करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥तुका ह्मणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥२॥तुका ह्मणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥
नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥दंभिस्थती भलत्या भावें । मज हरिजन ह्मणावें ॥२॥तुका ह्मणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥३॥
नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥१॥ह्मणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥तुका ह्मणे सत्ता । वरी असते बहुतां ॥३॥
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥ह्मणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥तुका ह्मणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥३॥
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥प्रकाराचें तीन । तुका ह्मणे केलें जन ॥३॥
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥बीज पृथिवीच्या पोटीं । तुका ह्मणे दावी दृष्टी ॥३॥
विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥१॥देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥तुका ह्मणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥२॥तुका ह्मणे माया । होय दासी लागे पायां ॥३॥
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥तुका ह्मणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥तुका ह्मणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥तपें इंिद्रयां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥धर्म सत्त्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥६॥तुका ह्मणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥७॥
सोडिला संसार । माया तयावरि फार ॥१॥धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥तुका ह्मणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥
बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥२॥तुका ह्मणे आतां । आह्मां जीवन शरणागतां ॥३॥
पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥१॥करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥तुका ह्मणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥
मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥१॥घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाहए रंग ॥ध्रु.॥अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥तुका ह्मणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥१॥आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥तुका ह्मणे नवविध । भक्ती जाणे तो चि शुद्ध ॥३॥
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ध्रु.॥अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥तुका ह्मणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥तुका ह्मणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥तुका ह्मणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥करुणावचनें । म्यां भाकावीं तुह्मां दीनें ॥२॥तुका ह्मणे घेइप । माझें थोडें फार ठायीं ॥३॥
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥गात नाचत विनोदें । टाळघागयांच्या छंदें ॥२॥तुका ह्मणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥
मुक्त कासया ह्मणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥तुका ह्मणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥तुका ह्मणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥तुका ह्मणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥तुका ह्मणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥तुका ह्मणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥
पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥१॥ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥तुका ह्मणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥तुका ह्मणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥
वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥तुका ह्मणे हाडें । कुतया लाविलें झगडें ॥३॥
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥न वर्जितदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥नव्हे एकदेशी । तुका ह्मणे गुणदोषीं ॥३॥
आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥तुका ह्मणे भुली । इच्या उफराटएा चाली ॥३॥
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥तुका ह्मणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥तुका ह्मणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥
नेणती वेद श्रुति कोणी । आह्मां भाविकां वांचुनी ॥१॥रूप आवडे आह्मांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥२॥तुका ह्मणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥तुका ह्मणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
घेइप माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥मना तेथें धांव घेइप । राहें विठोबाचे पायीं ॥३॥तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥तुका ह्मणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥तुका ह्मणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥१॥पाहा विचारूनि देवा । नको आह्मांसवें दावा ॥ध्रु.॥तुज बोल न बोलवे। आह्मां भांडायाची सवे ॥२॥तुका ह्मणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥
तुज मागणें तें देवा । आह्मां तुझी चरणसेवा ॥१॥आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ती चारी ॥ध्रु.॥संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥तुका ह्मणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥तुका ह्मणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥अपराधाच्या कोटी । तुका ह्मणे घालीं पोटीं ॥३॥
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥तैसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥
नवां नवसांचीं । जालों तुह्मासी वाणीचीं ॥१॥कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥३॥
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥तुका ह्मणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥शरण आलों आतां धांवें । तुका ह्मणे मज पावें ॥५॥
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥त्याचा हा चि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥नामरूपा केला ठाव। तुज कोण ह्मणतें देव ॥२॥तुका ह्मणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥
आपुलें मागतां । काय नाहीं आह्मां सत्ता ॥१॥परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥तुका ह्मणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥तुका ह्मणे बळी । तो गांढएाचे कान पिळी ॥३॥
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥सर्व- साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥२॥करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥३॥हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥ह्मणवी हरिचा दास । तुका ह्मणे धन्य त्यास ॥५॥
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥तुका ह्मणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥तैसा तूं चि आह्मांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥तुका ह्मणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥२॥तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥
गाढवाचे घोडे । आह्मी करूं दृष्टीपुढें ॥१॥चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥तुका ह्मणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥
बाईल मेली मुक्ती जाली । देवें माया सोडविली ॥१॥विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसयाचें काज ॥ध्रु.॥पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥२॥माता मेली मज देखतां । तुका ह्मणे हरली चिंता ॥३॥
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥१॥करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥२॥तुका ह्मणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥तुका ह्मणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥अंगुळिया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥नपुंसकासाठीं । तुका ह्मणे न लगे जेठी ॥३॥
वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥१॥तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें ॥ध्रु.॥जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥२॥गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥३॥जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजायंत्र ॥४॥साधनाच्या ओढी । डोळियांच्या मोडामोडी ॥५॥तुका ह्मणे देहीं । संत जाहाले विदेही ॥६॥
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥२॥तुका ह्मणे ठेवी तैसें । आह्मी राहों त्याचे इच्छे ॥३॥
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥तुका ह्मणे तइप । सिद्धि वोळगती पायीं ॥३॥
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥पूजी प्रतिमेचे देव । संत ह्मणती तेथें भाव ॥ध्रु.॥विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥तुका ह्मणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥तुका ह्मणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥तुका ह्मणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥
टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥१॥तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥२॥तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥१॥धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥२॥गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥६॥तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥७॥शाक्तावर - अभंग १३
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ह्मणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥६॥पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥७॥कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥८॥शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥९॥विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥१०॥योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥११॥वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥तुका ह्मणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंिद्रयें ॥ध्रु.॥क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥तुका ह्मणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥३॥
ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥१॥सांडुनियां रामराम । ब्राह्मण ह्मणती दोमदोष ॥ध्रु.॥शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥तुका ह्मणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥करितां पाप न धरी शंका। ह्मणे तुका कोणी ही ॥३॥
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥तुका ह्मणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥तिची त्या पडली सवे । मागें धांवें ह्मणोनि ॥ध्रु.॥शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥तुका ह्मणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥
हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥तुका ह्मणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥७॥
कांद्यासाठी जालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥पूजेलागीं द्रव्य मागे।काय सांगे शिष्यातें ॥२॥तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा॥३॥
सांडुनियां पंढरीराव । कवणातें ह्मणों देव ॥१॥बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव ह्मणतां ॥ध्रु.॥सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥तुका ह्मणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥
बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥तुका ह्मणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥रिक्षता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥तुका ह्मणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥३॥
नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥२॥तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥ ॥१३॥
पाखांडएांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥तुका ह्मणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥मारिती तोडिती झोडिती निष्ठ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अिग्नस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥ह्मणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥
अल्प माझी मती । ह्मणोनि येतों काकुलती ॥१॥आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥२॥तुका ह्मणे दया । मज करा अभागिया ॥३॥
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥तुका ह्मणे माझ्या असांवल्या बाहएा । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥३॥
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥तुका ह्मणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥ ॥१३॥
तुझे वणूप गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥२॥ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । ह्मणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥तुका ह्मणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । ह्मणोनियां माप भक्ती केलें ॥१॥भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥२॥तुका ह्मणे आह्मी भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥
देवा ऐसा शिष्य देई । ब्रह्मज्ञानी निपुण पाहीं ॥१॥जो कां भावाचा आगळा । भक्तीप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥२॥ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥३॥
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥मोक्षसिद्धि तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥२॥नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म तें केवळ नांदतसे ॥४॥तुका ह्मणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥५॥
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥काय करूं देवा ऐसी नाहीं शिक्त । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥तुका ह्मणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥
शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥२॥तुका ह्मणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥तुका ह्मणे श्वाना िक्षरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥३॥
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
आतां असों मना अभक्तांची कथा । न होइप दुश्चिता हरिनामीं ॥१॥नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्तांचें सर्वकाळ ॥२॥तुका ह्मणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥तुका ह्मणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाइप ॥३॥
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥तुका ह्मणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तो चि जाणे ॥४॥
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥तुका ह्मणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.