तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥वोळगती जया अष्टमासिद्धि । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥३॥लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥१॥शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥३॥मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥तुका ह्मणे माझें । काय होईल तुह्मां ओझें ॥३॥
एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥आह्मी देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥तुका ह्मणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥२॥तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥
कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥१॥मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥
आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥
न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥१॥पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥२॥तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥३॥
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥१॥आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥२॥तुका ह्मणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥२॥तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥१॥जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥२॥महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥३॥तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥३॥
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥३॥
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥२॥आला नांवा रूपा । तुका ह्मणे जाला सोपा ॥३॥
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥१॥विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥२॥तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥१॥सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥२॥तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥३॥
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि। लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका ह्मणे ॥४॥
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥धन्यधन्य हरिचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥२॥रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥५॥
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥१॥पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥२॥तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥२॥तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥१॥बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥२॥तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥२॥तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥३॥
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥२॥तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥१॥तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥२॥तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥३॥
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भिक्तरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥ह्मणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥तुका ह्मणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥३॥
लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥१॥ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥३॥
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥२॥अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥३॥
आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥१॥जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥
तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥३॥
तुह्मां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥२॥तुका ह्मणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥२॥तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥
आह्मी शिक्तहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥माझें मज देइप देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥नाहीं येत बळा । आतां तुह्मासी द्मगोपाळा । तुका ह्मणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥
ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥
काय आतां आह्मीं पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥तुका ह्मणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥
वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥द्याल जरि तुह्मी धीर । होईल िस्थर मन ठायीं ॥२॥तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥२॥तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥२॥तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥२॥आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥२॥अरे भक्तापराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥३॥
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥तुका ह्मणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥युक्त आहार वेहार । नेम इंिद्रयांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥देह समर्पिजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥३॥
मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥२॥मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥१॥तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धि करुनी ठेवा ॥ध्रु.॥विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥२॥तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥३॥
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥१॥उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥२॥जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥३॥बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥१॥कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥३॥तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥१॥जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥३॥
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥४॥
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥१॥तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥तुका ह्मणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥३॥
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥३॥
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥३॥
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥२॥तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥३॥
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥तुका ह्मणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥
करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥२॥निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥तुका ह्मणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न ह्मणावें । ऐसें तंव आह्मां सांगितलें नाहीं देवें ॥१॥ह्मणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥येथें नाहीं लाज भिक्तभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥३॥जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका ह्मणे येर जन्मा आले पाषाण ॥५॥
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥तुका ह्मणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ध्रु.॥वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन िस्थर नाहीं ॥ध्रु.॥बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥२॥होईल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हा चि मज ॥३॥तुका ह्मणे मी कमाईचे हीण। ह्मणऊनि सीण करीं देवा ॥४॥
ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥२॥कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥३॥तुका ह्मणे वांयां जालों भूमी भार । होईल विचार काय नेणों ॥४॥
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइप निवडूनि ॥२॥उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥जन वन आह्मां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥ह्मणऊनिं मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥ह्मणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥तुका ह्मणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥
न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥कांहीं नेणें परि ह्मणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥२॥संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥३॥मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥४॥तुका ह्मणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥५॥
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥२॥इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥३॥भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका ह्मणे आतां शरण आलों ॥४॥
तुझा दास ऐसा ह्मणती लोकपाळ । ह्मणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥तुका ह्मणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥२॥जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥३॥तुका ह्मणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥४॥
नको ब्रह्मज्ञान आत्मिस्थतिभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥२॥पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥४॥
मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥१॥पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥३॥प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥४॥पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥६॥
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥न करावी निरास न धरावें उदास । देइप याचकास कृपादान ॥३॥तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देइप पायापासीं ठाव देवा ॥४॥
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥१॥कुळधर्म भिक्त कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥२॥कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥३॥तुका ह्मणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥४॥
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.