बिंबात्मता अनुभवि स्व - सुखांत जेव्हांप्रारब्ध - दुःख - सुख - भोग न त्यास तेव्हांचांचल्य बुद्धिस घडे सुख - दुःख - भोगेंतेव्हां सचेतनपणे प्रतिबिंब - योगें ॥१२॥
बुद्धीमधें प्रतिमुखें जगदादि काळींभोगानिमित्तचि जसीं निघती निराळींबिंबात्मबुद्धि - जळ चंचळ होय जेव्हांभोगार्थ हें डळमळी प्रतिबिंब तेव्हां ॥१३॥
प्रारब्ध - वायु करि बुद्धि जळांत ऊर्मीत्या मीपणीं गमतसे असुखी सुखी मीनाहीच यद्यपि अहंकृति योगियालादुःखांत मीपण अवश्य दिसे तयाला ॥१४॥
वाटे न मीपण तया सुख भोग - रुपींपाहे सुखें सकळ ही स्व - सुख - स्वरुपींदुःखें मृषा परि न भॊग चुकेचि तें मीदुःखी म्हणोनि करि बुद्धि - जळांस उर्मी ॥१५॥
वाटे सुखी म्हणुनि त्यास सुखी तथापीपाहे सुखें सकळ आत्म - सुख - स्व - रुपींदुःखी सुखी म्हणुनि हे न चुके प्रतीतीनाहीं प्रतीति तरि भोगचि ते न होती ॥१६॥
भोगीं प्रतीति न चुकेचि अहंकृतीचीतेव्हां उठे अवचितें लहरी मतीचीत्या मीपणासि अवलंबुनि पूर्व - पापेंयोई अहो अनुभवी प्रतिबिंबरुपें ॥१७॥
त्या मीपणेंकरुनि ज्या प्रतिबिंबरुपेंजन्मांऽतरीं रचियलीं बहु पुण्य - पापेंत्या मीपणें सकळ तें प्रतिबिंब भोगीबिंबात्मते करुनि आतळती न योगी ॥१८॥
बिंबात्मता - अनुभवीं स्थिरता जयासीआत्मा गमे न मग चित्प्रतिबिंब त्यासीभोगोनि भोक्तृपण यास्तव त्यासि नाहींदेहीं असोनिहि अखंडचि तो विदेही ॥१९॥
झालाचि बिंब मग हैं प्रतिबिंबरुपेंदुःखें सुखे अनुभवी जरि पूर्व - पापेंबिंबात्मतेतुनि निघे प्रतिबिंब जेव्हांजो बिंब ईश्वर तयासहि भोग तेव्हां ॥२०॥
हा पूर्वपक्षहि उडे कळतां उपाधीबिंबात्मता अनुभवी परि पूर्वबुद्धीतो नित्य - मुक्त जगदीश उपाधि - भेदेंलिंपे कदापि न सुखें अथवा न खेदें ॥२१॥
ज्ञानासि भोक्तृपण भोग जडासि नाहींतो भोग त्यासहि उपाधिविना न कांहींजीवास त्यांतहि गुण त्रय भोग देतीशुद्धा उपाधिकरितांचि न भोग होती ॥२२॥
सत्वैकमात्र जगदीश उपाधि त्यालाकैसा घडे रजतमाविण भोग बोलाबिंबासि भोक्तृपण याकरितांचि नाहींचैतन्य तों सहज केवळ होय तेंही ॥२३॥
सर्वज्ञ मात्र जगदीश उपाधि - सत्वेंतोही अचेतन सचेतन बिंब तेत्वेंत्याला रजोगुण - तमोगुण - योग नाहींया दोंविणें न म्हणवे जड भोग कांहीं ॥२४॥
चैतन्य तत्व परि वृत्ति न त्यासि कांहींसत्वेंचि वृत्ति परि चित्पण त्यासि नाहींवृत्तीस दोनहि सचेतनता करीतीशुद्धा तथापि जगदीश - उपाधि - वृत्ती ॥२५॥
विद्यामयें सकळ सात्विक - वृत्तिरुपेंबिंबें सचेतन अनंत - सुखस्वरुपेंआविधका त्रि - गुण - मिश्रित जीववृत्तीतीचा प्रकाश करि चित्प्रतिबिंब चित्तीं ॥२६॥
विक्षेप आवरण दोंपरिंची अविद्याते नाशते प्रगटतां त्दृदयांत विद्याविद्या - बळें अनुभवी निज - बिंब आत्माते शुद्ध - सत्वमय - वृत्ति भवाऽब्धिसीमा ॥२७॥
विक्षेप इंद्रियगणें विषयांसि जाणेतैसेंचि आवरण आपण कोण नेणेऐसे रजोगुण तमोगुण शुद्धसत्वेंटाकोनि बिंब धरिलें जगदात्मकत्वें ॥२८॥
विक्षेप - आवरण - रुप जरी अविद्यागेली मनीं प्रगटतां परमात्मविद्यादेहेंद्रियें असति तत्कृत पुण्य - पापेंसत्वासि आतळति तीं फळ - भोग - रुपें ॥२९॥
सत्वासि जोंवरि विटाळ रजस्तमाचानाहींच तोंवरि कुभोग फळागमाचाप्रारब्ध - वायु करि चंचळ मीपणासीहे झोंबती मग गुण द्वय त्या गुणासी ॥३०॥
सत्वासिं मिश्रित गुण द्वय होति जेव्हांतींही गुणीं डळमळी प्रतिबिंब तेव्हांदुःखी सुखी म्हणुनि एक तनू प्रतीतीते तों न सर्वगत बिंब न शुद्ध वृतीं ॥३१॥
ऐसीं न ईश्वर - उपाधिस पुण्य - पापेंजो कां सचेतन अनंत - सुख - स्वरुपेंज्याला विटाळ न कदापि रजस्तमाचासूर्यास लेप न जसा रजनी - तमाचा ॥३२॥
झालाचि बिंबहि पुन्हा प्रतिबिंब - योगीहोऊनियां रजतमें सुख दुःख भोगीपाण्यांत बिंब निघतां प्रतिबिंब नाहींबिंबात्मतेंतुनि दिसे प्रतिबिंब तेंही ॥३३॥
येथें म्हणाल जरि बिंब अनंत जेव्हांबाहेर आंत निघणें रिघणें न तेव्हांहें तों खरें परि अहो उपमेसि कांहींसर्वत्र साम्य निज घेउनि येत नाहीं ॥३४॥
ब्रम्हीं प्रपंच कलशादि - विकार जैसेमातीमधें म्हणुनि बोलति वेद ऐसेंचैतन्य जें अचळ आणि अनंत त्यालामातीसमानहि कसें वदवेल बोला ॥३५॥
मातीच सत्य कलशादि असत्यरुपींमाती तथापिहि यथास्थित तत्सरुपींब्रम्हीं प्रपंच - घडमोडि घडोनियांहीब्रम्हत्व - हानि अणुमात्र तथापि नाहीं ॥३६॥
होऊनिही कलश हानि न मृत्पणाचीब्रम्हत्वहानिहि असी न घडे प्रपंचींतें ब्रम्ह तों अचळ नित्य अनंत जेव्हांदृष्टांतिही मग विलक्षणता न तेव्हां ॥३७॥
हें क्षुद्र बिंब रिघतें उदकांत जेव्हांपाण्यामधें मग न तत्प्रतिबिंब तेव्हांदृष्टांत एक पण - मात्र - निरुपणीं हादृष्टांत याउपरि आणिक एक पाहा ॥३८॥
जैशा विशाळ दरडी सरितादि - तीरींत्यांचें नदींत दिसतें प्रतिबिंब नीरींयेऊनि पूर दरडीवरि जाय पाणीतेव्हां नदे खतिजळीं प्रतिरुप कोणी ॥३९॥
तें ओहटोनि जळ ये सरितेंत जेव्हांभासे पुन्हा दरडिचें प्रतिबिंब तेव्हांपाणी नदीमधिल बुद्धि तसी शरीरींजीवात्मता - दरडिचें प्रतिबिंब नीरीं ॥४०॥
सर्वत्रही धरणि - बिंब अनंत जैसेंमिथ्या शरीर सरितादिकरुप तैसेंमातीच सत्य कलशादि असत्य रुपेंपृथ्वी खरी नदितदाक मृषा - स्वरुपें ॥४१॥
आधार एक धरणी उदकासि जैसीचैतन्य भूम,इ उदकोपम बुद्धि तैसीआधार होउनि जळीं प्रतिरुप रुपंपृथ्वी तसी द्विविध बुद्धि सचित्स्वरुपें ॥४२॥
दृष्टांत येरिति तथापिहि एक देशीचैतन्य सर्वगत बुद्धि - जळीं प्रकाशीबिंबावरी प्रसरते शुभ बुद्धि जेव्हांबिवैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हां ॥४३॥
देहावलंबन तिला सुख दुःख भोगीभोगार्थ होय मग हा प्रतिबिंब योगीभोगी तथापि मज भोग असें न मानीबिंबात्मता वळखिली निज - राजधानी ॥४४॥
अज्ञान बाळ निज देश विदेश नेणेदेशांतरांत निज देश सुबुद्धि जाणेभोगासि होउनि जरी प्रतिबिंब भोगीबिंबात्मतेसि विसरे न तथापि योगी ॥४५॥
बुद्धीस जोंवरि विवेक असा कळेनातों हें अभोक्तृपण केवळ आकळेनाबिंबास भोग न घडे प्रतिबिंब भोगीदेखे समाधि - समयांत तंदैक्य योगी ॥४६॥
चैतन्य भोगित असे म्हणवे न ऐसेंते भोगणें मज जडास घडेल कैसेंचित्ब्रम्ह केवळचि भोगितसे म्हणावेंतेव्हां चिदैक्य सुख दुःख समान व्हावें ॥४७॥
एकासि जेसमयिं दुःख - सुख - प्रतीतीजीवेश्वरांस सकळांसहि भोग होतीनाना उपाधि तरि वस्त्र जळेल जेव्हांमूर्ती तयावरिल वाचति केविं तेव्हां ॥४८॥
नासे व्रणें करुनि अंगुळिमात्र कांहींचैतन्य दुःखित तथापिहि सर्व - देहींचैतन्य एक असतें तरि एक देहाहोतांचि दुःख करितें जन सर्व हा हा ॥४९॥
त्याकारणें वदति वेद अनेक कुंभींएक प्रभाकर दिसे बहु भिन्न अंभींज्या ज्या घटीं डळमळी जळ सूर्य तेथेंहाले न चंचळ दिसे घट भिन्न जेथें ॥५०॥
ऐसींच सत्व - उदकीं प्रतिबिंब - रुपेंतें ब्रम्ह केविं म्हणवेल निज - स्वरुपेंब्रम्हात्मता कळलि याउपरीच योगीप्रारब्ध - भोग मग तत्प्रतिबिंब भोगी ॥५२॥
बिंबास तों न म्हणवे सुख दुःख कांहींसर्वात्मता - अनुभवीं प्रतिबिंब नाहींज्याला न भोक्तृपण शाश्वत तोचि आत्माज्ञात्यासि भोग न अशा कळतांचि वर्मा ॥५३॥
भोग - प्रतीति - समयांत अभोक्तृता हेंयोगेश्वरासिहि अहो म्हणणें न साहेभोगीं नसोनिहि अभोक्तृपण - प्रतीतीभोगोनि भोगहि तयासि कसे न होती ॥५४॥
हा पूर्वपक्षहि हरीच हरील येथेंबोलेल केवळ पुढें निज - तत्त्व जेथेंहा भोक्तृतत्व म्हणवोनि चतुर्थ केला ॥५५॥
अध्याय वामन - मुखें प्रणिपात त्याला
भोग - प्रतीति - समयांत कसा अभोक्ताबोलेल हें हरिच आपण वेद - वक्ताभोगीं असोनिही अभोक्तृपण - प्रतीतीभोक्ता नव्हे म्हणुनि वर्णिल तत्त्वरीती ॥१॥
चैतन्य सर्वगत केवळ बिंब जैसेंदेही कमात्र भरलें प्रतिबिंब तैसेंदोहींस सत्वगुण - योग तरी प्रतीतीहेतों सुषुप्ति सरतां खुण सर्व चित्तीं ॥२॥
नाहीं सुषुप्ति - समयीं स्व - पर - प्रतीतीआत्मा तथापि निज हाचि विचारचित्तींभोगीं अभोक्तृपण यद्यपिही स्फुरेनाबिंबात्मता निज तथापिहि अंतरेना ॥३॥
भोगांत जेसमयिं भोक्तृपणप्रतीतीआत्मा जरी स्फुरतसे प्रतिबिंब चित्तींआत्मा नव्हे नम्हणवे प्रतिबिंब जेव्हांभोक्तृत्वही स्फुरतसे त्दृदयासि तेव्हां ॥४॥
सत्वोदकांत तम - कर्दम मिश्र जेव्हांतें बिंब जें नम्हणवे प्रतिबिंब तेव्हांसत्वांत जागरिं तया प्रतिबिंब चित्तीबिंबींच त्यासहि निजात्मपणप्रतीती ॥५॥
निद्गेंत जो बहुसुखें स्व - सुखें निजेलोंतो प्रत्ययासहित जागृत मीच झालोंहा प्रत्यय प्रतिमुखात्मपणें तथापीआत्मत्व आठवि सुषुप्ति - गत - स्वरुपी ॥६॥
जैसें सुषुप्ति - समयीं प्रतिबिंब - बिंबींएकच येरिति समाधि - सुखाऽवलंबींजागा सुषुप्ति - सुख आठवि याचरीतीभोगोनि भोगहि अभोक्तृपण - प्रतीती ॥७॥
बिबैक्यही सम समाधि - सुषुप्ति - काळीभोगामधें त्रिगुण हे प्रतिबिंब पाळीत्यालाचि यद्यपिहि भोक्तृपण - प्रतीतीआहेचि बिंबहि अभोक्तृपणें स्वचितीं ॥८॥
आधार सत्व - सलिला क्षिति बिंब जेव्हांचिद्रूप त्यांत दरडी दिसतात तेव्हांबिंबात्मतेकरुनि सत्व - जळ प्रकाशेतेव्हां तयाउदकिं चित्प्रतिबिंब भासे ॥९॥
चिद्विंब जें लय - समाधि - सुषुप्ति माजीआत्मा न तो म्हणउनी म्हणवे कसा जीभोगासि जेसमधिं तत्प्रतिबिंब भोगीबिंबीं अभोक्तृपण देखति आत्मयोगी ॥१०॥
बिंबीं कदापि न गुण - त्रय - रुप वृत्तीयालागिं तेथ नवसे किमपि प्रवृत्तीभोगीं प्रतीति उपजे प्रतिबिंबरुपींसत्वें समाधि - गत बिंब सुखस्वरुपीं ॥११॥
तेथें प्रतीति नदिसे पडतां सुषुप्तीसत्वास जेसमयिं तामस मूढ वृत्तीसर्वत्र तें वळखिलें निज सर्व संतींसत्वें तथां तहि समाधि - सुख - प्रतीती ॥१२॥
साक्षी सुषुप्ति - समयीं म्हणती तयातेंनिर्धर्मकत्व बरवें नकळे जयातेंसाक्षित्व ईश्वर - उपाधिकरुनि जेव्हांजीवात्मयासि निरुपाधि चिदैक्य तेव्हां ॥१३॥
साक्षित्व केवळ घडे अगुणीचं जेव्हांसापाधिधर्म निरुपाधिपणींच तेव्हांसाक्षित्व यास्तव न केवळ निर्गुणत्वींतेथे चिदैक्य तमज्यासमयांत सत्वीं ॥१४॥
सत्वोंदकांत मिसळे तम पंक जेव्हांबिंबामधे प्रतिमुखासि चिदैक्य तेव्हांसाक्षित्व ईश्वरउपाधिस कां असेनायाला प्रतीति निरुपाधिपणें दिसेना ॥१५॥
स्व - प्रत्ययाविण उपाधि असोनि नाहींसाक्षित्व तेथ वदधे न तयासि कांहींजीवात्मयासि न असे प्रळयीं प्रतीतीतैसी असोनिहि उपाधि पडे सुषुप्तीं ॥१६॥
अंधासि भास्कर दिसे न अशाच रीतीझांकील नेत्रहि तई न रवि - प्रतीतीएवं प्रतीति न असे प्रळ्यांत जैसीनाहीं सुषुप्ति समयांतहि यासि तैसी ॥१७॥
साक्षित्व यासि नघडे मतिमूढ जेव्हांबिबैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हांसत्वांत जागरिं जरी प्रतिबिंब होतेआत्मत्व शाश्वत अखंडहि तेंचि यातें ॥१८॥
तें नातळे रजतमा सुख दुःख भोगीतेथें अभोक्तृपण देखति आत्मयोगीसत्वांत जागरिं जरी प्रतिबिंब जेव्हांपाहे सुषुप्ति - सुख आपण तोंचि तेव्हां ॥१९॥
आत्मप्रतीति सकळां प्रतिबिंबरुपेंज्ञात्यास केवळ सुषुप्ति - गत - स्वरुपेंहोऊनि भोगित असे प्रतिबिंब देहींबिंबासि भोक्तृपण तो नदिसेचि कांहीं ॥२०॥
बिंबीं अभोक्तृपण सिद्ध परि प्रतीतीबिंबासि तो दिसतसे न असेच रीतीत्याला अभोक्तृपण मानियलें तथापीनेणें अभोक्तृपण तें स्व - सुख - स्वरुपीं ॥२१॥
भोक्तृत्व जेसमयिं या प्रतिबिंबरुपींतेव्हां अभोक्तृपण तें न गमे स्वरुपींयालागि भोगुनि अभोक्तृपण - प्रतीतीकैसी म्हणाल परिसा तरि येथ रीती ॥२२॥
चैतन्य हें त्रिविध वेद - पुराण - संतीमानूनियां उरविलें निज एक अंतींबिंबार्क ईश दुसरें प्रतिबिंब नीरींजो जीव त्यांतुनिहि तत्प्रतिभा शरीरीं ॥२३॥
चिद्विंब तो प्रतिफळे रवि कांस्य - पात्रींजीवत्व तें सकळ - जीव - उपाधि - मात्रींभिंतीवरी प्रतिमुखांतिल तेज जैसेंस्थूळासि चेतवितसे प्रतिबिंब तैसें ॥२४॥
ऐशातिहींवरि फिरे जन - सत्व - वृत्तीसत्वेंकरोनिच तदन्यगुणप्रवृत्तीचिच्छक्ति सत्वगुण त्या करितां प्रतीतीसत्वैक मात्र न उरे पडतां सुषुप्ती ॥२५॥
तें सत्व शुभ्र अति निर्मळ नीर जैसेंकाळें तथांत तम कर्दम - रुप तैसेंतें क्षोभतां उदक सत्व गढूळ जेव्हांमोडे प्रतीति किमपि स्फुरते न तेव्हां ॥२६॥
सत्वांत जागरिं घडे प्रथम प्रतीतीतत्वत्ययें मग रजस्तमरुप वृत्तीचैतन्य तो त्रिविध एकचि त्यांत जेथेंसत्वें प्रतीति गमते तितुकीच तेथें ॥२७॥
सूर्य प्रभांतर तयांतहि दृष्टि जेथेंपावे प्रकाश गमतो तितुकाचि तेथेंदृष्टीस चंचल दिसे प्रतिबिंब जेव्हांबिंबार्क चंचळ नसे नदिसोनि तेव्हां ॥२८॥
भोगांत हा डळमळी रवि जेविं नीरींचिद्विंब सूर्य नदिसोनि नसे विकारींबिंबात्मतेकरुनि चंचळता नमानीभोगोनि भोग नमनी तरि काय हानी ॥२९॥
भोगांतही जरि अभोक्तृपणासि पाहेबिंबात्मतास्मृति अखंड तयासि राहेभोगी सुखाऽसुख तरी प्रतिबिंब त्याचेंआत्मत्व बिंबगत शाश्वत जासि साचें ॥३०॥
भोक्तृत्व आणिक अभोक्तृपण - प्रतीतीसत्तेसि तों नसति दोनिहि बुद्धी - वृत्तीबुद्धींन भोगित असे प्रतिबिंब जेव्हांबिंबीं अभोक्तृपण आठवि बुद्धि तेव्हां ॥३१॥
बिंबीं अभोक्तृपण सत्य जरी कळेनाहें ज्ञान - हीन - जन बुद्धिस आकळेनानेणें अभोक्तृपण बिंब जरी तथापीआत्मत्व होउनि न भोग तथा स्वरुपीं ॥३२॥
आत्माचि तो कसि तयासि नसे प्रतीतीऐसें म्हणाल तरि कां न पहा सुषुप्तीआत्मा प्रतीतिमय जो इतुकाचि जेव्हांनाहीं सुषुप्ति समयीं तरि काय तेव्हां ॥३३॥
आत्मा सुषुप्तिंत असे तरि याप्रतीतींत्याचें स्वरुप नव्हती गुण - बुद्धि - वृत्तीशंकानिवृत्ति इतुकी निज - वैदिकांचीशंके तथापिहि अवैदिक - बुद्धि कांची ॥३४॥
लोकीं द्विधा द्विविध निंदक लोक - वेदींबौद्ध प्रसिद्ध कपटें करि भेद - वादीयौद्धां प्रमाणचि न केवळ वेद जैसेपारवांडियासी अवघे निगमार्थ तैसे ॥३५॥
त्यामाजि बौद्ध म्हणती पडतां सुषुप्तीआत्मत्व शून्य उरतें नसतां प्रतीतीयेथेंच यावरि नवेचुनि वेदवाणीसंदेह हा अनुभवें हरि चक्रपाणी ॥३६॥
जें शून्य ते सुख असें सहसा घडेनातेव्हां सुषुप्ति समयीं सुख सांपडेनाहोतांचि जागृति सुख स्मरतो किमर्थस्वमांत जागरिं न जें सुख तें समर्थ ॥३७॥
चैतन्य तेंचि सुख जागरिंही प्रयासींआत्म - स्वरुप गमतें सुख जे जयासीजाणे सुखाऽसुख तयाविण अन्य जेव्हांयाला सुषुप्तिसुखही नघडेचि तेव्हां ॥३८॥
जाणे सुखासि सुख यासि जई कळेनानाहींच हा जरि सुषुप्तिस आढळेनाऐसें म्हणा जरि म्हणाल तरी घडेनातें सौख्य यासि मग जागरिं सांपडेना ॥३९॥
होतों सुखें किमपि जेथ म्हणे कळेनातें यासि तेथ नसतां सुख आकळेनाआहे म्हणाल तरि तरी तो सुख - भोग यालाझाला कसा किमपिही नकळोनि बोला ॥४०॥
आतां म्हणाल सुख तेथ तया स्फुरेनाजों यासि जागृति न तोंवरि तें रमरेनातेव्हां तनूसि निजल्यावरि गंध लागेतैं सत्य जागरिं कळे सुख तेंचि सांगे ॥४१॥
तेव्हां सुषुप्ति - समयीं सुख - लेश नाहींस्रकूचंदनादि सुख - लेश कळे न कांहींहोतों सुखें किमपि जेथ कळे न तेथेंया प्रत्ययासि तरि उत्तर हें न येथें ॥४२॥
स्रकूचंदनादि घडले मज भोग देहींनिद्रेंत हें सुख मला कळलें न कांहींऐसें म्हणे परि सुषुप्ति सुखासि ऐसेंनिद्रेंत सौख्य नव्हतें म्हणवेल कैसें ॥४३॥
तेथें प्रतीति नसतां सुख सिद्ध जेव्हांभोगेंकरोनि सुखभोग न तेथ तेव्हांजों भोग्य भोक्तृपण भोगज सौख्य ऐसानाहीं विवेक सुख - भोग वदाल कैसा ॥४४॥
एवं असोनि नकळे सुख तेथ जेव्हांतें भोगजन्य सुख तों म्हणवे न तेव्हांजीकां सुषुप्ति समयीं सुखरुप तेथेंतो बुद्धिने स्मरतसे सुख तेंचि येथें ॥४५॥
चैतन्य आणि सुख यास्तव एक दोन्हीआतां म्हणाल जरि चेतनतेसि हानीचैतन्य कोठुनि वदा उपजे प्रबोधींबुद्धी स्मरे निज - अचेतनते समाधीं ॥४६॥
काहींच जेथ नकळे सुख तेथ आहेया प्रत्ययें निज - जडत्वचि बुद्धि पाहेतेथील जें सुख तयासिच आत्मता हेचैतन्य - हानि म्हणणें न तयासि साहे ॥४७॥
बुद्धीस यास्तव कळे परि भोग नाहींज्यालागि भोग जड तें म्हणवेन कांहींत्या चित्सुखेंकरुनि हे दिसती प्रतीतीबुद्धि - प्रतीति न उरे पडतां सुषुप्ती ॥४८॥
कांहींच जें न कळणें जडरुपता हेआनंद - मात्र - मतिवांचुनि हाचि राहेभोक्ता तयाविण दुजा तरि सांपडेनाबुद्धीस भोक्तृपण तों सहसा घडेना ॥४९॥
आत्मत्व केवळ सुषुप्तिपुढें ढळेनाअन्यत्र भोक्तृपण त्याविण आढळेनाहें वृत्तिरुप कळणेंहि तया घडेनावृत्ती सचेतन सुषुप्ति तई पडेना ॥५०॥
बाहेरही पसरती बहु दूर वृत्तीदेहाचि आत्म - गत भोग तथापि होतीज्याला न भोग जडता स्फुट सिद्ध त्यालाचैतन्य - सिद्धि - सुखमात्र न केविं बोला ॥५१॥
आतां म्हणाल तरि कां न तया प्रतीतीहे आइका अनुभवेंचि करुनि रीतीआत्मा वदे परि जिभेविण बोलवेनाचाले स्वयें परि पदाविण चालवेना ॥५२॥
सत्तेकरोनिच उठे स्वपर - प्रतीतीएवं तथापिहि अपेक्षित तेथ वृत्तीआत्मा असे नरव - शिरवाऽग्र समग्र - देहींवृत्तीविणें स्फुर तसे न तयासि तोही ॥५३॥
आत्मा तनूंत भरला परि वृत्ति जेथेंपावेल अंग तितुकेंचि गमेल तेथेंपादादिकां अवयवां मनि जों रमरेनाव्यापोनि तेस्थळिं असोनिहि तें स्फुरेना ॥५४॥
येणेंरितीं स्व - पर - रुपहि याप्रतीतीहोती प्रकाशति जई निज - चित्त - वृत्तीवृत्ती प्रकाशति म्हणाल तुम्हीं जडालातेव्हां सुषुप्ति - सुख वृत्तिवरीच बोला ॥५५॥
अंगीकराल तरि तेथ नसे प्रतीतीआतां प्रकाशक कशा जड - रुप - वृत्तीमानाल वृत्तिकरितां जरि या प्रतीतीहोती सुषुप्ति - समयीं जडमूढ वृत्ती ॥५६॥
ज्याला सुषुप्ति - सुख घेउनि तोचि वृत्तीवृत्तिप्रकाशक तयास करी प्रतीतीवृत्ती नसोनिहि सुषुप्तिंत सौख्य जेव्हांजों वृत्तिहीन सुख केवळ तोंचि तेव्हां ॥५७॥
एवं प्रतीति करणार जडा तयातेंसांगा सुषुप्ति - सुख केविं जडासि होतेंज्याला सुषुप्तिसुख जागर - भोग त्यालातो स्वप्रकाश सुखरुप न केविं बोला ॥५८॥
ज्याला सुषुप्ति - ममयीं न दिसे प्रतीतीतोचि स्मरे स्वसुख तें उठतांचि वृत्तीवृत्ति - प्रकाशपण त्यासि किमर्थ तेथेंनाहीं निजोनि उरतो सुखमात्र जेथें ॥४९॥
ऐसें म्हणाल तरि झांकति नेत्र जेव्हांदीप प्रकाशित नसे नयनासि तेव्हांदीपें प्रकाशित घटादिक सर्व गेहींआत्मा प्रकाशित समस्त असेंचि देहीं ॥६०॥
निद्रा - मतींत मिसळे तम - पंक जेव्हांदृष्टींस जेविं पटलें तम तीस तेव्हांदीपें प्रकाशित घरांत घटादि - सृष्टीतैसीच ते पटळ - युक्तहि अंध - दृष्टी ॥६१॥
एवं तथापिहि दिसे नयनीं न कांहींऐसी सुषुप्ति - समयांतहि बुद्धि देहींदीप - प्रकाश गृहिं आणि घटादि - सृष्टीदीपेंच हे सकळ देखति जेविं दृष्टीं ॥६२॥
आत्म - प्रतीति - सहिता सकळां प्रतीतीआत्म - प्रभेकरुनि जाणति बुद्धि - वृत्तीहें श्रोत - शुद्ध - मत यासि न बाध कांहींऐसें अवाधित मतांतर मात्र नाहीं ॥६३॥
क्रांते मतें सकळ - आत्मपणासि जेथेंनेणोनि बोलति समस्त अयुक्त तेथेंतो भ्रांत जो द्विज निज - द्विजता न जाणेतैसाचि लोक निज - आत्मपणासि नेणे ॥६४॥
ऐसें असोनि करिती कुमतें तथापीअंधासि अंध - पथिं घालिति अंध - कूपींजैसीं अवैदिक - मतें अति - वेद - बाह्येंवेदाश्रितें तसिंच जीं कुमतें असात्द्यें ॥६५॥
तीं उत्तर - प्रकरणीं अवघीं मुरारीदूषील आत्मपण बाधित ज्या विचारींवृत्ति - प्रकाशक न वृत्तिमय प्रतीतीआत्मस्वरुप म्हणवोनि सुषुप्तिरीती ॥६६॥
सर्वाऽनुभूत मत वैदिक सिद्ध होतांआत्मा अवाधित कसा इतराति आतांजे कां अवैदिकहि वैदिक - वेष - धारीते ये स्थळीं करिति तर्क कुतर्क भारी ॥६७॥
नाहीं सुषुप्ति - समयीं म्हणतां प्रतीतीअंगीकरा म्हणति नास्तिक - शून्य - रीतीत्यांचा कुतर्क - मत - भंग करावयालागूटार्थ हा अनुभवें हरि बोलियेला ॥६८॥
नाहींतरी श्रुतिविरुद्ध मतें प्रसिद्धेंकेलीं बृहस्पतिमुखें सहजें विरुद्धेंजे बात्द्य वैदिक दिसोनिहि गुप्त - बोधश्रुत्यर्थ मोडिति न जाणति तत्व शुद्ध ॥६९॥
आत्मत्व - खंडन तथा मतिचें मुरारीआतां करील निगमाऽनुभवें विचारींआत्मत्व - खंडन करील रथागपाणीत्याचें न जैं अनुभवी निगमीं पुराणीं ॥७०॥
तें उत्तर प्रकरणीं सुजनीं पहावेंआत्मत्व येथ कथिलें हरिनें स्वभावेंहा आत्मतत्व म्हणऊनि यथार्थ नामेंअध्याय हा रचियला जगदेक - धामें ॥७१॥
दिसति भेदम तें निगमाश्रितें परि समस्तहि नास्तिक - मिश्रितेंनिगम - दूषक नास्तिक ते जसे श्रुतिगताऽर्थ - विदूषक हे तसे ॥१॥
अनाधिगत अवाधितार्थवेदीं अधिगत बाधित वर्णिताति भेदींअधिगत सकळांसि भेद जी हा निवडिति तत्वमसि श्रुतीतही हा ॥२॥
आहेसि तो तूं म्हणऊनि साचा जो अर्थ हा तत्वमसि श्रुतींचाश्रुत्यर्थ हा अर्थ गुरुपदेशें कळे रमा - कांत - कटाक्ष - लेशें ॥३॥
चा० छं० सुधार्थ हा उलंडुनी अलौकिकार्थ खंडुनीअदृष्ट अर्थ धुंडुनि प्रयत्न - भेद मांडुनीस्वयेंचि जीव - ईश्वरा प्रसिद्ध भेद पामराअसेंचि तत्व तत्परा निरुपती अहो परा ॥४॥
पृ० छं० नसोनि नृप ठाउका पुसत तो कसा भूपतीनव्हेसि नृप तूं असें वदति उत्तरें त्याप्रतीतसेंचि निगमासि जें पुसति ईश सांगा कसानव्हा तुम्हिं परेश तो म्हणुनि वेद बोले असा ॥५॥
जो सर्वेश्वर तूं नव्हेसि म्हणतो प्रामाण्य त्याला कसेंप्रख्याताऽर्थनिरुपणें करुनियां होतें कळेना असेंवृक्षाग्रावरि बैसले परि अहो तन्मूळ हें छेदितीजे कां तत्वमसि श्रुति सहि असें जाणोनि वारवाणिती ॥६॥
स्पष्ट तत्त्वमसि वेद बोलतो अर्थ भेदपर यासि वाटतोरोगियासि शशि जेवीं पींवळा तत्कळा न दिसती समुज्वळा ॥७॥
संध्या करा प्रतिदिनी म्हणवोनि जैंसावाक्यार्थ तत्वमसिचा न किमर्थ तैंसास्पष्टार्थ आणिक अलौकिक तत्व जेथेंव्याख्या बळेंचि करिती विपरीत तेथें ॥८॥
श्रुतिगत न दिसे जो अर्थ जो व्याकरीतीअधिगत सकळांतें साधिती द्वैत - रीतीश्रुति - गत दिसतो जो अर्थ तो आवडेनागुरुविण नकळे जें बोलती तें घडे ना ॥९॥
विरुद्ध स्वभावें नये ऐक्य लक्षा स्वयें जीव तो ईश या पूर्वपक्षाअहो टाकिलें श्रोत दूषोनि शास्त्रीं तिहीं घेतले त्यास सिद्धांत - पात्रींजसा टांकिला कांडुनी धान्य कीडा समर्थी दरिद्य्रासतो होय मांडाविरुद्ध - स्वभावत्व होतो उपाधी स्वरुपीच तें मानिती स्थूळ - बुद्धी ॥११॥
सकळांविषयी अनीशत्व देहीं जगदीशत्व घडे तया न कांहींम्हणतां तरि तोहि अनीश ज्याला नघडे ऐक्य तुम्हीं तयासि बोला ॥१२॥
असो ईश आतां अनीशत्व ज्याला तुम्हीं तोचि कीं आपुलें रुप बोलातुम्हां भ्रांत जो सांगवेनाच जेव्हां स्वयें कोण नेणेच तो भ्रांत तेव्हां ॥१३॥
अहंप्रत्यय स्फूर्ति ते वृत्ति जेथें तुम्हीं मानितां शुद्ध आत्मत्व तेथेंअहंवृत्ति हे स्फुर्ति ज्याच्या प्रकाशें विचारोनि सांगा तया सावकाशें ॥१४॥
तुम्हिं अहंस्फुरणात्मक जेधवां तरि चिदात्मक मीपण तेधवांजरि जडत्व म्हणाल अहंपणा तरि वदा जड टांकुनि आपणा ॥१५॥
नवदयेच तई उगले असा तुम्हिं अनीश्वर तो म्हणतां कसातरि अनीश्वर - रुप उपाधि का मग परेश - उपाधिही तो पहा ॥१६॥
जड अहंपण ते जरि वेगळें अजड मीपण घ्याल जरी बळेंस्व - चिदहंपण यासि नसांडिता तुम्हिं वदा जड मीपण तत्वता ॥१७॥
अहं - स्फूर्ति ते मानितां आपणासी नये सांगता त्या जडा मीपणासीयथापूर्व मी मी तुम्हीं बोलतां हा दिसेना जडा मीपणा ठाव पाहा ॥१८॥
अहं देह बोलाल त्या मीपणातें न पाहाल तेव्हां तुम्हीं आपणातेंअहं देह जेव्हां स्फुरे वृत्ति देहीं चिदात्मत्व आहे अहंस्फुर्ति नाहीं ॥१९॥
जडाऽहंकृतीनें अहंदेह वाटे न तेव्हां दुजी ते अहंस्फूर्ति भेटेअहंस्फूर्ति चिद्रूप आत्मत्व जेव्हां दिसेना अहं देह हे स्फूर्ति तेव्हां ॥२०॥
अहं एक दूजी अहं देह ऐसी द्विधा स्फूर्ति हे एक काळींच कैसीअहं स्फूर्ति काल - द्वयीं तुल्प जेव्हां अहं स्फूर्ति हे केवलात्मा न तेव्हां ॥२१॥
जसा देह मी मानितों देह - योगें अहंस्फूर्ति तैंसी अहंस्फूर्तिसंगेंअहं प्रत्यया टांकितां बुद्धि आहे तियेही पुढें आत्मया चित्त पाहे ॥२२॥
अहंरुप हे वृत्ति आत्मा नव्हे हा स्व - शास्त्राऽभिमानासि टांकोनि पाहाजसी मीपणीं त्वंपण - स्फूर्ति नाहीं नसे त्वंपणीही अहंवृत्ति कांहीं ॥२३॥
अरे तूं म्हणोनी पराव्यासि जेव्हां म्हणे मी म्हणोनी नसे स्फूर्ति तेव्हांदिसेना घट - स्फूर्ति जेव्हां पटाची पटामाजिही स्फूर्ति नाहीं घटाची ॥२४॥
तसें तूं स्फुरे तेधवां मी स्फुरेना असेही जरी मीपणातें स्मरेनाम्हणा ना घडी एक मी मी म्हणोनी घडी माजित्या तूमची काय हानी ॥२५॥
आतां म्हणाल न म्हणे जरि मी म्हणोनीरुपीं प्रतीति तरि वर्तत मी म्हणोनीते मी असें न म्हणतांहि असे प्रतीतीमी वृत्ति तों जसिच तूं म्हणऊनि वृत्ती ॥२६॥
तूंवृत्ति आगम अपायपणांत मी हेमी वृत्ति हे तदनुरुपचि दीस ताहेतें मीपण स्फुरण - रुपचि होय जेव्हांत्वंस्फूर्ति माजि तरि काय नसेल तेव्हां ॥२७॥
जैसा अहं म्हणुनि वृत्ति विणेंचि पाहेमी वृत्ति - युक्तहि तसाच किं दीसताहेवृत्तींत केवळ पणांतहि तुल्य जेव्हांवाटे तुम्हांसि तरि केवळ हानि तेव्हां ॥२८॥
साळीस जो तांदुळ मानिताहे साळीसही त्याच समान पाहेतेव्हां त्वचा युक्तचि धान्यमानी तुम्हीं न मानाचि मताऽभिमानी ॥२९॥
सहज मीपण टांकुनिही स्फुरे तरि न केवळ होउनियां उरेस्फुरण मीपण - वर्जित जेधवां स्फुरतसे स्वमतींतचि तेधवां ॥३०॥
सहज केवळ तें न तुम्हां कळे बहुत - तर्क - बळेंहि न आकळेगुरुमुखाविण ते नकळे गती म्हणुनि बोलति ये चरितीं श्रुती ॥३१॥
गुरुविणें म्हणती नकळे असें श्रुति तयास तुम्हीं वदतां कसेंगुरुकृपेंचि करीं वदता जरी गुरुमुखें श्रुत तत्व नव्हे तरी ॥३२॥
वेदांतही वाचिलिया कळेना तें श्रीगुरुवांचुनि आकळेनाआत्मा अहं स्फूर्ति म्हणोनि शास्त्रें भेदात्मकें बोलति भेदमात्रें ॥३३॥
जोकां अहं - प्रत्यय - रुप आत्मा तो बोलतां हा निज - तत्व - वर्त्माहा शास्त्रमात्रें कळणार याला कां पाहिजे हो गुरुराज बोला ॥३४॥
शास्त्रासही तों गुरु पाहिजे तो म्हणाल ऐसा तरि हा नव्हे तोश्रुत्यर्थ सांगे परि तत्व नेणें तत्वज्ञ जो केवळ तत्व जाणें ॥३५॥
गुरुविणें नकळे हरिची गती जरि म्हणाल असें वदती श्रुतीतरि न जीव कळे सकळांसि कां तुम्हिं तुम्हांस कसें नवदों शंका ॥३६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.