मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्रीहरिगीता — महाभूतविवेक

साहित्य

श्रीहरिगीता — महाभूतविवेक

श्लोक ४५१–६००

shriharigita — mahabhutaviveka

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

‘पंचदशी’तील महाभूतविवेक प्रकरणावरील टीका — आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच महाभूतांचा विचार. ‘तत्त्वविवेक संपला, पण तृप्तीचा ढेकर आला नाही, म्हणून भूतविवेक’ — या घरगुती प्रतिमेने प्रकरणाची सुरुवात होते. या मालिकेतील सर्वात मोठा भाग.

वादी - ऐसा भेद तुम्हीं म्हणतां ॥ परि तो चित्तीं आरूढ नोह तत्वतां ॥बुद्धि निश्चयें निश्चय करितां ॥ चित्त व्याकुळे ॥३७१॥
सि० - चित्तीं आरूढ न होये ॥ तें अनेकाग्रें का संशयें ॥हया दोहीं पैकीं कारण होये ॥ कोणतें सांग ॥३७२॥
अप्रमत्तो भव ध्यानादाद्येऽन्यस्मिन्विवेचनम् ॥कुरु प्रमाणयुक्तिभ्यां ततो रूढतमो भवेत् ॥७३॥
प्रथम अनेकाग्रचि म्हणसी ॥ तरि तें ध्यानें करावैं निश्चयासी ॥द्वितीय संशय प्रतिपादिसी ॥ तरि तो प्रमाणयुक्तिं दवडावा ॥३७३॥
करितां सद्वस्तुचें ध्यान ॥ चितचि होईल चैतन्य ॥मग तेथें नसे भान ॥ अन्य वस्तुचें ॥३७४॥
सत अन्य वस्तु नाहीं ॥ ऐसें प्रमाणा आलें पाहीं ॥श्रुति स्मृति पाहीं ॥ हेंचि प्रतिपादिती ॥३७५॥
घनदाट वस्तुचे ठाईं ॥ अवकाशाचा रिगचि नाहीं ॥युक्ति चित्तें चिंतुनी पाहीं ॥ सकल कांहीं ॥३७६॥
आपणा मध्यें अवकाश ॥ कोठें राहिल सावकाश ॥अनुभवें तूंचि पाहिं आपणास ॥ विवरोनियां ॥३७७॥
येणें येणें प्रकारें ॥ चित्तीं आरूढेल सारें ॥गुरू शास्त्र आत्मविचारें ॥ सकल कळे ॥३७८॥
ध्यानान्मानाद्युक्तितोऽपि रूढे भेदे वियत्सतो: ॥न कदाचिद्वियत्सत्यं सद्वस्तुच्छिद्रवन्न च ॥७४॥
ध्यानें मानें युक्तिं ॥ भेद दिसेल वियत् सतीं ॥कांकीं सत् असत असती ॥ कैसें एक ॥३७९॥
वादी - असो एक बरें झालें ॥ वियत् विजातीय भेद पावलें ॥तुमचे बोल व्यर्थ झाले ॥ सत् भेद रहित म्हणोनी ॥३८०॥
सि० - सत् विजातीय असत् ॥ तें आहे म्हणसी हाचि व्याघात ॥मुळींच झालें नाहीं नाहीं वियत् ॥ वाटे ती भ्रांती ॥३८१॥
ती भ्रांती ही जावया ॥ बुद्धि आरूढ होवावया ॥पडला वळसा मुनिवर्या ॥ आम्हां साठीं ॥३८२॥
जड जीवाचे कळवळे ॥ नाना यत्नें बोध केले ॥धन्यधन्यम्हणोनी पाउलें ॥ सदा वंदावीं ॥३८३॥
तात्पर्य आकाशवत नव्हे वस्तु ॥ घन सर्वत्र वोतप्रोतु ॥कैंची बुद्धि जाणें तयाची मातु ॥ भेदाभेंदी ॥३८४॥
ज्ञस्य भाति सदा व्योम निस्तत्त्वोल्लेखपूर्वकं ॥सद्वस्त्वपि बिभात्यस्य निश्छिद्रत्वपुर: सरम् ॥७५॥
ज्ञाता हेंचि सदा जाणें ॥ आकाश निस्तत्व म्हणे ॥सतचितत्व विवरणें ॥ एकलें असें ॥३८५॥
निच्छिद्र सद्वस्तु असे ॥ तेथ कशाचा ही शिरकाव नसे ॥माया भ्रमें जें जें भासें ॥ तें तें मिथ्या ॥३८६॥
सतोऽनुवृत्ति: सर्वत्र व्योम्रो नेति पुरेरितम् ॥व्योमानुवृत्तिरधुना कथं न व्याहतं वच: ॥८१॥
वादी - व्योम विवेदन प्रस्तावें ॥ सन्नतुव्योमें बोलावें ॥आणि तेंचि आतां विवरात्रें ॥ कोणे रीती ॥४००॥
आतां त्याचे विपरीत बोलता ॥ आकाशानुवृत्ति कथिता ॥तरि ययास दोष कोण आतां ॥ घ्यावा आम्ही ॥४०१॥
सत अनुवृत्ती सर्वत्र असें ॥ तैशी आकाशीं मुळीच नसे ॥हेंचि प्रतिपादन केलें असें ॥ पुर्वीं तुम्ही ॥४०२॥
आपणचि आपल्या बोला ॥ व्याघात करूं लागला ॥मग सर्वचि घोंटाळा ॥ पुर्वापार ॥४०३॥
छिद्रानुवृत्तिर्नेतीति पूर्वोक्तिरधुना त्वियम् ॥शद्बानुवृत्तिरेवोक्ता वचसो व्याहति: कुत: ॥८२॥
सि० - पुर्वीं स्वरूप लक्षणा बोलिली ॥ आतां शद्बानुवृत्ति प्रतिपादिली ॥यांत व्याहतिदोषा जागा दिली ॥ कैशी तुवां ॥४०४॥
जैसें कां अग्निसन्निधानीं ॥ शीत होतसें उष्ण पाणी ॥त्यांत अग्नी न येवोनी ॥ ऊष्णताचि येते ॥४०५॥
तैसी शब्दानुवृत्ति ॥ वायुतत्त्वीं राहती ॥यांत दोष व्याहती ॥ कोठें येतो ॥४०६॥
ननु सद्वस्तु पार्थक्यादसत्त्वं चेत्तदा कथम् ॥अव्यक्तमायावैषम्यादमायामयतापि नो ॥८३॥
वादी - वाय्वादिकांतुनी काढिता सत्ता ॥ ते जैसे राहती निस्तत्वता ॥तैसी माया ही कां न म्हणतां ॥ निस्तत्व ऐशी ॥४०७॥
निस्तत्त्वरूपतैवात्र मायात्वस्थ प्रयोजिका ॥साशक्तिकार्ययोस्तुल्या व्यक्ताव्यक्तत्वभेदिनो: ॥८४॥
सि० - मायेंतुनी काढितां सत्ता ॥ माया ही निस्तत्व म्हणता ॥काय लाभे तुझे हाता ॥ सांग आम्हां ॥४०८॥
व्यक्ताव्यक्तत्व भेदा ॥ माया असे सदां सर्वदां ॥करीतसे नाना धंदा ॥ मायीक पणें ॥४०९॥
मिस्तत्व हाचि स्वभाव मायेचा ॥ त्यांत लवलेशनसे सत्तेचा ॥आम्हां विस्मय तुझ्या बोलाचा ॥ बहुवाटतो ॥४१०॥
सदसत्त्वविवेकस्य प्रस्तुतत्वात्स चिंत्यताम् ॥असतोऽवांतरो भेद आस्तां तच्चिंतयात्र किम् ॥८५॥
असो आतां तुझें हें बोलणें ॥ आम्हां प्रस्तुत सदासत निवडणें ॥असत आवांतर भैद गणणें ॥ नाहीं काज ॥४११॥
सद्वस्तु ब्रम्हा शिष्टोंऽशो वायुर्मिथ्या यथावियत् ॥वासयित्वा चिरं वायोर्मिथ्यात्वं मरुतं त्यजेत् ॥८६॥
वायु मधील सदंश काढितां ॥ शिष्टांश राहे जी वायु रूपता ॥ती निस्तत्व आकाशवत तत्वता ॥ मिथ्या असे ॥४१२॥
म्हणोनी बुद्धीनें ती टाकावी ॥ ब्रम्हासत्ताचि आदरावी ॥फळ घेऊनी सांडावी ॥ फलकटें जैसी ॥४१३॥
सारासार विचार करावा ॥ वायू असार म्हणोनी सांडावा ॥बुद्धीला सत्यत्वाचा गोवा ॥ कधीं ही न पडावा ॥१४१॥
वादी - असार रूपेंची वायू असे ॥ बुद्धी ही ते ग्रहण करीतसे ॥मग तया मिथ्यत्व कैसें ॥ येतें सांगा ॥४१५॥
सि० - अरे असार म्हणजे सत् ॥ कां तूं मानिशी असत् ॥सत म्हणतां दोष येत ॥ असार पणाला ॥४१६॥
बरें असत म्हणसी ॥ तरी तूंची मिथ्या बोलसी ॥मग आम्हां काय विचारशी ॥ यथात्व त्याचें ॥४१७॥
मृगजळासी म्हणतां जल ॥ कोण पिऊनी झाला शीतल ॥तैसेंची हे तुझे बोल ॥ बुद्धि आग्राहय ॥४१८॥
एवं हेंचि सिद्ध झालें ॥ वायूला मिथ्यात्व आलें ॥तेंचि बुद्धिनें पाहिजे घेतलें ॥ विचार निरंतर ॥४१९॥
चिंतयेद्वन्हिमप्येवं मरुतोन्यूनवर्तिनम् ॥ब्रम्हांडावरणेष्वेषा न्यूनाधिकविवारणा ॥८७॥
ऐसेंचीं वन्हीचें रूप असें ॥ विचारें पहातां भिथ्या दिसें ॥जें वायूच्या एकदेशीं असें ॥ ब्रम्हांडाभितरी ॥४२०॥
न्यूनाधिक विचारणा ॥ करितां येईल सकल ध्याना ॥ही सकल ब्रम्हांड रचना कैशी जाहली ॥४२१॥
ब्रम्हांडा भोंवतालीं ॥ एकेक भूतांचीं आवरणें झालीं ॥तीं प्रमाणें पाहिजे पाहिलीं ॥ विचार करूनी ॥४२२॥
वायोर्दशांशतोन्यूनो वन्हिर्वायौ प्रकल्पित: ॥पुराणोक्तं तारतम्यं दशांशैर्भूतपंचके ॥८८॥
वायूच्या द्शांश न्य़ून ॥ वन्हितत्व असे जाण ॥हें सकलही प्रमाण ॥ पुराणीं पहावें ॥४२३॥
भागवतीं पंचमस्कंदीं ॥ व्यासोक्ती हेंची प्रतिपादी ॥तें सकळही तारतम्य बुद्धि ॥ घ्यावें भूतपंचकीं ॥४२४॥
वन्हिरुष्ण: प्रकाशात्मा पूर्वानुगतिरत्र च ॥अस्तिवन्हि: स निस्तत्त्व: शब्दवान् स्पर्शवानपि ॥८९॥
उष्ण प्रकाश रूप वन्ही असे ॥ तेथें सत्ता अस्तित्वें विलसे ॥तीं काढितां निस्तत्व रुप दिसें ॥ शब्द स्पर्श ॥४२५॥
शब्द स्पर्श हे दोन्ही धर्म ॥ आकाश वायूचे पुर्वोनुक्तम ॥निस्तत्व रूप माया परम ॥ सत्ता परब्रम्हाची ॥४२६॥
सन्मायाव्योमवाय्वंशैर्युक्तस्याग्नेर्निजो गुण: ॥रूपं तत्र सत: सर्वमन्यद्बुद्धया विविच्यताम् ॥९०॥
हे सकलही धर्म वेगळे करितां ॥ वन्हीचा धर्म राहे रुपता ॥तो सत्तेवांचून निस्तत्वता ॥ म्हणोनि त्यागावा ॥४२७॥
पुर्वानुक्रचें करूनी ॥ बुद्धिनें सकल विवंचोनी ॥मिथ्यारूप असे वन्ही ॥ म्हणोनी त्यागावा ॥४२८॥
सतो विवेचिते वन्हौ मिथ्यात्वे सति वासिते ॥आपो दशांशतो न्यूना: कल्पिता इति चिंतयेत् ॥९१॥
एवं प्रकारें करून ॥ मिथ्या ठरतां दहन ॥तया दशांशन्यून ॥ आपही विवेचावें ॥४२९॥
संत्यापोऽमू: शून्यतत्त्वा: सशब्दस्पर्श संयुता: ॥रूपवत्योऽन्यधर्मानुवृत्त्या स्वीयो रसो गुण: ॥९२॥
सतोविवेचितास्वप्सु तन्मिथ्यात्वं च वासिते ॥भूमिर्दशांतो न्यूना कल्पिताप्स्विति चिंतयेत् ॥९३॥
अस्ति भूस्तवत्त्शून्यास्यां शब्दस्पर्शौ सरूपकौ ॥रसश्च परतो गंधौ नैज: सत्ता विविच्यताम् ॥९४॥
पृथककृतायां सत्तायां भुमिर्मिथ्याऽवशिष्यते ॥भूमेर्यशांशतो न्यूनं ब्रम्हांडं भूमिमध्यगम् ॥९५॥
ब्रम्हांडमध्ये तिष्टंति भुवनानि चतुदर्श ॥भुवनेषु वसंतेषु प्राणिदेहा यथा यथम् ॥९६॥
ब्रम्हांडलोकदेहेषु सद्वस्तुनि पृथक कृते ॥असंतोंऽडदयो भांतु तद्भानेऽपीह का क्षति: ॥९७॥
पाणी आहे हीच सत्ता ॥ ती बुद्धिनें विवेकें वेगळी करितां ॥बाकी राहे निस्तत्वता ॥ तें मायारूप ॥४३०॥
तेथ शब्दगूण अकाशाचा ॥ स्पर्श तो असे वायूचा ॥रूप धर्म वसे अग्नीचा ॥ रस स्वकीय वसे ॥४३१॥
एवं हे सकळही गूण ॥ सत्ता विरहीत निस्तत्व जाण ॥विचारें करावें पृथक्करण ॥ आप तत्वाचें ॥४३२॥
एवं विचारें करुन ॥ पृथ्वीतत्त्वही विवरावें जाण ॥जें असें दशांशें न्यून ॥ आप तत्वाचें ॥४३३॥
आकाशादि भूतांचे ॥ घेऊनी शब्दादि गूण साचे ॥गंध गूण स्वकीय पणाचें ॥ धर्मत्व असे ॥४३४॥
तेथही सत्ता वेगळी करितां ॥ राहे मिथ्या पृथ्वी रूपता ॥ती त्यागावी तत्वता ॥ असार म्हणोनी ॥४३५॥
भूमी दशांशें न्यून ॥ ब्रम्हांडमध्य भूमी जाण ॥तियेवरी चतुर्दश भुवन ॥ पाताळ खर्गादि ॥४३६॥
तिये भुवनांतरीं ॥ प्राणी वसती देहधारी ॥खकर्म प्रारब्धानुसारी ॥ यथा योग्य ॥४३७॥
एवं ही ब्रम्हांड रचना ॥ मायिक उभारली जाणा ॥येथ सदत्वाचा ठिकाणा ॥ विचारें विवरावा ॥४३८॥
सत् असतांचि जें आहे ॥ येर्हवीं मुळीच नोहें ॥मायामय अघवें हें ॥ मिथ्या रूप ॥४३९॥
जरि हें दिसलें किंवा भासलें ॥ तरि तें मिथ्यारूपचि ठरलें ॥मृगजळ वांझबाळें ॥ जिया परी ॥४४०॥
येथ सर्वत्र एकलीच सत्ता आहे ॥ दुजें कांहीं एक नाहीं, नोहें ॥हें पतिज्ञा पूर्वक बोलतहि ॥ वाणी माझी ॥४४१॥
वादी - बरें असो तुमचे मतें ॥ सतचि झालें सकल भासतें ॥तेणें काय लाधला फळातों ॥ आम्हा सांगा ॥४४२॥
भूतभौतिकमायानामसत्वेऽत्यंतवासिते ॥सद्वस्त्वद्वैतमित्येषा धीर्विपर्येति न क्वचित् ॥९८॥
सि० - अरे भूतभौतिक अवघी सृष्टी ॥ मायामय ही लाधली द्दष्टी ॥ध्यान विचारें चित्तचतुष्टी ॥ दार्ढ्यता आली ॥४४३॥
सदद्वैत श्रुति सिद्धांती ॥ बुद्धिझाली निश्चिती ॥न फिरे कधीं ही मागुती ॥ विषर्यासा ॥४४४॥
सकल हा ब्रम्हांडगोल ॥ अवघा मायेचा कल्लोळ ॥ऐशी बुद्धि झाली निखळ ॥ इया विचारानें ॥४४५॥
सदद्वैता त्पृथग्भूते द्वैते भूम्यादिरूपिणि ॥तत्तदर्थक्रिया लोके तथा द्दष्टा तथैव सा ॥९९॥
वादी - सदद्वैतता एक झाली ॥ सकलही भूतें मिथ्या ठरलीं ॥तेणें व्यवहार दशा लोपली ॥ होय जगीं ॥४४६॥
सि० - सकल ही मिथ्या म्हणतां ॥ व्यवहारा कैशी ये बाधकता ॥तदर्थचि क्रिया करिता ॥ जैशा तैशा ॥४४७॥
व्यवहारा सत्यत्व देशी ॥ तेणें संशय ये तुझे मानसीं ॥येर्हवीं पहातां विचारेशीं ॥ बाधकता नाहीं ॥४४८॥
स्वप्नी स्वप्नव्यवहार चालती ॥ जगतीं प्राणीही तैसेचि वर्तती ॥ज्ञाता ही त्याच रीती ॥ समजूनी चाले ॥४४९॥
घटादि मृण्मय सकल सृष्टी ॥ माती म्हणोनी आली प्रतीती ॥तेणें व्यवहार दशा लोपती ॥ कैसी होय ॥४५०॥
नाना आरशीं मुख पाहिलें ॥ तें सत्य ऐसें कोणी मानिलें ॥परि व्यवहारा उपेगा आलें ॥ स्वच्छास्वच्छ ॥४५१॥
देह हा नाशिवंत ॥ कोणीही न मानिती शाश्वत ॥तरी ही व्यवहार चालत ॥ लोकीं इया ॥४५२॥
आतां एक हें एवढें होतें ॥ ज्ञाता समजूनी करितो कृत्यें ॥तेणें सुखदु:ख संघातें ॥ न लिंपे कधीं ॥४५३॥
तत्वज्ञान देहीं होतां ॥ व्यवहार बंद पडेल सर्वथा ॥हया मूर्खपणाच्या वार्ता ॥ आम्हीं नायकों ॥४५४॥
सांख्यकाणादबौद्धाद्यैर्जगद्भेदो यथा यथा ॥उत्प्रेक्ष्यतेऽनेकयुत्त्क्या भवत्वेष तथा तथा ॥१००॥
सांख्य काणाद बौद्धादि मती ॥ नाना भेदें वर्णिली जगतीं ॥तयांच्या त्या मती सिद्धांतीं ॥ भ्रष्ट जाहल्या ॥४५५॥
तयांचें मत करावया खंड्ण ॥ प्रस्तुत विषय नाहीं जाण ॥म्हणोनी तयाचें प्रतिपादन ॥ असो तैसे असो ॥४५६॥
अवज्ञातं सदद्वैतं नि:शंकैरन्यवादिभि: ॥एवं का क्षतिरस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥१०१॥
वेद युक्ति विचार प्रमाणें ॥ जें सिद्ध जाहलें तें न मानणें ॥तया मूर्खाशीं वाद करणें ॥ नको आतां ॥४५७॥
तयांच्या त्या द्वैतपर मती ॥ उपेक्षण्या काय आहे आम्हां क्षिती ॥ते जैसे कां आम्हा, मानिती ॥ तैसेची आम्हीं तयां ॥४५८॥
तयांचें तें द्वैत ॥ असो चिरायु स्थापित ॥तेणें कांहींच बाध न येत ॥ अद्वैत सिद्धांती ॥४५९॥
द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैते धी: स्थीरा भवेत् ॥स्थैर्ये तस्या: पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥१०२॥
वादी द्वैतवादी अद्वैत अनादरती ॥ अद्वैत वादी द्वैता उपेक्षती ॥येणें काय फल प्राप्ती ॥ उभयतां असे ॥४६०॥
सि० - अद्वैत सिद्धांत उपेक्षितां ॥ जन्ममरणाच्या भोगाव्या व्यथा ॥देहीं कधीं ही सुखाची वार्ता ॥ नायकावी ॥४६१॥
तैसें नाहीं द्वैत उपेक्षितां ॥ अद्वैतीं मती होय स्थिरता ॥यांच देहीं लाभें जीवन्मुक्तता ॥ जन्ममृत्यु चुके ॥४६२॥
हें आमुचेंचि नोहे मत ॥ ऐसा बोलिला भगवंत ॥द्वितीयाध्यायीं अर्जुनाप्रत ॥ गीते माजीं ॥४६३॥
एषा ब्राम्ही स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुहयति ॥स्थित्वाऽस्यामंतकालेऽपि ब्रम्हा निर्वाणमृच्छति ॥१०३॥
अर्जुना ऐशा हया ब्रम्हास्थिती ॥ जयाची बुद्धि होय स्थिर निश्चिती ॥तया व्यामोहादि न बाधिती ॥ कवणे ही काळीं ॥४६४॥
तो देहीं असतां जिवन्मुक्ति ॥ अंतीं ब्रम्हापदाची होय प्राप्ति ॥जन्ममरणाचें पुनरावृत्ति ॥ कधीं ही नये ॥४६५॥
ऐसें बोलियले भगवान ॥ हें काय फळ होय सान ॥म्हणोनि द्वैत बुद्धि उपेक्षून ॥ अद्वैतीं स्थिरावी ॥४६६॥
सदद्वैतेऽनृतद्वैते यदन्योन्यैक्यवीक्षणम् ॥तस्यांतकालस्तद्भेदबुद्धिरेव न चेतर: ॥१०४॥
यद्वांऽतकाल: प्राणस्य वियोगोऽस्तु प्रसिद्धित: ॥तस्मिन् कालेऽपि न भ्रांतैर्गताया: पुनरागम: ॥१०५॥
नीरोग उपविष्टो वा रुग्णोवा विलुठन् भुवि ॥मूर्च्छितो वा त्यजत्वेष प्राणान् भ्रांतिर्न सर्वथा ॥१०६॥
सत् अद्वैत असत् द्वैत ॥ हया दोहींचें मिश्रण झालें जगांत ॥तेणें प्राणी झालें भ्रांत ॥ सतासतीं ॥४६७॥
वास्तवीक मिश्रण नाहीं झालें ॥ परि तें बुद्धिमोहें घेतलें ॥तें या विवेकें दूर जाहलें ॥ भूतपंचकाच्या ॥४६८॥
मोहबुद्धिचा अंत झाला ॥ तोचि अंतकाल म्हणियला ॥तईंच ब्रम्हाप्राप्ति जिवाला ॥ होत असे ॥४६९॥
अथवा अंतकाळ शब्दानें ॥ प्राण वियोग जरी समजणें ॥तरी ही उठलें भ्रमाचें ठाणें ॥ नये परतोनी ॥४७०॥
जया अद्वैत सिद्धांत ठसला ॥ तो प्राणी तेव्हांचि मुक्त झाला ॥तया या मायामोहाचा घोंटाळा ॥ कधींही न बावे ॥४७१॥
तो रोगी असो का निरोगी ॥ भोगी असो का अत्यंत त्यागी ॥तयासी कोण्याही प्रसंगीं ॥ भ्रम न शिवे ॥४७२॥
तो बसला असो कां निजला ॥ नाना व्यथें लोळत पडला ॥कां प्राणोत्क्रमणीं मूर्छित झाला ॥ तरी ही मुक्त ॥४७३॥
हा ! हा ! धन्य तयाचें निधन ॥ विस्मृतींत ही ब्रम्हापरिपूर्ण ॥तया अंतकाळींची व्यथा दारुण ॥ कैची बाधे ॥४७४॥
अरे जयाची नामें स्मरतां ॥ न बाधे भवभय व्यथा ॥तया मुक्ताची अवस्था ॥ कोण वर्णी ॥४७५॥
जयाचें निखळ ज्ञान ॥ सदां अखंड समाधान ॥देखोनी भयें घेतलें रान ॥ मोहादिकीं ॥४७६॥
तीं परतोनी कधीच न येती ॥ काय तम करी सूर्यागृहीं वस्ती ॥नाना पूर्ण प्रबोधीं स्वप्न भ्रांति ॥ माळ घाली ? ॥४७७॥
दिने दिने स्वप्नसुप्त्योरधीते विस्मृतेऽप्ययम् ॥परेद्युर्नानधीत: स्यात्तद्वद्विद्या न नश्यति ॥१०७॥
प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना ॥न नश्यति न वेदांतात्प्रबलं मानमीक्ष्यते ॥१०८॥
जैसें कां करितां अध्ययन ॥ स्वप्न सुषुप्तींत होतें विस्मरण ॥परि प्रबोधकाल होतांचि जाण ॥ जैसेंच्या तैसें ॥४७८॥
तैसेंचीं हेंही ज्ञान ॥ न नासें होतां ही विस्मरण ॥नाना विस्मरणचि नासतसें जाण ॥ इया बोधें ॥४७९॥
सूर्य असतांचि जवळी ॥ कैसी तमाची होय झांकोळी ॥परिस भेटतांची लोहाची मैळी ॥ परतोनी येई ? ॥४८०॥
तैसें प्रमाण सिद्धज्ञान ॥ त्यास कोण करील अप्रमाण ॥वेदांत केसरी गर्जोंन ॥ बोलिला जें कां ॥४८१॥
इतर शास्त्रें जंबुकें ॥ न होतींच जया सन्मुखें ॥भयें थबकलीं देखें ॥ ठाईंच्या ठाईं ॥४८२॥
आणखी मतवादी सावजें ॥ निष्प्राणवत झालीं खुजें ॥तिहीं काय नाशिजें ॥ इया ज्ञाना ॥४८३॥
तस्माद्वेदांतसंसिद्धं सदद्वैतं न बाध्यते ॥अंतकालेऽप्यतो भूतविवेकान्निर्वृत्ति: स्थिता ॥१०९॥
तस्मात वेदसिद्धांत ॥ सदद्वैत हाचि यथार्थ ॥ब्रम्हाप्राप्ति प्राण्या होत ॥ जया निश्चयें ॥४८७॥
ऐसा हा भूतविवेक ॥ जे नित्य विचारें करती सम्यक ॥तया ब्रम्हापद देख ॥ आधींच आलें ॥४८८॥
अंतकाळीं ही भ्रांती ॥ तया न होय निश्चिती ॥पूर्णं लाभे न्निवृत्तिस्थिती ॥ पठण मात्रें ॥४८९॥
श्रीमुनीविद्यारण्य ॥ घेउनी माळेचें प्रमाण ॥केले नवाधिकशत जाण ॥ श्लोकमणी ॥४९०॥
ही माळाजे जपती ॥ तयां काळाची नाहीं भीती ॥सदद्वैत मेरू निश्चिति ॥ येती तया ठाया ॥४९१॥
मेरुचिया पैटी ॥ स्थित होतां नाहीं राहटी ॥इयाचा विचार करितां शेवटीं ॥ सतचि होती ॥४९२॥
जे अलक्ष्य करुनी उपेक्षती ॥ तयां होय पुनरावृत्ती ॥म्हणोनी लक्ष्य ठेवोनी निश्चिती ॥ बुद्धि करावी ॥४९३॥
हा ! हा ! जन्मभूमीच्या ग्रामीं ॥ मी स्नात झालों इया संगमी ॥सदद्वैत गंगा नामीं ॥ देखोनीया ॥४९४॥
श्लोक नद्या मिळाल्या ॥ समस्तही गंगारूप जाहल्या ॥त्याही म्यां वंदिल्या ॥ भक्तिभावें ॥४९५॥
तेथ ओवियें भरुनी अंजुली ॥ श्रीसतगुरुपदीं अर्ध्यदानें अर्पिलीं ॥सोहंपदें जपली गायत्री माता ॥४९६॥
झाली संध्या संदेह निरसला ॥ सतगुरु ह्रदयींच प्रगटला ॥ब्रम्हानंद दुमदुमिला ॥ सर्वत्रभर ॥४९७॥
नाना दुर्भिक्ष पडलें पृथ्वी वरी ॥ तेणें गांजिलें विश्व भारी ॥म्हणोनी ओवियें अभिषेकला त्रिपुरारी ॥ विश्वपिता ॥४९८॥
तो सदद्वैत रूपें प्रकट्ला ॥ सदन्नाचा सुकाळ झाला ॥तेणें द्वैत दुष्काळ लया गेला ॥ विश्व जनाचा ॥४९९॥
किंवा श्लोक नव्हती हे ब्राम्हाण ॥ तया ओवियें नमस्कारिलें जाण ॥पंचाशत परिपूर्ण ॥ साष्टांग भावें ॥५००॥
येथ मिया काय केलें ॥ श्रीसतगुरुचि ह्रदयांतुनी बोले ॥तेंचि ओवियें लिहिलें ॥ त्यांचें त्यांनीं ॥५०१॥
नाम घेतां ग्रासोग्रासीं ॥ तो नर जेविलाची उपवासी ॥तैसाचि मी गोविंद नामा सरसी ॥ अक्रिय जाहलों ॥५०२॥
ऐशा हया तीन ओवियें वरती ॥ करूनी आत्मरायाची स्तुति ॥भूतविवेक समाप्ति ॥ होती झाली ॥५०३॥
॥ इति श्रीहरिगीते हरीहरराय विरचिते भूतविवेकनाम द्वितीय प्रकरण समाप्तं ॥॥ ॐ तत् सत् - शांति: शांति: शांति: ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
एवं
— अशा प्रकारे
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
माया
— भासमान करणारी शक्ती
ऐसें
— असे
तेथ
— तिथे
तैसें
— तसे
जैसें
— जसे
म्हणोनि
— म्हणून
जाहलें
— झाले
तुवां
— तू (करणरूप)
नोहे
— नाही, होत नाही
माजीं
— मध्ये, आत
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
वरी
— वर; शिवाय

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.