वंदोनियां स्थिर - चराऽत्मक - वासुदेवाध्यानीं फणींद्रशयनी जगदात्मदेवाश्री - कर्म - तत्व जनसत्व - विशुद्धकारीदिव्य प्रबंध रचितो भब - बंध - हारी ॥१॥
ज्याचें मुख द्विज असें पुरुषाख्यसूक्तींत्याचेंच कीं वदन वामन हे तदुक्तीविश्वात्मते करुनि तों दुसरें असेनाग्रंथासि यासि करणार दुजा दिसेना ॥२॥
जो सर्व - बुद्धि - गन चित्प्रतिबिंबरुपेंतो भक्त - त्दृद्गत अनंत निजरचरुपेंत्याच्या मुखेंचि उपदेशनि आत्मविद्याजीवांचिया हरि मुकुंद अनाद्यविद्या ॥३॥
जो श्री - गुरु प्रगटला मलयाऽद्रि देशींकेलें कृतार्थ करुणाऽर्द्र - कटाक्ष - लेशींदाऊनि पादकमळें त्दृदयाऽभिरामेंसतचित्सुरवात्मक शरीर तयाचि नामें ॥४॥
ध्यानीं दिसे परम - हंस मुनींद्रवेषेंचित्तीं स्फुरे जड - विशेष - निषेध - शेषेंतो ग्रंथ हे सकळही रचितो मुरारीहे वामनाऽकृति उगीच निमित्त - धारी ॥५॥
मारुनि दाउनि मुखीं कुरु - दुर्जनातेंयुद्धीं निमित्त करि मागुति अर्जुनातेंहें कर्म - तत्वहि तसें रचिलें मुकुंदेंदाऊनि वामन - मनीं चरणाऽरविंदें ॥६॥
कर्मे मृषा सकळही परि भोग देतीदेखोनिसर्प लटिका भय कंप होतीदृग्भ्रांति जाउनि दिसे जरि रज्जु दृष्टीहे होय सर्वहि मृथा मग कर्म - सृष्टी ॥७॥
ब्रम्हात्मता नकळतां कृत कर्म साचेंयाकारणें त्रिविध रुप असे तयाचेंजें कर्म आणिक अकर्म - विकर्म - रुपेंजीवांसि बद्ध करि होउनि पुण्य पापें ॥८॥
तें कर्म जें स्व - विहितें करणें स्वधर्मेजीं पातके अकरणी तितुकीं अकर्मेहोती विकर्म निगमीं जितुकी निषिद्धेंहीं बाधती त्रिविधही सुख - दुःख - बद्धें ॥९॥
सत्कर्म पुण्य परि बद्धकता न सोडीलोखंड पाप तरि पुण्य सुवर्ण - बेडीपुण्यांत पातक सुखांतहि दुःख अंतींदोनी अहो त्यजिलिं याकरितांचि संतीं ॥१०॥
कर्मे करी भगवदर्पणरुप - धर्मेकर्मात तो कुशळ देखतसे अकर्मेकर्मेच तीं नव्हति बद्धकता न जेव्हांनेदीच मृत्यु विष तें म्हणवे न तेव्हां ॥११॥
वेदोक्त कर्म नकरुनि अकर्म जोडीतें तों अकर्म करि पातक - रुप वेडीकर्मी अकर्मपण कर्मकता अकर्मींजाणूनि वर्तति अभिज्ञ मुकुंद - धर्मी ॥१२॥
गीतेमधें प्रतिपदीं जगदात्मदेवेंकेला असा विशद निर्णय वासुदेवेंकृष्णार्पणें करि अकर्म मुकुंद - धर्मेत्यावेगळीं सकळ बंधन - रुप कर्मे ॥१३॥
नित्यासही फळ असे पितृ - लोक - वेदींस्वर्गादि काम्य - फल - बंध अनेक भेदींनिष्काम आणिक सकाम समान बेडीवस्तु स्वयें स्वगुण तो सहसा नसोडी ॥१४॥
भक्षूनियां विष जसा मरणा न इच्छीकर्मे करुनि फळ कर्मठहीन वांछीयाकारणें नव्हति बद्धक तींच कर्मेजी ईश्वरार्पण अकाम करी स्वधर्मे ॥१५॥
वैद्याचिया करिं दिल्ह्या बचनाग होतोप्राणाऽपहार - गुण टांकुनि दिव्य होतोकर्मे स्वयें सहज जीं भव - बंध - रुपेंकृष्णार्पणें फळति मोक्ष - फळ - स्वरुपें ॥१६॥
मातीमधें घट दिसोन नसे विचारेंब्रम्हीं दिसें सकळ कर्म अशाप्रकारेंमातीमधें सहज अर्पित कुंभ जैसाब्रम्ही अशेष - जन - कर्म - कलाप तैसा ॥१७॥
घे मृत्तिका घट - मिषें दधि दुग्ध पाणीबुद्धींद्रियेंकरुनि कर्महि चक्रपाणीहें सर्व अर्पित अनर्पित तो न कांहींऐसें तथापिहि तदर्पणसिद्धि नाहीं ॥१८॥
सर्वस्व ने नृप तरी फळ - त्यास नेदीतोचि प्रसन्न जरि अर्पुनि तेंचि वंदीयाकारणें वदतसे स्मृति याच रीतीकर्मे अशीं न करितां भव - बंध होती ॥१९॥
कृष्णार्पणेंचि करणें म्हणऊनि यस्यस्मृत्या असी स्मृति करी त्रिजगांत लास्यकर्म स्मृतीकरुनियां जरि सांग होतेंवंदोनियां तरि समर्पिति कर्म त्यातें ॥२०॥
ज्याच्या स्मृतीकरुनि आणिक नाम घेतांदान - क्रिया - तप - मरवादिकही करीतांजें न्यून तें सकळही परिपूर्ण होतेवंदा म्हणे स्मृति समर्पुनिकर्म त्यातें ॥२१॥
याकारणें सकळ कर्म करोनि अंतींश्लोकद्वयें विनविला हरि सर्व - संतींहे श्लोक दोन सकळांसहि पाठ लोकींजेणें अलिप्तजन यद्यपि कर्म - पंकीं ॥२२॥
यस्यस्मृत्याचनामोत्क्यातपःपूजाक्रियादिषुन्यूनसंपूर्णतांयातीसद्योवंदेमच्युतंमंत्रहीनंक्रियाहीनभक्तिहीनंसुरेश्वरयतपूजितंमयादेवपरिपूर्णतदस्तुमेंज्याच्या स्मृतीकरुनि आणि तसेंच नामेंजें न्यून तेंचि परिपूर्णपणासि नेमेंयावे तया करिन वंदन अच्युतातेंऐसें रहस्य पहिल्यांत निरुपिजेतें ॥२३॥
हैं सद्य वंदन करोनि तया अनंतातत्प्रार्थना दुसरिया स्मृतिमाजि आतांकीं अंगही नहि जनार्दन देवदेवामत्कर्म तें सकळ हो तव - पाद - सेवा ॥२४॥
जें मंत्र - हीन हरि हीनहि जें क्रियेनेंत्वद्भक्ति मुक्तिपथ केवळ तद्विहीनेंम्यांजें असोरिति असांगहि कर्म केलेंतें पूर्ण हो म्हणउनी तुज अर्पियेलें ॥२५॥
स्मृत्यर्थ हा श्रुतिहि बोलति याचि उक्तीयज्ञेन यज्ञमयजंत म्हणोन सूक्तींयज्ञें करोनि यजिला हरि यज्ञमूर्तीतो मुख्य धर्म वदति श्रुति विष्णुकीर्ती ॥२६॥
गीतेंत तो विशद हेंचि वदे मुरारीश्रीव्यास हेचि इतिहास - पुराण - कारीकृष्णार्पणाविण कदापिहि मोक्ष नाहींतें निर्गुणार्पण नव्हे सगुणीच तेंही ॥२७॥
नाशील रज्जुहि कसा लटिक्या भुजंगासांगा कसा अगुण नाशिल कर्म - संगाविद्ये करोनिच मरेल अहो अविद्यातें ब्रम्हकर्म हरि जेथ असेल विद्या ॥२८॥
ब्रम्हार्पण स्मृति वदे सगुणींच तेंहीब्रम्ह द्विधा सगुण निर्गुण भेद नाहींकर्मास नाश सगुणाविण होय जेव्हांहें निर्गुणार्पण अबाधित होय तेव्हां ॥२९॥
ऐसे न निर्गुण न देवगणांत कोणीकर्मास पात्र हरि एक रथांगपाणीत्यालागिंही त्यजुनि काम भजेल जेव्हांहे कर्म - बंध तुटती मग सर्व तेव्हां ॥३०॥
साधारणासि विधि हा जरि तीव्र भक्तिप्रेमें भजोनि करि काम तथापि मुकीनासोनि रोग - भव वैद्य अपथ्य देतोअज्ञान नासुनि फलप्रद विष्णु होतो ॥३१॥
उत्तानपाद - सुत राज्य - पदा - निमित्तेंसप्रेम तीव्र भजतां दृढ एकचितेंअज्ञान नासुनि पद ध्रुव देउनी हीनेला क्षितीहुनि पदाप्रति याचि देहीं ॥३२॥
कामें करुनि तरल्या व्रज - गोप - नारीतीव्र - स्मृती करुनि दानव दैत्य वैरीभक्तांस हस्त - गत मुक्तिहि आवडेनादास्याविणें इतर रीति तया घडेना ॥३३॥
देवोनि योग मग भोगहि दे स्व - भक्तांऐसें तथापि न लगे फळ हें विरक्तांसामान्य जे जन तयांस न तीव्र भक्तीते काम्य इच्छिति तई न घडेल मुक्ती ॥३४॥
साधारणें त्यजुनि काम सदा मुकुंदींकर्मार्पणें करुनियां चरणाऽरविंदींसंपादणें परम दुर्लभ दास्य त्याचेंयावेगळें स्वहित आणिक त्यांसि कैंचें ॥३५॥
झाला जरी जितचि मुक्त न दास्य सोडीमुक्तीहुनी अधिक हे हरिदास्य - गोडीआम्हींचि विष्णु भजणें कवणासि आतांहा ज्ञान - गर्व उपजे न कदापि संतां ॥३६॥
संत स्व - बुद्धि - मन - इंद्रिय - कर्म - धंदानिर्व्याज सेविति समर्पुनियां मुकुंदामुक्तांसही अधिक हे हरि - दास्य - गोडीदास्यें करोनिच तुटे गुणकर्मबेडी ॥३७॥
नेणोनिही जरि समर्पिल सर्व कर्मेजाणेल तत्व परमेश्वर - दास्य - धर्मेतो दासजो सकळ अर्पितसे मुकुंदादेहेंद्रियादिकृत नित्य निमित्त धंदा ॥३८॥
जो स्वामि - कार्यचि सदा करितोचि भृत्यस्वामीस तों किमपिहीन दिसे अगत्ययाकारणें स्वकृत अर्पिल सर्व त्यालानि कामनें करुनि तो हरिदास बोला ॥३९॥
वेदोक्त आचरण जें परमेश्वराऽज्ञातेही समर्पुनि समस्तहि देह - यात्रादास्यार्थ अर्पिति भले शनपत्रनेत्रा ॥४०॥
वेदोक्त अर्पुनि न अर्पिल देह - धंदातो तों नव्हे परम आवडता मुकुंदाकांही स्व - कार्यहि करी प्रभु - कार्य कांहींस्वामीस तों अतिशयें प्रिय होत नाहीं ॥४१॥
जो स्वामि - कार्य - पर तो स्व - शरीर - रक्षात्या कारणेंचि करितोच तया अपेक्षायाकारणें विहित आणिक देह - यात्रादास्यार्थ अर्पिति भले अरविंद - नेत्रा ॥४२॥
वेदोक्त कर्म निज आणिक ही स्वधंदाअर्पील धन्य जइंपासुनियां मुकुंदाहोवोनि शुद्ध तइंपासुनि मोक्ष मार्गालागे कृतार्थ न मनी स्व - मनीं त्रिवर्गा ॥४३॥
जो ईश्वरार्पण करी निज - सर्व - कर्मेसंतुष्ट होय हरि त्यावरि दास्य - धर्मेहोऊनियां प्रगट त्यासि गुरु स्वरुपेंज्ञानाऽनळें सकळ जाळिल पुण्यपापें ॥४४॥
ज्ञाना नळें करुनि संचित दग्ध होतेंतेव्हां अकर्तृपण तें क्रियमाण होतेंप्रारब्धमात्र उरतें सरतें स्वभोगेंतें नासल्या उपरि मुक्तिच भक्ति योगें ॥४५॥
आत्मा कळे तरि कळे प्रियता मुकुंदींश्री - वासदेव - मय विश्व समस्त बंदीनिर्व्याज भक्ति समजोनि अनन्ययोगेंप्रारब्ध सारित असे सुख - दुःख - भोगें ॥४६॥
जो वास नाराहित पूर्विल कर्म भोगीतो भक्त तो जितचि मुक्त परात्मयोगीदग्धांबरीं दिसति तंतु जळोनि जैसेभोगार्थ हे त्रिगुण लिंगतनूत तैसे ॥४७॥
भोगासि योग्य परि मोड न तंडुलातेंऐसेंचि मुक्त - जन - लिंग - शरीर होतेंजो वासना त्यजुनि वर्तवि इंद्रियांसीप्रारब्ध भोगुनि नव्हे क्रियमाण त्यासी ॥४८॥
काया - मनें करुनि आणिक इंद्रियेंहीकर्मे करी पुरुष तीं क्रियमाण देहींतो देह जींवरि पडे क्रियमाण तों तेंत्यानंतरें वदति संचित कर्म त्यातें ॥४९॥
ज्या देहिंचें सुकृत दुष्कृत त्याचि देहींनासे परस्पर बळें मग नाश नाहींया कारणें म्हणति संचित कर्म त्यालाज्ञानानळाविण न नाश कधीं जयाला ॥५०॥
त्या संचितांतुनिहि कर्म फळ - प्रदाताप्रारब्धभोग निवडोनि करी विधातातो भोगही समयिंच्या समयींच होतोत्या त्या स्थलाप्रतिहि ओढुनि तोचि नेतो ॥५१॥
यत्नेंविणें सहज जें सुख होय त्यासीआयुष्य वेचुनि बुडे जन हा प्रयासींया कारणें भगवदर्पण सर्व कर्मेजाणोनि सुज करिती हरि - दास्य - धर्मे ॥५२॥
दुःखें जसीं सुख तसें निज - पूर्व - कर्मेत्यालागिं यत्न करिती नकळोनि धर्मेवेदांत - सिंधु - जठरी परमार्थ रत्नेंयत्नेचि लभ्य करिती न तयासि यत्नें ॥५३॥
हें उत्तर - प्रकरणीं जगदात्म बंधुबोलेल वामन - मुखें करुणेक सिंधुतें यत्न - तत्त्व कळल्यावरि बाह्य धंदासांडोनि सेविति मुकुंद - पदाऽरविंदा ॥५४॥
अध्याय हा प्रथम जो फळ - तत्त्व - नामाकामात्मकासि फळ - बंध तसा अकामाया कारणें स्वनिगमोदित आणि धंदाअर्पूनि वामन मनें भजतो मुकुंदा ॥५५॥
यत्नाविणें म्हणति होइल सौख्य कैसेंयत्नाविणेंचि सुख बोलति एक कैसेंहें तत्त्वता नकळतां परमार्थ कैंचाएकांत निश्वय घडेल कसा मनाचा ॥१॥
यत्नेंविणें फळ कदापिहि सांपडेनायत्नेंकरुनिहि अहो फळ हें घडेनागूढार्थ हा त्हदयिं तोंवरि ऊघडेनाहें कर्म - तत्त्व निज - दृष्टिस जों पडेना ॥२॥
बीजेंविणें फळ कदापि नये द्रुमालातें बीज पूर्विल जयास्तव वृक्ष झालाबीजें नवीं नव्हति साधन या फळासीतैसा अलीकडिल यत्न वृथा प्रयासीं ॥३॥
हा देह - वृक्ष निज - पूर्विल - कर्म - बीजेंत्यावीण साधन सुखादि - फळा न दूजेंबीजें नवीं तरु फळा न निमित्त जैसींकर्मे नवीं नव्हति कारण या फळांसी ॥४॥
बीजें नवीं नव तरु सृजितील जेव्हांयेती फळें मग तरुसि तयासि तेव्हांबीजांतुनींन उपजे तरु तो तथालायेती फळें तरिच सार्थक यत्न बोला ॥५॥
हे यत्न तों सकळही क्रियमाण होतीहोऊनि संचित शरीर तरु करीतीदुःखें सुखें तरुसित्या फळरुप येतीहे यत्न या तनु - तरुस फळें नदेती ॥६॥
पूर्वील यत्न फळ - दायक या शरीरींहे यत्न होतिल पुढें सुख - दुःख - कारीयाकारणें सकल टांकुनि लोक - धंदाचित्तीं धरा दृढ मुकुंद - पदाऽरविंदा ॥७॥
कोटी अनेकविध यत्न नृथाचि गेलेयत्नाविणेंचि कितिएक कृतार्थ झालेदुःखें सुखें द्विविध हो फल पूर्वकर्मेयत्नांसि यत्न म्हणती नकळोनि वर्मे ॥८॥
यत्नें श्रमें करुनि दुःख - समूह होतीते पूर्व - पातक - मुळेंचि फळासि येतीयत्नेंकरुनि अथवा सहजेंचि झालींतें तें सुखें स्वकृत तींचि फळासि आलीं ॥९॥
पापें प्रयत्न घडतां सुकृतें सुखातेंपावे प्रयत्न सुख - रुप गमे तयातेंजो पुण्यहीन करि यत्न सुखा न भेटेत्याला प्रयत्न अवधा अति दुःख वाटे ॥१०॥
दैवीप्रयत्न जन एक करुनि कांहींविद्या कळा सुत धनादिक याचि देहींपावोनियां सफळ मानिति त्या श्रमातेंतेंहि स्व - पूर्व - फळ हें न कळे तयातें ॥११॥
कोणी तपें जप पुरश्वरणें विचित्रेंघेऊनि वेचिति धनें अति अल्पमात्रेंत्यांचें तयांसि नफळोनि फळे परांलाआतां प्रयत्न फळ - दायक केविं बोला ॥१२॥
तें कर्म सांग नव्हतां नफळे म्हणावेंतेव्हां फळप्रद कसें दुसर्यासि व्हावेंज्याचें तयासि फळ तें जरि देत नाहींझालें परासि फळ पूर्विल कर्म तेंही ॥१३॥
निष्काम तो फळ न इच्छितसे म्हणावेंवेचूनि पुण्य परवित्त किमर्थ घ्यावेंनिष्काम जो करुण तो पर - घान - कर्मेकां मारणादिक करील अहो अधर्मे ॥१४॥
कांहीं परार्थ जपतां धन - लाभ झालामंत्रादि - सिद्धि तितुकीच गमे तयालाराज्यादि लाभ इतरासि तयाचि कर्मेकां यासि अल्प फळ हें नकळेचि वर्मे ॥१५॥
या कारणें सकळ लौकिक यत्न जैसेंदैवी - प्रयत्नहि सकाम समस्त तैसेनिष्काम मात्र फळ - दायक या शरीरींजेणें प्रसन्न हरि कर्मज - बंध - हारी ॥१६॥
जे काम्य यत्न तितुके क्रियमाण होतीहोऊनि संचित पुढें फळ यासि देतीत्यामाजि लौकिक अमंगळ दैव यत्नेंप्रारब्धरुप भव - सागर - सौख्य - रत्नें ॥१७॥
यालागिं काम्य निगमाऽगम याचि देहींजे बोलती सकळ चालवणेंचि तेहीमानोनि सद्य - फळ पुण्य जनीं करावेंतेणें पुढें सुख अशा करुणार्द्र - भावें ॥१८॥
जें ज्यासि काम्य फळलें म्हणती पुराणींतेंही जनासि मुनि दाखविती शिराणींकाम्यें जयासि फळ सद्य तया शरीरींतें पूर्व - पुण्य नव - यत्न - निमित्त - धारी ॥१९॥
पुत्रेष्टि काम्य मरवही करितां प्रयत्नेंवंध्या वधू प्रसवती न सुतादि रत्नेंवंध्याच त्या नव्हति ज्यांस घडे प्रसूतीवंध्याच ज्या सुत तयां सहसा न होती ॥२०॥
ज्यां कां उपासक - जनां कवितादि - शक्तीत्यां सर्व पूर्व सुकृतेंचि सदुक्त उक्तीघोकोनि यत्न करितां फळ पूर्वकर्मेदैवी प्रयत्नहि तसा इतुकींच वर्मे ॥२१॥
घोकोनिही जन निरक्षर एक झालेतैसेच दैविकहि यत्न नृथाचि गेलेजो यत्न ज्यास फळला म्हणवूनि वाटेतें पूर्व - पुण्य - फळ काळ - बळेंचि भेटे ॥२२॥
दोन्हीं प्रयत्न करितां श्रम दुःखरुपेंदेवोनि भोग सरती निज - पूर्व - पापेंत्यामाजि लौकिक पुढें करि पाप - वृद्धीशास्त्रोक्त काम्य करितां करि पुण्य - सिद्धी ॥२३॥
तस्मात् प्रयत्न सुख दोनिहि पूर्व - कर्मेपापेंचि दुःख सुख तें सुकृतें स्व - धर्मेजैसेंचि पाप फळ दुःख उगेंचि येतेंतैसेंचि पुण्यफळही उगलेंचि होतें ॥२४॥
यत्नें करोनि निज दुःख जरी निवारीहोणार दुःख नचुकेचि तरी शरीरींसेऊनियां वन सुखें त्यजिलीं विरक्तींत्यांलागिंही न सुटती सुखरुप - भक्तीं ॥२५॥
जे ज्ञान - निष्ठ नर ते करिती न कांहींप्रारब्ध - भोगचि तयां क्रियमाण नाहींयत्नादिरुप - निज - पाप - फळासि तेहीहोऊनियां अवश भोगिति दुःख देही ॥२६॥
ब्रम्हज्ञ अज्ञ सम भोगिति पुण्य - पापेंअज्ञासि जोडति नवीं क्रियमाण - रुपेंअज्ञ प्रयत्न करिती क्रियमाण - धर्मेतें ज्ञानियासि नघडे इतुकेंचि वर्मे ॥२७॥
अज्ञानिया द्विविध यत्न घडोनि येतीपूर्वार्जितें स्व - दुरितें कितिएक होतीत्यावेगळा करि सदां सुख - लाभ - धंदातो ज्ञानियासि नघडे भजतां मुकुंदा ॥२८॥
होणार होइल अशा दृढ - निश्वयातेंघेतां प्रयत्न नघडे सुख - निस्पृहातेंदेहादि - रक्षण - निमित्तचि यत्न कांहींलागे तयासि तरि पूर्विल पाप तेंहीं ॥२९॥
कर्मानुरुप सकळासहि बुद्धि होतेज्ञात्यासही तदनुरुपचि वर्तवीतेतीचा प्रवर्तक जगद्गुरु तीस चाळीते देह वर्तवि सुखाऽसुख - भोग - काळीं ॥३०॥
यत्नादि - रुप निज पूर्वील पाप भोगीत्यावेगळे नकरि यत्न कदापि योगीप्रारब्ध दुःख सुखही इतरांसि जैसेंदेहाऽभिमान गळतां नघडेचि तैसें ॥३१॥
दुःखें सुखें द्विविध दैहिक दुर्निवारेंदेहाऽभिमान - रचितें चुकती विचारेंजो अज्ञ तो द्विविधही सुख दुःख भोगीजें दुर्निवार तितुक्याचि फळासि योगी ॥३२॥
मानाऽपमान सुख दुःख सुतादि देहींद्रव्यादिलाभ अथवा धन - हानि कांहींदेहात्मते करुनि हें सुख दुःख वाटेदेहाऽभिमान गळतां न कदापि भेटे ॥३३॥
देहीं क्षुधा - ज्वर - तृषादिक दुःख येतेंस्रग्गंधभोग सुरतादिक सौख्य होतेंइत्यादि दुःख सुख जें बहुता प्रकारेंदेहाऽभिमान - रहितांसहि दुर्निवारें ॥३४॥
गेलें अर्हषण तथापिहि देह त्याचाज्ञान्यासही करि मृषा फळ - भोग साचाबाधों सके न सुख - दुःख पणें ममत्वांज्ञान्यास हें हरि पुढें निवडील तत्त्वा ॥३५॥
अध्याय हा रचियला दुसरा परेशेंजे वाचिती नव्हति दुःखित यत्नलेशेंवेदांत - वेद्य - पुरुषा भजती सुचितेंहा यत्न - तत्त्व - अभिधान - कथा - निमित्तें ॥३६॥
जों आत्मयासि सुख - दुःख विटाळ नाहींप्रारब्ध - कर्म - फळ तों म्हणवे न कांहींदेऊं शके न ममता सुख दुःख जेव्हांकैसा घडेल ममतास्पद भोग तेव्हां ॥१॥
हा पूर्वपक्ष दृढ यास्तव यासि जैसेंस्पर्शोनि भोग नघडे वदिजेल तैसेंकीं भोग होउनि सुखाऽसुख त्यासि नाहींजो कां ममत्व न धरी दृढ यांत कांहीं ॥२॥
बुद्धी करोनि सुख दुःख कळे तथापीते भोग आदळति येउनि चित्स्वरुपींजाणोनि दुःख सुख बुद्धिस जें रुतेनातें आत्मयासि न घडे सुख दुःख नाना ॥३॥
गेलें अहंपण तथापिहि मीपणाचेंआहे शरीर करितें सुख दुःख साचेंबाहेर ज्यां सुत - धनादिक - लाभ - हानीजाणोन सुज्ञ सुख दुःख मनीं न मानीं ॥४॥
प्रारब्ध - भोग - दगडीं तनु भिंति झालीते जों अहंममजळें मतिभिंति ओलीबाहेरुनी दगड तों रुतती तयेशीते वाळली मग खड्यास धरील कैशी ॥५॥
बुद्धींतुनी जरि अहं ममतादि गेलेदेहादि भान अवघेंच नसे विरालेंधूम्रासि पेटउनि अग्नि विझोनि जातोतो धूम्र एकघडि त्या सदनीं रहातो ॥६॥
अज्ञान - भेद तुटल्यावरिही स्वचित्तींसंस्कार - शेष करि पूर्विलिया प्रतीतीबाहेरुनी सुत धनादिक लाभ हानीजाणोनि सुज्ञ सुख दुःख मनीं न मानी ॥७॥
जे ज्ञान - भानु - किरणीं मति - भिंती वाळेहे तीस लागुनि खडे पडती निराळेजे ज्ञान - वर्जित अहं ममतार्द्रबुद्धीत्यांला खडे रुतति यास्तव भोग - सिद्धी ॥८॥
पुत्रादि लाभ समजोनिहि हर्ष नाहींहानी करोनि नमनीं मनिं दुःख कांहींहे लाभ - हानि कळणेंचि विटाळ त्यालाप्रारब्ध - भोग ममतास्पद तोचि बोला ॥९॥
प्रारब्ध - भोग ममतास्पद आणि कांहींयेणेंरितीच परि अज्ञ अभिज्ञ नाहींराज्यादिकारण पितासुतेवेर जेथेंबापासि दुःख नकरी सुत - मृत्यु तेथें ॥१०॥
तो पुत्र - मृत्यु तरि पूर्वील - कर्म - योगेंप्रारब्ध - कर्म सरलें तितुक्याच भोगेंऐसेंच सर्व ममतास्पद भोगरुपेंजे हर्ष शोक तितुकीं क्रियमाण - पापें ॥११॥
जे शुक भिंति न खडे रुततील तीतेंतैसें न निर्मम - जना सुख दुःख होतेंभिंती मधें दगड जे रचिले तयांचानेघे म्हणेल तरि होइल भोग साचा ॥१२॥
जैसीं क्षुधा - ज्वर - नृषादिक दुर्निवारेंदुःखें तसीं न ममता - रचितें विचारेंतीं मानिलीं तरिच कीं सुख दुःख देतीजीं ज्ञानियासि ममता गळतां न होती ॥१३॥
भोग - स्वरुप इतुकें ममतास्पदाचेंकीं लाभ हानि कळणें सुख दुःख कैंचेंतें अज्ञ मानिति तृथा ममता धरोनीब्रम्हज्ञ निर्मम म्हणोनि तया न मानी ॥१४॥
बाहेरही सुत - धनादिक - लाभ - हानीजाणोनि अज्ञ सुख दुःख तनूंत मानीजी दैहिकें तितुकिंही उठती शरीरींभिंतीसि लागति खडे उभय - प्रकारीं ॥१५॥
हें कर्मतत्व जरि येस्थळिं पूर्वपक्षीतर्के करी द्विविधही फळ तुल्य लक्षीबाहेरुनी विषयही सुख दुःख देतीतैसें ममत्व सम दोनिहि कां न होती ॥१६॥
हा तर्क तों अनुभवासि विरुद्ध आधींव्याधी जसी म्हणवितील तसीन आधीआधी विवेक करितां चुकतील जैसेव्याधी विवेक करितां चुकती न तैसे ॥१७॥
मानी तरीच तनयादिक लाभ हानीहीं दैहिकें न चुकती जरि हा न मानीया कारणें सुत धनादिक बात्द्य जैसेंदेहासि दुःख सुख तें म्हणवे न तैसें ॥१८॥
बाहेरुनी विषय हे जरि सौख्य देतेतेव्हां क्षुधा - ज्वर - तृषार्त सुखीच होतेस्त्रग्गंधलेप करि शीतळ तापहर्तानेदी तथापि सुख काम - तृषा - क्षुधार्ता ॥१९॥
देहासि भोग सुख दुःख मनासि नाहींतें बोलवे न सुख दुःख तयास कांहींगंधें फुलें अति - सुगंध - सुमंद - वातेंकामातुरासि विरहीं सुख काय होतें ॥२०॥
प्रारब्धकर्म वदति क्षय भोग - रुपेंभोग - स्वरुप सुख दुःखचि पुण्य पापेंभोक्त्यासि भोग नकळोनिहि भोग देहींतो भोग कीं कळलियाविण भोग नाहीं ॥२१॥
भोक्त्यासि भोग नकळोनिहि भोग देहींसकचंदनें शव अलंकृत भोग तोहीआलिंगिती युवति जाळिति पुत्र जेव्हांभोक्त्याविणेचि मग भोग घडेल तेव्हां ॥२२॥
भोक्त्यासि दुःख - सुख - भोग कळेल जेव्हांतो पुण्य - पापमय भोग सरेल तेव्हांदेहासि भोग सुख दुःख न आत्मयासीतेव्हां सुखाऽसुख असे फळ याचिपासी ॥२३॥
कामातुरा सुमन - चंदन - सौख्य नाहींदेहीं रति - श्रम मनांत न दुःख कांहींतेव्हां सुखाऽसुख - फळें असती स्व - देहींकाळें फळें तरु तरुचिमधील तेही ॥२४॥
दुःखें सुखें असति कर्म जयाचि देहींबाहेरुनी विषय होति निमित्त कांहींजैसीं जलें तरुसि येति फळें रसाळेंऐसें तथापि फळ केवळ नृक्ष - मूळें ॥२५॥
येथें सुखाऽसुख फळें तनु वृक्ष - रुपेंवृक्षासि बीज निज पूर्विल पुण्य - पापेंबीजाऽनुरुपचि तरुसि फळें विचित्रेंतेव्हां जळें तरुसि जीवन - रुप - मात्रें ॥२६॥
देहीं क्षुधा - ज्वर - तृषादिक दुःख जेव्हांबाहेरुनी नव्हति कोणिहि हेतु तेव्हांऐसेंचि पुष्प फळ जें सुखनाम तेंहीवृक्षामधें फळ तसीं अवघीं स्व - देहीं ॥२७॥
दुःखें सुखें असिं अहंपण - दुर्निवारेंहोती ममत्व - रचितें न असीं विचारेंजें दुर्निवार तितुकें सुख दुःख देहींबाहेरिल्या तनुसि आदळतात तेंही ॥२८॥
याकारणें स्व - सुख दुःख फळेल जेव्हांप्रारब्ध दुःख - सुख देइल यासि तेव्हांभिंतीमधें दगड येरिति भोग देहींभिंतीस आदळति जे ममताख्य तेही ॥२९॥
प्रारब्द तें दगड पूर्विल पुण्य - पापेंमाती तसीं दिसति पांचहि भूतरुपेंतो होय कर्दम अहंममतादि - नीरेंभिंती करी विधि तई विविधें शरीरें ॥३०॥
प्रारब्धरुप दगडाचिमधून कांहींपुत्रादिरुप उरलें रचितां स्व - देहींतेही खडे वसति भिंतिस काळ येतांभिंतीमधील गळती निज - भोग होतां ॥३१॥
प्रारब्ध तें दगड भिंतिमधील जैसेकाळें करोनि गळती फळ - भोग तैसेघोंडे जसे गळति भोग फळोनि जातीभूतें शवीं उरति पांचहि जेविं माती ॥३२॥
लागोनि जे दगड ते पडती निराळेभिंती वरील निज - भोग - समाप्ति - वेळेज्या कां नसोडिति खडे ममतार्द्रभिंतीते संचितें इतर - भिंतिस हेतु होती ॥३३॥
ते भिंतिचा निज - धणी क्रियमाणरुपेंहे पूर्व भिंति पडतां कृत - पुण्य - पापेंआणीक भिंति करितां ममतार्द्रचित्तींजे रुतले दगड कारण तेथ होती ॥३४॥
ऐसींच दैहिक - सुखार्थ करोनि कार्येदुःखी सुखी म्हणुनि मानुनियं अधैर्येपाषाण नूतन अहंममतार्द्रचित्तींजोडोनि नेउनि सवें करि अन्य भिंती ॥३५॥
पाषाण ते विधि अहंममता विभागेंकांहीं तनूंत किति एक - ममत्व - योगेंजीवासि भोगवि अशा द्विविध - प्रकारेंदुःखें सुखें द्विविध वास्तव या विचारें ॥३६॥
जे जागरीं विषय रुप - रुसादि घेतीसंस्कार ते दगडरुप मनीं धरीतीभिंती चराचर निजोनि मनीं करितोदेहांतरासि कृत - कर्म असेंचि नेतो ॥३७॥
यालागिं निश्वित सुखाऽसुख - तारतम्येंजेंसीं अहंपण तसीं न ममत्व - गम्येंबाहेरुनी विषय केवळ हे तु तेथेंदुःखा सुखा घडति हे म्हणवे न येथें ॥३८॥
जो अज्ञ तो द्विविध - दुःख - सुखा बुडालादैहीक मात्र नसुटे फळ योगियालाआतां स्व - दैहिक - सुखाऽसुख अज्ञ भोगीतैसें न भोगिति कदापिहि आत्मयोगी ॥३९॥
दुःखांत धैर्य सुख भोगुनिही उपेक्षाभोगूं पुढें सुख अशी न जया अपेक्षाजे दुःख भोगुनि न शोक - निमग्न होतीहोणार दुःख कळल्या भय जे नघेती ॥४०॥
एवं ममत्व सुख दुःख न योगियांसीदैहिक भोग नचुकेचि कधीं तयांसीते भोग भोगुनिहि मागुति भोग कांहींविश्वाऽत्मतेंकरुनि केवळ ज्यासि नाहीं ॥४१॥
जाणोनि चिज्जडविवेकहि विश्व - साक्षीहोऊनि जो निज - अनंतपणास लक्षीहे वर्म त्यासि नकळे सुख - दुःख भोगीभोक्ताचि मी म्हणुनि मानितसे कुयोगी ॥४२॥
कोणी मृषा म्हणुनि बोलति भोग कैंचेमिथ्या भुजंग परि ते भय - कप साचेस्वमीं मृषा गज मृषा तनु मर्द्दिताहेद्रष्ट्रा तथापिहि खरेंचि म्हणोनि पाहे ॥४३॥
नाहींच भोग तरि त्यास किमर्थ मुक्तीशास्त्रें किमर्थक किमर्थ स्रदुक्ति युक्तीकर्तृत्त्व तें प्रकृतिचेंचि चिदश भोक्तागीतेंत निर्णय करी हरि वेद - वक्ता ॥४४॥
भोत्कृत्व हें न म्हणवे परमात्मयासीआत्मत्व तें अनुभवाप्रति ये जयासीत्याला विटाळ म्हणवे न सुखाऽसुखाचासर्वात्म - योग - निपुणासहि भोग कैंचा ॥४५॥
जेथें चिदंश मन इंद्रिय - भोग तेथेंहा धर्म वर्जिति जडाजड सर्व जेथेंऐशास दुःख - सुख - भोग घडेल कैसाश्री - सूर्य हा मृगजळांत बुडे न जैसा ॥४६॥
प्रारब्ध - कर्म - फळ तें तरि सर्व भोगीसाक्षी तथापिहि अहो जगदात्मयोगीहा निर्णय प्रकरणीं पुढिल्या मुरारीबोलोनियां हरिल संशय दुःख - हारी ॥४७॥
अध्याय हा रचियला तिसरा परेशेंआत्मैक्य - वांचुनि न लिंपति भोग - लेशेंअध्याय - नाम इतुक्यास्तव भोग - तत्त्वज्ञानी अलिप्त कळतां जगदात्मकत्व ॥४८॥
आत्मा अलिप्त सुख दुःख तया न जेव्हांप्रारब्धभोग घडती कवणासि तेव्हांहा देह नित्य शव तो सुख - दुःख नेणेंया गोष्टिचा उकल एक हरीच जाणें ॥१॥
जों ज्ञानियासि जगदात्मकता कळेनासंसार - बंध त्दृदयांतुनि तों ढळेनाचैतन्य जें वळखिलें चिदचिद्विवेकेंतें तों फिरे जड - शरीर - पुरें अनेकें ॥२॥
चैतन्य केवळ शवासहि जें प्रकाशीतें देखिल्यावरि नव्हे मग एकदेशीत्यालागिं देखति तदात्मकते करोनीत्याला न भोग जगदात्मक तें म्हणोनी ॥३॥
विश्वात्मता अनुभवी मग भोग त्यालासंसार - दुःख - सुख केविं घडेल बोलाप्रारब्ध - भोग तरि त्यासहि तो सुटेनासंदेह कृष्ण करुणेंविण हा फिटेना ॥४॥
विश्वात्मतेकरुनि दे स्व - जनासि मोक्षश्रीकृष्ण तो हरिल हा दृढ पूर्वपक्षविश्वात्मता हरिस बिंब - सुख - स्वरुपेंत्यालाचि जीवपन चितू - प्रतिबिंब - रुपें ॥५॥
जीवासि त्या प्रलय आणि सुषुप्ति - काळींबिवैंक्य केवळ न जीवपणें निराळींतीं वेगळीं प्रगटती उठतां उपाधीकीं जागरीं नितळतां जळरुप - बुद्धी ॥६॥
बुद्धी अनेक उदकें घटरुप देहींभासे अनेकजळिं एकचि बिंब तेंहीबिंबीं मिळोनिहि पृथक् प्रतिबिंब होतेंप्रारब्ध - भोग सुख दुःख घडे तयातें ॥७॥
प्रारब्ध - भोग निज - पूर्विल पुण्य - पापेंआत्मत्व मीपण तई प्रतिबिंब - रुपेंबिंबात्मता अनुभवी सकळात्मयोगीभोगासि तो प्रतिमुखात्मपणेंचि भोगी ॥८॥
सर्वा घटीं गगन तें सहसा न हालेत्याचेंचि त्या घटजळीं प्रतिबिंब डोलेआत्मा असा द्विविध बुद्धि - जळांत देहींएकासि भोग - फळ सर्वगतासि नाहीं ॥९॥
आधीं जडाऽजड - विवेक कळे जयासीचैतन्य हें द्विविधही उमजे तयासीव्यापोनि मीपण असे प्रतिबिंब देहींसर्वत्र बिंबचि तसें प्रतिबिंब नाहीं ॥१०॥
बिंबात्मता गुरु - मुखें समजोनि योगीहोऊनि भोग - समयीं प्रतिबिंब भोगीप्रारब्ध - वायु करि चंचल बुद्धि जेव्हांपाण्यांत त्या डळमळी प्रतिबिंब तेव्हां ॥११॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.