सोळा - सहस्त्र - सदनीं यदुराज नांदेसत्कीर्ति तारक करुनि जगीं जनां देवेदोनियां पद शिरीं वरदा तयाचेंवर्णीन तें गुण - गणाऽमृत दातयाचें ॥१॥
भौमासुरा वधुनियां रण - संगतातेंस्त्रीवृद षोडश - सहस्त्र अनंग - तातेंद्वारावती - पुरिस देउनि दिव्य यानेंत्या धाडिल्या नृप - सुता अजि अव्ययानें ॥२॥
एके घडीसचि धरी सकळां करीं तोआत्माचि जो जडजिवां सकळां करीतोजो भूमि - पुत्र मुरुदैत्य वरा हरीतोसोळा - सहस्त्र नवर्या नवरा हरी तो ॥३॥
सोळा - सहस्त्र - वरही जळजाऽक्ष झालातें कायसें अजि अशक्य अधोक्षजालासस्त्रीक षोडश - सहस्त्रचि देवदेवेंकेले विवाह समयीं वसुदेव देवें ॥४॥
देवकी प्रति - गृहीं वर - माय जो जगांत नवरा वर - मायतोचि हा प्रति - गृहीं नवरा हो जो मनीं म्हणति मानव राहो ॥५॥
घर - बापही प्रतिगृहीं वसुदेव प्रतिमंदिरीं सकळ - रुपहि देवयदुवीर आप्त अवघे प्रतिगेही हरि दाखवी इतर लोक उगेही ॥६॥
जोशी - पुरोहितहि तोचि मुकुंद झालाजे सावधान म्हणताति तया अजालाएक्याच लग्नसमयीं अवघ्या - करीं तोहातें धरी जगहि जो निमिषें करीतो ॥७॥
मोजितां दशशतें - द्विअष्टकें मंदिरें सकळ मंगळाष्टकेंव्यापिली प्रभु - गुणाऽमृताक्षरीं व्याप्त जेविं हरि तो क्षराक्षरीं ॥८॥
गर्जती द्विजचि ते श्रुभ - नादी अन्य मौनपर बंदिजनादीमंगळत्व इतरत्व न साहे मंगळप्रद कथा परिसा हे ॥९॥
नरक अद्वय पाश जो हरी वरि तयां युवतींस तो हरीद्विज तयाच सुमंगळाऽष्टकीं रमतिं तेच जगीं अभीष्ट कीं ॥१०॥
दुर्गें सर्व चुरा करी सहमुरा मर्दूनि भौमासुरानिर्दाळी असुरां सुखी करि सुरां साधूजना भूसुरांभौमाच्या कुमरा समर्पुनि धरा जाऊनि त्याच्या घराधाडी स्वाऽत्मपुरा स्त्रिया निजपुरा सोळासहस्त्रा वरा ॥११॥
भौमक्ष्माधिपती - स्त्रिया कुळवती सोळासहस्त्रा सतीआणी शौर्यगंती हरुनि कुमती तों पावला श्रीपतीयुद्धीं दैत्यपती वधूनि युवती धाडी स्व - गेहाप्रतीत्यांतें द्वारावतीमधें हरि अति प्रेमें वरी येरिती ॥१२॥
श्रीमद्वारवती पती खग - पती - स्कंधीं बसे श्रीपतीबामांकीं सुदती अलंकृतवती श्रीसत्यभामा सतीएवं दैत्यपती वधूनि युवती सोळासहस्त्रा कृतीआणी हंसगती वरी यदु - पती नामेंचि जो दे गती ॥१३॥
रुक्म्याची अनुजा समुद्र - तनुजा दे पत्र रामाऽनुजाधाडी गुप्त अजासमीप नृपजा नामें सुदेवा द्विजातेव्हां श्री - गिरिजा - गृहीं स्व - सहजा आणी सुधा सिंधुजामर्दी अश्वगजा चमू निज - भुजा - वीर्ये हरी पद्मजा ॥१४॥
भावाच्या मरणीं मुकुंद - करणी सत्राजितें स्थापुनीघाली आळजनीं स्यमंतक - मणी नेला म्हणे चोरुनीऋक्षाच्या सदतीं वनीं हुडकुती आणी हरी त्याक्षणींप्रायःश्वित्त मनीं करी सह - मणी श्री - सत्यभामाऽर्पणीं ॥१५॥
माझा राम धणी यदुत्तमपणीं आला न जाणें घृणीझोंबे त्यासि रणीं कळोनि करणी पायीं स्व - चूडामणीअर्षी श्री - चरणीं स्यमंतकमणी तो जाबवान् सद्गुणीवंदी पायवणी पदांबुज धणी घे ऋक्ष - कन्यार्पणी ॥१६॥
कालिंदी यमुना फणींद्र - दमनावांचुनि ते अंगनाअन्यातें वरिना म्हणूनि वचना या बोलिली अर्जुनाआली कृष्णमना गजेंद्रगमना आणूनि चंद्राऽननापाहोनी सुदिना वरी सुनयना आनंद सर्वा जना ॥१७॥
आतेचा पति जो अवंति नृपती तत्कन्यका श्रीपतीजाणोनि स्वरती स्वयंवर गती श्रीमित्रविंदा सतीआणी द्वारवतीप्रति क्षितिपती जिंकोनि जे वर्जितीभाऊ दुष्टमती तिचे परतती दुर्यो धनाचे व्रती ॥१८॥
वज्राचे दिसती वईल असती बांधे तया हे सतीकन्या नाग्नजिती म्हणे क्षितिपती देईन ऐशा व्रतीबांधे विश्वपती म्हणोनि सुमती अर्पी सुता त्याप्रतीआणी द्वारवती प्रियेस नृपती जिंकोनि मार्गी किती ॥१९॥
आतेची दुहिता तिच्या निज हिता जाणोनि माता पिताभाऊ त्याच मता धरुनि विहिता मार्गीच ते सु - स्मितादेती कीं चरिता स्मरोनि जनिता पावे गती तत्वतातो हा विश्व - पिता वरु निजसुता भद्रावती सुव्रता ॥२०॥
कोणी एक करीं धनुष्यचि धरी जें सज्ज कोणी करीएवं भूप वरी न राजकुमरी जो विंधिला यापरीत्या चापेंचि हरी स्वयंवर वरी लक्षूनि नीरीं वरींविंधी मत्स्य वरी तयास नवरी श्रीलक्ष्मणा सुंदरी ॥२१॥
त्याच्याचि वैवाहिक मंगळाष्टकें गाती विवाहीं द्विज मंगळाष्टकेंहें आयके माधव देव सुद्विजां सोळासहस्त्री वरि दे वसु द्विजा ॥२२॥
ज्या मंगळें मंगळ याजनाचें चरित्र तें रम्य निरंजनाचेंभावें अशा वर्णिति मंगळाला मुखें जयाच्या रस हा गळाला ॥२३॥
सावधान हरि संत - रक्षणीं त्यासि दे न कधिं अंतर क्षणींसावधान म्हणती द्विजन्म ते यानिमित्त असि बुद्धि जन्मते ॥२४॥
अंतिंचे घडिस अंबुजेक्षणीं अंतरी बुडवि अंबु जे क्षणींकामिनी बुडविती मनास त्या मानि ती सफल कामना सत्या ॥२५॥
जडत्व भ्रांतीचें कपट सरलें अंत्रपट तोदिसे सच्चित्तंतू प्रगट नयनीं निष्कपट तोसहस्त्रें सोळाही प्रकृति वरिती सत्पति सत्याअनन्या चिच्छक्ती वरिति सगुणा श्रीपतिस त्या ॥२६॥
माइका कपट - अंत्रपटातें वारिती युवति निष्कपटातेंआत्मतंतु शतधाच पहाती अक्षता मणिमयांकितहातीं ॥२७॥
भ्रांति - अंतरपटा विरहातें वारितां मग परस्पर हातेंअक्षताच शिरिं अक्षत - मोतें अर्पिताति नवलान गमो तें ॥२८॥
जई त्या चतुर्वक्त - अष्टाक्ष - तातें स्त्रियांच्या शिरीं अर्पिलें अक्षतांतेंतंई ऊठती नाद वाद्यांत नाना द्विजीं मंत्र गंधर्व - वृंदीं तनाना ॥२९॥
मृदंगादि नाना ध्वनी गायनाचे सुरस्त्री - नटी - वृंदही गाय नाचेदिशा व्यापिल्या सर्वही अंबराच्या असा नाद लग्नांत पीतांबराच्या ॥३०॥
मुक्ताफळातें द्विज अक्षतांतें श्री कुंकुमें रंगुनि अक्षतांतेंकरुनियां अर्पिति वेद - वादी ते पाहती कौतुक यादवादी ॥३१॥
लाधल्या नवरिया हरिला ज्या होमिती सकळ सुंदरि लाज्याहस्त हस्त - कमळीं युवतीचें श्रीपती धरि नितंबवतीचें ॥३२॥
द्याकार दे धनद बैसुनि दक्षणातेंसंतोषवी नवरियां कमलेक्षणातेंदातृत्व देउनि दरिद्रपणास त्यालाधाडी दिगंत वरितो हरि त्या सत्यांला ॥३३॥
कामें करी दशशताक्ष हरी समोरदेखूनि नृत्य करि जेविं घनास मोरसर्वाऽग - लोचन मयूर सुरेंद्र साचाघे लाभ मेघ - तनु - कृष्ण - कृपा - रसाचा ॥३४॥
जे ते गृहीं मणिमयांऽक - विवाह - वेदीजो तो अहेर सुर देव - बरा निवेदीगाती मुकुंद - गुण गायक सार वेदींकीजे तसें स्तवन मूर्ति धरोनि वेदीं ॥३५॥
सोळासहस्त्र - सदनीं हरि भोजनातेंअन्नें सुधामय चतुर्विध भो जनातेंस्त्रीरुप हें धरुनि आणि स्व - अन्न पूर्णासर्वास वांटुनिहि वाटित अन्नपूर्णा ॥३६॥
भाज्या साठि भरी तयांत हि परी रांधूनि शाकंबरीपात्रें तेचि करीं धरी तदुपरी वाटी स्वशाकंबरीवामांकीं नवरी घराप्रति हरी दिव्यासनाऊपरीत्यातें हें अमरी असे सुखकरी वाढूनि कोशिंबरी ॥३७॥
पात्रें सुवर्ण - मणि - निर्मित्त विश्वकर्मामांडूनि दाखवि तया निज - शिल्पिकर्माबैसावया जडित पाट पुढें चवायाताटातळीं इतर बैसुनि आंचयाया ॥३८॥
गंगा स्वयें मूर्तिमती जनाला दे वारि जैं बैसति भोजनालास्नानें जिच्या मुक्ति अजी वदावी ते तीर देहें यदुवीर दावी ॥३९॥
संतोष हो हरिचिया पद - सारसातेंभावें अशा वरुण घेउनि सारसातेंवाटी जिभेसि रुचि दे बरवी जनाच्याऐशा गती रस - पती करि भोजनाच्या ॥४०॥
सद्यपक्क रस जे गिरिजा ते आणि हे धरणि वाटित जातेशर्करादिक दलाम्र - रसाचा दाखवी वरुण आदर साचा ॥४१॥
श्री कामधेनु पुरवी जन हो रसातेंस्त्रीमूर्ति होउनि घृतादिक - गोरसातेंदुग्धादि तें जडित पात्र करुनि घालीवाढावया भुवन - सुंदरि ते निघाली ॥४२॥
साय आणिक दत्द्यां दुधताका वाढिते मदत - केतु पताकादे स्वरुप - रस जे रसिकांजी जीपुढें रतिहिजे रशिकांजी ॥४३॥
जें शक - दुर्लभ तसें निज तक वाढीनासूनि जें अरुचि दे सुरुचीस वाढीपंक्तीतया घमघमी ठिकरी तयाचीवाढी विभूति असि हे यदुराजयाची ॥४४॥
ब्राम्हणा मुखिं ध्वनी मिटक्यांची दक्षिणा अमित सोनटक्यांचीतारका गणिति भूमि दिसेना मोहरीहि उदरांत धसेना ॥४५॥
नद्या अग्नि होउनियां उष्ण पाणी मनुष्याकृतीनें अहोपात्र पाणीजयां देति सर्वस्वही ओचवाया बसायासि देऊनि तेथें चवाया ॥४६॥
जसी मेघचक्रांत सौदामिनीची असी कृष्णरुपीं प्रभा कामिनीचीहरी श्याम गोर्या स्त्रिया त्या सुवर्णा विवर्णत्व देती स्ववर्णे सुवर्णा ॥४७॥
तैलंग - कर्नाटक - गुर्जरांतें कर्हाड - कोल्हापुर - निर्जरांतेंआनंद गोदा - तटिंच्या द्विजांला वधूवरां देखुनि पूर्ण जाला ॥४८॥
तांबूल दे पति शशांक वनस्पतींचाजोका स्वयेंचि मन सर्व - जगत्पतींचासर्वत्र दोंदिल गणाधिप वेत्रहस्तीकामें करी नरतनूमुख जेविं हस्ती ॥४९॥
निरोप दे त्यांस चतुर्थ होमीं म्हणे हरी कीं तुमचा अहो मीश्रीमूर्ति ही हे पुरुषोत्तमातें तसी न विप्र प्रिय जेविं मातें ॥५०॥
दे द्विजां हरि निरोप जेक्षणी प्रेमअंबु भरिं अंबुजेक्षणींवंदितां पद जगद्गुरु निघे जो किरीटहि न सांवरुनि घे ॥५१॥
प्रेम - विव्हळ पदांबुरुहातें मस्तकीं धरि जगद्गुरु हातेंब्रम्ह - भक्ति सुगुणाऽर्णव दावी प्रीति ते किति म्हणूनि वदावी ॥५२॥
विवाह लोकांत अलोकरीती करी तरी लोक जसे करीतीजें वामन ध्यान - पथेंचि पाहे वर्णी तयाचीच अजी कृपा हे ॥५३॥
एवं यथायोग्यचि सर्वलोका दावूनियां लेश कृपावलोकानिरोप गोविंद तया जनां दे सोळासहस्त्रीं यदुराज नांदे ॥५४॥
सोळा - सहस्त्र - सदनीं निज - देह केलेज्याच्या कथामृतरसा जन हे भुकेलेहा द्वारका - विजय - नामक ही हरी तोदिव्य प्रबंध करितो भव जो हरी तो ॥५५॥
द्वारका - विजय - काव्य जयांत स्वामिचे विजय त्या विजयांतहा विवाह - विजय प्रभुला हो अर्पिला हरिकथामृत लाहो ॥५६॥
सोळा सहस्त्र युवती घटिकेचि माजीरुपें करुनि तितुकीं तितुक्यां समा जींश्रीकृष्णजी वरुनि त्यांत अनादि शांतस्वामी वसे म्हणुनि कीर्ति दहादिशांत ॥१॥
हे कीर्ति गातां सुर - गायकांनीं श्रीनारदें अयिकिली स्वकांनींये द्वारके विस्मित चित्त झाला पाहूं म्हणे त्या पुरुषा अजाला ॥२॥
सोळा सहस्त्र - युवतीं सहि ऐकला होऐके घडीस वरि हें हरि केविं लाहोनांदे कसा तितुकियां सदनीं सदा हापाहां दिशा सकळ वर्णिति ज्यास दाहा ॥३॥
परम कौतुक मानुनि ये मुनी प्रतिगृहीं हरि - दर्शन नेमुनीगगन - पंथ धरुनिच धांवला त्वरित मुक्तिपुरी प्रति पावला ॥४॥
जटा मस्तकीं वाजवी ब्रम्हवीणा हरीचे गुणीं मिश्र वाणी प्रवीणाप्रभूची मुखीं गाउनी कीर्त नाचे नवे नित्य घे सोहळे कीर्तनाचे ॥५॥
तो नारद द्वारवतीस पाहे कीं स्वर्गशोभेस करी वपा हेसमृद्ध देखे जन संपदांसी घरोघरी हीं अणिमादि दासी ॥६॥
द्वारकेंत अति रम्य नळे हो श्री जयांतिल कधीं न मळे होपुष्पितें उपवनें मुनि लक्षी मोजितां न धरिती शत लक्षी ॥७॥
विहग ज्यांत उदंड अखंड जी मधुरता वरिजे जिहिं अंडजींकुसुमित द्रुम सुंदर साजती फळभरेच लवोन विराजती ॥८॥
सरोवरे निर्मळ नीर ज्यांचें कीं ज्यामध्यें कानन नीरजाचेंतयां अजी वर्णिल कोण पद्मा जेथें असे सद्य करुनि पद्मा ॥९॥
पराग नीरीं नव - पंकजांचे कस्तूरि धिक्कारिति पंक ज्यांचेदेखोनि त्या मुक्तपुरीं जळाला संसार - संताप असे जळाला ॥१०॥
अन्य सर्व उपमा भ्रम राहो पंकजें मुनि - मन भ्रम राहोद्वारका - पति - पदें दिसती हो जीं स्तनीं धरि अनादिसती हो ॥११॥
हरिपदोपम पद्म सरोवरीं परमहंस मुनींद्र सरोवरीदिसति हंसहि सात्विक साजिरे वसति लाभ दुज्यां न असा जिरे ॥१२॥
हरिपदाकृतिनें असि सारसीं प्रभुपुरींत तया जळसारसींत्यजुनि आवडि लौकिक - सारसीं वसति माडियली द्विज सारसीं ॥१३॥
सांडिला कुसुम - संभ्रम रानीं द्वारका - जळरुहीं भ्रमरांनीजेरिती मुनि - मनो - मधुपांनीं कृष्ण - पाद - कमळीं मधु - पानी ॥१४॥
कृष्ण - पाद - कमळीं न रसाचा स्वाद घे ननरवानर साचावानगदिकहि राघव तारी हा तरे न कवणे अवतारीं ॥१५॥
निर्माण ज्याणें विधि शंभु केले त्याकारणें लोचन हे भुकेलेत्याची पदाब्जेंचि पहावयाला त्वरा दुजा न प्रिय भाव याला ॥१६॥
असे सर्वठायीं जरि हा उदास प्रभूची पुरी रम्य त्या नारदासगमे कीं हरीची तनू त्यास वाटे पहातां उठे प्रेम उल्हास - वाटे ॥१७॥
द्वारका - विभव जो मुनि लक्षी माडियांसि गणना नवलक्षींउच्च श्रुभ्र - रजता स्फटिकाच्या चांदण्या रजनिच्या घटिकाच्या ॥१८॥
चांदण्यांत सित वसु विराजे वर्णिती निपुणजे कविराजेभौक्तिकारुहित चांदवियांची दीप्ति तृप्ति करि चांद वियांची ॥१९॥
भूमि त्या नगरिं रत्नमणींची कोंदणें जडित इंद्रमणींचींवाट ते गज - रथाऽश्व - नृपाची हेम दिव्य वरि सुंदर पाची ॥२०॥
रत्न - हेम - रवधिता पडशाळा सत्सभा बहु अशाचि विशालापंक्ति रत्नमय हाट वट्याचीं दीप्ति रातिस दिसे दिवट्यांची ॥२१॥
देखे असींच नवले मुनि फार वाटेदेखोनि कृष्ण गृहसौख्य अपार वाटेद्वारीं उभे सकळही सुर लोकपाळश्रीकांत ज्यांत असतो भुवनैकपाळ ॥२२॥
देखिलें हरिचिया भवनाशी दर्शनेंकरुनि जें भव नाशीत्यांत षोडश - सहस्त्र - सतींचीं मंदिरें हरिचिये वसतीचीं ॥२३॥
कौशल्य तें परम कीं भव - बंध नाशीकौशल्य तें न अजि जें करि बंधनाशीकौशल्य वांछित असें नरराजथालाकौशल्य अर्पुनि भजो यदुराजयाला ॥२४॥
काव्यांत ज्या कुनर आणि अपूतनारीवर्णूनि वर्णिति जयांत न पूतनारीतें काकतीर्थचि कदापि न मानसाच्याहंसाचिया रमति हो गति मानसाच्या ॥२५॥
स्वकौशल्य तें विश्वकर्मा विशेषें हरीचे गृहीं दाखवी हो अशेषेंगृहें त्यांत सोळासहस्त्रें समाने अशाही पुरीमाजि जे भास माने ॥२६॥
सहस्त्रें जीं सोळा यदुपति - गृहें त्यांतहि मुनीनिघे एक्या गेहीं हरि - पद - रजांलागिं नमुनीनिघाला वैकुंठी म्हणुनि मुनिला वाटत असेविलास श्रीकांत क्षितिवरिहि दावी अजि असे ॥२७॥
स्वयंभ स्तंभ श्रीमरकतमणीचेच वरतेफळाच्याही रुपें खचित मणि वैडुर्य वर तेन रात्रींहीं जेथे किमपि तम कीं उत्तम - मणीप्रकाशीती जाणों उदित तितुकेही दिनमणी ॥२८॥
शशीची प्रभा पांढरी चांदव्याला गमे विश्वकर्माब्धितो चांदव्यालाजया भोंवतें वृंद मुक्ता - द्विजांचें जिहीं मोहिलें नेत्र मुक्ता द्विजांचें ॥२९॥
चांदव्या करुनि त्याचि अपारा तृप्ति मानिति चकोर दुपारीकृष्ण - पाट - नख - चंद्र सुधाते देखतां विहगबुद्धिहि धाते ॥३०॥
गृहांतील कृष्णागराचा निघे तो नभीं धूग्वही मेघ मानूनि घे तोसुखें नाचती देखती त्यास मोर स्त्रिया हांसती ज्या उभ्या त्या समोर ॥३१॥
ज्या कांकण्या वक्र गृहाग्रभागीं रत्नांकिता त्यांत यथा - विभागींचकोर पारावत हंस पक्षी मयूरही नेत्र जयांसि पक्षी ॥३२॥
त्या अंडजांमाजि चकोरजाती ते चांदव्यालागिं गृहांत जातीबाहेर ये वृंद तया घनाचें विलासमानी शिखिवृंद नाचे ॥३३॥
इत्यादि या कुशलता करि विश्वकर्मादावी म्हणे जड - सचेतन - विश्व - कर्मासंतुष्ट हो किमपि मानुनि हे स्वसेवाभावें अशा कुशळ हो तुम्हिं कां न सेवा ॥३४॥
कौशल्य जें ज्यांस असेल लोकी ते श्रीहरीच्याच कृपावलोकींदेणें हरीचेंच तया हरीतें न अर्पिता काळ वृथा हरी तें ॥३५॥
पेरुनि लाभ अधिकाधिक घे पिकाचातो एक पक्क म्हणवे न कदापि काचादे भूमितें करुनि अन्न न पाणि खातोपेरी न तींत तरि पात्र न आणिखा तो ॥३६॥
दृष्टीं धुतां अन्न न काय सांचें गर्ताजळीं त्या मग वायसांचेसमूह धाती न कदापि जाती त्या काकतीर्थाप्रति हंस - जाती ॥३७॥
उच्छिष्ट ताटांतिल अन्न सांचे धुतां जळीं त्या मग वायसांचेसमूह तें घेउनि तृप्त जाती न पाहती ते शुक - हंस - जाती ॥३८॥
धनाकारणें जे पराधीन वाणी कवी नाचवीती वृथा दीनवाणीअहो त्यांत अन्योन्य उच्छिष्ट सारें कवित्वें जना वाटती तींच सारें ॥३९॥
हरि - गुण - अमृतें जीं वाटिलीं व्यासदेवेंश्रुकसम जनवृंदे तींच घेती सदेवेंविविध मग असे ते ग्रंथ उद्गार साचेसहज निघति त्यांच्या तत्पदांच्या रसाचे ॥४०॥
यालागिं जे कुशळता करि विश्वकर्मासंतुष्ट हो मज म्हणे प्रभु विश्व - कर्माएवं असेल कुशलत्व नरा जयालातो तें समर्पण करु यदुराजयाला ॥४१॥
मुकुंदाच्या पायीं कुशळ न समर्पी कुशळताकरी आयुष्याचा व्यय कुशळता ते विपलतापहा तो कौशल्यें यदुपतिकृतें वामन न मनीं ॥४२॥
हरीच्या या लीला नवरस - सुधा - सार सकळाहरीती ज्या गातां कुरस - भवरोगादि - सकळाअसो ते हे गाडी रसिक जन हे साक्षि हरि तोअजी जे या ग्रंथी त्रिगुण तरि नामेंच हरितो ॥४३॥
नजाणें कौशल्यें किमपि परि पोटी नियम कींहरीच्या या लीला हरिच रचितो चित्र - यमकींतरी सर्वा ग्रंथीं प्रतिपदहि अर्पूनि हरिलाअहंकर्तृत्वाचा अनुसृतहि संस्कार हरिला ॥४४॥
यानंतरें नारद त्या अजला देखून कैसा कृतकार्य झालात्या आयका श्रीहरिच्या कथा रे तरेच येथें जरि चित्त थारे ॥१॥
सोळासहस्त्रांतहि पट्टराणी श्रीरुक्मिणी आदिरमा पुराणीआठां स्त्रियांमाजिहि मुख्य दाराजे कां नसोडि क्षणत्वा उदारा ॥२॥
आधीं तिच्या नारद ये गृहातें तों घेउनी चामर दिव्य हातेंसेवा करी श्रीयदुनायकाची जी भोंवती दाटणि बायकांची ॥३॥
ती समान सखिया नग मोतें लेइल्या नवल कीं न गमो तेंहे विलास सकळां सदनाचे देखतां सुर - सभासद नाचे ॥४॥
रुपें गुणें वेष वयें समाना सख्या सहस्त्रावधि भासमानादासीं तया श्रीहरिची विभूती समात्मता सन्मति जेविं भूतीं ॥५॥
तदनिं त्या मुनि लंघुनि उंबरा निघतसे अजि तों कनकांऽबरास्व - जन - दर्शन - उत्सव पावला लगबगें उडि टाकुनि धांवला ॥६॥
उडी टाकिली श्रीपलंगावरुनी त्वरें उत्तरीयांऽबरा सांवरुनीकिरीटांऽकितें मस्तके विप्रपायीं नमी वंदिजे जो सुरेद्रें उपायी ॥७॥
जया वंदिजे ज्या विरिंच्यादि दासी जया वंदिजे भक्त - वृंदी - उदासींन साध्यांश ज्या सिद्धि - मुक्ति - प्रदासी परी वंदितो देव तो नारदासी ॥८॥
रमाकांत सोळा - सहस्त्रांऽगनाचा पती लाभ देत्यासि आलिंगनाचाधरुनि स्व - हस्त - द्वयें भक्त - पाणी पलंगवरी बैसवी चक्रपाणी ॥९॥
पादोदकें जो त्रिजगास तारी अनंत - कल्याण - गुणाऽवतारीस्वमस्तकीं क्षाळुनि देव तो या श्रीनारदाच्या धरि पाद - तोया ॥१०॥
पूजी यथाविधि म्हणे मग पूर्णकामस्वामी वदा किमपि जें मज योग्य कामबोले मुनी नवल जी मज हो न वाटेकीं लाविसी जन समस्तहि याच बोटे ॥११॥
देणार मागितलिया परमा गतीतेंनेघें तिला म्हणसिही जरि माग तीतेंमागेंन पाय अवलोकुनियां स्मृतीतेंआलों असें धरुनि निश्चय या मतीतें ॥१२॥
पद तुझे त्दृदयीं हरि रेखिले असति ते अजि दृष्टिस देखिलेस्मृति असीच असो त्दृदयांबुजी सरस हें घननीळ दयांबुजी ॥१३॥
तेथुनि गेला दुसर्या गृहातें तो कृष्ण फांसे उचलोनि हातेंगृहेश्वरीशीं निज - उद्धवासीं खेळे त्दृदंभोरुहश्रुद्ध - वासी ॥१४॥
पूजा यथापूर्वचि नारदाची करुनी त्या भक्ति - विशारदाचीम्हणे अपूर्नासहि पूर्णकाम स्वामी वदाजी मज योग्य काम ॥१५॥
हरि असा जरि मानहि दे वदे तरि न उत्तर तो क्षितिदेव देप्रतिगृहीं करि जो नव लक्षणें दिसति तींनव - मानव - लक्षणें ॥१६॥
आलेत केव्हां पुसतां द्विजाला तत्पूर्वपूजा गरुड ध्वजालाजाणों नसे ठाउक त्या अजाला तेव्हां ऋषी विस्मित - चित्त जाला ॥१७॥
घरोघरीं नूतन भाव दावी माया हरीची किति ते वदावीएवंच ये आणिखिया गृहातें धरुनि वीणा मुनिवर्य हातें ॥१८॥
तों लेंकुरें खेळवितो हरी तो जो मोह माया स्मरणें हरीतोत्या बाळका लाडवि लोकरीती क्रीडा करी लोक जसे करीती ॥१९॥
बोबडी करुनि दाटुनि वाणी बोलतो परम - कौतुक - बाणीबाळ बोलति तसेंच हरी तो बोलतो गृहिणि - चित्त हरीतो ॥२०॥
उचचि नावद - साकल खोबलें खजुल देउनि गाय बलें बलेंबसुनियां मग तूं गलुलावली मजपुलें उलबीं बलि वावली ॥२१॥
चालीलिया देइन गोल गोला गोलांबिया देइन फालफालामी ईहुनी आवलतों खलें कीं ऐसा हली खेलवि लेंकलें कीं ॥२२॥
हरि मुलांसह कंटुक खेळतो परि न लौकिक केवळ खेळ तोस्वकरिं घेउनि कंदुक सीकवी गति पहा वदताति कसी कवी ॥२३॥
मुनि - मानस वृंदचि कंदुकसे यदुनंदन कंदुक तेचि कसेकरिं घेउनि नंदन खेळवि तो प्रभु तो मनिं चिज्जडखेळ वितो ॥२४॥
भनकंटुक ते करिचे पडती विषय क्षितितें तरी जडतीपडतांचि चिदंबरिं जे उडती हरितें अजि ते बहु आवडती ॥२५॥
मन - कंदुक ते कृत - कर्म - फळें विषय - क्षिति आफलि दैव - बळेंअधिकाधिक चिद्गगनीं कुशळें उडती मन - कंदुक इंदुकळें ॥२६॥
विषय क्षितिऊपरि त्याचि पडे मन मृन्मयपिंड न तों उपडेनिपटूनि तयास हि बाळ करीं धरिती परि आदर हा नकरीं ॥२७॥
प्रतिबिंब - चिदंशक बाळक ते निज - मानस - इंद्रिय - चाळकतेचिखलासमही मन खेळविती विषय प्रिय बंधक खेळवीती ॥२८॥
परि कंटुक - खेळचि बिंब हरी सिकवि प्रभु जो भवबंध हरीमन - कर्दम - खेळ न तो सिकवी म्हणताति जगद्गुरु ज्यासि कवीमुनि कौतुक दूरुनि पाहतसे स्वमनांत पहा तुम्हिं सर्व तसेविषयक्षितिहूनि तंई उडती सुमनें प्रभुला मग आवडती ॥३०॥
इत्यादि लौकिक - रसांत अलोक रीतीदावी चरित्र हरि लोक जसें करीतीऐसा लपोनि हरि दूरुनि देखिला होतैसाचि तो मुनिवरें मनि रेखिलाहो ॥३१॥
तेथूनिही अन्यगृहास जावें त्याही गृहीं येचिरितीं भजावेंम्हणूनि ये मेधतनू समोर पाहे तया जेविं घनास मोर ॥३२॥
करीं घेउनी वाजवी ब्रम्हवीणा तया देखतां भक्ति - योग - प्रवीणापुढें धावणें पूजनें पूर्वरीती करी आपणा देव जैसें करीती ॥३३॥
त्याहीं गृहीं प्रश्न नवाच केला त्या कौतुकाचाच ऋषी भुकेलाआलेति केव्हां पुसतो मुनीला जाणी नसे ठाउक मेघनीळा ॥३४॥
त्यास उत्तर नदेत मुनी तो जाय अन्य - सदना नमुनी तोदाखवी स्वरसमा नवला हो दाखवी स्वमनिं मानवला हो ॥३५॥
कोणें गृहीं स्नान करी हरी तो नामें मनाचे मळ जो हरी तोकोणे गृहीं अग्नि यथोक्त होमी कीं हे करीतों गृहधर्म हो मी ॥३६॥
यानंतरे स्व - चरिताऽमृत नारदासीदावी तया स्मर जना सुख - नीरदासीवंदूनि त्या हरिचिया पद - सारसातेंवर्णीन भागवत - दिव्य - कथा रसातें ॥१॥
सुनामामाहेरासीं विविध - विभवें पाठवितसेस्व - माहेरीं ज्या ज्या यदुविर तयां आठवितसेमुळें धाडी त्यांला तदितरगृही इंदुवदनासुना आल्या देखे ऋषिवर रमाकांत - सदना ॥२॥
सदनी पाहतसे मुनि दूसर्या प्रभुस तों स्वसुता निज - सासर्यासजळ - लोचन पाठवि तो हरी प्रकृति मोहक जो स्मरणें हरी ॥३॥
मुली कोठें आल्या श्वश्रुर - सदनींहूनि सदनामुल्हार्या सांगातें कुमुदनयना इंदुवदनादिलीं क्षेमें त्यांतें सजळ - जळजाऽक्षें हरि हरीअविद्यामोहातें स्मरण करितां जो हरि हरि ॥४॥
करी लेकराच्या महाउत्सवासी जगत्तात जो द्वारका - दुर्ग - वासीमुलांची मुलिंची स्वयें लोकरीती करी कौतुकें लोक जैसे करीती ॥५॥
उठोनि एके सदनीं प्रभाते हरी करी स्नान मुनी प्रभा तेंदेखें पुढें कौतुक काय पाहे लीला हरीची त्दृदयीं जपा हे ॥६॥
घटीं जेविं माती जगीं वासुदेव स्वयें तोचि तें ज्ञान दे देवदेवअसी चिज्जडीं संधि संध्या वदावी असा तो स्व - संध्या अनुष्ठान दावी ॥७॥
जगद्वम्हसंधींत संध्या करीती न कां कर्म संध्या तया लोकरीतीस्वयें जो जग द्वम्ह संध्या हरी तो करी कर्म जो कर्मबंधा हरी तो ॥८॥
करावें कदा कर्म हें सीकवीतो कथेची वदे रीति ऐसी कवी तोजपे त्यांपुढें वेदमाता हरी तो स्वबोधेंचि जो भेद - माता हरी तो ॥९॥
जया देवांची हो निगम जननी गर्भपरमात्रिलोकीं सूर्याही हुनि वर दिसे तेज चरमाप्रकाशीं प्रेरी ही सकळ - जन - बुद्धी - अधिप तोस्वये गायत्रीतें निजमय जगद्व्यात जपतो ॥१०॥
दर्भ घालुनि मुकुंद करीं तो पंचयज्ञहि बसोन करितोहा जना सुपथ माधव दावी सज्जनीं गति असीच वदावी ॥११॥
धेनु भूमि तिल रौप्य सुवर्णे अंबरें अतिविचित्र सुवर्णेब्राम्हणांसि हरि पूजुनि दानें देतसे इतर पुण्य - निदानें ॥१२॥
कोणेके सदनीं शशांक - वदनी पंकेरुहामोदिनीघ्या अन्नें इति वादिति अनुदिनीं जे ब्राम्हणाल्हादिनीविप्र - प्रेम मनीं गजेंद्रगमनी वाढी गृहस्वामिनीक्लेशातें न मनीं जनार्ति शमनी अन्नें दिवायामिनी ॥१३॥
भोजनाऽनुगुण विप्र - दक्षिणा देउनी नमुनियां प्रदक्षिणाश्रीहरी करुनि शेष जेवितो सदृहस्त करि अन्य जेविं तो ॥१४॥
कोठें विचार निगमागम शास्त्ररीतीशास्त्रज्ञ आणिक बहु श्रुतही करीतीधर्माऽर्थ - काम निवडी हरि वेगळालेनिर्दोष ज्यामधिल दोष अहो गळाले ॥१५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.