मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्रीहरिगीता — तत्वविवेक

साहित्य

श्रीहरिगीता — तत्वविवेक

श्लोक १५१–२७१

shriharigita — tatvaviveka

रचना — वामन पंडित · सु. १६०८–सु. १६९५

सारांश

विद्यारण्यांच्या ‘पंचदशी’तील तत्त्वविवेक प्रकरणावरील वामन पंडितांची ओवीबद्ध मराठी टीका. मूळ संस्कृत श्लोक आणि त्यामागे त्याचे मराठी निरूपण, अशी रचना — दोन्हींचे क्रमांक वेगळे चालतात, म्हणून पानावर दोन मालिका दिसतात. ‘अंधाचिया मालिका एकमेकां सोडीत नाहीत’ अशा ओळींनी गुरुपरंपरेवरच पहिला प्रश्न विचारला जातो.

स्वसुखाची सोडुनी गोडी ॥ विषयीं धरी आवडी ॥कर्में करुनी धडपडी ॥ भोगासाठीं ॥१२१॥
नदी प्रवाह भोंवरीं ॥ कीटक पडला माझारीं ॥आतां तयाच्या फेरी ॥ कोणगणी ॥१२२॥
तैसा जीव या संसारीं ॥ जन्म मरणाचे फेरे करी ॥जाजावला बहुती परी ॥ नाना दु:खें ॥१२३॥
काम क्रोध मद मत्सर ॥ दंभादि नाना विखार ॥मोहमाया महा सुसर ॥ मिठी न सोडिती ॥१२४॥
कर्में करुनी स्वर्गा जावें ॥ तेथेंही देच असती अवघे ॥आतां कैसेनी सुटावे ॥ या भवार्णवी ॥१२५॥
हाहा बहु कटकट ॥ किती जाहले वोखट ॥कोण चुकवील ही वाट ॥ जन्म मृत्युची ॥१२६॥
सत्कर्मपरिपाकांते करुणानिधिनोद्धृता: ॥प्राप्य तीरतरुच्छायां विश्राम्यंति यथासुखम् ॥३१॥
उपदेशमवाप्यैवमाचार्यात्तत्त्वदर्शिन: ॥पंचकोशविवेकेन लभंते निर्वृतिं पराम् ॥३२॥
सत्कर्म पूर्वोपार्जित पुण्यें ॥ येउनीयां कृपाळु सज्जनें ॥जैसा कटिक बाहय देशीं ठेवणें ॥ नदी प्रवाहांतुनी ॥१२७॥
मग तो तीर तरुच्छाई ॥ प्राप्य सुख आनंदें घेई ॥तैसाची हाही देहीं ॥ स्वसुखातें भोगी ॥१२८॥
अहेतुक सत्कर्में हातवटी ॥ पूर्वोंपार्जित पुण्याचे शेवटीं ॥पडे दयाळु सद्नुरुची गांठी ॥ उपदेशावया ॥१२९॥
मग ते उपदेश करती ॥ पंचकोश विवरती ॥महावाक्यें दाखविती ॥ स्वात्मसुख ॥१३०॥
तेथें निवर्तीच्या लाभें ॥ जीव परमानंदी शोभे ॥अद्वैत सामराज्य वैभवें ॥ डोलूं लागे ॥१३१॥
श्रोता करी विनंती ॥ तीच उपदेश पद्धती ॥ऐकावया चित्तवृत्ती ॥ एकवटली ॥१३२॥
वक्ता बोल वचन ॥ तुझें करुं समाधान ॥करी एकाग्र मन ॥ तेची सांगूं ॥१३३॥
अन्नं प्राणो मनो बुद्धिरानंदश्चेति पंच ते ॥कोशास्तैरावृत: स्वात्मा विस्मृत्या संसृतिं व्रजेत् ॥३३॥
अन्नमय प्राणमय ॥ मनोमय विज्ञानमय ॥पांचवा आनंदमय ॥ कोश तो ॥१३४॥
एही कोशीं आत्मा आच्छादिला ॥ स्वस्वरुपातें विसरला ॥संसार प्रवाहीं पडला ॥ दु:खें भोगावया ॥१३५॥
जैसा का कोश किडा ॥ आपणा आपण घाली वेढा ॥तैसाचि हा जीव वेडां ॥ कोशीं पडला ॥१३६॥
स्यात्पंचीकृतभूतोत्थो देह: स्थूलोऽन्नसंज्ञक: ॥लिंगे तु राजसै: प्राणै: प्राण: कर्मेद्रियै: सह ॥३४॥
सात्विकैर्धींद्रियै: साकं विमर्शात्मा मनोमय: ॥तैरेवसाकं विज्ञानमयो धीर्निंश्चयात्मिका ॥३५॥
करणे सत्वमानंदमयो मोदादिवृत्तिभि: ॥तत्तत्कोशैस्तु तादात्म्यादात्मा तत्तन्मयो भवेत् ॥३६॥
कोश म्हणजे आवरण ॥ स्वस्वरूप विस्मरण ॥तेणें झालें भ्रमण ॥ भुवन त्रयीं ॥१३७॥
स्थूलदेह तोचि अन्नमय ॥ अन्नीं निर्माण अन्नीं लय ॥तयाशींच करुनी आत्मीय ॥ जीववर्ते ॥१३७॥
पंच कर्मेंद्रियें पंच प्राण ॥ मिळोन प्राणमय कोश जाण ॥हाचि मी ऐसें म्हणोन ॥ कर्में करी ॥१३९॥
पंच ज्ञानेंद्रियें मनबुद्धि ॥ येही मनोविज्ञानमय कोश सिद्धी ॥तियेठाईं ठेउनी बुद्धि ॥ हेंचि मी म्हणे ॥१४०॥
ऐसे त्रयकोशाचेयुत ॥ लिंग देहीं असे वर्तत ॥तेचि मी म्हणोनी रत ॥ झाला जीव ॥१४१॥
सुषुप्ति आनंद विभासे ॥ तेंचि मी ऐसें भासे ॥तोचि आनंदमय कोश असे ॥ स्वात्मरूपीं ॥१४२॥
येणें येणें प्रकारें ॥ आत्मा तन्मयत्व स्फुरे ॥कोश नामाभिधानें धरे ॥ आपुल्याला ॥१४३॥
अन्वयव्यतिरेकाभ्यां पंचकोशविवेकत: ॥स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रम्हा प्रपद्यते ॥३७॥
अभाने स्थूलदेहस्य स्वप्ने यद्भानपात्मन: ॥सोऽन्वयो व्यतिरेकस्तद्भानेऽन्यानवभासनम् ॥३८॥
लिंगाभाने सुषुप्तौ स्यादात्मनो भानमन्वये ॥व्यतिरेकस्तु तद्भाने लिंगस्या भानमुच्यते ॥३९॥
तद्विवेकाद्विविक्ता: स्यु: कोशा: प्राणमनोधिय: ॥ते हि तत्र गुणावस्थाभेदमात्रात्पृथक्कृता ॥४०॥
सुषुत्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वय: ॥व्यतिरेकस्त्वात्म भाने सुषुत्त्यनवभासनम् ॥४१॥
यथा मुंजादिषीकैवमात्मा युक्त्या समुद्धृत: ॥शरीरत्रितयाद्धीरै: परं ब्रम्हौव जायते ॥४२॥
तया पंच कोशातें ॥ करूनी अन्वय व्यतिरेकातें ॥विचारें पावावें परतें ॥ परब्रम्हा ॥१४४॥
स्थूल देहीं जो आपण ॥ तयाचें स्वप्नीं ही असें भान ॥परी अन्नमय कोश जाण ॥ न स्मरे तेथें ॥१४५॥
तिन्हीही अवस्था पचंकोश ॥ यांचा वारंवार होतसे नाश ॥परि आत्मा अविनाश ॥ सर्व काळीं ॥१४६॥
जैसा पुष्पमाळेचा दोरा ॥ सर्व पुष्पीं एक सरा ॥तैसा स्वात्मा वसे खरा ॥ पंच कोशीं ॥१४७॥
भोमी जैसी सर्व भरित ॥ भूतें तिये ठायीं वर्तत ॥तैसा आत्मा अनुस्यूत ॥ सर्वांठायीं ॥१४८॥
इया सकळाचें नास्तित्व ॥ आत्मा स्मरे सदोदीत ॥अन्वय व्यतिरेकें जो पाहात ॥ तयाशी हें कळें ॥१४९॥
जैसा मुंजा तृण कोमलांकुरु ॥ निवडती विचारेंची धीरु ॥तैसाच जीवें स्वविचारु ॥ परब्रम्हा व्हावें ॥१५०॥
आपणाशीं आपण व्हावया ॥ विचारू तरी कासया ॥अन्य विषय त्यागलिया ॥ उरे तो स्वत: ॥१५१॥
परापरात्मनोरेवं युक्त्या संभावितैकता ॥तत्त्वमस्यादिवाक्यै: सा भागत्यागेन लक्ष्यते ॥४३॥
तेंचि करावया विवरणा ॥ भाग त्याग लक्षण ॥तत्वमस्यादि वाक्यें करुन ॥ करूं पुढें ॥१५२॥
एवं उक्त प्रकार करून ॥ जीवात्मा न होऊनि भिन्न ॥युक्त्या साम्य लक्षण ॥ प्रदर्शिलें ॥१५३॥
जगतो यदुपादानं मायामादाय तामसीम् ॥निमित्तं शुद्धसत्वां तामुच्यते ब्रम्हा तद्निरा ॥४४॥
यदा मलिनसत्त्वां तां कामकर्मादिदॄषिताम् ॥आदत्ते तत्परं ब्रम्हा त्वंपदेन तदोच्यते ॥४५॥
त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्परविरोधिनीम् ॥अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते ॥४६॥
यतजे सच्चिदानंद लक्षण ब्रम्हा ॥ तेंची तामसी स्वीकारी मायाधर्म ॥उपाधीयोगें गुण कर्म ॥ करी ऐसें वाटे ॥१५४॥
शुद्ध सत्वप्रधान ॥ मायानिर्मीतां झाले जाण ॥तया निमित्त उपादान ॥ तत् ऐसें बोल ती ॥१५५॥
मलीन तत्त्वीं मायेंत ॥ जें प्रतिबिंबत होत ॥तया त्वं ऐसे उच्चारित ॥ ब्रम्हातद्निरा ॥१५६॥
एवं त्रय प्रकारीं ॥ एकची वसे निर्विकारी ॥माया त्यागूनी निर्धारी ॥ हेंचि लक्षावें ॥१५७॥
“तत्वमसी” महावाक्यें ॥ जीव ब्रम्हा आलें ऐक्यें ॥मायादि उपाधी पडले फिक्के ॥ वेदोपदेशें ॥१५८॥
सोऽयमित्यादिवाक्येषु विरोधात्तदिदंतयो: ॥त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा ॥४७॥
मायाविद्ये विहायैवमुपाधी परजीवयो: ॥अखंडं सच्चिदानदं परं ब्रम्हौव लक्ष्यते ॥४८॥
होहो तोचि मी देवदत्त ॥ येणें विरुद्ध धर्म त्याग होत ॥अन्य देश काळ लक्षण न स्मरत ॥ त्याचेची स्मरे ॥१५९॥
तैसाचि मायोपाधी गत ॥ जीव ब्रम्हाता जैं स्मरत ॥तैं अखंड भेद रहित ॥ ब्रम्हाची असे ॥१६०॥
ऐसें भागत्याग लक्षणें ॥ माया ब्रम्हा ओळखणें ॥आप आपणातें जाणणें ॥ महावाक्यें ॥१६१॥
सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्यादवस्तुता ॥निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न द्दष्टं नच संभवि ॥४९॥
शंक - महावाक्यें काय लक्षावें ॥ सविकल्प कीं निर्विकल्पावें ॥परि हे दोन्हीही पक्ष आघवे ॥ व्यर्थ होती ॥१६२॥
सविकल्प म्हणावें जरी ॥ तरी ते अवस्तु निर्धारी ॥मिथ्यापणेंचि उजरी ॥ येई पुढें ॥१६३॥
नाम जात्यादि रहित ॥ निर्विकल्प सदा असत ॥तयासी कल्पावें हा व्याघात ॥ होऊं पहातो ॥१६४॥
लोकीं द्दष्ट झालेंची नाहीं ॥ जयाची उत्पत्तिही कोठें नाहीं ॥तयाशी कल्पावें हें पाहीं ॥ मिथ्या बोल ॥१६५॥
विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत ॥आद्ये व्याहतिरन्यत्रानवस्थात्माश्रयादय: ॥५०॥
समाधान - तूं जो विकल्प करशी ॥ तो निर्विकल्पीं का सविकल्पाशी ॥प्रथम व्याघात रूप तुजसी ॥ कळों आलें ॥१६६॥
द्वितियें सविकल्पीं विकल्प ॥ हेंही म्हणणें दिसें अल्प ॥येती बहुता परि दोष ॥ आत्माश्रयादि ॥१६७॥
“विकल्पनेन सह सविकल्प:” ॥ येथ प्रथमचि असे विकल्प ॥तया विकल्पावरी विकल्प ॥ कैसा करसी ॥१६८॥
येणें येणें प्रकारें ॥ दोष येतील सारे ॥म्हणोनी विकल्पाचे वारे ॥ येवो न द्यावे ॥१६९॥
इदं गुणक्रियाजातिद्रव्यसंबंध वस्तुषु ॥समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितीष्यताम् ॥५१॥
विकल्पतदभावाभ्यामसंसृष्टात्मवस्तुनि ॥विकल्पितत्त्वलक्ष्यत्वसंबंधाद्यास्तु कल्पिता: ॥५२॥
गुणक्रिया जाती द्रव्य संबंध ॥ हें वस्तुशी कल्पणे अबद्ध ॥वस्तु स्वत: असे सिद्ध ॥ जैशी तैशी ॥१७०॥
महावाक्यें हेंचि लक्षावें ॥ कीं वस्तु अस्पृक आहे स्वभावें ॥गुणादिक हें भावावें ॥ कल्पनावरुती ॥१७१॥
तार्किकें करती शंका ॥ परि त्या मनी घेऊंनका ॥श्रुति मातेच्या शब्दा वळखा ॥ घाला तुम्हीं ॥१७२॥
इत्थं वाक्यैस्तदर्थानुसंधानं श्रवणं भवेत् ॥युक्त्या संभावितावनुत्संधानं मननं तु तत् ॥५३॥
ताभ्यां निर्विचिकित्सेऽर्थें चेतस: स्थापितस्य यत् ॥एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते ॥५४॥
हेंचि करावें सतत श्रवण ॥ देउनी एकाग्र अंत:करण ॥तयाचें हो करावें मनन ॥ वरचे वरी ॥१७३॥
श्रवण मननाचे पाठी ॥ विचारें निदिध्यास धरावा पोटीं ॥तेणें साक्षात्कार प्रगटी ॥ आपोआप ॥१७४॥
घ्यातृध्याने परित्यज्य क्रमाद्धेयैकगोचरम् ॥निवातदीपवच्चित्तं समाधिरभिदीयते ॥५५॥
ध्येय ध्यान ध्याता ॥ त्रिपुटी रहित होता ॥समाधी सुखें तत्वता ॥ निश्चला होशी ॥१७५॥
जैसा निवांत असे दीप ॥ तैसा राहशी निष्कंप ॥हेंही बोलणें अल्प ॥ ऐसा होशी ॥१७६॥
वृत्तयस्तु तदानीमज्ञाता अप्यात्मगोचरा: ॥स्मरणादनुमीयंते व्युत्थितस्य समुत्थितान् ॥५६॥
शंक - ध्येयैककार वृत्ती ॥ कैशी सुखाची करी निश्चिती ॥ज्ञेयज्ञाता विरहीत स्थिती ॥ असे जेथ ॥१७७॥
स० - आत्मगोचरा वृत्ती ॥ समाधी कालीं अज्ञ जरि भासती ॥तरी उत्थित होतां स्मरती ॥ समाधी सुख ॥१७८॥
अनुभवाविण स्मरण ॥ हें लोकीं विपरीत असें जाण ॥म्हणोनी सुख निश्चयें करून ॥ अनुभवी ॥१७९॥
वृत्तीनामनवृत्तिस्तु प्रयत्नात्प्रथमादपि ॥अद्दष्टा सकृदभ्यास संस्कारसचिवाद्भवेत् ॥५७॥
यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा ॥भगवानिममेवार्थमर्जुनाय न्यरूपयत् ॥५८॥
शं० - असो समाधीकार वृत्ती ॥ पुन्हा उत्थित कैशी होती ॥प्रयत्नाचा अभाव जये स्थिती ॥ निरंतर ॥१८०॥
स० - पूर्व कर्म रूप संत्कारें ॥ पुन: पुन: वृत्ती उभारे ॥परि ती अभ्यासें न्यावी माधारे ॥ योगादिकीं ॥१८१॥
ऐसा निरंतर करितां अभ्यास ॥ न पडे उत्थानादिकांचा त्रास ॥आत्मैक्य पदीं समाधी विलास ॥ भोगी सुखें ॥१८२॥
मग निर्वात जैसा दीप ॥ तैशी राहे आपे आप ॥ऐसे बोलियला जगाचा बाप ॥ गीतेमाजी ॥१८३॥
हेंही नको अघवे ॥ स्वत: आपण अनुभवावें ॥मग शंका कैशी उद्भवे ॥ तें पाहों आम्हीं ॥१८४॥
अनादाविह संसारे संचिता: कर्मकोटय: ॥अनेन विलयं यांति शुद्धो धर्मों विवर्धते ॥५९॥
ऐशी होतां आत्मस्थिती ॥ सकल कर्में विलया जाती ॥पुण्या पुण्य संचितादि जाती ॥ दग्ध होती ॥१८५॥
मग स्वधर्म वादूं लागे ॥ वृत्ती आनंदची झाली अंगें ॥तें सुख कोण सांगे ॥ अवर्णनीय ॥१८६॥
धर्ममेघमिमं प्राहु: समाधिं योगवित्तमा: ॥वर्षत्येष यतो धर्मामृतधारा: सहस्रश: ॥६०॥
तयाचे एके क्षणीं ॥ होते सहस्रश: क्रतुश्रेणी ॥अमृतधारा वर्षोनी ॥ धर्म राणीवा देई ॥१८७॥
म्हणोनि धर्ममेघ तया प्रती ॥ स्पष्ट बोलिली वचनोक्ती ॥योगवितमाची स्थिती ॥ ऐसी होय ॥१८८॥
तो जेउता पाहे ॥ तेथें ऋद्धि सिद्धी उभी राहे ॥तो राहे ते ठाये ॥ कैलास भुवन ॥१८९॥
अमुना वासनाजाले नि:शेषं प्रविलापिते ॥समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्मसंचये ॥६१॥
आणिक ही येणें साधे ॥ अहंकर्तृत्वाभिमान न बाधे ॥ज्ञाना ज्ञानादि द्वंद्वें ॥ जाती लया ॥१९०॥
पुण्य पाप कर्में उन्मळूनी ॥ मूळाविद्यासहित नाश होऊनी ॥आपण राहे सहजासनी ॥ सहजी सहज ॥१९१॥
वाक्यमप्रतिबद्धं सत्प्राकपरोक्षावभासिते ॥करामलकवद्बोधमपरोक्षं प्रसूयते ॥६२॥
महावाक्यें जागा झाला ॥ तेथ कैचा स्वप्न घोंटाळा ॥वाझ पुत्राचा सोहळा ॥ जगा मानी ॥१९२॥
आपण आमुक ऐसी सय ॥ हाचि मायेचा प्रत्यय ॥हेही झाले जेथें लय ॥ आपेआप ॥१९३॥
तयाचें करावया वर्णन ॥ वेद झाला असे निर्माण ॥नेती नेती शब्दें करून ॥ भांबावला ॥१९४॥
परोक्षं ब्रम्हा विज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥बुद्धीपूर्वकृतं पापं कृत्स्नं दहति वन्हिवत् ॥६३॥
अपरोक्षात्मविज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥संसारकारणाज्ञानतमसश्वंडभास्कर: ॥६४॥
ऐसें श्री सद्नुरुवाक्यासरसें ॥ जयाचें अंत:करण विलसे ॥तया स्मरतांचि निरासे ॥ सकल पाप ॥१९५॥
पाप म्हणजे पतन ॥ स्वात्मरूपाचें विस्मरण ॥कर्पूर अग्रीवत दहन ॥ दग्धझालें ॥१९६॥
तमरूपीं जो संसार ॥ तया लागीं हा चंडभास्कर ॥ऐसा बोध प्रखर ॥ झाला जया ॥१९७॥
इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मन: समाधाय ॥विगलितसंसृतिबंध: प्राप्नोति परं पदं नरो नचिरात् ॥६५॥
ऐसा हा तत्व विवेक ॥ जे नरवाचिती बुद्धिपूर्वक ॥तया संसाराचें दु:ख ॥ न शिवे कोणकाळीं ॥१९८॥
विचारकरुनी पहाती ॥ तया होय आत्मस्थिती ॥अद्वैत साम्राज्य भोगिती ॥ निरंतर ॥१९९॥
सतगुरु कृपाबळें ॥ मी टाकूं गेलों पाउलें ॥निर्बळचि परि बळ आलें ॥ तडियवरी ॥२००॥
बाळपणीं जडदेह मृदु ॥ पडितां सांवरीतसे गोविंदु ॥बाप लागलासे छंदु ॥ कैसा नकळे ॥२०१॥
पोराचिये आवडी ॥ आपणही घाली पायघडी ॥दोन्ही करांतें वोढी ॥ आपुलेकडे ॥२०२॥
करुनि माघारी द्दष्टी ॥ नवलचाली चाले उफराटी ॥होतां न होतां शेवट मिठी ॥ घालुनी चुंबे ॥२०३॥
आत्मा वै पुत्रनामासि ॥ हें साच करावया श्रुतीशीं ॥खेळे आप आपणाशीं ॥ कांहीही मिर्षे ॥२०४॥
ऐसें हें स्वप्नीय खेळ ॥ मज प्रबोधीं आठवलें प्रांजळ ॥तरी स्वात्मान्य विटाळ ॥ शिवूं न शके ॥२०५॥
इतिश्री हरिगीते हरिहरराय विरचिते तत्त्वविवेकं नाम प्रथम प्रकरणं समाप्तमस्तु - ॐ तत् सत् ॥॥ शांति: शांति: शांति: ॥समाप्त.

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
एवं
— अशा प्रकारे
माया
— भासमान करणारी शक्ती
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ठायीं
— ठिकाणी
जैं
— जेव्हा
तैं
— तेव्हा
वरी
— वर; शिवाय
जेथ
— जिथे
स्वधर्म
— आपल्या स्थानाला उचित असलेले कर्तव्य
म्हणोनि
— म्हणून
तेथ
— तिथे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

हेही वाचा

स्रोत — TransLiteral Foundations

पडताळणी बाकी — श्लोक जसा स्रोतावर आहे तसा घेतला आहे; स्रोतावरील आधुनिक भाषांतर घेतलेले नाही. चूक कळवा.