सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥१॥येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास॥३॥
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥३॥
ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥१॥न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥चोरटएासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥२॥तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान॥३॥
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण॥३॥
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो॥१॥सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥२॥बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥४॥मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईल न कळे काय ॥ध्रु.॥न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥भल्या बुया मारी । होतां कोणी न निवारी ॥४॥अविचाया हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥तुका ह्मणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥
गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥१॥मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥२॥तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥३॥
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥२॥तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे॥३॥
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥२॥तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥३॥
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा॥१॥कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥३॥
होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥१॥संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस॥ध्रु.॥नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥२॥तुका ह्मणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥३॥आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥२॥तुका ह्मणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी॥१॥अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥२॥तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥१॥तो ही येथें कामा नये । नर्का जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥तुका ह्मणे दांभिक तो । नर्का जातो स्वइच्छा ॥३॥
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥३॥
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥१॥पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे॥२॥धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥३॥तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥४॥
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥१॥खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥मृगजळा पोही घालुनि सज्ञाना । तापलिया जना निववावें ॥३॥तुका ह्मणे मिथ्या देहेंिद्रयकर्म । ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ॥४॥
तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस॥१॥मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥२॥सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥३॥
काय मागें आह्मी गंुतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥१॥कीर्ति चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आह्मां ॥ध्रु.॥घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आह्मांपासीं नाहीं तैसा ॥२॥तातडी तयांनीं केली विटंबणा । आह्मां नारायणा काय उणें ॥३॥नाहीं मुक्तिचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥४॥तुका ह्मणे काय मानेल तें आतां । तूं घेइप अनंता सर्व माझें ॥५॥
जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥१॥केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥२॥तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी॥३॥
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्का द्वारीं॥१॥ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥३॥
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥१॥ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा॥ध्रु.॥साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥२॥बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥३॥आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥४॥तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥५॥
आमुचें दंडवत पायांवरि डोई । व्हावें उतराई ठेवूनियां॥१॥कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥२॥तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥३॥
भाग्यवंत आह्मी विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥३॥वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥तुका ह्मणे भक्तजनाची माउली । करील साउली विठ्ठल आह्मां ॥५॥
तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥१॥सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥२॥उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडाळितां ॥३॥तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥४॥
संतजना माझी यावया करुणा । ह्मणउनी दीन हीन जालों ॥१॥नेणें योग युक्ती नाहीं ज्ञान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥भाव भक्ती नेणें तप अनुष्ठान । करितों किर्त्तन विठ्ठलाचें ॥२॥ब्रह्मज्ञान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥३॥तुका ह्मणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥४॥
ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥१॥काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे ज्ञान खरें भिक्तरस ॥२॥गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥३॥तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥४॥तुका ह्मणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक ह्मणोनियां ॥५॥
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें॥ध्रु.॥तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥३॥
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥तुका ह्मणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥१॥बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥३॥
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥१॥मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥२॥तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥३॥
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥अधमाचें चित्त दुश्चित्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥२॥गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥३॥पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥५॥
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥२॥तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥३॥
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥२॥तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥परि मूर्खाचें चित्त बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥२॥अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥३॥अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥४॥पहा ब्रह्मानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥५॥
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाईच्या पति पांडुरंगा ॥१॥चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥३॥
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥
जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥१॥काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुह्मी डोळे झांकियेले ॥ध्रु.॥राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥२॥तुका ह्मणे मागें आपंगिलें भक्तां । माझिया संचिता कृपा नये ॥३॥
पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥१॥स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥भक्ताचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥२॥ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥३॥तुका ह्मणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥४॥
प्रगट व्हावें हे अज्ञानवासना । माझी नारायणा हीनबुद्धि ॥१॥खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसिद्ध हा ॥ध्रु.॥ज्ञानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्तीं धरोनियां ॥२॥परि तूं कृपाळ होसी देवराणा । िब्रदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥३॥उतावीळ बहु भक्तांचिया काजा । होसी केशीराजा तुका ह्मणे ॥४॥
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दुहावला ॥१॥ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥२॥हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥३॥तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥४॥
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥१॥तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥२॥तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥३॥तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥४॥
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥२॥अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
तुज केलिया नव्हे ऐसें काई । डोंगराची राई क्षणमात्रें॥१॥मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥२॥दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥३॥तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥४॥
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥१॥अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥२॥स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥३॥तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥४॥
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी॥१॥जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥३॥तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥४॥४२७४. पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥१॥सोइयाची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥२॥श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥३॥नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥४॥हातें मोया शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥५॥सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥६॥हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥७॥पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥८॥देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥९॥गाईला देखोनी बदबदां मारी । घोडएाची चाकरी गोड लागे ॥१०॥ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥११॥तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१२॥
आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥१॥मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥२॥तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें॥३॥
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥६॥चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥४२७७. नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥१॥सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥२॥तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥३॥
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥१॥विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥२॥ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥३॥तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥४॥
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥२॥ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥३॥तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥४॥
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥१॥काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृष्टि जाली ॥ध्रु.॥आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥१॥चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥२॥नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥३॥तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥४॥
षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥१॥त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी निश्चिती फावलें तें ॥ध्रु.॥तैसें दुष्टकर्म जालें हरिभक्ता । त्यागिली ममता विषयासिक्त ॥२॥इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥३॥तुका ह्मणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥४॥
बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं॥१॥आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥२॥तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रह्म सनातन अंगसंगें ॥२॥अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥धन्य त्याची शिक्त भक्तीची हे ख्याति । तुका ह्मणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीर्ति महाद्वारीं वानूं तुझी ॥१॥पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥२॥तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥३॥
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु॥१॥अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥३॥
कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा॥१॥काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥२॥तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥३॥
तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा॥१॥आतां न धरावें दुरी । बोल येईल ब्रीदावरी ॥ध्रु.॥पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥२॥तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥३॥
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥न जाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥३॥तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥१॥त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी॥२॥आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे॥३॥केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥६॥
मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥१॥आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥२॥तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥३॥
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥त्याचा होईन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकळ्या पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें॥ध्रु.॥चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥२॥व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥३॥तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥४॥
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥१॥तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा॥ध्रु.॥तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥२॥विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥३॥तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥४॥
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥१॥तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥२॥तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥३॥
भिक्तॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे॥१॥प्रेम व्याज देइप हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्त्तन ॥२॥तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाईत ॥३॥तुका ह्मणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥४॥
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥मिराबाईसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥४॥
हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सत्त्व माझें ॥२॥तुका ह्मणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्तीं येऊं द्यावी ॥३॥
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥१॥कावळ्याचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥२॥तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥३॥
मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥१॥वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥२॥नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥३॥
धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं॥१॥धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥२॥एके हातीं धरली दाढी । घे कुहाडी दुजे हातीं ॥३॥येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥४॥तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥५॥
निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥१॥निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥२॥तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद॥१॥जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण॥२॥निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥
नाना मतांतरें शब्दाची वित्पित्त । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥यज्ञ याग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥तुका ह्मणे होय उपरति चित्ता । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥
नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥हर्षामषॉ अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥न सरे ते भिक्त विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥२॥तुका ह्मणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥२॥तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण॥१॥ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥ब्रह्मीं ब्रह्मरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥
काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥काय बा करीसी दंभलौकिकातें। हित नाहीं मातें तुका ह्मणे ॥४॥
स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥१॥चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥३॥
आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥१॥पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥२॥नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥३॥
सद्गूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥१॥उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं॥२॥नमस्कारीं त्याला सद्गुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥३॥
सद्गूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥१॥हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥२॥बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥३॥
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥१॥देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥२॥बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥३॥
सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥२॥तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥३॥
चला आळंदीला जाऊं । ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । मुखीं ह्मणतां चुकती फेर ॥२॥तुह्मां जन्म नाहीं एक । तुका ह्मणे माझी भाक ॥३॥
चरणीं नमन सद्गूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥१॥गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काळ्या नाथिला महाबळी ॥ध्रु.॥ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनार्दन ॥२॥तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥३॥
सद्गूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि॥१॥ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥२॥तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥३॥
डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना॥१॥परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥२॥परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते॥३॥ब्राह्मणें ब्राह्मणा सद्गू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥४॥तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥५॥
संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥१॥गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥२॥श्वपच अंत्यज भिक्तस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥३॥
कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा॥१॥चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥२॥तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥३॥ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥४॥
लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वज्ञा हे भ्रांति बाधूं नेणे ॥१॥सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काई ॥ध्रु.॥तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥२॥भोग भोग्य भोक्ता नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥३॥तुका ब्रह्मानंदीं आहे तुकब्रह्म । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥४॥
न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥१॥खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले॥ध्रु.॥भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥२॥तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥३॥
अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे॥१॥ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥२॥तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥३॥पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनार्दन ॥४॥तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आई तो चि विठो ॥५॥
ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥१॥पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥३॥तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥
किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास॥१॥तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥२॥तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥३॥
कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥१॥रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥४॥
उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥१॥पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥२॥तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥३॥
पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥१॥या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥२॥केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥३॥दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥४॥दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥५॥तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥६॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.