प्रथम चरण येथें वर्णिला भक्ति योगेंतटुपरि दुसरा जो ज्ञान - कांड - प्रसंगेंपुनरपि चरणीं या भक्ति गोविंदजीचीकथिन सरि नपाचे मुक्ति कैवल्य जीची ॥१॥
नित्यानित्य - विचार सार करितां वैराग्य चित्तीं धरीतो जिज्ञासु मुमुक्षु विष्णुचरणीं सप्रेम सेवा करीज्ञानें अद्वय भक्ति त्यास कळतां ती गोड मुक्तीहुनीजीवन्मुक्त मुकुंद - भक्ति करितो सर्वात्मभावें मनीं ॥२॥
स्कंध जो प्रथम भागवती या श्लोक तेथिल असाच पहायामुक्तही करिति माधवजीची भक्ति मुक्ति नकरी सरिजीची ॥३॥
जो सर्वत्र जगत्प्रकाशक जगीं तंतूच जैसा पटींकीं कालत्रयिं आत बाहिर दिसे मातीच नानाघटींआत्मा येरिति पाहती रमति जे त्यामाजि ऐसी स्थितीआत्माराम म्हणूनि संस्कृतपदें ऐशांसि वाखाणिती ॥४॥
आत्माराम असे शुकादिक मुनीं ज्यांचे अविद्यामयग्रंथी सर्वहि सूटले जितचि जे ब्रम्ह स्वयें अद्वयभति श्रीपतिची उगीच करिती तेही निमित्ताविणकीं मुक्तीहुनि गोड केवळ असे श्रीमाधवाचे गुण ॥५॥
येरिती सगुण सुंदर भक्ती मुक्त ही करिति साधुनि मुक्तीआदि अंतिं हरिभक्तिच संतां हेंचि वर्णित असे विधि आता ॥६॥
ज्ञान - हेतु हरि भक्तिच आधीं ज्ञानियांसि तरि तेचि समाधीज्ञानसिद्ध सकळात्मक भक्ती प्रीति आत्मगत अन्य - विरक्ती ॥७॥
असा भाव दाऊनि आद्यंत - भागीं वदे भक्तियोगा विधी आदियोगीमधें ज्ञानकाडें स्तुती श्रीहरीची करुनी पुन्हा भक्ति वर्णी विरिंची ॥८॥
असंतीं कसा धुंडिला आणि संतीं चिदात्मा असा ज्ञानकांडीं तदंतींविधी बोलिला येस्थळीं केवळात्मा कळे वर्णिला तो अनायास - वर्त्मा ॥९॥
जड शरीर - विलक्षण आत्मता सुगम ती गमती परि तत्त्वताहरि तुझ्याच कृपे करितां फळे हुडकितां न कदापिहि आकळे ॥१०॥
तरिच बोध रमापति - भक्तिनें म्हणति केवळ वेद न युक्तिनेंम्हणुनि तूं करुणा करिसी जयीं म्हणतसे विधि तत्त्व कळे तयीं ॥११॥
सुगम गमत आहे बोध देवा तथापीअनुभव धरणें जो पूर्व - बिंब - स्वरुपींचरण - कमळ तूझें तत्प्रसादांश - लेशेंनघटित तदभावें धुंडितां सावकाशें ॥१२॥
श्लोकार्थ - संक्षेप असाच येथें भावार्थ आतां वदिजेल तेथेंआत्मज्ञता मानिति एक सोपी तत्वंपदार्थी प्रतिबिंबरुपी ॥१३॥
देहास जाणे प्रतिबिंब त्याला जाणूनियां मानिति बोध झालाशवासही भासवि तो कळेना जोकां प्रसादाविण आकळेना ॥१४॥
क्षेत्रा आत्मपणेंच जाणत असे क्षेत्रज्ञ जीवाख्य तोज्याला तत्वमसी म्हणूनि निगम त्वंशब्द हा योजितोतो तों चित्प्रतिबिंब जो अनुभवीं पाहे स्वबिंबात्मताबिंब श्रीभगवत्स्वरुप - महिमा श्लोकांत या तत्वता ॥१५॥
त्वंपदार्थ घडतो प्रतिबिंबीं तत्पदार्थ सकळात्मक - बिंबींतत्त्वबोध भगवन्महिमेचा त्वंपदा वदति या श्रुति - वाचा ॥१६॥
जो देशांतर - दृष्ट तोचि नर हा देशांत ही देखिलातें देश - द्वय टाकितां स्थळयुगी तो एकला देखिलाजे येणेरिति लक्षणा करिति ते कूटस्थ - सर्वेश्वराकूटस्थीं प्रतिबिंब आठउनियां कूटस्थ केला खरा ॥१७॥
जीवोपाधि शरीर कुंभ - न भवत् कूटस्थ - देहीं वसेजें ब्रम्हांड मठांत ईश्वरपणीं चिव्द्योम तें उल्लसेदोघां ऐक्य असे रिती सहज हें तें साधितां जीव हाकूटस्थीं प्रतिबिंब मेळउनियां त्या लक्षणें तो पहा ॥१८॥
कूटस्थीं प्रळयीं सुषुप्ति समयीं एकत्व तों नाकळेज्ञानें ऐक्य समाधिमाजि घडतें बुद्धीस तेव्हां कळेकूटस्थीं प्रतिबिंब मेळउनियां यालागिं वेदश्रुतीजें कां सिद्धचि ऐक्य तें असिपदें येणेरिती बोलती ॥१९॥
जीवोपाधिमधें अखंडचि जरी कूटस्थ हा निश्वयेंभोगातें प्रतिबिंब भोगित असे तो तों अभोक्ता स्वयेंत्याला बंध न मोक्ष ऐक्य सहजें तें साधिलें हें जरीज्याला बंध तयास तें अनुभवा एकत्व येना तरी ॥२०॥
आतां श्रीगुरु जी अनात्मजडता मिथ्या निषेधूनियांआत्मा - सर्व - निषेध - शेष उरवी आत्मत्व बोधोनियांतो तों आपण या प्रतीतिस दिसे भोक्तृत्व पूर्वी जयाप्रारब्धात्मक भोग येतिल पुढें तें भोगणेंही तया ॥२१॥
एवं येरिति आत्मता सुगम हे शिष्या गमे तत्त्वताते याची प्रतिबिंबता न कळली याला स्वबिंबैक्यताकूटस्थैक्य म्हणूनियां असिपदें एकत्व जें बोधिलेंश्रीगोविंद - दया - प्रसाद - निपुणें तें पाहिजे साधिलें ॥२२॥
बिंबात्मतेंत उपजे जड देह त्यालाआत्मा धरी त्यजिहि तो प्रतिबिंब बोलातो अन्य देह जड अन्य - जडास जेव्हांटाकूनि जाय जड भासक तो न तेव्हां ॥२३॥
टाकूनियां सर्प असत्य दोरी त्याचें अधिष्ठान नजाय दूरीभासे कसा सर्प न रज्जु जेथें शवांत तों न प्रतिबिंब येथें ॥२४॥
ममैवांशो जीवलोके म्हणूनी गीता वाक्यें अर्जुनालागिं कानींजो कां भोक्ता आपुला अंश सांगे तो चौर्यासीं लक्षयोनींत वागें ॥२५॥
उत्क्रामंतं स्थितंवा म्हणउनि वदला कृष्ण गीतेंत जेव्हांजाणें येणें न बिंबा त्यजुनि जड तनू जातसे अंश तेव्हांजातो टाकूनि देहा परि जड दिसतें त्या मृषा सर्प रुपींआहे जो बिंब रज्जू हुडकुनि मिळती संत त्या चित्स्वरुपें ॥२६॥
जें पूर्वपद्यें वदला विधाता कीं रज्जु तूं संत तुतें अनंताधुंडूनियां पावति चित्स्वरुपा तें बोलवेना प्रतिबिंब - रुपा ॥२७॥
टाकूनि जो जाइल अन्यदेहा तो पूर्वदेहीं नअसेंचि पाहातो देह सर्पात न रज्जु तेव्हां जो गेलिया देह दिसेच जेव्हा ॥२८॥
चैतन्य तुल्य दिसतें प्रतिबिंब बिंबींएकत्व दोहिंस समाधि - सुखावलंबींदेहांत मात्र अधिक प्रतिबिंब पाहींसर्वात्मता अनुभवांत दिसे न कांहीं ॥२९॥
सत्वांत त्यांत निज चित्प्रतिबिंब होतेंतें सत्व विश्वमय बिंब जयीं पहातेंबिंबैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हांबिंबावरी पसरतें निज सत्व जेव्हां ॥३०॥
जो कां गिरि सिंधुतरींत तीरीं तरींत त्याचें प्रतिबिंब नीरींनीरें तयातें प्रतिबिंब आलें बिंबांत तें त्याच जळें निमालें ॥३१॥
जळधिभीतरि ये भरतें जयीं जळ तरींत उचंबळतें तयींजळ चटे गिरिहीवरि जे धवां मग दिसे प्रतिबिंब न ते धवां ॥३२॥
त्रिभुवनात्मक बिंब चराचरीं पसरतें मन शुद्ध तयावरीतनुमधें प्रतिबिंब दुजें नुरे मन जयीं निज - बिंब - सुखीं मुरे ॥३३॥
जों अशा अनु भवास न पावे चित्त चिन्मय असें न थिरावेतोंवरी अनुभवास न आलें ज्ञान शाब्दिकचि केवळ झालें ॥३४॥
गीतेमधें हरिहि येरिति बोलियेलाकीं अर्जुना तरिच तूं वद बोध झालाभूतें अशेष जरि देखसि आत्मरुपींतेव्हांचि देखसिल ऐक्य मम - स्वरुपीं ॥३५॥
ज्ञान - प्रशंसा बहुसाल केली तों अर्जुनाची करुणा उदेलीयाचा करावा उपदेश याला आली कृपा हे करुणालयाला ॥३६॥
परि नये शरणागत तों नदे अभयहस्त न तत्त्व तया वदेगुरु दयाळु तथापिहि येरिती वदति दाटुनि तत्व न त्या प्रती ॥३७॥
तरी कृपा ये करुणालयाला देखोनि सत्पात्र म्हणे तयालाकीं ज्ञान सर्वाहुनि थोर आहे जाणूनि तें होउनिं धन्य राहें ॥३८॥
भावें वदे या हरि अर्जुनाला कीं हें कळावें सकळां जनांलाकीं जाण तें संत कृपे करुनी तयां गुरुत्वें त्दृदयीं वरुनी ॥३९॥
म्हणे अर्जुना संत धुंडूनि आधीं तयांपासुनी ज्ञान हें शीघ्र साधींकरुनी नमस्कार साष्टांग सेवा करावी पहावें जसें देवदेवा ॥४०॥
कृपादृष्टिनें पाहती तूज जेव्हां करावा अरे अर्जुना प्रश्न तेव्हांतुटे बंध का केविं हें दुःख नाशे कसा नित्य आनंद आत्मा प्रकाशे ॥४१॥
अशा वंदन - प्रश्न - सेवा - प्रसंगें जयीं त्यांस तूं सेविसी अंतरंगेंतुतें वेद शास्त्रज्ञ जे तत्ववेत्ते कृपादृष्टिनें पाहती तेधवां ते ॥४२॥
तें ज्ञान तूज उपदेशिति तेधवां तेजेणें करुनि सकळांसहि मुक्ति होतेते संत तूज उपदेशिति तत्त्व जेव्हांऐसा पुन्हा न तुज मोहं पडेल तेव्हां ॥४३॥
अनुभव मज कैसा होय तो बोध होतांम्हणसिल तरि पार्था सांगतों तूज आतांसकळ विविध भूतें देखसी स्वस्वरुपींतुज मज मग तेव्हां ऐक्यता विश्वरुपीं ॥४४॥
या कारणें ज्ञान जयांस होतें ते स्वस्वरुपांत समस्त भूतेंअसे पहाती प्रतिबिंब तेव्हां बिंबीं मिळे येरिति बोध जेव्हां ॥४५॥
या कारणें तव - कृपा - लव - लेश जेव्हांजाणेल येरिति तुझ्या महिमेस तेव्हांनाहीं तरी म्हणतसे विधि याच भावेंकीं ज्ञान तों वरि तयास कसें म्हणावें ॥४६॥
श्लोकामधें पहिलिया वदला विधाताकीं ज्ञान तें तव - कृपांश - लवें अनंताबोलेल या उपरि कीं मज तोचि देवाद्यावा प्रसाद - लव जो तव - पाद - सेवा ॥४७॥
तूझा प्रसाद - लवही परि भाग्य - वृंदाजो आमुच्या उपजवी मज तो मुकुंदायेथेंचि होउनि कृतार्थ करो मुरारीजन्मांतरीं तरि घडो दुसर्या शरीरीं ॥४८॥
तूं कल्पवृक्षसम सर्वजनास देवातुझा प्रसाद करितां तव - पादसेवामी दास यद्यपि जरी अपराध केलाकीं वत्स वत्सप हरुनि समूह नेला ॥४९॥
अन्याय थोर घडला मजलागिं देवातो प्रार्थितों म्हणुनि मागुति वासुदेवाचित्तांत हा धरुनि भाव वदे विधाताकीं तो प्रसाद मज मागुति हो अनंता ॥५०॥
हा सापराध जरि देह तुझ्या प्रसादाआयुष्य - शेषवरि पात्र नव्हे मुकुंदाजन्मांतरीं तरि घडो मज अन्यदेहींतूझा प्रसाद - लव - लेश तदंश कांहीं ॥५१॥
ऐसें वदोनिहि सशंक असा विरिंचीकीं सापराध तरि उत्तम योनि कैंचीयाचा प्रसाद तरि एक मनुष्य - देहींशंका असीं उपजतां स्मृति होय कांहीं ॥५२॥
इंद्रद्युम्न द्रविड धरणीपाल जो पांड्यराजाजो कां विष्णु - व्रत - धर करी तत्प्रसादार्थ पूजातो देवाची करित असतां तेथ आला अगस्तीत्याची पूजा नृत्य नकरि तैं तो म्हणे होय हस्ती ॥५३॥
झाला गजेंद्र नृप जो मग त्यास नक्रेंपायीं जळांत धरितां हरिनें स्वचक्रेंनक्रास मारुनि गजाधिप सोडवीलावैकुंठ - मुक्ति - सदनीं निजरुप केला ॥५४॥
पूजा - प्रसाद हरिचा मज हो म्हणूनीकेली मधेंच मुनि - शाप - बळें कुयोनीतो पावला परि तशांतही या मुकुंदेंकेला प्रसाद सुर - सेव्य - पदाऽरविंदें ॥५५॥
या कारणें विधि म्हणे हरिचा विरोधीमी वत्स वत्सप हरुनि महाऽपराधीझालों म्हणोनि हरि होइल दुष्ट योनीप्रार्थी प्रसाद मज तेथहि हो म्हणूनी ॥५६॥
या कारणें म्हणतसे हरिला विधाताकीं दुष्ट योनि मज होय जरी अनंतातेथें प्रसाद मजलागिं तुझा मुकुंदाहे प्रार्थना इतकि या चरणार विंदा ॥५७॥
ती योनि भोगुनि अशाच पदास यावेंकीं मुक्तिचें पद तिचे पदवीस जावेंब्रम्हा म्हणे हरि असा अभिलाष नाहींमागेन एक हरि दे मज तेंचि कांहीं ॥५८॥
प्रसाद श्रीकांता करि मज असा कीं तुझि जिहींपदान्नांची सेवा सतत धरिली त्यांतचि मिहीतुझ्या या पायांचा भृतक असि भृत्यांत गणनाप्रसादें त्या पावे तव चरण भावें मुनिधना ॥५९॥
मोक्षादि सर्व पुरुषार्थ - पदें विशेषेंसेवा - सुधा तुझि असार करी अशेषेंसेवा - प्रसाद - फळ यास्तव मागता हेब्रम्हा हरी सफळ वामन तेंचि लाहे ॥६०॥
प्रसादाचें तूझ्या फळ चरण - सेवाच मज देअसें पूर्वश्लोकीं कमळ भव कृष्णाप्रति वदेसुधा - गोडी तुच्छा असिहि हरिसेवा ब्रजजनाघडे लाळा घोंटी नवल बहु वाटे विधि - मना ॥६१॥
व्रज - जन - विभवातें या प्रसंगें विधाताविनविल कड पावे तोंवरी श्री अनंतास्तन - रस हरि प्याल ज्यांत गो - गोपिकांचाप्रथम कथिल त्यांचें वैभव ब्रम्हवाचा ॥६२॥
धन्या अहो व्रजवधू व्रजलोक गायीज्याच्या स्तनें करुनि तृप्त सुधाब्धिशायीप्यालासि वत्स सुत होउनियां जयांचींदुग्धें नवर्णवति धन्यपणें तयांचीं ॥६३॥
यज्ञादिकें करुनि तृप्ति नव्हे जयालायेथें क्षणक्षणहि तृप्ति दिसे तथालापान्हा स्तनांत उरला परि सर्व पीनाहे बोल बोलति अशा स्तन - युग्म - पीना ॥६४॥
भावें अशा हरिस तृप्त म्हणे विधातागो - गोपिका परम धन्य अशा अनंतामुक्तींस लाभ न असा म्हणऊनि सेवाश्लोकांत मागत असे पहिल्यांत देवा ॥६५॥
गो - गोपिका - स्तन - रसें हरि तृप्त झालात्याचेंच भाग्य कमळासन बोलियेलाआतां व्रजीं वसति त्यां सकळां जनाचेंवर्णूनि भाग्य - समुदाय विरिंचि नाचे ॥६६॥
अहो धन्य गौळी अहो धन्य नंद व्रजीं सर्वही धन्य हो प्राणि - वृंदअहो भाग्य यांचें अहो भाग्य यांचें सखे सोयरे ब्रम्ह कृष्णारत्न ज्यांचे ॥६७॥
अहो भाग्य हा शब्द उच्चार वाचे विधाता मनीं विस्मयाविष्ट नाचेअसा भाव चित्तामधें वासुदेवं अहो दाविला वर्णिला त्याच देवें ॥६८॥
व्रज - जन - बहु - भाग्यें वर्णितां या प्रकारेंनकळति विधिलाही जीं अतर्क्ये अपारेंम्हणुनि विभव - लेशें त्यांचिया भाग्य जें जेअनु भविति असे ते वर्णितों देवराजे ॥६९॥
यांचा न भाग्य - महिमा वदवे असो हाकीं जो अतर्क्य मज नीरद - नीळ - देहाआम्हीं शिवादि अकराजण धन्य झालींयांच्या अचिंत्य - विभवें हरितेंचि बोलों ॥७०॥
बुध्यादि पात्रें अकरा करुनीं तूझ्या पदां भोज - रसें भरुनीक्षणक्षणा पान करुं मुकुंदा वर्णू किती या व्रज - भाग्य - वृंदा ॥७१॥
व्रजजन अकराही पाद - पद्माऽमृतानेंकरिति भरुनि पात्रें जेधवां नित्य पानेंसुरवर अकरा त्या एक एकाचि पात्रेंपरम विभव आम्हीं मानिओं संगमात्रें ॥७२॥
बुद्धयादिकी करुनियां व्रज - लोक - वासीसप्रेम जे भजति चिंतिति माधवासीबुद्ध्यादि देव अकरा कृतकृत्य तेथेंआम्हीं शिवादिक असेरिति भाव येथें ॥७३॥
व्रजास या रक्षक कृष्ण जेव्हां काळादिकांचें भय काय तेव्हांहा बुद्धिचा निश्वय त्यांस जेथें ब्रम्हा तिचें दैवत धन्य तेथें ॥७४॥
माझा हरी आणिक मी हरीचा अहंपणीं हे व्रज - लोक वाचातेथें महारुद्र कृतार्थ होतो श्रीकृष्ण भाग्यें गिरिजा पती तो ॥७५॥
कामादि संकल्पहि जे मनाचे श्रीकृष्णरुपी व्रजिंच्या जनाचेतद्वेवता चंद्र कृतार्थ तेथें संकल्प होती हरिरुप जेथें ॥७६॥
येती मुकुंद - चरितें व्रज - लोक - कानींदिग्देवता पिति सुधा श्रवणाऽभिमानीत्वग्देवता पवन ही कृतकृत्य तेव्हांस्पर्श रमापति - शरीर तयासि जेव्हां ॥७७॥
डोळे भरुनि हरिला जन हे पहातीतेव्हां दिवाकर सुधाब्धिंत मग्न होतीश्री - बाळकृष्ण - मुख - चुंबन - लाळ - पानेंजिव्हेमधें वरुण धन्य तया रसानें ॥७८॥
जो स्वा भाविक दिव्य गंध हरिचा घेतां सुवासा तयाप्राणीं अश्विनिचे कुमार पदवी घ्राणेंद्रियांची जयांते तेथें कृतकृत्य आणि हरिच्या लीळा जयांच्या मुखींवाचा - दैवत अग्नि कृष्ण चरितें नामामृतें तो सुखी ॥७९॥
सलगि करुनि लागे चक्रपाणीस पाणीविभव तदभिमानी मानितां वज्रपाणीहरि - चरण पहाया चालती लोक जेव्हांजन - चरण - युगाचा देव तो तुष्ट तेव्हां ॥८०॥
चरण - देव उपेंद्र जरी हरी तरि तयास असे गणना सुरींअदितिच्या सुत वामन यागुणें चरण - दैवत वामन आपणें ॥८१॥
सकळ सद्गति ज्या करितां जसी चरणिंची गति त्याकरितां तसीम्हणउनि गतिदायक जो हरी चरणिं गति त्याकरितां तसीम्हणउनी गतिदायक जो हरी चरणिं राहुनियां गतिही करी ॥८२॥
इतर - इंद्रिय - देवगण व्रजीं विभव मानिति जेविं तसें निजीनिजचि वैभव वामन मानितां चरण - देव उपेंद्र हरीच तो ॥८३॥
व्रज - जन - विभवातें वर्णितां वामनाचेंव्रजचि त्दृदय झालें भाग्य हें वाडवनाचेंव्रजजनचरणांचा देव तो वामनात्माम्हणउनि अणु त्याचा वर्णिला भाग्य वर्त्मा ॥८४॥
उपेंद्र जो वामन शेषशायी तो देव देव व्रज लोक - पायींतत्पाद धूळी निज - नाम - धारी जो मी तया अर्पितसे मुरारी ॥८५॥
स्कंधांत एकादश ज्यास संख्या तेथें हरी उद्धव - भक्त - मुख्याजो बोलिला श्लोक तयास पाहा तो श्लोकही वर्णिल तोचि जो हा ॥८६॥
ज्या भक्ता मजवीण अन्य नलगे निर्वैर शांत स्वयेंजो सर्वत्रहि पाहतो सम मला सर्वात्मता - निश्चयेंत्यामागेंचि सदा अरे फिरतसें त्याच्या पदाच्या धुळीमी आंगें धरितों पवित्र करितों लोकांस भूमंडळी ॥८७॥
येथें माधव उद्धवास वदला कीं मी अरे आपणात्याच्या पादरजें पवित्र करितों या उद्धवाला खुणात्याच्या ठाउक कीं पवित्र करणें ज्याला तदात्माचि हाया भावें वदतो रजांस धरितो सद्भक्त भक्ति - स्पृहा ॥८८॥
आतां पावन भक्त - पाय - धुळीनें सर्वास जेव्हां करीकां पापी अपवित्र लोक दिसती बोलाल ऐसें जरींहोतें ठाउक हें रहस्य इतुक्यां जे शुद्धि हे प्रार्थितीकीं भक्तांऽध्रि - रजें पवित्र करुनी तारी तयां श्रीपती ॥८९॥
ज्याला ठाउक अन्नसत्रचि नसे जो अन्न मागेचिनासत्रीं भोजन लभ्य होइल वदा कोणेरिती त्याजनाज्याला ठाउक हें रहस्यचि नसे प्रार्थी न या श्रुद्धिसीत्यांला श्रुद्धि न त्यारजें हरि हरी शंका मनाची असी ॥९०॥
करी वामन प्रार्थना हे मुकुंदा तुझ्या भक्त - पायांचिया धूळिवृंदाहरी घालिं माझे शिरीं सर्वकाळीं वहातोसि आगेंचि ज्या पाय धूळी ॥९१॥
या कारणें चरण दैवत जो मुरारीआत्मा उपेंद्र हरि वामन - नाम - धारीतो घेउनी व्रज - जनांऽग्नि - सरोज - धूळीमातें कृतार्थ करि या कलि - दुष्ट - काळीं ॥९२॥
श्रीकृष्ण तो पदरजें व्रजिच्या जनाच्यादुर्वासना हरितसे हरि वामनाच्याआत्मा उपेंद्र तरि वामन - नाम देहासेऊनियां पदरजें करि धन्य पाहा ॥९३॥
आत्मैक्य नामैक्यहि शेषशायी देऊनि मातें निज - भक्त - पायींउपेंद्र तो वामन जेथ आहे धूळीमधें धन्य करुनि पाहे ॥९४॥
बुद्ध्यादि देव अकरा विधि बोलियेलाजे आपणासहित भाग्य असें तयांलाविश्वात्मतेंकरुनि भाग्य उपेंद्र मानीकीं धूळि हे स्व - जन - वैभव - राजधानी ॥९५॥
येथेंचि टीका करिताति कोणी कीं यांत पद्मोद्भव श्रूळपाणीमिळोसि तेराजण देव होती श्रीकृष्ण - पादाब्ज - रसार घेती ॥९६॥
श्लोकार्थ तों होत असे असाही परंतु भावार्थ विरुद्ध कांहींकीं मित्र जो देव गुदेंद्रियाचा तद्भाग्यही वर्णिल काय वाचा ॥९७॥
शास्त्रीं विराडिंद्रियसृष्टि जेथें गुदेंद्रियाला नरकत्व तेथेंत्या इंद्रिया लाभ कसा हरीचा बोलेल सांगा विधि तो स्ववाचा ॥९८॥
चित्तीं स्फुरे हरि गुदेंद्रियकर्म होतांऐसें म्हणाल तरि तें मन - बुद्धि चिन्नासर्वेद्रियें करुनि कर्म घडे तथापीसद्भक्त - मानस असे हरिच्या स्वरुपीम ॥९९॥
पात्रें जसीं आणिक इंद्रियांचीं श्रीकृष्ण - सेवा असि यास कैचीम्हणूनि पात्रें अकराचि साचीं जे देव एकादश उक्ति त्याची ॥१००॥
समर्पिती कर्म कळूनि देवा होतें विसर्ग सुख तेंचि सेवाआत्मा सुखें तें सुख वासुदेवा हा भाव यालागिं कसा वदावा ॥१०१॥
कर्मार्पणादि विधि यांस कधीं कळेनाहा कृष्ण ईश म्हणऊनिहि आकळेनानैसर्गिक - प्रियपणें भजती मुकुंदादेहेंद्रियें करिति सर्वहि कृष्ण - धंदा ॥१०२॥
या इंद्रियें करुनि काय घडेल सेवासर्वेद्रियें सहज सेविति वासुदेवायावेगळेचि अकराजण देव होतांहा क्लिष्ट कल्पितहि अर्थ किमर्थ आतां ॥१०३॥
आम्हीं शिवादि अकरा अतएव धाताया दोंसुरांसहित बोलियला अनंतात्यामाजि - सेवटिल इंद्रिय गोपिकांचेंझालें कृतार्थ म्हणऊनि म्हणाल साचें ॥१०४॥
तथापि हा काळ जयीं स्तुतीचा तयां न तो लाभ तयां रतीचाकात्यायनीचें व्रत गोपकन्या करुनि होती रति - लाभ - धन्या ॥१०५॥
हे धन्य देव अकरा जण मात्र जेव्हांवत्सें हरुनि विनवी विधि येथ जेव्हांश्लोकार्थ आणिक अबाधित अर्थ जो हाश्रोते तुम्हीं करुनि येथ विवेक पाहा ॥१०६॥
व्रज - जन - विभवाचा पार नेणे म्हणूनीविभव सुरवरांला जें तदंशें करुनीविशद कथुनि आतां श्लोक हा बोलतो कींव्रज - जन - पद - रेणू लभ्य तो धन्य लोकीं ॥१०७॥
तें भाग्य थोर तरि कीं जरि जन्म येथेंकांहीं घडे हरि असें तव दास्य जेथेंहे कृष्ण - भक्ति - पदवी जरि लभ्य नाहींया गोधनांत तरि हो पश्रु जन्म कांहीं ॥१०८॥
सप्रेम भक्त तुज पाहति शेषशायीवृंदावनांत तुज येरिति वत्स गायीहेही महापदवि लभ्य उगीच नाहीहो या वनीं तरुलतादिहि जन्म कांहीं ॥१०९॥
जे या वनी तरु - लतादिक जन्म घेतीकोणाचिया पदरजें तरि धन्य होतीझालें जिणें सकळही हरिरुप ज्यांचेंत्यांचें पदाब्जरज लाधति भाग्य त्यांचें ॥११०॥
यांचे जिणें सकळ माधव रुप झालेंऐसें व्रजस्थ - जन - वैभव बोलियेलेंया भक्तिचें फळ रमापति काय यांलादेयील की म्हणुनि येथ सशंक झाला ॥१११॥
श्लोकांत यांत वदतो म्हणऊनि धाताकीं तूं व्रजस्थ - जन - भक्ति - रसें अनंताझालासि केवळ ऋणी फळ काय देसीउत्तीर्ण कोण फळ देउनि त्यांस होसी ॥११२॥
जे या गोवळवाडियांत असती तूं काय देसी तयांमोटी मुक्ति तुझी परंतु नव्हसी उत्तीर्ण देऊनियांद्वेषीही कुळ - मुक्ति - युक्त पदवी पावे तुझी पूतनातेही देउनियां ऋणी व्रजजन प्रेमें जगज्जीवना ॥११३॥
जे थानीं विष घालुनी तुज हरी मारावया पातलीद्वेपेही स्तन पाजितां स्वपदवी तीतें तुवां दीधलीप्रेमें श्रीमुख पाहतां स्तन युगीं पान्हा जयांचा पिसीत्याला देउनि मुक्ति ते हरि कसी उत्तीर्णता पावसी ॥११४॥
आतां यां सकळां कुळांसहितही देसील मुक्ती जरीउत्तीर्ण व्रजिंच्या जनास करुणासिंधू नहोसी तरीभाऊ जो अघनाम आणि वकही बंधू असी पूतनातीतें जें पद तें तयांसहि दिल्हें देवा जगज्जीवना ॥११५॥
ज्याला तूज निमित्त वित्त सकळ प्राणादिहिं आपलेंदेवा वाटत गोड तूजविण तें टाकूनि जीही स्थळेंत्यांला जे गति पूतनेसि दिधली ते देउनीचा कसाउत्तीर्ण प्रभुवर्य होसिल मनीं हा मोह माझ्या असा ॥११६॥
यालागिं काय हरि देउनियां जनालाउत्तीर्ण होसिल असें नकळें मनालादेऊनि मुक्तिहि ऋणी व्रजवासियांचाभावें अशा वदलि तेथ विरिंचि वाचा ॥११७॥
कृष्णा तूज निमित्त सर्व सदन प्राणादि ज्यांचें जिणेंमुक्तीचें पद राक्षसांसि दिधले तें त्यांसि देणें उणेंयाचें तूं ऋण केविं फेडिसि असें श्लोकामधें पूर्विल्याभक्ति श्रीव्रजिच्या रमापति पुढें येणेरिती वर्णिल्या ॥११८॥
येथें असें विधि वदोनि सशंक झालाकीं हें खरेंच परि मागुति या जनांलाआहे गृहादि अनुराग विराग नाहींकीं गोप हे रमति सर्वहि देह गेहीं ॥११९॥
टाकूनियां गृह - सुतादि कलत्र वित्तेंजाती यती भजति त्यास विशुद्ध चित्तेंजो मोक्ष त्यांस हरि यांसहि तोचि देतोउत्तीर्ण येरिति करुनि मुकुंद होतो ॥१२०॥
ऐसा विचार सुचतां व्रजिंच्या जनाचीश्रीकृष्ण भक्ति मनिं आठवितां मनाचीशंका हरे त्वरित कीं हरि भक्ति जेथेंहोती अवाधक असे अनुराग तेथें ॥१२१॥
तैसी न जोंवरि रमापति - भक्ति चित्तींतों गेह - देह - सुत - कामिनि - भोग - वित्तींज्या आवडी करिति बंधन या जनांलात्या बंधका नव्हति जो हरि भक्त झाला ॥१२२॥
चंद्रादि सर्व गगनीं ग्रह आणि तारादिप्ती तयांसिहि असोनि यथा प्रकाराश्रीसूर्य त्यांत उगवे मग त्यां समस्तांदिप्ती यथास्थित असोनिहि होति असा ॥१२३॥
खद्योत तेजें रविच्या प्रकाशें होती तशा या हरि भक्ति - लेशेंभावें अशा श्लोक विरिंचि आतां बोलेल तो हा सुख कारि संतां ॥१२४॥
कामादि चोर वय तों वरिची हरीतीकाराग्रहासम गृहें हरि तोंचि होतीमाझें तुझें म्हणुनि तोवरि मोहबेडीकीं जोंवरी न तव दुर्लभ दास्य - गोडी ॥१२५॥
पुत्रादिकांचे अनुराग जेकां हे चोरटे नागविताति लोकांते तोंच कीं जों तय दास्य नाहीं जे दास त्यांचें हरिती न कांहीं ॥१२६॥
आयुष्यवेगीं हरि भक्ति जोडी तुटेल त्याची भवबंधबेडीतो काळ नेतो विषयानुरागें कामादि हे चोर अशा प्रसंगें ॥१२७॥
आतां असोनि अनुराग कलत्र - वित्तीश्रीकृष्ण - आवडि - ठसा बसला स्वचित्तींप्रेमें स्मरे हरिस चित्त अखंड ज्यांचेंपुत्रादि - राग हरिती वय केविं त्यांचें ॥१२८॥
देहें करुनि करितां स्व - गृहादि - कामेंचित्तीं मुकुंद वदनीं गुण - कर्म - नामेंपुत्रादि - आवडि असोनि यथाप्रकारेंत्याचें वृथा वय न जाय अशा विचारें ॥१२९॥
सर्वाहुनीही प्रिय कृष्ण जेव्हां भक्तीस येना व्यभिचार तेव्हांहे चोरटे यास्तव तोंचि देवा कीं जों नलागे तव पादसेवा ॥१३०॥
कारागृहें केवळ बंदिशाळा गृहें जनांची सुरलोकपाळाकीं बंदिशाळेंतुनिही पळाले कोणी गृहें टाकुनियां न गेले ॥१३१॥
दुःखें जरी अनुभवी पुरुष स्वदेहींनाहीं जयास सदनीं सुखलेश कांहींजाऊं सके न गृह टाकुनियां तथापीदारिद्र्य भोगुनि करी बहु पाप पापी ॥१३२॥
कारागृहासम गृहें वरि तोंचि देवाकीं जो गृहस्थ नकरी तव - पाद सेवाजे कां तुतें भजति मुक्ति पुरी तयांचीहोती गृहें स्मरति तूज मनें जयांचीं ॥१३३॥
टाकूनियां गृह - धनासि वनासि जावेंनिःसंग होउनि रमापतिला भजावेंऐसा विवेक उपजे न जया मनालामोहाख्य बंधन असेच तया जनाला ॥१३४॥
हें स्वप्नतुल्य गृहदारसुतादि कांहींदेहाऽवसान - समयीं सह येत नाहींऐसें विवेकमय शस्त्र करुनि बेडीहें मोहलक्षण महा - जनहीन तोडी ॥१३५॥
हें मोहलक्षण गृहादिक तोंचि बेडीलागे न जों तव - पदांबुज - युग्म - गोडीटाकूनि सर्व वनिही तुजला भजावेंतें सर्व तूंचि तरि टाकुनि काय जावें ॥१३६॥
ऐसें गृहस्थ भजती हरि तूज चित्तेंप्रारब्ध येरिति असोनि कलत्र वित्तेंत्याला गृहादिक न बाधक होय तैसेंखद्योत - तेज रविच्या उदयीं न जैसें ॥१३७॥
खद्योत - तेजहि असे इतरांसि जेव्हांनाहीं विरुद्ध भजनीं सुजनासि तेव्हांजें सर्व कर्म हरि अर्पित ज्यां जनांचेंनाहीं गृहादिभय त्यांस विरुद्ध कैंचें ॥१३८॥
कांहीच ज्यांस भजनास विरुद्ध नाहींत्यांलागि तूं सुलभ हें न विचित्र कांहींजे सेविती तुज निमित्त जितां मुकुंदायांचा तसा तवनिमित्तचि सर्व धंदा ॥१३९॥
सन्यासियाहुनिहि या व्रजिंच्या जनालाऐसा तुझा अधिक लाभ समान झालाजे त्यांसि मुक्ति हरि यांसहि तेचि देसीउत्तीर्ण केविं तरि देउनि मुक्ति होसी ॥१४०॥
जैसें यतीस भजन - प्रतिकूळ कांहींनाहीं तसें व्रजजनासि असोनि नाहींप्रेमा यतीहुनिहि ज्यांस विशेष ऐसाउत्तीर्ण मुक्तिफळ देउनि होसि कैसा ॥१४१॥
श्लोकांत हें पहिलिया वदला विरिंचीऐसें तथापि परिशंकित बुद्धि त्याचीकी मुक्ति मात्र यतिला परि कृष्ण जैसाझाला व्रजीं सुलभ हा न यतीस तैसा ॥१४२॥
वत्सांसवें हरुनियां व्रज बाळ नेलेत्याचे पिते सकळही स्वपितेच केलेजे बाळ ते म्हणविले स्वसखे मुकुंदेंहोती कृतार्थ नकरी मुनिवर्य - वृंदें ॥१४३॥
ज्या गोपिका वडिल त्या जननी स्वभावेंज्या धाकट्या सहज त्यांस अनंगभावेंकेलें कृतार्थ न यतीसहि हो विरक्तांश्रीकृष्णलाभ सनकादिक जेविं मुक्तां ॥१४४॥
उत्तीर्ण काय हरि होइल येरितीनेंहें मानिलें त्दृदयिं भारतिच्या पतीनेतो आठवूनि अवतार - निमित्त कांहींबोलेल कीं हरिपदाविण मोक्ष नाहीं ॥१४५॥
तूं निष्प्रपंच तुज माय न बाप कांहींकोणी सखा न रिपु आणिक मित्र नाहींतो तूं असा किमपिही न जरी अपेक्षाभक्तांसि उद्धरिसि केवळ अंबुजाक्षा ॥१४६॥
तूं तो अनादि - करुणामृत - पूर्ण सिंधूदीनासि उद्धरिसि केवळ दीनबंधूसर्वासि तारक कथा तुझिया पवित्रायालागिं वाटविसि केवळ या चरित्रा ॥१४७॥
लोकांसि आवडति केवळ लोकरीतीरुपें तुझीं तदनुसार कथा करीतीते लोकरीतिच रितें करितां अनंतासंपादिसी जनक आणिक बंधु माता ॥१४८॥
कामातुरा प्रिय न बाप न माय कांहींस्त्री गोष्टि एक दुसरें प्रिय त्यासि नाहींया कारणें व्रज वधू - सुरतादि लीलाआरंभुनी निज - कथा - रुचि देसि त्यांला ॥१४९॥
तूं निष्प्रपंच परि वाटविसी प्रपंचाकीं आयकोत जन कर्ण वदोत वाचाजे कां प्रपन्न जन त्यांस सुखें अनंतेंसंपादिसी तरि न तो उपकार यांतें ॥१५०॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.