मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
रुक्मिणी विलास

साहित्य

रुक्मिणी विलास

श्लोक १–१५०

rukmini vilasa

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

रुक्मिणीहरणाची कथा विस्ताराने. पण पहिल्याच श्लोकानंतर कवी ती अद्वैताकडे वळवतो — चिच्छक्तीला चिन्मयाचा जसा वियोग नसतो, तसा रुक्मिणीला हरीचा नसतो. कथा आणि तत्त्वज्ञान एकाच वेळी चालतात.

करुनि नमन देवा रुक्मिणी नायकातेंनिजपद हरि दे जो कीर्त्तिच्या गायकातेंस्मरत पद तयाचें त्याचिया लोकलीलाकथिन हरिति गातां वर्णितां ज्या कलीला ॥१॥
चिच्छक्तिला सतत चिन्मय जेविं योगश्री रुक्मिणीस न कधीं हरिसी वियोगमी यास्तव प्रियतमा परमा रमा तेमानी अहंकृति शिवे असि मारमाते ॥२॥
कुनारीसि कीं प्रीति अज्ञा नरा हेअहंकार हा ज्यांत अज्ञान राहेन जें पाहिजे निर्गुणा आपणातेंह्नणे कृष्ण कां हें शिवे मी पणातें ॥३॥
ह्नणवुनि खिजवीतो रुक्मिणीतें हरी तोपरम करुणतीच्या मीपणाला हरीतोकथिन चरित तें जें वर्णिलें श्री शुकानेंमनिं धरुनि पहावें सज्जनीं हें सुकानें ॥४॥
बोल खोल बहु भागवताचेश्री शुका - परम - भागवताचेपाप - ताप - हर या रसमात्रात्याचिया कथिन मी रस मात्र ॥५॥
श्रीरुक्मिणीची बहु गोड वाणीग्रंथास तेथें न करीन वाणीकीं कृष्ण जे शब्द अगाध वाचेवदेल तें वर्णिन माधवाचे ॥६॥
हा प्रेम संवाद सुखी सुजाणाकरीतसे नामहि तेंचि जाणाआतां शुकाचार्य परीक्षितीतेंसांगे कथा धन्य करी क्षितीतें ॥७॥
पलंगावरी रुक्मिणीच्या सुसेजेवसे कृष्ण ते त्यास सेवीत सेजेउभी सुंदरी ढाळीते चामरातेंमनीं जे शिवे मीपणा पामरातें ॥८॥
कर मुद्यावलयांसह चाळितांचवर माधवजी वरि ढाळितांध्वनि उठे चरणीं मृदुभूषणींत्दृदय लग्न जिचें यदुभूषणीं ॥९॥
हरि वरि चवरेसी जेधवां हस्त नाचेदिसति सखर - वस्त्रीं कंप कांहीं स्तनाचेचळति कुचयुगाच्या कुंकुमें रत्नहारस्फुरतिच पदराही आड त्यांचे विहार ॥१०॥
बरी साजते मेखळा तीसमाजीध्वनी ऊठती क्षुद्र घंटासमा जीअसी सेविते सन्निध श्रीपतीतेंपहातो स्मराचा स्वयें बाप तीतें ॥११॥
चहुंकडूनिहि आनन शोभलेंपदक खोलुनि शोभतसे भलेंश्रवणिचे नग शोभति दोकडेवरुनि चांचर - केशहि वांकुडे ॥१२॥
गळ सरी दुसरी न धरी गळांप्रतिभवीं न पती हरि वेगळाअवतरे अवतीर्ण जयीं पतीस्व अनुरुप परस्पर दंपती ॥१३॥
कसि असीस अहंमति वाटतेनरक - जन्म - मृतीसहि वाटतेह्नणउनी खिजवूनि तितें हरीनिपुण कृष्ण अहंकृति तें हरी ॥१४॥
वरावे ते राजे निजसम तुवां राजतनयेन ये आह्मां ऐसा क्वचिदपि वरुं वो सुविनयेदिल्हें बापें भावें त्यजुनि बरवे ते क्षिति - पतीपती केला ज्याचे कुळपति समुद्रांत लपती ॥१५॥
घालिती नृपति येऊनि घालेयानिमित्य जलधींत निघालेशत्रु ज्यास नृप दानव रीतीऐसियास नवर्या न वरीती ॥१६॥
त्यजियेलें अजिहि स्वनृपासनाकरिल त्याचिहि कोण उपासनाप्रगट गोष्टिहि हे जनिं हो कसीकळत तूं ठकलीस अहा कसी ॥१७॥
ज्याचा मनांतिल अगम्यचि पंथ वाटेजे लौकिकासम न चालति लोक वाटेऐशाचिया कुळसुता बसतील पाटींदुःखाचिया निघति दाटुनि त्या कपाटीं ॥१८॥
आह्मीं अकिंचनचि हे तरि गोष्टि साचीआह्मांसि आवड बहू जन तो तसाचीआह्मीं स्वयें प्रियहि त्याचि अकिंचनातेंआढ्यासि आमसि न सेवक सेव्यनातें ॥१९॥
ऐश्वर्यवंत वय आकृतिही समानस्वार्थार्थ होतिल परस्पर त्या समानमैत्रीविवाह नघडे अधमोत्तमातेंतूं भाळलीस नृपनंदिनि काय मातें ॥२०॥
येथें सुजाणपण जाण तुझें बुडालेंकीं दीर्घदृष्टिगत तें अवघें उडालेंज्याला न लेशगुण तो पति काय केलाज्याकारणें जन अकिंचन वो भुकेला ॥२१॥
अटन करित भिक्षा भक्षणें ज्या समाजींगगन वसन वारा सूत्रही त्या समा जींअगुण पण जयाचें ऐसिया स्वादु लागेतुज नृपति सुते तो कायसा दादु लागे ॥२२॥
आतां तर्हीं क्षत्रिय तूं भला गेवरीं जयाचा तुज लोभ लागेजेणें तुला साधिति लोक दोन्हींआह्मीं वृथा काय बहू वदोनी ॥२३॥
आह्मीं न आणूं जरि तू जलागेहें दावितां आनन लाज लागेचैद्यादि - रायां तव अग्रजालाम्यां जिंकितां पौरुष उग्र जाला ॥२४॥
तर्हीं उदासीन पणीं न कामींनहो कधीं स्त्री धन पुत्र कामींपूर्ण स्वलाभें असतों उगेहीदेहीं जगीं ही जसि ज्योति गेहीं ॥२५॥
हें यानिमित्य वदनें गदपूर्वजालाकीं मी प्रिया पतिस हा तिस गर्व जालानाहीं वियोग ह्नणऊनि असी अहंताराहे उगा हरुनि ते भव - भाव - हंता ॥२६॥
झाली असे परिसतांच अनाथ वाणीठावी नसे जिस कधीं असि नाथवाणीत्रैलोक्यनाथ तिस गमे करितो पणातें ॥२७॥
शुक ह्नणे स्त्रवली नयनां बुजींधुक धुकी मनिं कंप त्दृदंबुजींस्वपवनें निज - बिंबफळा - धराकरुनि शुष्क पदें उकरी धरा ॥२८॥
कुच सुकुंकुम - चर्चित चांगलेनयन बिंदु पडों वरि लागलेगिरियुगीं अतसी कळिका जळेंस्तनतटी तसिं वाहति काजळें ॥२९॥
नयनिं होऊनि शोक पयोधरास्रवति लक्षुनि अद्रिपयोधराचपळ वीज गमेच मनाचि कींमुख सकंप चळे मणि नासिकीं ॥३०॥
हसित बाष्प तिच्या मिर वेगळांनर न ज्यास शिवे हरि वेगळाशुक ह्नणे असुखास न अंतरेउपजतां स्वतनू स्मृति अंतरे ॥३१॥
दाटूनि कंठ पडली वदनास मुद्राशोकें भरे जग जसें भरितें समुद्राघेऊनि चामरचुडासह मुद्रिकांहींभूई पडे उरि नुरे तनुमाजि कांहीं ॥३२॥
पडे केळि जैसी महाचंड - वातेंअसें देखतां ये कृपा माधवातेंउडी शीघ्र टाकी पलंगावरुनीधरी उत्तरीयांबरा सांवरुनी ॥३३॥
उचलिलि चहुंहस्तीं श्री स्वयें श्रीधरानेंपुसि नयन जळातें त्यांत ऐक्या करानेंकुच युगुलिं हरीचे गुंतले दोन्हि पाणीसदृढ धरि चतुर्थे पोटसीं चक्रपाणी ॥३४॥
उदासीन काळत्रयीं त्या सतीचेंकरी बंधन प्रेम तें त्यास तीचेंसमाधान आतां त्दृषीकेश वाचेकरी आयका शब्द ते केशवाचे ॥३५॥
ह्नणे हरी रुक्मिणिला अहाहाअनर्थ कां मांडियला महा हानिर्दोष आम्हीं परि ठेवि लागेहा दोष आह्मांवरि ठेविला गे ॥३६॥
मजविण न सुखाचा तूज तो हेतु कांहींसमजत तुझिया या पाहतों कौतुकांहींनिज - वचन - विनोदें बोलिलों तूजला गेनकळत गति याची खेद हा तूज लागे ॥३७॥
जसें नीर सेतास नेती तयाचेंतुवां योग्य अर्था नुसंधान याचेंवदावें असें शब्दही बोलिलों कींतुझी होय विख्यात टीका त्रिलोकीं ॥३८॥
वदें मी तुझे बोलते आयकायातुवां टाकिली हे मृतप्राय कायाविनोदार्थ तो साच चित्तांत भारीतुवां मानिला वो ह्नणे कैटभारी ॥३९॥
तुवां या विनोदार्थ रीती खिजावेंखर्या गुत्दृ अर्थास वर्णीत जावेंपहावें मुख प्रेम - कोप - प्रभावेंतुझें तेधवां बोलिलों याच भावें ॥४०॥
नयनशर - धनुष्यें भोंवयांच्या प्रतापेंश्रवण वरिहि येती तांबडे कोप - तापेंअधर थरथरीती रक्तवर्ण - स्वभावेंअसिस तुज पहावें बोलिलों याच भावें ॥४१॥
प्रियासी वृथा दीसते ती उगे हीगृहस्था जना लाभ तो हाचि गेहींविनोदें अशा जो अवो काळ जातोकरीतो सुखी दुःखिता काळजा तो ॥४२॥
अलभ्य हा लाभ शतक्र तूतेंतो वाटला नेम अवक्र तूतेंहें जाणती ज्या अति - धीट भारीभ्याडे ह्नणे नेणसि कैटभारी ॥४३॥
बोधी असा सांत्वनदक्ष तीतेंम्हणे शुकाचार्य परिक्षितीतेंटाकी प्रिया त्यास भयास देवीबोलेल तें आइकिजे सदेवीं ॥४४॥
लक्षी अपांगें मुख कृष्णजीचेंस्वमान भंगें मन उष्ण जीचेंस्नेहें सलज्जें नयनेंचि पाहेटाकूनि चिंता कळतां कृपा हे ॥४५॥
श्रीरुक्मिणी ह्नणतसे पुरुषोत्तमातेंकीं जी न साम्य मज तूज ह्नणोनि मातेंजे बोलिलास हरि ते तरि गोष्टि साचीयेते जडास समता कसि चिद्रसाची ॥४६॥
सत्तानुभूति तुझि जे सतएव सिद्धामी तो गुण - प्रकृति या करितां प्रसिद्धातूं चित्समुद्र अजि मी लटिक्या तरंगाहें तों नव्हे अनृत जाणसि अंतरंगा ॥४७॥
दिसे केविं मी त्वत्प्रकाशाविनाहीअजी वस्त्र तंतूविना जेविं नाहींस्वयें ब्रह्म तूं मी तुझी स्वैर मायाजगीं जन्मलों तैंच दोघें रमाया ॥४८॥
तूजही जन जनाऽधिप सारेसेविताति पसरुनि पसारेनीच केविं ह्नणवे तव देहाहें ह्नणे झणि अनंत वदे हा ॥४९॥
म्हणउनी म्हणते अजि केशवागणिति आत्मपणें जितके शवाअबुध इच्छुनि भाग्य नृपासनाकरिति माझिच काम्य - उपासना ॥५०॥
मृग जळा मृग धांवति बापुडेश्रमतिं तों जळ साचचि सांपडेतहि मनीं अनृताऽमृत वासनाफलद तूंचि वृथा मदु पासना ॥५१॥
रजत श्रुक्ति वरील तथास्तवश्रमति नेणति जे सुख वास्तवअसुख तें सुख मानुनि वासनाधरिति ते करिती मदुपासना ॥५२॥
तनुस मी ह्नणुनी अभिमानितीविषय दुःखहि जे सुख मानितीधरुनि ते दृढ दुर्भर वासनाकरिति यज्ञ असे मदुपासना ॥५३॥
न अभिमानिति या तितके शवाभजति केवळ ते तुज केशवामृग जळा सम भाग्य - नृपासनागणिति ज्यांस चिदर्क उपासना ॥५४॥
तुतें सेविती सूज्ञ सर्वोत्तमातेंअसे अज्ञ ते मागती वित्त मातेंस्वयें थोर तूं येरिती श्रीनिवासाअसें मी पदी श्लाघ्य मानूनि वासा ॥५५॥
असमता मज तूज असे खरीपरि असें वदली तुझि वैखरीशरण केविं भयें वरुणालयातदपि उत्तर घे करुणालया ॥५६॥
लोकीं नियामक गुणत्रय जेविं राजेरज्जू फणींत हरि त्यांत असा विराजेसर्वांस दोर न दिसे अति - भ्याड साचत्रासें ह्नणे भिसि गुणाप्रति तूं तसाच ॥५७॥
या राजयांसिच भितों जरि हे स्ववाणीजी स्थापिसी तरि गमेलचि मंद वाणीकीं ते तुवां पळउनी हरिलेंचि मातेंबोलेल हें स्फूट पुढें पुरुषोत्तमातें ॥५८॥
व्यापिलें जग पदें त्रिविक्रमाभें तया न ह्नणवे उरुक्रमाहाचि अर्थ सकळांपरी खरारुक्मिणी विनवि वृष्णि - शेखरा ॥५९॥
भिऊनियां याचि खळा नृपालाया सागरीं कोण ह्नणे लपालामनीं समुद्रीं वसतोसि देवागुणासि जाणों भिसि वासुदेवा ॥६०॥
बलाऽढ्यासवें द्वेष हाही तसाचीतुझा भाव हे गोष्टिहि होय साचीबळी इंद्रियां दुर्भराचीच सेनाखरा द्वेष त्यांसी तयां जें दिसेना ॥६१॥
म्हणसि टाकियलें स्वनृपाऽसनातरि जयां तव - पाद - उपासनानृप - पद त्यजिलेंचि तिहीं असेभरत अंग गयादि किती असे ॥६२॥
ज्याच्या मनांतील अगाध रीतीन लोक मार्गासि कधीं धरीतीआह्मीं असे हें वदलासि मातेंवदेन तेंही पुरुषोत्तमातें ॥६३॥
जे सेविती रस तुझ्या पद - सारसाचात्यांचा कळे न कधिं मार्ग विचार साचाजे आत्मया प्रियतमा तुज आयत्यातेंध्याती द्विपाद पशु जाणति काय त्यातें ॥६४॥
तूझा अगम्य पथ हें न अपूर्व कांहींकां जे अगम्य निगमा - विधि - पूर्वकांहींनिर्मूनि पाळुनि जगा निमिषे हरीतोकर्त्ता नव्हे करुनि केवळ तूं हरी तो ॥६५॥
तूझें अलोलिक कथाऽमृत गाति जेणेंजे लौकिकास अजि हाणति लोक जेणेंऐशाचि ही तुझि न केविं अलोकरीतीआश्चर्य कोण जन येविषयीं करीती ॥६६॥
मी निष्किंचन आणिखी प्रियहि मी निष्किंचनाचा खराते निष्किंचनही जन प्रिय मला तैशाचिया शेखराहें मातें वदलेत अर्थ तुमच्या निष्किंचनत्वीं असाकीं त्यापासूनियां न किंचिदपि कीं जे ते तुह्मीं जी असा ॥६७॥
नव्हेचि ज्यापासुनि कर्म कांहींतया अकर्त्या अज - आदिकांहींतुह्मीं प्रिय प्रीति तुतें तयांचीजगांत पूजा हुतभुक्तयांची ॥६८॥
दारिद्र निष्किंचन शब्द दावीतयांसि हे गोष्टि कसी वदावीतुझ्या प्रिया तूं प्रिय ज्यांस देवाते पूज्य लोकां सकळां सदेवा ॥६९॥
बहु धनाढ्य मला भजतीच नाम्हणुनि मी प्रिय - शुद्ध अकिंचनाजरि असें ह्नणसी सुखदायकाधन तया किति जी यदुनायका ॥७०॥
कुबेरासम द्रव्य तो बोलवेनाधनाच्या मदें मान ज्याची लबेनाधनाढ्यत्व तें आढ्यतानामकां जीघडे त्यास होते सुधा जेविं कां जी ॥७१॥
पदरिं नधनदाच्या कोटिवा अंश कांहींमद तरि न असा जो त्य कुबेरादिकांहींअमित विभव ज्याला गर्व त्याला दिसेनातुजचि भजतसे हो श्रीविरिंच्यादि सेना ॥७२॥
तया तुझा प्रेमविलस देवाजी बोलिजे आढ्य जया सदेवादरिद्र जो तो तुजला भजेनापाषाण सत्संग जळीं भिजेना ॥७३॥
धन गज रथ तूझे सर्व सर्वोत्तमा तेन कळत ममतेनें देखतां चित्त मातेतुज शरण न येतां दुर्जना अंतकालागिळि विषय विषाचा त्या मदें भ्रांत काला ॥७४॥
न भजुनी मज आढ्य असी खरीतुझिच हे न घडे हरि वैखरीजरि तदंतर भाव न सांबरीअमृत - अर्थ कलिप्रद सांबरी ॥७५॥
विवाह मैत्री बरवी समासीघडू नये ते अधमोत्तमासीभावार्थ या श्रीपति भारतीचादावूनि बोले परिहार तीचा ॥७६॥
तूं राजकन्या परि उग्रसेनामी सेवितों जेविं समग्र सेनाबात्द्यार्थ हा व्यर्थ जळो जळालाडोळां पुन्हां आणिल तो जळाला ॥७७॥
अति श्रेष्ठता तूज सर्वोत्तमातेंउणी मी जर्ही सेविती मत्त मातेंखरें हे तर्हीं योग्य होतें वरायाअजी आयकावें बरें देवराया ॥७८॥
जरि निपट - दरिद्री जो न लाहेचि कांजीतरि अमृत मिळाल्या त्यास सोडील कां जीतसि बहुत उणी मी लभ्य झालासि मातेंह्नणउनि वरिलें म्यां तूज सर्वोत्तमातें ॥७९॥
निज - तनू नर लाउनि सार्थकींकरितसे भलता पुरुषार्थ कींसफळ पौरुष देह तुझा खराकवण तूजसम प्रभुशेखरा ॥८०॥
साधूं नयेचि तरि जी पुरुषार्थ कांहींतूझें समत्व न सुरां न अजादिकांहीजो तो करील पुरुषार्थ असी प्रसिद्धीतेव्हां मला उचित हे तव - पादसिद्धी ॥८१॥
फळ चहुं पुरुषार्थी तूं निजानंद - सारातरि सकळ फळात्मा तूंचि कीं सर्व साराम्हणुनि सुख समस्त त्यागुनी वासुदेवाउचितचि वरिलें म्यां तूज जी देवदेवा ॥८२॥
सद्बुद्धिटाकुनि गृहक्रतूतेंजे सेविती साधु अवक्र तूतेंतूं स्वामि ते सेवक सत्क्रियांसीसंबंध ऐसा उचित प्रियांसी ॥८३॥
मिथुन सुख - रतातें तूंचि आनंद साचामृग मृगजळिं मानीं स्वाद सत्या रसाचापिउनि सलिल मूढ ध्यात मिथ्याच पाणीगृहसुखनिरतातें दूरि तूं चक्रपाणी ॥८४॥
म्हणुनि टाकुनि सर्व यदूत्तमाभजति नीचपणें तुज उत्तमाउचित अर्पियली तनु हे तुतेंजर्हि उणी सुख हें वरिलें तुं तें ॥८५॥
आतां स्वयें न वदिजे मज निर्विकारीकीं श्लाघ्य मानिति मला जन जे भिकारीते तों यती त्यजिति राज्य समग्र सारेंभक्षूनि भैक्ष्य चरितें तुझिं गाति सारें ॥८६॥
राज्यादिकें टाकुनि निर्विकारीत्वदर्थ होताति असे भिकारीराज्यांत दुःखें सुख तूजमाजीम्हणूनि तूं श्लाघ्य तयासमाजीं ॥८७॥
निष्काम काय वरिला पति निर्विकारीकीं श्लाघ्य मानिति जय जन हो भिकारीतूझें सुजाणपण याकरितां बुडालेंजें दूर दृष्टिपण तें ह्नणसी उडालें ॥८८॥
आणीक आपण वृथा गुणहीन साचातो वाटला तुज कसा प्रिय - मानसाचानेणोनि हे मजचि ते उचलोनि घालीमाळा न दृष्टि तिचि दूरपथीं निघाली ॥८९॥
वदसि येरिति तूं यदुनायकापरिस तेविषयीं सुखदायकाअजि वृथा ह्नणिजे न करी क्रियासहज ज्यास न इंद्रिय - विक्रिया ॥९०॥
जर्ही तूं न होसी त्दृषीकादि सेनातयां तूजवांचूनी काहीं दिसेनावृथा ज्याविना इंद्रियांदीक सारेप्रिया आत्मया व्यर्थ होसी कसारे ॥९१॥
स्फुरसि आत्मपणेंचि निरंजनापरम तो प्रिय तूं सकळां जनातुज निमित्त समस्तहि आवडीजन यदर्थ धनादिक सांवडी ॥९२॥
विषयभोग जया प्रति बिंबतोतवं चिदंश जळ प्रतिबिंब तोतुज भजेल तंई परमा गतीह्नणुनि संत तुतें गति मागती ॥९३॥
निरसुनि भजत्याच्या त्या जला मीपणातेंपरम - करुण ऐक्यें देसि तूं आपणातेंम्हणुनि भजति तूतें टाकुनी पुत्र दाराकळत वरियलें म्यां तूज ऐशा उदारा ॥९४॥
नव्हे नेणती जी नव्हे अल्पदृष्टीनव्हे दोन्हिही माझिया जी अदृष्टींबहू दूरि आणीकही बुद्धि जातेनिवदींतसें नाथपादांबुजातें ॥९५॥
तुझ्या भोंवई पासुनी काळ जालातया पाहतां कांप ये काळजालाशरीरें पदें ब्रह्म पर्यंत नानागिळी काय पांराजयांच्या तनाना ॥९६॥
टाकूनि सर्व तुज दीर्घतरा विचारेंम्यां येरिती वरियलें न कुबुद्धिचारेंअज्ञान आणि अविचार अदीर्घ - दृष्टींतूझें पद स्मरति त्यांस नसें अदृष्टीं ॥९७॥
वाक्यांत या भावतुझा असाचकीं अर्थ दूजा अजि होय साचस्थापेल अज्ञानचि तूजमाजीतें आयकावें करुनी क्षमा जी ॥९८॥
शार्ड स्वनेंचि पळवूनि नृपाऽधमातेंसिंहें मृगांतुनि जसें हरिलेंचि मातेंतो सागरीं भिउनि त्यासि ह्नणे दडालाजो हें वदेल मतिमंद म्हणे जडाला ॥९९॥
आणीक एक मन शब्द तुझा न सोसीसक्रोध उत्तर वदेन असी असोसीकीं लोकरीतिरहिता वरतील मातेंत्या पावतील बहुतेक बहुश्रमातें ॥१००॥
आईक जी जळधि कंकण ज्या क्षितीचेंएकाधिपत्य निरुपद्रव दक्ष तीचेंटाकूनिही श्रमति काय अजी वनातेंजाऊनि सेउनि तुतें जगजीवनातें ॥१०१॥
आणीक एक मज जें अजि बोललासीचित्तास तो बहु - सखोल कुबोल लासीकीं क्षत्रियर्षभ वरीं अझुनीं भलागेआत्मा तुरुप तुज ज्यावरि लोभ लागे ॥१०२॥
तूजें कथामृत निघेल जिच्या सुकानींजें वर्णिलें अजि शुकादि पिका शुकानीतें तूज टाकुनि वरील न नश्वरातेंमी तों तुझीच वरिलें तुज ईश्वरानें ॥१०३॥
मरणशील असे जरि कामिनीतुझि कथा परिसे दिन यामिनीत्यजुनि तूज अशास बरी न तेतुझिच मी तरि काय वरीन ते ॥१०४॥
अज परम अनादी श्री तदंगें अनादीअज सकळ जनादी श्री तदंगें जनादीनिगम वदति ऐसें सर्वही त्यावरुनीतुज निज अनुरुपा धन्य झालें वरुनी ॥१०५॥
इह परत्र तुवां निज कामनापुरवितां स्मृतिकुत्सित कां मनाउभय - सौख्य तुझ्या पदपंकजींबुडवणारचि आणिक पंकजीं ॥१०६॥
आत्मा नुरुप वरिलेंचि जरी मला गेतूझें मज प्रिय न रुप न नाम लागेया लागिं जाय ह्नणतों ह्नणसी वरायारायांत यांत तरि आइक देवराया ॥१०७॥
तुज नव्हे किमपि प्रिय हें खरेंजरि असे त्यजिलें सुर - शेखरेंचरण होत तुझे मजला गतीशरण त्यां प्रिय जे मज लागती ॥१०८॥
स्वशरणावरि तूं प्रियचि प्रियावचनमाळ तथापिहि अप्रियाभय करी तरि हो मजला गतीपद तुझे प्रिय जे मज लागती ॥१०९॥
भजति त्यास अनुग्र तूं करींकरिसि जी गुण हा भय हें हरीशरण मीं ह्नणऊनि तुझ्या पदाहरित तें भवसंकट - आपदा ॥११०॥
अनृतही भवसिंधु जसा खरान भजतां तुज जी सुर - शेखराशरण मी जरि ये न विनोद हकरिल ये घडि श्रून्य दिशा दहा ॥१११॥
आतां हरी नृपति जे मज बोलिलासीते तीस होत पति जे अति दुष्ट लासीकानीं जिच्या तुझि कथा न पडे कदापीदुःखी जिताच मरतां यमलोक दापी ॥११२॥
तूझी कथा मृड - विरंचि सभेस देवींसन्मानयुक्त धरिजेति मनीं सदेवींकानीं जिच्या पडति त्या जगदेकसारावोपील ते परिसतां नृपलोक सारा ॥११३॥
स्त्रियांचे ते देवा नृपति खर कीं बैल कुतरेअहा कोण्ही बोले वधिति धन - राज्यार्थ सुतरेनवोढाच्या लाता खरपुरुष सोसूनि रमतीवृषस्कंधीं घेती श्वनर अवमानार्ह कुमती ॥११४॥
श्री जों असे तों क्षितिपाळ वर्णीकंटाळली तप्तसुवर्ण वर्णीओकार - वाणा मुखभाव दावीजे जे वदे गोष्टिहि ते वदावी ॥११५॥
करुनि अंगुळिभंग रमाधवाह्नणत तें नृप ते अजि माधवाशव जितेच अशाच रमापतीबहुत ओंगळ त्या ह्नणती पती ॥११६॥
श्मश्रु रोम नख केश कातडीआंत मांस कफ पित्त आंतडींमूत्र शेंबुड मळादि वाहतीत्यांसि सुंदरपणेंचि पाहती ॥११७॥
मृगजळ पुरुषाचा देह नानाविकारींरविकरसम त्यांत श्रीपती या प्रकारींकुलवधु जरि पातिव्रत्यमार्गेचि पाहेभव जलधि तरे ते सर्व तूझी कृपा हे ॥११८॥
तूझा पदान्नमकरंद कथारसाचाहुंगेल जे तिसचि हा सुविचारसाचाठायीं पडे जग भजे अजि त्या पतीतेंमी भोगितें तुज तयाच रमापतीतें ॥११९॥
सुधा मानुनीयां पितो एक कांजीसुधापानकर्त्ता शिवे त्यास कां जीतसी टाकुनी मी जया मंगळालानृपांला तयां कां भजों वोंगळोला ॥१२०॥
हीं उत्तरें सकळ युक्तचि जेविं झालींदुःखें भडाग्निसम तीं अवघीं विझालींतों मी उदास ह्नणऊनि अगाध वाचाआणी स्मृतीस मन तो मधु माधवाचा ॥१२१॥
या गोष्टीनें सर्वहि तें उडालेंचिंतार्णवीं चित्त महा बुडालेंतो भूमि देखे शरणागतीचीध्यानीं हरीच्या करुणागतीची ॥१२२॥
एकाविणें इतर रक्षक सान वाटेये तेधवांच शरणागति नीट वाटेऐसी अनन्य - गुरुभक्ति - उपासना हीदे कृष्ण त्यासिच घडे इतरासि नाहीं ॥१२३॥
दाता सुरद्रुम नमागतियास नाहींन प्रार्थितां हरि न दे स्वउपासना हीते दीधल्यावरि जरी बहु तो उदासप्रेमेंस रक्षित असे शरण स्वदास ॥१२४॥
जे आवडी त्यजुनियां पद - संपदांचीप्रीतीच मागति सदां हरिच्या पदांचीते त्यांस दे सुरतरु मग ते स्वदासस्वामी न सोडिच कदापि जर्ही उदास ॥१२५॥
हा उदास परि याचि उपायींलभ्य यास्तव शिर प्रियपायींठेवुनी म्हणतसे मृदुवाणीप्रीति दे नकरितां अजि वाणी ॥१२६॥
दे प्रेम याच तुझिया चरणांबुजाचेंमाथां सदाशिव धरी शिव अंबु ज्याचेंकीं तूं उदास सहवास तुझा करायाआणीक यत्न न दिसे जगदेक राया ॥१२७॥
कांता जनास सकळांहुनि थोर वाटेतूं तो न चालसि असेरिति चोरवाटेयालागिं आवडि पदीं स्वसुर द्रुमातेंजी मागणें इतर यत्न दिसे न मातें ॥१२८॥
मातें गुण प्रकृतितें जगदेकरायातूं पाहतोसि जनबुद्धिस जैं करायालोहा जडा चलत चुंबक - सन्निधानेंआतां तसेंचि करणें करुणानिधानें ॥१२९॥
प्रत्युत्तरें हरिस संमत हें वदोनीदे उत्तरें कथितसें निजभाव दोनीन स्वानुरुप वरिला नृप कां भला गेआतां तरी वरिं जयावरि लोभ लागे ॥३०॥
अशाहि स्त्रिया देखती वर्तमानींम्हणोनी तुझी गोष्टि मी साच मानींमनीं एक एकीस जें गोड वाटेतिला अन्य नेऊनि ने अन्य वाटे ॥१३१॥
देखोनि अंबा जशि शाल्वरायाझाळी मनीं सिद्ध तया वरायाभावानिमित्तें हरि भीष्म तीतेंआणीक दोघी - बहिणी - सतीतें ॥१३२॥
शाल्वास देखोनि मनोभवार्ताभीष्में असी आइकतांचि वार्ताते त्यागिली सांप्रत वर्त्तमानींस्त्रिया अशाही मनिं साच मानी ॥१३३॥
होऊनिही अजि विवाह नवा मनातेंस्त्री पुंश्वळी सरस देखुनि मानवातेंचिंत्ती मनीं कुनर संग करी तियेतेंत्यागी भला पतनु जीस्तव यास येतें ॥१३४॥
स्त्रिया दुष्टकर्मे असींही करीतीह्नणोनि प्रसंगें असी लोकरीतीहरी बोलसी जाणसी पूर्ण मातेंवदों कायसी साक्षि सर्वोत्तमातें ॥१३५॥
धरुनियां श्रीपतिपाद पद्माहे बोलिली बोल सखोल पद्माया लागुनी तीस वदे हरी तोजो दुःख तीचे अवघें हरीतो ॥१३६॥
भलि भलि अमृताचे घोट हे आयकायाबहुत बहुत होती हे तृषायुक्त कायाम्हणवुनि रचिला हो क्षोभ या मानसाचापरि वदसि मुखें हा भाव माझाचि साचा ॥१३७॥
प्रसन्न मी नित्यचि तूजलागेघे तो जरी जो वर तूज लागेपरंतु तूतें दिधली स्वकायाजे देतसे सर्व वरादिकां या ॥१३८॥
जें भाग्य वांछित विरिंचि - शतक्रतूतेंतें मागती सकळही विधि शक्र तूतेंएकांत - भक्ति त्दृदयावरि वास तीतेंमोक्षादि सर्व सुख सिद्ध सदा सतीतें ॥१३९॥
सदा चित्समुद्रैक्यविद्यानदी जेनवें काय आतां तिला ज्ञान दीजेस्वतां त्यास जो मीपणा क्षिप्र संगेंचढे तो तुवां नासिला याप्रसंगें ॥१४०॥
अहंपणा त्यागुनि तीव्रतत्त्वाझोंबे पुन्हा प्रेम पतीव्रतत्वासाध्वी अशा दाखविलें मतीतेंदेखोन मी मानवलोंच तीतें ॥१४१॥
वाईट ऐसें तुज बोलिलों कींतें आइके जे ललना नृलोकींमानीच ते निश्चय दुष्ट मातेंन तूं तसें भाविसि उत्तमातें ॥१४२॥
न अधमासम वो मज मानिलेंजरि बहू तुज म्यां अपमानिलेंम्हणुनि नासुनि नूतन मीपणास्थितिहि पूर्विल साधिलि आपणा ॥१४३॥
किमपिही नलगे मज वेगळेंम्हणुनि साधिसि सर्वहि मंगळेंमज भजोनिही ज्यास मनीं असेविषय भोगचि आइक ते असे ॥१४४॥
ज्या संपदा करिति बंधन दंपतीतेंत्या मागती मजहि मुक्तिचिया पतीतेंस्वब्रह्मचर्य तप वेचिति जे सकामींऐशांस हो सुलभ होइन त्यांस क मी ॥१४५॥
भोग सर्व घडती पशु देहींत्या तनू नरक शास्त्र वदेहीमुक्तिच्या पतिस त्या विषयातेंमागती नसमजे विषयातें ॥१४६॥
सेवून याही पुरुषोत्तमातेंअभाग्य जे मागति भोग मातेंपरंतु हा शब्द न तूज लागेकीं एक मीच प्रिय तूजला गे ॥१४७॥
घरधणिनि तुवां हे थोर भाग्येंचि वृत्तीधरियलि चरणीं या जे निवृत्ति प्रवृत्तीखळ जन न कधींही या सुबुद्धीस लाहेकपटचि मिरवी स्त्री गोष्टि कैंची तिला हे ॥१४८॥
म्हणुनि तूजसमानचि कामिनीजरि तयांत वसे दिन - यामिब्नीतरिच त्यास तुझा महिमा नसेपरिस आणिक निर्मळ मानसे ॥१४९॥
जे पावले स्वनगरा नृपती विवाहींते मानले मग मृगांबुनदीप्रवाहींमाझ्या कथा परिसतां मज देवरायाकेला तुवां परम यत्न अवो वराया ॥१५०॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तुज
— तुला
मातें
— मला
तुवां
— तू (करणरूप)
तया
— त्याला, त्या
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
घडे
— घडते, शक्य होते
सकळ
— सर्व
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
ऐसें
— असे
देखोनि
— पाहून
प्रकृति
— सृष्टीचे मूळ जड तत्त्व
माया
— भासमान करणारी शक्ती
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
ठायीं
— ठिकाणी
देखे
— पाहतो
जैं
— जेव्हा

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.