मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
कर्मतत्व

साहित्य

कर्मतत्व

श्लोक ३०१–४५०

karmatatva

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

कर्माचा विचार आठ प्रकरणांत मांडणारा ग्रंथ: फळ, यत्न, भोग, प्रारब्ध, आत्म, वेद, जीव आणि चैतन्य तत्त्व. ‘प्रयत्न करावा की नाही, आणि केला तर फळ कोणाचे’ हा जुना प्रश्न — वामन पंडित तो वेदान्ताच्या बाजूने सोडवतात, पण कर्म सोडायला सांगत नाहीत.

शास्त्रें अनेक तुम्हिं वाचियली तथापीजी वत्व केवळ तुम्हां न कळे स्वरुपींआतां म्हणा द्विविधही गुरु - गम्य तत्त्वेंतेव्हां गुरु न तुमच्या मिरवे गुरुत्वें ॥३७॥
न वळरवे गुरु आपण आपणा तरिच मानितसे चिदहंपणाकवण आपण हें नकळे जया श्रुति - गताऽर्थ कळेल कसा तया ॥३८॥
असो ईश तो तो तुम्हां आकळेना जयाला अनीशत्व तोही कळेनाम्हणूनी तुम्हां तत्त्वमस्यादि वाक्यें बहू दुर्घटें व्याकराया अशक्यें ॥३९॥
अनीशत्व ईशत्व दोंन्ही उपाधी स्वरुपींच तें मानिती स्थूल - बुद्धी ॥४०॥
अहं प्रत्यय स्फूर्ति आत्मत्व जेव्हां सुषुप्तीमधें नाशतो काय तेव्हांअहं प्रत्यय स्फूर्ति जेव्हां दिसेना सुषुओप्तींत मूर्छेत तेव्हां असेना ॥४१॥
आहे अहंस्फूर्ति तरी प्रतीती कांहो दिसेना पडतां सुषुप्तीनाहीं म्हणावा तरि तोंचि कीं तो होऊनि जागा सुख आठवी तो ॥४२॥
आत्मा अहंस्फूर्ति नव्हेचि जेव्हां सुषुप्तिकाळीं नसतांचि तेव्हांआतां अनीशत्व म्हणा उपाधी ऐसीच ईशत्व - उपादि - सिद्धी ॥४३॥
विसरतो निजतो अहमात्मता तरि कसा उरतो वद तत्वतान वदवे तरि केवि अनीश तो धरुनि नीजउपाधिस भासतो ॥४४॥
आहे अहंप्रत्यय यासि तेव्हां निद्रा पडे गाढ अतीव जेव्हांहोऊनि जागा विसरे म्हणावा तेव्हां कसा स्वप्नहि आठवावा ॥४५॥
स्वप्नीं दिसे विश्व असेंचि यातें या कारणें हा स्मरतो तयातेंतैसें सुषुप्तीत दिसे न कांहीं या कारणें ते स्मृति यासि नाहीं ॥४६॥
ऐसें म्हणाल तरि अंध गृहांत जेव्हांकांहीं दिसे न निज देहहि त्यासि तेव्हांआहे प्रतीति दिवसा स्मरतो तियेतेंऐसी सुषुप्ति नकळेचि किमर्थ यातें ॥४७॥
बुद्धींद्रिये सकळ अंध गृहांत जागींसूर्योदयीं स्मरतसे जन याचि लागींबुद्धीद्रियांवरि जई पडते सुषुप्तीऐसाचि हा परि न ते वदवे प्रतीती ॥४८॥
ऐसें म्हणाल तरि तो जरि जागताहेनिद्रिस्थ बुद्धि मन इंद्रिय कां न पाहेपाहातसे तरि किमर्थ असे स्फुरेनाकां जागृतींत मग तें स्फुरणें उरेना ॥४९॥
सुषुप्तीमधें बुद्धि जागी असेना तियेवीण कांहींच याला कळेनाअसे बोलतां वेद - सिद्धांत सिद्धीं अहं प्रत्ययें केविं त्यांची प्रसिद्धी ॥५०॥
अहं स्फूर्ति रुपें असें तेथ जेव्हां विनाबुद्धि कांही न जाणेचि तेव्हांअसे बोलतां हा तरी येच रीती जनालागिं कां नाठवे ते प्रतीती ॥५१॥
विनाबुद्धि कांहींच जेव्हा कळेना स्वधर्मत्व याला तई आकळेनाअहंस्फूर्ति आत्मा स्वरुपेंचि जेव्हां कळेना कसें ते स्थळी यासि तेव्हां ॥५२॥
प्रत्यक्ष येथें सकळाऽनुभूती मूर्छेत निद्रेंत नसे प्रतीतीअनीश - ईशत्व तयासि आंगा लागेल कोणे रिति हेंचि सांगा ॥५३॥
जे बुद्धिनें प्रत्यय यासि यावा अनीश ईशत्व तियेसि भावास्वयें तयाला असती प्रतीती तेव्हां खरी ही तुमचीच रीती ॥५४॥
अभीशत्व ईशत्वही बुद्धि - वृत्ती चिदात्मा तयाला स्वयें न प्रतीतीस्वतंत्रत्व वृत्तीस येईल जेव्हां प्रतीतिप्रद स्वात्मथा वृत्ति तेव्हां ॥५५॥
जरि म्हणाल असें तरि आइका नयनिं काष्ठहि दाखवि पावकान निरुपाधिक अग्नि कधीं दिसे परि उपाधि - अधीन न तो असे ॥५६॥
काष्ठादि यत्किमपिवांचुनि अग्नि सृष्टीकोणीतरी नयनिं देखियला न दृष्टीदाह - प्रकाशक तथापिहि अग्नि जैसाआत्मा स्वतंत्र परतंत्र उपाधि तैसा ॥५७॥
अमृत गोड असें रसनेविण जरि कळे न तथापिहि तो गुणअमृतनिष्ठ सुधागत माधुरी न रसनेंद्रियनिष्ठ असे परी ॥५८॥
स्वतंत्र तें केवळ जेथ सत्ता सत्ता स्वरुपासि तसी न चित्ताचित्तास निद्रेंत नसे प्रतीती तेव्हां उठे तामस मूढवृत्ती ॥५९॥
निद्रेंत वृत्तींस नसे प्रतीती प्रत्यक्ष तेथें जडरुप वृत्तीहोऊनि जागा सुख आठवी तो प्रकाशितो वृत्तिस जागरीं तो ॥६०॥
पूर्वाध्यायीं अर्थ हा स्पष्ट आहे वृत्तीते तों न स्वतंत्रत्व साहेजोकां भोक्ता तो सुखेच्छा धरुनी वृत्ती सर्वा वर्तवी चेतऊनी ॥६१॥
वाचेविणे जेरिति बोलवेना पायांविणें जेरिति चालवेनाआत्मा तथापि प्रभु आत्मतंत्र जेणें प्रकाशे जड तत्वमात्र ॥६२॥
शक्तीविणें शक्ति नव्हे तथापी स्वतंत्रता केवळ चित्स्वरुपींजाऊनि मारी परि राष्ट्र - सेना सत्ता नृपा वांचुनियां दिसेना ॥६३॥
सत्तेंत वृत्तीविण न प्रतीती सत्ता - विहीना जड चित्त - वृत्तीहोतो असा चिज्जडयोग जेव्हां जीवत्व ईशत्वहि होय तेव्हां ॥६४॥
तथापि सत्ता न जडासि जेव्हां स्वतंत्र त्याला म्हणवे न तेव्हांआत्मत्व जेव्हां नकळे तुम्हांला कां मोडितां हो निगमार्थ बोला ॥६५॥
म्हणाल सर्वास चिदैक्य जेव्हां सर्वास भोक्तृत्व समान तेव्हांचैतन्य भेदेंविण एक भोगें दुःखी सुखी सर्वहि तत्प्रसंगें ॥६६॥
जो भोक्तृतत्व म्हणऊनि चतुर्थ येथेंअध्याय हा विशद निर्णय सर्व तेथेंबिंबासि भेद नघडे प्रतिबिंब - भेदेंभोक्तृत्व भिन्न जळचंचळताविनोदें ॥६७॥
येथें तुम्हीं धरुनियां स्व - मताऽभिमानास्थापावया स्व - मत युक्तिस या न मानाहे अस्मदादि मति कल्पित तों न युक्तीवेदश्रुती वदति ज्या जगदीश - उक्तीनानाजळीं रवि जसा बहुरुप भासेआत्मा तसा बहुउपाधिंत वेद ऐसेयुक्ति स्वयें वदति त्यांस तुम्ही न मानाप्रत्यक्ष दाखवितसां स्व - मताऽभिमाना ॥६९॥
एक प्रभाकर अनेक जळांत जैसाक्षेत्रें अनेक परि एकचि देव तैसानाना जसे दिसति सूर्य अनेक नीरींदेवासि जीवपण भिन्न असे शरीरीं ॥७०॥
ऐशा श्रुती वदति ज्या जगदीश - युक्तीप्रत्यक्षही अनुभवाप्रति येति युक्तीएकत्व यास्तवचि तत्वमसीति वेदींनेतां वदा तुम्हिं किमर्थ तदर्थ भेदीं ॥७१॥
बिंबासिं प्रतिबिंब - ऐक्य न घडे ऐसें तुम्ही साधितांझालें तें प्रतिबिंब कोठुनि वदा पाहोनियां तत्वताजैसें बिंब तसेंचि तें उपजलें ज्यापासुनी सर्वथात्याचा त्या चमधें पुन्हा लय तुम्हीं कां हो नमाना वृथा ॥७२॥
मुख अधोमुख होउनि पाहतें उदकिं ऊर्ध्वमुखें मुख राहतेंमळिन - निर्मळतादिकलक्षणीं इतरता धरली अविचक्षणीं ॥७३॥
आधी उपाधिविण हें नव्हतेंचि जेव्हांबिंबात भिन्न प्रतिबिंब नसेचि तेव्हांनासे उपाधि न उरे प्रतिबिंब दूजेंमिथ्याच सर्व वदतां तुम्हि भेदबीजे ॥७४॥
आद्यंत ऐक्य तरि हें स्फुट दीसताहेनाहीं तुम्हां नम्हणवे जरि हे नसाहेमध्येचं भेद दिसतो तरि पाहिजे तोभेंदेक रोनिच सुखा सुखभेद होतो ॥७५॥
आद्यंत काळीं तरि भेद नाहीं मध्यें न हा भेद विरुद्ध कांहींहा भेद तों साधन - भोग - भेदी याचेंचि तें त्वंपद - ऐक्य वेदीं ॥७६॥
अद्वैत तत्वमसि जोंवरि भेद नाहींअद्वैतबोध करणें नघडेचि कांहींजीवेश शिष्य गुरु यासि न ठाव जेव्हांकोणासि कोण उपदेश करील तेव्हां ॥७७॥
भोक्तृत्व भिन्न दिसतें सकळांसि जेव्हांआत्मत्व ऐक्य सकळांसि घडेल तेव्हांआत्मत्व एक तरि भोग - विभेद कैसाहा पूर्वपक्ष हरिला हरिनेंच ऐसा ॥७८॥
असे एक जीवत्व अद्वैत वादीं जगीं बोलती तो विरुद्धार्थ वेदींन अद्वैत हें द्वैतही तें घडेना गुरु वांचुनी तत्व हें सांपडेना ॥७९॥
चैतन्य - भेद नसतां तरि भेद भोगींऐसें कदापि नव्हते सुख - दुःख योगींहें वर्णिलें विशद येथचि भोक्तृतत्वींतें पाहणें अनुभवीं अति - शुद्ध - सत्वीं ॥८०॥
वेदांताश्रित एक - जीव - मत तें जेव्हां नव्हे सर्वथाभेदीं बोलति आत्मता बहुमती येथें तिची कां कथातें श्रीमाधव उत्तर प्रकरणीं दूषील जें अन्यथाआत्मत्व प्रतिपादिती सकळही भिन्नात्मवादी वृथा ॥८१॥
जीवेशभेद वदताति विरुद्ध - धर्मैते तों उपाधि - गुण हें नकळोनि वर्मेअद्वैत तत्व उपपादिति सर्व वेदींतो अर्थ मोडिति अबाधित भेद - वादी ॥८२॥
जयां बोलती ऐक्य जीवां घडेना तयां जीव तो पूसतां सांपडेनाअहं प्रत्यया बोलती आत्मता हे अहंवृत्ति त्या केवळातें नसाहे ॥८३॥
स्वयें जीव होऊनि तो जीव कैसा असें पूसतां सांगवेनाच तैसाअहं प्रत्ययालागिं तो आकळेना अहं प्रत्ययेंवीण याला कळेना ॥८४॥
स्वयें भ्रांत आत्मत्व ज्याला कळेना म्हणोनीच वेदार्थही आकळेनास्वयें भ्रांत होऊनिही भेदवादी अहो मोडिती ऐक्य जें स्पष्ट वेदीं ॥८५॥
प्रामाणिकाऽर्थ - अवलंबित एक गोष्टीआहे तथापि नपडेचि तयासि दृष्टीऐसें तथापि निज - तत्व तया कळेनाआचार्य - वर्य - करुणेविण आकळेना ॥८६॥
अहं स्फूर्ति आत्मा नव्हे हा तथापी स्फुरे तो अहं प्रत्ययो चित्स्वरुपींतयालागिं आत्मत्व बोलाल जेव्हां नव्हे तो असें बोलवेनाच तेव्हां ॥८७॥
प्रतिकूळ परंतु तो तुम्हांला नकळूनी जरि बोलतां तयालाअहमीश अनीश दोनि जेथें नुरती केविं विरुद्ध धर्म तेथें ॥८८॥
नव्हे अहं प्रत्ययरुप जेव्हां अनीश ईशत्व उपाधि तेव्हांआहे अहं प्रत्यय भिन्न जेथें अनीश ईशत्वहि भिन्न तेथें ॥८९॥
तथापि आत्मत्व न शुद्ध तेहीं जैसें सुषुप्तींत दिसे न कांहींयालागिं कोणासहि तें कळेना जें श्रीगुरु वांचुनि आकळेना ॥९०॥
विरुद्ध धर्मे श्रुति मोडितां हा होतो महादोष तुम्हांसि पाहाअगम्य वेदाऽर्थ तुम्हां कळेना जो श्रीगुरु वांचुनि आकळेना ॥९१॥
म्हणाल वेदांतचि भेद आहे श्रुतीस त्या ऐक्यहि हें नसाहेहें बोलणेंही तुमचें घडेना श्रुतीमधें द्वैतचि सांपडेना ॥९२॥
जीवत्व ईशत्व उपाधि - भेदें निरुपिलीं ही असतील वेदेंगीतादिशास्त्रांतहि येचरीती तुम्हांसि तीं साधनरुप होती ॥९३॥
तुम्हीं द्वासुपर्णा श्रुती द्वैतरुपें पहातां तुम्हां द्वैत वाटे स्वरुपेंतयां द्वासुपर्णासही भेद ऐसे नसोनी अहो मानितां भेद कैसे ॥९४॥
द्वैतश्रुती द्विवचनें जरि मानितांहाश्रीरामकृष्ण म्हणतां द्वय कां न पाहावेद प्रमाणचि जसे अवतार ऐक्येंश्रुत्युक्त - ऐक्य बहु तत्वमसीतिवाक्यें ॥९५॥
तयोरन्यथा अन्यशब्दासि भेदीं तुम्हीं मानुनी दावितां द्वैत वेदींतयोरन्य दोघांत त्या ऐक्य ऐसा असोनी तुम्हीं मानितां भेद कैसा ॥९६॥
तयोरन्य एथें तयोर्भेद ऐसा तुम्हीं बोलतां अर्थ होईल कैसातयां दोंमधें भेद तो पिप्पलातें जई भक्षितो इष्ट आम्हांसि होतें ॥९७॥
तया दोंमधें भेद तो उपाधी तया भेद तो आमुचा पक्ष साधीतया भेदयोगेंचि भोक्तृत्व याला उपाधीविणें ऐक्य बिंबी जयाला ॥९८॥
अशन - अनशनत्वें भेद बोलाल जेव्हांतरि हरि - अवतारीं घ्या विरुद्धार्थ तेव्हांव्रज - पर - वधु - जारी एक लीलाऽवतारीबहुविध विपरीतेंही न कां त्या प्रकारीं ॥९९॥
निष्ठा तुम्हांला बहुसाल भेदीं तो वाटतो या करितांचि वेदींघटादिनामें व्यवहार जेव्हां न बोलती मृन्मय तत्व तेव्हां ॥१००॥
दत्द्यांचें दुधाचें जळाचें घृताचें असें बोलतां पात्र - एकत्व कैचेंअसा कोटिशब्दें जरी भेद वाटे असा भेद शब्दैकमात्रेंचि तूटे ॥१०१॥
घटादीक हें सर्वही एक माती अशा ऐक्य शब्देंचि ते भेद जातीतसें सर्वही ब्रम्ह इत्यादि - शब्दीं उडे भेद तो साधिला कोटि - अव्हींअसे वेद जे बोलती भेद नाना तयांमाजि तों तत्व कांहीं असेनाअसे तत्व यालागिं तत्वोपदेशें श्रुती बोलती तत्वमस्यादि लेशें ॥१०३॥
चिदैक्य तें तत्वमसीति - वाक्यें सव्र खलु ब्रम्ह अचेतनैक्येंअद्वैत ऐसे उपदेश वेदीं नदीसती हे उपदेश भेदीं ॥१०४॥
सत्यं भिदा म्हणुनि यास्तव कल्पियेल्यावेदश्रुती तुम्हिं तथापिहि त्या उडाल्याप्रत्यक्ष जें दिसतसे उपदेश त्यालाकांहो वृथा करुनि कष्टति वेद बोला ॥१०५॥
याही प्रमाणीं श्रुति मानितांहा तरी श्रुती त्या पुढिल्यांहि पाहासत्यं भिदा बोलति तेचि दोषी पुढें श्रुती बोलति वाक्य - लेशीं ॥१०६॥
भेदोपदेश निगमीं सहसा घडेनासत्यं भिदादि निगमीं श्रुति सांपडेनाजीवेश लोकरचनादिक भेद वेदींभासे प्रमाण तरि हें नघडेचि भेदीं ॥१०७॥
डेरे रांझण घागरी म्हणुनि हीं नावें स्वरुपें जसींनाना - यज्ञ - कलाप लोक रचना वेदामध्येंही तसीपात्रांचा विनियोग कर्म इतुक्या भेदासही बाधि तोहे माती अवघी म्हणोनि वदनीं हा शब्द जो ऊठतो ॥१०८॥
असा भेदही बोलतो वेद जेथें तुम्हीं भेद तो मानितां तत्व तेथेंवदे ऐक्य तो अर्थ मोडोनि वेदीं घडेना तरी योजिती अर्थ भेदीं ॥१०९॥
जगत्सत्य जीवेश्वरा भिन्न जेथें किमर्थ श्रुती पाहिजेतील तेथेंअशा दूषणें ग्रंथ वाढेल भारी म्हणोनी नबोलेचि येथें मुराऽरी ॥११०॥
हरीनेचि या संस्कृतीं ग्रंथ केले असे दोष हे तेस्थळीं बोलियेलेमहाराष्ट्र - भाषेंत या वेदरीती बहू बोलतां श्रोतयां वीट येती ॥१११॥
दपटिजे खल - नासिक जेधवां पसरितो मुख दुर्जन तेधवांवदति शश्वदनेकचिदात्मता न वदवे पुसतां दृढ तत्वता ॥११२॥
जीवेश्वराऽभेद विरुद्धधर्मे हें बोलती जे नकळोनि वर्मेज्याच्या वळें मोडिति जे श्रुतीला ते व्यर्थ हा निर्णय येथ झाला ॥११३॥
कर्मप्रशंसादि निमित्त वेदीं जो भासतो भेद अतत्ववादींप्रमाण तें मानुनि तत्व जेथें श्रुतीमध्यें मोडिति अर्थ तेथें ॥११४॥
जगत्सत्यता भेद जीवेश्वरातें श्रुतीवांचुनीही कळे जें जनातेंश्रुती बोलती तत्वता तेंचि जेव्हां प्रमाणत्व त्याचेंचि थारे न तेव्हां ॥११५॥
असा वेद - तत्वाऽर्थ त्याला कळेना विना ऐक्य सिद्धांत हा आकळेनाम्हणोनीच अध्याय हा वासुदेवें असे निर्मिला वेद - तत्वारव्य - नावें ॥११६॥
न ऐक्यें घडे एक - जीवत्व जैसें न भेदें अनेकत्व जीवासि तैसेंअसा उत्तराऽध्याय आरंभता हे कळे ज्यास तो ब्रम्ह होऊनि राहे ॥११७॥
वेदांताविण बात्द्य - वैदिकमतें जीवात्मता त्या मतीसूक्ष्माहूनिहि सूक्ष्म शाश्वत सदा नित्यत्वही मानितीप्रत्यक्षां जरि सूक्ष्मता अनुभवीं जीवा न हे बाधितीस्व - प्रामाणिकता मतासि तितुक्या सर्वासही साधिती ॥१॥
नाना जीवहि मानितां अणुपणें नित्यत्वही आणितावृद्धिर्हास नसे तयासि अथवा आहे वदा तत्वतावृद्धिर्हास नसे म्हणाल नघडे तेव्हां अहो नित्यतावृद्धिर्हास नसे तई अनुभवा येताचि देहात्मता ॥२॥
मशक तेचि तिमिंगिळ जेधवां कसि न वृद्धि तयासिहि तेधवांमशक - देह तिमिंगिळ पावती उरति ते अणु होउनि मागुती ॥३॥
नपावे जई वृद्धि विस्तीर्ण देहीं नव्हे स्वल्य देहीं जई र्हास कांहींनव्हे भोग अत्यल्य ते जीव जेव्हां घडे भोग सर्वत्र तो थोर तेव्हां ॥४॥
व्यापीन हा देह समस्त जेव्हां गृहांत तैसा तनुमाजि तेव्हांभिंतीस स्रक - चंदन - भोग होती याला न ते तों सुख शैत्य देती ॥५॥
गृहामाजि देहास जों आढळेना गृहस्थासि शीतोष्णता तों कळेनागृहा ऊपरी तापतो सूर्य जेव्हां गृहीं हा सुखी साउली मानि तेव्हां ॥६॥
शरीरास शीतोष्णता जेथजेथें शरीरीं स्वयें भोगितो तेथतेथेंकसें व्यापकत्वासि नाहीं म्हणावें कडें हातिंचें दर्पणीं कां पहावें ॥७॥
व्यापोनि देह सुख - दुःखहि भोगिताहेत्याला अणुत्व म्हणणें सहसा नसाहेत्याला महत्व म्हणतां मग सर्व देहींतो एक भेद मग जीवपणासि नाहीं ॥८॥
नसे भेद चैतन्यजीवांसि जेव्हां नव्हे भोगणें वेगळें त्यासि तेव्हांअणुत्वा महत्वासही हा नसाहे वदा हो कसा केवढा जीव आहे ॥९॥
बहू थोर हा मानिजे जीव जेव्हां घडे एक - जीवत्व - सिद्धांत तेव्हांअसे दूषिला हा कुसिद्धांत पूर्वी तसी अल्पता हे घडेनाचि सर्वीं ॥१०॥
येथें बहू भांडति भेद - वादी अणुत्व आहे म्हणताति वेदींकुयुक्ति ही आणिति येथ कांहीं तथापि ते साधक होत नाहीं ॥११॥
उपाधियोगोंचि अणुत्व वेदीं ते मानिती सार्थक भेदवादींतये स्थळीं हे श्रुति बोलिजेते या श्लोक वृत्तें वरि वाचिजेते ॥१२॥
बुद्धेर्गुणेनात्मगुणेन चैव आराग्रमात्रे त्द्यवरोपिदृष्टःया वेद वाक्यें अणुतेसि जेथें निरुपिला भाव असाचि तेथें ॥१३॥
गुणें बुद्धिच्या आत्मयाच्या गुणेंही कधीं अत्यही होय अत्यंत देहीगुणें बुद्धिच्या शुद्धसत्वांत नीरीं चिदात्मा दिसे चिद्गुणें त्या शरीरीं ॥१४॥
उदक अल्प बहू घट जेवडा मनिफळे अवकाशहि तेवडाम्हणुनि अल्प उपाधि घडे जई तदनुरुप चिदात्मकता तई ॥१५॥
म्हणुनि जीवपणें अति सूक्ष्मता जसि उपाधी तसी प्रतिबिंबतासहज बिंब अनंत असे स्वयें परि अणू प्रतिबिंबचि विस्मयें ॥१६॥
अणोरणीयान् महतो महीया नात्मा गुहायां वदति श्रुती याअणोरणीयान् प्रतिबिंबरुपें महत्व चिद्विंब सुख - स्वरुपें ॥१७॥
अणुत्व वदवे कसें न घडतां परिच्छिन्नताअणूहुनि अणू जसें नवदवे महापर्वतागिरींद्र अणुमात्र तो अणु जळांत भासे जसाउपाधि अणु त्यामध्यें अणु दिसे चिदात्मा तसा ॥१८॥
उपाधिविण तो स्वयें न अणुमात्र आत्मा असेविरुद्ध अणुमात्रता अनुभवीं समस्तां दिसेम्हणाल अभिमानुनी तनुसि भोग भोगी जरीवदा गृह - तनूंतही तदभिमानियाच्या परी ॥१९॥
गृहीं गृहामाजि गृहाऽभिमानी छायेंत त्याचे न तदुष्ण मानीगृहावरी वृष्टि परंतु याला लागेल ते वृष्टि किमर्थ बोला ॥२०॥
देहाभिमानी तरि उष्ण - शीतें स्पर्श कसें हो सुख दुःख होतेंशीतोष्ण वारुनि गृहांत जैसा देहांत कां जीव असे न तैसा ॥२१॥
जैसा गृहीनिजगृहावरि उष्ण वृष्टीघेऊनि आंत वसतो परि तो न कष्टीव्यापूनि जीव नसता तरि सर्व गात्रेंदुःखी सुखीहि नव्हता अभिमान - मात्रें ॥२२॥
जैसा गृहीं गृहतनूवरि उष्ण वृष्टीघेऊनि आंत नव्हता जरि जीव कष्टीव्यापोनि यास्तव असे अवघ्या शरीरींकैसा गृही निजगृहांत अशा प्रकारीं ॥२३॥
अणुत्व अत्यंत विरुद्ध ऐसें वेदीं पुराणीं वदतील कैसेंतथापिही बोलति भेद जेथें उपाधि योगें प्रतिबिंब तेथें ॥२४॥
वेदीं पुराणीं प्रतिबिंबरुपी जीवासि या वर्णिति चित्स्वरुपीउपाधियोगें प्रतिबिंब जेव्हां उपाधिकत्वें अणुरुप तेव्हां ॥२५॥
अणुस्वरुपेंचिकरुनि जेव्हां एकत्र देहांत असेल तेव्हांअन्यत्रही भोग तयासि कैसे होतील कां पां नपहाचि ऐसें ॥२६॥
यानंतरें बोलति युक्ति काहीं कीं व्यापतो चंदन - बिंदु देहींएकत्र तो बिंदु जसा असोनी व्यापी तनू शीतळ तें करुनीं ॥२७॥
एकत्र हा जीवह याप्रकारें असोनियां व्यापितसे शरीरेंअदीर्घदर्शी कुमताऽभिमानी जो आइके तो खरि युक्ति मानी ॥२८॥
जो व्यापितो चंदन - बिंदु देहीं तें शैत्य त्याचा गुणमात्र कांहींतें नाशतें शैत्यहि अग्नितापें तो बिंदु अंगीं असतां स्वरुपें ॥२९॥
न शैत्य नाशे जरि बिंदु - नाशें सर्वत्र हा भोग वदाल कैसेंशैत्यासवें बिंदुस नाश येना तेव्हां तयाचा गुण भिन्न माना ॥३०॥
देहीं गुण व्यापक चंदनाचा मानाल तैसा जरि सिद्ध साचादेहीं जई व्यापक गंधबिंदू शैत्यें तई व्यापक कान इंदू ॥३१॥
दीप - प्रभाव्यापक सर्व - गेहीं जैसी तसा व्यापक जीव देहींया व्यापकत्वीं सुख दुःख जेव्हां न व्यापकातें सुख दुःख तेव्हां ॥३२॥
पायांत शैत्य न उरे जरि ताप ताहेभाळीं यथास्थितचि चंदनबिंदु राहेरात्रीं जळे वन तयांतिल शैत्य नाशेतेव्हां नभीं न शशिमंडळिं दाह भासे ॥३३॥
न तापे शिरीं पोळतां पाय बिंदू न तापे दिशा तापतां पूर्ण इंदूजरी सर्वदेहासि जीव प्रकाशी न दुःखी सुखी बोलवे एक देशी ॥३४॥
न हाले घरीं दीप निर्वातदेशीं जरी बात्द्य - वात - स्थळीही प्रकाशींतसा जीवही एक देशी शरीरीं तया भोग सर्वत्र कैशा प्रकारीं ॥३५॥
भाळीं चंदन वाळलें परि पुन्हा ओलें जळें होतसेपायीं व्यापक तें तरी पद धुतां ओलें न जेव्हां दिसेतेव्हां जीव त्द्यदंबुजीं नखशिखा व्यापोनि आहे तसाकांतालिंगन - ताडनें करि सुखी दुःखी शरीरीं कसा ॥३६॥
ओले होतां चरण निढळीं गंधही आर्द्र होतेंतेव्हां साम्य स्व - मति - कृत हें व्यापकत्वासि येतेदृष्टांतीं हा असुख सुखही भोगितो सर्वठायींजैसा पाहा त्दृदयिं म्हणतां मस्तकीं हात पायें ॥३७॥
म्हणाल हे अद्भुत जीवशक्ती शक्तीस नाहीं सुख दुःख भुक्तीतथापि हा जीव असेल जेथें देतील शक्ती सुख दुःख तेथें ॥३८॥
हे भोग तेव्हां त्दृदयीं घडावें सर्वत्र देहांत न सांपडावेया कारणें सर्वहि या कुयुक्ती अणुत्व तेव्हां न घडेल भुक्ती ॥३९॥
नाडिद्वारा म्हणति फिरतो जीव हा तेथतेथेंदेहामध्यें असुख सुख घे कारणें होति जेथेंएके काळीं नघडति तरी शीत - उष्णादि बाधातर्के ऐशा करुनि अणुता या स्वजीवासि साधा ॥४०॥
वेदाश्रितें भेद - मतें समस्तें झालीं पहा येरिति येथ अस्तेंसिद्धांत हा भास्कररुप जेथें भेदांधकारा बळ काय तेथें ॥४१॥
अणुत्वा महत्वा न हा जीव साहे स्व - नानात्व एकत्वही जो न लाहेम्हणोनी अनेका जळीं सूर्य नाना तसा जीव - सिद्धांत दूजा घडेनाम्हणउनी श्रुतिही वदती असें स्मृति - पुराण - कदंब वदे तसेंसकळ बिंब हरी प्रतिबिंब हा जितुकिजे तनु हा तितुका पहा ॥४३॥
सकळ - जीव - कदंब हरी स्वयें अनुभवी प्रतिबिंबपणें भयेंलय - सुषुप्तिंत नित्य तदैक्यता हरिस कां नघडे सकळात्मता ॥४४॥
अनुभवी सुख दुःख पृथकपणें डळमळी जळिं भानु न आपणेंअणुमहत्वउपाधिगुणें तया प्रकृति ईश - अनीशपणें जया ॥४५॥
अनीश माया - प्रतिबिंबरुपी ईशत्व तें बिंब सुख - स्वरुपीअनीश्वरोपाधिमधें अविद्या उपाधि जो ईशपणांत विद्या ॥४६॥
दुःखादि - भोक्तृत्व अनीश्वरासी भोक्तृत्व नाहीं परमेश्वरासीसिद्धांत ऐसा सकळश्रुतींचा ज्या द्वासुपर्णादिक वेद - वाचा ॥४७॥
म्हणुनि तत्वभमी बहुधा श्रुती वदति ऐक्य अवाधित येरितीअसिपदें निरुपाधि चिदैक्यता हरुनि भेद निरुपति तत्त्वता ॥४८॥
असिपदें जरि नित्य चिदैक्यता वदतसां कसिचित्प्रतिबिंबताजरि म्हणाल असें तरि तत्त्वता प्रतिमुखासि निदान मुखात्मत ॥४९॥
घडि घडी प्रतिबिंब दुजें दिसे परि मुखाविण अत्प न तें असेमुटुळ नीर तई स्वमुखीं वसे प्रतिमुखास दुजें वदतां कसे ॥५०॥
प्रत्यक्ष भेद नदिसे पडतां सुषुप्तीस्वप्नांत जागृतपणीं उभय प्रतीतीदेहामधें प्रतिमुखीं सुख - दुःख - सिद्धीबिंबावरी फिरति सर्व सबात्द्य वृद्धी ॥५१॥
बिंबत्मतें करुनि बुद्धि जगांत धांवेदेहांत दुःख सुख हें प्रतिबिंब पावेसर्वानुभूति परि हे नकळे जनालाअल्पाविणें स्फुरण तों नघडे मनाला ॥५२॥
हें उत्तर प्रकरणीं जगदेकबंधूबोलेल वामन - मुखें करुणैकसिंधूहा जीवतत्व म्हणऊनि अशेष - नाथेंअध्याय येथ रचिला निजबोध जेथें ॥५३॥
चैतन्य - भेद अवधेचि उपाधि भेदेंएकात्मता तरिच बोलिलि नित्य वेदेंतो भेद केवळ दिसे सुख दुःख भोगींएकत्व सुप्तिलय आणि समाधि - योगीं ॥१॥
जें हालते सकळ तें प्रतिबिंब हालेहे जों उपाधिकरितां बहु भेद झालेतेतों जळें गढूळ होत समस्त जेव्हांबिंबाविणें प्रतिमुखा गति काय तेव्हां ॥२॥
बिंबात्मताचि सकळासि समस्तकाळींभोगीच हे प्रतिमुखात्मपणें निराळींसर्वत्र बिंब मन त्यावरि धांवता हेदुःखें सुखें प्रतिमुखासि न पाहता हे ॥३॥
ईशानीश उपाधि दोनिहि अहो बिंबामध्ये वर्ततीजो आकाश मठांत सर्वहि घटीं आकाश तों येरितीआकाश प्रतिबिंबले घटजळीं तें तों जळें हालतोऐसे हालति भोगमात्र दिसती जीवा असे पाहतां ॥४॥
स्वप्न - प्रबोधांतचि भोग याला सुषुप्तिकाळीं निज - सौख्य त्याला ॥५॥
बिंबेंचि ते जड उपाधि - सुषुप्तिकाळींतेव्हां न हीं प्रतिमुखें उरती निराळींस्वप्न - प्रबोध - समयांतहि याच रीतीबिबें करोनिच सचेतन सर्व होती ॥६॥
बिंवैक्य सुप्तिसमयांत घडे जयालातो मुक्त त्यास भव केविं म्हणाल बोलाबुद्धी करुनि निज बिंब कळेल जेव्हांअज्ञान - मूळ भवबंध तुटेल तेव्हां ॥७॥
विद्या अविद्या उभय प्रकाशी तें बिंब - चैतन्य न एकदेशीया कारणें तत्वमतीति वाक्यें बिंबावरी वर्तवितो चिदैक्यें ॥८॥
असिपदें म्हणऊनिच बोलती सहसदैक्य असेचि बहु श्रुतीतरिच तत्वमसी असि वैखरी अनुभवी मनिं मानिति हे खरी ॥९॥
वीना अहंकार न भोग होती प्रत्यक्ष हेतों अवघे पहातीदुःखी सुखी मी सुख दुःख मातें या प्रत्ययावीण न भोग यातें ॥१०॥
नखशिखाग्रचि दीसति मीपणें तितुकियांत सुखाऽसुख भोगणेंतितुकियांतचि चित्प्रतिबिंबता अवधियास्थळिं केवळ बिंबता ॥११॥
प्रतिबिंब - अहंकृती - बिणें नघडे हे सुख - दुःख - भोगणेंपरि बिंब तयांतही असे अवकाशें घट पूर्ण हे जसे ॥१२॥
आत्मा धणी सर्व जडें प्रकाशी तो मीपणा भीतरि एकदेशीत्या मीपणें भोक्तृपणप्रतीती यालागिं तत्वें तदधीन होती ॥१३॥
व्हावें मला सुखचि दुःख कधीं नव्हावेंबुद्धींद्रियें वश अहंपणिं या स्वभावेंत्यामाजि भोगित असे प्रतिबिंब ज्याचेंतें बिंब सर्वगत नित्य अनंत साचें ॥१४॥
देहाहुनी मीपण बात्द्य नाहीं तैसेंचि हें चित्प्रतिबिंब देहींबाहेर जाती मन चित्त बुद्धी बिंबामधें त्यास चिदात्म - सिद्धी ॥१५॥
चित्त बुद्धि मन हीं अचेतनें आत्मयाचकरितां सचेतनेंजीव तो नखशिखेपुढें असे नत्प्रकाशक न बात्द्य तो दिसे ॥१६॥
ब्रम्हांड - सांडी मन बुद्धि धांवे हें जीव चैतन्य न तेथ पावेचिदात्मया वांचुनि या जडाला बिंबाविणें प्रत्यय केविं बोला ॥१७॥
जिये दृष्टिनें हा स्व देहासि पाहे तिणें बात्द्यरुपासिही पाहताहेस्वदेहीं असे जीव चैतन्य तेणें पहातां पुढें चैतन्य केणें ॥१८॥
शरीतांतुनी त्यासवें धावताहे म्हणावें तरी र्हास वृद्धी न साहेमनें धांव घ्यावी तसें थोर व्हावें न धावे तई अल्परुपें असावें ॥१९॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
घडे
— घडते, शक्य होते
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
सकळ
— सर्व
जैसें
— जसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तैसें
— तसे
तेथ
— तिथे
जेथ
— जिथे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
म्हणोनि
— म्हणून
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
प्रकृति
— सृष्टीचे मूळ जड तत्त्व
माया
— भासमान करणारी शक्ती
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
मातें
— मला
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.