कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥३॥
कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥३॥
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभिक्त । व्यापार करिती संसाराचा ॥३॥
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥१॥परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥३॥
िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥३॥
न लगती मज शब्दब्रह्मज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां॥१॥ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥
तुझा ह्मणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥तुका ह्मणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥
जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर ॥३॥
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥तुका ह्मणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥२॥तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥तुका ह्मणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥३॥तुका ह्मणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥
माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥तुका ह्मणे अमृतसिद्धि । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥
तुझें अंगभूत । आह्मी जाणतों समस्त ॥१॥येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥तुका ह्मणे भेदा । करुनि करितों संवादा॥३॥
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥दंड लाहें केला । तुका ह्मणे जी विठ्ठला ॥३॥
माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥३॥
जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥१॥परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥तुझें नाम अमोलिक। नेणती हे ब्रह्मादिक ॥२॥ऐसें नाम तुझें खरें । तुका ह्मणे भासे पुरें॥३॥
सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥द्यावें तें चिं घ्यावें । ह्मणउनि घ्यावें जीवें ॥२॥तुका ह्मणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें॥१॥त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥
सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें॥१॥स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान॥१॥दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥जो स्मरे रामराम । तयासी ह्मणावें रिकामें ॥२॥जो तीर्थव्रत करी । तयासी ह्मणावें भिकारी ॥३॥तुका ह्मणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं॥४॥
या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी॥४॥तुका ह्मणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥
उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥येइल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥भिक्तप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना॥३॥यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥तुका ह्मणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥
माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून॥१॥कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥तुका ह्मणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥
भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा॥१॥सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥तुका ह्मणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥
जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥१॥तो एक नांनवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥२॥नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥३॥तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥४॥
जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥२॥तुका ह्मणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥
आह्मां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥१॥आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥३॥
मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥कैसें तुज लाजवावें । भक्त ह्मणोनियां भावें ॥२॥नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥तुका ह्मणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं॥५॥
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥तुका ह्मणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥३॥
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरडएावरि लोळे ॥२॥प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥तुका ह्मणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥
तरलों ह्मणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥तुका ह्मणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥३॥मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥४॥
सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥तुका ह्मणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ॥३॥
भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥१॥अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥रिद्धि सिद्धि ज्या कामारी। तुका ह्मणे ज्याचे घरीं ॥३॥
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥गोडी िप्रयापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल॥३॥
बाळ माते निष्ठ होये । परि तें स्नेह करीत आहे॥१॥तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आह्मां ॥ध्रु.॥नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे॥४॥नांवें घाली उडी । तुका ह्मणे प्राण काढी ॥५॥
हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां॥३॥अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥
किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥एका घाइप न करीं तुटी । न निघें दवासोई भेटी ॥ध्रु.॥सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥२॥सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥३॥
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥तुका ह्मणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥३॥
साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥दासा नव्हे कर्म दान। तन मन निश्चळ ॥२॥तुका ह्मणे आत्मनिष्ट । भागे चेष्ट मनाची॥३॥
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥
आह्मां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥तुह्मांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥२॥तुका ह्मणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥
अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी॥१॥नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥तुका ह्मणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥३॥
आह्मी हरिचे हरिचे । सुर किळकाळा यमाचे ॥१॥नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥आह्मी हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥२॥आह्मी हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥३॥तुका ह्मणे आह्मांवरी । सुदर्शन घरटी करी ॥४॥
देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥न घेइप माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥तुका ह्मणे घेइप विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥
पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥विष्णुदासां गति नाहीं तरावया । ह्मणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥
वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥लुटालुटा पंढरपूर। धरा रखुमाईचा वर ॥२॥तुका ह्मणे चला । घाव निशानी घातला॥३॥
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥सुदामा ब्राह्मण दरिद्रें पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥तुका ह्मणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥
निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥तैसा आह्मासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥
श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥तुका ह्मणे आह्मां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥
सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥तुका ह्मणे तुझ्या चरणांची पाखर । असतां किळकाळ पायां तळीं ॥३॥
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥तृण नाहीं तेथें पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥तुका ह्मणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥ब्रह्महत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥तुका ह्मणे नव्हे चोरीचा व्यापार । ह्मणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥४॥
कामांमध्यें काम । कांहीं ह्मणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका ह्मणे कर्म । जाळोनियां तरसी ॥३॥
तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥
कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥१॥काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुह्मी देवा ॥२॥तुका ह्मणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥३॥
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥तुका ह्मणे नारायणा। तुह्मां बहुत करुणा ॥६॥
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥वत्साचिये आसे। धेनु धांवेना गोरसें ॥२॥तुका ह्मणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥
भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥तुका ह्मणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥
तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥तुका ह्मणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप॥१॥जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥
धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या॥ध्रु.॥नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥भाविक हो येथें धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाति ॥३॥
अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥१॥अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका ह्मणे नये सवें कांहीं ॥३॥
संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥अवघीं च इंिद्रयें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥तुका ह्मणे सार हरिनामउच्चार । येहवी येरझार हरीविण ॥३॥
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे॥१॥आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥२॥तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥३॥
भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा॥ध्रु.॥सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें॥२॥सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥तुका ह्मणे भिक्तसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥४॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं॥३॥तुका ह्मणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥
हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देइप हें चि ॥२॥तुका ह्मणे आतां देइप संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना॥३॥
गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥२॥निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥
भाव धरिला चरणीं ह्मणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥धरिले निश्चळ न सोडीं ते पाय । तुका ह्मणे सोय करीं माझी ॥३॥
तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥तुका ह्मणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥
आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥१॥तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भक्तांची प्रीति तुह्मां ॥२॥परि आह्मांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥३॥तुका ह्मणें तैसें तुज काय उणें । देइप दरुषण चरणांचें ॥४॥
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां॥१॥जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥शरणागतां देव राखे। येरां वाखे विघ्नाचे ॥२॥तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी॥१॥सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥अनाथाचा नाथ देव। अनुभव सत्य हा ॥२॥तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ॥३॥
मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान॥१॥असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥२॥तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥३॥
कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥१॥सेटएा ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥पाप न लगे धुंडावें॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥२॥जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥३॥गाई ह्मसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥४॥तुका ह्मणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥५॥
तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥१॥वांटेकरी ह्मणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥२॥बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । ह्मणउनि करा विनोद हा ॥३॥आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥४॥न ह्मणसी लेंकी माउसी बहिणी । आह्मां केलें धणी पापाचें त्या ॥५॥बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥६॥तुका ह्मणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥७॥
मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥तुका ह्मणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥
आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥१॥सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥करावीं व्यसनें। दुरी येउनि नारायणें ॥२॥जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं॥३॥ह्मणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥४॥तुका ह्मणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥५॥
झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥२॥तुका ह्मणे ठावें । ऐसें जालें अनुभवें॥३॥
पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥१॥भेईना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी॥ध्रु.॥नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥२॥तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥३॥
आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव॥१॥कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥दुजेपण जालें वाव। त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥२॥तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥३॥
िस्त्रया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥१॥ह्मणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥२॥आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥३॥देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला॥४॥तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥५॥
जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥१॥कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥तुका ह्मणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥
ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥१॥डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥२॥तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥३॥
तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥१॥आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥२॥श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥३॥चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥४॥ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥५॥ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥६॥तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥७॥
त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयतासी जातां॥१॥माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥
देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें ।वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥१॥नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी ।लागल्या लागें त्यागें सांडूनि। लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें ।हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥२॥आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें ।पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥३॥तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं ।आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥४॥
भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंिद्रयांचा लाग । आह्मांवरूनि चुकला ॥१॥करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥२॥तुका ह्मणे ये आवडी । आह्मीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥३॥
तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥१॥कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥२॥चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥तुका ह्मणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं िस्थर राहें ॥४॥
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥तुका ह्मणे जालों बळी । आह्मी निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥३॥
न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥१॥आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥देईन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥२॥तुका ह्मणे देवा । बहु आवडसी जीवा ॥३॥
कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥२॥तुका ह्मणे इंिद्रयांसी । ये चि रसीं रंगवूं ॥३॥
नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥१॥नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥२॥ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥३॥जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥४॥सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.