतीहुडकिती हरि बात्द्यहि तूजला धरुनि भाव असा विधि बोलिला ॥४४१॥
अहो बात्द्यही धुंडिती आत्मयाला म्हणूनी असें जें विधी बोलियेलान तीर्थादि मूर्त्यादि पूजादि भावें कसा तो असा शास्त्र दृष्टीं पहावें ॥४४२॥
हा आत्मशब्द कथिला जगदीश - भावेंद्वैतेंचि धुंडिति असेंचि जरी म्हणावेंतोही कसा म्हणुनि धुंडिति शास्त्ररीतीतीर्थादिकें सुकृत - कारक मात्र होती ॥४४३॥
तीर्थे - व्रतेंकरुनि होइल चित्त शुद्धीशास्त्रेंकरुनि तदनंतर सत्वसिद्धीसत्संप्रदाय तरि हा जरि भेदवादीतेही परात्मपण धुंडिति शास्त्र - वेदीं ॥४४४॥
असे तत्त्व तें केविं सर्वेश्वराचें विचारीं असें धुंडणें नाम याचेंघडेना कधीं धुंडणें अन्य रीती तरी भेद मानूनि जिज्ञासु होती ॥४४५॥
जिज्ञासेविण धुंडणेंचि न घडे ते तत्त्व - जिज्ञासुताज्याला तो गुरु शास्त्र टाकुनि कसा धुंडी न हें तत्वतासच्छास्त्रें निज आत्मता हुडकिती दुःसंगतीनें वृथाजें दृग्गोचर रुप तत्त्व म्हणती येथें तयाची कथा ॥४४६॥
बाहेर धुंडिति बहिर्मुखता तयांचीजे अज्ञरीती बदला अवघी विरिंचीजे धुंडिती निगममार्ग धरुनि आतांते रीती आणि विधि वर्णिल त्यांच संतां ॥४४७॥
देहींच संत तुज धुंडिति हे अनंताजें अन्यथा त्यजिति त्या जड - अंतबंतामिथ्या निषेधुनि भुजंग चिदात्म - दोरीजे कां खरी तिसचि पाहति कीं मुरारी ॥४४८॥
असा येथें झाला चरण दुसरा या त्रिचरणींत्रिपादें जो मोजी धरणि हरि त्याचीच करणीदिसे मूळ श्लोकीं बहुतचि खुजा वामनपणेंस्वयें टीकारुपें करुनि भरिलें विश्व निपुणें ॥४४९॥
श्रीभद्भागवतीं विचित्र - दशम - स्कंधीं विरिंची स्तुतीतेथें हा चरण द्वितीय चरणद्वंद्दीं हरीच्या श्रुतीरत्नें मस्तकिंचीं चतुर्मुख - मुखें अर्पूनि भूमंडळींश्रोत्यांच्या श्रुति - भूषणीं मिरवती निर्माल्य ती कुडलीं ॥४५०॥
ब्रम्ही द्वैत - विचार जो उपनिषद्भागीं श्रुती बोलतीतीं वाक्यें श्रुतिचीं शिरें मणिगणीं श्रुत्यर्थ जे साधितीतें कृष्णासि निवेदिलें विधिमुखें वेदीं धरामंडळींश्रोत्यांच्या श्रुति भूषणें मिरवती रत्नें जसीं कुंडलीं ॥४५१॥
पृथ्वी आक्रमिली पदें करुनियां एक्या स्वभावें क्षितीत्याचें केवळ पादपद्म म्हणती पायें दुज्या श्रीपतीगंगा आणुनि जेविं उद्धरि जना ब्रम्हांडही भेदुनीतैसी या चरणीं दुज्या मिरवती हे ज्ञान - मंदाकिनी ॥४५२॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.