मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
कर्मतत्व

साहित्य

कर्मतत्व

श्लोक ४५१–५१८

karmatatva

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

कर्माचा विचार आठ प्रकरणांत मांडणारा ग्रंथ: फळ, यत्न, भोग, प्रारब्ध, आत्म, वेद, जीव आणि चैतन्य तत्त्व. ‘प्रयत्न करावा की नाही, आणि केला तर फळ कोणाचे’ हा जुना प्रश्न — वामन पंडित तो वेदान्ताच्या बाजूने सोडवतात, पण कर्म सोडायला सांगत नाहीत.

म्हणाल कीं नेत्र असे शरीरीं तथापि हे पाहति रुप दूरीहा जीव तैसा मन इंद्रियेंहीं दुरील जाणे परि याचिदेहीं ॥२०॥
डोळे यथास्थित असोनिहि अंध होतीदृष्टी विणें किमपि रुप न ते पहातीयालागिं नेत्र - युग दोनि जळीं शरीरींहे पूर्ण दोनिहि दृगिंद्रियदृष्टि नीरीं ॥२१॥
जों उंच भूमि जळ तोंवरि धांवताहेजों आड ये किमपि तोंवरि दृष्टिं पाहेउंचस्थळीं परततें जळ आदळोनीपाहोन दृष्टि नयनाप्रति ये फिरोनी ॥२२॥
श्रोत्रांत तों पडति येउनि शब्द जेव्हांजीवात्मया वरुनि ते कळताति तेव्हांघ्राणासि गंध रसनेसहि येचरीतीजीवात्मया वरुनि भोग समस्त होती ॥२३॥
तैसें दृगिंद्रिय जरी अति दूर जातेंतें दुःख आणि सुख याचि तनूस देतेंऐसें तथापिहि दृगिंद्रिय जों स्वरुपेंपावे न दूरिवरि तों दिसती न रुपें ॥२४॥
हे नेत्र गोलकचि केवळ दृष्टि होतीदेही असोनिहि तरी दुरुनी पहातीसंकोचतें पसरतें जल - रुप दृष्टीतैसे न हे नयन जेविं तडाग - सृष्टी ॥२५॥
दूरील आत्म्यविण बात्द्य सृष्टी दीसेल कैसी बहुरुप दृष्टीहें ऊफराटें घडलें तुम्हांला चैतन्य तें कोटिल तेथ बोला ॥२६॥
हा जीव तों सकळ - संमत याचिदेहींदृष्टीस दूरिगत हा तरि तेथ नाहींचैतन्य कोण तरि दृष्टिस या प्रकाशींऐसेंच चित्त - मन - बुद्धिस दूरदेशी ॥२७॥
आतां म्हणाल रविमंडळ एकदेशीएवं तर्ही त्रिभुवनांत जसें प्रकाशीतैसाचि जीव तरि भास्कर - तेज जैसेंहें जीव - तेजहि म्हणा बिजगांत तैसें ॥२८॥
हीं बुद्धि - चित्त - मन धांउनि येति मागेंजीवप्रकाशहि फिरे जरि त्याचमागेंसूर्यप्रकाश उपमा नघडे तयालाहा व्यापुनी त्रिभुवनीं रवितुल्य बोला ॥२९॥
ब्रम्हांड - रवर्पर विभेटुनि चित जातेंजीवप्रभेंकरुनि तेस्थळिं तें पहातेंत्याहूनिही मन पुढें ढकलेल जेव्हांहें तेज तेथ पहिलेंचि असेल तेव्हां ॥३०॥
तेव्हां अनंतपर्ण सर्वगतत्व आलेंजीवप्रभेस तुमच्या इतुक्याच बोलेंते जीव तों अमित आणिक एकदेशीव्यापूनि ईश्वरहि येचरिती प्रकाशी ॥३१॥
हें व्यापिलें सकळ विश्व जसें परेशेंजीवें तसेंचि अवघें निज - चित्प्रकाशेंऐसी अनेकविध बाधक युक्ति जेथेंइत्यादि हे मिरवती न कुतर्क तेथें ॥३२॥
स्वयंप्रकाशें मन बुद्धि चेष्टी चिदंश तेव्हां फिरतांचि सृष्टीअसा जरी व्यापक जीव जेव्हां सर्वत्र त्या भोगहि होय तेव्हां ॥३३॥
स्वयें जडा चेतनता असेना प्रकाश यावीण तया दिसेनासंकोच विस्तार घडे न त्याला बात्द्यप्रकाशें मन केविं बोला ॥३४॥
हा जीव तों केवळ एकदेशी चिद्विंव तें सर्व मन प्रकाशीचैतन्यतुल्य प्रतिबिंब बिंबीं सिद्धांत हा वेट् - मताऽवलंबी ॥३५॥
सर्वत्र नाहीं प्रतिबिंब जेव्हां अणुत्व - वार्ताहि घडेल तेव्हांअणुत्ववादी तितुके बुडाले सिद्धांत तेथें अवघे उडाले ॥३६॥
उडाले तसे एक - जीवत्व - वादी न जीवत्व बिंबात्मतेलागिं वेदींचिदात्मा हरी हे चिदाभास भोक्ते असें जाणती तेचि वेदांतवक्तेऐशासही श्रुति अगम्यचि हें रहस्यश्रीकांत ज्यास न अनन्यपणें उपात्यभिंतीवरी मतिसवें निजतेज तैसेंतें बोलती प्रतिमुखांतील तेज जैसें ॥३८॥
सूर्य - प्रभा प्रतिफळे जरि कांस्यपात्रींतेथूनि भिंतिवरि तेज दिसेचि नेत्रींऐसें मन त्रिभुवनांतहि जेथजेथेंजीव प्रकाशक तयांसहि तेथतेथें ॥३९॥
दृष्टांत योग्य परि येविषयीं नपावेएकत्र तें चहुंकडे न कदापि धांवेभिंतीवरी प्रतिमुखांतिल एकदेशीसर्वत्र धावन करुनि न तें प्रकाशीं ॥४०॥
जसी एकदेशी तसी जीव - ज्योती जगीं तीवरी धांवते चित्त - वृत्तीअसें मानितां वस्ति देहींच राहे तरी ते प्रभा काय विश्वांत राहे ॥४१॥
तें तेज तों नपुरतें प्रतिबिंब जेथेंभिंती प्रकाशित असेल अखंड तेथेंतेथूनि तें नपरते तर्हि एकदेशीहोऊनि जीव भुवनत्रय हा प्रकाशी ॥४२॥
असे जीव हे सर्वही एकदेशी जगद्वाप्त तेव्हां तयाच्या प्रकाशींस्वरुपीं जसें व्यापिलें हें मुकुंदें प्रकाशें तसीं व्यापिलीं जीव - वृंदें ॥४३॥
म्हणोनीच दृष्टांत हा स्थूळ देहीं घडे बोध हा येस्थळीं येत नाहींचिदर्कप्रभा सूक्ष्म - देहीं तथापी पडे तेज तें सर्वदा स्थूळरुपीं ॥४४॥
दिसे स्वप्नकाळीं दुजें स्थूळ जेव्हां पडे आड या स्थूळ - देहासि तेव्हांन भिंतीवरी कांस्य - पात्रार्क ज्योती दिसे त्यावरी जे मधें आड येतीन निद्रेंत हें आठवे स्थूल जेव्हां दिसे कल्पनेचेंच तें स्थूल तेव्हांघरी तें मनांतील चैतन्य त्याला नदेहासि यातें पडे आड याला ॥४६॥
भिंतीवरी प्रतिमुखांतिल तेज जेथेंदोहींमध्ये किमपि ये जरि आड तेथेमतें तेज त्याचिवरि तेसमयीं प्रकाशीभिंतीवरी मग तयास्तव एकदेशी ॥४७॥
हे दीप्ति तों प्रतिमुखांतिल एकदेशीत्यामाजि येति तितुक्यासहि ते प्रकाशीज्यालागिं आवरण मीपण लिंगदेहींस्थूळावरी तदभिमान पुढें न कांहीं ॥४८॥
दुःखी मी अथवा सुखी चतुर मी अज्ञान मी मी सुधीतो हा प्रत्यय मीपणाहुनि दुजा हा जीव नेणें कधींचैतन्य - प्रतिबिंब यास्तव नसे स्थूळापुढें सर्वथाहें प्रत्यक्ष पुढें तयास नदिसे दुःखासुखाची कथा ॥४९॥
ते अंतःकरणीं अहंपण तया सूक्ष्माम धें राहणेंकिंवा हे प्रतिबिंब - ज्योति पडते स्थूळीं तया पाहणेंया स्थूळाकरितां अहंपणिं जिवा दुःखें सुखें भोगणेंदृष्टीला नदिसे मनें त्रिभुवनीं जेजे स्थळीं हिंडणें ॥५०॥
ध्रुव - पद शशि तारा दीसती याच दृष्टीमन तरि फिरता हे जोंवरी ब्रम्ह - सृष्टीअति जड मन दृष्टी चित्प्रकाशत्व त्यालाप्रतिमुख तरि देहीं तेस्थळीं कोण बोला ॥५१॥
मना बुद्धिदृष्टीसही बात्द्यदेशीं स्वयें बिंब विश्व - प्रकाशें प्रकाशीअसी सूर्यतेजावरी दृष्टि धांवे असें तेज जेथें जरी हे नपावे ॥५२॥
असें बिंबचैतन्य हें सर्व आहे म्हणोनीच चंद्रादिकां दृष्टि पाहेमनोवृत्तिही त्यावरी दूरि धांवे प्रकाशी तिला तेंचि तें जेथ पावे ॥५३॥
स्व - देहासही तोचि आत्मा प्रकाशी असे भोगमात्रार्थ हा एकदेशीघटीं व्यापकाकाश तो तों न हाले जळीं दूसरा दीसतो तोचि डोले ॥५४॥
असीं सर्व चोवीसही जीवतत्वें तया व्यापकें वर्तती चेतनत्वेंतयां जीव होऊनियां जीव भोगी पहाती प्रकाशत्व बिंबींच योगी ॥५५॥
विनारज्जु तो सर्पदृष्टीं दिसेना विनारज्जु तो सर्प कांहीं असेनादिसेना जसें ज्याविणें विश्व दृष्टीं असें सर्व मिथ्या तयावीण सृष्टी ॥५६॥
दिसे रज्जुनें सर्प ऐशा प्रकारें चिदात्म - प्रकाशेंचि दोन्ही शरीरेंदिसे दोंप्रकारे चिदात्मत्व तेंही असे भोग एका दुज्या भोग नाहीं ॥५७॥
भोक्ता परिछिन्न न सर्वठायी देहींच जो व्यापक हातपायींहा जीव आणीक जडे प्रकाशीं तें बिंब सर्वत्र चिदंबुराशी ॥५८॥
घेऊनि सूक्ष्मतनुतें प्रतिबिंब जातेंहें स्थूल रज्जुवरि सर्प तसें रहातेंबिंबें प्रकाशक असे शव जेविं दृष्टीबिंबेंच येचरिति सूक्ष्म - शरीर - सृष्टी ॥५९॥
बिंबैक्य चित्प्रतिमुखासि सुषुप्ति जेव्हांबिंबात्मतेंकरुनि दोनिहि देह तेव्हांबिंब प्रकाशकचि चित्प्रतिबिंब नानाते जीव जीवपण त्याप्रति बोलवेना ॥६०॥
बिंबांत त्या प्रकृतिच्या अतिश्रुद्ध विद्याहे दूसरी प्रतिमुखात्मपणें अविद्याबिंब प्रकाशक उपाधियुगीं तथापीयेना उपाधिगुण अन्य - उपाधि रुपीं ॥६१॥
विविध इंद्रिय एक चिदात्मता परि नघे रस नासिक तत्वतान रसनेसहि गंध कधी कळे प्रकृति शुद्ध तसी रसना कळे ॥६२॥
चक्षुः श्रवा सर्प म्हणाल कैसा हा आइका येथ विचार ऐसादों इंद्रियां गोलक एक जैसें जिव्हेंत वागिंद्रिय - कार्य तैसें ॥६३॥
इंद्रियें दशहि लिंगशरीरीं गोलकें दिसति भोगविकारींस्थूल जीव उभयेंद्रिय भोगी श्रोत्र - कर्म नयनेंद्रिय भोगी ॥६४॥
जसीं इंद्रियें वेगळीं लिंगदेही तथी शक्ति अन्वोन्यतों होत नाहींतशा जीववृदी उपाधी अविद्या तथा ईश्वराची तथालागिं विद्याएवं प्रकाशक जडें अवधींच बिंबीहे जीव तों सकळ - दुःख - सुखाऽवलंबीबिंबात्मतेकरुनि वर्तति वृत्तिनानाजीवेश्वरात्मपण भिन्न जसें असेना ॥६६॥
म्हणुनि तत्वमसीति मुखें श्रुती जड - निषेध चिदैक्यचि बोलतीअसदुपाधि तथा सदुपाधितो परि निषेध अभेदचि साधतो ॥६७॥
जरि अभेदविलक्षणता कसी तरि उपाधिविलक्षणता असीवदति दोन सुपर्ण जया श्रुती जड उपाधिविलक्षण बोलती ॥६८॥
भोगार्थ जीव प्रतिबिंब झाला अद्वैतही द्वैतहि त्यासि बोलाअभेद तो वास्तव भेद भोगी बिंबात्मता जाणति आत्मयोगी ॥६९॥
प्रकाशें जसी सूर्यतेजेंचि दृष्टी दिसे तीस त्याऊपरी सर्व सृष्टी ॥७०॥
प्रकाशे जसी सूर्यतेजेंचि दृष्टी प्रकाशे तसी सूर्य - तेजेंचि सृष्टीतई सृष्टिचें ज्ञान दृष्टीस होतें असें चित्त चैतन्य योगें पहातें ॥७१॥
जई दृष्टि हे सूर्यमात्रासि पाहे न कांहीं तयामाजि हे सृष्टि आहेअसें चित्त चैतन्यमात्रासि लक्षी तदाकार होऊनि वृत्तीस भक्षी ॥७२॥
तदाकारता होय चित्तास जेव्हां दिसेना चिदाभास त्यामाजि तेव्हांनदीचें जई पावते नीर तीरीं न तेव्हा दिसे दूसरेंतीर नीरीं ॥७३॥
दरडिचें प्रतिबिंब निरीं दिसे जळ चढे दरडीस तई नसेमन अनंतसुखांत मुरे जई अनुभवीं प्रतिबिंब नुरे तई ॥७४॥
जों मीपण - स्फुरण तों प्रतिबिंब तेथेंआपादमस्तक अहंकृतिवृत्ति जेथेंवृत्तीस अंत नकळोनि मुरेल जेव्हांतेव्हां अहंपण न वा प्रतिबिंब तेव्हां ॥७५॥
हा निर्विकल्पक - समाधि निवृत्ति जेथेंदूजा समाधि सविकल्पक - वृत्ति तेथेंनाना घटादि विकृती तरि एक मातीमध्यें मृषा विकृति मातिच आदि अंतीं ॥७६॥
समाधींत या वृत्तिही ब्रम्ह होती घटादिप्रपंची जसी एक मातीदिसेना असे तीविणें कुंभ जैसा विना ब्रम्हचैतन्य हा भाव तैसा ॥७७॥
हरीनेंच जो चित्सुधाग्रंथ केला असे तेथ विस्तार हा वर्णियेलास्थिती या समाधीमधें योगियांसी दिसे केवळ ब्रम्ह हें विश्व त्यांसी ॥७८॥
घडे येथही ऐक्य जीवासि बिंबीं जई सत्व विश्वात्मकत्वावलंबींचिदाभास भोगार्थ त्या सत्व - नीरीं अहंकारऊर्मीत हाले शरीरीं ॥७९॥
असे बोलिलें स्पष्ट हें भॊक्तृतत्वीं चिदाभास भोगी दिसे मिश्रसत्वींघडे नित्य अभ्यास बिंबात्मयोगी गुणी भोग भोगूंनिही तो न भोगी ॥८०॥
ज्ञानाऽभिमान कितिएक धरोनि चित्तींअभ्यास - वर्जित - मुखें वदती कुयुक्तीविप्रत्व - विस्मृति पडे तरि तो द्विजातीयेणेंरितीच सधवा विधवा नहोती ॥८१॥
हे बोल फोल परि मानुनि खोल लोकींअभ्यास टाकुनि दिल्हे चिदचिद्विवेकींबुद्धीस हे स्मरण - विस्मरणादि धर्मब्रम्ह प्रकाशक असें नकळेचि वर्म ॥८२॥
विप्रत्व विप्र विसरोनि न शूद्र होतीतैशाचि नापितगृहा सधवा नजातीब्रम्हत्व - भाव विसरेलचि बुद्धि जेव्हांदेहात्म भाव सहजें तिस सिद्ध तेव्हां ॥८३॥
अभ्यास यास्तव सदा करिताति योगीब्रम्हात्मभाव दृढ पावति वीतरागीअभ्यासती सगुण निर्गुण विश्वरुपीब्रम्हात्मभाव निज - चित्सुख - सत्वरुपीं ॥८४॥
जो ग्रंथ वामन - मुखें जगदात्मदेवेंकेला असे निगमसार यथार्थ नावेंअभ्यास तेथ कथिले हरि - भक्ति - भावेंते मानसीं धरुनि जीतचि मुक्त व्हावें ॥८५॥
अध्याय हे सकळ आठहि अष्ट सिद्धींश्रोत्यांस येथ निजलाभ सुधा - समृद्धीकर्मे समर्पुनि हरीप्रति श्रुद्ध सत्वींव्हावें विमुक्त इतुकें फळ कर्मतत्वीं ॥८६॥
हा कर्मतत्व हरिनें रचिला प्रबंधश्रुत्यर्थसार हरि जो जन - कर्म - बंधजो श्री त्रिविक्रम जगीं जगदात्मबंधूतो वामन प्रभु कृपाऽमृत - पूर्ण - सिंधू ॥८७॥
स्फूर्ति त्रिविक्रमपणें श्रुतिसार तत्वींसंक्षेपतें दिसतसे स्मृति वामनत्वींतोचि त्रिविक्रम असा पसरे त्रिलोकींग्रंथार्थ संत - त्दृदयीं स्व - मुखाऽवलोकीं ॥८८॥
ज्याच्या स्मृतीकरुनी आणिक नाम घेतांदान क्रिया तप मखादिकही करीतांजें न्यून तें सकळही परिपूर्ण होतेंऐसें स्मृती वदति तो रचणार यातें ॥८९॥
ग्रंथासि या करुनि आपण आपणातेंतो अर्पितो नवल केवळ येथ होतेंऐसी समुद्र - लहरी पडते समुद्रींतैसीच वृत्तिलहरी असि चित्समुद्रीं ॥९०॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तेथ
— तिथे
तैसें
— तसे
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
घडे
— घडते, शक्य होते
ऐसें
— असे
जैसें
— जसे
एवं
— अशा प्रकारे
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जेथ
— जिथे
प्रकृति
— सृष्टीचे मूळ जड तत्त्व
सहजें
— सहजपणे, आपोआप

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.