मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ४०२२–४१२४

Tukaram Gatha, part 40

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ४० — अभंग ४०२२ ते ४१२४.

आह्मां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥तरी च हरिचेदास ह्मणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥२॥तुका ह्मणे देवा ऐसी यांची सेवा। द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥३॥
पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां॥ध्रु.॥अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥तुका ह्मणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥
कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥१॥अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥२॥तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥३॥
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ऐसे तंव तुह्मी नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥२॥तुका ह्मणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥३॥
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥२॥तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥३॥
तिळ एक अर्ध राई । सीतबुंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ह्मणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका ह्मणे तो येथें ॥३॥४०२८. विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥विठ्ठलविठ्ठल भावें ह्मणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥तुका ह्मणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥
भोळे भिक्तभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥१॥भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥२॥तुका ह्मणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥३॥
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड॥३॥
पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे॥१॥तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥
बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥१॥सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥२॥सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥३॥तुका जाला वाणी । चुकवुनि चौ†यासीच्या खाणी ॥४॥
काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना ।प्रार्थितां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी ।न दिसे कोणी आवरी। आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥न राहे एके ठायीं एकी घडी। चित्त तडतडा तोडी ।घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥२॥आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं ।तुका ह्मणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी॥३॥
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा॥१॥सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण॥४॥तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥५॥
पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आर्का वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥२॥तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥३॥
लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥तुका ह्मणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥
आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥१॥ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥२॥तुका ह्मणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥३॥
तुजविणं कांहीं । िस्थर राहे ऐसें नाहीं ॥१॥कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥२॥तुका ह्मणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥
खोंकरी आधन होय पाकसिद्धि । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥पालथे घागरी रिचवितां जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥३॥
नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण॥ध्रु.॥आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥३॥एकासी धड न बोले वाचा । एकासी ह्मणे मी तुझे बांदीचा ॥४॥तुका ह्मणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु॥५॥
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । ह्मणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥३॥तुका ह्मणे अहो देवा दिनानाथा। दरुषण आतां नको त्याचें ॥४॥
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरक्ती ॥२॥आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती जालों आह्मी मुक्त ॥३॥त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥४॥तुका ह्मणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें॥५॥
दोष करूनि आह्मी पतित सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥१॥आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि। सोडा झडकरी ब्रीद आतां ॥२॥तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥३॥देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आह्मीं देवा ॥४॥तुका ह्मणे आह्मीं उठलों दैन्यवरि। विचारा श्रीहरी तुह्मी आतां ॥५॥
राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥तुका ह्मणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥
देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥१॥तो हा गविळयाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥२॥ऐशा भक्तांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥३॥होय दासांचा जो दास । तुका ह्मणे विठ्ठलास॥४॥
आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें॥१॥केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥२॥तुका ह्मणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥३॥
जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥१॥पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥२॥स्नान चंद्रभागे । तुका ह्मणे हें चि मागें ॥३॥
कां गा कोणी न ह्मणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥तुका ह्मणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥
वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला॥१॥विठोबासी शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥३॥
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥२॥भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥३॥तुका ह्मणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥
धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥१॥कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥२॥तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥३॥
गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥१॥सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥२॥गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥३॥पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका ह्मणे मिठी घालूं चला ॥४॥
नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥२॥तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पु†या ॥३॥
जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥२॥तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । ह्मणउनि पुढती आणियेलें ॥३॥
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥तुका ह्मणे चित्त । होय आवडी मिश्रित॥३॥
ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया॥१॥तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥२॥तुका ह्मणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तिमय ॥३॥
कोणा ही केंडावें हा आह्मां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥१॥ह्मणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें॥२॥तुका ह्मणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥३॥
देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥तुका ह्मणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धि ठायीं वोळगती ॥१॥कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आह्मी ॥ध्रु.॥स्वर्गसुखें आह्मीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥२॥तुका ह्मणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥
माझें मागणें तें किती । दाता लक्ष्मीचा पति ॥१॥तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥२॥तुका ह्मणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥३॥
अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥३॥
जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥१॥आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥२॥तुका ह्मणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥३॥
सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥१॥न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥२॥तुका ह्मणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥३॥
काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥१॥काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥२॥काय जालें जरी केले म्यां सायास । ह्मणवितों दास भक्त तुझा ॥३॥तुका ह्मणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥४॥
जातां पंढरीच्या मागॉ । काय वणूप सुखा मग ॥१॥घडे लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होईजे मुक्त ॥२॥जो अलक्ष्य ब्रह्मादिकां । आला संनिध ह्मणे तुका ॥३॥
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिर्निशीं ॥२॥तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥
मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥माझी कथा करा ऐसें ह्मणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥२॥तुका ह्मणे सर्व सिद्धि तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रह्म होय ॥१॥कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥२॥तुका ह्मणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥३॥
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥१॥कां जी आह्मांवरी आणिकांची सत्ता । तुह्मासी असतां जविळक ॥२॥तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥३॥
रात्री दिवस आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाहए जग आणि मन ॥१॥जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥२॥तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥३॥
होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका ह्मणे देइप । धाक नाहीं जन्माचा ॥४॥
माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥१॥आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥काय कराविया आणिका या युक्ति । काय नव्हे भिक्त विठोबाची ॥२॥एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥३॥तुका ह्मणे माझी विठोबासी चिंता । भेईना सर्वथा न घडे तें ॥४॥
कासया व्हावें जीतांचि मुक्त । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥१॥वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥२॥सुख आह्मांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥३॥तुका ह्मणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥४॥
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग॥१॥कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती॥२॥तुका ह्मणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥३॥
लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥१॥करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥नाहीं चिंता रे आह्मांसी । तूं चि भार चालविसी ॥२॥आह्मी जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥३॥आह्मां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥४॥तुका ह्मणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥५॥
आह्मां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥१॥करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥२॥तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥३॥
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥घेईल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥२॥सांगितली सोय करुणासागरें । तुह्मां कांहो बरें न वाटतें ॥३॥तुका ह्मणे तेणें उपकार केला । भोळ्या भाविकाला तरावया ॥४॥
आह्मां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥आह्मांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥तुका ह्मणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुह्मी ॥४॥
तांबगी हें नाणें न चले ख†या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥तुका ह्मणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥२॥तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥३॥
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥२॥तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥
अज्ञानाची भिक्त इिच्छती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥२॥अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥३॥तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥४॥
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥२॥तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥३॥
आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥१॥फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥२॥तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥३॥
अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥१॥जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥२॥संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका ह्मणे ॥३॥
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥तुका ह्मणे आह्मीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥
पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥शांति क्षमा अंगीं विरिक्त सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥तुका ह्मणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुक्त लोक ॥३॥
देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥इंिद्रयांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥तुका ह्मणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥
नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥१॥न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥२॥करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका ह्मणे ॥३॥
आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥१॥जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥पोटा घातलें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥२॥मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥३॥तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं॥४॥
स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥१॥सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥तुका ह्मणे गाढव लेखा। जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
जगीं कीर्ति व्हावी । ह्मणोनी जालासी गोसावी॥१॥बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप ॥२॥तुका ह्मणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥२॥यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥
बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥१॥साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥
विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥१॥कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥२॥तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥१॥तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥२॥तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥३॥तुका ह्मणे संत सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥४॥
कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥१॥न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥२॥विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥३॥तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥४॥
आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥१॥आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बईल चुकला मोरा ॥२॥तुका ह्मणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥३॥
भावभिक्तवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥१॥अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें॥२॥तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥३॥देव जोडिलिया तया काय उणें । तुका ह्मणे मन धीट करा ॥४॥
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥१॥दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥तुका ह्मणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धि संतसंगीं॥३॥
रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥१॥निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥दास तुका ह्मणे विठ्ठलउदारें । अज्ञानअंधारें दूरी केलें ॥२॥
मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥तुका ह्मणे घालें पोट । मग बोटचांचणी॥३॥
माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥१॥ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥तुका ह्मणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥३॥
संतपाउलें साजिरीं । गंगा आली आह्मांवरी ॥१॥जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥स्वेतबंद वाराणसी। अवघीं तीथॉ तयापासीं ॥२॥तुका ह्मणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥३॥
न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥१॥कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥२॥तुका ह्मणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥३॥
करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥१॥मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥शांतिखड्ग हातीं। काळासी ते नागविती ॥२॥तुका ह्मणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥
तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रह्मांडीं ही हरी माईना ते ॥१॥मेरूची लेखणी सागराची शाई । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥अनंत अपार आपंगिले भक्त । माझें चि संचित ओडवेना ॥२॥तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥३॥
काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या॥१॥देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥२॥तुका ह्मणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥३॥
तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥काय येणें उणें आह्मां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥तुका ह्मणे आह्मी गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥
कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज॥१॥बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा िस्थर केला जीव ॥ध्रु.॥तेणें सुखें मन िस्थर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥२॥नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥३॥तुका ह्मणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥४॥
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥२॥संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥तुका ह्मणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आह्मी करूं ॥४॥
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥तुका ह्मणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥तुका ह्मणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥
तुझें वर्म आह्मां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥१॥अवघा चि नट वाउगा पसारा । चेईला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥ह्मणउनि देहबुद्धि नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥२॥सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥३॥तुका ह्मणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥४॥
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥तुका ह्मणें देह वाईलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥
संकोचतो जीव महत्त्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥तुमचे चरण पावविलों सेवा । ह्मणउनि हेवा हा चि करीं ॥२॥विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें॥३॥
देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥३॥
भिक्त ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥तुका ह्मणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥
समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥१॥मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥२॥दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका ह्मणे मात ऐसी आहे ॥३॥
भवाचिया संगें बहु च नाडिले । किळकाळें पाडिले तोंडघसीं ॥१॥तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥२॥तुका ह्मणे करीं सर्व ही तूं त्याग । अपाअ हें सर्वांग जगदीशीं ॥३॥
रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान॥१॥तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥तुका ह्मणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
घडे
— घडते, शक्य होते
तुज
— तुला
ठायीं
— ठिकाणी
सकळ
— सर्व
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
काई
— काय
देखोनि
— पाहून
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
कीजे
— केले जाते
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
देखे
— पाहतो
येर
— दुसरा, इतर
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
माया
— भासमान करणारी शक्ती
पुढती
— पुन्हा, पुढे
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
वैराग्य
— आसक्ती सुटणे
जैसें
— जसे
तैसें
— तसे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा