नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥१॥मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्यां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥तुका ह्मणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥तुका ह्मणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥३॥
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥तुका ह्मणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥२॥तुका ह्मणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥३॥
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । ह्मणऊनि लाता मागें सारी ॥२॥तुका ह्मणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥३॥
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥तुका ह्मणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥३॥
अवघा वेंचलों इंिद्रयांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥तुका ह्मणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥होईल येणें कळसा आलें । िस्थरावलें अंतरीं ॥२॥तुका ह्मणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥दाशत्त्वें दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥तुका ह्मणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥३॥
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥२॥तुका ह्मणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥तुका ह्मणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥२॥तुका ह्मणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥
आह्मां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥तुका ह्मणे येथें खयाचा विकरा । न सरती येरा खोटएा परी ॥३॥
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥तुका ह्मणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥३॥
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥२॥तुका ह्मणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥तुका ह्मणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥तुका ह्मणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥तुका ह्मणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥३॥पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥४॥तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरूं त्याला ॥५॥
भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥माझी माझी ह्मणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥तुका ह्मणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥३॥
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥२॥सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका ह्मणे स्मरीला ॥३॥
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥१॥भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥तुका ह्मणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥३॥
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥१॥लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥२॥तुका ह्मणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥तुका ह्मणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥तुका ह्मणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥२॥तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
आह्मां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥२॥तुका ह्मणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥३॥
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥तुका ह्मणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥३॥
तुह्मां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥नसतें सांभाळिलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥२॥तुका ह्मणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥३॥
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥२॥आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥३॥
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥
भोगावरि आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥३॥आवघे चि वाण आले तुह्मां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥४॥तुका ह्मणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥
कां हो एथें काळ आला आह्मां आड । तुह्मांपाशीं नाड करावया ॥१॥कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥४॥तुका ह्मणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥५॥
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥३॥तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देइप भाव पांडुरंगा ॥४॥
दंभें कीर्ति पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥२॥कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥तुका ह्मणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥
धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥१॥ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥२॥तुका ह्मणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥१॥होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥तुका ह्मणे आह्मी लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥तुका ह्मणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चित्त समाधान ॥३॥
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥सकळां इंिद्रयां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥तुका ह्मणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥
होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥तुका ह्मणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥तुका ह्मणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥
बळें बाहएात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥२॥प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥३॥तुका ह्मणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥
ह्मणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥२॥भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥तुका ह्मणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥
न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कइप कासयानें ॥ध्रु.॥साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥तुका ह्मणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥
चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥तुका ह्मणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥३॥
उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥१॥पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥२॥तुका ह्मणे आह्मांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥३॥
काय विरिक्त कळे आह्मां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥२॥कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥३॥कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥४॥तुका ह्मणे आह्मां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥२॥सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥तुका ह्मणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥तुका ह्मणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥
उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥१॥उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥२॥तुका ह्मणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥१॥ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥२॥तुका ह्मणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥
अनाथांची तुह्मां दया । पंढरीराया येतसे ॥१॥ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥तुका ह्मणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥२॥तुका ह्मणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥
हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥२॥तुका ह्मणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥३॥
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥२॥तुका ह्मणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥३॥
धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥तुका ह्मणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥३॥
दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंिद्रयां ॥२॥कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पित्त । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥तुका ह्मणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीणाअ प्रकाशाची ॥३॥
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥२॥बाळाचे सोईतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥३॥गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥४॥तुका ह्मणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥२॥तुका ह्मणे आह्मां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥इंिद्रयांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥तुका ह्मणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥
बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पाहेरा ओढाळांचा ॥१॥बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥२॥नाहीं कोठें िस्थर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥वेगळाल्या खोडी केली तडातडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥२॥खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥३॥शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥४॥तुका ह्मणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥
आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥तुका ह्मणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥२॥। तुका ह्मणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥३॥
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥१॥आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥२॥तुका ह्मणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
उचित न कळे इंिद्रयाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥२॥तुका ह्मणे आह्मी तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥ह्मणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥२॥तुका ह्मणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज िस्थत येईल कळों ॥३॥
गावे ह्मणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥तुका ह्मणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥२॥इंिद्रयांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥तुका ह्मणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥५॥
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न ह्मणे राम ॥ध्रु.॥पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥अझुन तरि मुका । कां रे जालासि ह्मणे तुका ॥५॥
वांटा घेइप लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥नाहीं सारिलें तोंवरी । धांव घेइप वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥फट लंडी ह्मणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥तुका ह्मणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥तुका ह्मणे कुचर दाणा । तैसा ह्मणा डेंग हा ॥३॥
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिया ऐसी केवीं गारगोटी ॥१॥मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ध्रु.॥काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥३॥
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥२॥करुनि वस्ती बाजारीं । ह्मणवी कासया निस्पृही ॥३॥प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥तुका ह्मणे होंई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥
तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥१॥काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥२॥तुका ह्मणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥तुका ह्मणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥४॥
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तइप ॥२॥तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥३॥
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं िस्थर ॥१॥न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका ह्मणे ॥३॥
जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥१॥बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥
द्रव्याचा तो आह्मी धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥तुका ह्मणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । ह्मणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥तुका ह्मणे घेइप राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥१॥एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥तुका ह्मणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा ह्मणउनी ॥३॥
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥३॥
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥३॥तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥१॥संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥४॥
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥३॥तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥
धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥साधनाची सिद्धि । मोन करा िस्थर बुद्धि ॥४॥तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥५॥
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥३॥
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥२॥काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥४॥
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥२॥तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥१॥शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडेती ॥३॥न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥तुका ह्मणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.