शं० - योगिया भय कां वाटावे ॥ प्राणायामादि साधिती आघवे ॥अस्पर्शयोगातें भियावे ॥ कवणे रीती ॥११३॥
स० वृत्तीचा आधार तुटतां ॥ वाटे येईल मृत्यु अवस्था ॥आपण नाहींसे हौं हें भय चित्ता ॥ निरंतर वाटे ॥११४॥
सदवस्तु असत कल्पिती ॥ येणें भांबावलेनी चित्तीं ॥अभये भयचि मानिती ॥ मूर्ख पणें ॥११५॥
आपण दुसरें कल्पावें ॥ मग योगें तेंचि आपण व्हावें ॥यया परीस आपण आपुले स्वभावें ॥ कां न मुरावें ॥११६॥
आपणचि आपण होतां ॥ अस्पर्श योग साधे आयिता ॥परि या गुरुगम्य वार्ता ॥ येरा कानडया ॥११७॥
अमृतसागरीं बुडतां ॥ वाटे मृत्युचें भय चित्ता ॥ऐशा हया योगियांच्या वार्ता ॥ एकरसीं आटणी ॥वसे तेथें स्पर्शालागोनी ॥ प्रधानत्व ॥११९॥
तुम्ही अस्पर्श आणि योग म्हणतां ॥ हें विपरीत वाटे आमुचे चित्ता ॥ब्रम्हाचारी स्वपुत्र वार्ता ॥ कैसी मानी ॥१२०॥
स० कर्ष स्पर्श संयोग आणि योग ॥ ऐसे चार असती योग विभाग ॥तयांचें ही यथासांग ॥ वर्णना करूं ॥१२१॥
वस्तु वस्तुशीं आकर्विती ॥ तया गुरुत्वाकर्षण म्हणती ॥ही योगाची प्रथम जाती ॥ कर्षयोग ॥१२२॥
तेथें सजात न विजात ॥ एकमेकाशीं आकर्षित ॥परि मिळणी नाहीं होत ॥ एकरसीं ॥१२३॥
काळें एकमेक भिडती ॥ तया स्पर्शयोग म्हणती ॥इयाची ही होय स्थिती ॥ प्रथमा सारखी ॥१२४॥
आतां तिसरा जो संयोग ॥ तो सजाती विण न होय सांग ॥विजातीयाशीं प्रसंग ॥ कधींच न करी ॥१२५॥
परि इयांचें मिश्रण ॥ ओळखताती सुजाण ॥कांकीं एकरसी आटण ॥ नव्हे म्हणोनी ॥१२६॥
जैसें दुग्धीं पाणी मिसळलें ॥ संयोगीं एकत्वची दिसलें ॥परि राजहंस चोंचीं निवडलें ॥ पाणी तें पाणी ॥१२७॥
आतां ऐक बापा योग ॥ जो सकळ धुरीची सीग ॥योगीये टाकिती आंग ॥ जया ठायीं ॥१२८॥
तो मिळणी एकवटला ॥ पुनरपि न निवडे कोणाला ॥परि द्वैतपणास जागा दिला ॥ एकरसीं ॥१२९॥
तैसा नव्हे अस्पर्श योगु ॥ ज्याचा मुळींच नाहीं वियोगु ॥प्रतिबिंब बिंबातें आंगु ॥ स्पर्शिलें जैसें ॥१३०॥
नाना रज्जुसर्पाभासु ॥ ज्ञान होतांचि होतसे नासु ॥मग मिळणी तियेचा स्पर्शु ॥ तिये जैसा ॥१३१॥
कां भ्रमें कोणी विसरला ॥ हा मी नोहेचि म्हणे आपुल्याला ॥भ्रमनिरसतांचि योग झाला ॥ त्याचा त्याला ॥१३२॥
नाना स्वप्नीं आपण मेला ॥ बहु लाक्रोशें रडुं लागला ॥प्रबोध होतांचि लाधला ॥ आपआपणा ॥१३३॥
किंवा स्वप्नीं भद्रजाति ॥ भिक्षा मागतां जाजावला बहुति ॥जागा होतांचि मिळाला निश्चिती ॥ राजवैभवा ॥१३४॥
हें जैसें का मिळणें ॥ किंवा झालीं स्पर्शलक्षणें ॥तैसिये ठाईं असणें ॥ अस्पर्श योगू ॥१३५॥
आपणासी आपण मिळणें ॥ हींच अस्पर्शयोगाचीं लक्षणें ॥सिद्धचि कृतक नव्हती जाणे ॥ इतरां परी ॥१३६॥
ऐसा सोडूनी राजपथ ॥ भ्रमिष्ट होती भयाभीत ॥तयांसी श्रीगुरु दूषित ॥ आचार्यही ॥१३७॥
भगवत्पूज्यपादाश्च शुष्कतर्कपटूनमून् ॥आहुर्माध्यामिकान् भ्रांतानचिंत्यऽस्मिन्सदात्मनि ॥३०॥
सद्दस्तुचे ठाईं ॥ विपरीत कल्पिती जे कांहीं ॥तया भ्रांताचें नांवही ॥ घेऊं नये ॥१३८॥
ते आपणचि ना बुडती ॥ इतरांसी घेती सांगाती ॥म्हणोनी आचार्य दूषीती ॥ तया लागीं ॥१३९॥
अनाद्दत्य श्रुतिं मौर्ख्यात्तदिमे बौद्धास्तमस्विन: ॥आपेदिरे निरात्मत्वमनुमानैकचक्षुष: ॥३१॥
माध्यामिक बौद्धादिक ॥ श्रुती अनादरुनी मूर्ख ॥इंद्रियें अनुमानिती देख ॥ निरात्मत्व ॥१३०॥
म्हणती शून्थच पूर्वीं होतें ॥ तया पासुनी हीं पंच महाभूतें ॥सृष्टी झाले निर्मिते ॥ संयोग बळें ॥१४१॥
प्रलय होतां अंतीं ॥ शून्यची सकल होती ॥पुन्हा तेथोनीच उद्भवती ॥ आपोआप ॥१४२॥
एवं आदी आणि अंतीं ॥ शून्यचि आहे निश्चिती ॥ऐसें जे का बोलती ॥ तया दूषती ॥१४३॥
शून्यमासीदिति ब्रूषे सद्योगं वा सदात्मताम् ॥शून्यस्य न तु तद्युक्तमुभयं व्याहतत्वत: ॥३२॥
न युक्तस्तमसा सूर्यो नापिचासौ तमोमय: ॥सच्छून्ययोर्विरोधित्वाच्छून्यमासीत्कथं वद ॥३३॥
तूं पूर्वीं शून्य होतें ऐसें बोलसी ॥ तरी तया कोण सत्ता लाविसी ॥कां तेंचि स्वत: विराजसी ॥ सद्रूपत्वें ॥१४४॥
दोन्ही ही तुझ्या पक्षीं ॥ सतचि लाविसी साक्षी ॥परिहे विरुद्ध पणा लक्षी ॥ हेंही तुज नकळे ॥१४५॥
सूर्य आंधारें झाला युक्त ॥ किंवा तमोमयचि निश्चित ॥हे दोन्ही बोल भ्रांत ॥ जियापरी ॥१४६॥
तैसें शून्य विरोधी असतां ॥ कैसी लाविसी सद्रूप सत्ता ॥सरूपचि शून्य म्हणतां ॥ शून्यता कैसी ॥१४७॥
शून्याशीं शून्य कोणी म्हणावें ॥ शून्येची शून्या कैसें प्रकाशावें ॥नामरूपातें भावावें ॥ कवणें कवणा ॥१४८॥
वियदादेर्नामरूपे मायया सविकल्पिते ॥शून्यस्य नामरूपे च तथा चेज्जीव्यतांचिस्म् ॥३४॥
जैसे सस्तुद्वचे वरती ॥ जैसि आकाशादि नामरूपें कल्पिती ॥तैसेची माये शून्या वरती ॥ कल्पना करसी ॥१४९॥
सद्वस्तुचे ठाईं ऐसें कल्पिशी जरी कांहीं ॥ तरी तो अपसिद्धांत होई ॥तुझाचि तुजला ॥१५०॥
शून्य म्हणजे कांहीं अहे ऐसे मानिशी ॥ कां कांहीं नाहीं ऐसें कल्पिशी ॥आहे जरी तूं म्हणशी ॥ तरी शून्य कैसें ॥१५१॥
बरें नाहीं म्हणोनी बोलसी ॥ तरी सिद्धांता पुढें काय आणसी ॥शून्यची प्रतिपादिसी ॥ कवणे रीती ॥१५२॥
वांझेचिया लेंकरा ॥ अधिकारसी गंधर्व नगरा ॥नाना स्वप्नीय जनावरा ॥ मृगजळ पाजिशी ॥१५३॥
किंवा घेउनियां तमा ॥ सूर्य माखिशी उत्तमा ॥गंवची नसतां सीमा ॥ प्रतिपादिसी ॥१५४॥
ऐशापरी शून्यता ॥ कल्पनामयी असतां ॥चिरकाल राहूं जीविता ॥ तुझी तुझ्यापाशीं ॥१५५॥
वादी - तरी आमुचे शुन्याचियपरी ॥ तुमचिया सद्वस्तुचे उपरी ॥कल्पित नामरूपातें अंगीकारी ॥ तुम्ही झालां ॥१५६॥
वास्तविक पहातां ॥ नामरूप हे आभाव तत्वता ॥मग तुम्ही कैसे कल्पिता ॥ सद्वस्तुचे ठायीं ॥१५७॥
सतोऽपि नामरूपे द्वे कल्पिते चेत्तदा वद ॥कुत्रेति निरधिष्ठानो न भ्रम: क्वचिदीक्ष्यते ॥३५॥
सि० - अरे आम्ही मुळींच झालें नाहीं म्हणतों ॥ तूची तयाचा अंगीकार करितो ॥तये विषयीं आम्ही विचारतों ॥ सांग भातां ॥१५८॥
नामरूपें कल्पिशी ॥ तया अधिष्ठान काय घेशी ॥सत किंवा असत मानशी ॥ अथवा जगत ॥१५९॥
सदधिष्टानची जरीम्हणूं लागसी ॥ तरी कोणाचें नामरूप कोणा कल्पिशी ॥रजतादिकाचा आरोप करशी ॥ शुक्तिके वरती ॥१६०॥
अन्याचीं नामरूपें ॥ अन्या वस्तुशी आरोपे ॥हे मले झाले सोपे ॥ भ्रमा तुझ्या ॥१६१॥
चोरे करावी चोरी ॥ तूं त्या मालकची आंगीकारी ॥परि न्याय येता उजरी ॥ चोर तो चोर ॥१६२॥
विषा अमृत नाम ठेविलें ॥ पिउनी कोण सांग जियाले ॥तैसेचि नामरूपाचे मासले ॥ सदधिष्ठानीं ॥१६३॥
ब्रम्हा चारीयांचा नातु ॥ सुखें सांगु तुला हया मातु ॥परि नामरूपासी अधिष्ठातु ॥ सद्वस्तु नहोय ॥१६४॥
आतां असत म्हणू जावें ॥ तरि ते नाहींच स्वभावें ॥तेणें कैसेनि हुवावें ॥ अधिष्टान ॥ १६५॥
वांझेच्या मुलाची कन्या ॥ रूपवती परम धन्या ॥कोणवरील शुन्या ॥ वाचुनी तिला ॥१६६॥
म्हणोनीयां असत ॥ हें अधिष्ठान नाहीं होत ॥आतां म्हणशी जगत ॥ तरीही मिथ्या ॥१६७॥
मुळींच जें नाहीं झालें ॥ तया अधिष्ठान आदी बोले ॥वर्णन करी सुखें बागुलें ॥ बालामधी ॥१६८॥
एवं ऐसे झाले सिद्ध ॥ अधिष्ठान अमाव प्रसिद्धा ॥नामरूप हे निर्विवाद ॥ मिथ्या रूप ॥१६९॥
वादि - अधिष्टान नाहीं झालें ॥ कल्पना रूपेची संचले ॥ऐसे म्हणतां मिथ्यत्व आलें ॥ कैसें नामरूपा ॥१७०॥
सि० अरे अधिष्ठाना वांचून ॥ कल्पनाही नुगवते जाण ॥भ्रमासी सुद्धा कारण ॥ अधिष्ठान व्हावें ॥१७१॥
एवं नामरूपादि मासलें ॥ मुळींच सद्वस्तु नाहीं स्पर्शलें ॥म्हणोनी अपसिद्धांत झाले ॥ तार्किकांच ॥१७२॥
सदासीदितिशद्बार्थभेदे वैगुण्यमापतेत् ॥अभेदे पुनुरुक्ति: स्यान्मैवं लोके तथेक्षणात् ॥३६॥
शंका - असत बद्दल शंकित झाला ॥ तुम्ही व्याघात होतो बोलिला ॥तरी सदासीत या बोला ॥ काय म्हणावें ॥१७३॥
सत आसीत या दोन शब्दीं ॥ अर्थ भेदाची लब्धी का नलब्धी ॥लब्धी तरीं अद्वैत असिद्धी ॥ ना लब्धी तरी पुनरोक्ती ॥१७४॥
स० - अरे लोकीं याच रीती ॥ प्रयोगातें करिती ॥तयाशी पुनरोक्ती ॥ न बोलावें ॥१७५॥
कर्तव्यं कुरुते वाक्यं ब्रूते धारयस्य धारणम् ॥इत्यादिवासनाविष्टं प्रत्यासीत्सदितीरणम् ॥३७॥
कर्तव्य करितो ॥ वाक्यचि बोलतो ॥धारणें धरितो ॥ येणें रीती ॥१७६॥
सत् आसीत या बोला ॥ पुनरोक्ती दोष नाहीं आला ॥वासनाविष्ट लोकव्यवहाराला ॥ दर्शविलें ॥१७७॥
शं० - अस्तु अद्वैत वस्तुचे ठाईं ॥ कालाचा अभाव असे पाहीं ॥तेथ अग्रे पद नाहीं ॥ यथायोग्य ॥१७८॥
कालाभावे पुरेत्युक्ति: कालवासनया यतम् ॥शिष्यं प्रत्येव तेनात्र द्वितीयं न हि शंकते ॥३८॥
स० - “सदेव सौम्येदमग्र आसीत्” इति ॥ बोलिली प्रमाण श्रुति ॥तेथ कालभाव निश्चिती ॥ नाहीं केला ॥१७९॥
कालवासनाविष्ट जगतीं ॥ द्वैतबोधपर लोक बहु असती ॥तयांसी होवाया प्रचिती ॥ अग्रे ऐशी बोलली ॥१८०॥
चोद्यं वा परिहारो वा क्रियतां द्वैतभाषया ॥अद्वैतभाषया चोद्यं नास्ति नापि तदुत्तरम् ॥३९॥
शंका आणि समाधानी ॥ ही द्वैत भाषेंत आहे मीळणी ॥अद्वैतीं नाहीं दोनी ॥ शंका समाधान ॥१८१॥
अद्वैत वस्तूचे ठाईं ॥ वादची मुळीं नाहीं ॥सत्यची असे तें पाही ॥ सदा सर्वदा ॥१८२॥
एवं ऐसें झालें सिद्ध ॥ सद्वस्तु अभेद निर्विवाद ॥तेथें कोणाचाही नाहीं संबंध ॥ नामरूपादिकांचा ॥१८३॥
तदास्तिमितगंभीरं न तेजो न तमस्ततम् ॥अनाख्यमनभिव्यक्तं सत्किंचिदवशिष्यते ॥४०॥
वस्तुचें करावया वर्णन ॥ वेद ही मुकावला जाण ॥तेथें कोणाचें आतां प्रमाण ॥ पुढें करावें ॥१८४॥
परि द्वैत निषेधा साठीं ॥ उगीच स्मृती हुटहुटी ॥अज्ञ जनाची कणव मोठी ॥ आली म्हणोनी ॥१८५॥
सकळही असे चंचळ ॥ म्हणोनी वस्तुशी म्हणे निश्चळ ॥परि तें निश्चळ ना चंचळ ॥ नामरूपातीत ॥१८६॥
जे वाचामनाशीं न हो विषय ॥ ते कैसेनी होय प्रतिपादनीय ॥ऐसें गंभीर जें निरामय ॥ स्वयंप्रभ ॥१८७॥
सूर्यादिकांचीं तेजें ॥ खद्योत परिही न साजे ॥तम विलक्षण विराजे ॥ अनावरण ॥१८८॥
तयाची व्याख्या कोण करी ॥ जे अनभिव्यक्त निरंतरी ॥परि स्मृती बोलली चतुरी ॥ “किंचिदवशिष्यते” ॥१८९॥
बालें धरिला द्वैत छंदु ॥ तो मोडाया किंचित् विरोधु ॥धरिला बागुलाचा संबंधु ॥ आला म्हणोनी ॥१९०॥
येर्हवीं स्मृती कां हें न जाणें ॥ परि करावें लागलें बोलणें ॥अज्ञजन बोधावया कारणें ॥ किंचित् म्हणोनी ॥१९१॥
ननु भूम्यादिकं माभूत्परमाण्वंतनाशत: ॥कथं तें वियतोऽसत्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥४१॥
शं० - निरंश सदवस्तु नित्य ॥ सदा सर्वदा नाश रहित ॥आकाश ही तैसेंचिसत ॥ कां न मानितां ॥१९२॥
भौम्यादिकांचे परमाणु असती ॥ त्याचा नाश संभवतो जगतीं ॥तैसे आकाशीं मुळींच नसती ॥ मग त्या कां उपेक्षीतां ॥१९३॥
आकाश कधीं नाहींसे झालें ॥ ऐसें कोणी देखिलें ना ऐकिलें ॥मग सद्वस्तुच हें संचलें ॥ ऐसें बोला ॥१९४॥
अत्यंतं निर्जगव्द्योम यथाते बुद्धिमाश्रितम् ॥तथैव सन्निराकाशं कुतो नाश्रियते मतिम् ॥४२॥
निर्जगब्द्योम द्दष्टं चेत्प्रकाशतमसी विना ॥क्व द्दष्टं किं च ते पक्षे न प्रत्यक्षं वियत्खलु ॥४३॥
स० - तुझे बोल आम्हास मानवते ॥ परि आकाश बुद्धि आरूढ होते ॥बुद्धिमध्यें येते आणि जाते ॥ इतरा सारिखे ॥१९५॥
बुद्धीचेनी प्रकाशें ॥ जयाचें आस्तित्व आम्हा भासे ॥येर्हवी कईंही न उल्हासे ॥ आपेआप ॥१९६॥
प्रकाश तमा वांचून ॥ जयाचें आस्तित्वही नये प्रमाण ॥तया सद्वस्तु तूं म्हण ॥ आम्ही न म्हणू ॥१९७॥
खपुष्पाच्या माळा ॥ सुखें घाली वांझपुत्राचे गळां ॥नाना मृगजळींच्या कासवीला ॥ दुग्धवती म्हण ॥१९८॥
तैशी नोहे सद्वस्तु ॥ बुद्धिच्या कघींच नोहे गृहा आतु ॥बुद्धी तयाची मातु ॥ कधींही न जाणे ॥१९९॥
कोण्याही प्रकाशें ॥ वस्तुचें आस्तित्व न भासे ॥प्रमाण नहोय सरिसें ॥ जयाच्या प्रमाणा ॥२००॥
वादि - ऐशी कधीं नये प्रमाणा ॥ तयाशीं शून्य ऐसें म्हणा ॥बुद्धी गृहाक नये जाणा ॥ तया आस्तित्व कैचें ॥२०१॥
समा० - अरे जयाचेनी प्रमाणें ॥ प्रमाणा प्रमाणत्व येणें ॥तयासी अप्रमाण कोण म्हणे ॥ बुद्धीमंत ॥२०२॥
जयाचेनी प्रकाशें ॥ बुद्धीअस्तित्व अभासे ॥तया अस्तित्वाचे वानिवसे ॥ मानसीं काई ॥२०३॥
सद्वस्तु शुद्धं त्वस्माभिर्निश्चितैरनुभूयते ॥तुष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेश्च वर्जनात् ॥४४॥
सकल ही वस्तु अशुद्ध ॥ जयाचा बुद्धीशीं होतसे संबंध ॥बुद्धी आश्रया विण एकही सिद्ध ॥ हौं न शके ॥२०४॥
तैशी नोहे सद्वस्तु ॥ कोणाचे संबंधें विण असतु ॥अनुभवत्याविण अनुभवतु ॥ शूद्धपणें ॥२०५॥
इतर कोणाही वस्तूचा ॥ अनुभव न येतां साचा ॥पद्धे वळसा शून्याचा ॥ अभाव रूपी ॥२०६॥
तैसी सद्वस्तु नोहे ॥ प्रतीतीमात्रचि जी आहे ॥कधींही शून्य नोहे ॥ स्वयंप्रभ ॥२०७॥
शून्याची ही प्रतीती ॥ बुद्धी घेतसे निश्चिती ॥तैशी नोहे वस्तु स्थिती ॥ बुद्धी अग्राहय ॥२०८॥
शुद्ध निर्मल वस्तु असे ॥ स्वयंप्रभोनीच प्रकाशे ॥आपणचि आपण उल्हासे ॥ आपुलेपणे ॥२०९॥
सद्बुद्धिरपि चेन्नास्ति मास्त्वस्य स्वप्रभत्वत: ॥निर्मनस्कत्वसाक्षित्वात्सन्मात्रं सुगमं नृणाम् ॥४५॥
वा० - बुद्धिग्राहक नाहीं म्हणतां ॥ स्वयंप्रम स्वभावतां ॥मग त्याची अस्तित्वाची वार्ता ॥ कैसेनी कळे ॥२१०॥
स० - अरे बुध्यादिकांच्या नास्तित्वा ॥ जो साक्षी असे तत्वता ॥तया निरमनस्का साक्षित्वा ॥ कवण हवें ॥२११॥
तूंची स्वत: आपण पाहीं ॥ तुझ्या अस्तित्वाची कोण करील ग्वाही ॥बरें कोणी म्हणेना म्हणोनी नाहीं ॥ काय तुझा तूं ॥२१२॥
एवं सुगम सन्मात्रवस्तु ॥ जेथ मन बुद्धीची न चले मातु ॥कोणाचे अस्तित्वावीण असतु ॥ अस्ति त्व जयाचें ॥२१३॥
मनोजृंभणराहित्ये यथा साक्षी निराकुल: ॥मायाजृंभणत: पूर्वं सत्तथैव निराकुलम् ॥४६॥
ऐसे सुगम आणि सोपारे ॥ जेथ नसे मनकल्पनेचे वारे ॥निराकुल साक्षित्व स्फुरे ॥ एकलेंची ॥२१४॥
तैसी मायातीत वस्तु ॥ माया आवरण रहितु ॥माये पूर्वीं असतु ॥ निराकुल ॥२१५॥
वस्तु स्वातंत्र्य निरंतर ॥ तेथ कोणीही न करी अंतर ॥उगा मायेचें औडंबर ॥ दिसों येतें ॥२१६॥
माया म्हणजे कांहीं नाहीं ॥ ते वस्तुशीं करील काई ॥मृगजळाचे प्रवाहीं ॥ सूर्य़ बुडे कैसा ॥२१७॥
मृगजळ होण्या पूर्वीं होती ॥ निराकुल सूर्याची स्थिती ॥मग ते झाले वरती ॥ व्याकुळली काई ॥२१८॥
हें जैसें का व्यर्थ बोलणें ॥ तैसीं मायेचीं असती लक्षणें ॥वस्तु कांहींच हें नेणे ॥ सदेंवपणे ॥२१९॥
निस्तत्वाकार्यगम्यास्य शक्तिर्मायाग्रिशक्तिवत् ॥नहि शक्ति:क्वचित्कैश्चिद्बुध्यते कार्यत: पुरा ॥४७॥
मायेचें मुळींच अस्तित्व नसे ॥ उगीच स्वरूपावरी आभासे ॥जैसें कां मृगजळ दिसे ॥ सूर्य किरणीं ॥२२०॥
परि अज्ञकुरंगें तृषिती ॥ पाणी म्हणोनी धांव घेती ॥तयांची किती वर्णावी फजिती ॥ श्रमले पणे ॥२२१॥
तैसें या मायाजाळीं ॥ सावजें बहु सांपडलीं ॥काळ येवोनीयां बळी ॥ माना कुरुंडी ॥२२२॥
“नान्यत् किंचन मिषत्” ॥ ऐसा श्रुतीचा सिद्धांत ॥परि तो मूर्खा न मानवत भ्रमले पणें ॥२२३॥
तयांचा भ्रमनिरसायासाठीं ॥ श्रुति कळवळोनि पोटी ॥अध्यारोप अपवाद राहटी ॥ बोलूं लागली ॥२२४॥
वस्तुशक्तीच माया असे ॥ परि ती कार्यानुमेय दिसे ॥येर्हवीं कधींच न भासे ॥ स्वतंत्र पणे ॥२२५॥
जैशी कां अग्रिशक्ति ॥ स्फोटादी ज्वलन कार्यें वाटती ॥तैशीच ही मायाशक्ती ॥ भूतादि कार्यें गमे ॥२२६॥
येर्हवीं तरी शक्ति ॥ स्वतंत्रपणें कै भासती ॥कार्यानुमेयंच दिसती ॥ सर्वत्र ठाईं ॥२२७॥
न सद्वस्तु स्वत: शक्तिर्न हि वन्हे:स्वशक्तिता ॥सद्विलक्षणतायांतु शक्ते: किंतत्वमुच्यताम् ॥४८॥
वादी - वन्हिशक्ति वन्हिहूनी अभिन्न ॥ तैशीच सदशक्ती जाण ॥किंवा तयाहूनी विलक्षण ॥ कांहीं असे ॥२२८॥
सदशक्ती सदची असे ॥ तरी शक्तिपणाचा अभाव दिसे ॥नाहीं म्हणतां तरी विलसे ॥ असत पणे कैशी ॥२२९॥
स० - सद्शक्ती जी का माया ॥ ती असे जैसी पुरुषछाया ॥तियेसी सत म्हणाया ॥ आम्ही पुढें नहोऊं ॥२३०॥
शून्यत्वमिति चेच्छून्यं मायाकार्यमितीरितम् ।न शून्यं नापि सद्याद्दक्ताद्दक्तत्वमिहेष्यताम् ॥४९॥
मग शून्य जरी म्हणावें ॥ तरी कार्य कैसेनी व्हावें ॥नामरूपादि अघवे ॥ कैसेनी राहती ॥२३१॥
म्हणोनी ती सत ना असत ॥ कांहीं म्हणतां नाहीं येत ॥अनिर्वचनीय इत्यर्थ ॥ ठरला आमुचा ॥२३२॥
नासदासीन्नो सदासीत्तदानीं किंत्वभूत्तम: ।सद्योगात्तप्रस: सत्वं न स्वतस्तन्निषेधनात् ॥५०॥
म्हणोनी सृष्टीच्या आधारा ॥ नाहीं सदासत थारा ॥माय देवीचाची उभारा ॥ तमोमयी ॥२३३॥
“तमआमीत्तमसामूढमग्रे” इति ॥ प्रमाण बोलियेली श्रुति ॥म्हणोनी सत्व निश्चिती ॥ सद्योगें ॥२३४॥
सद्वस्तुची शक्ती ॥ स्वत: निषेधा येती ॥परि ती वस्तु पाशी असती ॥ सदत्वानें ॥२३५॥
अत एव द्वितीयत्वं शून्यवन्न हि गण्यते ॥न लोके चैत्रतच्छत्त्क्योयों र्जीवितं लिख्यते पृथक् ॥५१॥
एवं ऐसें झालें सिद्ध आतां ॥ शून्यत्व शक्तिस नये म्हणातं ॥जरि ती पृथक्कारें धुंडतां ॥ न सांपडे कधीं ॥२३६॥
आणि लोकीं ही याच रीती ॥ शक्ती पृथक्कारें न गणिती ॥चैत्राचा पगार आर्पिती ॥ चैत्रासच ॥२३७॥
चैत्र आणि त्याची सक्ति ॥ हे पृथक्कपणें न लिखती ॥पुरुषीच सामावती ॥ शक्ती तयाची ॥२३८॥
शत्त्क्याधिक्ये जीवितं चेद्वर्धते तत्र बुद्धिकृत् ॥न शक्ति: किंतु तत्कार्यं युद्धकृष्णादिकं तथा ॥५२॥
शक्तिच्याचि मानें अर्पिती ॥ कमजास्त जीवित वृत्ती ॥ऐसे नोहे बुद्धिकौशल्यें होती ॥ कमजास्त पणा ॥२३९॥
कृषीवळाची शक्ती ॥ युद्धकर्यापासून जास्त होती ॥परि योद्धा वेतन मिलवीतो जास्ती ॥ येरा कमी ॥२४०॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.