मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
द्वारकाविजय

साहित्य

द्वारकाविजय

श्लोक १५१–२५९

dvarakavijaya

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

पाच सर्गांचे काव्य. सोळा सहस्र स्त्रियांसह द्वारकेत नांदणारा यदुराज, भौमासुराचा वध, आणि नगरीचे वर्णन. ‘सोळा - सहस्त्र नवर्या नवरा हरी तो’ अशा ओळी — एकाच शब्दाचे दोन अर्थ काढणारा त्यांचा यमक इथे पानोपानी दिसतो.

वदे तया श्रीहरि तो सुजाणा कीं धर्म कृष्णार्पणधर्म जाणामिळे स्वधर्मे धन अर्थ साचा द्यावा सुपात्रीं नकरुनि साचा ॥१६॥
जो स्वस्त्रियांसीं ऋतुहेतुकाम तो काम सांगे प्रभु पूर्णकामजडांत आत्मा पट - तंतुरुपें सदा स्फुरे मुक्ति अशा स्वरुपें ॥१७॥
स्वप्रवृत्तिच अनादि पुराणी गाति जे द्वि - नव - संख्य - पुराणींत्याचिया करि हरि श्रवणातें जो पवित्र करितो श्रवणातें ॥१८॥
पापें जनाचीं श्रवणें गळालीं असीं पुराणें प्रभु वेगळालींजगद्गुरु आइकतो हरी तो नामेंचि जो पापकुळे हरी तो ॥१९॥
बोलती परमहंस - जनादी वेद पंचम जुनाट अनादीकोणिये सदनिं तो इतिहास कोणिये घरिं करी अति हास ॥२०॥
हास्य - दायक - विनोद - रसाचा दाखवी हरिहि आदर साचाप्रीति - पंकज जगीं उकलो कीं आयके हरिहि कौतुक लोकीं ॥२१॥
भेदवादमत कौतुकरीती एक गात उपहास करीतीएक वर्णिति विचित्र - कळीतें हांसतां त्दृदय जे उकलीते ॥२२॥
मी अनीश मज ईश्वर दावा तोचि भेद परतोनि वदावातूं अनीशचि न ईश्वर पाहें हाचि गुत्द्य उपदेश कृपा हे ॥२३॥
जसें पावणें विष्णुसर्वोत्तमातें तसें पावणें जाण अंधत्तमातेंघडे भोग दोहीं स्थळीं लिंगदेहा न देवेश दोघां पुन्हा अंग दे हा ॥२४॥
वैकुंठ - अंधत्तम - लोक - वासी न लिंग न स्थूळ जयीं जिवासीतेव्हां निराकार पणें असावें कीं रुपठायींतरि जी स्फुरावें ॥२५॥
म्हणें गुरु रुप असें जिवासी रुपें तया तो उभयत्रवासीचराचराकार जगीं जसा रे चिद्रूपही जीव तसेचि सारे ॥२६॥
वर्णाविणें रुपठसा पडेना वर्णत्व चिद्वसुस सांपडेनाश्रुत्यर्थ कांहींतरि वर्ण दावी हे कल्पना त्या पुरुषें वदावी ॥२७॥
लोहितादि - रजआदि गुणातें वेद वर्णिति न जीवगणातेंवर्णरुप असतें जरि साच श्रौत शब्द असताच तसाच ॥२८॥
फळे मूढ विश्वास अंधत्तमांत स्वरुपेंच वैकुंठलोकांत मातजया मुक्तितें कावळे - श्वान - जाती असें बोलतां लोक हांसोनि जाती ॥२९॥
असें वेदशास्त्रांत कोठेंचि नाहीं नवाटे अजी गोडसी कल्पनाहीजयां मुक्ति वैकुंठलोकीं अहो ते मनुष्यत्व टाकूनियां श्वान होते ॥३०॥
मुक्त होतिल तथापि कावळे जीभ त्यांसि न जसी पिका बळेकीर्तनीं करिल कावकाव ते वैखरी निजगुणें उगावते ॥३१॥
श्वानरुपहि न मुक्ति जी भली भुकणारचि तथापि जी भलीजेधवां करिल कीर्तनास ते मुक्तिची सहज कीर्ति नासते ॥३२॥
जया देह मुक्तीमध्यें गाढवाचा तयाची उठे जेधवां गाढ वाचाबहू फार आनंद मुक्ती जनां दे स्वयें ज्योत तो श्रीमहाराज नांदेहें मत श्रुतिविरुद्ध अहाहा मोक्ष काय वदतील महा हाभेद जो विदित तोचि कळावा यांत काय उपदेश फळावा ॥३४॥
तुम्हीं बोलतां अर्थ जे जे श्रुतीचे मला वाटती सर्वही अश्रुतीचेदिसे बंदिशाळेंत ते वेदवाचा रडे आठऊनि प्रभू यादवांचा ॥३५॥
विनोद हा दाखवितां अजाला जोकां गुरुराज - विनोद झालाशिष्यास तो होउनि तप्त दायी कीं रे नव्हे मुक्ति तुतें कदापी ॥३६॥
शिष्यत्व जो राय - विनोद दावी म्हणे असी मुक्तिहि जी वदावीते मुक्ति त्याच्याच असो अदृष्टीं दिसो न त्याचें मुखही स्वदृष्टीं ॥३७॥
तो तन्मयस्थ जन राय - विनोद - सारेंते बोलती वदसि शब्द असा कसा रेबापा झणी धरिसि अन्य - मतानुमानाजे जीव ते धरिति याचि मतानुमाना ॥३८॥
तो म्हणे निगम - संमत जे जे पक्ष त्यास तुम्हीं मानुनि जे जेबोलतां श्रुतिविरुद्धचि वाणी वाटते मज अमंगळवाणी ॥३९॥
बौद्धावतारीं हरि लोकलीळा करी तंई दे बळ या कळीलाजे द्वापरीं धर्म सहाय होते झाले प्रधानांग कळीस हो ते ॥४०॥
कळी धार्तराष्ट्र स्व - पापें मराया हरी आणि भीमादि जे धर्मरायासहाय स्वयें तेचि या हो कळीला हरी बुद्धरुपें करी लोक लीळा ॥४१॥
नव्हे बुद्धरुपें हरी सेव्य लोकीं जसें पाप हें बौद्ध लोकाऽवलोकींमतें यारिती दुष्टकाळांत नाना करिती अतत्वार्थवादी तनाना ॥४२॥
जसें स्वामिनें वेद मिथ्या म्हणावे तसे सेवकीं अर्थ मिथ्या गणावेवधी स्वामि तो मुख्य - लंकापतीतें करी मारुती जाळुनी ताप तीतें ॥४३॥
प्रधानांग त्या मारुती - भीमसेना करुनी कळीची महाभीम सेनाजसी मर्दिली दाविली लोकलीळा करी पुष्टत द्वैपरीत्यें कळीला ॥४४॥
स्वयें अप्रमाणत्व आणूनि वेदीं निषेधूनियां धर्म दैत्या निवेदीकरी श्रीहरी जेधवां पक्ष ज्याचा करी भीमही दास पादांबुजाचा ॥४५॥
जई घेतला धर्म कृष्णे कडे हो स्वयें भीम झाला तई त्याकडे होकळीकारणें वेदनिंदा वदावी प्रधानांगता भीमही त्यांत दावी ॥४६॥
द्रोणपुत्र अजि शंकर होतो शंकरार्य कळिभीतरि होतोतो उभा निगमवृक्ष करीतो भीम मागुति मुळ्या उकरीतो ॥४७॥
द्वापरीं कळिकडे शिव होतो या कळींत विपरीत अहो तोवेदपाळक म्हणोनि म्हणावा भीम बुद्ध परि बौद्ध गणावा ॥४८॥
जसा बंधु होऊनि दुर्योधनाचा करी यत्न तन्मृक्त्यच्या साधनाचातसा वेददायाद होऊनि दुर्योधनासी कळीमाजि सद्धर्म - सद्धोध नासीअहो सारख्या कृष्ण - भीम - प्रवृत्ती तंई क्षात्र आतां करी विप्रवृत्ती ॥५०॥
दीसतें मत बरें कळिमाजी आपल्या स्व - मत लोक - समाजीकाजवे झळकती तमराती वेदसूर्यचि तुम्हांस अराती ॥५१॥
हे प्रवृत्तिच अनादि पुराणी वर्णिती कुमति रीति पुराणींकीं असेंच कळिमाजि घडावें तेधवां श्रुतिपथें विघडावें ॥५२॥
म्हणुनि सत्यवती सुत बोलतो तुम्हिंहि जाणत सालचि बोल तोनिगमवृक्ष फळे दशमींच या वदतसे कळि - पातक - संचया ॥५३॥
म्हणे व्यास मेघांत पर्जन्य - काळीं तमें रात्रि जे जों घनी होय काळींजई झांकती चंद्र - श्रुकादि होते प्रभा काजव्याची तंई फार होते ॥५४॥
पाप - मेघ - पडळीं कळिकाळीं मोहरात्रि अतिदारुण काळीझांकतां निगम - बोधक रीती स्वप्रकाश कुमतेंचि करीती ॥५५॥
पाखंड खद्योतचि दुष्टकाळीं प्रकाशती दुर्मति - रात्रिकाळींवाखाणिती भेदचि लोकरीती सेवा हरीची कपटें करीती ॥५६॥
आवडे परम शंभु जंगमा चंदन प्रिय जसा भुजंगमासेव्य विष्णुहि तुम्हांत तसा हो विष्णु - निंद्यकुमतांत असा हो ॥५७॥
बोल जो त्रिविध जीव बोलतो निंदितो स्फुट हरीस बोल तोमुक्तिदायक तंई नव्हे हरी सर्व - जीव - भव जो न संहरी ॥५८॥
जो मुक्तियोग्यचि तयासचि मोक्ष झालामुक्ति प्रटत्व मग काय अधोक्षजालात्या योग्यतेसहि नदे म्हणतां हरी तोसंसारवंध तरि काय हरी हरीतो ॥५९॥
जो स्वयें धनिक त्यासिच वाणी दे कणीक इतरां करि वाणीदे कणीकहि न दे कनका हीं सेविल्या घण - मणी - कनकांही ॥६०॥
नदे अयोग्या हरि जेविं वाणी हे बोलताहे तुमचीच वाणीतच्छक्ति तेव्हां अतिदीनवाणी कीं मुक्ति तद्योगपणास वाणी ॥६१॥
जो योग्य त्या शक्त असोन देना कृपाळु कोणीच तया वदेनान शक्त तेव्हां असमर्थ झाला कां निंदिता हो गरुड ध्वजाला ॥६२॥
अशक्त कीं निर्दय त्यास बोला किंवा मनासींच धरा अबोलाजें बोलणें यावरतें असारें एवं पहा हें मतदुष्ट सारें ॥६३॥
नामेंच तुष्ट हरि होउनि बोधरीतीदे मोक्षसंमत नव्हे कुमतें धरीतीध्यानेंकरुनिहि न मुक्तिपथास दावीधिःकार त्यास जिहिं गोष्टि असी वदावी ॥६४॥
अयोग्या नव्हे ध्यान कां हो म्हणावे भयें ध्यान कंसादिकाचें गणावेंभयें ध्यान अत्यंत झालेंचि ज्याला तुम्हीं मानितां मुक्ति जीवा दुज्याला ॥६५॥
सर्वा जरी मोक्ष न देव देतो दे योग्यतामार्ग जना वदे तोमागीतलें कल्पतरु जना दे साम्यें असा हो सुरराज नादे ॥६६॥
एवं तुम्हीं निंदुइतसां हरी तो कीं सर्वबंधा न हरी हरी तोदेऊनि अंधंतमही कृपा हा करी असा ही म्हणतोच पाहा ॥६७॥
म्हणें तयांला सुख तेंचि वाटे तेव्हां वृथा चालति मुक्तिवाटेन मागती जन्म न दुःख पाहे अंधंतन्मीं मुक्तिसमा कृपा हे ॥६८॥
वाईट अंधंतम कां म्हणावें कां मुक्तियोग्या बरवें गुणावेंवैराग्यकष्टाविण हीन मातें झालीं विरागें पुरुषोत्तमातें ॥६९॥
सुखें तई दुःखतमांत नाहीं न गर्भवासादिक यातनाहींसंसारिकांहूनि बरें म्हणावे कां दैत्य सर्वाधम ते गणावे ॥७०॥
अभक्तां सुभक्तां तई तुल्प माना वृथा बोलतां भक्त - पक्षाऽभिमानाअसे साम्य मोक्षास अंधंतमाचें असें सिद्ध कर्तृत्व सर्वोत्तमाचें ॥७१॥
असी कल्पना ही प्रमाणाऽनुसारी दिसेना वृथा गोष्टि वाईट सारीनव्हे मानितां निर्दयत्वाभिमाना वृथा वाहतां या स्वशास्त्राऽभिमाना ॥७२॥
मतें हीं कळीचीं महापापसंगें भविष्यें पुढें तीं विनोद - प्रसंगेंविनोदीजनीं वर्णितां गायकांनीं करी हास्य घे जो जगत्काय कांनी ॥७३॥
वेदार्थ - दूषक - नव - श्रुति - कल्पकांचीइत्यादि दाविति अहो मति रीति कांचीकीं भेद लौकिकचि जो निगमीं असेनावेदश्रुती करि नव्या कळि - दुष्ट सेना ॥७४॥
जे द्वासुपर्णा श्रुति दोन पक्षी बोले तया मानिति भेद पक्षींपरस्परें भेद तयां वदेना तो वेद भेदात्मक भाव देना ॥७५॥
असे द्वाविमौ श्लोक गीतेंत दोन्ही वदे भेद त्याला न ऐसें वदोनीजसे द्वसुपर्णी तसे एथ जाणा कसा बोलवे भेद कृष्णा सुजाणा ॥७६॥
श्रुत्यर्थ ऐसाच महापुराणीं प्रवृत्ति हे नित्य असी पुराणीकीं हे उपाधीस्तव वेगळाले भेद स्वरुपीं अवघे गळाले ॥७७॥
भेदीं प्रमाण तरि एक तुम्हां दिसेनामोडीतसां सकळ अद्वय - भेदसेनाऐसें पुसे विरळत्या सुमहामतीतेंसत्यं भिदा म्हणुनि दावितसे श्रुती तें ॥७८॥
जगीं पाठ ज्यां कां श्रुती विप्रसिद्धा तया वेगळ्या या श्रुती अप्रसिद्धाकुतर्के कुयुक्ती अशा लाख वीतां प्रमाणें तसीं कल्पिते दाखवीतां ॥७९॥
यतीलागिंही ज्या मतीं हेम - लाहो मत - छापना वाटते हे मला होघडे ज्या मिषें लाभ रे साधनाचा नये लोभ रे कृत्रिमा साधनाचा ॥८०॥
नदे जो मतस्थाविणें बिंदु - तोया तुम्हां होतसे हो मनीं वेद्य तो याकळींत प्रतिष्ठा दिल्ही या मतातें असी बुद्धिरुप स्वयें कामता तें ॥८१॥
हिडंबा वधू द्वापरीं भीमसेना तिची पुत्र - पौत्रादि जे भीम सेनातुम्हीं भीमशिष्य स्वयें तेचि सारे जळाचा जनां बिंदु देतां कसा रे ॥८२॥
दयाहीनता वृत्ति हे राक्षसाची तुम्हांमाजि रे दीसती स्पष्ट साचीमतस्थाविणें जे नपाजा जळाला स्वभाव स्वयें राक्षसाचा जळाला ॥८३॥
बुद्धें तुम्हां मोहन कामतातें केलें न हें जाणत या मतातेंद्रव्यप्रतिष्ठार्थ धरुनि सारे विचार नेणा तुम्हि हा असा रे ॥८४॥
कंटाळलों मी तुमच्या मतातें देखोनि सर्वत्र असंमतातेंपाहेन मी माधव सर्वभूतीं अद्वैत विद्या हरिची विभ ती ॥८५॥
विनोद वेदश्रुति - दुर्मतांचे करुनि इत्यादि असंमतांचेखेळोनि हे राक्षस विप्रवृत्ती निवेदिली हो कळिची प्रवृत्ती ॥८६॥
वेदामधें व्याकरणानुसार भेदार्थ वाखाणिति जे असारते वर्णिले वैष्णव बोध रीती न वाद जे वेदमतीं धरीती ॥८७॥
असे जगीं वैष्णव नाम यांला महात्मता जेविं महात्मयालागीतेसि तेही धरिती प्रमाण नेणोनियां व्याकरण - प्रमाण ॥८८॥
महात्मा असा शब्द गीतेंत नाना तया वाचितां ते करीती तनानाप्रमाणा जयालागिं ओव्या मराठ्या धरीती करीं काठिया ऊपराट्या ॥८९॥
अधःशाख काठी तिचें ऊर्ध्व मूळ प्रमाणास गीता जया ऊर्ध्वमूळअसा वर्णीतां धर्मही जंगमाचा करी हास्य तेव्हां स्थिराजंगमाचा ॥९०॥
अन्यही कुमत कुत्सक रीती वेष दाउनि पुढें उतरीतीतो मनांत हरि हांसत राहे दुर्मती त्यजुनि सर्व - तरा हे ॥१९१॥
लीला - विनोद करितां मुनि त्या अजालादेखे असा विजय यांत चतुर्थ जालालीलाविनोद विजयी प्रभु नाम याचेंठेवी दरिद्र हरणार सुदामयाचें ॥९२॥
मुनीलागिं सोळासहस्त्रा पदांतें हरी दाखवी सुंदरां संपदांतेंवदावें किती ज्यास हो पार नाहीं न तर्कास ये जें सरोजासनाही ॥१॥
कोणी त्या शयनीं विचित्र - सुमनीं कृष्णप्रिया कामिनीकामासक्तमनीं सदा निशिदिनी मेघांत सौदोमिनीकोणी सेव्य मुनी - पदाऽब्ज नमुनी स्वामी गृह - स्वामिनीसेवीती सदनीं मृगांकनयनी प्रेमें दिवायामिनी ॥२॥
स्वजन - काम मृगादिक पारधी करुनि ये परतोनि अपारधीसकळ यादववीर समागमीं गुणगणीं स्तविजे निगमागमीं ॥३॥
कोण्हास दे अभय बोलत उद्धवादीकोणी जरा सुत मुखांस विरुद्धवादीकोणावरी म्हणति धाडुनि उग्र सेनातें द्रव्य द्या म्हणति आणुनि उग्रसेना ॥४॥
जे भिऊनि भजती चरणातें दे तयां अभयही शरणातेंऐसियांत मुर - भौम - रिपू जी देखतां मुनिस सादर पूजी ॥५॥
घरीं एके पाहें यदुपति - सुता - योग्य नवरीजयाच्या पुत्रातें चतुर नवरी कोण न वरीस्वयें पाहे कोठें उचित निजकन्येस नवरामुनी देखे ऐशा विविध गति शेषासनवरा ॥६॥
सरोवरें जीं सदनाचमाजी जळांत त्या कृष्ण वधू - समाजींक्रीडे स्त्रियांसीं पडतांचि पाणी शिपी तयांही वरि चक्रपाणी ॥७॥
एके घरीं श्रीहरि आंगणांत अश्वावरी त्या अबळा - गणांतजो लोटितां वेग उणे मनाचे करी असा हो अभिराम नाचें ॥८॥
कोठें हरी धांवडितो गजातें मनीं स्त्रियांच्या करि अंगजातेंसर्वत्र त्या दिव्य मनोभिरामा देखोनित्या पावति मोद रामा ॥९॥
वळखि दे न असा यदुराज तो दुरुनि वेषहि गुप्त विराजतोकवण वृत्त कसेरितिचें वरी विवरिलक्षितसे स्वगृहांतरीं ॥१०॥
लपोनि स्वयें सर्व - संसार - साक्षी पहातो कशा वर्तती सारसाक्षीकरी कर्म तो अन्य जैसे करीती अशा नारदा दाखवी लोकरीती ॥११॥
प्रधान जे लौकिक कारभारी लपोनि त्यांमाजिहि कैठभाऽरीपाहे बर्या वाइट लक्षणातें लक्षी मुनीत्या कमळे क्षणातें ॥१२॥
मुनीलागिं इत्यादि जें देव दावी नसे अंत वार्ता किती ते वदावीऋषी भागला देखतां लोकलीला जगीं नाशते कीर्तनें जे कलीला ॥१३॥
एके घरीं आपण आणि राम विचारितो भक्त - मनोभिरामकीं संत - कल्याण अशा उपायें करुं जया उद्धरणें स्वपायें ॥१४॥
हांसोनि तो नारद माधवासी बोले पहा काय रमाधवासीम्हणे तुझ्या या चरिताऽवलोकीं न शक्त योगींद्र न देव - लोकीं ॥१५॥
सलगि करुनि तूझी पाहतों स्वैर मायाक्षितिवरि धरिसी जे लोकदृष्टी रमायाभयरहित कृपेनें पाद - सेवा - प्रतापेंइतर नर जळे हें पाहतां क्षिप्र तापें ॥१६॥
ब्रम्हा तुझी होउनि योगमाया कांहीं म्हणे दृष्टिस यो गमायाहरुनि वत्सें मग ते न मोजी जे देखिली आणि म्हणे नमो जी ॥१७॥
पाहों म्हणे अर्जुन विश्वकाया नशक्त कोणी जिस आयकायातो मोहिला देखुनियां बरा हो हा दास तैसा झणि घाबराहो ॥१८॥
झणी हे करु मोह माया विभूती हरी दीसताहेस तूं जेविं भूतींतुझी कीर्ति सर्वत्र कानीं पडावी तुझ्या प्रीतिची ते कळा सांपडावी ॥१९॥
देहास्य या नारदरुपदेहा जाईल येथूनि निरोप दे हाप्रपंच पाहेल फिरोन सारा तुझा कथामार्ग फिरो न सारा ॥२०॥
तुझ्या यशें व्याप्त - जगत्रयातें पाहून मी होउनि पात्र यातेंगाईन इत्यादिक लोकलीला निर्दाळिती या श्रवणें कलीला ॥२१॥
म्हणे हरी बोलसि सर्व साच प्रभाव मायेस असे असाचपाहों तिला ज्या पुरुषें म्हणावें तो मोहिला निश्चित हें गणावें ॥२२॥
भजावेंचि मातें तुम्हीं सर्वथा रे स्वरुपीं तंई चित्त सर्वत्र थारेपहातांचि मायेस कां सांपडावें पाहावेंचि कीं आणि फांसां पडावें ॥२३॥
तरी नको खेद करुं उगा रे माया न हे तूजवरी उगारेमी ईमधें मग्न असेंचि वाटे तेव्हांचि ते बुद्धि चुके सुवाटे ॥२४॥
हे धर्म लोकां हरि सीकवीतो धरील जो बुद्धि असी कवी तोतो मोहपाशीं जन सांपडेना हा मोह तूतें सहसा पडेना ॥२५॥
करी ते जरी मोह माया सुरां रे तरी खिन्न होऊ नको वासुरा रेकरीना तुतें मोह हा स्वैर माया जिला आजि अंगीकरीतों रमाया ॥२६॥
आशा देखतां लौकिका संभ्रमातें मला सक्त मानूनि पावे श्रमातेंतसा भ्रांत पुत्रा अरे होसिना तूं म्हणूनीच माझा खरा होसि नातू ॥२७॥
येरिती सरसिजासन - तातें नातुवासि निज - पाद - रतातेंदाविल्या गृहगृहीं निज - जाया दे निरोपहि गदाग्रज जाया ॥२८॥
सोळा सहस्त्र - सदनीं हरि एकला होदेखूनि घे मुनि विचित्र अनेक लाहोतो ध्यान तैं करित जाय पदांबुजाचेंमाथां धरी अधिप शंभु पदांबु ज्याचें ॥२९॥
जरि मना यदुराज - कथा - रसीं परम मानुन कौतुक थारसीजितचि मुक्ति रसास सदा पिसी नगणितां मग मृत्युस दापिसी ॥३०॥
निज - कथा - रस हा बरवा मनीं कथितसें कनकांवर वामनींसकळ मोक्ष फिके मज लागती हरिकथाच गमे मजला गती ॥३१॥
या द्वारकाविजयनाम - सुधारसाचीब्रम्हांड भेदुनि अलौकिक धार साची ॥३२॥
आणूनि उद्धरि जना पद वामनाचातो वामनीं स्वरस नित्य नवा मनाचा ॥३३॥
ग्रंथ हा स्व - सुखरुप उपायीं अर्पितां त्रिभुवनेश्वर पायींमुक्ति माजिहि न वाम न पावे तें अपार सुख वामन पावे ॥३४॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या
माया
— भासमान करणारी शक्ती
सकळ
— सर्व
घडे
— घडते, शक्य होते
एवं
— अशा प्रकारे
मातें
— मला
ऐसें
— असे
देखे
— पाहतो
वरी
— वर; शिवाय
म्हणोनि
— म्हणून
देखोनि
— पाहून
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
तैं
— तेव्हा

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.