जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥तातडिया मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥नेदाविया काई म्हसी वांचों लोक । पुरा सकिळक सिळाधारीं ॥३॥धाक नाहीं माझा गोविळयां पोरां । सकिळक मारा ह्मणे मेघां ॥४॥ह्मणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥५॥मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥६॥अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका ह्मणे तइप देव दुरी ॥७॥
देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान॥१॥नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥जैसा भाव तैसा जविळ त्या दुरि । तुका ह्मणे हरि देतो घेतो ॥५॥
तो या साच भावें न कळे चि इंद्रा । ह्मणउनि धारा घाली सिळा ॥१॥घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥४॥लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥यांचिया विचारें होणार ते काई । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥७॥
वेडावलीं काय करावें या काळीं । ह्मणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥शिरी धरूं गोवद्र्धन उचलूनि । ह्मणे तुह्मी कोणी भिऊं नका ॥२॥नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥अशंकित चित्तें न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें ह्मणती चला ॥४॥चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥५॥
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥७॥
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । किळकाळासि वास पाहों नेदी ।१॥पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळांचिये ॥३॥शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आह्मी ऐसे ॥५॥ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मीं आतां हात सोडा ॥६॥हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥भार आह्मांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥१२॥
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥लटिका चि आह्मीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥आलें कळों तुका ह्मणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं॥१॥लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥२॥भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवद्र्धना राखियेलें ॥७॥राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥९॥सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥११॥
लोकां कळों आला देव आह्मांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त जालें त्यांचें ॥४॥त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥७॥
समाधान त्यांचीं इंिद्रयें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥५॥
जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥कवतुकासाठीं भक्त देहावरि । आणिताहे हरि बोलावया॥३॥यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१०॥संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका ह्मणे यासि नाश नाहीं ॥११॥
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाई वत्स पशु जीवां ॥४॥वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥५॥
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा ह्मणे देव ॥१॥देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका ह्मणे ॥५॥
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥१॥वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥वत्सें गाई पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका ह्मणे ॥७॥
नाचतां देखिलीं गाई वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥विचारितां उचलिला गोवद्र्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रह्मयासि ॥६॥सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥समागमें गाई वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥संग जाला मायबापां लोकपाळां । आिंळगिती गळा कंठाकंठ ॥९॥करिते हे जाले स्तुती सकिळक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला॥११॥पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥२॥वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या॥३॥सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा ह्मणे घरा ॥४॥राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकिळकां ॥२॥सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥त्यां जाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकिळक नारायणें ॥६॥नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे॥१॥हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥आहे तुका ह्मणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार॥३॥
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा॥१॥परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥८॥पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥९॥जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका ह्मणे राज्य सैन्य जन ॥१०॥
सैन्य जन हांसे राया जालें काई । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भिक्त नाहीं ॥२॥नाहीं याचा त्याचा भाव एकविध । ह्मणउनि छंद वेगळाले ॥३॥वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका ह्मणे ॥५॥
द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक॥१॥देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥३॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले॥३॥झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥५॥रूप पालटलें गुण नाम याति । तुका ह्मणे भूतीं देव जाला ॥६॥
जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥३॥देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥भेदें तुका ह्मणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥५॥
नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचा॥२॥अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकिळक एक राज्य ॥५॥राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका ह्मणे करें शस्त्र धरी ॥७॥
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका ह्मणे ॥५॥
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत ह्मणों यासि ॥२॥यासि कळावया एक भिक्तभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका ह्मणे वाचा नातुडे तो ॥७॥
तो बोले कोमळ निष्ठ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥तळमळ नाहीं तुका ह्मणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥५॥
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥७॥
चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥चुकवुनि जन्म देईल आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥५॥
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥१॥दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकिळक मथुरेचे ॥४॥मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिलें बहुतकाळ तेथें ॥६॥तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका ह्मणे ॥७॥
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥नारायणें दिलीं अक्षई मंदिरें । अभंग साचारें सकळांसि॥८॥सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥रचिलें तें देवें न मोडे कवणा । बिळयांचा राणा नारायण ॥१०॥बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका ह्मणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥१॥ॠिद्धसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपित्त सर्वां घरीं ॥२॥घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्त्तन नरनारी ॥३॥नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥५॥
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥पाळी वेदआज्ञा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें॥३॥अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥अभिमान नाहीं तुका ह्मणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥
धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म िक्षती उतरलें॥१॥उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी॥२॥दिनानाथिब्रदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका ह्मणे आटी सोसियेली ॥५॥
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका ह्मणे ऐसी िब्रदावळी॥३॥
िब्रदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥निज सुख तुका ह्मणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईवत्सां ॥१॥गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥भिक्त नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका ह्मणे आह्मांसहित गेला ॥५॥
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥३॥जातों येतों आह्मी देवाचे सांगांतें । तुका ह्मणे गात देवनाम ॥४॥
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भिक्त नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥बोलावया पुरे वाचा माझी कायी। तुका ह्मणे पायीं ठाव द्यावा ॥९॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥३॥दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥भिक्त नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसिद्धि ॥६॥सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥७॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.