म्हणोनीयां शक्ती वरती ॥ नाहीं वेतन कमजास्ती ॥शक्ती निराळी न गणती ॥ पुरुषमात्रीं ॥२४१॥
तैशीच ही मायाशक्ती ॥ सद्वस्तुवीण नये हातीं ॥कांकीं पृथक्कपणे न वाफरती ॥ सद्वस्तुच्या ॥२४२॥
एवं हे ऐसें झालें ॥ शक्ती पृथक्कपण नाहीं आलें ॥कार्या वरुनी ओळखिलें पाहिजे तिला ॥२४३॥
सर्वथा शक्तिमास्य न पृथग्गणना कचित् ॥शक्तिकार्यं तु नैवास्ति द्वितीयं शंक्यते कथम् ॥५३॥
सर्वत्रची ऐसें असे ॥ शक्ति पृथक्क कोणी गणीत नसे ॥म्हणोनी द्वितीयत्व नसे ॥ कोठे ही शक्तिचें ॥२४४॥
वस्तु आणि वस्तु शक्ती ॥ हीं भिन्नपणे कधीच नसती ॥म्हणोनी शंकेची उत्पति ॥ नसे द्वैताच्या ॥२४५॥
वादी - सदशक्ति ही सर्वत्र असे ॥ किंवा एक देशीं वसे ॥तयाचें प्रमाण कांहीं असे ॥ श्रुती मधें ॥२४६॥
न कृत्स्नब्रम्हावृत्ति: सा शक्ति: किंत्वेकदेशभाक् ॥घटशक्तिर्यथा भूमौ स्निग्धमृद्येव वर्तते ॥५४॥
सि० - ब्रम्हाशक्ति जी माया असे ॥ ती सर्वत्र कधींच न विलसे ॥कांकीं ब्रम्हा अभाव होतसे ॥ सर्वत्र म्हणतां ॥२४७॥
बरें एकदेशी म्हणावें ॥ तरी निरंशा अंश कल्पावे ॥म्हणोनी तेंही न संभवे ॥ आमुचे मते ॥२४८॥
जैशी कां घटशक्ति ॥ सर्वत्र मूभीमध्यें नसती ॥स्निग्ध मृत्तिकेंतच असती ॥ एकदेशीं ॥२४९॥
तैशीच म्हणूं जावी माया ॥ एकदेशी ब्रम्हा या ॥तरी स्वगत भेद ठाया ॥ पुसिला असे ॥२५०॥
‘सत्यंज्ञानमनंतंब्रम्हा’ इति ॥ बोलियली प्रमाण श्रुति ॥तेणें देसकाळादि परिच्छेद स्थिती ॥ उरों नाहीं दिली ॥२५१॥
वादी - मग मुळींच माया नाहीं म्हणा ॥ उगाच कां वाढवितां कल्पना ॥श्रुति स्मृतीच्या प्रमाणा ॥ दोष आला ॥२५२॥
पादोस्य सर्वा भूतानि त्रिपादस्ति स्वयंप्रभ: ॥इत्येकदेशवृत्तित्वं मायाया वदति श्रुति: ॥५५॥
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥इति कृष्णोऽर्जुनायाह जगतस्त्वेकदेशताम् ॥५६॥
स भूमिं विश्वतो वृत्त्वा हयत्यतिष्टद्दशांगुलम् ॥विकारवर्तीचा भास्ति श्रुतिसूत्रकृतार्वच: ॥५७॥
एकपदीं सकल भुतें ॥ त्रिपाद स्वयंप्रभ राहते ॥ऐशी श्रुतिही बोलते ॥ प्रमाण द्वारें ॥२५३॥
गीतेमाजी कृष्ण ही बोलिला ॥ अर्जुना एकांशेंन स्थिती जगताला ॥सकल ब्रम्हागोल संचला ॥ माया एकदेशी ॥२५४॥
सूत्रकार ही हयाच रीती ॥ ते तिष्ठत दशांगुळ म्हणती ॥विश्वविकारें विकार वर्ती ॥ मूमी एकदेशी ॥२५५॥
इत्यादि असंख्य श्रुति स्मृती ॥ प्रमाणें नाना रीती वदती ॥ते कैसें निरंशें अंश आरोपिती ॥ सांगा आम्हां ॥२५६॥
निरंशेऽप्यंशमारोप्य कृत्स्नेंशे वेति पृच्छत: ॥तद्भाषयोत्तरं ब्रूते श्रुति: श्रोतृहितैषिणी ॥५८॥
इहीं सकल ही आरोप केला ॥ किंवा सत्यांश असे सद्वस्तुला ॥मायादेवीच्या सकल हया लीला ॥ कोठे राहव्या ॥२५७॥
स० - तूं बोलिलासी जीं प्रमाणें ॥ ती आम्हास ही भाग मानणें ॥परि श्रुति ह्रद्रत न जाणणें ॥ हें काई ॥२५८॥
बाला लागलसे छंद ॥ तो एकाकीं न करवे बंद ॥बागुल आला गेला हा मिथ्या वाद ॥ बोलावा लागे ॥२५९॥
तैशीच अथ्यारोप अपवाद श्रुति ॥ बोलून गेली सृष्टी उत्पत्ती ॥शेवटीं सकळ ही माया निश्चिती ॥ होंचि प्रतिपादिलें ॥२६०॥
माया म्हणजे कांहीं नाहीं ॥ तें झालें आहे हयाचा वाद काई ॥परि मूर्ख तये ठांई ॥ वादा प्रवर्तले ॥२६१॥
तयांचा वाद तुटावा ॥ सद्बोध चित्तीं आरूढावा ॥म्हणोनी श्रुति स्मृति धांवा ॥ मारूं लागल्या ॥२६२॥
तुम्हासी सांगू गेले स्वप्न ॥ तेथें कैचें अनुसंधान ॥कोठेंशंका समाधान ॥ करावें लागे ॥२६३॥
कानाशी गोड वाटावें ॥ संषय सकळही फिटावे ॥ऐसे गुप्त धरुनि अंतरीं ठेवे ॥ श्रुति स्मृती बोलल्या ॥२६४॥
माया मुळीच नाहीं म्हणतां ॥ उद्वेग वाटेल तुमचे चित्ता ॥म्हणोनी एकदेशीय सत्ता ॥ प्रतिपादिली ॥२६५॥
परमात्मा याच रीती ॥ अर्जुनाप्रति बोधिती ॥“एकांशेन” जगत स्थिती ॥ म्हणजे मुळींच नाहीं ॥२६६॥
“नासतो विद्यते भाव” इत्यादि ॥ बोलिले सिद्धांत आदी ॥परि तेथ अर्जुनाची बुद्धी ॥ कोती पाहिली ॥२६७॥
म्हणोनी घेतला वळसा ॥ सप्तशत श्लोकमात्रीय रसा ॥तेव्हां “नष्टो मोह:स्मृतिर्लब्धा” या सरसा ॥ वाक्या अर्जुन बोलिला ॥२६८॥
मुळींच कांहीं नाहीं म्हणावें ॥ तें कोणें कैसें प्रतिपादावें ॥म्हणोनी मायामय हें अघवे ॥ श्रुति कल्पित्या झाल्या ॥२६९॥
त्याही कल्पना निराधार ॥ होती हयणोनी सदंश आधार ॥घेउनी बोलियल्या सार ॥ सदैव इत्यादिना ॥२७०॥
सत्तत्त्वमाश्रिता शक्ति: कल्पयेतसति विक्रिया: ॥वर्णा भित्तिगता भित्तौ चित्रं नानाविथं तधा ॥५९॥
जैसें कां भिंती वरती ॥ रंगें नाना चित्रें उमटती ॥तैशीच ही चिच्छक्ति ॥ विकारली जगती ॥२७१॥
पर्वत नदी डोंगर ॥ वर्णचि दिसती नानाकार ॥तैसीच ही मायादेवी साकार ॥ एकलीच विलसे ॥२७२॥
तियैचा अभासभासु ॥ सद्वस्तु वरती विलासु ॥कैसा झाला सावकाशु ॥ तोही सांगू ॥२७३॥
आद्यो विकार आकाश: सोऽवकाश: स्वरूपवान् ॥आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेप्युनुगच्छति ॥६०॥
निर्विकारी झाला विकार ॥ तोही झाला निराकार ॥पोकळपणाचा आकार ॥ अवकाश घनी ॥२७४॥
हीच मूळ कल्पना ॥ आकाशाची झाली भावना ॥सत्ता विशेष गुणा ॥ उद्भवली ॥२७५॥
येर्हवीं पहातां आकाश ॥ स्वरूपाकारच वाटे भास ॥परि गुणा झाला अवकास ॥ पोकळ पणें ॥२७६॥
एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावक: ॥नावकाश: सति योम्नि स चेषोऽपिद्वयं स्थितम् ॥६१॥
सद्वस्तुच्या ठाईं ॥ अवकांश मुळींच नाहीं ॥तें सदस्वभावें असे पाही ॥ एकलें एक ॥२७७॥
परि आकाशीं द्वय स्वभाव ॥ सत्ताविशेष अवकाश ठाव ॥मायादेवीचा प्रभाव ॥ येथून वाढला ॥२७८॥
यद्वा प्रतिध्वनिर्व्योम्नो गुणौ नासौ सतीक्ष्यते ॥व्योम्नि द्वौ सध्द्वनी तेन सदेकं द्विगुणं वियत् ॥६२॥
सद्वस्तुचे ठाईं ॥ “सत्” हाही शद्ब नाहीं ॥अवकाश होतांचि आला पाही ॥ प्रतिध्वनी ॥२७९॥
सतला सत् कोणी म्हणावें ॥ तें असें एकलें स्वभावें ॥अवकाश होतांची संभवें ॥ सत् शद्ब ॥२८०॥
म्हणोनी द्विगूण आकाश झालें ॥ तेणेंचि सद्वस्तु एक गुणी म्हटलें ॥येर्हवीं गुणातीत वस्तु संचलें ॥ जैशाचें तैसें ॥२८१॥
वांझेला मुलगा नाहीं झाला ॥ परि झाला ऐसाचि कल्पिला ॥मग सुखें ऐका बाललीला ॥ एकेक त्याच्या ॥२८२॥
तैसाचि हा माया विलासु ॥ सुखें ऐका सावकाशु ॥श्रुत्यादिकांना अवकाशु ॥ बरा फावला ॥२८३॥
श्रुति प्रमाणा आल्या ॥ स्मृत्यादिकीं. बाहया उभारल्या ॥मायादेवी शृंगारल्या ॥ पुत्रोत्साहें ॥२८४॥
या शक्ति: कल्पयेव्द्योम सा सव्द्योम्नोरभिन्नताम् ॥आपाद्य धर्मधर्मित्वं व्यत्ययेनावकल्पयेत् ॥६३॥
प्रथम मायें आकाश कल्पिलें ॥ परि तें सदभिन्नत्व नाहीं दिसूंदिलें ॥पश्चात् धर्मधर्मित्व भासविलें ॥ तईंच वैपरित्वें ॥२८५॥
तेणें आकाशाचे ठाईं आलें ॥ सत्ता भान पहिलें ॥सत् ऐसें नांव दिलें ॥ वस्तु लागीं ॥२८६॥
सतो व्योमत्वमपन्नं व्योम्न: सत्तां तु लौकिका: ॥तार्किकाश्चावगच्छंति मायाया उचितं हि तत् ॥६४॥
जैसा कां मृत्तिकेचा घट केला ॥ तो मातीपणा नाहीं सुटला ॥तैसेंचि या आकाशाला ॥ सदत्व न सुटे ॥२८७॥
म्हणोनी सतची झालें आकाश ॥ ऐसा भासविला भास ॥निर्रावकाशी अवकाश ॥ धर्म लाविला ॥२८८॥
आकाशीं सदत्व आणलें ॥ सदत्वीं आकाश कल्पिलें ॥ऐसे मांडले घोटाळे ॥ नानाविव ॥२८९॥
तार्किकादि मत सिद्धांती ॥ येथेंच भांबाऊती पडती ॥आकाश सद्रूपचि मानिती ॥ माया योगें ॥२९०॥
वादी० - अन्याची प्रतिती अन्य ॥ हें कैसें न्याया होईल मान्य ॥बरें प्रतिती ही उपपन्न ॥ कैसी होते ॥२९१॥
स० - अरे माया हेचि उचित ॥ तेथ कैचा न्यायसिद्धांत ॥न्यायासी जी विरुद्व येत ॥ तीच माया ॥२९२॥
भ्रामक दाखवी प्रतीति ॥ अन्याची अन्यावर भ्रांती ॥जग भ्रमविलें याच रीती ॥ नाना मोहें ॥२९३॥
यद्यथा वर्तत तस्य तथात्वं भाति मानत: ॥अन्यथात्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सार्वलौकिक: ॥६५॥
जें जैसें आहे वर्तत ॥ तें तैसेंचि जरी दिसत ॥तरी तें यथार्थ वाटत ॥ जैसेंच्या तैसें ॥२९४॥
वस्तु एक असावी ॥ ती भ्रमें भलतीच दिसावी ॥ती अयथार्थ जाणावी ॥ समज तयाची ॥२९५॥
जैसें कां शुक्तिकेवरी ॥ रजताची भासली लकेरी ॥भ्रांत्या प्रतीती आली खरी ॥ अन्यथात्व ॥२९६॥
नाना स्थाणुवरी पुरुष ॥ रज्जू वरी सर्पाभास ॥येच रीती माया प्रतीतीस ॥ लोकीं येते ॥२९७॥
हें दिसें ऐसेंचि जरी असे ॥ तरी मृगजळाचेनी वोलांसे ॥बिजारोपण करती माणसें ॥ भूमीचे ठाईं ॥२९८॥
एवं ऐशीच हो प्रतीती ॥ मायादेवीची हीच नीती ॥तेथ शंका समाधान दोन्हीही भ्रांति ॥ जाणावी बापा ॥२९९॥
भ्रमेंचि आकाश दिसलें ॥ भ्रमेंचि देव मानिलें ॥भ्रमेंचि सकळ कल्पियलें ॥ सृष्टीजात ॥३००॥
एवं “भ्रममूलमिदं जगत” ऐसाचि आहे सिद्धांत ॥तेथें च रमताती भ्रांत ॥ माया योगें ॥३०१॥
येथोनी कैसेनी सुटावें ॥ ऐसें जरि विचारसी मनोभावें ॥तरी तेंचि आतां सांगतों ऐकावें ॥ एकाग्र करूनी ॥३०२॥
एवं श्रुतिविचारात्प्रग्यथा यद्वस्तु भासते ॥विचारेण विपर्योति ततस्तच्चिंत्यतां वियत् ॥६६॥
श्रुतिविचाराचे पूर्वीं ॥ आकाशचि सदत्वें दावी ॥जग सत्यत्वा आणवी ॥ मायादेवी ॥३०३॥
सुखदु:खाचे सांगडी ॥ पापपुण्याची पुरवडी ॥स्वर्गनरकादी उतरडी ॥ रची मोडी ॥३०४॥
नवल इयेचें लाघव ॥ अभावी दाखविला भात्र ॥भावेचि झाली देवी देव सुवधात्रो ॥३०५॥
इंद्रभुवन निर्मियेलें ॥ आमृत तेथ एक कल्पियले ॥रंभा उर्वशादि रचियेले ॥ रूपाचे सांगाडे ॥३०६॥
बंधमोक्षाच्या दावणो ॥ बांधिलीं जनावरें नाना योनी ॥तेथ अज्ञ सुज्ञ दोनी ॥ एकेचि पाती ॥३०७॥
पायीं घालुनी शृंखला ॥ मुक्तपणाचा नांच मांडिला ॥आपणचि देखे आपुली लीला ॥ नानाविव ॥३०८॥
क्वचित् एखादा जीव ॥ एथून सुटकेचा करी उपाव ॥तया पुढें सिद्धिची माव ॥ नांचवू लागे ॥३०९॥
सुखाचे घेउनि दोरखंड ॥ बांधुनी टाकी दोनी दंड ॥कोणाही जिवाचे बंड ॥ इये पुढें न चाले ॥३१०॥
हा हा इये पासोनी जो सोडवी ॥ तयाची किती वर्णावी थोरवी ॥धन्य धन्य हेचि वदवी ॥ वाचा आमुची ॥३११॥
अम्हा मूढा साठीं ॥ बोंब मारीत हटोहटी ॥आक्रोशें धांवे उठाउठी ॥ कळवोनी ॥३१२॥
तया श्रुति परोती ॥ माउली नाहीं नाहीं त्रिजगती ॥अहिता पासुनी सोडविती ॥ जिवा लागीं ॥३१३॥
आम्हीं कैसे बैसावें ॥ कोण उठणी उठावें ॥कैसें जेवावें निजावें ॥ हें ही बोलली ॥३१४॥
आम्हीं होऊनी नि:संग ॥ करूं लागलों नाना संग ॥तेथ ही प्रतिपादित सांग ॥ हिताहित ॥३१५॥
आमुचीये मळमूत्री ॥ विसर्जनी अहोरात्री ॥गाथा गाईली पवित्री ॥ त्याज्यात्याज ॥३१६॥
आम्हीं कैसें बोलावें ॥ कोण कर्म अचरावें ॥कोण्या रस्त्यानें जावें ॥ आपुलीया ठाईं ॥३१७॥
कैसा करावा भोग ॥ कैसा करावा त्याग ॥विधीनिषधीं सांग ॥ प्रतिपादिलें ॥३१८॥
कर्म करुनी अकर्ता ॥ भोग भोगोनी अभोक्ता ॥बोल बोलोनी अवक्ता ॥ कैसें व्हावें ॥३१९॥
जीव म्हणजे काय ॥ शीव म्हणजे काय ॥आत्मा म्हणजे काय ॥ हें ही प्रतिपादिलें ॥३२०॥
आम्हीं पाऊल टाकावें ॥ तेथ ही हा दिवटा धांवे ॥कां कीं आम्हीं न पडावें ॥ गर्ते माजी ॥३२१॥
वैराग्य कैसें करावें ॥ विचार कैसे विवरावे ॥ज्ञान कैसेनीं ठसावें ॥ आमुचें आम्हां ॥३२२॥
संसार म्हणजे मृगजळ ॥ हें ही बोलियेलें प्रांजळ ॥आमुचें सत्य हित निवळ ॥ उघड दावियेलें ॥३२३॥
आमुचे अनिवार छंद ॥ माया मोहें झालों धुंद ॥तेही युक्तीप्रयुक्तीं केले बंद ॥ कृपाळुपणें ॥३२४॥
आतां किती इयेशी वर्णावें ॥ सकळ इयेनींच आम्हां दावावें ॥अद्वैत साम्राजीं बैसवावें ॥ इनेची आम्हां ॥३२५॥
धन्य धन्य श्रुतिमाता ॥ जिचा बोधकर्णपुटीं ऐकता ॥भवभय माया वार्ता ॥ वाव झाली ॥३२६॥
ऐसा जियेचा विचारू ॥ तयावरी बोधी श्रीसद्नरु ॥धन्य धन्य अपरंपारु ॥ उपकार तयाचे ॥३२७॥
आम्हीं हेंद्रे जन प्राकृत ॥ नाहीं भाषा ही पुरी संस्कृत ॥परि केलें कृत कृत्य ॥ ईक्षण मात्रें ॥३२८॥
श्रुतीजलधींतुनी बहु यत्नें ॥ शोधुनी काढिलीं अमोघ रत्नें ॥आम्हा आर्पियलीं प्रयत्नें ॥ नको नको म्हणतां ॥३२९॥
उपनिषद सिद्धांत ॥ दाखविले यथार्थ ॥आम्हां बनविलें समर्थ ॥ काळाचे ही काळ ॥३३०॥
आम्ही मूर्खपणें भांडावें ॥ तरी हंसुनी युक्तीनेंचि बोधावें ॥किती म्हणोनी वर्णावें ॥ वात्सल्य तयांचें ॥३३१॥
जयासी सानुकुळ श्रीगुरु ॥ तोचि धन्य धन्य जगती नरु ॥तेणें सकळ हा माया कुंजरू ॥ पायीं रगडिला ॥३३२॥
श्रीगुरुचीनी प्रसादें ॥ काय एक न सादे ॥द्वैत साकार द्वंदें ॥ लया जाती ॥३३३॥
जयाचेनी कृपाउजिवडे ॥ महेंद्र पदही पावती वेडे ॥वेदघोषही बोलती रेडे ॥ अचुक पणीं ॥३३४॥
धन्य धन्य गुरुमाउली ॥ श्रुती प्रत्यक्षचि उभी राहिली ॥आम्हांस करावया सावली ॥ कृपाळुपणें ॥३३५॥
आम्हांसी घेऊनी खांदीं ॥ बसविती साम्राजपदीं ॥डंका ठोकोनी देती पदीं ॥ ब्रम्हाचि ब्रम्हा झालें ॥३३६॥
गुरु शिष्याच्या भावा ॥ उरोंच न देती ठावा ॥दीपकें वातीचा दिवा ॥ स्पर्शतांचि जैसा ॥३३७॥
गुरु शास्त्र आणि आपण ॥ एकचि रूपें झाली गोठण ॥ब्रम्हानंद परिपूर्ण ॥ दुमदुमिला ॥३३८॥
आतां वर्णना पुरे करी ॥ श्लोकपद राहिलें दुरी ॥ऐसें बोलियलें अंतरीं ॥ श्रीगुरु माझे ॥३३९॥
ऐकोनी तयांचें वचन ॥ आलें गेलेलें भान ॥“ऐशिया श्रुतिविचारेण” ॥ मुनी जे का बोलिले ॥३४०॥
विचारेण या पदावरी ॥ व्याख्या झाली येथवरी ॥श्रोतें कोपावें ना चतुरीं ॥ बोबडया बोला ॥३४१॥
आणि कोप तरी कुणावरी करती ॥ तेचि अंतरांतुनी प्रतिपादती ॥मला एक बाहुलें निश्चिती ॥ पुढें केलें ॥३४२॥
असो ऐशिया विचारें स्पर्शला ॥ तयानेच मायाकलाप आकर्षिला ॥सद्रूप ब्रम्हाचि झाला ॥ देखदेखतां ॥३४३॥
आणि इतरही याच रीती ॥ गगनादि भाव सोडिती ॥वस्तु सद्रूप चिंतिती ॥ निरंतर ॥३४४॥
तेही ब्रम्हाचि होती ॥ नाना विपरीत भाव त्यागिती ॥श्रुतिविचारें लाभतीं ॥ आपआपणा ॥३४५॥
श्रुति गुरुवरी नाहीं विश्वास ॥ तया येथचि नरक वास ॥कोण वर्णी आपदांस ॥ तयांच्या त्या ॥३४६॥
म्हणोनिया निरंतर ॥ ब्रम्हाविचारेंच भरावें अंतर ॥शास्त्र गुरुवरी विश्वास थोर ॥ असों द्यावा ॥३४७॥
भिन्ने वियत्सती शब्दभेदाद्वद्धेश्च भेदत: ॥वाय्वादिष्वनुवृत्तंसन्नतु व्योमेति भेदधी: ॥६७॥
सत् आणि वियत् शब्दिं ॥ वसे निरंतर भेद बुद्धि ॥ययाचें कारण आधिं ॥ परिस आतां ॥३४८॥
मुळीं शब्दीं पृथकपणा ॥ विपर्यास असे जाणा ॥मग अर्थाचे ठिकाणा ॥ शोध घेऊं ॥३४९॥
विकल्पनेन जें सत् ॥ तया म्हणती वियत् ॥कांकीं सत्ता प्रतिपादित ॥ न होय जेथ ॥३५०॥
जैशी पृथ्वीदिकांचे ठाईं ॥ सत्ता अस्तित्व वाटे पाहीं ॥तैशी आकाशीं नाहीं ॥ बुद्धि ग्राहय ॥३५१॥
पृथ्वी आहे पाणी आहे ॥ तेज आहे वायु आहे ॥तैशा परी आकाश नोहे ॥ ऐसें वाटतें बुद्धी ॥३५२॥
तीच जाणावी भेदबुद्धि ॥ राहतें वियत् सत् शब्दीं ॥जैपा का नद नदी ॥ लिंग भेद ॥३५३॥
सद्वस्त्वधिकवृत्तित्वाद्धर्मि व्योम्नस्तु धर्मता ॥धिया सत: पृथक्कारे ब्रूहि व्योम किपात्मकम् ॥६८॥
सद्वस्तुचेनी आधारें ॥ सकल ही सृष्टी वावरे ॥येर्हवीं तया पृथक्कारें ॥ सत्ता नाहीं ॥३५४॥
म्हणोनी सदसत विशेषें ॥ बाकीचा किंचित अभास भासे ॥सता धर्मित्व असे ॥ इतरां धर्मता ॥३५५॥
धर्म धर्मि वांचून ॥ न राहे एकही क्षण ॥तैसेंची आकाश ही जाण ॥ कैसें राहतें ॥३५६॥
वादी - मृत्तिके वांचूनी घट नाहीं ॥ तेथ धर्मि मृतिकाच पाहीं ॥परि तो निराळा रूपें राही ॥ तैसें आकाश कां नसावें ॥३५७॥
सि० - अरे सद्वस्तु वांचून ॥ बुद्धि काय करी आकाश वर्णन ॥कोणतें तयाचें विलक्षण ॥ रूप असे ॥३५८॥
अवकाशात्मकं तच्चेदसत्तदिति चिंत्यताम् ॥भिन्नं सतोऽसच्च नेति वक्षि चेव्द्याहतिस्तव ॥६९॥
जरी तूं अवकाशात्मक म्हणसी ॥ तरि तें सतचि विलासविसी ॥सत् विलक्षण प्रतिपादिसी ॥ कोणे रिती ॥३५९॥
सत् विलक्षण असे असत् ॥ तेंचि म्हणसी तरी होतो व्यावात ॥जन्मांध सूर्य प्रकाश पाहव ॥ हें का जैसें ॥३६०॥
आकाशाची करशी खोळी ॥ मृगजळ भरिसी आंजळी ॥नाना गंधर्व नगराचे राउळीं ॥ बागुला बैसवीसी ॥३६१॥
सत् विलक्षण आकाश ॥ कोणे रीती करसी भास ॥जीभ नाहीं मला म्हणतां दोष ॥ वदतांचि असे ॥३६२॥
भातीतिचेद्भातु नाम भूषणं मायिकस्य तत् ॥यदसद्भासमानं तन्मिथ्या स्वप्नगजादिवत् ॥७०॥
वादी - मग असत्वाचे ठाईं ॥ भान तरी कैसें राही ॥परि येथें राहतें हे प्रत्ययीं ॥ येतें आमुच्या ॥३६३॥
सि० - स्वप्नीं गजादि पहासी ॥ जागृतीं भानही असे तुजसी ॥तरी का सत्यत्व आणसी तया लागीं ॥३६४॥
तें जैसें का असत् ॥ तैसेंची हें सकल जगत ॥मायोपाधी भासत ॥ सत मिथ्यत्वें ॥३६५॥
माया हेंचि असे उचित ॥ मिथ्या सत्यत्वें दावीत ॥हें सकल ही प्रतिपादित ॥ मागें केलें ॥३६६॥
जातिव्यक्ती देहिदेहौ गुणद्रव्ये यथा पृथक् ॥वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोऽत्र विस्मय: ॥७१॥
सामान्यपणें असे जाती ॥ परि विशेष भेद दिसे व्यक्ति ॥देह आणि देहचालक निश्चिती ॥ एक नव्हती ॥३६७॥
जैसे का द्रव्य आणि गुण ॥ दिसे विचारे पृथकपणा ॥तैसेंचि आकाश आणि सत् जाण ॥ ष्टथक् भासती ॥३६८॥
गुळ आणि गुळाची गोडी ॥ सुवास आणि कंर्पुर वडी ॥नाना वस्त्र आणि तयाची घडी ॥ एक नव्हती ॥३६९॥
तैसेंच वियत् आणि सत् ॥ बुद्धि भेद असे निवडत ॥यांत मवल वाटत ॥ काय तुजला ॥३७०॥
बुद्धोऽपि भेदो नो चित्ते निरूढिं याति चेत्तदा ॥अनेकाग्र्यात्संशयाद्वा रूढयभावोऽस्य ते वद ॥७२॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.