मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्रीहरिगीता — महाभूतविवेक

साहित्य

श्रीहरिगीता — महाभूतविवेक

श्लोक १–१५०

shriharigita — mahabhutaviveka

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

‘पंचदशी’तील महाभूतविवेक प्रकरणावरील टीका — आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच महाभूतांचा विचार. ‘तत्त्वविवेक संपला, पण तृप्तीचा ढेकर आला नाही, म्हणून भूतविवेक’ — या घरगुती प्रतिमेने प्रकरणाची सुरुवात होते. या मालिकेतील सर्वात मोठा भाग.

हरि ॐआतां आम्हीं ऐसें करुं ॥ श्रोतया आर्दी नमस्कारूं ॥अवधानाचाद एती चारू ॥ म्हणोनीयां ॥१॥
श्रोतया विण ॥ वत्त्क्या नव्हे वक्तेपण ॥मायबापचि ते जाण ॥ वक्तयाचे ॥२॥
तत्वविवेक संपला ॥ परि तृप्तींढेंकर नाहीं दिला ॥म्हणोनी भूतविवेकाला ॥ आरोगू पूढती ॥३॥
“सदैव सोम्येदमग्र आसीत्” ॥ इत्यादि घेउनी श्रुतिसिद्धार्थ ॥नानापक्वान्नें करीत ॥ श्रीविद्यारण्यमुनी ॥४॥
तेथें मी वाढपी झालों ॥ चौगुणें वाढुं लागलों ॥श्रोतसमुदाय लागला डोलें ॥ आनंदानें ॥५॥
ब्रम्हानिष्ठ भवाद्दश श्रोते ॥ तेथें माझे सतगुरु ही होते ॥त्याना प्रेमाचें उचंबळलें भरितें ॥ शब्द लालित्यें ॥६॥
म्हणती आतां पुरेकरीं ॥ श्लोकार्थातें विवरीं ॥किती वाढिशी वरचेवरी ॥ तृप्ती वरी तृप्ति ॥७॥
ऐकुनी सतगुरुच्या बोला ॥ लागलों मी व्याख्यानाला ॥तो प्रथम श्लोक पुढें आला ॥ मुनिवर्यांचा ॥८॥
सदद्वैतं श्रुतं यत्तत्पंचभूतविवेकत: ॥बोद्धुं शक्यं ततो भूतपंचकं प्रविविच्यते ॥१॥
सकल ही सृष्टीनिर्माण ॥ झाली सताद्वैतवस्तु पासून ॥ऐशी बोलली श्रुती प्रमाण ॥ “सदेव” इत्यादिना ॥९॥
तें अद्वैत ब्रम्हा कैसेनी बोलावें ॥ जेथ वाचा मन परतलीं स्वभावें ॥कार्या वरुनी अनुभवावें ॥ पंच भूतांच्या ॥१०॥
म्हणोनी पंचभूतविवेक ॥ करूं आताम सम्यक ॥जेणें होईल हरिख ॥ श्रोतृजना ॥११॥
शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे ॥एकद्वित्रिचतु: पंचगुणा व्योमादिषु क्रमात् ॥२॥
आकाशाचा शब्दगुण ॥ तेथून वायु झाला उत्पन्न ॥त्याला आले दोन गुण ॥ शब्द स्पर्श ॥१२॥
वायुपासून वन्ही झाला ॥ तो धरी तीन गुणांला ॥शब्दस्पर्श आणि रूपाला ॥ प्रकाशत्वें ॥१३॥
अग्री पासूनी झाला रस ॥ तो धरी चौगुणास ॥शब्दस्पर्श रूपरस ॥ पातळपणें ॥१४॥
तेथून झाली भूमी ॥ ती पांच गुणातें आक्रमी ॥शब्द स्पर्श रूप नामीं ॥ रस गंध ॥१५॥
प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायोर्बीसीति शब्दनम् ॥अनुष्णाशीतसंस्पर्शो वन्हौ भुगुभुगुध्वनि: ॥३॥
उष्ण: स्पर्श: प्रभा रूपं जले बुलुबुलुध्वनि: ॥शीत स्पर्श शुक्लरूपं रसो माधुर्यमीरितम् ॥४॥
भूमौ कडकडाशब्द: काठिण्यं स्पर्श इष्यते ॥नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रस: ॥५॥
सुरमीतरगंधौ द्वौ गुणा: सम्यक विवेचिता: ॥प्रतिध्वनि उमटतो ॥ तोच आकाशीं शब्द होतो ॥हाचि एक गुण राहतो ॥ आकाशतत्वीं ॥१६॥
वायूचा शब्द वीसीत ॥ थंडगार स्पर्श होत ॥हे दोन गुण राहत ॥ जये ठायीं ॥१७॥
अग्रीचा भुगुभुगुध्वनि ॥ उष्णस्पर्श रूप प्रकाशनीं ॥ऐसें राहती गुण तीनी ॥ एके ठायीं ॥१८॥
जळीं बुलबुल शब्द होतां ॥ शीतस्पर्श शुक्ल रूपता ॥रसीं वसे माधुर्यता ॥ चारी गुणें ॥१९॥
भूमीं कडकड शब्द होत ॥ कठीण स्पर्श लागत ॥नीलादि चित्ररूप दिसत ॥ मधुर आम्लादि रस ॥२०॥
गंधही नानागुण ॥ भूमीमध्यें असतीजाण ॥एवं हीं पांचही लक्षण ॥ पृथ्वीठायीं ॥२१॥
ऐशीं हीं पंचभूतें ॥ धरितीं झालीं नानागुणातें ॥तयांचें कार्य इंद्रियें त्यांतें ॥ पुढेंकरुनी बोलती ॥२२॥
श्रोत्रं त्वकचक्षुषी जिव्हा घ्राणं चेंद्रियपंचकं ॥६॥
कर्णादिगोलकस्थं तच्छब्दादिग्राहकं क्रमात् ॥सौक्ष्म्यात्कार्यानुमेयं तत्प्रायो धावेद्बहिर्मुखम् ॥७॥
आकाशाचें इंद्रिय श्रोत्र होत ॥ तें कर्णगोलकीं राहत ॥शब्दाशीं ग्रहण करीत ॥ अंतर्बाहय ॥२३॥
वायुचें त्वगेंद्रिय होत ॥ तें सर्वशरीरभर राहत ॥स्पर्शानें झालें जाणत ॥ अंतर्बाहय ॥२४॥
अग्रींपासून चक्षु झाले ॥ ते नेत्रगोलकीं राहिले ॥अंतर्बाहय पहाते झाले ॥ रूपालागीं ॥२५॥
आपाची जिव्हा झाली ॥ ती रस चाखुं लागली ॥रसना नाम पावली ॥ मुखगोलकीं ॥२६॥
पृथ्वीचें झालें घ्राण ॥ तें गंधातें करी ग्रहण ॥नासिकगोलकीं राहून ॥ अंतर्बाहय ॥२७॥
इंद्रियें असती सूक्ष्म जाण ॥ तयांचा कार्यावरूनी अनुमान ॥जयाचें नेहमी क्रमण ॥ बाहयप्रदेशीं ॥२८॥
“परांचि खानिव्यतृणत्स्वयंभू:” इति ॥ प्रमाण बोलियली श्रुति ॥अनुभवें पहावें निश्चिती ॥ आपणही ॥२९॥
शंका - बाहयार्थ इंद्रियें ग्रहण करिती ॥ परि अंतर कैसेनी जाणती ॥तयाची करावया प्रचिती ॥ श्लोकद्वय बोलिले ॥३०॥
कदाचित् पिहिते कर्णे श्रूयते शब्द आंतर: ॥प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेऽन्नभक्षणे ॥८॥
व्यज्यंते हयांतरा: स्पर्शा मीलने चांतरं तम: ॥उद्नारेरसगंधौचेत्यक्षाणामांतरग्रह: ॥९॥
कर्णीं बोटें घालुनी पाहतां ॥ ऐकुं येती अंतर्ध्वनिता ॥जलपानें किंवा अन्न भक्षितां ॥ स्पर्श समजे ॥३१॥
नेत्रांचें करितां मीलन ॥ अंतर तम दिसतसे जाण ॥ढेंकर येतां तत्क्षण ॥ गंव रस समजे ॥३२॥
येणेंयेणें सर्वो परी ॥ अंतरजाणती चतुरी ॥अंतर ग्राहक निर्भारी ॥ इंद्रियें असती ॥३३॥
आतां कर्मेद्रियांचें करावया कथन ॥ मुनी बोलियेले श्लोक दोन ॥तयांचें ही विवरण ॥ करूं पुढती ॥३४॥
पंचोत्त्क्यादानगमनविसर्गानंदका: क्रिया: ॥कृषिवाणिज्यसेवाद्या: पंचस्वतर्भवंति हि ॥१०॥
वाक्पाणिपादपायूपस्थैरक्षैस्तत्क्रियाजनि: ॥मुखादिगोलकेष्वास्ते तत्कर्मेद्रियपंचकं ॥११॥
मुख गोलकीं राहूनी वाणी ॥ शब्दांचा करितसे ध्वनी ॥हस्तद्वयीं राहुनी पाणि ॥ घेणें देणें करी ॥३५॥
पादद्वयीं राहुन ॥ करीतसे आक्रमण ॥गुदीं करी मळाचें विसर्जन ॥ तत् इंद्रियें ॥३६॥
शिश्नीं भोगातें भोगुन ॥ आनंद करीतसे जाण ॥मूत्र रेत विसर्जन ॥ हेंही करितसे ॥३७॥
कृषि वाणिज्य आणि सेवा ॥ आदि शब्दें सकल क्रियाजात अघवा ॥करितसे इंद्रिय मेलावा ॥ यथायोग्य ॥४८॥
इंद्रियें गोलकांतरीं राहुन ॥ करिती विषयांची आठवण ॥गोलकही तद्रूप होऊन ॥ नाचूं लागे ॥३९॥
मनोदशेंद्रियाध्यक्षं ह्रप्तद्मगोलके स्थितम् ॥तच्चांत: करणं बाहयेष्वस्वातंत्र्याद्विनेंद्रियै: ॥१२॥
दशेंद्रियाचें अव्यक्षमन ॥ तें ह्रदकमलीं स्थित होऊन ॥सकल इंद्रियें स्वाधनि ॥ घेऊनी वर्तें ॥४०॥
शरीरीं जातांति अन्न ॥ आंत वाटूनीं होतसे चूर्ण ॥मग तें पातळ पदरीं गाळून ॥ चोथा गुदीं विसर्गी ॥४१॥
कांहीं वेळ तसेंची राहतें ॥ तेथें सत्व निघून पाणी वरती सांटतें ॥तें मूत्र पिशवी झालें भरतें ॥ असार म्हणोनी ॥४२॥
मग उरतें जें का सार ॥ तया अग्री कढवी अनिवार ॥तेंचि लाल होतसे रुधिर ॥ शरीर पोसावया लागीं ॥४३॥
तयाची जी सांठवण ॥ मांसाची होतसे गोठण ॥तया ह्रदय हें नामाभिधान ॥ आलें असें ॥४४॥
तें अंगुष्ठमात्र गोल असे ॥ कमलकलिका साम्य दिसे ॥द्वादश पाकळया भेदें वसे ॥ म्हणोनी ह्रदकमल ॥४५॥
तें अंतरीं असे पोकळ ॥ हेंचि मनाचें वसतिस्थळ ॥इयाचीच नांवे सकळ ॥ अंत:करणादि ॥४६॥
बाहयइंद्रियां चालक ॥ सकल शरीरा पोषक ॥येथून करीतसे देख ॥ एकलेंची ॥४७॥
तेथें तें रुधीर आणकीं कढे ॥ तेणें रेत अर्क दोन निवडे ॥तेथेंच सकलशीरांचीं बिर्हाडें ॥ देह पोसक्या ॥४८॥
त्यांना रक्त रेताची करी वाटणी ॥ आपण तैजम अर्क खातसे आनुदिनीं ॥म्हणोनी तैजस अभिमानी ॥ नाम पावलें ॥४९॥
असो ऐसें जें कां मन ॥ त्याचेंच नांव अंत:करण ॥आंतील झालें साधन ॥ म्हणोनियां ॥५०॥
हयाचा स्वतंत्र कारभार ॥ सकल इंद्रियें याचे ताबेदार ॥होंउनी करिती कारभार ॥ मना सारिखा ॥५१॥
अक्षेष्वर्थार्पितेष्वेतत्गुणदोषविचारकम् ॥सत्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तै: ॥१३॥
इंद्रियें घेतां विषय गोडी ॥ तेथें हें आवडी निवडी ॥गुणदोषाची परवडी ॥ करीतसे ॥५२॥
आतां हा विषय पुरे ॥ इयाची गोडी आणीख घ्यारे ॥येणें येणें नानाप्रकारें ॥ आज्ञा करितसे ॥५३॥
हें नाहीं ज्या कामीं ॥ तेथें इंद्रियें असून निकामी ॥ऐसें हें पराक्रमी ॥ वर्ततसे ॥५४॥
सत्व रज तमोगुणें ॥ हें विकारी होतसे जाणे ॥तयाची ही पृथक्करणें ॥ दाऊं पुढती ॥५५॥
वैराग्यं शांतिरौदार्यमित्याद्य: सत्वसंभवा: ॥कामक्रोधौ लोभयत्नामित्याद्या रजसोस्थिता: ॥१४॥
आलस्य भ्रांतितंत्राद्या विकारास्तमसोस्थिता: ॥सात्विकै: पुण्यनिष्पत्ति: पापोत्पत्तिश्च राजसै: ॥१५॥
तामसैर्नोभयं किं तु वृथायु: क्षपणंभवेत् ॥अवाहंप्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थिति: ॥१६॥
होतांचि सत्वांचा संभव ॥ लाधे वैराग्य शांति औदार्य ठेव ॥आणीखही नाना वैभव ॥ आपोआप येतें ॥५६॥
काम क्रोध लोभ ॥ मद मत्सर आणि दंभ ॥नाना यत्न होती स्वयंभ ॥ रजोद्भवीं ॥५७॥
आलस्य निद्रा भ्रांति ॥ तमोगुणीं उद्भवती ॥आणखीही नाना जाती ॥ मूर्खपणाच्या ॥५८॥
सात्विक गुणाचेनि योगें ॥ पुण्य व्हावया लागे ॥राजसाचे निसंगें ॥ पापोत्पत्ति ॥६९॥
तामस गुई दोन्ही नाहीं ॥ व्यर्थ आयुष्य जातें पाहीं ॥ऐसें हें मनचि पाहीं ॥ नाना विकारीं होतसे ॥६०॥
ऐसें जें कां मन ॥ तयाचाही स्वामी आंपण ॥अहं प्रत्ययी होऊन ॥ कार्य करी ॥६१॥
गीते माजी परमात्मा ॥ बोलियेले “अहं आत्मा” ॥आदि मध्य अंत ग्रामा ॥ भूतीं असे ॥६२॥
लोकींही हीच स्थिति ॥ कार्य कारी त्यातें प्रभु म्हणती ॥म्हणोनी अहमात्मा निश्चिती ॥ मुख्य येथींचा ॥६३॥
स्पष्टशब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् ॥अक्षादावपितच्छास्त्रयुक्तिभ्यामवधार्यताम् ॥१७॥
शब्दादि युक्ती करून ॥ भौतीक स्पष्ट केलें जाण ॥कोणतीहीवस्तु निर्माण ॥ भूत कार्यीं वसे ॥६४॥
घेउनी शास्त्राचें प्रमाण ॥ इंद्रियें कार्यासहित कथलीं जाण ॥“अन्नमयंहि सौम्य मन” ॥ इत्यादि वाक्यें ॥६५॥
आदी मध्य अंती ॥ एकचि आत्मा निश्चिती ॥हेही झाली स्पष्टोक्ती ॥ अन्वय व्यतिरेकें ॥६६॥
जैसे मृत्तिका कार्य घत होत ॥ आदी मध्य अंतीं माती असत ॥तैसेंच हया भौक्तिकीं वसत ॥ आत्मतत्व ॥६७॥
“षोडशकला सौम्य पुरुष” इति ॥ बोलियली छांदोग्य श्रुति ॥तीच केली स्पष्टोक्ती ॥ शास्त्रयुक्ति ॥६८॥
एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेंणाप्यवगम्यते ॥यावत्किंचिद्भवेदेतदिदं शब्दोदितंजगत् ॥१८॥
“सदैव सोम्येदमग्र आसीत” ॥ इत्यादि श्रुति सिद्धांत ॥तेचि अद्वैत ब्रम्हा प्रतिपादित ॥ युक्ती केलें ॥६९॥
भूत भौतिक सृष्टी ॥ एकलाची करी परमेष्टी ॥तयाची ही हातवटी ॥ दाखविली ॥७०॥
एकादश इंद्रियें कडुन ॥ किंवा शास्त्र युक्ती लढऊन ॥हेंचि केलें प्रतिपादन ॥ अद्वैत ब्रम्हा ॥७१॥
इदं ही सकल जंगत ॥ ऐसे झाले प्रतिपादित ॥तेंचि करावया पूरीत ॥ प्रमाण बोले ॥७२॥
इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवाद्वितीयकम् ॥सदेवासी न्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वच: ॥१९॥
अरुण पुत्र उद्दालक ॥ ऐसेंच बोलिला सम्यक ॥नामरूपादी भासक ॥ सद्ववस्तुति असे ॥७२॥
साखरेचें केलें वृंदावन ॥ तैं कायेतें कहवटपण ॥नामरूप भासोनी भिन्न ॥ साखरची तें ॥७३॥
तैसेंची हें जगत ॥ नामरूपीं भिन्न दिसत ॥परीअसे एक अद्वैत ॥ ब्रम्हा पूर्ण ॥७४॥
आदी मध्य अंतीं ॥ नगीं सुवर्णाचीच वस्ती ॥तैसेंच ब्रम्हानिश्चिती ॥ सर्वत्र असे ॥७५॥
येथें झालें न झालें ॥ नाना तैसेंची संचलें ॥है सकलही आर्वाक बोले ॥ म्रांतमयी ॥७६॥
वस्तुचॆं यथार्थ वर्णन ॥ वस्तुशींच न होय जाण ॥तेथें अवस्तु प्रमाण ॥ कवणें घ्यावें ॥७७॥
तेंचि करावया कथन ॥ मुनी बोलियेले पुढें होऊन ॥आम्हीही तयाची कासधरून ॥ सरसावलों ॥७८॥
शं० - हांहां तुमचे बोला ॥ जीव आमुचा भ्याला ॥कांकीं एकही प्रमाणाला ॥ धरितां नये ॥७९॥
प्रथम अद्वैत बोलितां ॥ पुढें द्वैत प्रतिपादितां ॥पुन्हां अद्वैतचि द्वैत झालें म्हणतां ॥ एवं सकल घोटाळा ॥८०॥
बरें पुढें कांहींच नाहीं झालें ॥ वस्तु जैसें तैसेचि संचलें ॥हेंही प्रतिपादित केलें ॥ भ्नमिष्टा सारखें ॥८१॥
आतां आम्हीं ऐसें विचारूं ॥ वस्तुचि झालाना संसारु ॥का नामरूपादि प्रकारु ॥ निराळा असें ॥८२॥
स० - कोणी ही बोलिल्या वत्त्क्याचा ॥ शेवट सिद्धांत घ्यावा त्याचा ॥तैसा आमुचे बोलाचा ॥ शेवट घेई ॥८३॥
वस्तु स्वत: अभेद ॥ तेथें कधींच नाहीं झाले भेद ॥हे सद्दष्टांत करुनि सिद्ध ॥ दाऊं तुजला ॥८४॥
वृक्षस्य स्वगतो भेद: पत्रपुष्पफलादिभि: ॥वृक्षांतरात् सजातीयो विजातीय: शिलादित: ॥२०॥
मुळीं भेद असती त्रय ॥ स्वगत सजातीय विजातीय ॥जैसा वृक्षाचा स्वगत भेद होय ॥ पत्र पुष्प फलादि ॥८५॥
अन्य वृक्षांच्या जाती ॥ ते सजातीय भेद होती ॥मनुष्य पाणी शिलादि होती ॥ विजातीय भेद ॥८६॥
तथा सद्वस्तुनो भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ॥ऐक्यावधारणद्वैतप्रतिषेधैस्त्रिभि: क्रमात् ॥२१॥
ऐसे हे भेदत्रय झाले ॥ परि ते सद्वस्तुशीं नाहीं स्पर्शिले ॥“एक मेवाद्वितीयं” ऐसें बोले ॥ श्रुति माता ॥८७॥
म्हणोनी भेदत्रयारहित ॥ सद्वस्तु असे निभ्रांत ॥तेंचि क्रमानें प्रतिपादित ॥ करुं आतां ॥८८॥
सतो नावयवा: शंक्यास्तद्शंस्यानिरुपणात् ॥नामरूपे न तस्यांशौ तयोरद्याप्यनुद्भवात् ॥२२॥
नामरूपे भवस्यैव सृष्टित्वात्सृष्टित: पुरा ॥न तयोरुद्भवो तस्मान्निरंशं सद्यतो वियत् ॥२३॥
निरंश अवयव रहित ॥ सद्वस्तु सदां असत ॥तेथें नामरूपादि प्रकार होत ॥ कवणें काळीं ॥८९॥
मुळींच झालें नाहीं उद्भव ॥ तेथें नामारूपाचा कैचा सद्भाव ॥आकाशवत वस्तु निरवयव ॥ सदां सर्वदां ॥९०॥
नाहीं जेथें अवयव ॥ तेथें स्वगत भेदाचा कैचा ठावा ॥वस्तु ठाईं असे अभाव ॥ सकल भेदाचा ॥९१॥
सदंतरं सजातीयं न वैलक्षण्यवर्जनात् ॥नामरूपो पाधिभेदं विना नैव सतो भिदा ॥२४॥
नामरूप गुण लक्षण वर्जित ॥ वस्तु असे सदोदीत ॥तेथें सजातीय भेद होत ॥ कवण्या गुणें ॥९२॥
नामरूपा वांचून ॥ भेदासी नसे ठाण ॥आतां भेद कोठून ॥ सजातीय येई ॥९३॥
घटाकाश मठाकाश ॥ तैसा उपाधी भेद भासत ॥तैसाही न स्पर्शत ॥ वस्तुचे ठाई ॥९४॥
कोठें ऐकिलें ना देखिलें ॥ वस्तु सजातीय पुढें आलें ॥तात्पर्य भेद रहित संचले ॥ वस्तु जैशाचें तैसें ॥९५॥
विजातीयमसत्तत्त न खल्वस्तीति गम्यते ॥नास्यात: प्रतियोगित्वं विजातीयाद्भिदा कुत: ॥२५॥
आतां विजातीय भेद असत ॥ तो मुळींच सिद्ध नाहीं होत ॥असत शब्देंचि प्रतिपादित ॥ नाहीं ऐसें ॥९६॥
मुळींच जें झालें नाहीं ॥ तें प्रतियोगी होईल कैसें पाहीं ॥तात्पर्य एकही भेद नाही ॥ वस्तुठाई ॥९७॥
स्वगत सजातीय विजातीय ॥ भेदरहित वस्तु होय ॥म्हणोनी “एकमेवाद्वितीय” ॥ श्रुति बोलिली ॥९८॥
एकमेबाद्वितीयं सत्सिद्धमत्र तु केचन ॥विव्हला असदेबेदं पुरासीदित्यवर्णयन् ॥२६॥
एवं ऐसें झालें सिद्ध ॥ वस्तु सदा सर्वदा अभेद ॥परि मूर्ख तेथेंही विरुद्ध ॥ असतवाद करिती ॥९९॥
तयाचीया रीती ॥ दाउं तुजला पुढती ॥“असदेवेदंपुरासीत्” इति ॥ विव्हालादि बोलती ॥१००॥
मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥
मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥
नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥
किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥
एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥
वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥
विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥
अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥
मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥
मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥
नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥
किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥
एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥
वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥
विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥
अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥
गौडाचार्या निर्विकल्पे समाधावन्ययोगिनाम् ॥साकारब्रम्हानिष्ठानामत्यंतं भयमूचिरे ॥२८॥
अस्पर्शयोगो नामैष दुर्दर्श: सर्वयोगिमि: ॥योगिनो बिभ्यति हयस्मादभये भयदर्शिन: ॥२९॥
साकार ब्रम्हानिष्ट योगी ॥ किती दुर्दशा पावती आंगीं ॥गौडाचार्य तया लागीं ॥ बाल म्हणती ॥१०८॥
जैसे बालें भिती बागुलाला ॥ तैसेचि हे योगी “अस्पर्श” योगाला ॥अभये भय दर्शनाला ॥ प्रतिपादिती ॥१०९॥
साकार ध्यान निष्टा ॥ करुनि मिरविती प्रतिष्ठा ॥म्हणती निर्विकल्पाचिया वाटा ॥ कष्टमयी ॥११०॥
कल्पियेलें ध्यान ॥ दिसे तोंवरी समाधान ॥नाहीं तरी रुदन ॥ करिताती ॥१११॥
अखंड स्वात्माराम ॥ तेथें न करिती आराम ॥सुगमचि मानिती दुर्गम ॥ भयप्रद ॥११२॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
तया
— त्याला, त्या
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
एवं
— अशा प्रकारे
पुढती
— पुन्हा, पुढे
ठायीं
— ठिकाणी
देखे
— पाहतो
वरी
— वर; शिवाय
जेथ
— जिथे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
सकळ
— सर्व
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
वैराग्य
— आसक्ती सुटणे
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
तैं
— तेव्हा
जैसें
— जसे
तैसें
— तसे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.