मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ४३३०–४४३२

Tukaram Gatha, part 43

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ४३ — अभंग ४३३० ते ४४३२.

पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥१॥कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारीं एकपणें ॥२॥तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥३॥
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृत्ति थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥३॥दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥४॥
अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥१॥ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥२॥तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥३॥
दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिली देवरायें ॥१॥तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥२॥कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥३॥धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रिक्षली दुष्काळांत ॥४॥दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीर्त्ति मोठी ॥५॥मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण । फिर्याद लिहून पाठविली ॥६॥अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥७ ॥दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥८॥विकते धारणे सवाईचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥९॥दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥१०॥विठो पाडेवार भक्तां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥११॥जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो ह्मणे स्थळ मंगळवेढें ॥१२॥दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥१३॥देखोनियां राजा संतोष पावला । ह्मणे व्यर्थ त्याला तलब केली॥१४॥काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो ह्मणे बेगारी विठा कां जी॥१५॥पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप ह्मणती ते॥१६॥पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥१७॥छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि॥१८॥वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा॥१९॥दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा ह्मणे जालें कवतुक ॥२०॥काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥२१॥काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा॥२२॥कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला॥२३॥पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥२४॥सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥२५॥दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो ह्मणे आपुलें कर्म नव्हे ॥२६॥आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी॥२७॥निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥२८॥दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥२९॥तुका ह्मणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥३०॥
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईन पवित्र पांडुरंग ॥१॥दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥२॥चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंगा ॥४॥साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥५॥सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥६॥आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥८॥दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥९॥
धरोनियां फरश करी । भक्तजनाचीं विघ्नें वारी॥१॥ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥२॥उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥३॥नागयज्ञोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥४॥भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥५॥
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥१॥ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥नाम प्र†हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥२॥नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥३॥नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥४॥नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥५॥नाम जाणे शुकमूर्ति । जाणे राजा परिक्षिती ॥६॥नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥७॥
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥३॥विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥४॥
किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥१॥नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥२॥तुका ह्मणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥३॥वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥हात पाय राहिलें कान। नेत्रा पाझर हाले मान ॥३॥अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥५॥लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥तुका ह्मणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥जिव्हाळ्याचा काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥२॥तुका ह्मणे ऐसी नोव†याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥३॥
न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥१॥चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥२॥तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥३॥
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥२॥तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥
विधवेसि एक सुत । अहर्निशीं तेथें चित्त ॥१॥तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥२॥तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति॥३॥
ह्मणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥शाळिग्रामासि ह्मणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥भावी सद्गु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥तुका ह्मणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥
स्वगाअचे अमर इिच्छताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आह्मां ॥१॥नारायणनामें होऊं जिवनमुक्त । किर्त्तनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥२॥यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥तुका ह्मणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि॥४॥
व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥१॥पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥२॥तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे॥३॥
पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥१॥ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥२॥उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥३॥गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥४॥खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥५॥
आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाई आमुचि माता ॥ध्रु.॥भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी॥१॥तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥३॥
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं॥३॥
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥२॥तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा॥३॥
जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार॥१॥निर्गुण होता तो सगुणासि आला । भिक्तसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥२॥सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥३॥मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥४॥तुका ह्मणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥५॥
जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥१॥नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥२॥तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥३॥
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाण ॥ध्रु.॥प्रेतदेह गौरविलें। तैसें विटंबवाणें जालें ॥२॥तुका ह्मणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धिचेष्टा॥३॥
पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥१॥रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥२॥देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥३॥तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥४॥
ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥१॥लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा॥ध्रु.॥सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥२॥केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥३॥नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥४॥तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥५॥
नरदेह वांयां जाय । सेवीं सद्गूचे पाय ॥१॥सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पूजीं देव ॥ध्रु.॥थोराचिये वाटे। जातां भवशोक आटे ॥२॥प्रल्हादातें तारी । तुका ह्मणे तो कंठीं धरीं ॥३॥
संचित तैशी बुद्धि उपजे मनामधीं । सांगितलें सिद्धि नव जाय ॥१॥ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥२॥घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥३॥
कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥१॥तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥२॥तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥३॥
धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥१॥चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥१॥तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥२॥तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥३॥
सोडियेल्या गाई नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥१॥सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाई वनामाजी ॥ध्रु.॥गाईगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥२ ॥काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥३॥गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥४॥तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥५॥तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥६॥
ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृप्ति जाली ॥१॥मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । विस्मित विधाता देखोनियां ॥ध्रु.॥दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । विस्मित मानसीं सुरवर ॥२॥देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥३॥तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥४॥
आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥१॥श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥२॥अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥३॥तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥४॥
एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥१॥एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥हाता हात हाणे लाही । पळतां घाई चुकविती ॥२॥तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥३॥
चला वळूं गाई । दूर अंतरल्या भाई ॥१॥खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥गाई हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥२॥तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥३॥
नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥१॥हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥२॥तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥३॥
हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥२॥तुका ह्मणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥३॥
जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥१॥गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥२॥तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥३॥
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥१॥तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥२॥कागदीं लिहिली नांवाची साकर। चाटितां मधुर केवीं लागे ॥३॥तुका ह्मणे जळो जळो त्याचें ज्ञान। यमपुरी कोण दंड साहे ॥४॥
भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खिळिलें त्यासी॥१॥समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥२॥तुका ह्मणे पुंडलीका । भिक्तबळें तूं चि निका ॥३॥
आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥१॥यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥२॥तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥३॥
भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥१॥मन बुद्धि जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥२॥तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥३॥
कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥१॥ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥२॥तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥३॥
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥२॥तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥
सांवळें सुंदर पाहे दृष्टिभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥१॥मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाईसवें सदा ॥ध्रु.॥मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥२॥वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा॥३॥
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी॥१॥कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥२॥मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें॥३॥मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥
पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥१॥पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।२॥मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥३॥तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥४॥
उदार कृपाळ पतितपावन । िब्रदें नारायणा जाती वांयां ॥१॥वर्णिलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥२॥कोण ऐसा भक्त लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥३॥तुका ह्मणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥४॥
ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥१॥पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥२॥तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥३॥
कां रे पुंडएा मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥१॥विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥भक्ती देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥२॥तुका ह्मणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥३॥
शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥१॥काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥२॥तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा॥३॥
माझें परिसावें गा†हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥१॥माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥सबाहएअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥२॥तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा॥३॥
गुरुचिया मुखें होइल ब्रह्मज्ञान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥१॥वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥२॥तुका ह्मणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥३॥
देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥१॥एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥२॥पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥३॥तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥४॥
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥३॥तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥
कीर्त्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाई धन विटाळ तो ॥१॥हरिभक्ताचि माता हे हरिगुणकीर्त्ति । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईना जननीची ॥२॥तुका ह्मणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥३॥
पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥१॥आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥२॥परतोनि सोई धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥३॥घातलीसे मिठी नाही भिक्तभाव । उदार पंढरिराव तुका ह्मणे ॥४॥
येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥१॥येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥२॥तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाई । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥३॥
कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥१॥शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाई॥ध्रु.॥क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥२॥तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावईन॥३॥
आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत ह्मणवावें ॥१॥पूवाअ भक्त जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेक्षिले तुह्मीं कोणी ॥ध्रु.॥माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥२॥करावी ह्मणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येईन मी ॥३॥तरी माझे हाती देइप मनबुद्धि । जरि दयानिधि येशील तूं ॥४॥तुका ह्मणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥५॥
माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा॥ध्रु.॥साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥साहए होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥कृपा करोनि देइप दया क्षमा शांती । तेणें तुझी भिक्त लाभईल ॥५॥माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥तुका ह्मणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥
अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥१॥तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥२॥तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥३॥
आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥१॥पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेक्षिलें न सोडीं मी ॥ध्रु.॥कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥२॥तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥३॥
बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥
पंचाग्निसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥१॥सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥२॥वाटतें सेवटीं जालासि निष्ठ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥३॥
तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥१॥बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥२॥अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥३॥अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥४॥ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥५॥तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥६॥
काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥१॥नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥२॥तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥३॥
नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥पूवाअ जाले भक्त असंख्य विरक्त । काम क्रोध अहंते निर्दाळिलें ॥२॥ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥३॥कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या िब्रदासी राखावया ॥४॥तुका ह्मणे एक बाळक अज्ञातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥५॥नाटाचे २
कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ।कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान ।नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध॥ध्रु.॥नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ।मज नाहीं संतांचा आधार । नाहीं िस्थर बुद्धि माझी ॥२॥न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ।न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी ।तुझीं िब्रदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥४॥
भीमातीरवासी । तेथें निश्चयेंसी काशी ॥१॥मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी ह्मणे तुका ॥३॥
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाईची पावेल ॥१॥श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥२॥तुका ह्मणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥३॥
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥१॥काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥२॥तुका ह्मणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥३॥
हें चि मागणें विठाबाई । पायीं ठेवूनियां डोई ॥१॥शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥तुका ह्मणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥१॥तुजलागीं दानें तुजलागीं तीथॉ । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥सकळ चित्तवृत्ति दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥२॥तुका ह्मणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥३॥
पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥तुका ह्मणे भेटी देइप नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥
पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥नारद प्र†हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्तीं ॥१॥तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥२॥आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया॥३॥तुका ह्मणे देइप चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥४॥
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥तुका ह्मणे आह्मी पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुह्मांस फुकाचें हें ॥ध्रु.॥संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥तुका ह्मणे आह्मीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥१॥सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया॥ध्रु.॥करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा॥२॥जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥३॥तुका ह्मणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥४॥
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥तुका ह्मणे देइप दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रह्मादिकां ॥४॥
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आह्मां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥वाटे चित्तीं काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥तुका ह्मणे माझे पुरवीं मनोरथ । येई गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥१॥नामाचा प्रताप िब्रदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥२॥माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥३॥तुका ह्मणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥४॥
रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥ २ ॥तुका ह्मणे रामनामीं । कृतकृत्य जालों आह्मीं ॥३॥
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥तुका ह्मणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥
भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥अकरालक्ष योनि किडएांमाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये ॥२॥तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥तुका ह्मणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून॥१॥कोण करील माझें साहे । चित्तीं विचारूनि पाहें ॥ध्रु.॥तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥तुका ह्मणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज॥१॥आहें अमंगळ दुर्बळ । होइप दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥तुका ह्मणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥२॥तुका ह्मणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥३॥
अगा पंढरीच्या राया । वेगीं येइप तूं सावया ॥१॥दीनबंधु तुझें नाम । देइप आपुलें आह्मां प्रेम ॥ध्रु.॥जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥२॥तुका ह्मणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥३॥
विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥नामापाशीं चारी मुक्ति। पहा हृदयीं प्रतीति ॥२॥तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥तुका ह्मणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥न लभे व्रततीर्थदानीं। तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥तुका ह्मणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥
गव्हांच्या घुग†या । नाचण्यांच्या पु†या । ब†या त्या चि ब†या । पाधाणी त्या पाधाणी ॥१॥काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥२॥तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥३॥
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥१ ॥ह्मणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥लोभिक तें लोभा लावी। बांधल्या गोवी वांचूनि ॥२॥तुका ह्मणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥३॥
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥५॥
अवघ्या कोल्हएांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥२॥दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

सकळ
— सर्व
ऐसें
— असे
तुज
— तुला
तैसें
— तसे
तया
— त्याला, त्या
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
ठायीं
— ठिकाणी
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
घडे
— घडते, शक्य होते
अगा
— अरे (संबोधन)
नोहे
— नाही, होत नाही
अवधारीं
— ऐक, लक्ष दे
परिसा
— ऐका
देखे
— पाहतो
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तेवीं
— त्याप्रमाणे
केवीं
— कसे
जैसें
— जसे
वरी
— वर; शिवाय
देखोनि
— पाहून
माया
— भासमान करणारी शक्ती

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा