मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ३८१९–३९१९

Tukaram Gatha, part 38

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ३८ — अभंग ३८१९ ते ३९१९.

आतां धरितों पदरीं । तुज मज करीन सरी ॥१॥जालों जीवासी उदार । उभा ठाकलों समोर ॥२॥तुका विनवीतसे संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥तुका ह्मणे तुझा नाहीं अंतपार । ह्मणोनि विचार पडिला मज ॥३॥
पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥२॥तुका ह्मणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥३॥
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥तुका ह्मणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोव†या सांगाती ॥२॥तुका ह्मणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥लोभ मोह माया आह्मां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥तुका ह्मणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥
त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥एक चि मागणें देइप तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥बापा विठ्ठलराया हें चि देइप दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥आवडीसारखें मागितलें जरी । तुका ह्मणे करीं समाधान ॥४॥
सुगरणीबाई थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥२॥कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥३॥रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥४॥तुका ह्मणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥५॥
बाप माझा दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥२॥तुका ह्मणे भेटावया । सदा उभारिल्या बाहएा ॥३॥
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥तुका ह्मणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥३॥
कां रे पुंडएा मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥युगें जालीं अठ्ठावीस । अजुनी न ह्मणसी बैस ॥२॥भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥तुका ह्मणे पुंडलिका । तूं चि बिळया एक निका ॥४॥
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥तुका ह्मणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतों ॥२॥तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥३॥
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥२॥तुका ह्मणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग किळकाळा ॥ध्रु.॥स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥विचारितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आणीक नाहीं ॥३॥तुका ह्मणे चित्त रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥
ब्रह्मज्ञान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज॥१॥पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥२॥तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज॥३॥
मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडीं हें ॥१॥कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥२॥तुका ह्मणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥३॥
नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥१॥अंधळ्याचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥तुका ह्मणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥३॥
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी कऴिवलवाणें ॥ध्रु.॥नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥तुका ह्मणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥
होईल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥तुह्मांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥तुका ह्मणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा॥३॥
काय तुझी ऐसी वेचते गांठोळी । मांहे टाळाटाळी करीतसां ॥१॥चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरि सांगा निवडूनि ॥ध्रु.॥कोण तुह्मां सुख असे या कवतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मी ॥२॥तुका ह्मणे काय जालासी निर्गुण । आह्मां येथें कोण सोडवील ॥३॥
देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥१॥रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥२॥तुका ह्मणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥३॥
नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥नाहीं आणूनियां समर्पिलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥तुका ह्मणे आह्मीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥३॥
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥तुका ह्मणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥मन िस्थर माझें जालेंसे निश्चळ । वारिलीं सकळ आशापाश ॥२॥जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥तुका ह्मणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥
होऊं शब्दस्पर्श नये माझा तुह्मां । विप्रवृंदा तुह्मां ब्राह्मणांसी॥१॥ह्मणोनियां तुह्मां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका ह्मणे ॥३॥
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥विचारितां नाहीं दुजा बिळवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥३॥ह्मणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥तुका ह्मणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥२॥तुका ह्मणे बरे धाकटएाचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥
आह्मां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥तेणें माझें चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥२॥तुका ह्मणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होतो कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥इंिद्रयांचे आह्मी पांगिलों अंकित । त्यांच्यासंगें चित्त रंगलें तें ॥२॥एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥तुका ह्मणे जरी मोकिळसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाटीं ॥१॥तें मी तुझें नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं॥२॥वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥तुका ह्मणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥घेइप उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥तुका ह्मणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥सिद्ध महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥तुका ह्मणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥३॥
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज िस्थति ॥ध्रु.॥कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥२॥तुका ह्मणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥
धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले धन्य कर ॥३॥धन्य तुका ह्मणे आह्मांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥
बरवी हे वेळ सांपडली संधि । साहए जाली बुद्धि संचितासी ॥१॥येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥२॥तुका ह्मणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥उकरडएावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥गाईचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥तुका ह्मणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा॥२॥तुका ह्मणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
वांझेनें दाविलें ग†हवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥२॥कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥तुका ह्मणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥४॥
तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥१॥लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥२॥तुका ह्मणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥३॥
मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥१॥राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भक्तकाजा ॥२॥सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥तुका ह्मणे त्यासी गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥तैसी हरिभिक्त सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥तुका ह्मणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥२॥तुका ह्मणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥तुका ह्मणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥३॥
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥१॥उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकिळली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥तुका ह्मणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥३॥
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥तुका ह्मणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥३॥
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पिक्षराज ॥ध्रु.॥उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥तुका ह्मणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठ अतिवादी॥१॥अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप॥ध्रु.॥संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥तुका ह्मणे हित उचित अनुचित । मज लागे नित आचरावें ॥३॥
विठ्ठलावांचोनि ब्रह्म जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥२॥विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥३॥तुका ह्मणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥१॥धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥सकळां चरणीं गिळत माझा जीव । तुका ह्मणे भाव एकविध ॥३॥
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥१॥प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा॥ध्रु.॥जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये॥२॥तुका ह्मणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥
झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥वल्कलें नेसुनि ठुंगा गुंडाळुनी । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाटीं ॥२॥सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका ह्मणे त्याचा पांग फिटे ॥४॥
भिक्तभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥तुका ह्मणे आतां होई तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥१॥अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥तुका ह्मणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥तुका ह्मणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥
नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥३॥तुका ह्मणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
जेजे आळी केली तेते गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेले ॥ध्रु.॥अभ्यास तो नाहीं स्वप्नीं ही दुश्चिता । प्रत्यक्ष कैंचा चि तो ॥२॥आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी जालें ॥३॥तुका ह्मणे आतां नाहीं भरवसा । मोकलिसी ऐसा वाटतोसी ॥४॥
पूवाअहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥२॥तुका ह्मणे आह्मांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥
दर्दुराचें पिलुं ह्मणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥१॥कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥आज्ञा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥२॥तुका ह्मणे तुझे ऐसे हे पवाडे । वर्णितां निवाडे सुख वाटे ॥३॥
करुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी॥ध्रु.॥कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥तुका ह्मणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥१॥प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥तुका ह्मणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥धन्य तुज कृपासिंधु ह्मणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥तुका ह्मणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥निष्ठ अथवा होइप तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥आपुलें वचन राहावें सांभाळून । तुह्मां आह्मां जाण पडिपाडु ॥३॥ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईल तयाकडे ॥४॥तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥
आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥२॥जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका ह्मणे ॥३॥
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥आपुलें ह्मणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥तुका ह्मणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा॥१॥पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें॥२॥पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका ह्मणे ॥५॥
अभयदान मज देइप गा उदारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥१॥देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांही नेणें दुजें ॥ध्रु.॥सेवा भिक्त भाव नेणें मी पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥२॥अवघा निरोपिला तुज देहभाव । आतां मज पाव पांडुरंगा ॥३॥तुका ह्मणे तुजें नाम दिनानाथ । तें मज उचित करीं आतां ॥४॥
लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाई जननिये ॥१॥पतितपावन ह्मणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें ह्मणतील ॥३॥करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥४॥तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥
तू आह्मां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥तुका ह्मणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरि गीत गाइप तुझे ॥२॥तुका ह्मणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा॥२॥तुका ह्मणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
यालागीं आवडी ह्मणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥३॥तुका ह्मणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥४॥
झांकूनियां नेत्र काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥१॥रामनाम ह्मणा उघड मंत्र जाणा । चुकती यातना गर्भवास ॥ध्रु.॥मंत्र यंत्र संध्या करिसी जडीबुटी । तेणें भूतसृष्टी पावसील ॥२॥तुका ह्मणे ऐक सुंदर मंत्र एक । भवसिंधुतारक रामनाम ॥३॥
पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ब्राह्मणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥तुका ह्मणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥२॥तुका ह्मणे एके वेळे देइप भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥३॥
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि जाले ॥२॥तुका ह्मणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥३॥
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥१॥भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥तुका ह्मणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥
आविसाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका ह्मणे सुखा पार नाहीं ॥३॥
जायाचें शरीर जाईल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥कृपेचे सागर तुह्मी संत सारे । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥तुका ह्मणे ऐसें करावें निर्वाण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । ह्मणोनि पायांसी अंतरलों ॥३॥अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥सांचलिया धन होईल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥तुका ह्मणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥तुका ह्मणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥
कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥भक्त जाय सदा हरि कीर्ति गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मागाअ चालताहे संगें हरि ॥३॥तुका ह्मणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥
बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥
हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥तुका ह्मणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥
खिस्तीचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥२॥आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥तुका ह्मणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥
जगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥तुका ह्मणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥३॥
हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥तुका ह्मणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥तुका ह्मणे तरि वत्र्तूनि निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥४॥
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥तुका ह्मणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥२॥वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥
मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥१॥काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥नाना छंद अंगीं बैसती विकार । छिळयेले फार तपोनिधि ॥२॥तुका ह्मणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥
काय वांचोनियां जालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरि ॥१॥जातां भलें काय डोळियांचें काम । जरि पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥काय मुख बिळ श्वापदाचे धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥तुका ह्मणे पैं या पांडुरंगाविण । न वचे चि क्षण जीव भला ॥३॥जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुह्मीं ॥१॥काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥तुका ह्मणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥
कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं ह्मणती एक ॥२॥बुडविली भिक्त म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥न करावी कथा ह्मणती एकादशी। भजनाची नासी मांडियेली ॥४॥न जावें देउळा ह्मणती देवघरीं । बुडविलें या परी तुका ह्मणे ॥५॥
नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥न करिसी तरि हेंचि कोडें मज । भिक्त गोड काज आणीक नाहीं ॥२॥करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला
ऐसें
— असे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
तैसें
— तसे
माया
— भासमान करणारी शक्ती
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जैसें
— जसे
येर
— दुसरा, इतर
घडे
— घडते, शक्य होते
देखोनि
— पाहून
ठायीं
— ठिकाणी
स्वधर्म
— आपल्या स्थानाला उचित असलेले कर्तव्य
केवीं
— कसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
वरी
— वर; शिवाय
दिठी
— दृष्टी, नजर
कीजे
— केले जाते
तेवीं
— त्याप्रमाणे
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
जंव
— जोपर्यंत

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा