मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ४१२५–४२२६

Tukaram Gatha, part 41

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ४१ — अभंग ४१२५ ते ४२२६.

जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥१॥हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥२॥सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥३॥तराळ राळ बोंबें उतराई। राखा आपुलिया भाई ॥४॥हरिच्या नामीं घालूं जागा । तुका ह्मणे हुशार गा ॥५॥
संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली॥१॥गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥तुका ह्मणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥१॥हें चि एक तुह्मां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥तुका ह्मणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार॥३॥
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धि पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥३॥सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका ह्मणे संतमहंतपाय ॥४॥
हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥१॥ह्मणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥आस करूनियां राहेन अंगणीं । उचिष्टाची धणी घ्यावयासी ॥२॥चालतां ते मागाअ चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका ह्मणे लाता घेइन अंगीं ॥४॥
पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रह्म सावळें॥ध्रु.॥आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥२॥तुका ह्मणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥
ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥१॥पातकाची रासी ह्मणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥२॥एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥३॥तुका ह्मणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥४॥
आतां आह्मां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥१॥धीर दिला आह्मां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥२॥तुका ह्मणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥३॥
भिक्त आह्मी केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥१॥सुख आह्मां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥तुका ह्मणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
शास्त्रज्ञ हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥१॥क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥तोळाभर सोनें रतिभार राई । मेळविल्या पाहीं नास होतो ॥२॥हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥३॥तुका ह्मणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥४॥
इंिद्रयांसी नेम नाहीं । मुखीं राम ह्मणोनि काई ॥१॥जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥तुका ह्मणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥
न लगे देवा तुझें आह्मांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥१॥देइप तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें॥३॥तुका ह्मणे हरी देइप तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥४॥
पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥१॥मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥तुका ह्मणे सर्व अंतर्बाहए आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥
बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥१॥लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥२॥म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका ह्मणे ॥३॥
मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥२॥मुक्तिवरील भिक्त जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥मग देवभक्त जाला । तुका तुकीं उतरला ॥४॥
प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥१॥रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥२॥तुका ह्मणे अंतकाळीं । आह्मां सोडवीं तात्काळीं ॥३॥
तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी॥१॥तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥२॥तुका ह्मणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥३॥
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । ह्मणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥२॥तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥१॥शरण निरंतर ह्मण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥२॥नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥३॥तुका ह्मणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥४॥
सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥१॥माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ मन केलें॥ध्रु.॥गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी॥२॥प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥३॥अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥४॥तुका ह्मणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥५॥
आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥यावें जावें आह्मीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥२॥काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥तुका ह्मणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥४॥
आतां आह्मां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥१॥ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥३॥
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥जेथें चंद्रभागातिरीं । आह्मी नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥२॥तुका ह्मणे आह्मी बळी । जीव दिधला पायां तळीं ॥३॥
आह्मी नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥तुज शरण आलियाचें काय हें चि फळ। विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥तुझें पावनपण न चले आह्मांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥२॥आह्मी दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥तुका ह्मणे तुह्मी खादली हो रडी । आह्मी धरली सेंडी नाम तुझें ॥४॥
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आह्मी ॥१॥आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आह्मी पातकी ही ॥२॥याचें पावनपण सोडवा चि तुह्मी । पतितपावन आह्मी आहों खरें ॥३॥आह्मी तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥तुका ह्मणे आह्मी मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥
घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥२॥जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥३॥तुका ह्मणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥४॥
वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी॥१॥आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥२॥तुका ह्मणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥३॥
हातपाय मिळोनि मेळा । चला ह्मणती पाहों डोळां॥१॥देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥२॥डोळ्याचा डोळा पाहों गेला । तुका ह्मणे तो पाहों ठेला ॥३॥
मुखें संति इंिद्रयें जती । आणिक नेणे भाव भक्ती॥१॥देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥२॥चित्ताचें आसन। तुका करितो कीर्त्तन ॥३॥
धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन िस्थरावलें तुझ्या पायीं ॥२॥तुका ह्मणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥
गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥१॥तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥काय तुजपासीं सांगों हें गा†हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥२॥कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥३॥तुका ह्मणे आह्मी मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥४॥
जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठाचे हात वाहाती कैसे ॥२॥तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥३॥
मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥१॥पाहा जनाई सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥२॥तुका ह्मणे विठोबासी । ठाव देइप चरणापासीं ॥३॥
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥तुका ह्मणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुह्मांपें ॥१॥आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥कैसी तुह्मां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥२॥आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥३॥
चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥१॥आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥२॥तुका ह्मणे चाली । पुढें वाट खोळंबली॥३॥
किती एका दिसीं । बुद्धि जाली होती ऐसी ॥१॥कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥अवलंबुनी भीक। लाज सांडिली लौकिक ॥२॥तुका ह्मणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥३॥
आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥१॥मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥२॥तुका ह्मणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥३॥
परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥३॥
पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥१॥दोष जाले बिळवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥मेघ पडों भीती । पिकें सांडियेली िक्षती ॥२॥तुका ह्मणे कांहीं । वेदा वीर्य शिक्त नाहीं॥३॥
ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥१॥कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥३॥तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधीं बैसे॥४॥
देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा॥१॥वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥२॥भूत न बोले निरुतें। कांहीं केल्या न सुटे तें ॥३॥जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥४॥तुका ह्मणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें॥५॥
हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥ह्मणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥तुका ह्मणे अंगीं । शक्ती देइप नाचें रंगीं ॥३॥
लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥१॥कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥२॥तुका ह्मणे तैसें मतवादीयांचें जिणें। दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥
काय आह्मीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥गजा नाडएा सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥२॥तुका ह्मणे गणिका नष्ट। माझे कष्ट त्याहूनि ॥३॥
भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आह्मांसी फळला॥१॥याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाईम्हसी ॥२॥स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥३॥तुका ह्मणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥४॥
गुणा आला ईटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥तुका ह्मणे समध्यान । हे चरण सकुमार ॥३॥
रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥तुका ह्मणे देवा । देइप कीर्त्तनाचा हेवा ॥३॥
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥नाम आदित्याचें झाड। त्याचा न पडे उजड ॥२॥सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥तुका ह्मणे देवा । िब्रद सोडूनियां ठेवा ॥४॥
जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥१॥पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥२॥चंद्रभागे स्नान । तुका ह्मणे हें चि दान ॥३॥
यासाटीं करितों निष्ठ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥१॥ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥२॥तुका ह्मणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥१॥सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित्त ॥२॥आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥३॥लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें॥४॥तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥५॥
देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला॥१॥भेऊं नको देइप भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥तुझ्या जीवींचें मी जाणें । ह्मणसी मुक्ती आह्मां देणें ॥२॥तुका ह्मणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥३॥
यमधर्म आणिक ब्रह्मादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥१॥करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे॥ध्रु.॥सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥२॥चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदिक्षणा ॥३॥तुका ह्मणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥४॥
विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भिक्तभावें केला देव ॠणी ॥१॥देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥२॥तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥३॥अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥४॥बंधनाचा फांसा आह्मीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥५॥पद्मनाभा नाभिकमळीं ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक ह्मणविसी ॥६॥ह्मणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥७॥पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥८॥जवळीक जाली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥९॥मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥१०॥धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥११॥
बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥१॥पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥दिनानाथ िब्रद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥२॥उतरीं सत्वर पैलथडी नेइप । पूर्णसुख देइप पायांपाशीं॥३॥पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥४॥केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें॥५॥नाम तुझें गोड स्वभक्ता आवडे । भक्तांलागीं कडे खांदा घेसी॥६॥घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥७॥विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥८॥पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥९॥
एक वेळे तरी जाईन माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी॥१॥चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥२॥तुका ह्मणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥३॥
सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें॥१॥संत शब्द उपदेशी । मग तूं हो ह्मणशी ॥२॥तुका ह्मणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥३॥
उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥१॥दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥तेथें असे भागीरथी। येथें जाणा भीमरथी ॥२॥वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥३॥मनकर्णिका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥४॥वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥५॥धुंडिराज दंडपाणी। उभा गरुड कर जोडुनी ॥६॥गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥७॥तेथें असती गयावळ । येथें गाई आणि गोपाळ॥८॥शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्राप्ति ॥९॥संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥१०॥
फटएाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥१॥कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥२॥तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥३॥
दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥१॥काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥२॥तुका ह्मणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥३॥
अहो कृपावंता । हाइप बुद्धीचा ये दाता ॥१॥जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥तुका ह्मणे देवा । माझें अंतर वसवा ॥३॥
निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥१॥नेघे मोल धुतो फुका। पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥२॥तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका ह्मणे न्हाणी ते ॥३॥
प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥१॥नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥२॥स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां॥३॥चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥४॥नये त्याचा संग धरूं ह्मणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥५॥
अथॉविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥१॥घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥२॥तुका ह्मणे ज्याला अथाअ आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥३॥
बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतां चि चिंधी मन धांवे ॥१॥व्यभिचा†यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥२॥सांडुनियां देइप संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥२३॥तुका ह्मणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥४॥
मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥१॥आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥सद्गुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥२॥आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥३॥तुका ह्मणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥४॥
स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥१॥जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥२॥तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥१॥दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥शां नये सहस्रा नये। लक्षकोडीलागीं नये ॥२॥तुका ह्मणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥३॥
संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥१॥तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥२॥तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥१॥तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥२॥तुका ह्मणे तैसे भक्त । तयांसी जन हें निंदित ॥३॥
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥सून ह्मणे बहुत निकें । तुह्मी यात्रेसि जावें सुखें ॥८॥सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे॥११॥अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥१२॥मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥तुका ह्मणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥
एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥१॥निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥२॥तुका ह्मणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥३॥
मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं॥१॥ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला॥३॥
संसार करिती मोठएा महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥१॥पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥२॥विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । ह्मणोनि लागले जन्ममृत्यु ॥३॥तुका ह्मणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥४॥
गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥१॥त्यासी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥२॥तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥३॥
भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥२॥कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥३॥तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥४॥
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईच्या माथां तिडिक उठे ॥२॥आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥१॥आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥२॥तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥३॥
हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥१॥आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें॥ध्रु॥तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥२॥जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥३॥काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥४॥तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥५॥
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥१॥तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥२॥कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥३॥तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥४॥
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥१॥नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥२॥तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥३॥
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥१॥मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥२॥तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥३॥
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥१॥मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥२॥तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥३॥
धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥२॥तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥३॥
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥१॥अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥२॥तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वर्णिती सकळ नारायणा ॥३॥
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥१॥अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥२॥तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥३॥
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥१॥सकुमार मूर्ति श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥२॥चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥३॥तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥४॥
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ २॥तुका ह्मणे अवघा वोणवा गीळिला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥३॥
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥१॥नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥२॥वोणव्याच्या रागें गिळिशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥३॥
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥२॥कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥३॥तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥४॥
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईल पोळिली नारायणा ॥ध्रु.॥बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥२॥घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥३॥तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥४॥
एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥१॥वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥२॥तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥३॥
एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥१॥गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥२॥तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥३॥
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥१॥ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥२॥चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥३॥
ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥१॥दुर्जनां चांडाळां करीं निर्दाळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥भक्त माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥२॥पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥३॥माझे भक्त मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥४॥कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका ह्मणे डोळे झांकियेले ॥५॥
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥७॥वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥
कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥३॥वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥४॥ताईत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥६॥नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥७॥तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥८॥
उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हि†या अंगीं ॥१॥एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥
बारावषॉ बाळपण । तें ही वेचलें अज्ञानें ॥१॥ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥बाकी उरलीं आठएाशीं। तीस वेचलीं कामासी ॥२॥बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥३॥बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥४॥तुका ह्मणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥५॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
ठायीं
— ठिकाणी
तया
— त्याला, त्या
तैसें
— तसे
तुज
— तुला
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
वरी
— वर; शिवाय
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
तुवां
— तू (करणरूप)
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
जंव
— जोपर्यंत
काई
— काय
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
येर
— दुसरा, इतर
घडे
— घडते, शक्य होते
माया
— भासमान करणारी शक्ती
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
स्वधर्म
— आपल्या स्थानाला उचित असलेले कर्तव्य

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा