तुझे ह्मणों आह्मां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥तुका ह्मणे परीस । सांपडल्या उपवास॥३॥
कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रह्मज्ञानाविण चाड ॥१॥दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥तुका ह्मणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥३॥
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥१॥तेथें आह्मीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥२॥तुका ह्मणे आह्मी किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥३॥
डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥तुका ह्मणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥
भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रह्मचारी ॥१॥ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥वळीवळी थोरथोर। मोडोनियां केले चूर ॥२॥वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥तुका ह्मणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥
अतित्याई देतां जीव । नये कींव देवासि ॥१॥थोडएासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥त्यासि परलोकीं नाहीं मुक्ति । अधोगति चुकेना ॥२॥तुका ह्मणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥३॥
तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा॥१॥हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥तुका ह्मणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत॥४॥
तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भिक्त घडेल देवा ॥५॥ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥तुका ह्मणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥
नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥रामकृष्ण ह्मणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥तुका ह्मणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥छाटी भगवी मानसीं ।व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥२॥तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ १ ॥डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥न वर्जितां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥२॥तुका ह्मणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥३॥
आपटा संवदड रानचारा । दसयाचा होय तुरा॥१॥तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥मृत्तिकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥२॥तुका ह्मणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥३॥
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल॥१॥नाम वाचे श्रवण कीर्त्ति । पाउलें चित्तीं समान ॥ध्रु.॥कीर्त्तनाचा समारंभ । निदपभ सर्वदा ॥२॥तुका ह्मणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनामीं ॥३॥
आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥२॥येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥ऐसें आह्मां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥२॥तुका ह्मणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥३॥
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥तुझ्या नामबळें तरले पतित । ह्मणोनि माझें चित्त तुझे पायीं ॥२॥तुका ह्मणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥
उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥१॥युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥२॥तुका ह्मणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥३॥
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥
तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥हें चिं देइप विठाबाई । पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण॥४॥पुंडलीक पाहोन दृष्टी । हषॉ नाचों वाळवंटीं ॥५॥तुका ह्मणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥
बाईल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥१॥सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥फजित केलें जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं॥४॥गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥५॥तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अभक्त ते ॥ध्रु.॥केवडएामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भिक्तहीन ॥२॥तुका ह्मणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥
शिव शिक्त आणि सूर्य गणपति । एक चि ह्मणती विष्णूस ही ॥१॥हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥अन्य देवतांसि देव ह्मणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥धन्य ते वैष्णव भजती केशव । सात्विक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥तुका ह्मणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥
तुह्मी साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुह्मां घरीं ॥१॥तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुह्मांपुढें काय बोलों ॥२॥तुह्मी अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥मेरूचा पाठार अवघी ते िक्षति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥तैशी तुह्मी निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥कृपानिधि तुह्मीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥अज्ञान मी वेडें ह्मणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुह्मां ॥१२॥बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥तुका ह्मणे तुह्मी संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निद।व ॥१॥देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे॥३॥दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥
जयजय ह्मणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥१॥आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥आपण ह्मणे आणिकां हातीं । यज्ञादिकीं नये ते गति ॥२॥आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि ह्मणतां राम ॥३॥मंत्र जपा हा चि सार। वर्णा याती जयजयकार ॥४॥ह्मणतां राम ह्मणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥५॥
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईल काळा फोडों डोई ॥१॥तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईल तें दुरि शृंगारिलें ॥२॥तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥
होइप आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तइप सकळ चिंता ॥ध्रु.॥अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥तुका ह्मणे जालें एक चि वचन । केलिया कीर्त्तन आराणुक ॥३॥
लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण ।उद्यांचें आजि च मरण । आणोनि ह्मणे हरि भोक्ता ॥१॥नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं ।लाभ विचारोनि पोटीं। होइप सेवटीं जागृत ॥ध्रु.॥आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा ।पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास॥२॥ह्मणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा ।होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥क्षण या देहाच्या अंतीं। जड होउनि राहेल माती ।परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥जंव या नाहीं पातल्या विपित्त । आयुष्य भविष्य आहे हातीं ।लाभ विचारोनि गुंती । तुका ह्मणे अंतीं सर्व पिसुनें॥५॥
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥१॥काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥२॥तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥३॥
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥जातीचें मी हीन न कळे भजन । ह्मणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥तुका ह्मणे मज ह्मणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥शिवास नामाचा आधार । केला किळकाळ किंकर ॥२॥मरण जालें काशीपुरी। तेथें नाम चि उद्धरी ॥३॥तुका ह्मणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥
अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥२॥संतांची जो निंदा करी मुखीं जप। खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥
नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥ह्मणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥करिती विठोबाची भिक्त । दयाधर्म नाहीं चित्तीं ॥२॥तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥अंगीं नाहीं क्षमा दया । ह्मणती भेट पंढरीराया ॥४॥नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदिक्षणा॥५॥ऐसें नव्हे भिक्तवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साहए होय ॥१॥उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साहए करी ॥ध्रु.॥शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साहए करी ॥२॥असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥तुका ह्मणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा॥४॥लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥
अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥१॥माझिया गा चित्ता करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाईच्या पति कृपावंता ॥२॥हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा॥३॥तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शिक्त नाहीं ॥४॥न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥५॥तुका ह्मणे हरि करावें या काय । भजनासि साहए होइप बापा ॥६॥
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥माझें दुःख जरी ऐकशील सई । ह्मातारा तो बाई खोकतसे ॥२॥खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥पूर्व सुकृताचा हा चि बाई ठेवा । तुका ह्मणे देवा काय बोल ॥६॥
स्वामीच्या सामथ्यॉ । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥देव ज्यासी साहए । तेणें केलें सर्व होय ॥२॥तुका ह्मणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥
नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । ह्मणा हरीहरी सर्वभावें ॥१॥नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥गजेंद्राची िस्थति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥तुका ह्मणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकिळलें॥४॥
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आह्मां दिनानाथें रिक्षयेलें ॥१॥यम नेतां तुह्मां रक्षील हें कोण । तुह्मां धन्यधन्य कोण ह्मणती ॥ध्रु.॥संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम िस्थति सांगितली ॥२॥तें चि धरोनि चित्तीं तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥
देवासी पैं भांडों एकचित्त करूनि । आह्मांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥आह्मां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आह्मां देशवटी देवो सुखें ॥२॥देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥चित्तीं धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥तुका ह्मणे सर्व देवाची नष्टाई । आह्मी सुखें डुलतसों ॥५॥
भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥येथें पंिक्तभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥तुका ह्मणे लाभ घ्यावा। मुद्दल भावा जतन ॥३॥
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥१॥धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥२॥तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥३॥गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥४॥तुका ह्मणे हातीं । न धरितां गमाविती ॥५॥
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥३॥तुका ह्मणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग॥१॥हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥गोब्राह्मणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका ह्मणे ॥३॥
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय ह्मुण ॥ध्रु.॥खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥हातींचा हिरोनि घातला पोटासी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥३॥ओंव्या प्रारंभ २३१ अभंग ३
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया॥१॥याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुदास तुका ॥२॥काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया॥५॥या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा॥२२॥माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥चेतवला अिग्न तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥मना धीर करीं दृढ चित्तां धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥त्याचा भार माथां चालवी आपुला। जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥होती आवडत जीवाचे ताइत। त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौयासी ॥३८॥शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥जेणें अिग्नमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता॥४३॥तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं॥४४॥नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण॥४७॥विनवितां दिवस बहुत लागती । ह्मणउनि चित्तीं देव धरा ॥४८॥धरा पाय तुह्मी संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥५०॥त्याची च उिच्छष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥व्यासें सांगितलें भिक्त हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्तें उत्तरें रुसिया ॥५४॥यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥तान्हेलें भुकेलें ह्मणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥मरणाचे अंतीं राम ह्मणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्तीं सर्वकाळ ॥६४॥सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥नागवलों ह्मणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं। जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । ह्मणउनि तुटी देवासवें ॥७५॥सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकमाअ ॥७८॥षडकमाअ हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी॥८१॥युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या॥८३॥पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रह्मादिकां॥८४॥काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय॥८५॥होय हा सगुण निर्गुण आवडी । भिक्तिप्रय गोडी फेडावया ॥८६॥या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें॥८७॥तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळीं ॥८८॥सत्त्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक॥८९॥सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणीं॥९१॥सत्त्वरजतमा आपण नासती । करितां हे भिक्त विठोबाची ॥९२॥चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आह्मां ॥९५॥आह्मांसी विश्वास याचिया नामाचा । ह्मणउनि वाचा घोष करूं॥९६॥करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी॥९८॥सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका ह्मणे कांहीं न लगे आंता॥१००॥
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥२॥कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥३॥आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥११॥चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप॥६॥आपेंआप बेडएा तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥११॥
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥घरोघरीं जाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥लोकां गोकुळींच्या जालें ब्रह्मज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका ह्मणे आस त्यजूनियां ॥१३॥
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥खेळविला जिंहीं अंतर्बाहएसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भिक्तभावें ॥२॥फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या। बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी। उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥मानाचा कंटाळा तुका ह्मणे त्यासी। धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥जैसा तैसा आहे अंतर्बाहएात्कारीं । ह्मणउनि चोरी नसंपडे ॥५॥नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका ह्मणें भावें चाड एका ॥११॥
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं ह्मणवोनि ॥२॥नसंपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें॥३॥तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥दुष्ट अभक्त जे निष्ठ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥७॥जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥यमधर्म ह्मणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुह्मां कान डोळे मुख ॥१०॥कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्तीं सांगितलें ॥११॥सांगितलें संतीं तुह्मां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥१२॥दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समर्पिलें ॥२॥समथॉ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे॥३॥रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाई चारी ॥४॥गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाई पशु ॥६॥सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥परी याचि तुह्मी आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वर्म दावी सोपें ॥१३॥
दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें। उिच्छष्ट तें खावें धणीवरी ॥७॥वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका ह्मणे संगें भक्तांचिया ॥१२॥
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥क्रिया करी तुह्मां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥गोपिकांसी ह्मणे वैकुंठींचा पति । तुह्मीं माझ्या चित्तीं सर्वभावें ॥५॥भाव जैसा माझ्याठायीं तुह्मी धरा । तैसा चि मी खरा तुह्मांलागीं ॥६॥तुह्मां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुह्मां ग्वाही ॥७॥ग्वाही तुह्मां आह्मां असे नारायण। आपली च आण वाहातसे ॥८॥सत्य बोले देव भिक्तभाव जैसा। अनुभवें रसा आणूनियां ॥९॥यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥जैसा मनोरथ जये चित्तीं काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्तीं ॥१५॥चित्तें ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकिळक विसरोनि ॥१७॥निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा॥१८॥कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव ह्मणुनि तया चुंबन देती ॥१९॥देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका ह्मणे वाचा काया मनें ॥२१॥
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥७॥
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥३॥पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥५॥बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥११॥आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥१३॥लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥१४॥भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥१५॥डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग॥३॥व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौळियांचें ॥६॥गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥७॥
नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि॥४॥उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी॥५॥यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥वाढला तो सेवाभिक्तचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥कृष्णासी सकळ गाई घोडे ह्मैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव॥९॥जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी॥१०॥क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥१२॥त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण॥१३॥कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका ह्मणे ॥१७॥
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥१॥ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥२॥वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥५॥लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥८॥न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥१०॥बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥१२॥बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥१३॥
तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥४॥विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥९॥चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥१४॥
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥२॥जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥व्याही भाई हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥८॥भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥१३॥यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥१६॥तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥१७॥काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी॥१८॥मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती॥१९॥धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती॥२०॥नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥२१॥बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥२२॥मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥२३॥वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती॥२५॥न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥२६॥एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥२७॥तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला॥२८॥
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे ह्मणे तीस पोट धालें ॥४॥पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका ह्मणे करी सर्व काज ॥९॥
जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥३॥जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रह्मादिकीं ॥५॥ब्रह्मांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला ॥७॥लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥८॥तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥भिक्तकाजें देवें केला अवतार। पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥१३॥स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥गौळिये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥१८॥पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥मुख माझें काय जो मी वणूप पार । मग नमस्कार घाली ब्रह्मा ॥२०॥ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥देव चि अवगा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥दुजा भाव तुका ह्मणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥कळला हा देव तया साच खरा । गाई वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥३॥ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका ह्मणे सेवे संचित हें ॥५॥
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥गाई दवडुनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरि बांधा त्या ही ॥३॥त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडएांतुनि ॥४॥पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥७॥
तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥७॥
तयांसवें करी काला दहींभात । सिदोया अनंत मेळवुनी ॥१॥मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस। झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥मांदीं मेळवुनी धणी दिली आह्मां। तुका ह्मणे जमा केल्या गाई ॥१४॥
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥३॥तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका ह्मणे जुगें घडी जाय ॥५॥
जाय फाकोनियां निवडितां गाई । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे॥२॥गोविंदे वेधिलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥गोपाळ गुणाचा ह्मणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली॥३॥दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भिक्तचिया सुखा गोडावला ॥४॥लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥देवी ह्मैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥हरि तुका ह्मणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥
भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥देव गिळुनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥२॥दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रह्मांड देखे माजी ॥७॥माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥मायबाप ह्मणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥मीं च ह्मणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥१४॥ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥१७॥
नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि॥३॥बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्तीं ॥४॥चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकिळक देव देखे ॥७॥देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥काया वाचा मनें पूजावे वैष्णव । ह्मणउनि भाव धरूनियां ॥९॥यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥संधि सारूनियां पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलांसी ॥१३॥कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥आजि आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥न वंचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥गोपाळांसि ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥६॥करी तुका ह्मणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥
काय आह्मां चाळविसी वायांविण । ह्मणसी दुरून देखिलासि ॥१॥लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका ह्मणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥२॥वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥७॥
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥
काय आतां यासि ह्मणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥५॥
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥४॥जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥५॥सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥६॥मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥एका समतुकें अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥११॥पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥१२॥धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥१५॥मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥सांभाळिलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें॥३०॥
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥जळांत पाहातां हाडति या दृष्टि । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥५॥कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥त्यासि नारायण ह्मणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥वरि जातां वरि पाहाती गोपाळ । ह्मणति सकळ आह्मी नेणों ॥१०॥नेणों ह्मणती हें करितोसि काई। आह्मां तुझी आई देइल सिव्या ॥११॥आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥२॥सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥३॥बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बया बरें ॥४॥बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥५॥
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥७॥
आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका ह्मणे देवा कारण हें ॥७॥
ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥त्याचें आइकोन निष्ठ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरीं ॥४॥वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥मोठएानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधूदकारें ॥१०॥कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥चिंतावला चित्तीं तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥जाला सावकाश झेंप घाली वरी। तंव ह्मणे हरि मुष्टिघातें ॥१४॥तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा। हरावया जैसा जीव जाला ॥१५॥आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥यांस तुका ह्मणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥यथेष्ट भिक्षलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥५॥आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥विसरु न पडे संवगडएा गाई । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥११॥
अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि॥२॥गडियांसि ह्मणे वैकुंठनायक । या रे सकिळक मजपाशीं ॥३॥मजपाशीं तुह्मां भय काय करी । जविळ या दुरी जाऊं नका ॥४॥कानीं आइकिले गोविंदाचे बोल । ह्मणती नवल चला पाहों ॥५॥पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आिंळगिले ॥६॥आल्या गाई वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश। तुका ह्मणे आस निरसली ॥१२॥
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥
जननी हे ह्मणे आहा काय जालें । शरीर रिक्षलें काय काजें ॥१॥काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका ह्मणे ॥५॥
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका ह्मणे ॥१३॥
नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आिंळगिलीं ॥१॥हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रह्म ॥३॥ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण॥६॥नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥सेवाॠणें तुका ह्मणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥लोक गेले कामा गाईपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥आशेचे बांधले तुका ह्मणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥
जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥हिरोनि घेतल्या कावडी सकळा । ह्मणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥नव्हे तें चि करी न भे किळकाळा । तुका ह्मणे लीळा खेळे देव ॥५॥
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव ह्मणे तयां भेऊं नका ॥१॥नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका ह्मणे वरि भारवाही ॥५॥
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि िस्थर ॥३॥बुद्धि िस्थर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका ह्मणे तेणें दुःखी होती ॥५॥
दुःखी होती लोभें करावें तें काई । उडतील गाई म्हैसी आतां ॥१॥आणीकही कांहीं होईल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥क्रोध देवावरि धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥५॥
भाग त्या सुखाचे वांकडएां बोबडएां । आपलिया गडएां भाविकांसि ॥१॥भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥४॥कवणाचें चाले तुका ह्मणे बळ । जयासी गोपाळ साहए जाला ॥५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.